प्रस्तावना
“नैनं दहति पावकः...” हेंच
तर म्हटतोय प्रस्तुत कादम्बरीचं एक पात्र – वोलान्द हस्तलिखिताबद्दल, की “हसतलिखितं जळंत
नसतात”. हेच सत्य आहे, न केवळ आपल्या नायकाच्या हस्तलिखिताच्या संदर्भात, पण सम्पूर्ण
कादम्बरीच्याही संदर्भात; जिला तिच्या लेखकाने – हताश, निराश, आहत मिखाइल
बुल्गाकोवने खरोखरंच शेकोटीत झोकून दिलं होतं, आणि जिची पुनर्रचना फक्त
त्याच्या स्मरणशक्तीमुळेच शक्य झाली होती.
मिखाइल बुल्गाकोवने तब्बल
बारा वर्षांत ही कादम्बरी लिहिली आणि त्याच्या दुप्पट कालखण्ड सोवियत संघांत
तिच्या प्रकाशनासाठी लागला. सन् 1967मधे जेव्हां कादम्बरी प्रकाशित झाली, तर ही न केवळ सोवियत, अपितु
विश्वसाहित्यालापण नवं वळण देणारी ठरली. कदाचित तेव्हांपासूनंच हा आभास होऊं लागला
होता,
की
सोवियत संघाच्या साहित्यिक, सामाजिक आणि राजनीतिक जीवनांत परिवर्तन येण्यांत आहे, जे खरोखरंच आलं सन्
1986-87पासून. ही कादम्बरी न केवळ बुल्गाकोवच्या, पण तत्कालीन सामाजिक जीवनाचं
खरं खुरं चित्र प्रस्तुत करते.
जरी ही रचना केवळ सत्यावरंच
आधारित आहे,
तरीही तिला
आश्चर्याच्या,
रहस्यांच्या
इतक्या वेष्टनांमधे गुण्डाळून प्रस्तुत केलेलं आहे, की ती यथार्थ कमी आणि कल्पना
जास्त वाटते. बुल्गाकोवने लाचखोर, हावरंट, खोटारड्या लोकांच्या प्रति जराही दया-माया न
बाळगतां त्यांना निर्दयतेने दंडित केलं आहे. पण हे सगळं वाचताना पाठक ना तर गंभीर
होतो,
ना दुःखी, त्याला रागसुद्धां
येत नाही. साखरेच्या पुडीतून कडू औषध घेतल्याची जाणीव होते. मास्टर आणि
मार्गारीटाच्या जीवनाचा सुखद शेवट एका गोड भावनेला जरूर जन्म देतो.
सन् 1891मधे वर्तमान
उक्राइनच्या कीएव शहरांत जन्मलेले मिखाइल बुल्गाकोव व्यवसायाने डॉक्टर होते. रशियन
क्रांतीच्यानंतर सन् 1921मधे मॉस्कोला येईपर्यंत त्यांने डॉक्टरीबरोबर लेखन
कार्याचासुद्धां आरंभ केला. मॉस्कोत आल्यावर त्यांने स्वतःला पूर्णपणे लेखन
कार्याला समर्पित केलं. अनेक नाटक आणि कादंब-यांच्या लेखकाने मॉस्कोंत आल्यावर
वर्तमानपत्रांमधे विनोदी लेखांपासून आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आरंभ केला होता.
त्याबरोबरंच अनेक गोष्टीपण लिहिल्या, ज्यांत ब-याच गोष्टी त्यांच्या डॉक्टरी
व्यवसायातल्या आठवणींवर आधारित होत्या.
सन् 1921मधे पहिली कादम्बरी ‘श्वेत गार्ड’ प्रकाशित झाली. सन् 1924-26च्या
कालखण्डांत त्यांने लघु कादम्ब-या ‘दिआबलियादा‘ (सैतानपणा) , ‘रोकावीये याइत्सा’ (दुर्भाग्यशाली
अण्डे) आणि ‘सबाच्ये सेर्द्त्से’ (श्वान-हृदय)
लिहिल्या.
तत्कालीन सोवियत जीवनावर
निर्ममतेने प्रहार केल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होऊं लागले. त्यांच्या
नाटकांचं मंचन थांबवण्यांत आलं, ज्यांत प्रमुख होते ‘ब्येग’ (पलायन), ज़ोयकिना क्वार्तीरा
(ज़ोयाचा फ्लैट),
द्नी
तूर्बिनीख (तूर्बिन परिवाराचे शेवटचे दिवंस) आणि ‘बग्रोवी अस्त्रोव’ (लाल द्वीप).
काही शुभचिंतकांनी त्यांना
स्टालिनच्या स्तुतींत एक नाटक लिहायला सुचवलं, पण ह्या स्वाभिमानी लेखकाने
ते मान्य नाही केलं आणि आपली दृष्टी गमावूनसुद्धां, अत्यंत कठीण अश्या आजाराला
तोंड देत,
त्यांने
आपली महानतम कादम्बरी पूर्ण केली आणि सन् 1940 मधे ह्या जगाचा निरोप घेतला.
बुल्गाकोवच्या ह्या
कादम्बरीला भारतीय पाठकांसमोर प्रस्तुत करणं मला माझं कर्तव्यंच वाटलं आणि
म्हणूनंच मी थेट रशियनमधून भाषांतर करून ह्या महान लेखकाला श्रद्धांजली देण्याचा
प्रयत्न केला आहे. आधी हिंदींत ( सन् 1998, आणि मग 2016मधे) भाषांतर
केल्यावर आत्ता सन् 2017-18मधे कादम्बरी मराठी वाचकांच्या समोर प्रस्तुत करतांना
मनांत सम्मिश्र भावना दाटून आल्या आहेत. वाचक माझ्या ह्या प्रयासांत निहित भावनेला
समजून घेतील अशी आशा करूं या!
अनुवादिकेने वाचकांना मिखाइल
बुल्गाकोवच्या न केवळ रचनेचा, पण त्याच्या साहित्यिक विशेषतांचा, भाषा-शैलीचाही परिचय
देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून हा भावानुवाद नसून शब्दानुवाद करण्यांत आला
आहे.
तत्कालीन मॉस्कोशी संबंधित
प्रकरणांची शैली,
प्राचीन येर्शलाइमशी संबंधित कथानकाच्या शैलीपेक्षा वेगळी आहे. ह्या भिन्नतेला
कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यत्र-तत्र इंग्रजी शब्दसुद्धां वापरण्यांत आले
आहेत,
जे
आपल्या भाषेंत सामावून गेले आहेत. कथानक इतकं सशक्त आहे, की आपण कादम्बरी पूर्ण
केल्याशिवाय सोडणार नाही, अशी आशा आहे.
आ. चारुमति रामदास, हैदराबाद
मास्टर आणि
मार्गारीटा
लेखक
मिखाइल बुल्गाकोव
मराठी भाषांतर
आ. चारुमति रामदास
मास्टर
आणि मार्गारीटा
प्रथम
भाग
...तर, शेवटी,
तू आहेस तरी कोण?
- मी –
त्या शक्तीचा अंश आहे,
जी सदैव
वाईट इच्छिते
आणि सदैव
चांगलेच करते...
-ग्योथ,
फ़ाउस्ट
एक
अनोळखी
व्यक्तींशी कधींच बोलूं नका
वसंत
ऋतूतील एका अभूतपूर्व अशा उष्ण सूर्यास्ताचा वेळेस मॉस्कोच्या पत्रियार्शी
तलावाच्या1 काठावरच्या पार्कमधे दोन नागरिक प्रकट झाले.
त्यांच्यापैकी पहिला,
ज्याने राखाडी रंगाचा उन्हाळ्याचा सूट
घातला होता, कमी उंचीचा होता, लट्ठ, टकल्या, आपली सुंदर, सुबक हैट हातांत केक
सारखी धरली होती, चिकण्या,
चमकदार चेहर्यावर शिंगांच्या काळ्या
फ्रेमचा खूप मोठा चष्मा लावला होता. दुसरा, रुंद खांदे आणि लाल
केस असलेला, ज्यांच्या उद्दाम लटा त्याच्या डोक्यावर मागे
सरकलेल्या चौकटीच्या टोपीतून बाहेर निघत होत्या, त्याने चौकटीचांच
शर्ट आणि चुरगळलेली पांढरी विजार घातली होती. पायांत काळ्या चपला होत्या.
पहिला, कुणी आणखी नसून,
मिखाइल अलेक्सांद्रोविच बेर्लिओज़2, मॉस्कोच्या एका प्रख्यात साहित्यिक संगठनाचा अध्यक्ष होता. ह्या साहित्यिक
संगठनाचे संक्षिप्त नाव ‘मॉसोलित’3
असे होते. बेर्लिओज़ एका लट्ठ मासिक
पत्रिकेचा संपादकदेखील होता. त्याचाबरोबर चालणारा तरुण, कवी इवान
निकोलायेविच पनीरेव होता,
जो ‘बिज़्दोम्नी’4 (घर नसलेला) ह्या उपनावाने कविता लिहायचा.
किंचित
हिरव्या लिण्डन वृक्षांच्या सावलींत येतांच, दोन्हीं लेखक
सगळ्यांत आधी चटक रंगांने रंगवलेल्या ‘बिअर आणि पाणी’ असा बोर्ड लावलेल्या
एका स्टॉलमधे घुसले.
पण
आधी मे महिन्याच्या ह्या संध्याकाळच्या संदर्भांत एक विचित्र गोष्ट तर सांगून
टाकूं. न केवळ ह्या स्टॉलच्या जवळपास,
पण वृक्षांनी वेढलेल्या संपूर्ण आळीमधे
आणि तसेंच समानांतर जात असलेल्या ‘मालाया ब्रोन्नाया’ रस्त्यावरसुद्धां
एकही व्यक्ति दिसंत नव्हतां. त्या वेळेस, जेव्हां प्रकृति थकून
गेलेली होती, जेव्हां श्वास घ्यायचीसुद्धां शक्ति उरली नव्हती, जेव्हां मॉस्कोला भस्म करून सूर्य कोरड्या धुक्यांत ‘सादोवाया’ रिंगरोडवर लपून जायला अधीर झालेला होता, कुणीही बेंचवर नव्हतं बसलं. अगदी रिकामी होती आळी.
“नरज़ान”
(एक प्रकारचे शीतल पेय-अनु.) द्या.” बेर्लिओज़ म्हणाला.
“नरज़ान
नाहीये,” स्टॉलमधे उभ्या असलेल्या सेल्सगर्लने न जाणे कां चिडून
म्हटलं.
“बिअर
आहे?” कर्कश आवाजांत बिज़्दोम्नीने विचारलं.
“बिअर
संध्याकाळपर्यंत येईल,” तिने उत्तर दिलं.
“मग
काय आहे?” बेर्लिओज़ने पुन्हां विचारलं.
“ज़र्दाळूचं
सरबत, फक्त गरम...” सेल्सगर्ल म्हणली.
“ओह, द्या, तेंच द्या,
लवकर द्या!”
ज़र्दाळूचं
सरबत, खूप सारा पिवळा-पिवळा फेस काढंत असलेलं, न्हाव्याच्या दुकानांतून येत असलेल्या वासाचं. गटागट पिऊन साहित्यकार उचक्या
देऊं लागले, आणि पैसे देऊन जवळंच पडलेल्या बेंचवर बसले. तोंड
तलावाकडे आणि पाठ ब्रोन्नाया स्ट्रीटकडे होती.
तेवढ्यांत
दुसरी विचित्र गोष्ट घडली,
जिचा संबंध एकट्या बेर्लिओज़शी होता.
त्याच्या उचक्या एकदम बंद झाल्या. हृदय जोराने धडधडकरून जणु कुठेतरी क्षणभरासाठी
लुप्त झालं आणि जेव्हां परंत आलं तर जणू त्याच्यांत एक बोथट सुई घुसलेली होती.
शिवाय बेर्लिओज़ला एका निराधार,
परंतु प्रचण्ड भीतिने वेढून टाकलं, की त्याला कुठेही लक्ष न देतां पत्रियार्शीवरून पळून जावसं वाटलं. ह्या भीतीचं
कारण न समजून बेर्लिओज़ने व्याकुळतेने इकडे तिकडे बघितलं. त्याचा चेहरा विवर्ण
झाला. त्याने रुमालाने कपाळावरचा घाम पुसला, विचार केला, “हे मला काय होतंय?
आजपर्यंत असं कधीच नाहीं झालं...हृदय
चावटपणा करतंय... थकव्यामुळे मी पस्त झालोय, सगळं काही सोडून
किस्लोवोद्स्कला5 पळून जावं.”
तेवढ्यांत
त्याच्या चारीकडची कोंदट,
गरम हवा जणु त्याच्या समोर दाट होत
गेली आणि तिच्यातूंन एक चमत्कारिक दिसणारा पारदर्शी व्यक्ति प्रकटला. लहानश्या
डोक्यावर जॉकीसारखी टोपी,
चौकड्या-चौकड्यांचे आखूड हवाई
जैकेट...उँची सात फुट,
खांदे आखूड, अविश्वसनीय प्रकारे
कृश, आणि व्यक्तित्व, कृपया लक्ष द्या, एकंदरीत उपहास करणारे व्यक्तित्व होते.
बेर्लिओज़ची
जीवन पद्धति अशा प्रकाराची होती,
की त्याला चमत्कार बघण्याची सवय
नव्हती. भीतिमुळे आणखीनंच निस्तेज होऊन, त्याने डोळे
विस्फ़ारले आणि विचार केला: “हे अशक्य आहे!...”
पण
हे सत्य होतं आणि तो उंच माणूस,
ज्याच्या शरीराच्या आरपार बघता येत
होतं, ज़मिनीला स्पर्श न करतां बेर्लिओज़च्या डावीकडे –उजवीकडे
झुलूं लागला.
बेर्लिओज़ला
इतकी भीति वाटली, की त्याने आपले डोळे बंद करून घेतले. आणि जेव्हां डोळे उघडले तेव्हां सगळं संपलं होतं...भ्रम वितळून गेलेला होता, चौकड्यांचे जैकेटवाला लम्बू गायब झाला होता आणि हृदयांत घुसलेली सुईपण निघून
गेली होती.
“छिः
छिः, डेविल!” सम्पादक उद्गारला, “इवान, माहितीये, ह्या उष्णतेमुळे मला हार्ट अटैकच जवळ जवळ आलांच होता!
काहीतरी वशीकरणासारखं...” त्याने हसण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही डोळ्यांत भीतीची सावली होती, हात कापंत होते.
पण
हळू-हळू तो सावरला,
रुमाल झटकून थोडीशी हिम्मत करंत
म्हणाला, “हं,
तर मग...” आणि त्याने ज़र्दाळूच्या
सरबतामुळे मधेच तुटलेल्या संभाषणाचे सूत्र संभाळले.
नंतर
असं कळलं, की संभाषण येशू ख्रिस्ताबद्दल होतं. सम्पादकाने कवीला
आपल्या पत्रिकेच्या आगामी अंकासाठी एक लांबकचक, धर्मविरोधी कविता
लिहिण्यासाठी अनुबंधित केलं होतं. इवान निकोलायेविचने थोड्यांच वेळांत अशी एक
कविता लिहून सुद्धां टाकली,
पण सम्पादकाला ती जरासुद्धां आवडली
नाही. कारण असं होतं की ‘बिज़्दोम्नी’ने आपल्या कवितेच्या
प्रमुख पात्राला – येशूला काळ्या रंगांत, म्हणजे अत्यंत घृणित, नीच स्वरूपांत प्रस्तुत केलं होतं आणि सम्पादक महाशयांची इच्छा होती की
त्याने कविता पुन्हां लिहावी. आता ह्या पार्कमधे सम्पादक कवीला येशूबद्दल भाषण देत
होता, ह्या उद्देश्याने, की कवीला त्याची चूक
दाखवेल. हे सांगणं कठीण आहे,
की इवान निकोलायेविचला कोणच्या शक्तीने
असली कविता लिहिण्यासाठी प्रेरित केलं,
कदाचित् ही त्याच्या आविष्कार-प्रेमी डोक्यांची
देणगी होती, किंवा येशूबद्दलच्या अज्ञानामुळे असेल, पण त्याच्या कवितेत येशू एका जिवंत व्यक्तिप्रमाणे अवतरले होते, मात्र हे व्यक्तित्व कोणालांच आपल्याकडे आकर्षित करंत नव्हते. बेर्लिओज़ला हे
सिद्ध करायचं होतं की मुख्य प्रश्न येशूच्या व्यक्तित्वाबद्दल, आणि त्याच्या चांगल्या किंवा वाईट चित्रणाबद्दल सुद्धां नसून, हा आहे की व्यक्तिच्या स्वरूपांत येशू पृथ्वीवर कधीच अवतरित झालेले नाहीये.
त्यांच्याबद्दल प्रचलित सगळ्या गोष्टी फक्त कपोल-कल्पित आहे, मिथ्या आहे.
वाचकगण, कृपया लक्ष द्या,
की सम्पादकाचं वाचन खूप दांडगं होतं
आणि आपल्या ह्या ‘भाषणांत’
तो अत्यंत सुरेखपणे प्राचीन
इतिहासकारांचे संदर्भ देत होता. उदाहरणार्थ त्याने प्रसिद्ध इतिहासकार फिलौन
अलेक्सान्द्रीस्की6 आणि अत्यंत विद्वान अशा जोसेफ़ फ्लावी7 ह्यांच्या नावांचा उल्लेख केला, ज्यांनी एका शब्दानेही येशूच्या अस्तित्वाचा उल्लेख केलेला नाहीये. एका
प्रसिद्ध संदर्भाचा उल्लेख करताना मिखाइल अलेक्सान्द्रोविचने कवीला असं सुद्धां
सांगितलं की टेसिटसच्या8 प्रसिद्ध ‘एन्नल्स’च्या पंधराव्या खण्डाच्या चौवेचाळीसाव्या अध्यायांत, जिथे येशूला फासावर लटकावण्याचं वर्णन आहे, ती सुद्धां
वास्तविकता नाहीये. मूळ ‘होली बाइबल’मधे ह्याबद्दल काहींच
लिहिलेलं नाहींये...हे सगळं नंतरच्या आवृत्यांत भरले आहे.
कवी, ज्याच्यासाठी सम्पादक सांगत असलेल्या गोष्टी अगदी नवीन होत्या, आपले मोठे-मोठे हिरवे डोळे बेर्लिओज़वर रोखून लक्षपूर्वक ऐकत होता. तो मधून
मधून उचक्यापण देत होत्या. दर उचकी बरोबर ज़र्दाळूच्या सरबताला शिव्या देण्याचा
क्रमसुद्धा चालू होता.
“पूर्वेकडचा
असा एकही धर्म नाहीये,”
बेर्लिओज़ पुढे म्हणाला, “ज्यांत एखाद्या पवित्र युवतीने ईश्वराला जन्म दिला नसेल. ख्रिश्चन लोकांनी पण काहीही विचार न
करतां येशूचा निर्माण अशाच प्रकारे करून टाकला, जेव्हां येशू कधी
नव्हतेच. ह्याच मुद्द्यावर तुला विशेष जोर द्यायचा आहे...”
बेर्लिओज़चा
ज़ोरदार स्वर आळीत घुमंत होता. जसा जसा मिखाइल अलेक्सांद्रोविच पौराणिकतेच्या
जाळ्यांत अडकंत होता,
ज्यांत कोणी फक्त उच्च शिक्षित
व्यक्तीच आपली मान मुरगळू न देण्याची सावधगिरी बाळगून जाऊं शकतो, कवीला आणखी कितीतरी नवीन-नवीन आणि मजेदार गोष्टींचं आकलन होत होतं. दयाळु देव, तसेंच पृथ्वी आणि
आकाशाचा पुत्र – ओज़िरिसबद्दल9, फिनिशियन्सच्या फ़ामूस10 आणि मार्दूक11
ह्या देवांबद्दल कवीला सांगून झाल्यावर बेर्लिओज़ने कमी प्रसिद्ध, भयंकर देव वित्स्लिपुत्स्लिबद्दल12
सुद्धां सांगितलं, ज्याला एके काळी मैक्सिकोत अज़टेक लोक खूप मानायचे.
आणि
जेव्हां मिखाइल अलेक्सांद्रोविचने सांगितलं की वित्स्लिपुत्स्लिच्या प्रतिमेचा
निर्माण मळलेल्या पीठानी केला जात असे,
तेव्हांच आळीत एक माणूस दिसला.
नंतर, जेव्हां स्पष्ट सांगायचं तर खूप उशीर झालेला होता, अनेक संस्थांनी ह्या माणसाचे वर्णन प्रस्तुत केले. जर ह्या सगळ्या वर्णनांची
तुलना केली, तर आश्चर्यच होईल, कारण पहिल्या
वर्णनाप्रमाणे हा माणूस कमी उंचीचा होता, त्याचे दात सोनेरी
होते आणि तो उजव्या पायाने लंगडायचा;
दुस-या वर्णनांत हाच माणूस खूपंच उंच
होता, त्याचे दात प्लेटिनमचे होते आणि डाव्या पायाने
लंगडायचा. तिस-या वर्णनांत ह्या माणसाबद्दल कोणतीच विशेष गोष्ट नव्हती.
तात्पर्य
असें, की ह्यांच्यातील एकही वर्णन त्या माणसापर्यंत घेऊन
जाण्यास सफल नाहीं झाले.
सगळ्यांत
आधी: तो माणूस कोणत्याच पायाने लंगडंत नव्हता. त्याची उंची कमीपण नव्हती, आणि खूप जास्तसुद्धां नव्हती;
तो फक्त उंच होता. राहिला दातांचा
प्रश्न, त्याचे दात उजवीकडून प्लेटिनमचे आणि डावीकडून सोन्याचे
होते. त्याने राखाडी रंगाचा भारी सूट घातला होता. सूटच्याच रंगाचे विदेशी जोडे
होते, त्याच रंगाची टोपी कानावर झुकलेली, आणि बगलेत एक छडी दबलेली होती,
जिची मूठ कुत्र्याच्या डोक्यासारखी13 होती. दिसायला साधारण चाळीस वर्षाचा, चेहरा किंहित वाकडा,
दाढी-मिशा सफ़ाचट, केस काळे, उजवा डोळा – काळा, डावा – न जाणे कां
हिरवा, भुवया काळ्या, पण एक दुसरीपेक्षा
किंचित उंच होती. थोडक्यांत – परदेशी.
संपादक
आणि कवि ज्या बेंचवर बसले होते,
तिच्या जवळून जातांना परदेशी माणसाने
तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं,
तो थांबला आणि दोन पावलं दूर असलेल्या
बेंचवर बसला.
‘जर्मन...’ बेर्लिओज़ने विचार केला.
‘ब्रिटिश’, बिज़्दोम्नीने विचार केला,
‘ओफ़, ह्याला हातमोजांमधे
गरमपण नाहीं वाटंत!’
परदेशी14 माणूस ह्या दरम्यान तलावाच्या चारी बाजूला असलेल्या
उंच-उंच बिल्डिंग्सकडे बघंत होता. असं वाटंत होतं, की हे सगळं तो
पहिल्यांदा बघतो आहे आणि त्याला हे सगळं मजेदारपण वाटंत होतं.
त्याने
वरच्या मजल्यांकडे लक्ष देऊन पाहिलं,
जिथे खिडक्यांच्या काचांतून तुटलेल्या
आणि मिखाइल अलेक्सान्द्रोविचवरून नेहमीसाठी निघून गेलेल्या सूर्याचा प्रकाश
परावर्तित होत होता.,
मग त्याने आपली नज़र खाली वळवली, जिथे संध्याकाळच्या धूसर प्रकाशांत काचा काळ्या होत चालल्या होत्या. अनोळखी
माणूस न जाणे कां, हळूंच हसला. आपले डोळे बारीक करंत त्याने छडीच्या
मुठीवर हात ठेवले आणि हातांवर हनुवटी टेकवली.
“तू, इवान...” बेर्लिओज़ म्हणंत होता,
“खूप सुंदर आणि उपहासात्मक पद्धतीने
ईश्वराचे पुत्र समजल्या जाणार्या येशूच्या जन्माचं वर्णन केलं आहे, पण खरी गोष्ट तर अशी आहे,
की येशूच्या आधीपण ईश्वराच्या अनेक
पुत्रांचा जन्म झालेला होता,
जसं अडोनिस15, एटिस16, मित्राज़17. खरं म्हणजे त्यांच्यापैकी एकसुद्धां जन्माला नाहीं
आला, कोणीच नाहीं, येशूपण नाही.
त्याच्या जन्माचे, मागींच्या18 आगमनाचे वर्णन करण्यापेक्षां, हे जास्त ज़रूरी आहे,
की तू त्याच्या जन्माबद्दल प्रचलित असलेल्या
आधारहीन मान्यतांबद्दल लिही...नाहींतर तुझ्या गोष्टीतून असं वाटतंय की येशूचा
खरोखर जन्म झाला होता!...”
उचक्यांनी
त्रस्त बिज़्दोम्नीने आपला श्वास रोखून उचकी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम उलटंच झाला,
तो आणखीनंच जोरजोरांत आणि त्रासदायक
उचक्या देऊ लागला. अगदी तेव्हांच बेर्लिओज़चा जिभेला पण खीळ बसली, कारण की तो परदेशी माणूस अचानक उठून लेखकांकडे येऊं लागला.
दोघंही
विस्फ़ारित नेत्रांनी त्याच्याकडे बघू लागले.
“क्षमा
करा...” जवळ येत-येत तो परदेशी उच्चारांत म्हणाला, “अनोळखी असताना पण मी
हिम्मत करतोय...पण तुमच्या विद्वत्तापूर्ण संभाषणाचा विषय इतका मजेदार आहे की...”
त्याने
सौजन्याने आपली हैट काढली आणि दोन्हीं मित्रांसमोर उठून त्याचे अभिवादन
करण्याशिवाय पर्यायच नाहीं उरला.
‘नाहीं, कदाचित फ्रेंच आहे...’
बेर्लिओज़ने विचार केला.
‘पोलिश?’ बिज़्दोम्नी विचार करंत होता.
मी
असं म्हणेन, की कवीला प्रथम दृष्टीतंच परदेशी किळसवाणा वाटला, पण बेर्लिओज़ला तो जवळ-जवळ आवडला,
म्हणजे असं नाही की आवडला, पण...कसं...मजेदार वाटला,
कदाचित.
“मला
बसायची परवानगी द्याल कां?”
अत्यंत गोडीने परदेशी माणसाने विचारलं.
मित्रगण अनिच्छेने थोडंसं इकडे-तिकडे सरकले. परदेशी माणूस आरामांत दोघांच्या मधे
बसून गेला आणि लगेच संभाषणाला सुरुवात केली.
“जर
माझ्या ऐकण्यांत चूक नाहीं झाली,
तर तुम्हीं हे म्हणंत होता, की येशू जगांत नव्हतेच?”
अनोळखी माणसाने आपला हिरवा डोळा
बेर्लिओज़कडे वळवून विचारलं.
“नाहीं, तुम्हीं बरोबरंच ऐकलंय,”
बेर्लिओज़ने अत्यंत शालीनतेने उत्तर
दिलं, “मी बिल्कुल हेंच म्हटलं होतं.”
“आह, किती मनोरंजक!” अनोळखी उद्गारला.
‘ह्याला कोणचा सैतान
पाहिजे?’ बिज़्दोम्नीने विचार केला आणि कपाळावर आठ्या चढवल्या.
“आणि
तुम्हीं आपल्या मित्राच्या मताशी सहमत आहांत कां?” आता अनोळखी माणसाने
उजवीकडे बसलेल्या बिज़्दोम्नीकडे वळून विचारलं.
“शंभर
टक्के!...” बिज़्दोम्नी म्हणाला,
ज्याला थोड्या नाटकीय आणि अलंकारिक
ढंगाने बोलण्याचा शौक होता.
“आश्चर्य
आहे!” अनाहूत पाहुणा पुन्हां उद्गारला आणि न जाणे कां चोरासारखं इकडे तिकडे बघून
आपल्या जाड्या आवाजाला आणखी भसाड्या करंत म्हणाला, “माझ्या उत्सुकतेला
माफ़ करा, पण मला हे समजलंय की तुम्हीं देवावरपण विश्वास नाहीं
करंत?” आपल्या डोळ्यांत भीतिचे भाव आणून तो पुढे म्हणाला, “शप्पथ घेतो, मी कुण्णाला काहीही सांगणार नाहीं.”
“हो, आम्हीं देवावर विश्वास नाहीं करंत,” बेर्लिओज़ने
परदेशीच्या घाबरण्याची टिंगल करंत म्हटलं, “पण हे आम्हीं अगदी
उघंडपणे सांगू शकतो,
न घाबरतां.”
अनोळखी
माणसाने बेंचला पाठ टेकवून आणखीनंच उत्सुकतेने विचारलं, “तुम्हीं नास्तिक
आहांत कां?”
“हो, आम्हीं नास्तिक आहोत.” बेर्लिओज़ने स्मित करून म्हटलं. बिज़्दोम्नीने दात खात
विचार केला, ‘पिच्छांच पुरवतोय परदेशी उंदीर.’
“ओहो, काय थाट आहे!” परदेशी आश्चर्याने ओरडला, आणि आपलं डोकं दोन्हींकडे
हलवंत कधी ह्याच्याकडे,
तर कधी त्याच्याकडे बघूं लागला.
“आमच्या
देशांत नास्तिकतेने कोणी आश्चर्यचकित होत नाहीं,” बेर्लिओज़नी एखाद्या
राजनयिकाच्या थाटांत म्हटलं,
“आमच्या जनसंख्येचा बहुतांश भाग बरेंच
दिवसांपासून देवाबद्दल कोणत्याही किंवदंत्यावर विश्वास नाहीं ठेवंत.”
अनोळखी
माणसाने एक अजबंच काम केलं,
तो उठून उभा राहिला आणि आश्चर्यचकित
संपादकाचा हात पकडून म्हणाला,
“मी हृदयपूर्वक तुम्हांला धन्यवाद देतो!”
“तुम्हीं
ह्यांना धन्यवाद कां देताय?”
पापण्यांची उघडझाप करंत बिज़्दोम्नीने
विचारलं.
“एका
अश्या महत्वपूर्ण माहितीसाठी,
जी माझ्यासारख्या पर्यटकासाठी अत्यंत
रोचक आहे,” खूप गूढपणे बोट वर करून परदेश्याने समजावले.
ह्या
महत्वपूर्ण माहितीने पर्यटकावर निश्चितंच गंभीर प्रभाव टाकला होता, कारण की तो सारखा आपले भयभीत डोळे फिरवंत सगळ्या बिल्डिंग्सकडे बघंत होता, जणु त्याला प्रत्येक खिडकींत एकेका नास्तिकाचे दर्शन होतं आहे.
‘नाही, हा ब्रिटिश नाहीये...’
बेर्लिओज़ने पुन्हां विचार केला, तर बिज़्दोम्नीला आश्चर्य वाटंत होतं की – हा रशियनमधे कसा बोलतो आहे, अद्भुत्!’ त्याने पुन्हां कपाळावर आठ्या टाकल्या.
“पण, मला एक विचारायची परवानगी द्या...” ताणलेल्या उत्सुकतेने अनोळखी माणसाने
विचारलं, “परमेश्वराच्या अस्तित्वाबद्द्ल विद्यमान असलेल्या पाच
प्रमाणांबद्दल तुमचं काय मत आहे?”
“ओफ़!”
बेर्लिओज़ने सहानुभूतिपूर्ण स्वरांत उत्तर दिलं, “त्यांच्यापैकी एकही
काही लायकीचा नाहीये. मानवतेने खूप आधीच त्यांना नाकारून पुरातत्व संग्रहालयांत
फेंकून दिलंय. विश्वास करा,
की तार्किक बुद्धि परमेश्वराच्या
अस्तित्वाबद्दल कोणत्यांच प्रमाणाला मान्यता नाही देत.”
“शाबास!”
परदेशी ओरडला, “ शाब्बास! तुम्हीं अगदी एमानुएलचेच19 विचार
सांगितलेय. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याने पांचही प्रमाणांना नाकारून, स्वतंचाच उपहास करंत सहाव्या प्रमाणाची रचना करून टाकली!”
“काण्टचे
प्रमाण,” किंचित हसंत शिकलेला सम्पादक म्हणाला, “तो पण बरोबर नाहीये. शिलेरने20 बरोबरंच म्हटलं होतं, की ह्या संदर्भातील काण्टचे विचार फक्त गुलामांनाच आवडूं शकतील. श्त्राउसनी21
तर ह्या प्रमाणाची सपशेल खिल्लीच उडवलीयं.”
बेर्लिओज़
बोलंत होता, पण त्याबरोबरंच विचारही करंत होता, “पण, हा आहे कोण? आणि हा इतकी चांगली
रशियन कशी बोलतोय?”
“ह्या
काण्टला तर असल्या प्रमाणांसाठी सलोव्कीत22 तीन वर्षासाठी शिक्षा
मिळाली पाहिजे!” इवान निकोलायेविच मधेच टपकला.
“इवान!”
अवघडून बेर्लिओज़ पुटपुटला. पण काण्टला
तीन वर्षासाठी सलोव्कीला पाठविण्याच्या कल्पनेनी जणु अनोळखी माणसावर जादूच केली.
“
बरोबर, बरोबर...” तो ओरडला आणि बेर्लिओज़कडे बघणारा त्याचा
हिरवा डोळा चमकूं लागला,
“त्याला तिथेंच पाठवलं पाहिजे! मी
त्याला ब्रेकफास्ट करताना सांगितलं होतं: ‘तुम्हीं, प्रोफेसर, तसं म्हणा हे तुमचं मत आहे, पण खूपच घाणेरडा
विचार मांडलाय! तुमचा विचार,
कदाचित, खूप बुद्धिमत्तापूर्ण
असेल, पण तो आकलना पलिकडे आहे. लोक तुम्हांला हसतील.”
बेर्लिओज़चे
डोळे विस्फ़ारले, ‘ब्रेकफास्ट करतांना...काण्टला?...हा काय वटवट करतोय?”
त्याने विचार केला.
“पण,” बेर्लिओज़च्या विस्मयाकडे लक्ष न देतां आणि कवीकडे वळंत परदेशी बोलतंच होता, “त्याला सोलोव्कीला पाठवणं संभव नाहीये, कारण की जवळ-जवळ शंभर
वर्षांपासून सोलोव्कीपेक्षांही खूप दूरच्या जागेवर राहतोय, आणि त्याला तेथून आणणं कसंही शक्य नाहीं, खरंच सांगतोय.”
“ओह, दुःखद गोष्ट आहे!” चिडखोर कवीने प्रतिसाद दिला.
“मला
पण दुःख आहे!” अनोळखी माणूस आपला डोळा चमकावंत पुढे म्हणाला, “पण मला एक वेगळाच प्रश्न सतावतोय: ज़र परमेश्वर नाहीये, तर सांगा की मानव जीवनाचे संचालन कोण करतंय आणि पृथ्वीवर चाललेल्या सगळ्या
हालचालींचं सूत्र कोण सांभाळतंय?”
“मनुष्य, आणखी कोण?” बिज़्दोम्नीने चिडून म्हटलं. पण स्पष्ट होतं की त्याला
हा प्रश्न समजला नव्हता.
“माफ़
करा,” अनोळखी माणसाने हळूंच विचारलं, “पण, संचालन करण्यासाठी काहीतरी वेळबद्ध योजनातर आखावी
लागतेच ना, भले ही थोड्याचं वेळासाठी असूं दे? मला सांगा की मनुष्य सूत्रधार कसा असूं शकतो, जेव्हां तो थोड्या
वेळासाठी, जसं एक हज़ार वर्षांसाठीसुद्धां, कोणतीच योजना आखण्यास असमर्थ आहे, उलंट त्याचं आपल्या ‘उद्या’वरपण नियंत्रण नाहीये, आणि, खरोखरंच,” अनोळखी माणूस बेर्लिओज़कडे वळून म्हणाला, “समजा, तुम्हीं हे संचालन सुरूं करता, स्वतःचं आणि इतरांचंदेखील आणि अचानक तुम्हांला...हे...हे...हे फुफ्फुसांचा
ट्यूमर होतो...” अनोळखी गोड हसंत म्हणाला, जणु ह्या ट्यूमरच्या
कल्पनेनी त्याला फार आनंद झाला असावा,
“ हो, ट्यूमर...”
मांजरासारखे डोळे बारीक करंत त्याने पुन्हां म्हटलं, “बस, तुमचं काम खल्लास! तेव्हां तुम्हीं इतर कोणाच्या नाहीं, तर फक्त स्वतःचीच काळजी कराल. नातेवाईक तुम्हांला सांत्वना देतील आणि
तुम्हीं, दुर्भ्याग्याच्या कल्पनेनी घाबरून डॉक्टर्सकडे, वैद्यांकडे, भोंदू डॉक्टर्सकडे आणि ज्योतिषांकडे सुद्धां जाल.
त्यांच्यापैकी कोणीच तुमची मदत करूं शकणार नाही – हे तुम्हांला माहीतंच असणार. आणि
ह्या सर्वाचा दुर्भाग्यपूर्ण अंत होईल. तो, जो थोड्याच
वेळापूर्वी राज्य करंत होता,
आता अगदी प्राणहीन पडलेला असेल. लाकडी
पेटीत, आणि त्याला पाहणारे, हे समजून की आता ह्या
निर्जीव शरीराचा काही उपयोग नाही,
त्याला भट्टीत जाळून टाकतील. ह्याहून
वाईटही होऊं शकतं: माणूस किस्लोवोद्स्क जाण्याची तयारी करतोय...” अनोळखी माणसाने
डोळे बारीक करून बेर्लिओज़कडे पाहिलं,
“छोटीशीच गोष्ट आहे, पण ती सुद्धां पूर्ण करतां येत नाहीं, कारण की कदाचित त्याचा पाय घसरेल आणि तो ट्रामचा
खाली येईल! तरीही तुम्हीं म्हणाल कां की तुम्हीं स्वतःचं असल्या घटनाक्रमाची रचना
केली होती? हा विचार करणं जास्त तर्कसंगत नाहीं वाटंत कां की
दुसरंच कोणीतरी संचालन करतोय?”
आणि अनोळखी माणूस विचित्रपणे हसला.
बेरिओज़
खूप लक्ष देऊन ट्यूमर आणि ट्रामबद्दल अप्रिय गोष्ट ऐकत होता. तो काही अज्ञात विचाराने भयभीत झाला. ‘हा परदेशी नाहीये! हा
परदेशी असूंच शकत नाहीं!’…त्याने विचार केला – ‘ही एक फार आश्चर्यजनक
वस्तु आहे...पण हा आहे कोण?’
“कदाचित
तुम्हांला सिगरेट प्यायचीये?”
अकस्मात् अनोळखी माणसाने बिज़्दोम्नीला
विचारलं, “कोणचा ब्राण्ड पाहिजे?”
“तुमच्याकडे, जसे काही खूप सारे ब्राण्ड्स आहेत?” पडलेल्या स्वरांत
कवीने विचारलं, ज्याच्या सिगरेट्स खरंच संपल्या होत्या.
“कोणचा
ब्राण्ड?” अनोळखी माणसाने पुन्हां विचारलं.
“अच्छा, ‘नाशा मार्का’!
बिज़्दोम्नीने कटुतेने उत्तर दिलं.
अनोळखी
माणसाने लगेच खिशातूंन सिगरेट केस काढली आणि बिज़्दोम्नी समोर केली, “घ्या, ‘नाशा मार्का’!”
सम्पादक
आणि कवीला ह्या गोष्टीचं जास्त आश्चर्य नाहीं झालं, की सिगरेटकेसमधे ‘नाशा मार्का’
ब्राण्डची सिगरेट होती, त्यांना विस्मित केलं सिगरेटकेसनी. ती एक विशाल सिगरेट केस होती, शुद्ध सोन्याची,
तिचे झाकण उघडताना निळसर पांढरा प्रकाश
फेकणारा त्रिकोणी हीरा चमकंत होता.
दोन्हीं
साहित्यकारांच्या मनांत वेगवेगळे विचार आले. बेर्लिओज़च्या : ‘नाहीं, परदेशीच आहे!’ आणि बिज़्दोम्नीच्या: ‘मसणांत जा, एह?’
कवी
आणि सिगरेट केसचा मालक कश घेत होते,
पण बेर्लिओज़ने सिगरेट पिण्यास नकार
दिला.
‘त्याच्या गोष्टीचा
विरोध केला पाहिजे की,
’ बेर्लिओज़ने विचार केला, ‘मनुष्याला एक न एक दिवस मरायचंच आहे, ह्या वास्तविकतेचा
विरोध कोणीच करंत नाहीये. पण मुद्दा हा आहे की...’
पण
तो हे शब्द म्हणायच्या आधीच परदेशी मध्येच बोलूं लागला, “ हो, माणूस नश्वर आहे,
पण हे तर अर्धंच दुर्भाग्य आहे. वाईट
भाग हा आहे, की कधी कधी तो अचानकंच मरून जातो, ह्याच गोष्टीवर मी जोर देतोय! आणि त्याला हे पण माहीत नसतं आणि तो विश्वासपूर्वक नाही सांगू शकंत, की आज संध्याकाळी तो काय करणार आहे.”
‘विचित्र आहे हा
प्रश्न’…बेर्लिओज़ने विचार केला आणि म्हणाला, “तुम्हीं तर अगदी अतिशयोक्तीच करतांय. आज संध्याकाळी मी काय करणारेय ह्याची
मला जवळ-जवळ सम्पूर्ण माहिती आहे. हो,
जर ब्रोन्नाया स्ट्रीटवर माझ्या
डोक्यावर जर एखादी वीटंच पडली तर...”
“विटेची
गरज नाहीये,” अनोळखी माणसाने मधेच सोद्देश्य म्हटलं, “ती अशीच कुणावर कधीही पडंत
नसते. तुमच्यावर तर ती नाहींच पडणार. तुम्ही वेगळ्यांच प्रकारे मरणार आहांत.”
“कदाचित
तुम्हांला माहितीये,
की कोणच्या प्रकारे?” बेर्लिओज़ने तीक्ष्ण उपहासाने विचारलं, आणि नकळतंच ह्या
निरर्थक संभाषणांत तो ओढला गेला – “आणि मला सांगाल?”
“मजेत!”
अनोळखी म्हणाला. तो जणु डोळ्यांने बेर्लिओज़चे माप घेत होता, जसं त्याच्यासाठी सूट शिवणारेय,
आणि ओठांतल्या ओठांत पुटपुटंत होता: ‘एक, दोन...बुध दोन मधे, ...चंद्र अस्त
झालांय...सहा – दुर्भाग्य...संध्याकाळ – सात’ – आणि मग
आनंदाने ओरडला, “तुमचं डोकं कापलं जाणारेय!”
बिज़्दोम्नी
‘खाऊ की गिळू’ नजरेने हात-पाय पसरंत
असलेल्या अनोळखी माणसाला बघंत होता आणि बेर्लिओज़ने उपहासात्मक आवाजांत विचारलं, “कोण कापणारेय?
शत्रू? आततायी 23?”
“नाहीं,” अनोळखी म्हणाला,
“रशियन महिला, कम्सोमोल्का.”24
“हुम्!”
अनोळखी माणसाच्या थट्टेने थोडासा चिडून बेर्लिओज़ म्हणाला, “माफ़ करा, ह्या गोष्टीवर विश्वास करणं कठीण आहे!”
“मला
पण माफ़ करा!” परदेशीने उत्तर दिलं,
“मगर असंच होणारेय, हो, मी तुम्हांला विचारणार होतो, की आज संध्याकाळी तुम्हीं काय करतांय, जर काही सीक्रेट नसेल
तर सांगा.”
“काहींच
सीक्रेट नाहीये. आतां मी सादोवाया स्ट्रीटवर माझ्या घरी जाईन आणि मग रात्री दहा
वाजतां – मॉसोलित. तिथे एक मीटिंग आहे ज्याची अध्यक्षता मला करायची आहे.”
“नाहीं, हे शक्य नाहीं...” परदेशीने जोरांत प्रतिवाद केला.
“कां?”
परदेशी
माणसाने डोळे बारीक करून घेतले आणि आकाशाकडे बघंत म्हणाला, जिथे संध्याकाळच्या गारव्याचा अनुभव करंत पक्ष्यांचे झुण्ड उडत होते, “कारण की अन्नूश्काने सनफ्लॉवर ऑइल विकंत घेतले आहे, आणि फक्त विकतंच नाहीं घेतलंय,
उलट थोडंसं सांडलं पण आहे. ह्याचा अर्थ
असा झाला की मीटिंग नाहीं होणार.”
ह्या
बरोबरंच लिण्डन वृक्षांच्याखाली शांतता पसरली.
“माफ़
करा,” बेर्लिओज़ने आश्चर्याच्या पोतडीसारख्या परदेशी माणसाकडे
बघंत पुन्हां सुरुवात केली,
“इथे सनफ्लॉवर ऑइलचं काय काम आहे...आणि
ही अन्नूश्का कोण आहे?”
“सनफ्लॉवर
ऑइल अश्यासाठी की,” बिज़्दोम्नी उघड-उघड अनोळखी माणसाबरोबर युद्धं जाहीर
करंत मधेच टपकला, “महाशय,
तुम्हीं कधी पागलखान्यांत गेले आहांत?”
“इवान!”
मिखाइल अलेक्सांद्रोविच हळूच त्याला रागावला.
पण
अनोळखी माणसाने ह्या गोष्टीचं वाईट नाहीं वाटून घेतलं आणि खूपंच आनंदाने हसंत
सुटला.
“गेलो
होतो, गेलो होतो आणि एकदांच नाहीं!” तो हसतां हसतां ओरडला, पण त्याचे डोळे कवीवरंच होते. “मी कुठे-कुठे नाहीं गेलो! दुःख फक्त एकांच
गोष्टीचं आहे, की मी प्रोफेसरला विचारूं नाहीं शकलो, की स्किज़ोफ्रेनिया म्हणजे काय?
तुम्हीं स्वतःच प्रोफेसरला ह्या बद्दल
विचाराल, इवान निकोलायेविच!”
“तुम्हांला
माझ नाव कसं माहीत?”
“हे
घ्या! इवान निकोलायेविच,
तुम्हांला कोण नाहीं ओळखंत?” अनोळखी माणसाने आपल्या खिशातूंन एक दिवस आधीचा ‘लितेरातूर्नाया गज़ेता’चा अंक काढला ज्यांत पहिल्यांच पानावर इवान निकोलाएविचला आपला फोटो दिसला, फोटोच्या खाली त्याची कविता छापलेली होती. पण ह्या लोकप्रियतेचा आणि
प्रसिद्धीचा जितका आनंद त्याला काल झाला होता, आज तो तितकांच
निर्विकार होता.
“मला
माफ़ करा,” तो म्हणाला आणि त्याचा चेहरा काळवंडला, “तुम्हीं एक मिनिट थांबाल कां? मला माझ्या मित्राशी थोडं बोलायचंय.”
“ओह, ज़रूर!” परदेशी उद्गारला. “येथे,
लिण्डनच्या सावलीत इतकं चांगलं वाटतंय, शिवाय, मला कसंलीच घाई नाहीये.”
“बघ, मीशा,” कवी बेर्लिओज़ला एकीकडे खेचंत नेतां नेतां म्हणाला, “हा कोणी टूरिस्ट नाहीये,
मला तर हा कुणी हेर वाटतोय. हा आपला
देश सोडून गेलेला25 रशियन आहे, जो येथे परत आलांय.
त्याच्या डॉक्यूमेन्ट्स बद्दल विचार,
नाहींतर तो पळून जाईल...”
“तुला
असं वाटतंय?” उत्तेजित होऊन बेर्लिओज़ पुटपुटला, पण तो मनांत विचार करंत होता: ‘हा बरोबर म्हणतोय!’
“माझ्यावर
विश्वास ठेव,” कवीने त्याच्या कानांत सांगितलं, “तो मूर्ख असल्याचं नाटक करतोय,
म्हणजे आपल्याकडून काहीतरी उकळतां
येईल. तू ऐकतोयंस ना,
कशी चांगली रशियन बोलतोय तो?” कवी पुढे म्हणाला आणि सावधगिरीने मागे वळून पाहिलं की तो परदेशी ऐकंत तर
नाहीये, “चल,
त्याला पकडूं या, नाहींतर तो पळून जाईल.”
आणि
कवी हात धरून बेर्लिओज़ला खेचंत बेंच पर्यंत आला.
अनोळखी
माणूस बेंचवर बसलेला नव्हता,
तो जवळंच उभा होता, हातांत एक छोटंस काळं पुस्तक,
मस्त कागदाचा लिफ़ाफ़ा आणि विज़िटिंग
कार्ड घेऊन.
“माफ़
करा, गोष्टींमधे मी इतका रमलो, की आपला परिचयसिद्धां
देण्याचं विसरून गेलं. हे आहे माझं कार्ड, पासपोर्ट आणि
मॉस्कोला येण्याचं निमंत्रण...कन्सल्टेशनसाठी.” अनोळखी माणूस स्पष्ट आवाजांत
म्हणाला, आणि दोन्हीं साहित्यकारांकडे तीक्ष्ण नजरेने बघंत
राहिला.
ते
गडबडून गेले, “सैतानाने सगळं ऐकलंय...” बेर्लिओज़ने विचार केला, पण अत्यंत सौजन्यपूर्ण दाखवंत त्याने स्पष्ट केलं की डॉक्यूमेन्ट्स दाखवायची
काहीं गरंज नाहीये. जेव्हां परदेशी बेर्लिओज़च्या हातांत डॉक्यूमेन्ट्स देत होता, तेवढ्यांत कवीने पटकन बघितलं की कार्ड पर विदेशी अक्षरांमधे ‘प्रोफेसर’ छापलं होतं आणि त्याच्या नावाचं पहिलं अक्षर होतं
दुहेरी ‘व’
(डबल V- W)…खूप आनंद
झाला...” आपली फजिती लपवंत सम्पादक पुटपुटला आणि अनोळखी माणसाने सगळे
डॉक्यूमेन्ट्स खिशांत ठेवून घेतले.
सूत्र
पुन्हां जोडलं गेलं होतं. तिघं पुन्हां बेंचवर बसले.
“तर, तुम्हांला कन्सल्टेन्ट म्हणून येथे बोलावलंय, प्रोफेसर?” बेर्लिओज़ने विचारलं.
“हो, कन्सल्टेन्ट म्हणून.”
“तुम्हीं
जर्मन आहांत कां?” बिज़्दोम्नीने विचारलं.
“मी...?” प्रोफेसरने जणु त्यालांच प्रतिप्रश्न केला आणि एकदम विचारांत पडला, “हो जर्मनंच समजा...” त्याने उत्तर दिलं.
“पण तुम्हीं खूप
चांगली रशियन बोलता...” बिज़्दोम्नीने म्हटलं.
“ओह, तसा, मी बहुभाषी आहे आणि पुष्कळश्या भाषा मला अवगत आहेत,” प्रोफेसरने उत्तर दिलं.
“तसं, तुमचं प्रोफेशन काय आहे?” आतां बेर्लिओज़ने विचारलं.
“मी
ब्लैक-मैजिकचा विशेषज्ञ आहे.”
‘तुझी तर!...’ मिखाइल अलेक्सांद्रोविचच्या डोक्यांत जणु घणाचे घाव पडूं लागले. “आणि...आणि तुम्हांला ह्या संदर्भांत सल्ला द्यायला आमच्याकडे बोलावलंय?” मोठ्या मुश्किलीने त्याच्या तोंडून शब्द फुटले.
“हो, ह्यासाठीच बोलावलंय,”
प्रोफेसरने जोर देऊन म्हटलं आणि स्पष्ट
केलं, “इथे सरकारी लायब्रेरीत दहाव्या शतकांतील विद्वान
हर्बर्ट अव्रीलाक्स्कीच्या26 ब्लैक मैजिकवर लिहिलेल्या अनेक मूळ हस्तलिखिते
सापडली आहेत. त्यांचा अर्थ सांगण्यासाठीच मला बोलावलंय. सम्पूर्ण जगांत मी एकटांच
ह्या क्षेत्रांतला विशेषज्ञ आहे.”
“आ-आ!...तर, तुम्हीं इतिहासकार आहांत?”
सुटकेचा निःश्वास सोडून किंचित आदराने बेर्लिओज़ने
विचारलं.
“मी
इतिहासकारंच आहे.” विशेषज्ञाने
म्हटले आणि लगेच जसं त्याला काहींच माहीत नाही, अश्या आविर्भावांत
म्हणाला, “आज संध्याकाळी पत्रियार्शी पार्क जवळ एक रोचक घटना
घडणार आहे!”
कवी
आणि सम्पादक पुन्हां चकित झाले. प्रोफेसरने दोघांना आपल्या अगदी जवंळ बोलावलं आणि
जेव्हां ते त्याच्याकडे वाकले तेव्हां तो पुटपुटला, “लक्षांत ठेवा, येशू अवतरित झाले होते.”
“हे
बघा प्रोफेसर,” बळे-बळे हसत बेर्लिओज़ने म्हटलं, “आम्हीं तुमच्या विद्वत्तेचा सम्मान करतो, पण ह्या मुद्द्यावर
आमचं वेगळं मत आहे.”
“तुमच्या
वेगळ्या मताची काही गरज नाहीये!” विचित्र प्रोफेसर म्हणाला, “ते होते म्हणजे होते, आणि बस, ह्यापुढे काहीही नाहीं.”
“पण
एखाद्या प्रमाणाची आवश्यकता तर असणारंच...” बेर्लिओज़ने पुन्हां सुरुवात केली.
“कोणत्यांच
प्रमाणाची गरज नाहीये...” प्रोफेसर हळूंच म्हणाला, आणि त्याचं परदेशी
उच्चारणसुद्धां एकदम बदललं – “सगळं अगदी स्पष्ट आहे: रक्तवर्णीय किनारीचा पांढरा
अंगरखा घातलेला...”
**********
दोन
पोंती
पिलात
रक्तवर्णीय
किनारीच्या पांढ-या अंगरख्यांत,
महान हिरोदच्या1 महालाच्या
दोन्हीं पार्श्वांच्या मधे अनेक स्तंभ असलेल्या विशाल दालनांत, अश्वारोह्यांसारखा पावलांचा आवाज़ करंत, वसन्त ऋतूच्या
निस्सान महिन्याच्या चौदाव्या तिथीला जूडियाच्या2 न्यायाधीश पोंती
पिलातने3 प्रवेश केला.
न्यायाधीशाला
जर जगांत कोणच्या वस्तूची घृणा होती,
तर ती म्हणजे गुलाबाच्या अत्तराचा
सुगंध आणि आतां त्याला हे कळलं होतं,
की आजचा दिवस खूप वाईट जाणारेय, कारण सकाळपासूनंच हा सुगंध न्यायाधीशाचा पिच्छा पुरवंत होता. न्यायाधीशाला
असा आभास होतं होता,
जणुं उद्यानांतले अशोक आणि लिण्डनचे
वृक्षसुद्धां गुलाबाचाच वास फेकताहेत,
जणु अंगरक्षकांच्या त्वचेच्या
वासांतसुद्धां हा दुष्ट वास मिसळलांय. महालाच्या पार्श्व भागांत स्थित, न्यायाधीशाबरोबर येर्शलाइमहून4 आलेल्या विद्युत गतिने आक्रमण
करणा-या बाराव्या सैन्य तुकडीच्या5 पाक शाळेंतून धूर निघंत होता, जो ह्या गोष्टीचा संकेत देत होता, की पाकशास्त्र्यांनी
स्वयंपाकाला सुरुवात केलीये. हा धूर उद्यानांतून स्तंभांच्या दालनांत येत होता, ह्या कडु धुरांतसुद्धां तो गुलाबाच्या अत्तराचा ओलसर गंध भरून गेलेला जाणवंत
होता. अरे देवा, देवा आम्हांला कोणत्या गोष्टीसाठी शिक्षा देतांय?
‘हो, शंकेला जागांच नाहीं! ही तीच आहे, पुन्हां तीच, अविजित भयानक व्याधि अर्धशीशी,
ज्यांत फक्त अर्ध्या मस्तकांतच शूल
उठतो. ह्या व्याधीचं काहींच औषध नसतं,
ह्यातूंन सुटका शक्यंच नाहीं. आम्हीं
डोकं इकडे-तिकडे नाहीं हलवणार.’
संगमरमरी
फरशीवर कारंज्याजवळ आसनाची व्यवस्था केलेली होती. न्यायाधीशाने कोणाकडेही
दृष्टिक्षेप न करतां एकीकडे हात पसरला.
पीडेमुळे
न्यायाधीशांचा चेहरा वाकडा झालांच आणि त्यांनी तिरप्या नजरेनेंच चर्मपत्रावर
लिहिलेला लेख वाचून ते सचिवाकडे परंत दिलं आणि अत्यंत प्रयासपूर्वक म्हणाले, “गलिलीहून6 आलेला अभियुक्त? कनिष्ठ न्यायखण्डाला
मुकदमा पाठवला होता?”
“होय, महाबली!” न्यायाधीशाच्या सचिवाने उत्तर दिलं.
“मग?”
“तिथे
त्यांनी अभियोगावर निर्णय सांगण्यास नकार दिला आणि सिनेद्रिओनने7
केलेली मृत्युदण्डाची सिफारिश पुष्टि करण्यासाठी आपणांकडे पाठवलीय,” सचिवने खुलासा करंत सांगितलं.
न्यायाधीशाने
गाल खाजवंत हळूंच म्हटलं,
“अभियुक्ताला प्रस्तुत करा.”
आणि
लगेच दोन शस्त्रधारी स्तंभांच्या दालनाच्या खाली असलेल्या उद्यानांतून जवळ-जवळ
सत्तावीस वर्षांच्या तरुणाला न्यायाधीशा समोर घेऊन आले. ह्या तरुणाने जीर्ण, फाटका निळ्या रंगाचा चोगा घातला होता. डोक्यावर एक पांढरा रुमाल होता, ज्याला कपाळावर चामड्याच्या पट्ट्याने बांधलं होतं. हात मागे बांधलेले होते. तरुणाच्या डाव्या डोळ्याखाली मोठी
जखम होती, तोंडाच्या कोप-यावर – आणखी एक जखम, वाळलेलं रक्त असलेली.
अभियुक्ताने
अत्यंत उत्सुकतेने न्यायाधीशाकडे पाहिलं.
तो
थोडा वेळ शांत होता,
मग त्याने हळूंच अरामैक8 भाषेत
विचारलं, “तर,
तू लोकांना येर्शलाइमचं मंदिर9
ध्वस्त करण्यासाठी चिथवलं होतं?”
हे
विचारताना न्यायाधीश पाषाणवत् बसला होता, फक्त त्याचे ओठ
किंचित हलंत होते. न्यायाधीशाच्या पाषाणासारखं बसलं राहण्याचं कारण हे होतं की
त्याला नारकीय पीडेने धुमसंत असलेल्या आपल्या मस्तकाला जराही हलवायचे नव्हते.
मुसक्या
बांधलेला तरुण थोड़ंसं पुढे येऊन म्हणाला, “भल्या माणसा, माझ्यावर विश्वास ठेवं...”
पण
न्यायाधीशाने पूर्वीप्रमाणेच न हलतां आणि आवाज न वाढवतां लगेच त्याला थांबवत
म्हटलं:
“हे, तू मला ‘भला माणूस’
म्हणून संबोधित केलं? तू चूक करतोय. येर्शलाइममधे सगळेच हलक्या आवाजांत माझ्याबद्दल म्हणतांत की
मी एक क्रूर दानव आहे,
आणि हे अगदी खरंय,” आणि तसंच, एकसुरांत तो पुढे म्हणाला, “सेनाध्यक्ष
क्रिसोबोयला माझ्याकडे पाठवा.”
सगळ्यांना
असं वाटलं, की विद्युतगतिने आक्रमण करणा-या सैन्याच्या एका
अतिविशिष्ट तुकडीचं नेतृत्व करणारे सेनाध्यक्ष मार्क, ज्यांना क्रिसोबोय
ह्या टोपणनावांने ओळखले जायचे,
दालानमध्ये येतांच, अंधार झालाय.
आपल्या
सैन्य तुकडीतील सर्वांत उंच सैनिकापेक्षांही क्रिसोबोय जवळ-जवळ डोक्याइतके उंच
होते. त्यांचे खांदे इतके चौडे होते,
की आतांच उदय झालेल्या सूर्याला
त्यांनी पूर्णपणे झाकून टाकलं होतं.
न्यायाधीशाने
लैटिनमधे सेनाध्यक्षाला सांगितलं,
“अभियुक्त मला ‘भला माणूस’ म्हणतोय. त्याला एका मिनिटासाठी येथून घेऊन जा आणि
समजावून सांगा की माझ्याशी कसं बोलायला पाहिजे. पण त्याचं अंग-भंग नका करू.”
आणि
पाषाणमूर्तिसारख्या बसलेल्या न्यायाधीशाला सोडून सगळे जणं मार्क क्रिसोबोयलांच
बघूं लागले, जो कैद्याला हाताने आपल्या मागे येण्यास सांगंत होता.
क्रिसोबोयला
सगळे लोकं त्याच्या उंचीमुळेपण बघतंच असायचे, मग तो कुठेही कां न
असो. जे लोकं त्याला पहिल्यांदा बघंत,
ते आणखी एका कारणाने बघंतंच बसायचे.
त्याचा चेहरा खूप कुरूप होता,
त्याचं नाक एका युद्धांत कोण्या
जर्मनच्या तलवारीने कापलं गेलं होतं.
संगमरमरी
फरशीवर मार्कच्या वजनदार पावलांचा आवाज येत होता. कैदी त्याच्या मागेमागे चुपचाप
चालला होता. स्तंभाच्या दालनांत सम्पूर्ण शांतता पसरली. फक्त उद्यानांत
कबुत्तरांची गुटरगूं ऐकू येत होती आणि कारंज्याचं पाणी जणु एक गोडसं, सार्थक गीत गात होतं.
न्यायाधीशाला
वाटलं की उठून पाण्याच्या धारेखाली कानशील ठेवून तसंच शांत होऊन जावं, पण त्याला हे देखील माहीत होतं की ह्याने काहीही होणार नाहीये.
कैद्याला
स्तंभांच्याखालून उद्यानांत आणून क्रिसोबोयने कांस्य प्रतिमेच्या जवळ उभ्या
असलेल्या शस्त्रधारी सैनिकाच्या हातून चाबुक घेतला आणि हलकेच हालवंत कैद्याच्या
खांद्यांवर मारला. सेनाध्यक्षाची हालचाल सहज आणि निष्काळजीपूर्ण होती, पण कैदी एकदम पुढे वाकून जमिनीवर असा पडला, जणु त्याचे पायच
छाटून टाकलेत, तोंड उघडून खोल श्वास घेणा-या त्याच्या चेह-याचा रंग
उडून गेला, डोळ्यांसमोर अंधारी आली. मार्कने डाव्या हाताने त्याला
रिकाम्या पोत्यासारखं उचलून धरलं. त्याला आपल्या पायांवर उभं केलं आणि अनुनासिक
स्वरांत तुटक्या-फुटक्या अरामैक भाषेंत म्हटलं, “रोमच्या न्यायाधीशाला
संबोधित करतांना म्हणायचं – महाबली (हिगेमोन)10 ! इतर कोणत्याही
शब्दाचा प्रयोग करायचा नाहीं. शांतपणे उभं राहायचं. कळलं तुला, की मारूं?”
कैदी
कोलमडला, पण त्याने स्वतःला सांभाळलं. त्याच्या चेहरा पुन्हां
किंचित उजळला. त्याने श्वास घेऊन भसाड्या आवाजांत म्हटलं, “मी समजलो. मला नको मारू.”
एका
मिनिटानंतर तो पुन्हां न्यायाधीशासमोर उभा होता.
एक
कंटाळवाणा, आजारी आवाज घुमला:
“नाव?”
“माझं?” कैद्याने पट्कन विचारलं. तो आपल्या सम्पूर्ण अस्तित्वानिशी संक्षिप्त उत्तर
देण्याचा प्रयत्न करंत होता,
म्हणजे न्यायाधीशाचा क्रोध ओढवून
घ्यायला नको.
न्यायाधीशाने
हळूंच म्हटलं, “माझं – मला माहीत आहे. जेवढा आहेस, त्यापेक्षां जास्त मूर्ख व्हायचा प्रयत्न करूं नकोस. तुझं नाव सांग.”
“येशुआ,11 ” कैद्याने लगेच उत्तर दिलं.
“आडनाव
आहे?”
“हा-नोस्त्री”
“कुठला
राहणारा आहेस?”
“गमाला12 शहराचा,”
कैद्याने डोकं फिरवून जणु सांगायचा
प्रयत्न केला की दूर,
त्याच्या उजवीकडे, उत्तर दिशेला गमाला शहर आहे.
“कोणच्या
वंशाचा आहे?”
“मला
नक्की नाहीं माहीत,”
कैद्याने उत्साहाने सांगितले, “मला माझ्या आई-वडिलांची आठवण नाहीये. लोकं म्हणतांत की माझे वडील सीरियाचे
होते.”
“तू
राहतोस कुठे?”
“माझं
असं कोणचंच निश्चित ठिकाण नाहीये.” कैद्याने लाजून म्हटलं, “मी एका शहरांतून दुस-या शहरांत हिंडत असतो.”
“ह्याला
एका शब्दांत सांगता येईल – भटक्या,”
न्यायाधीशाने म्हटलं आणि पुढे विचारलं, “नातेवाईक आहेत?”
“कुणीच नाहीं. ह्या
जगांत मी एकटा आहे.”
“लिहितां-वाचतां
येतं?”
“हो.”
“अरामैक
शिवाय आणखी एखादी भाषा येते कां?
“हो, मला ग्रीक भाषा येते.”
सुजलेली
पापणी उठली, वेदनेच्या धुक्याने मिचमिचणारा डोळा कैद्यावर स्थिर
झाला, दुसरा डोळा बंदंच राहिला.
पिलातने
ग्रीकमधे बोलायला सुरुवात केली:
“हूँ,
तर तू मंदिराच्या इमारतीला ध्वस्त
करणार होता आणि ह्या कामासाठी जनतेला चिथवलंसुद्धां होतंस”
कैदी
पुन्हां रंगांत आला. त्याच्या डोळ्यांतील भीतीचा भाव लुप्त झाला. त्याने ग्रीकमधे
उत्तर दिलं:
“मी, भ...” डोळ्यांत पुन्हां भीति तरंळली. तो चुकून ‘भल्या माणसा’ म्हणणारंच होता. आपली चूक सुधारंत तो म्हणाला, “मी, महाबली, जीवनांत कधीही मंदिर ध्वस्त करण्याचा विचार नाही केला
आणि कोणालाही ह्या उन्मादपूर्ण कामासाठी चिथवलं नाहीये.”
एका
लहानशा टेबलवर वाकून कागद-पत्र बघणा-या आणि कैद्याची जबानी लिहिणा-या सचिवाने
आश्चर्याने डोकं किंचित वर केलं,
पण लगेच पुन्हां चर्मपत्रावर वाकवलं.
“सणा-सुदीच्या
निमित्ताने ह्या शहरांत अनेक प्रकारचे लोकं येतांत. त्यांत जादूगार, ज्योतिषी, भविष्यवक्ते आणि हत्यारेसुद्धां असतांत...” न्यायाधीश
एका सुरांत बोलंत होता. उदाहरणार्थ,
तू खोटारडा आहेस, तुझ्या आरोप पत्रांत स्पष्ट लिहिलंय: जनतेला मंदिर नष्ट करण्यासाठी चिथवलं.
लोकांनी ग्वाही दिलीये.”
“ह्या
भल्या माणसांना...” कैद्याच्या तोंडातूंन निघालं आणि तो पटकन् पुढे म्हणाला, “महाबली, काहींच कळंत नाही आणि जे काही मी म्हटलं होतं, त्याचा अगदी गोंधळ करून ठेवलाय. मला आशंका आहे, की हा गोंधळ बराच वेळ
चालेल. आणि हे अशाने झालंय की तो माझ्या मागे-मागे येतो आणि माझ्या कथनांना सतत
चूक-चूक लिहितोय.”
शांतता
पसरली. आता वेदनेने जड झालेले दोन्हीं डोळे कैद्यावर रोखले गेले.
“शेवटचं
सांगतोय – नाटक बंद कर,
दरोडेखोर कुठला...” पिलात ने हळूंच, पण एकसुरांत म्हटलं,
“तुझ्यावर लावलेले आरोप जास्त नाहींत, पण जे काहीं आहेत,
ते तुला मृत्युद्ण्ड देण्यासाठी
पर्याप्त आहेत.”
“नाहीं, नाहीं, महाबली,”
कैद्याने विश्वास द्यायचा प्रयत्न केला, “एक माणूस आहे जो शेळीचे चर्मपत्र घेऊन माझ्या मागे-मागे फिरतो आणि निरंतर
लिहीत असतो. पण एकदां मी हे चर्मपत्र बघितलं, आणि मी घाबरलो. जे
काही तो लिहीत होता,
तसलं काहीही मी बोललोच नव्हतो. मी
त्याला विनंती केली: कृपा करून तू आपलं हे चर्मपत्र जाळून टाक. पण त्याने माझ्या
हातांतून हिसकावून घेतलं आणि पळून गेला.”
“कोण
आहे तो?” पिलात ने आढ्यतेने विचारले आणि आपल्या कानशिलावर हात
फिरवला.
“लेवी
मैथ्यू!”13 कैदी पट्कन उत्तरला, “तो कर-संग्राहक होता
आणि मी पहिल्यांदा त्याला बिफागीच्या14
रस्त्यावर भेटलो,
तिथे, जिथे कोप-यावर
अंजिराचा बगिचा आहे...आणि त्याच्याशी गोष्टी केल्या, सुरुवातीला तर तो
माझ्याशी आडमुठेपणाने बोलला. त्याने माझा अपमानसुद्धां केला, म्हणजे असं की...आपल्या दृष्टीने तो माझा अपमान करंत होता...त्याने मला
कुत्रा म्हटलं...” कैदी हसला,
“मला तर ह्या प्राण्यामधे कोणतीच
हास्यास्पद गोष्ट दिसंत नाहीं,
की ज्याने मला अपमानित झाल्यासारखं
वाटेल...”
सचिवाने
लिहिणं बंद करून तिरप्या डोळ्यांनी बघितलं, पण कैद्याला नाहीं, अपितु न्यायाधीशाला.
“पण
माझं बोलणं ऐकून तो किंचित शांत आणि नम्र झाला,” येशुआने पुढे
सांगितलं, “जमिनीवर पैसे फेकून दिले आणि म्हणाला की तो
माझ्याबरोबर यात्रा करेल...”
पिलात
आपले पिवळे दात दाखवत एका गालाने हसला. मग आपल्या सम्पूर्ण शरीराला सचिवाकडे वळवून
म्हणाला:
“ओफ!
काय शहर आहे येर्शलाइम! इथे जे पण ऐकायला मिळेल, ते कमीच आहे. कधी
ऐकलं आहे कां, की कर-संग्राहकाने पैसे जमिनीवर फेकून दिलेत?”
सचिवाला
कळलंच नाही की पिलातच्या म्हणण्याचं काय उत्तर द्यावं. त्याला न्यायाधीशासारखं
हसणंच जास्त सोयिस्कर वाटलं.
“आणि
तो म्हणाला, की आता त्याला पैश्यांशी घृणा झालीये.” येशुआ लेवी
मैथ्यूच्या विचित्र वर्तनाबद्दल समजावतांना पुढे म्हणाला, “आणि तेव्हांपासून तो माझा सहयोगी आहे.”
अजूनपर्यंत
आपले दात दाखवंत न्यायाधीशाने कैद्याकडे बघितलं, मग सूर्याकडे, जो धृष्ठतेने,
दूरवर, खाली, उजवीकडे असलेल्या अश्व-शर्यतीच्या मैदानांत बनलेल्या अश्वाकृतींच्या वर
आलेला होता, आणि अचानक पीडादायक उदासीने त्याने विचार केला की
सगळ्यांत सोपं होतं ह्या विचित्र दरोडेखोरला दालनांतून हे सांगून हाकलून देणं, की ‘ह्याला फासावर लटकवा’, अंगरक्षकांना पिटाळून
ह्या स्तंभांच्या दालनांतील आतल्या खोलीत जाऊन, खोलीत सम्पूर्ण अंधार
करून घेणं...बिछान्यावर पडून शीतल जल मागवणं...फिर्यादीच्या सुरांत आपल्या
कुत्र्याला, बांगाला बोलावून त्याला आपल्या अर्धशीशीच्या
वेदनेबद्दल गा-हाणं सांगणं. न्यायाधीशाच्या दुख-या डोक्यांत विषाचा विचारपण तरळून
गेला.
अंधुक
डोळ्यांनी त्याने कैद्याकडे बघितलं,
आणि थोडा वेळ चुपचाप बसून वेदनेने
आठवण्याचा प्रयत्न केला,
की येर्शलाइमच्या ह्या सूर्याच्या
भट्टीत, जखमी चेहरा घेऊन हा कैदी त्याच्यासमोर कशासाठी उभा आहे
आणि त्याला अजून किती अनावश्यक प्रश्न ह्या कैद्याला विचारायचेत.
“लेवी
मैथ्यू?” भसाड्या आवाजांत रोग्याने विचारलं आणि डोळे मिटून
घेतले.
“हो, लेवी मैथ्यू...” एक उंच,
त्रस्त करणारा आवाज़ त्याच्यापर्यंत
पोहोचला.
“आणि
तू बाजारांत मंदिराबद्दल काय सांगितलंय लोकांना?”
उत्तर
देणा-याचा आवाज पिलातच्या कानशिलावर जणुं घणाचे घाव घालत होता, हा दुःखदायी आवाज पुढे म्हणाला,
“मी, महाबली, हे सांगितलं होतं,
की जुन्या विश्वासांचं मंदिर एक दिवस
ध्वस्त होणारेय आणि त्याच्या जागेवर सत्याचं नवं देवालय उभं राहील, अशा प्रकारे सांगितलं की सगळ्यांना कळावे.”
“अरे, भटक्या, तू बाजारांत जनतेला सत्याबद्दल सांगून कां चिथवलंस, त्या सत्याबद्दल,
ज्याचे तुला स्वतःलासुद्धां ज्ञान
नाहीये? सत्य काय आहे?15”
आणि
न्यायाधीशाने लगेच विचार केला,
‘अरे देवा, मी ह्याला
न्यायमंदिरांत अत्यंत अनावश्यक प्रश्न विचारतोय...माझी बुद्धि आतां साथ देत नाहींये...,’
आणि त्याच्या नजरेसमोर काळ्या द्रवाचा
प्याला तरळून गेला. ‘मला विष पाहिजे, विष!’
आणि
तेवढ्यांत त्याने पुन्हां आवाज ऐकला.
“सत्य, सर्वप्रथम हे आहे,
कि तुझं डोकं दुखतंय. इतकी तीव्र पीडा
आहे की तू मृत्युबद्दल विचार करतोय. तुझ्यांत बोलण्याचंसुद्धां त्राण उरलं नाहीये.
माझ्याकडे बघतानापण तुला त्रास होतोय,
नकळतंच मी तुला तुझा हत्यारा
असल्यासारखा वाटतोय,
ह्याचं मला दुःख आहे. आणखी कोणत्याही
गोष्टीबद्दल तू विचारसुद्धां करूं शकत नाहीये. तुझ्या मनांत फक्त येवढीच इच्छा आहे, की तुझा कुत्रा धावंत-धावंत तुझ्या जवळ यावा, फक्त तोंच असा आहे, ज्याच्याशी तूं भावनात्मक रूपाने जोडलेला आहेस. पण तुझी वेदना आतां
संपणारेय. डोकेदुखी गायब होणारेय.”
सचिवाने
विस्फारलेल्या डोळ्यांनी कैद्याकडे पाहिलं आणि लिहितां-लिहितां मधेच थांबला.
पिलातने
वेदनेने ओथंबलेले डोळे कैद्याकडे उचलले आणि बघितलं की सूर्य अश्व-शर्यतीच्या
मैदानावर बरांच वर आलेला आहे. त्याचे किरण येशुआच्या तुटलेल्या पादत्राणांवर पडंत
होते आणि तो सूर्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करंत होता.
न्यायाधीश
आसनावरून उठला. त्याने दोन्हीं हातांने डोकं गच्च दाबलं. त्याच्या पिवळ्या ज़र्द
चेह-यावर भितीची सावली दिसली. आपल्या इच्छाशक्तीने त्याने स्वतःच्या भितीवर ताबा
ठेवला आणि पुन्हां आसनावर बसला.
कैदी
बोलंतच होता. सचिवाने आता लिहिणं बंदंच करून टाकलं होतं. आपली मान हंसासारखी बाहेर
काढून तो लक्षपूर्वक कैद्याचे बोलणे ऐकंत होता. त्याला एक ही शब्द सोडायचा नव्हंता.
“बघ, सगळं संपलंय...” कैद्याने प्रेमभराने पिलातकडे पाहिलं आणि पुढे म्हणाला, “मला आनंद झालाय. मी तुला असा सल्ला देईन, महाबली, की थोडावेळ महालाच्या बाहेर चालून ये, कमींत कमी ‘ऑलिव्स माउन्ट’वर 16 असलेल्या उद्यानापर्यंत तरी जाऊन ये.
संध्याकाळपर्यंत वादळ येणारेय,”
कैद्याने वळून डोळे बारील केले आणि
सूर्याकडे पाहून म्हणाला,
“तुझ्यासाठी पायी चालणं फायद्याचं आहे.
मी पण आनंदाने तुझ्या बरोबर आलो असतो. माझ्या डोक्यांत काही नवीन विचार आलेयंत, कदाचित ते तुला मनोरंजक वाटतील. मला तुझ्याशी बोलायला आवडेल, कारण तू एक बुद्धिमान व्यक्ति वाटतोयं.”
सचिवाचा
चेहरा भितीने पांढरा फटक पडला. त्याच्या हातांतून चर्मपत्र खाली पडलं.
“दुःख
हे आहे...,” कैदी बोलतंच होता, त्याला कोणी थांबवूं
शकंत नव्हतं, “की तू पूर्णपणे स्वतःतंच गुरफटला आहेस. लोकांवरून तुझा
विश्वास उडालेला आहे. तुला पण माहितीये, की आपलं सम्पूर्ण
प्रेम फक्त कुत्र्यावरंच ओतणं चांगलं नाहीये. तुझं जीवन अभावग्रस्त आहे, महाबली...” आणि कैदी हसला.
सचिव
आतां फक्त एकाच गोष्टीचा विचार करंत होता, की आपल्या कानांवर
विश्वास करावां किंवा नाहीं,
पण विश्वास करावांच लागला. त्याने
अंदाज़ लावायचा प्रयत्न केला,
की कैद्याच्या ह्या अद्भुत धृष्ठतेवर
न्यायाधीशाचा क्रोध कोणच्या प्रकारे प्रकट होतो. तो न्यायाधीशाला चांगलं ओळखंत
असला, तरीही बरोबर अंदाज़ करणे सचिवाच्या कल्पनेबाहेरची गोष्ट
होती.
तेव्हां
न्यायाधीशाचा भसाडा,
तुटका-फुटका आवाज़ ऐकू आला. तो लैटिनमधे
म्हणंत होता, “ह्याचे हात मुक्त करा.”
अंगरक्षकांपैकी
एकाने आपल्या बरछीचा आवाज केला,
ती दुस-याकडे दिली, आणि कैद्याच्या जवळ जाऊन त्याचा दोर सोडला. सचिवाने आपलं चर्मपत्र उचललं आणि
ठरवलं की तो काही लिहिणार नाहीं आणि कोणत्यांच गोष्टीने आश्चर्यचकित होणार नाहीं.
पिलातने
हळूंच ग्रीकमधे विचारलं,
“स्वीकार कर, की तू महान चिकित्सक
आहेस.”
“नाहीं, न्यायाधीश, मी चिकित्सक नाहीये...” कैद्याने उत्तर दिलं आणि
आपल्या हाताच्या लाल,
सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर प्रेमाने
हात फिरवंत राहिला.
पिलात
त्याच्याकडे तिरप्या नजरेने बघंत होता आणि आतां त्याच्या डोळ्यांत वेदनेचा
लेशमात्रही नव्हता. त्यांत होत्या सर्वांना परिचित असलेल्या ठिणग्या.
“मी
तुला विचारलं नाहीं,”
पिलातने विचारलं, “कदाचित तुला लैटिन येत असेल?”
“हो, येतं,” कैद्याने उत्तर दिलं.
पिलातच्या
जर्द गालांवर रंग परतला. त्याने लैटिनमधे विचारलं, “बरं, तूं कसं ओळखलं की मला कुत्र्याला बोलवावंसं वाटंत होतं?”
“अगदी
सोपं आहे,” कैद्यानेपण लैटिनमधेच उत्तर दिलं, “तू हवेंत हात फिरवंत होता,
आणि ओठ...”
“हो,” पिलात म्हणाला.
थोडा
वेळ शांतता पसरली मग पिलातने ग्रीकमधे विचारलं, “अच्छा, तर तू चिकित्सक आहेस?”
“नाही, नाही...” कैद्याने उत्साहांत उत्तर दिलं, “विश्वास ठेव, मी चिकित्सक नाहीये.”
“बरं, बरं ठीक आहे,
जर लपवायचं असेल तर खुशाल लपंव.
तुझ्यावर लावलेल्या आरोपाशी ह्याचा सरळ संबंधसुद्धां नाहीये. तर तू ह्या गोष्टीवर
ठाम आहेस, की तू तोड-फोड करून, किंवा जाळपोळ करून
किंवा इतर कोणत्या पद्धतीने मंदिर ध्वस्त करायचा प्रयत्न नाही केला?”
“मी, महाबली, कोणालांच अश्या कोणत्याही कामासाठी नाही चिथवलं, मी पुन्हां सांगतो. मी काय कमी डोक्याचा वाटतोय?”
“ओह, नाहीं. तू बिल्कुल कमी डोक्याचा वाटंत नाही.” पिलातने हळूंच म्हटलं आणि एक
भयंकर स्मित त्याच्या चेह-यावर पसरलं,
“तू शप्पथ घे, की असं नाही झालं.”
“कोणाची
शप्पथ घेऊं? तुझी काय इच्छा आहे?” कैद्याने विचारलं.
“वाटलं
तर आपल्या जीवनाची घे,”
न्यायाधीश म्हणाला, “त्याचीच शप्पथ घेण्याची वेळ आलीय, कारण की ते एका
केसाने लटकतंय, हे लक्षांत असूं दे!”
“तू
असा विचार करतोयंस कां,
महाबली, की तूंच त्याला
केसाने टांगलंय?” कैद्याने विचारलं, “असं असेल तर तू खूप
मोठी चूक करतोयंस.”
पिलात
रागाने थरथरूं लागला आणि दात करकरंत म्हणाला, “मी हा केस कापूं
शकतो.”
“असा
विचार करणेसुद्धां चूक आहे,”
एक निर्मळ स्मित करून एका हाताने
स्वतःला सूर्यापासून वाचवण्यांचा प्रयत्न करंत कैद्याने नाराजी दाखवली, “स्वीकार कर, की केस कापणं त्याच्यांच हातांत नाहीये, ज्याने त्याला टांगलंय.”
“बरंय, बरंय,” पिलात हसला, “आता मला पटलंय की येर्शलाइमचे
रिकामटेकडे लोक अवश्यंच तुझ्या मागेमागे चालंत असतील. हे तर मला माहीत नाहीये की
तुला जिह्वा कोणी दिलीय,
पण गोष्टी छान करतोस. बरं, हे तर सांग की तू काय गाढवावर17 बसून सुसा18
दरवाज्यांतून येर्शलाइममधे दाखल झाला होतास, आणि तुझ्या बरोबर
मोट्ठी गर्दी होती,
जी तुझा अशा प्रकारे जयजयकार करंत होती, जणु तू कुणी पैगम्बर असावा?”
न्यायाधीशाने चर्मपत्राकडे खूण करंत
विचारलं.
कैद्याने
अविश्वासपूर्ण नजरेने न्यायाधीशाकडे बघून उत्तर दिलं, “माझ्या जवळं तर
गाढवंच नाहीये, महाबली. मी येर्शलाइममधे सूसा दरवाज्यातूनंच आलो. पण
चालंत आलो. माझ्यासोबत फक्त लेवी
मैथ्यू होता. मला बघून कुणीच जयजयकार करंत नव्हतं, कारण तेव्हां मला
येर्शलाइममधे कोणी ओळखतंच नव्हतं.”
“तू
कुणा दिसमास, गेस्तास आणि बार-रब्बानला19 ओळखतोस कां?” पिलातने कैद्याकडे एकटक बघंत विचारलं.
“ह्या
भल्या माणसांना मी नाही ओळखंत,”
कैद्याने उत्तर दिलं.
“खरंच?”
“खरंच!”
“आता
तू मला हे सांग, की तू हे नेहमी-नेहमी ‘भला माणूस’ ह्या शब्दाचा प्रयोग कां करतोस?
तूं काय, सगळ्यांना ह्याच
नावाने संबोधित करतो?”
“हो, सगळ्यांना,” कैदी म्हणाला, “जगांत वाईट माणसं नाहीतंच.”
“पहिल्यांदाच
ऐकतोय,” पिलात हसला, “कदाचित तुला जीवनाचा
अनुभव कमी आहे. पुढे काही लिहिण्याची गरज नाहीये,” त्याने सचिवाला
सांगितलं, ज्याने खरं तर केव्हांपासूनंच लिहिणं बंद केलेलं होतं, मग कैद्याकडे वळून म्हणाला,
“तू हे काय एखाद्या ग्रीक पुस्तकांत
वाचलंय?”
“नाहीं, आपल्या बुद्धिनेंच मी ह्या निष्कर्षापर्यंत पोहोंचलोय.”
“आणि
तूं ह्यांच गोष्टीचा प्रचारसुद्धां करतोस?”
“हो.”
“आता, उदाहरणार्थ, सेनाध्यक्ष मार्क क्रिसोबोय, तो पण ‘भला माणूस’
आहे?”
“हो,” कैदी म्हणाला,
खरं म्हणजे तो दुर्दैवी आहे. जेव्हां
भल्या माणसांनी त्याच्या चेह-याला कुरूप करून टाकलं, तेव्हांपासून तो
निष्ठुर आणि क्रूर झालांय. कदाचित् हे माहीत करणं चांगलं होईल की कोणी त्याचं
अंगभंग केलं.”
“मी
सांगतो,” पिलात म्हणाला, “कारण की मी स्वतःच्या
डोळ्यांनी ते बघितलंय. भले माणसं त्याच्यावर तुटून पडले, जसे कुत्रे अस्वलावर तुटून पडतांत. जर्मन सैनिकांनी त्याच्या हाता-पायांना, मानेला घट्ट विळखा घातला. सेनाध्यक्ष जणु पोत्यांत बंद झाला. जर बाजूच्या
घोडदळ टोळीने, ज्याचं नेतृत्व मी करंत होतो, त्या वेढ्यावर आक्रमण नसतं केलं तर, हे दार्शनिक, आज तू क्रिसोबोयशी बोलूं शकला नसतां. हे सगळं वैली ऑफ वर्जिन्स मधे इदिस्ताविजोच्या20
युद्धांत घडलं होतं.”
“जर
त्याच्याशी कोणी वार्तालाप केला असतां,”
कैदी जणु स्वप्नांतल्या जगांत हरवला
होता, “तर मला विश्वास आहे, की त्याच्या
स्वभावांत परिवर्तन झालं असतं.”
“मला
वाटतं…” पिलात म्हणाला, “की जर तू त्याच्या
एखाद्या सैनिकाशी किंवा ऑफ़िसरशी बोलला असता, तरी त्याला आनंद
नसतां झाला. पण सुदैवाने हे होणार नाहीये आणि सगळ्यांत आधी, मी हे होऊं देणार नाहीं.”
ह्याच
वेळी स्तंभांच्या दालनांत एक चिमणी तीरासारखी उडत आली. सोनेरी छताखाली तिने एक
चक्कर मारला, आणि जवळंच खाली असलेल्या एका तांब्याच्या मूर्तीच्या
चेह-याला आपल्या तीक्ष्ण पंखाने झाकून पुन्हां वर उडून गेली आणी स्तंभाच्या वरच्या
टोकामागे लपली. कदाचित तिथे घरटं बनवायचा विचार तिच्या मनांत आला असावा.
जेवढा
वेळ ती चिमणी दालनांत उडंत होती,
तेवढ्यांत न्यायाधीशाच्या आता स्पष्ट
आणि हल्कं झालेल्या डोक्यांत एका योजनेने जन्म घेतला. योजना अशा प्रकारची होती, की महाबलीने भटक्या दार्शनिक येशुआवर लावलेल्या आरोपांची तपासणी केली.
हा-नोस्त्री आडनावाच्या ह्या माणसाविरुद्ध कोणतांच अपराध सिद्ध नाहीं होऊं शकला.
येशुआच्या कार्यकलापांशी येर्शलाइममधे त्यासुमारास घडंत असलेल्या अराजकतापूर्ण
घटनांचा कुठलांच संबंध आढळला नाही. भटक्या दार्शनिक मानसिक रुग्णासारखा भासंत
होता. ह्या सर्व तथ्यांकडे लक्ष देतां, न्यायाधीश पिलात सिनेद्रिओनच्या कनिष्ठ न्यायाधीशाने
दिलेल्या मृत्युदण्डाची पुष्टी करंत नाहीये. पण हे सुद्धां नाकारतां येत नाही, की हा-नोस्त्रीचे निर्बुद्ध,
स्वप्नदर्शी भाषण येर्शलाइममधे गडबड
पसरवूं शकतांत, म्हणून न्यायाधीश येशुआला येर्शलाइमपासून दूर, भूमध्यसागरांत असलेल्या सीज़ेरिया स्त्रातोनोवांत, जिथे न्यायाधीशाचे
निवास स्थान आहे, ठेवण्याची आज्ञा देतोय.
बस, फक्त सचिवाला हा आदेश लिहायला सांगणे शिल्लक होते.
चिमणीचे
पंख महाबलीच्या डोक्याच्या अगदी वर फडफडंत होते. ती कारंज्याच्या खालच्या कुंडाकडे
आली आणि बाहेर उडून गेली. न्यायाधीशने कैद्याकडे बघितलं, त्याच्या जवळ गरम धुळीचा लोळ वर उठंत होता.
“ह्याच्याबद्दल
सगळं झालं?” पिलातने सचिवाला विचारलं.
“नहीं, दुर्दैवाने नाहीं,”
सचिवने सांगितलं आणि चर्मपत्राचा दुसरा
तुकडा पिलात कडे दिला.
“आता
आणखी काय आहे?” पिलातने विचारलं आणि तोंड वाकडं केलं.
चर्मपत्रावरचा
लेख वाचून त्याच्या चेह-याचा रंग आणखीनंच बदलला. एक तर त्याच्या चेह-याकडे आणि
मानेकडे काळ्या रंगाचं रक्त प्रवाहित होत असावं, किंवा आणखी काही कारण
असावं, पण त्याच्या शरीराचा रंग पिवळ्याहून भुरा झाला, डोळे जणु खोल-खोल जाऊं लागले.
कदाचित
हा त्याच्या नसांमधे तांडव करणा-या रक्ताचांच दोष असावा, पण न्यायाधीशाच्या दृष्टीला काहींतरी निश्चितंच झालं. त्याला भास झाला की जणु
कैद्याचं डोकं दूर कुठे तरी वाहून गेलंय आणि त्याच्या जागेवर दुसरं डोकं प्रकट
झालंय21. ह्या टकल्या डोक्यावर तीक्ष्ण दातांचा सोन्याचा मुकुट होता; कपाळावर गोल फोड होता,
ज्याने तिथल्या त्वचेला खाऊन टाकलं
होतं आणि त्याच्यावर लेप लावलेला होता;
दात नसलेलं तोंड होतं, ज्याचा खालचा वाकडा-तिकडा ओठ लटकंत होता. पिलातला आभास झाला, की दालानातील गुलाबी स्तंभ आणि उद्यानाच्या पलिकडे येर्शलाइमच्या घरांचे
छप्पर गायब झालेत, आणि जणु सर्व काही काप्रेच्या हिरव्या, दाट उद्यानांमधे गडप झालं. त्याच्या कानांनासुद्धां काहीतरी झालं, जणु दूर कुठून तरी नगाड्यांचा आणि बिगुलचा मंद पण भयंकर आवाज येत होता आणि
एक अनुनासिक आवाज अत्यंत स्पष्टपणे ऐकूं येत होता, जो शब्दांना
ताणून-ताणून म्हणंत होता: ‘महामहिमच्या अपमानासंबंधीचा नियम...’
संक्षिप्त, संदर्भहीन, असाधारण विचार डोक्यांत कल्लोळ करूं लागले: ‘मेलो!’ मग: ‘मेलेत!...’
आणि त्यांच्यामधे एक विचित्र विचार, अवश्यंभावी असणा-या – आणि कुणाबरोबर?!
– मृत्युहीनतेबद्दल, आणि न जाणे कां,
म्रुत्युहीनतेच्या विचाराने मन
उद्विग्न झालं.
पिलात
सरंळ बसला, डोळ्यांसमोर तरंगत असलेल्या दृश्यांना दूर झटकलं, नजर दालानाकडे वळवली आणि त्याच्यासमोर कैद्याचे डोळे आले.
“ऐक, हा-नोस्त्री,”
न्यायाधीशाने येशुआकडे विचित्र नजरेने
बघंत म्हटलं. त्याचा चेहरा भयंकर झाला होता, पण डोळ्यांत काळजीची
झाक होती, “तू कधी महान सम्राटाबद्दल काही सांगितलं होतंस? उत्तर दे! सांगितलं होतं?
की...नाही...सांगितलं?” पिलातने ‘नाही’
शब्दावर जोर देत त्याला अनावश्यक
रूपाने ताणलं, जसं न्यायालयांत करंत नाहींत. आणि त्याला वाटलं की
त्याने डोळ्यांनेच येशुआला एक संदेश दिलाय, जणु हे सुचवलंय की
ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायला हवंय.
“सत्य
सांगणं नेहमी सोपं आणि प्रिय असतं,”
कैदी म्हणाला.
“मला
ह्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये,”
रागाने पेटून पिलात म्हणाला, “की तुला सत्य सांगणं प्रिय वाटतं किंवा अप्रिय वाटतं, पण तुला खरं बोलावं लागेल. जर अवश्यंभावी आणि पीडादायक मृत्यु नको असेल, तर प्रत्येक शब्द तोलून-मापून बोल.”
कोणालांच
कळलं नाही की जूडियाच्या न्यायाधीशाला काय झालं होतं. त्याने तळपत्या सूर्यापासून
स्वतःला वाचविण्यासाठी आपला एक हात वर उचलला आणि ह्या हाताचा ढालीसारखा उपयोग करंत, त्याच्या आडून कैद्याला डोळ्यांतल्या डोळ्यांत काही खूणदेखील केली.
“आणि...”
तो पुढे म्हणाला, “हे सांग की तूं किरियाथच्या22 जूडास
नावाच्या व्यक्तीला ओळखतोस कां?
आणि हे पण सांग की जर सम्राटाबद्दल
काही सांगितलं असेल,
तर तू त्याला काय सांगितलंस?”
“झालं
असं की...” कैद्याने उत्साहपूर्वक सांगायला सुरुवात केली. “परवा संध्याकाळी
मंदिराजवंळ माझी ओळख एका तरुणाशी झाली. तो स्वतःला जूडास म्हणतो आणि करियाथचा
राहणारा आहे. त्याने खालच्या शहरांत आपल्या घरी बोलावलं आणि माझं स्वागत...”
“भला
माणूस?” पिलातने विचारलं आणि त्याच्या डोळ्यांत राक्षसी अंगारे
चमकले.
“खूप
भला आणि जिज्ञासू माणूस आहे...” आणि कैद्याने ठासून सांगितलं, “तो माझ्या विचारांमधे खूप रस घेत होता, आणि त्याने अत्यंत
प्रसन्नतेने माझं स्वागत केलं...”
“त्याने
दिवे लावले...23” कैद्याच्याच स्वरांत न्यायाधीशाने म्हटलं आणि त्याचे
डोळे चमकले.
“हो,” न्यायाधीशाने दिलेल्या सूचनेने आश्चर्यचकित होत येशुआ पुढे म्हणाला, “त्याने मला राज्यशासनाबद्दल आपले विचार मांडायला सांगितलं. त्याला ह्या
प्रश्नांत विशेष उत्सुकता होती.”
“आणि
तू काय सांगितलं?” पिलातने विचारलं, “की तू सांगणारेस, की सांगितलेलं विसरलोय ?”
पण आता पिलातच्या स्वरांत निराशा होती.
“इतर
गोष्टींबरोबर मी हे म्हटलं होतं. “ कैदी सांगत होता, “की कोणत्याही
प्रकारचं शासन लोकांवर अत्याचारासारखं आहे आणि एक वेळ अशी येईल, की पृथ्वीवर कोणाचेच शासन नाही राहणार, न सम्राटाचे, न आणखी कुणाचे,
आणि मानव सत्य आणि न्यायाच्या साम्राज्यांत
प्रवेश करेल, जिथे कोणतेच शासन, किंवा शासक नसेल.”
“पुढे!”
“पुढे
काही नाहीं झालं,” कैद्याने म्हटलं. “तेवढ्यांत लोकं धावंत-धावंत आले, मला बांधलं आणि कारागृहांत घेऊन गेले.”
सचिव
एकही शब्द न सोडतां भरभर चर्मपत्रावर लिहीत होता.
“जगांत
सम्राट तिबेरियसच्या शासनासारखं महान आणि सुरेख शासन कधीच झालेलं नाहीये आणि कधी
होणारही नाही!” आता पिलात किंचाळला,
“अंगरक्षकाला दालनातूंन काढा!” मग
सचिवाकडे वळून म्हणाला,
“मला कैद्यासोबत एकटं सोडा, शासनाशी संबंधित काही गुप्त गोष्टी आहेत.”
अंगरक्षक
भाला उचलून खट-खट आवाज़ करंत दालनातूंन उद्यानाकडे चालला गेला. त्याच्या मागे मागे
सचिव सुद्धां निघून गेला.
दालनाच्या
शांततेला थोडा वेळ फक्त कारंज्यातून उडत असलेलं पाणीच भंग करंत होतं. पिलात बघंत
होता की कारंज्याच्या नळीतून पाण्याची तबकडी कशी उंच उठतेय आणि तिचे कोपरे तुटून
धारेच्या रूपांत खाली पडतेय.
आधी
कैदी म्हणाला, “मी बघतोय, की करियाथच्या ह्या तरुणाशी झालेल्या माझ्या
वार्तालापामुळे जणु आकाश फाटलंय. महाबली, मला आभास होतोय की
त्याचं काहींतरी अनिष्ट होणारेय,
मला त्याच्याबद्दल अत्यंत सहानुभूति
आहे.”
“मला
वाटतंय...” विचित्रपणे हसंत न्यायाधीश म्हणाला, “की जगांत नक्कीच असा
कोणीतरी आहे, ज्याच्याबद्दल तुला करियाथच्या जूडासपेक्षां जास्त
सहानुभूती असायला हवी,
आणि ज्याच्यावर जूडासपेक्षांही जास्त
मोठी आपत्ति येणारेय! तर,
मार्क क्रिसोबोय, जो एक थण्ड आणि आश्वस्त हत्यारा आहे, ते लोकं,” न्यायाधीशाने येशुआच्या जख्मी चेह-याकडे बोट दाखवंत म्हटलं, “ज्यांनी तुझ्या उपदेशांसाठी तुला मारलंय, दरोडेखोर दिस्मास आणि
गेस्तास, ज्यांनी चार सैनिकांची हत्या केली आणि, शेवटी, तो घाणेरडा विश्वासघातकी जूडास – हे सगळेंच ‘भले माणसं’ आहेत?”
“हो,” कैद्याने उत्तर दिलं.
“आणि
सत्याचं साम्राज्य येणारेय?”
“येईल, महाबली,” येशुआने ठासून सांगितलं.
“ते
कधीच नाही येणार!” अचानक पिलात इतक्या भयंकर आवाजांत ओरडला की येशुआ ठेचकाळला.
अगदी अश्शाच आवाजांत तो अनेक वर्षांपूर्वी वैली ऑफ वर्जिन्समधे आपल्या घोडेस्वार
सैनिकांवर ओरडला होता: ‘
त्यांना कापून टाका! त्यांना कापा!
भीमकाय क्रिसोबोय अडकलांय!’
आवाजाला आणखी जास्त मोट्ठा करून, आज्ञा देऊन-देऊन चिरक्या झालेल्या आवाजांत अशा प्रकारे शब्द फेकत, की ते उद्यानांतसुद्धां ऐकू जातील, तो ओरडला, “ गुन्हेगार! गुन्हेगार! गुन्हेगार!”
आणि
मग लगेच आवाज खाली आणून म्हणाला,
“येशुआ हा-नोस्त्री, तुझा कोण्या देवांवर विश्वास आहे?”
“देव
एक आहे,” येशुआने उत्तर दिलं, “माझा त्याच्यावर
विश्वास आहे.”
“तर
मग त्याची प्रार्थना कर! सम्पूर्ण शक्तिनिशी प्रार्थना कर! तरी पण...” पिलातचा
आवाज खोल गेला, “ह्याने काहीच फायदा होणार नाहीये. तुला बायको नाहीये
का?” विषादपूर्वक पिलातने विचारलं, त्याला कळंत नव्हतं की त्याला काय होतंय.
“नाही, मी एकटाच आहे.”
“किळसवाणं
शहर...” न जाणे कां,
अचानक न्यायाधीश पुटपुटला आणि त्याने
खांदे हलवले जणुं त्याला थण्डी वाजंत असावी, आणि हात एकामेकावर
चोळले, जसं त्यांना धुतोय, “जर तुला करियाथच्या
जूडासशी भेटण्या आधींच मारून टाकलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं.”
“तू
मला सोडून दे, महाबली,”
कैद्याने अकस्मात् विनंती केली आणि
त्याचा आवाज थरथरला,
“मला वाटतंय की लोकं मला मारून टाकणार
आहेत.”
आवेगामुळे
पिलातच्या चेहरा विकृत झाला. त्याने येशुआकडे आपले सुजलेले लाल डोळे फिरवले आणि
म्हणाला, “दुर्दैवी माणसा, तुला काय वाटतंय, रोमचा न्यायाधीश ते सगळं सांगणा-या माणसाला सोडून देईल जे तू म्हटलंय? अरे देवा! तुला असं वाटतंय का की मला तुझ्या जागेवर उभं राहायचंय? मी तुझ्या विचारांशी सहमत नाहीये! आणि आता मी काय सांगतो ते ऐक: जर आतां तू कुणाशी
एक जरी शब्द बोलला,
तर माझ्या हाततून सुटणार नाहीं! मी
पुन्हां सांगतोय, सावंध रहा.”
“महाबली...”
“चूप!”
पिलात ओरडला आणि त्याने उत्तेजित नजरेने त्या चिमणीकडे पाहिलं, जी पुन्हां उडून दालनांत आली होती, “इकडे या!” पिलात
ओरडला.
आणि
जेव्हां सचिव आणि अंगरक्षक आपापल्या जागेवर परतले, तेव्हां पिलातने
घोषणा केली की तो सिनेद्रिओनच्या कनिष्ठ न्यायालयाने गुन्हेगार येशुआ
हा-नोस्त्रीसाठी प्रस्तावित केलेल्या मृत्युदण्डाची पुष्टी करतोय. सचिवने
पिलाताच्या ह्या घोषणेला लिहून घेतलं
एका
मिनिटानंतर न्यायाधीशाच्या समोर मार्क क्रिसोबोय उभा होता. न्यायाधीशाने त्याला
कैद्याला गुप्तचर सेवा प्रमुखाकडे सोपवण्याची आज्ञा केली. त्या बरोबरंच
न्यायाधीशाचा हा आदेश पण कळविण्याची आज्ञा दिली, की येशुआ
हा-नोस्त्रीला इतर सर्व कैद्यांपासून वेगळं ठेवण्यांत यावं आणि गुप्तचर सेवेशी
संबंध असलेल्या कुणाही व्यक्तीला येशुआशी बोलायची किंवा त्याच्या कोणत्याही
प्रश्नाचे उत्तर द्यायची परवानगी नसावी, अन्यथा त्यांना कठोर
शिक्षा होईल.
मार्कने
खूण करतांच अंगरक्षकांने येशुआभोवती वेढा घातला आणि त्याला दालनाबाहेर घेऊन गेले.
त्यानंतर
न्यायाधीशाच्या सन्मुख एक सुदृढ,
भुरी दाढी असलेला सुदर्शन पुरुष
उपस्थित झाला, त्याच्या छातीवर सोनेरी सिंहांची मुण्डमाळा चमकंत होती, शिरस्त्राणावर गरुडाचे पंख होते,
तलवारीची मूठ सोन्याची होती, गुडघ्यांपर्यंत तिहेरी टाचेचे पादत्राण होते आणि डाव्या खांद्यावर लाल
अंगवस्त्र होते. हा रोमन सैन्य तुकडीचा प्रमुख होता. न्यायाधीशाने त्याला विचारलं
की सेबेस्तियन तुकडी सध्यां कुठे आहे. प्रमुखाने उत्तर दिलं की ही तुकडी
अश्व-शर्यतीच्या मैदानासमोरच्या चौकाला वेढा घालून उभी आहे, जिथे कैद्यांना आज शिक्षा सुनावण्यांत येणार आहे.
तेव्हां
न्यायाधीशाने आदेश दिला की रोमच्या ह्या सैन्य तुकडीला दोन शतकांमधे विभाजित करावे. पहिला भाग क्रिसोबोयच्या नेतृत्वांत गुन्हेगारांची रक्षा करेल, फाशी देण्याचे सामान-सुमान आणि जल्लादांना ‘बाल्ड –माउन्टेन’24 वर
नेणा-या गाड्यांची रक्षा करेल आणि तिथे पोहोचल्यावर त्यांच्या आजूबाजूला घेरा
टाकून उभा राहील. दुसरा भाग आत्ता,
लगेच ‘बाल्ड-माउन्टेन’वर पाठवण्यांत यावा,
जो लगेच त्याची घेराबन्दी सुरूं करेल.
ह्याच उद्देशाने, म्हणजे बाल्ड-माउन्टेनची रक्षा करण्यासाठी एक अतिरिक्त
अश्वारोही तुकडी, सीरियन तुकडी, तेथे पाठवण्यांत
यावी.
सैन्य
तुकडीचा प्रमुख दालनांतून निघून गेल्यावर न्यायाधीशाने सचिवाला सिनेद्रिओनचा
अध्यक्ष, त्याचे दोन सदस्य आणि येर्शलाइमच्या मंदिराच्या
सुरक्षा तुकडीच्या प्रमुखाला महालांत बोलवायला सांगितलं, आणि हे पण सांगितलं,
की ह्या सगळ्या लोकांना भेटण्याआधी तो
एकट्या अध्यक्षाशी एकांतांत बोलूं इच्छितो.
न्यायाधीशाच्या
आज्ञेचे लगेच आणि तंतोतंत पालन झालं. सूर्य, जो ह्या काळांत जणु
दात-ओठ खात येर्शलाइमला भस्म करंत होता, आपल्या चरम उँचीवर
पोहोचायच्या आधीच उद्यानाच्या वरच्या छतावर पाय-यांची रक्षा करणा-या दोन संगमरमरी
सिंहाच्या जवळ न्यायाधीशाने अध्यक्षपदावर कार्य करणा-या जूडियाच्या धर्मगुरू जोसेफ
काइफाची25 भेट घेतली.
उद्यानांत
शांतता होती. पण स्तंभाच्या मधून,
सूर्यप्रकाशांत न्हायलेल्या, हत्तींच्या अजस्त्र पायांसारखे बुंधे असलेल्या लिन्डन वृक्षांच्या
उद्यानाच्या वरच्या छतावर येताना,
जिथून न्यायाधीशाच्या समोर त्याला
घृणित वाटणारं शहर दिसंत होतं – आपले हवेत लटकणारे पुल, बुरूज आणि सर्वांत
अवर्णनीय, म्हणजे संगमरमरने बनलेल्या, छताच्या ठिकाणी एका
विशालकाय सोन्याच्या जबड्याने झाकलेल्या येर्शलाइमच्या मंदिरासहित – न्यायाधीशाच्या
तीक्ष्ण कानांनी दूर,
जिथे दगडी भिंत शहराला ह्या
उद्यानापासून वेगळं करंत होती,
क्षीण आवाज ऐकले, ज्यांच्यावरून अधून-मधून काही विव्हळण्याचे, ओरडण्याचे आवाज तरंगत
होते.
न्यायाधीशाला
समजलं की चौकांत आत्तापासूनंच येर्शलाइममधे हल्लीच घडलेल्या आतंकवादी घटनांने
त्रस्त लोकांची गर्दी जमा झालेली आहे. ही गर्दी मोठ्या अधीरतेने गुन्हेगारांना
सुनावण्यांत येणा-या शिक्षेची वाट बघतेय. ह्या गर्दींत पाणी विकणारे ओरडतायेत.
न्यायाधीशाने
आधी धर्मगुरूला दालनांत बोलावलं,
म्हणजे निर्मम उन्हांने तो स्वतःला
वाचवूं शकेल, पण काइफ़ाने नम्रतेने क्षमा मागितली26, आणि म्हणाला की त्याला असे करतां येणार नाही. तेव्हां पिलातने किंचित टक्कल
पडंत असलेल्या आपल्या डोक्यावर टोपी घातली आणि वार्तालाप सुरूं केला. हा वार्तालाप
ग्रीक भाषेंत चालला होता.
पिलातने
म्हटलं की त्याने येशुआ हा-नोस्त्रीच्या खटल्याचा तपास केलेला आहे आणि
मृत्युदण्डाची पुष्टी केलीय.
अशा
प्रकारे, मृत्युदण्ड जो आजंच संपन्न होईल, तीन दरोडेखोरांना सुनावण्यांत आला आहे: दिसमास, गेस्तास, बार-रब्बान – आणि शिवाय ह्या येशुआ हा-नोस्त्रीलापण. पहिल्या दोघांनी
सम्राटाच्या विरुद्ध क्रांती करण्यासाठी लोकांना तैयार केलं होतं. त्यांना रोमन
साम्राज्याने युद्ध करून कैद केलं होतं, ज्याचे श्रेय
न्यायाधीशाला जाते आणि म्हणूनंच त्यांच्याबद्दल काही विचार करण्यांत येणार नाही.
बाकी दोघांना, म्हणजे बार-रब्बान आणि येशुआला स्थानीय शासनाने बंदी
केलंय आणि सिनेद्रिओनने त्यांच्यावर खटला चालवलांय. प्रथा आणि नियमानुसार, ह्या दोघांपैकी एकाला लवकरंच येणार असलेल्या ईस्टरच्या (ज्यू लोक ह्याला ‘पासोवर’
म्हणतांत – अनु.) निमित्ताने मुक्त करावे लागणारेय.
आणि
म्हणूंनच न्यायाधीशाला विचारायचे आहे,
की सिनेद्रिओनला ह्या दोन
अभियुक्तांपैकी कोणाला मुक्त करायचंय : बार-रब्बानला किंवा हा-नोस्त्रीला27?
काइफाने
डोकं झुकवलं, हे दर्शविण्यासाठी की त्याला प्रश्न समजलांय आणि मग
म्हणाला, “सिनेद्रिओनचे निवेदन आहे की बार-रब्बानला मुक्त
करण्यांत यावं.”
न्यायाधीशाला
चांगलंच माहीत होतं,
की धर्मगुरू त्याला हेंच उत्तर देईल, पण त्याचं काम होतं,
धर्मगुरूच्या ह्या उत्तरावर विस्मय
दाखवणं. पिलातने चांगल्या प्रकारे हेंच केले. त्याच्या उद्दण्ड चेह-याच्या दोन्हीं
भुवया उंचावल्या, न्यायाधीशाने विस्मयाने सरंळ धर्मगुरूच्या डोळ्यांत
बघितलं.
“मान्य
करतो की ह्या उत्तराने मी चकित झालोय,”
न्यायाधीशाने हळूंच म्हटलं, “मला काळजी आहे,
की कुठे काही गैरसमज तर नाहीं झाला?”
पिलातने
स्पष्ट केलं की रोमन साम्राज्याला स्थानीय धार्मिक साम्राज्याच्या अधिकारांचं हनन
करायचं नाहीये, धर्मगुरूला हे चांगलं माहीत आहे, पण प्रस्तुत परिस्थितीत निश्चितंच चूक झालीये. रोमन साम्राज्याला ही चूक
सुधारण्यांस आनंद होईल.
खरं
म्हणजे : अपराधाचं गांभीर्य लक्षांत घेतां, बार-रब्बान आणि
हा-नोस्त्रीच्या अपराधांची तुलनांच करतां येणार नाही. बरोबर आहे, जर स्पष्ट रूपाने माथेफिरू असा दुसरा गुन्हेगार काही असंबद्ध, वेडवाकडं बोलतांना आढळला,
ज्यामुळे येर्शलाइम आणि जवळपासचे लोक
चिथावले गेले, तर पहिल्याचा अपराध पुष्कळ गंभीर स्वरूपाचा आहे.
त्याने
फक्त लोकांना खुल्लमखुल्ला बण्डासाठी प्रेरितच नाही केलं, पण त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना चौकीदारालासुद्धां मारून टाकलं.
हा-नोस्त्रीच्या तुलनेत बार-रब्बान खूप जास्त धोकादायक आहे.
ह्या
सर्व गोष्टींकडे बघतां न्यायाधीश आशा करतांत, की सिनेद्रिओनने
केलेल्या निर्णयावर पुन्हां एकदा विचार करावा आणि दोन्हीं गुन्हेगारांपैकी जो कमी
धोकादायक आहे, त्याला स्वतंत्र करावं. आणि कमी धोकादायक, निश्चितंच हा-नोस्त्री आहे. बरोबर?
काइफाने
सरळ पिलातच्या डोळ्यांत बघंत हलक्या पण दृढ आवाजांत सांगितलं की सिनेद्रिओनने काळजीपूर्वक
ह्या खटल्यावर विचार केलेला आहे आणि तो पुन्हां सांगतो की सिनेद्रिओन बार-रब्बानला
मुक्त करण्याची सिफारिश करतोय.
“काय? माझ्या विनंती नंतर सुद्धां?
त्याच्या विनंतीनंतर, ज्याच्या रूपाने रोमन साम्राज्य तुमच्याशी संवाद करतंय? धर्मगुरू, तिस-यांदा सांग.”
“तिस-यांदापण
आम्हीं हेंच सूचित करतोय की आम्ही बार-रब्बानला मुक्त करतोय,” काइफाने हळूंच म्हटलं.
सगळं संपलंय, बोलण्यासाठी
काही उरलंच नाही. हा-नोस्त्री नेहमीसाठी चालला जाईल आणि न्यायाधीशाच्या भयंकर आणि
दुष्ट पीडेचा इलाज करणारा कोणीच राहणार नाही; ह्या
पीडेचा मृत्युशिवाय दुसरा काही उपाय नाहीये. पण पिलातला ह्या वेळेस ह्या विचाराने
आश्चर्यचकित नव्हतं केलं. तोच अगम्य विषाद, ज्याने
दालनांत उभे राहताना त्याला घेरलं होतं, त्याचं
सम्पूर्ण अस्तित्व भेदून गेला. त्याने ह्या विषादाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला
आणि त्याला कळलं, की कारण विचित्र होतं: न्यायाधीशाला
वाटलं की कैद्याला काही विचारायचं राहून गेलंय, कदाचित
त्याने त्याची एखादी गोष्ट ऐकली नाहीये.
पिलातने प्रयत्नपूर्वक ह्या
विचाराला डोक्यातून पळवून लावलं आणि तो जसा उडंत आला होता, तसांच
उडूनही गेला. तो उडून गेला, पण विषादाचं
कारण समजलं नाही, कारण की तिला अचानक विजेसारखा चमकून
लुप्त होऊन जाणारा एक छोटासा विचार देखील समजावूं शकला नाही : ‘अमरत्व...मृत्युहीनता
आलेली आहे...’ कोणाची मृत्युहीनता आली आहे?
न्यायाधीशाला
कळलं नाही, पण ह्या रहस्यमय मृत्युहीनतेच्या
विचाराने न्यायाधीशाच्या अंगात तळपत्या सूर्यांत देखील हुडहुडी भरली.
“ठीक आहे,”
पिलातने
म्हटलं, “असेच होईल.”
त्याने चारीकडे नज़र वळवली
आणि सृष्टीत झालेल्या परिवर्तनाने तो चकित झाला. गुलाबांनी लगडलेली फांदी तुटलेली
होती. दालनाच्या वरच्या छताजवळ लागलेले सरूचे झाडंसुद्धां तुटले होते. अंजिराचं
झाड, सावलीत उभा असलेला पांढरा पुतळा आणि हिरवळदेखील
लुप्त झाले होते. ह्या सर्वांच्या जागी काही गुलाबी घट्ट पदार्थ28 प्रकट
झाला, त्यांत पाणवेली हलंत होत्या आणि त्या
न जाने कुणीकडे वाहूं लागल्या, आणि
त्यांच्या बरोबर पिलात पण वाहत होता. आतां त्याला वाहवून नेत होता दम घोटणारा आणि
जाळणारा जगांतील सगळ्यांत भयंकर प्रकोप – शक्तिहीनतेचा प्रकोप.
“माझा दम घुटतोय,”
पिलात
विव्हळला, “दम घुटतोय!” त्याने ओल्या,
थण्डगार हाताने अंगरख्याचे बटन तोडून टाकले, जे
खाली रेतीवर पडले.”
“आज हवा उष्ण व दमट आहे,
कुठून
तरी तूफ़ान येतंय...” न्यायाधीशाच्या लाल बुंद चेह-यावरून नजर न हलवतां आणि सगळ्या
संभाव्य विपदांची कल्पना करंत काइफाने म्हटलं, “ओह,
ह्या
वर्षी निस्सानचा महिना किती भयंकर आहे.”
“नाहीं,”
हे
दमटपणामुळे नाहीये, काइफ़ा, माझा
दम तुझ्यामुळे घुटतोय,” आणि आपल्या डोळ्यांना बारीक करंत
पिलात हसून म्हणाला, “आपली रक्षा कर,
धर्मगुरू.”
धर्मगुरूचे काळे डोळे चमकले.
त्याने अगदी तस्संच विस्मयाचं प्रदर्शन केलं, जसं
थोड्या वेळापूर्वी न्यायाधीशाने केलं होतं.
“हे मी काय ऐकतोय,
न्यायाधीश?”
स्वाभिमानपूर्वक
आणि शांतपणे काइफाने विचारलं, “तुम्हीं
मला त्या शिक्षेबद्दल धमकावतांय जिचं अनुमोदन तुम्हीं स्वतः पण केलेलं आहे?
हे
कसं शक्य आहे? आम्हांला तर अशी सवय आहे,
की
रोमन न्यायाधीश काहीही म्हणण्याआधी शब्दांच व्यवस्थित चयन करतांत. महाबली,
आपलं
बोलणं कुणी ऐकलं तर नाहीये?”
पिलातने विझलेल्या डोळ्यांनी
धर्मगुरूकडे पाहिलं आणि मग दात किटकिटंत हसला.
“काय म्हणतोय,
धर्मगुरू!
आपलं बोलणं इथे कोण ऐकूं शकतं? मी काय त्या
तरूण माथेफिरू भटक्या सारखा वाटतोय, ज्याला आज
मृत्युदण्डाची शिक्षा सुनावलीये? मी काय
लहान मूल आहे, काइफ़ा? मला
माहितीये की मी काय म्हणतोय. उद्यानाच्या चारीकडे घेराबंदी आहे. महालाच्या
चारीकडेपण रक्षकांचा वेढा आहे, असा,
की कोणत्या लहानशा भोकांतूनसुद्धां एक उंदीरपण आंत येऊं शकणार नाही! फक्त उंदीरंच
नाही, तो सुद्धां आंत येऊ शकणार नाहीं,
काय
म्हणतांत त्याला...किरियाथ शहरातला. असो, धर्मगुरू!
तू त्याला ओळखतोस कां? हो...जर तसला माणूस आत घुसलाच तर
त्याला दुःखच होईल, माझं म्हणणं तुला पटलंच असेल?
तर,
तू
लक्षांत ठेव, धर्मगुरू की आजपासून तुला शांतता
नाहीं मिळणार! न तुला, न तुझ्या प्रजेला,”
आणि
पिलातने दूर उजवीकडे हात केला, जिथे दूर
उंचावर मंदिर तळपंत होतं, “हे तुला मी
सांगतोय, मी, पोंतीचा
पिलात, सोनेरी भालेवाला अश्वारोही!” 29
“माहितीये,
माहितीये!”
काळ्या दाढीवाल्या काइफाने निर्भयतेने म्हटलं आणि त्याचे डोळे चमकले. त्याने
आकाशाकडे हात उचलला आणि पुढे म्हणाला, “जूडियाच्या
लोकांना माहितीये की तू त्यांचा किती हेवा करतोस आणि त्यांना खूप कष्ट देणारेस,
तरीही
तू त्यांना समाप्त करूं शकणार नाही! ईश्वर त्यांचं रक्षण करेल! महामहिम सम्राट आमची हाकपण ऐकतील,
आम्हांला
रक्तपिपासू पिलातापासून वाचंवतील!”
“ओह, नाही!...”
पिलात विस्मयाने किंचाळला. प्रत्येक शब्दाबरोबर त्याच्यावरचं दडपण उतरंत गेलं.
त्याला खूप हल्कं वाटूं लागलं. आता आणखी जास्त नाटक करण्याची,
शब्दांना
खबरदारीने निवडण्याची गरज नाहीये, “तूं
सम्राटाला माझ्याबद्दल खूप तक्रारी पाठवल्यांत, आता
माझी पाळी आहे, काइफ़ा! आता माझ्याकडून तक्रार जाईल,
अंत्योखियाच्या
गवर्नरला नाहीं, रोमला सुद्धां नाहीं,
सरंळ
काप्रेत, सरंळ सम्राटाला,
की
तू कसा विद्रोह करणा-यांना मृत्युच्या दाढेतूंन काढून येर्शलाइममधे लपवतोस,
आणि
तेव्हां मी येर्शलाइमला सोलोमैन तलावाचं पाणी नाहीं पुरवणार,
जसं
मी करणार होतो. नाही, पाणी नाहीं! आठवं,
की
कशी तुझ्यामुळे मला सम्राटची मुद्रा असलेल्या ढाली भिंतीवरून काढून ठेवाव्या
लागल्या, सैन्यांना एकत्र करावं लागलं,
मला
स्वतःला, बघतोयंस न, स्वतः
इथे यावं लागलं, हे बघायला, की
इथे काय चाललंय! माझे शब्द लक्षांत ठेव, धर्मगुरू,
येर्शलाइम
मधे तुला फक्त एकंच सैनिक तुकडी नाही दिसणार, फुलमिनातची
सम्पूर्ण तुकडी भिंतीच्या खाली येईल, अरबी
अश्वारोही आक्रमण करतील आणि मग तूं ऐकशील करुण रूदन आणि विव्हळण्याचे
आवाज़...तेव्हां तू मुक्त केलेल्या बार-रब्बानला आठवशील आणि तुला दुःख होईल की तू
त्या दार्शनिकाला त्याच्या शांतिपूर्ण उपदेशांसकट मृत्युच्या दाढेंत कां पाठवलंस.”
धर्मगुरूच्या चेह-यावर चट्टे
प्रकट झाले, डोळे जळजळ करूं लागले. तो सुद्धां
न्यायाधीशासारखांच हसला आणि दात खांत म्हणाला:
“न्यायाधीश,
तू
हे आता जे काही सांगितलंस, त्याच्यावर
तुझा स्वतःचा तरी विश्वास आहे कां? नाही,
अजिबात
नाही! ह्या फूस लावणा-या जादूगाराने,
येर्शलाइममधे शांति नाहीं आणलीय, आणि तुला,
अश्वारोही,
हे
चांगलंच माहितीये. तुला त्याला अशासाठी स्वतंत्र करायचे आहे,
की
जेणेंकरून तो लोकांना फूस लावून त्यांच्या धार्मिक मान्यतांवर आघात करेल आणि
जनतेला रोमच्या तलवारीखाली फेकून देईल! पण मी, जूडियाचा
धर्मगुरू, जोपर्यंत जिवंत आहे,
धर्माची
विटम्बना नाही होऊं देणार आणि जनतेचं रक्षंण करीन! तू ऐकतोयंस,
पिलात?”
काइफाने
धमकीच्या आविर्भावांत आपला हात उचलला, “तू समजून
घे, न्यायाधीश!”
काइफा बोलायचा थांबला.
न्यायाधीशाच्या कानांत पुन्हां जणु समुद्री लाटांची गर्जना घुमूं लागली,
जी
हिरोदच्या महालाच्या भिंतींपर्यंत येऊन पोहोंचली होती. ही गर्जना न्यायाधीशाच्या
पायापासून सुरूं होऊन त्याच्या चेह-यापर्यंत पोहोंचली. त्याचा मागे,
महालाच्या
प्रवेशद्वाराबाहेर, तुता-यांचा भयानक आवाज घुमूं लागला,
शैकडो
पायांचा आवाज, तलवारींचा खणखणाट...न्यायाधीशाला
समजलं की रोमन पायदळ सैन्याची तुकडी महालाच्या बाहेर जातेय...त्याच्या
हुकुमाप्रमाणे, मृत्युदण्डापूर्वीच्या परेड साथी,
जी
दरोडेखोर आणि क्रांतिका-यांच्या मनांत भीती उत्पन्न करते.
“तूं ऐकतोयंस,
न्यायाधीश?”
धर्मगुरूने
हळूंच विचारलं, “तूं कदाचित म्हणशील,”
त्याने
आपले हात आकाशाकडे उचलले, ज्याने
त्याच्या डोक्यावरची काळी टोपी खाली पडली, “की
हे सगळं त्या दयनीय दरोडेखोर बार-रब्बानमुळे आहे?”
न्यायाधीशाने पंजाच्या
मागच्या बाजूने ओलं, थण्ड कपाळ पुसलं,
जमिनीकडे
पाहिलं, मग डोळे बारीक करून आकाशाकडे
बघितलं. सूर्याचा लाल-लाल गोळा जवळ-जवळ त्याच्या डोक्यावंर होता,
काइफाची
सावली जणु सिंहाच्या शेपटीला चिकटली होती. तो हळूंच आणि उदासीनतेनं म्हणाला:
“दुपार व्हायला आली. आपण
गोष्टींमधे भरकटून गेलो, असो,
वार्तालाप
चालूं ठेवूं शकतो.”
त्याने शालीनतेने धर्मगुरूची
क्षमा मागितली, त्याला मग्नोलियाच्या सावलींत बसवून
इतर व्यक्तींची प्रतीक्षा करायला सांगितलं, ज्यांच्या
छोट्याशा सभेंत तो मृत्युदण्डाशी संबंधित काही निर्देश देणार होता.
काइफाने विनम्रतेने वाकून,
छातीवर हात ठेवून त्याचं अभिवादन केलं आणि तो उद्यानातंच राहिला,
पिलात
दालनांत परत आला. तेथे त्याची वाट बघत असणा-या सचिवाला त्याने सैन्य तुकडीच्या
प्रमुखाला, सिनेद्रिओनच्या दोन सदस्यांना आणि
मंदिर-सुरक्षा कमिटीच्या प्रमुखाला बोलवायला सांगितलं. ही मंडळी खालच्या छतावर,
कारंज्याजवळ
न्यायाधीशाच्या निरोपाची वाट बघंत होते. पिलातने असं पण सांगितलं की तो लगेच परंत
येईल आणि महालाच्या आतल्या भागांत गेला.
जोपर्यंत सचिव ह्या
छोट्याश्या सभेच्या आयोजनांत गुंतला होता, न्यायाधीश
महालाच्या आंत, सूर्याच्या प्रकाशाने वाचवणारे
जाड-जाड काळे पडदे लावलेल्या खोलींत एका व्यक्तीला भेटला. खरं तर ह्या अंधा-या
खोलींत सूर्याचे किरंण त्याला जराही त्रास देऊं शकंत नव्हते,
तरीही
त्याचा अर्धा चेहरा टोपीने झाकलेला होता. ही भेट अत्यंत संक्षिप्त होती. न्यायाधीशाने
हलक्या आवाजांत ह्या व्यक्तीला काही सांगितलं, जे
ऐकून तो निघून गेला आणि पिलात स्तंभ असलेल्या दालनांतून निघून उद्यानांत आला.
तिथे,
त्या
सगळ्यांच्या उपस्थितींत, ज्यांना
त्याने बोलावलं होतं, पिलातने गंभीरतेने आणि अत्यंत
कोरडेपणाने पुन्हां सांगितलं की तो येशुआ हा-नोस्त्रीला दिलेल्या मृत्युदण्डाचे
अनुमोदन करतोय, आणि त्याने औपचारिकरीत्या
सिनेद्रिओनच्या सदस्यांना विचारलं की ते कोणाला जीवनदान द्यायची सिफारिश करताहेत.
हे उत्तर मिळाल्यावर की बार-रब्बानला, न्यायाधीशाने
म्हटलं, “ठीक आहे,” आणि
तत्काळ सचिवाला हे लिहून घ्यायला सांगितलं. सचिवाने रेतीतील उचलून दिलेलं बटन
पकडून तो गंभीरतेने म्हणाला, “चला.”
सर्व उपस्थित व्यक्ति रुंद
संगमरमरी पाय-यांवरून, आपला पागल करणारा सुगंध फेकंत
असलेल्या, गुलाबाच्या भिंतींमधून खाली उतरले,
खाली,
आणखी
खाली उतरून महालाच्या भिंतीपर्यंत, प्रवेशद्वाराजवळ
पोहोचले, जे एका चिक्कण फरशीच्या चौकापर्यंत
घेऊन जात होतं, ज्याच्या दुस-या टोकावर
येर्शलाइमच्या व्यायामशाळेचे स्तंभ आणि पुतळे दिसंत होते.
लोकांचा हा छोटासा समूह
उद्यानांतून चौकांत असलेल्या उंच चौथ-यावर पोहोंचला, पिलात
आपले डोळे बारीक करून परिस्थितीचा आढावा घेत होता. ती जागा जी त्याने आतांच पार केली
होती, म्हणजेच महालापासून चौथ-यापर्यंतची
जागा, अगदी रिकामी होती,
पण
पिलातला आपल्यासमोर चौक कुठे दिसंतच नव्हता – त्याला भीड गिळून गेली होती,
जर
पिलातच्या डावीकडे सेबास्तियन सैनिकांच्या तिहेरी पंक्तीच्या तुकडीने आणि उजवीकडे
इतूरियाच्या सैनिकांच्या सहायक तुकडीने थांबवलं नसतं, तर
तिने चौथ-याला आणि रिकाम्या जागेला सुद्धां गिळलं असतं.
पिलात उंच चौथ-यावर बनवलेल्या
व्यासपीठावर पोहोचला – मुट्ठींत अनावश्यक बटन यंत्रवत दाबंत आणि डोळे बारीक करंत.
न्यायाधीश डोळे ह्यासाठी बारीक नव्हता करंत, की
सूर्य त्याच्या डोळ्यांना भस्म करंत होता, तर
अशासाठी की त्याला फासावर लटकावल्या जाणा-यांना बघायचं नव्हतं,
ज्यांना
थोड्यांच वेळांत येथे आणणार होते.
जसांच रक्तवर्णीय किनारीचा
पांढरा अंगरखा मानवी समुद्राहून खूप उंचावर दगडाच्या चौथ-याच्या टोकावर दिसला,
न
बघणा-या पिलाच्या कानांत एक लाट आदळली : “हा...आ...आ...” ही लाट हळू आणि खालच्या
सुरांत प्रारंभ झाली, तिचे उद्गम स्थळ अश्व-शर्यतीच्या
मैदानाजवळ कुठेतरी होते, मग ती उंच
स्वरांत गोंगाटासारखी विराट झाली, काही क्षण
तशीच गुंजायमान होऊन पुन्हां खाली पडायला लागली. ‘मला
बघितलंय...’ न्यायाधीशाने विचार केला. आवाजाची
लाट न्यूनतम बिंदुला पोहोचायच्या आधीच अप्रत्याशितपणे पुन्हां उच्चतम बिंदुकडे
जाऊं लागली आणि तरंगत तरंगत, पूर्वीच्या
गोंगाटापेक्षांही जास्त विराट झाली. ह्या दुस-या लाटेंत समुद्राच्या पाण्यांत
तरंगणा-या फेसासारखे शिट्ट्यांचे आवाज आणि वादळी गडगडांत सगळ्यांत वेगळा प्रतीत
होणारा स्त्रियांच्या विव्हळण्याचा आवाज तरंगत होता. ‘आतां
त्यांना चौथ-यावर आणताहेत...’ पिलातने
विचार केला, ‘आणि हा विव्हळण्याचा आवाज अशासाठी
की पुढे-पुढे वाढणा-या गर्दीने धक्कामुक्कींत काही महिलांना चिरडलंय.’
जोपर्यंत गर्दी आपल्या
सग़ळ्या भावनांना व्यक्त करून आपणहूनंच शांत नाही झाली, तेवढा
वेळ त्याने वाट बघितली. कारण की गर्दीला कोणत्याही प्रकारे शांत करणं शक्यंच
नव्हतं.
आणि मग ती वेळ आली,
न्यायाधीशाने
आपला उजवा हात वर केला आणि गर्दींतला उरला-सुरला आवाज पण लुप्त झाला.
तेव्हां,
जेवढी
शक्य होती, तेवढी गरम हवा पिलातने श्वासाद्वारे
फुफ्फुसांत भरून घेतली आणि तो ओरडला, त्याचा
भसाडा आवाज हज्जारो डोक्यांवर तरळला.
“सम्राट सीज़रच्या आज्ञेने!”
त्याच्या कानांवर लोखण्डी खडखडीचा आवाज अनेक वेळा आदळला. सैन्याच्या तुकड्यांमधे
आपले-आपले भाले आणि निशाणांना वर उचलून सैनिक गरजले.
“सीज़रचा जय असो!”
पिलातने चेहरा वर केला आणि
सरंळ सूर्याकडे फिरवला, त्याच्या
पापण्यांच्या खाली हिरवी आग भडकली. ह्या आगींत त्याचा मेंदू भडकला आणि अरामैक
भाषेचे भसाडे शब्द गर्दीवर तरंगले : “चार अभियुक्तांना, ज्यांना
येर्शलाइममधे हत्या, विद्रोह,
आणि न्याय तसेंच धार्मिक विश्वासाचा अपमान करण्याच्या अपराधांबद्दल पकडलेलं आहे,
त्यांना
फासावर लटकावून मृत्युदण्डाची शिक्षा सुनावण्यांत आली आहे! आणि आतां ह्या ‘बाल्ड-माउन्टेन’वर
मृत्युदण्ड सम्पन्न केला जाईल! ह्या अभियुक्तांची नावं आहेत – दिसमास,
गेस्तास,
बार-रब्बान
आणि हा-नोस्त्री. हे सगळे तुमच्या समक्ष आहेत!”
एकाही अभियुक्ताकडे न बघतां
पिलातने उजवीकडे हात दाखवला, हे निश्चित
केल्याशिवाय, की ते त्यांच जागेवर आहेत किंवा
नाही, जेथे त्यांना असायला पाहिजे.
गर्दीने खूप वेळ मोठ्या
गोंगाटाने उत्तर दिलं. हा गोंगाट आश्चर्यामुळे तरी होता, किंवा
हायसं वाटल्यामुळे. गोंगाट थांबल्यावर पिलात पुढे म्हणाला, “पण
फासावर फक्त तिघांनांच चढवलं जाईल, कारण की,
नियम
आणि प्रथेला अनुसरून ईस्टरच्या सणानिमित्त कोण्या एका अभियुक्ताला,
ज्याची
निवड कनिष्ठ सिनेद्रिओनने केलेली आहे, आणि ज्याचं
रोमन शासनाने अनुमोदन केलंय, त्याचं
घृणित जीवन सम्राट सीज़र परत करतायंत!”
पिलात ओरडून बोलंत होता. तो
हे पण ऐकंत होता, की गोंगाटाची जागा गंभीर शांततेने
कशी घेतली. आता त्याच्या कानांवर कोणतेच उसासे, सरसर
पोंहोचत नव्हती. एका क्षणासाठी पिलातला वाटलं की त्याच्या चारीकडची प्रत्येक गोष्ट
लुप्त झालीयं. जणु हे शहर, ज्याचा
त्याला तिटकारा होता, मरून गेलंय आणि सूर्याच्या सरळ
पडणा-या किरणांनी होरपळंत फक्त तोंच एकटा उभा आहे. आकाशाकडे तोंड करून पिलातने
काही वेळ शांततेला कायम ठेवलं आणि मग ओरडून सांगायला सुरुवात केली – “ज्याला आता
तुमच्या समोर स्वतंत्र करण्यांत येईल, त्याचं नाव
आहे...”
तो आणखी काही क्षण चुप
राहिला, नावाला आपल्या ओठांवर थोपवंत,
हा
विचार करंत, की त्याने सगळं व्यवस्थित
सांगितलंय, कारण की त्याला माहीत होतं की त्या
सौभाग्यशाली व्यक्तीचं नाव ऐकतांच ही मृतप्राय प्रजा पुनर्जीवित होईल आणि तेव्हां
कोणालाच एकही शब्द ऐकूं येणार नाही.
“सगळं
झालंय?” पिलातने पुटपुटंत स्वतःलांच विचारलं
– “हो, सगळं. नाव!”
आणि ‘र’
शब्दाला
निःस्तब्ध शहरावर उकलंत ओरडला, “बार-रब्बान!”
त्याला एकदम असं वाटलं,
की
सूर्य झणझणून त्याच्यावर पडलांय आणि त्याच्या कानांमधे आग ओत्तून गेलांय. ह्या
आगेत उकळंत होती स्पर्धा, शिट्ट्या,
विव्हळणे,
हसणे
आणि चीत्कार.
पिलात वळला आणि दगडी
चौथ-यावरून उतरून पाय-यांकडे वळला. तो कुठेच बघंत नव्हता, शिवाय
रंगीबेरंगी फरश्यांकडे, जेणेकरून
पाय-यांवरून घसरणार नाही. त्याला माहीत होतं, की
आता त्याच्या मागे फाशीचे सामान असलेल्या चौथ-यावर कास्याची नाणी आदळतील. ह्या
उमडत्या गर्दीमधे लोकं एकमेकाला दाबंत, धक्के देत,
एक
दुस-याच्या खांद्यावर चढून आपल्या डोळ्यांनी एक आश्चर्य बघतील,
की
कशा प्रकारे एक माणूस मृत्युच्या जबड्यातूंन सुखरूप बाहेर आलांय. अंगरक्षक कसे
त्याच्या बेड्या काढतील, असं
करतांना त्याच्या जखमी हातांना नकळंतच वेदना पोहोचवतील, तो
कसा, विंव्हळंत, कपाळावर
आठ्या घालंत एक अर्थहीन वेडसर हास्य पसरेल.
त्याला माहीत होतं की त्याच
वेळेस अश्वारोही सैनिक अन्य तीन्हीं अभियुक्तांना, ज्यांचे
हात मागे बांधलेले आहेत, पाय-यांकडे
नेत असतील, म्हणजे त्यांना पश्चिमेकडे जाणा-या,
शहराच्या
बाहेर, ‘बाल्ड- माउन्टेन’
च्या रस्त्यावर नेतां येईल. ह्या चौथ-यावरून दूर झाल्यावर पिलातने डोळे उघडले.
त्याला माहीत होतं, की आतां काही भीती नाहीये. आता
अभियुक्त त्याच्या दृष्टिक्षेपांतून निघून गेलेले होते.
गर्दीच्या मंद होत चाललेल्या
गोंगाटांत आता दवण्डी पिटणा-यांचा कर्कश आवाज वेगळांच ऐकूं येत होता. ते पिलातच्या
निर्णयाचे अरामैक आणि ग्रीक भाषांमधे भाषांतर लोकांना ऐकवंत होते. त्याच्या
कानांना तुटक-तुटक, चर्र-मर्र करणारा जवळ येत असलेल्या
घोड्याच्या टापांचा आणि तुतारीचा आवाज ऐकूं आला, जो
ओरडून काहीतरी संक्षिप्त, आनंदी असं सांगत
होतां. ह्या आवाजाला जणु प्रत्युत्तर देत तरुणांची कर्कश शिट्टी ऐकूं आली. तरूण
अश्व-शर्यतीच्या मैदानाकडून बाजाराकडे जाणा-या रस्त्याच्या किना-यावर बनलेल्या
घरांच्या छतांवर होते, तसंच एक कर्कश चेतावनी ऐकूं आली:
“संभाळ!”
रिकाम्या झालेल्या मैदानांत
एकट्या उभ्या असलेल्या सैनिकाने घाबरून काही खूण केली आणि न्यायाधीश,
सैन्य
तुकडीचा प्रमुख, सचिव आणि अंगरक्षक तिथेच थांबले.
अश्वारोही सैनिकांची तुकडी
मैदानाकडे तीरा सारखी धावली, जेणें करून
त्याला एका बाजूने घेरून लोकांचं तेथे येणं थांबवूं शकेल आणि कोप-यावर,
दगडी
भिंतीच्या खालून, जेथे द्राक्षाचा वेल पसरला होता,
छोट्या
रस्त्यावरून ‘बाल्ड-माउन्टेन’कडे
जाऊं शकेल.
अश्वारोही तुकडीचा सीरियन
प्रमुख, जो एका मुलाएवढा लहान आणि काळा होता,
आपल्या
घोड्यावर जणुं उडंत आला. पिलातच्या जवळ येऊन आपल्या चिरक्या आवाजांत काही ओरडला
आणि त्याने म्यानेतून तलवार काढली. दुष्ट, कावळ्यासारखा
काळा घोडा अडखळला आणि आपल्या मागच्या पायांवर उभा राहिला. तलवार म्यानींत ठीवून
कमाण्डरने घोड्याच्या खांद्यावर चाबुक मारला, त्याला
चारी पायांवर उभा केला आणि कोप-याकडे चालला गेला. घोडा सरपट चालंत होता.
प्रमुखाच्या मागे धुळीचे लोट उडवंत तीन-तीनच्या पंक्तीत अश्वारोही धावत होते,
बासाच्या
झाडांचे शिखर उसळूं लागले, न्यायाधीशाच्या
समोर, पांढ-या शिरस्त्राणांमुळे आणखीनंच
सावळे भासणारे, प्रसन्नतेने दात दाखवंत असलेले
चेहरे जात होते.
आकाशापर्यंत धूळीचे लोट
उडवंत, अश्वारोही सैनिकांची ही तुकडी
कोप-यावरच्या गल्लीत घुसली. न्यायाधीशाच्या समोरून, सूर्याच्या
प्रकाशांत चमचमणा-या तुतारीला पाठीवर बांधून, शेवटचा
सैनिक गेला.
हातांनी स्वतःला धुळीपासून
वाचवंत, किंचित क्रोधाने चेह-यावर आठ्या
घालून पिलात पुढे निघाला. त्याच्यामागे सैन्य तुकडीचा प्रमुख,
सचिव
आणि अंगरक्षकसुद्धां महालाच्या उद्यानाच्या द्वाराकडे चालूं लागले.
सकाळचे जवळ-जवळ दहा वाजले
होते.
**********
तीन
सातवं प्रमाण
“हो,
सकाळचे
जवळ-जवळ दहा वाजले होते, आदरणीय
इवान निकोलायेविच,” प्रोफेसरने म्हटलं.
कवीने चेह-यावर हात फिरवला,
जणु
आतांच झोपेतूंन जागा झालांय. त्याने बघितलं की पत्रियार्शीवर अंधार झाला
होता.
तलावाचं पाणी काळं दिसंत
होतं, आणि त्यांत एक छोटीशी नाव संथपणे
जात होती. वल्ह्यांच्या आवाजाबरोबरच नावेंत बसलेल्या कुण्या महिलेचं हसणंसुद्धां
ऐकू येत होतं. वृक्ष्यांच्या आळींत चौकाच्या तिन्हीं बाजूंना बेंचावर इकडे-तिकडे
बसलेले लोकं दिसंत होते, फक्त त्या
दिशेला सोडून, जिथे आपले मित्र वार्तालाप करंत
होते.
मॉस्कोच्या वरचं आकाश जणु
फिक्कंट झालं होतं. वरती पूर्ण चंद्र अगदी स्पष्ट दिसंत होता. चंद्र आता सोनेरी
नसून पांढरा झाला होता. आतां श्वास
घेणं सोपं झालं होतं. लिण्डन वृक्षांच्या खालचे आवाज पण संध्याकाळसारखेच मृदु,
कोमल
येत होते.
‘मला
कळलंसुद्धां नाही, की त्याने एक सम्पूर्ण गोष्टंच
गढलीयं?’ बिज़्दोम्नी आश्चर्याने विचार करू
लागला – ‘संध्याकाळपण झाली! असं पण असूं शकतं,
की
तो काही सांगतंच नव्हता आणि माझाच डोळा लागला, आणि
ते सगळं मी स्वप्नांत पाहिलंय?’
पण हे तर मान्य करावंच लागेल
की प्रोफेसरनेच हे सगळं सांगितलं होतं, नाहीतर असं
तरी समजायंच की बेर्लिओज़लापण अगदी तेंच स्वप्न पडलंय, कारण
की तो परदेशी पाहुण्याकडे एकटक बघंत म्हणंत होता, “जरी
बाइबलच्या गोष्टींशी साम्य नसलं, तरी तुमची
गोष्ट खूप रोचक होती, प्रोफेसर.”
“क्षमा
करा,” प्रोफेसरने सौजन्यतेने हसून म्हटलं,
“तुम्हांलातर माहीतंच आहे, की
बाइबलमधे जे काही लिहिलेलं आहे, तसं
वास्तवांत कधी घडलंच नाहीये. आणि आपण जर बाइबलला ऐतिहासिक प्रमाण म्हणून स्वीकार
केलं...” तो पुन्हां हसला. बेर्लिओज़ कावराबावरा झाला, कारण
की जेव्हां ते ब्रोन्नाया स्ट्रीट पासून पत्रियार्शीकडे येत होते,
तेव्हां
अगदी हेंच त्याने बिज़्दोम्नीला सांगितले होते.
बेर्लिओज़ने म्हटलं,
“मुद्दा असा आहे की...माफ़ करा, ही
गोष्टसुद्धां कोणीच प्रमाणित करूं शकणार नाही, की
जे काही तुम्हीं आता सांगितलंय, ते पण खरंच
घडलं असेल.”
“ओह, नाही! ह्या गोष्टीला कोणीपण सत्य सिद्ध करूं शकेल!” प्रोफेसर ने तुटक-तुटक
भाषेंत दृढ स्वरांत म्हटलं आणि अचानक दोन्हीं मित्रांना रहस्यपूर्ण ढंगाने आपल्याजवळ
सरकायला सांगितलं. ते दोघं त्याच्याकडे वाकले. तो, आपल्या आवाजांत घडी
घडी येणारा नाटकीपणा न दाखवतां,
सरळ, सपाट स्वरांत म्हणाला, “गोष्ट अशी आहे,
की...” प्रोफेसरने किंचित घाबरून इकडे
तिकडे बघितलं आणि फुसफुसंत म्हणाला,
“मी स्वतः त्यावेळेस तिथे उपस्थित होतो.
पोंती पिलातबरोबर दालनांत होतो,
उद्यानांतसुद्धां होतो, जेव्हां तो काइफाशी गोष्टी करंत होता, दगड्याच्या
चौथ-यावरदेखील होतो,
पण लपून, गुप्त वेषांत. म्हणून
मी तुम्हांला विनंती करतो की ही गोष्ट स्वतःपुरतीच राहूं द्या, एकदम गुप्त, एकसुद्धां शब्द बाहेर नको यायला. श्-श्-श्!”
शांतता पसरली,
आणि भीतीने बेर्लिओज़चा चेहरा फिक्का पडला.
“तुम्हीं...तुम्हीं किती
दिवसांपासून मॉस्कोत आहांत?” थरथरत्या
आवाजांत त्याने विचारलं.
“मी तर आत्ताच,
ह्याच
क्षणी मॉस्कोला आलोय,” प्रोफेसरने गोंधळून उत्तर दिलं आणि
तेव्हांच मित्रांनी त्याच्या डोळ्यांत बघितलं आणि त्यांची खात्री झाली की त्याचा
डाव्या, हिरव्या डोळ्यांत वेडेपणाचे लक्षणं
होते, आणि उजवा डोळा होता – भाव रहित,
काळा
आणि निर्जीव.
‘सगळं
स्पष्ट आहे,’ बेर्लिओज त्रस्त झाला,
‘ हा एक पागल जर्मन आलेला आहे, किंवा
पत्रियार्शीवर येऊन पागल झालांय. हीच आहे त्याची गोष्ट!’
हो, खरोखरंच
सगळंच स्पष्ट झालं होतं : स्वर्गवासी दार्शनिक काण्टसोबत केलेला विचित्र
ब्रेकफास्ट, आणि सनफ्लॉवर-ऑइल आणि अन्नूश्काशी
संबंधित वेडसर गोष्टी, आणि ती भविष्तवाणी की त्याचं डोकं
कापलं जाणारेय, आणि अशाच अन्य गप्पा. प्रोफेसर
नक्कीच मूर्ख होता.
बेर्लिओज़ने तेव्हांच मनामधे
आराखडा बांधला की त्याला पुढे काय करायचंय. बेंचच्या पाठीला टेकतां टेकतां त्याने
प्रोफेसरच्या मागून बिज़्दोम्नीकडे बघून डोळा मारला, की
त्याच्या विरोध करूं नको, पण
घाबरलेल्या कविला ह्या खाणाखुणा कळल्याचं नाही.
“हो, हो,
हो...”
बेर्लिओज़ने उत्तेजनेने म्हटलं, “हे सगळं
संभव आहे. अगदी संभव आहे. पोंती पिलात, ते दालन,
आणि
ते सगळं...आणि तुम्हीं काय एकटेच आला आहांत की बायकोसुद्धां बरोबर आहे?”
“एकटा,
एकटा,
मी
नेहमी एकटांच असतो...” किंचित कटुतेने प्रोफेसरने उत्तर दिलं.
“आणि,
प्रोफेसर,
तुमचं
सामान कुठेय?” बेर्लिओज़ने लाडीगोडीने विचारलं,
“हॉटेल ‘मेट्रोपोल’मधे1?”
तुम्हीं
उतरलांत कुठे?”
“मी? कुठेच
नाही...” त्या अर्धविक्षिप्त जर्मनने विषादपूर्वक आणि विचित्रपणे आपल्या हिरव्या
डोळ्याने पत्रियार्शी तलावाकडे बघंत उत्तर दिलं.
“काय?
आणि...तुम्हीं
राहणार कुठे?”
“तुमच्या क्वार्टरमधे...”
अचानक तो पागल म्हणाला आणि त्याने डोळा मारला.
“मी...मला आनंदंच होईल,”
बेर्लिओज़ पुटपुटला, “पण, असं
आहे, की माझ्याकडे तुमची गैरसोय होईल...आणि ‘मेट्रोपोल’मधे1
खूप शानदार खोल्या आहेत, ते पहिल्या
श्रेणीचं हॉटेल आहे...”
“आणि,
काय,
सैतानसुद्धां
नाहीये?” मानसिक रुग्णाने एकदम खुशीत येऊन
बिज़्दोम्नीला विचारलं.
“सैतान सुद्धां...”
“त्याचा विरोध करूं नकोस...”
प्रोफेसरच्या मागून तोंड वाकडं करंत बेर्लिओज़ फक्त ओठांनी पुटपुटला.
“काही सैतान-बैतान नाहीये!”
ह्या सगळ्या नाटकाने चिडून इवान निकोलायेविचने ते सांगून टाकलं,
जे
त्याला सांगायला नको होतं, “काय कटकट
आहे! तुम्हीं हा सगळा वेडेपणा बंद करा!”
ह्यावर पागल इतका प्रचण्ड
हसला की त्याच्या डोक्यावरून लिण्डन वृक्षावर बसलेली चिमणी फडफडंत उडून गेली.
“आता,
ही
तर खूपंच मजेदार गोष्ट आहे!” हसतां-हसतां प्रोफेसरचं सगळं शरीर हलूं लागलं. “ही
काय सवय आहे, काहींही विचारलं तरी नाहींच म्हणतोस!”
त्याने एकदम हसणं थांबवलं, कदाचित
छातीत दुखूं लागलं होतं, आणि,
जसं
मानसिक रोगांत साहजिकंच असतं, हसणं
संपल्यावर लगेच दुस-या मनःस्थितींत पोहोचला – चिडला आणि गंभीरपणे ओरडला,
“तर, तुमच्या मते,
असं
काही नसतंच?”
“शांति,
शांति,
शांति,
प्रोफेसर,”
बेर्लिओज़ने
त्याला समजावलं. ह्या रोग्याला उत्तेजित अवस्थेत पाहून तो घाबरला,
“तुम्हीं इथे एक मिनिट माझ्या मित्राबरोबर बसा,
आणि
मी कोप-यावर जाऊन एक फोन करून येतो, मग
तुम्हांला जिथे जायचं असेल, तिथे
आम्हीं सोडून येऊं. तुम्हीं तर इथे नवीन आहांत नं...”
तसं बघितलं तर बेर्लिओज़चा
प्लान अगदी बरोबर होता : जवळच्या टेलिफोन बूथमधे जाऊन परदेशी पर्यटकांशी संबंधित
कार्यालयांत हे सूचित करायचं होतं, की हा,
परदेशांतून
आलेला कन्सल्टेन्ट पत्रियार्शी पार्कमधे बसलाय आणि त्याची मानसिक स्थिति बरोबर
नाहीये. म्हणून त्वरित काही उपाय योजना करावी, नाहीतर
येथे काही अप्रिय घटना घडूं शकते.
“फोन करायचांय?
करा,”
मानसिक
रुग्णाने उदासीने म्हटलं आणि अचानक भावपूर्ण स्वरांत विनती केली,
“पण जाता-जाता तुम्हांला निवेदन करीन, की
सैतानाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा! मी तुमच्याकडून कोणची मोठी वस्तु मागत नाहीये.
लक्षांत ठेवा की सैतानाच्या अस्तित्वाबद्दल सातवं प्रमाण आहे,
हे
फार खात्रीदायक प्रमाण आहे! तुम्हांला लगेच त्याच्याबद्दल कळेल.”
“बरं,
बरं...”
खोटं खोटं प्रेम दाखवंत बेर्लिओज़ने म्हटलं आणि चिडलेल्या कवीकडे बघून त्याने डोळा
मारला, ज्याच्या डोक्यांत ह्या पागल
जर्मनवर लक्ष ठेवण्याचा विचार आलांच नव्हता. मग तो ब्रोन्नाया रस्ता आणि
एर्मालायेव गल्लींच्या चौकाकडे असलेल्या निर्गम द्वाराकडे गेला. तो गेल्या बरोबर
प्रोफेसर जणुं अगदी बरा झाला आणि त्याच्या चेह-यावर चमंक आली.
“मिखाइल अलेक्सांद्रोविच!”
त्याने जात असलेल्या बेर्लिओज़ला ओरडून विचारलं.
तो थरथरला,
मग
त्याने मागे वळून पाहिलं आणि स्वतःला सांत्वना दिली की त्याचं नावसुद्धां
प्रोफेसरने कुठल्यातरी समाचार पत्रांत वाचलं असेल. आणि प्रोफेसर दोन्ही हातांचा
चम्बू करून ओरडंत होता, “तुमच्या
काकांना कीएवला तार करून देऊं का?”
बेर्लिओज़च्या हृदयांत
पुन्हां धक्क्ं झालं. ह्या वेड्याला कीएवच्या काकांबद्दल कसं माहीतीये?
ह्याबद्दल
तर कधीच, कोणच्याही वर्तमान पत्रांत लिहिलेलं
नाहीये. ए हे...हे? बिज़दोम्नी खरंच तर नव्हता म्हणंत?
पण
त्याच्या जवळचे डॉक्यूमेन्ट्स? ओफ,
किती
रहस्यमय माणूस आहे. फोन करायलांच हवा! त्याची चांगली काढतील!”
आणि पुढे काहीही न ऐकतां
बेर्लिओज़ पुढे धावला.
ब्रोन्नायाकडच्या बाहेर
जाणा-या दरवाज्या जवळ बेंचवरून उठून सम्पादकाजवळ तोंच माणूस आला,
जो
तेव्हां सूर्याच्या प्रकाशांत दाट उष्णतेतून बनताना दिसला होता. फरक फक्त इतकांच
होता, की आता तो हवेतून बनलेला नव्हे,
तर
साधारण माणसांसारखा ठोस दिसंत होता. दाटंत असलेल्या अंधारांत बेर्लिओज़ने स्पष्ट
बघितलं, की त्याच्या मिश्या कोंबडीच्या
पंखांसारख्या होत्या, डोळे छोटे-छोटे,
उपहासाने
भरलेले, थोडेसे दारुडे,
आणि
चौकटीची विजार इतकी वर केलेली होती की आतूंन घाणेरडे मोजे दिसंत होते.
मिखाइल अलेक्सांद्रोविच
तिथेंच थबकला, पण त्याने असा विचार करून स्वतःची
समजूत घातली, की फक्त एक विचित्र योगायोग आहे आणि
ह्याबद्दल विचार करणं मूर्खपणा आहे.
“चक्रद्वार शोधतांय कां
साहेब?” चिरक्या आवाजांत त्या लम्बूने
विचारलं, “इकडे या! सरळ,
आणि
वाटेल तिथे निघून जा. सांगण्यासाठी तुमच्याकडून पाव लिटर साठी...हिशेब
बरोब्बर...भूतपूर्व कॉयर मास्टरसाठी!” शरीराला वाकवंत ह्या प्राण्यानी
अभिवादनाप्रीत्यर्थ आपली जॉकी-कैप काढून हातांत धरली.
बेर्लिओज़ कॉयर मास्टरची ही
ढोंगी याचना ऐकण्यासाठी नाही थांबला, तो
चक्रद्वाराकडे पळाला आणि हाताने त्याला धरलं. चक्रद्वार घुमवून तो रेल्वेचे रूळ
पार करणारंच होता, की त्याच्या चेह-यावर लाल आणि
पांढ-या रंगाचा प्रकाशझोत पडला: काचेच्या ट्रैफिक बोर्डवर लिहिलेले अक्षरं चमकूं
लागले, “सावधान, ट्राम
येत आहे!” आणि ही ट्राम त्याक्षणींच येऊन पोहोचली, एर्मलायेव
गल्लीपासून नवीन टाकलेल्या रुळांवरून वळून, ब्रोन्नाया
स्ट्रीटवर येतांच तिचा आंतील भाग प्रकाशाने भरून गेला, ब्रेकचा
चीत्कार करंत ती थांबली.
खरं तर बेर्लिओज़ सुरक्षित
जागेवरंच उभा होता, तरी पण सावध असावे,
म्हणून वळून मागे जायला लागला. त्याने आपला हात चक्री दरवाज्यावर ठेवला आणि एक पाय
मागे सरकवला. त्याच क्षणी त्याचा हात घसरला आणि सुटून गेला,
पाय
घसरला, जणु कडक बर्फावर घसरतोय. पाय
घसरून त्या छोट्याश्या दगडी रस्त्यावर
पडला जो रुळापर्यंत जात होता, दुसरा पाय
आपल्या जागेवरून फेकला गेला आणि बेर्लिओज़ रुळांवर पडला.
एखाद्या आधाराला पकडायच्या
प्रयत्नांत बेर्लिओज़ पाठीवर पडला. त्याचं डोकं हळूच दगडी रस्त्यावर आपटलं आणि
त्याची नजर आकाशाकडे गेली, पण उजवीकडे
की डावीकडे, त्याला कळलं नाहीं,
त्याला
सोनेरी चंद्र दिसला. तो पट्कन एका कुशीवर वळला, फट्कन
पायांना पोटाकडे घेतलं आणि वळतांक्षणीच स्वतःच्या अंगावर विलक्षण शक्तिने येत असलेला,
भीतिने
पांढरा फटक पडलेल्या एका महिलेचा चेहरा आणि तिची लाल टोपी त्याला दिसली. हा ट्राम
चालिकेचा चेहरा होता. बेर्लिओज़ ओरडू नाही शकला, पण
त्याच्या चारीकडे जमा झालेल्या महिलांच्या घाबरलेल्या किंचाळ्यांनी ती सम्पूर्ण
स्ट्रीट हादरली. ट्रामचालिकेने पट्कन विजेचा ब्रेक लावला, त्यामुळे
ट्राम गाडी जणु नाकावर जमीनीत घुसून गेली.
दुस-यांच क्षणी तिच्या खिडक्यांच्या
काचा खणखणंत बाहेर पडू लागल्या. बेर्लिओज़च्या डोक्यांत एक विकट विचार चमकला – ‘काय
खरंच?’ तुकड्यांमधे विभक्त झालेला चंद्र
आणखी एकदा, शेवटचांच झळकला आणि मग अंधार पसरला.
ट्रामगाडीने बेर्लिओज़ला
सम्पूर्णपणे झाकून घेतलं होतं. आणि पत्रियार्शीच्या आळीच्या जाळीखालून दगडी
रस्त्यावर एक गोल-गोल, काळीशी वस्तू गडगडंत गेली,
ती
ब्रोन्नाया स्ट्रीटच्या फुटपाथवर उड्या मारंत गडगडू लागली.
हे बेर्लिओज़चं छाटलेलं डोकं
होतं.
*******
चार
पाठलाग
स्त्रियांच्या उन्मत्त
किंकाळ्या शांत झाल्या, कानांना
भेदत जाणा-या पोलिसच्या शिट्ट्या ऐकूं आल्या. दोन एम्बुलेन्स गाड्या घेऊन गेल्या :
एक शिरा-वेगळे धड आणि छाटलेलं डोकं शवागारांत; दुसरी
काचाच्या तुकड्यांने जखमी झालेल्या सुंदर ट्रामचालिकेला. पांढरे कपडेवाल्या
चौकीदारांनी विखुरलेले काचेचे तुकडे गोळा करून टाकले आणि रक्ताच्या डागांवर वाळू
टाकून दिली आणि इवान निकोलायेविच चक्र दरवाज्याकडे पळतां पळतां बेंच वर कोसळला आणि
तसांच पडून राहिला.
त्याने बरेंचदां उठण्याचा
प्रयत्न केला, पण पाय काही ऐकायलांच तयार नव्हते –
बिज़्दोम्नीला पक्षाघातासारखं काहीतरी झालं होतं.
पहिलीच कर्णकटु किंचाळी ऐकून
तो चक्री दरवाज्याकडे धावला होता आणि त्याने डोक्याला रस्त्यावर गडगडताना बघितलं
होतं. हे बघून त्याला जणु वेडंच लागलं आणि तो बेंचवर कोसळला आणि आपल्याच हाताला
इतका कडकडून चावला, की रक्त निघूं लागलं. वेड्या जर्मन
बद्दल तो अगदी विसरून गेला होता. फक्त एकंच गोष्ट समजण्याचा प्रयत्न करंत होता की,
आत्ता
– इतक्यांत तो बेर्लिओज़शी बोलंत होता, आणि एका
मिनिटानंतर – डोकं...
उत्तेजित लोकं आश्चर्य प्रकट
करंत कवीच्या समोरून आळीत धावत होते, पण इवान
निकोलायेविच त्यांच्या शब्दांना ग्रहण करण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
अप्रत्याशितपणे त्याच्या
समोर दोन बायका एकमेकींवर आदळल्या आणि त्यांच्यातली एक, सरळ
केस आणि तीक्ष्ण नाक असलेली, कवीच्या
बिल्कुल कानांत दुसरीवर ओरडली, “अन्नूश्का,
आपली
अन्नूश्का! सादोवाया स्ट्रीटची! हे तिचंच काम आहे! तिने किराण्याच्या दुकानांतून
सनफ्लॉवर ऑइल विकंत घेतलं, एक लिटर,
पण
बाटली चक्र दरवाज्याला आदळून फुटली, सगळा
स्कर्ट तेलांत भिजला...ओफ, कित्ती
ओरडंत होती, ओरडंत होती. आणि तो बिचारा गरीब,
कदाचित
त्या तेलावरून घसरला आणि रुळांवर जाऊन पडला...”त्या बाईच्या ह्या उन्मत्त
आरडा-ओरडीतून इवान निकोलायेविचच्या अस्त-व्यस्त डोक्यांत फक्त एक शब्द घुसला : “ अन्नूश्का...”
“अन्नूश्का...अन्नूश्का?”
तो
स्वतःशीच पुटपुटला, आणि उत्तेजनेने इकडे-तिकडे बघूं
लागला, काही तरी आठवतंय,
काय?
काय
आहे?”
‘अन्नूश्का’
शब्दाला
‘सनफ्लॉवर ऑइल’ हा
शब्द जोडला गेला, आणि मग न जाणे कां पोंती पिलात.
पिलातला त्याने डोक्यांतून काढून टाकलं आणि ‘अन्नूश्का’पासून
सुरूं झालेली साखळी पुढे वाढवायचा प्रयत्न करूं लागला. ही साखळी लवकरंच पूर्ण झाली
आणि तिचं दुसरं टोक वेड्या प्रोफेसरपर्यंत पोहोचलं.
ओह, चूक
झाली! त्याने बरोबरंच सांगितलं होतं की मीटिंग होणारंच नाही,
कारण
की अन्नूश्काने तेल सांडलंय. आणि बघा, आता मीटिंग
होऊंच शकंत नाही! हे तर काहीच नाही : त्याने
चक्क सांगितलं होतं, की एक महिला बेर्लिओज़चं डोकं कापेल!
हो, हो! महिलांच तर ट्राम चालवंत होती! हे सगळं काय
आहे? आँ?
ह्यांत काही शंकांच नाही
उरली, की त्या रहस्यमय कन्सल्टेन्टला
बेर्लिओज़च्या दुर्दैवी मृत्युचं सम्पूर्ण विवरण चांगलंच माहीत होतं. कविच्या
डोक्यांत दोन विचार चमकून गेले. पहिला : तो वेडातर अजिबातंच नाहीये! हा फक्त
मूर्खपणा आहे!” आणि दुसरा : “हे त्याचंच पूर्वनियोजित षडयंत्र तर नव्हतं!”
पण विचारायची परवानगी द्या,
की
कसं?!
हरकंत नाही! आम्हीं शोधून
काढूं!”
महत्प्रयासाने इवान
निकोलायेविच बेंचवरून उठला आणि परंत वृक्षांच्या आळीकडे जाऊं लागला,
जिथे
थोड्या वेळा पूर्वी तो प्रोफेसरशी बोलंत होता. बघितलं, की
तो तिथून हललेला नाहीये.
ब्रोन्नाया स्ट्रीटवर लाइट्स
लागले होते, पत्रियार्शीच्या पाण्यांत सोनेरी
चंद्र चमकंत होता आणि चंद्राच्या भ्रामक प्रकाशांत इवान निकोलायेविचने बघितलं की
तो उभा आहे आणि आता त्याच्या बगलेत छडी नसून तलवार होती.
कॉयर मास्टर,
चौकटीवाला-लम्बू
प्रोफेसरच्या शेजारी त्या जागेवर बसला होता, जेथे
काही वेळापूर्वी इवान निकोलायेविच बसला होता. आता त्याच्या नाकावर एक अनावश्यक
चश्मा होता ज्यांत एक काच बिल्कुलंच नव्हता आणि दुसरा तडकलेला होता. ह्या चष्म्या
मुळे चौकटीवाले महाशय आतां आणखीनंच किळसवाणे वाटंत होते. त्याहूनही जास्त,
जेव्हां
त्यांनी बेर्लिओज़ला ट्रामचा रस्ता दाखवला होता.
थंडगार होतं चालल्या हृदयानी
इवान प्रोफेसरजवळ पोहोचला आणि त्याच्या चेह-याकडे लक्ष देऊन बघितल्यावर ह्या
निष्कर्षावर पोहोचला की ह्या चेह-यावर वेडेपणाचं कोणचंही लक्षण आधीसुद्धां नव्हतं
आणि आतासुद्धां नाहीये.
“खरं-खरं सांगा,
तुम्हीं
कोण आहांत?” इवानने पडेल आवाजांत विचारलं.
परदेशी वळला आणि त्याने
इवानवर अशी नजर टाकली, जणु त्याला पहिल्यांदाच बघतोय. मग
तोंड वेडावून म्हणाला, “समजलं नाई...रशियन बोलणं...”
“ह्यांना समजंत नाहीये.”
त्याच्या जवळंच बसलेला कॉयर मास्टर मधेंच टपकला, खरं
तर त्याला कुणीही प्रोफेसरच्या शब्दांना समजावून सांगण्याची विनंती केलेली नव्हती.
“नाटक नका करूं!” इवान गरजला
आणि त्याला आपल्या टाळूंत गारवा जाणवूं लागला, “आत्तां
तर तुम्हीं इतकी चांगली रशियन बोलत होतां. तुम्हीं जर्मन ही नाहीये,
आणि
प्रोफेसरसुद्धां नाहीये! तुम्हीं हत्यारे आणि गुप्तचर आहांत.
डॉक्यूमेन्ट्स!”
रागांत येऊन इवान ओरडला.
रहस्यमय प्रोफेसरने आपल्या
वाकड्या तोंडाला आणखीनंच वाकडं करंत खांदे उचकावले.
“महाशय!” घाणेरडा लम्बू
पुन्हां मधेच टपकला, “तुम्हीं पर्यटकाला कशाला त्रास
देताय? ह्याच्यासाठी तुम्हांला कठोर शासन
होईल!” आणि त्या संदेहास्पद प्रोफेसरने भोळा चेहरा केला आणि वळून इवानपासून दूर
जाऊ लागला.
इवानला वाटलं की त्याचा धीर
सुटंत चाललाय, दीर्घ श्वास घेऊन तो लम्बूला
म्हणाला, “ऐ महाशय, ह्या
गुन्हेगाराला पकडायला माझी मदत करा! तुम्हांला हे केलंच पाहिजे.”
लम्बू पटकन् उठला आणि
उडीमारून गरजला, “कोण गुन्हेगार?
कुठेय?
परदेशी
गुन्हेगार?” लम्बूचे डोळे आनंदाने मटकू लागले,
“हा? जर हा गुन्हेगार आहे,
तर
सगळ्यांत आधी आपल्याला ज़ो-याने ओरडले पाहिजे : ‘चौकीदार!
नाहीतर तो पळून जाईल. चला, बरोबर
ओरडूं, एकदम!” आणि लम्बूने आपला जबडा
उघडला.
गोंधळलेल्या इवानने त्या
मसक-या लम्बूचं म्हणणं ऐकून ज़ोराने आवाज लावला ‘चौकीदार!’
पण
लम्बूचं फक्त तोंडच उघडं होतं, त्यातूंन
आवाजंच नाही निघाला.
इवानच्या एकट्या,
कर्कश
किंकाळीचा काही विशेष परिणाम नाही झाला. दोन सुंदरश्या मुलींचे लक्ष त्याने अवश्य
वेधून घेतले, आणि इवानने त्यांच्या तोंडून ऐकलं,
“दारुड्या!”
“म्हणजे,
तू
त्याच्या बरोबर आहेस?” इवान उत्तेजनेने ओरडला,
“तुम्हीं काय माझी चेष्टा करतांहात? सोडा
मला!”
इवान उजवीकडे वाकला आणि
लम्बूपण उजवीच कडे वाकला, इवान
डावीकडे तर त्या दुष्टानेपण तसंच केलं.
“तू मुद्दाम माझ्या पायांमधे
कां अडमडतोयंस?” जनावरासारखा ओरडला इवान,
“थांब, मी तुलांच पोलिसकडे देतो.”
इवानने त्या दुरात्म्याला
कॉलरने पकडायचा प्रयत्न केला पण त्याचा झोकंच गेला. त्याच्या हातांत काहीच आलं
नाही. लम्बू जणु पृथ्वींत गडप झाला होता.
इवान धापा टाकूं लागला,
त्याने
इकडे तिकडे बघितलं आणि थोड्यांच अंतरावर त्याला परदेशी दिसला.
तो
पत्रियार्शीच्या कोप-याकडे असलेल्या गेटजवळ पोहोचला होता. तो एकटा नव्हता,
रहस्यमय
आणि खतरनाक लम्बूपण त्याच्याजवळ पोहोचला होता. येवढंच पुरे नव्हतं : ह्या मंडळींत
एक तिसरापण होता – माहीत नाही कुठून टपकलेला एक बोका, डुक्करासारखा
विशाल, कावळ्या किंवा काजळासारखा काळा,
अति
साहसी अश्वारोह्याच्या मिशांसारख्या मिशा असलेला. हे तिघे कुटिल पत्रियार्शीच्या
दिशेने जात होते. बोका आपल्या मागच्या पायांवर चालंत होता.
इवान ह्या पाप्यांच्या मागे
धावला, पण त्याला कळून चुकलं की त्यांना
पकडणं अशक्य आहे. तिघे कुटिल एका निमिषांत कोप-यावर पोहोचून दुस-यांच क्षणी
स्पिरिदोनव्कावर आढळले. इवानने आपला वेग कितीही वाढवला, तरी
त्यांच्यामधलं अंतर कमी नव्हतं होत. कवीला कळलंच नाही, की
तो केव्हां स्पिरिदोनव्का स्ट्रीट पासून निकीत्स्की गेटपर्यंत पोहोचला. इथे
आल्यावर परिस्थिति आणखीनंच विकट झाली. इथे खूब गर्दी होती. त्यांच्या नादांत इवान
कोण्या दुस-याच नागरिकावर आदळला, ज्याच्यामुळे
त्याला खूप बोलणी खावी लागली. आतां दुष्टांनी दरोडेखोरांसारखी चलाखी केली – ते
इकडे-तिकडे विखुरले.
लम्बू चपळतेने चालंत अर्बात
चौकाकडे जाणा-या बसमधे चढून गेला. अश्याप्रकारे तो तिथून निसटला. त्यांच्यापैकी एक
हातांतून निघाल्यावर इवानने बोक्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. तो विचित्र बोका ‘ए’
ट्रामगाडीच्या
फुटबोर्डवर चढून गेला आणि निर्लज्जासारखा धक्का मारून एका ओरडणा-या महिलेला आपल्या
जागेवरून ढकलून त्याने दण्डा पकडला, आणि महिला
कण्डक्टरला दमटपणामुळे उघडलेल्या खिडकींतून दहा कोपेकचं नाणं देऊं लागला. बोक्याचं
असं वर्तन पाहून इवान इतका चकित झाला, की
जवळच्यांच किराणा दुकानाला जणुं चिटकूनंच गेला आणि महिला कण्डक्टरचं वर्तन पाहून
तर त्याची परिस्थिति आणखीनंच शोचनीय झाली.
तिने ट्राममधे घुसंत येणा-या
बोक्याकडे फक्त बघितलं आणि रागाने थरथरंत म्हणाली, “मांजरी
नाही! मांजरीबरोबर नाही! खाली उतर, नाहीतर
पोलिसाला बोलवीन!”
आश्चर्याची गोष्ट ही होती की
वास्तविकतेची जाणीव ना तर महिला कंडक्टरला होती, ना
ही प्रवाश्यांना : बोका ट्रामगाडींत घुसला होता ही तर अर्धीच काळजीची गोष्ट होती,
विचित्र
गोष्ट तर ही होती, की हा बोका तिकिटाचे पैसे देत होता!
हा बोका न केवळ पैसेवाला होता, पण
अनुशासनप्रियसुद्धां होता. महिला कण्डक्टरची पहिलींच आरोळी ऐकून त्याने पुढे जाणं
थांबवलं आणि फुटबोर्डवरून उतरून ट्रामच्या थांब्यावर बसून गेला. तो आपल्या मिशा
ह्या दहा कोपेकच्या नाण्यानी स्वच्छ करंत होता, पण
कण्डक्टरने घंटी वाजवल्यानंतर जशीच ट्राम चालू लागली, बोक्याने
पण तेंच केलं, जे ट्राममधून खाली उतरवलेला माणूस
करतो, ज्याला त्यांच ट्रामने जाणं अति
आवश्यक असतं. बोक्याने ट्रामच्या तिन्हीं डब्यांना जाऊं दिलं. मग शेवटच्या
डब्याच्या मागच्या कमानीवर उडीमारून आपल्या पंज्यांनी बाहेर निघालेली एक नळी धरून
घेतली आणि निघाला ट्राम बरोबर, अशा प्रकारे
त्याने पैसे देखील वाचवले.
ह्या घाणेरड्या बोक्याच्या
मागे लागून इवानने त्या तिघांमधल्या मुख्य – प्रोफेसरला जवळ जवळ गमावलंच होतं. पण,
सौभाग्याने,
तो
कुठेच सटकला नव्हता. इवानने त्याच्या राखाडी टोपीला बल्शाया निकीत्स्काया,
किंवा
गेर्त्सेन स्ट्रीटच्या सुरुवातीला बघितलं. निमिषमात्रांत इवानही तेथेंच होता. पण
सफलता नाहींच मिळाली. कवीने आपला वेग वाढवला. मग तो येणा-या जाणा-यांना धक्के
मारंत धावूं सुद्धां लागला पण एक सेंटीमीटर सुद्धां प्रोफेसरच्या जवळ पोहोचूं नाही
शकला.
इवान कितीही वैतागलेला असला
तरी तो ज्या अलौकिक वेगाने प्रोफेसरचा पाठलाग करंत होता, त्याने
स्वतःच चकित होता. वीस सेकंद सुद्धां झाले नसतील की इवान निकोलायेविच निकीत्स्की
गेटमधून विजेच्या प्रकाशांत जगमगणा-या अर्बात चौकांत पोहोचला होता. काही क्षणांत वाकड्या
तिकड्या फुटपाथांची एक अंधारी गल्ली आली, जिथे इवान
निकोलायेविचने अडखळून आपल्या गुडघ्याला इजा करून घेतली. मग – एक जगमगणारा भव्य
रस्ता, क्रोपोत्किना स्ट्रीट,
मग
पुन्हां गल्ली, नंतर अस्ताझेन्का स्ट्रीट,
पुन्हां
एक गल्ली, आळसावलेली, घाणेरडी
आणि मंद प्रकाश असलेली, इथे
आल्यावर इवान निकोलायेविचच्या दृष्टीतूंन शेवटी तो निसटलांच,
ज्याची
त्याला इतकी गरज होती, प्रोफेसर हरवला.
इवान निकोलायेविच घाबरला,
पण
फक्त थोडाच वेळ, कारण की त्याला एकदम आभास झाला की
प्रोफेसर 13नम्बरच्या बिल्डिंगच्या 47 नंबरच्या फ्लैटमधेच आहे.
प्रवेशद्वारांतून वेगाने आत
जाऊन इवान निकोलायेविच दुस-या मजल्यावर चढला. त्याने पटकन तो फ्लैट शोधून लगेच
घण्टी वाजवली. काही वेळाने एका पाच वर्षाच्या मुलीने दार उघडलं आणि काहीही न विचारता
कुठेतरी चालली गेली.
रिकाम्या-रिकाम्या प्रवेश
कक्षांत एक खूपंच कमी प्रकाशाचा छोटा सा बल्ब घाणीमुळे काळ्या झालेल्या छताला
लटकंत होता, भिंतीवर टायर्स नसलेली एक सायकल
टांगलेली होती, एक खूप मोठी पेटी होती,
ज्यावर
लोखण्डाच्या पट्ट्या ठोकल्या होता. एका शेल्फ मधे हैंगरवर हिवाळ्यांत घालायची लांब
कानांची टोपी होती, जिचे लांब-लांब कान खाली लटकंत
होते. एका दाराच्या मागून एका माणसाचा मोट्ठा आवाज ऐकू येत होता,
बहुधा
तो रागाने काव्यात्मक भाषेत किंचाळत असावा.
ह्या अनोळखी वातावरणांत इवान
निकोलायेविच जरासुद्धां घाबरला नाही. तो सरंळ कॉरीडोरकडे धावला,
असा
विचार करून की तो नक्कीच बाथरूममधे लपला आहे. कॉरीडोरमधे अंधार होता. भिंतीवर
धडकंत-धडकंत इवानला एका दाराच्या खालून येणारी प्रकाशाची क्षीण किरण दिसली,
त्याने
चाचपडंत दाराचं हैण्डल शोधलं आणि सम्पूर्ण शक्तिनिशी त्याला घुमवलं. दार फट्कन
उघडलं. इवान बाथरूम मधेच घुसला होता. त्याला वाटलं की आता भाग्य त्याचा साथ देत
आहे.
पण भाग्यांने तेवढा साथ नाही
दिला, जेवढा द्यायला पाहिजे होता.
इवानच्या अंगावर ओलं गरंम वारं आलं आणि बॉयलरमधे पेटलेल्या कोळशाच्या प्रकाशांत
त्याने भिंतीवर टांगलेले मोठाले तसराळे बघितले. बाथटबपण दिसला,
ज्यांत
मीनाकारी तुटल्याने जिथे तिथे भयंकर काळे डाग दिसंत होते. ह्या टबमधे साबणाच्या
फेसाने सम्पूर्णपणे झाकलेली एक नग्न स्त्री हातांत स्क्रबर घेऊन उभी होती.
तिने आपल्या साबण लागलेल्या
डोळ्यांना किंचित किलकिलं करून, हातांनी
चाचपडंत आत घुसलेल्या इवानला पाहिलं आणि त्या सैतानी प्रकाशांत तिने इवानला ओळखलं
नाही. तिने हळूंच, पण आनंदाने म्हटलं,
“किर्यूश्का! वेडेपणा बंद कर! वेड लागलंय का?...फ्योदोर
इवानिच इतक्यांत येतीलंच. पट्कन इथून निघून जा!” आणि तिने हातांतला स्क्रबर इवानवर
भिरकावला.
स्पष्ट होतं की चूक झाली
होती, आणि सगळा दोष निश्चितंच इवान
निकोलायेविचचांच होता. तरीही तो हे स्वीकार करायला तयार नव्हता. भर्त्सनेच्या
स्वरांत तो ओरडला, “आह, दुराचारिणी!...”
आणि मग माहीत नाही कां, तो किचनमधे
पोहोचला. तिथे कोणीच नव्हतं. शेगड्या ठेवायच्या स्लैबवर मंद प्रकाशांत जवळ जवळ दहा
प्राइमस स्टोव चुपचाप उभे होते1 . चंद्राची एक किरण धुळीने माखलेल्या,
कित्येक
वर्षांत न धुतलेल्या खिडकीतूंन कशीतरी आत येऊन त्या कोप-याला प्रकाशित करंत होती,
जिथे
धूळ आणि जाळ्यांनी माखलेली येशूची सुळावर टांगलेली प्रतिमा लटकंत होती,
प्रतिमेच्या
बॉक्सच्या मागून दोन मेणबत्यांचे2 टोक दिसंत होते. मोठ्या प्रतिमेच्या
खाली एक छोटी, कागदाची प्रतिमा होती.
कोणालांच कळलं नाही,
की
इवान कोणच्या विचाराने पछाडला गेला, पण मागच्या
चोर दरवाज्याकडे पळायच्या आधी त्याने ह्या मेणबत्त्यांपैकी एक उचलून घेतली.
कागदाच्या येशूच्या प्रतिमेलासुद्धां आपल्या जवळ ठेवलं. ह्या वस्तू घेऊन काहीतरी
पुटपुटंत त्याने त्या अनोळखी क्वार्टरमधून पलायन केलं, बाथरूममधे
त्याने जे काही पाहिलं होतं, त्याने
उद्विग्न होऊन इवान अंदाज लावायचा प्रयत्न करंत होता की हा निर्ल्लज्ज किर्यूश्का
कोण बरं असेल आणि ती लांब कानांची घाणेरडी टोपी कुठे त्याचीच तर नव्हती.
निर्मनुष्य,
उदास
गल्लींत येऊन कवीने पळपुट्याला शोधण्यासाठी चारीकडे बघितलं,
पण
त्याचा कुठे पत्तांच नव्हता. तेव्हां इवानने दृढतेने स्वतःशीच म्हटलं:
“तो
नक्कीच मॉस्को नदीवर आहे! मार्च!”
इवान निकोलायेविचला
विचारायला पाहिजे होतं की कोणच्या कारणामुळे तो असा विचार करंत होता,
की प्रोफेसर मॉस्को नदीवरंच असला पाहिजे, दुसरीकडे
कुट्ठेच नाहीं. पण दुःखाची गोष्ट ही आहे, की असं
विचारणारं कुणीच नव्हतं, ती घाणेरडी
गल्ली अगदी निर्मनुष्य होती.
अत्यंत कमी वेळांत इवान
निकोलायेविच मॉस्को नदीच्या एम्फिथियेटरच्या3 पाय-यांजवळ दिसंत होता.
इवान निकोलायेविचने आपले कपडे काढले आणि एका सहृदय दाढीवाल्याकडे ठेवले. पांढरा
ढीला-ढाला शर्ट घातलेला तो म्हातारा आपल्या चुरगळलेल्या बुटांजवळ बसून स्वतःच
वळलेली सिगरेट पीत होता. हातांना हालवंत, ज्याने
थोडं गार वाटावं, इवानने एका पक्ष्यासारखा पाण्यांत
सूर मारला. पाणी इतकं गार होतं, की त्याचा
श्वास गुदमरायला लागला. त्याच्या डोक्यांत विचार आला की तो कदाचित पाण्याच्या वर कधीच
परतणार नाही. पण तो उसळून वर आला, त्याचे
डोळे भीतिने गोल झाले होते, आणि धापा
टाकंत इवान निकोलायेविचने नदीच्या काठावर लागलेल्या फानूसांच्या तिरक्या,
तुटक्या-फुटक्या
प्रकाशांत, पेट्रोलचा वास येत असलेल्या
पाण्यांत पोहणं सुरूं केलं.
जेव्हां ओल्या अंगाने पाय-या
चढून त्या ठिकाणी पोहोंचला, जिथे
त्याने दाढीवाल्याजवंळ आपले कपडे ठेवले होते, तेव्हां
त्याने बघितलं की त्याच्या कपड्यांबरोबरंच दाढीवालासुद्धां गायब झालांय. अगदी
त्याच जागेवर, जिथे त्याचे कपडे ठेवले होते,
फक्त
पट्ट्यापट्ट्यांची लांब चड्डी, फाटलेला
शर्ट, मेणबती, येशूची
प्रतिमा आणि काड्यापेटी पडली आहे. किंचित रागाने, दूर
कोणालातरी मुक्के दाखवंत इवानने ते सगळं उचलून घेतलं.
आतां दोन प्रकारचे विचार
त्याला वैताग आणंत होते : पहिला हा की त्याचं ‘मॉसोलित’चं
परिचय-पत्र, जे तो नेहमी स्वतःजवळ बाळगांयचा,
गायब
झालं होत; दुसरा विचार हा,
की
ह्या अवस्थेत तो मॉस्कोच्या रस्त्यांवर कसा बिनधास्त हिण्डू शकंत होता?
चला,
कमींत
कमी चड्डी तरी आहे...कोणाला ह्याने काय फरक पडणारेय, पण
कुठे भानगड व्हायला नको.
त्याने गुडघ्यांपर्यंत येत
असणा-या लांब चड्डीच्या खालच्या गुंड्या तोडल्या, असा
विचार केला, की अशाने चड्डी उन्हांळ्यांत
घालायच्या पैंट सारखी दिसूं लागेल, मग त्याने
येशूची प्रतिमा, मेणबत्ती आणि काड्यापेटी उचलली आणि
स्वतःला बजावलं की, ‘ग्रिबोयेदोवला जाऊं या! तो खात्रीने
तेथेंच असला पाहिजे.’
शहरावर संध्याकाळची मस्ती
पसरली होती. धूळ उडवंत, साखळ्यांची
खडखड करंत, एकामागून एक ट्रक्स जात होते,
मागच्या
भागांत हात पाय पसरून, पोत्यांवर काही लोक पाठीवर लोळले
होते. सगळ्या खिडक्या उघड्या होत्या. प्रत्येका खिडकींत नारंगी रंगाच्या शेडखाली
लैम्प्स जळंत होते. सगळ्या खिडक्यांतून, सगळ्या
दारांमधून, सगळ्या कोप-यांवरून,
सगळ्या
गोदामांतून, भूमिगत रस्त्यांवरून आणि अंगणांतून ‘येव्गेनी
अनेगिन’4चं एक गाणं ऐकूं येत होतं.
इवान निकोलायेविचची भीति
खरीच ठरली : येणारे जाणारे लोक लक्ष देऊन त्याच्याकडे बघायचे आणि तोंड फिरवून
घ्यायचे. म्हणून त्याने मुख्य रस्ता सोडून गल्या-बोळांमधून जाण्याचं ठरवलं. तिथे
ह्या गोष्टीची संभावना कमी होती, की लोक बिन
बुटांच्या आणि उन्हाळ्यांत घालायच्या चड्डीतल्या माणसाला पाहून बोलून-बोलून
टोचतील.
इवानने तसंच केलं. तो
अर्बातच्या रहस्यमय गल्ल्यांच्या जाळ्यांत घुसला. तो भिंतींना लागून लागून चालंत
होता. भीतीने इकडे-तिकडे बघायचा, प्रवेश
द्वारांत लपायचा, ट्रैफिक लाइट पासून दूर आणि राजनयिकांच्या
भव्य घरांपासून स्वतःला वाचवंत चालला होता.
ह्या सगळ्या कष्टप्रद
यात्रेंत, माहीत नाही कां,
सगळीकडे
ऐकू येणारा ऑर्केस्ट्राचा आवाज त्याचा पिच्छांच सोडंत नव्हता,
ज्यांत
एक जाडा आवाज तात्यानाबद्दल आपलं प्रेम प्रकट करंत गात होता.
**********
पाच
भानगड ग्रिबायेदवमधेच
होती
दुतर्फा झाडे असलेल्या रिंगरोडवर
एका खुरट्या बागेच्या आंत फिक्क्या पिवळ्या रंगाचं एक प्राचीन दोनमजली घर होतं,
ज्याला
लोखंडाची एक सुरेख जाळी रिंगरोडच्या फुटपाथापासून विभक्त करंत होती. घराच्या समोर
सिमेन्टचा एक चौक होता. हिवाळ्यांत ह्या चौकावर बर्फाचा ढेर लागायचा,
ज्यावर
एक फावडा दिसायचा आणि उन्हाळ्यांत हाच चौक कैनवासच्या तम्बूखाली एका शानदार
रेस्टॉरेन्टमधे परिवर्तित व्हायचा.
घराच नाव होतं ‘ग्रिबायेदव
भवन’. असं म्हणतांत की कधी काळी हे घर अलेक्सांद्र
ग्रिबायेदवच्या1 आत्याचं होतं. पण ते खरोखरंच तिचं होतं कां – आम्हांला
नक्की माहीत नाहीं. मल असंपण आठवतंय की कदाचित ग्रिबायेदवची अशी कोणतीच आत्या
नव्हती, जिच्या मालकीचं एखाद घर असावं...पण
घर ह्यांच नावाने ओळखलं जायचं. मॉस्कोच्या एका शेखीखोराने तर हे पण सांगितलं होतं
की दुस-या मजल्यावर असलेल्या स्तंभांच्या गोल हॉल मधे प्रख्यात लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध
‘बुद्धिमुळे दुर्भाग्य’ ह्या
रचनेचे काही अंश ह्याच आत्याला वाचून दाखवले होते. ती सोफ़्यावर लोळून ऐकायची.
वाचले असतील, नसतील, आम्हांला
काय! मह्त्वाची गोष्ट ही नाहीये.
महत्वाची गोष्ट ही आहे,
की
आजकाल ह्या भवनावर त्यांच ‘मॉसोलित’चा
अधिकार आहे, जिचा अध्यक्ष पत्रियार्शी तलावावर
येईपर्यंत, दुर्दैवी मिखाइल अलेक्सान्द्रोविच
होता.
साधारणपणे मॉसोलितच्या
सदस्यांपैकी कुणीच ह्याला ‘ग्रिबायेदव
भवन’ म्हणंत नव्हतं. ते सगळे फक्त म्हणायचे – ‘ग्रिबायेदव’ :
“मी काल दोन तास ग्रिबायेदवच्या जवळ घुटमळंत होतो”, “मग
काय झालं?” “एका महिन्यासाठी याल्टाची ट्रिप पटकांवलीय”,
“शाबाश!” किंवा “बेर्लिओज़कडे जा, आज
चार ते पाच पर्यंत तो ग्रिबायेदवमधे लोकांना भेटतोय...” आणि असंच बरंचस.
मॉसोलित ग्रिबायेदवमधे अश्या
प्रकारे स्थित होतं की त्याच्यापेक्षां चांगला आणी आरामशीर विकल्प दुसरा असूंच
शकंत नव्हता. ग्रिबायेदवमधे येणा-या प्रत्येक व्यक्तीला, इच्छा
नसतांनासुद्धां, विभिन्न स्पोर्ट्स ग्रुप्सचे
विज्ञापनं आणि मॉसोलितच्या सदस्यांचे सामूहिक आणि व्यक्तिगत फोटोग्राफ़्स बघावेंच
लागायचे, ज्यांनी ह्या भवनाच्या दुस-या
मजल्यावंर जाणा-या जिन्याच्या भिंती सुसज्जित होत्या.
दुस-या मजल्याच्या पहिल्याचं
खोलीचा दारावर लिहिलं होतं. ’फिशिंग
एण्ड हॉलिडे सेक्शन’, आणि तेथेंच गळाला लागलेल्या
मोट्ठ्या लाल पंखांच्या मास्याचं चित्र लावलं होतं.
दुस-या नंबरच्या खोलीवर
काही-काही न समजणारा मजकूर होता : एक दिवसीय सृजनात्मक यात्रेचा पास. एम. वी.
पद्लोझ्नायाला भेटा’.
पुढच्या दारावर एक छोटंस,
पण
बिल्कुलंच न समजणारं वाक्य लिहिलेलं होतं : ‘पेरेलीगिनो.’2
मग आगंतुकाची
नजर आत्याबाईंच्या घराच्या अखरोटच्या मजबूत दारांवर लटकलेल्या पट्ट्यांवर फिरायची
: ‘पक्लेव्किनाला भेटण्यासाठी इथे नाव नोंदावे’,
‘कैशियर’, ‘चित्रकारांचे
व्यक्तिगत हिशेब’...
खालच्या मजल्यावर एका
मोट्ठ्या रांगेच्या वरून, ज्यांत
प्रत्येक मिनिटाला लोकांची संख्या वाढंत होती, ती
पट्टी दिसंत होती, जिच्यावर लिहिलेलं होतं : ‘क्वार्टर-सम्बंधी
प्रश्न’.
‘क्वार्टर-सम्बंधी
प्रश्ना’च्या मागे एक शानदार पोस्टर दिसंत
होतं. त्यांत एक भला मोट्ठा खडक दाखवण्यांत आला होता. खडकाच्या काठाने फेल्टचा
डगला घालून आणि खांद्यावर राइफल घेऊन एक अश्वारोही जात होता. खाली लिण्डनचे वृक्ष
आणि एक बाल्कनी. बाल्कनीत एक तरूण पंखांचा टोप घातलेला, आपली
धाडसी नजर वर कुठेतरी लावून, हातांत पेन
धरून बसलेला. ह्या पोस्टर खाली लिहिलं होतं : ‘सृजनात्मक
कार्यासाठी सर्व सुविधांसह सुट्ट्या – दोन आठवडे ( कथा- दीर्घकथा),
ते एक वर्ष (कादम्बरी- तीन खण्डाची कादम्बरी), याल्टा,
सूकसू,
बोरावोये,
त्सिखिजिरी
महिंजौरी, लेनिनग्राद (शीत-महल3).
ह्या दारासमोर सुद्धां लाइन होती, पण फार
मोठी नव्हती, जवळ-जवळ दीडशे माणसं असतील.
पुढे,
ग्रिबायेदव-भवनाच्या
प्रत्येक वळणांवर, जिन्यावर, कोप-यांत
कोणची न कोणची पट्टी दिसयचीच:
मॉसोलित एक्ज़ेक्यूटीव बोर्ड, काउन्टर नं, 2,3,4,5; सम्पादक
मण्डळ, मॉसोलित अध्यक्ष,
बिलियर्ड
रूम, विभिन्न प्रकारचे प्रशासनिक कार्यालय. आणि शेवटी
तोच स्तंभ असलेला हॉल जेथे आत्याबाई आपल्या बुद्धिमान भाच्याच्या हास्यपूर्ण
रचनेचा आस्वाद घ्यायच्या.
ग्रिबायेदवमधे येणारा
प्रत्येक व्यक्ति, जर तो अगदीच मूर्ख नसेल,
तर
सहज समजू शकंत होता की मॉसोलितचे भाग्यशाली सदस्य किती मस्त जीवन जगंत होते,
आणि
लगेच मत्सराची काळी सावली त्याच्या मानगुटीवर बसायची. तो लगेच आकाशाकडे दुःखाने बघंत,
त्या
परमपिता परमात्म्याला दोष द्यायचा की त्याने ह्या पामराला एकही साहित्यिक योग्यता
कां नाही दिली, जिच्याशिवाय मॉसोलितचं तपकिरी, महागड्या चामड्यांत
फ्रेम केलेलं, सोनेरी किनारीचं ओळख पत्र
बाळगण्याची कल्पनांच करता येत नव्हती, ज्याच्याशी
मॉस्कोचे जवळ-जवळ सगळेच लोक परिचित होते.
आतां मत्सराबद्दल कुणी काय
सांगू शकतं? हा एक वाईट गुण आहे,
तरी
पण अतिथिच्या दृष्टीने बघायला हवं. जे काहीं त्याने वरच्या मजल्यावर पाहिलंय,
ते
आणि फक्त तेच सर्व काही नव्हतं. आत्याबाईंच्या घराचा सम्पूर्ण खालचा मजला एका
रेस्टॉरेन्टकडे होता, आणि ते पण कसं रेस्टॉरेन्ट! खरं
म्हणजे हे मॉस्कोचं सर्वोत्तम रेस्टॉरेन्ट होतं. फक्त ह्यासाठींच नाही,
की
ते जांभळ्या, असीरियन-आयाळ असलेल्या घोड्यांच्या
चित्रांनी सुसज्जित कमानीदार छप्पर असलेल्या दोन हॉल्समधे होतं,
फक्त
ह्याचसाठी नाही की त्याच्या प्रत्येक टेबलावर सुंदर शॉलने झाकलेला लैम्प होता,
फक्त
ह्याचसाठी नाही की रस्यावरून जाणा-या कोणच्याही माणसाला तिथे प्रवेश नव्हता,
पण
ह्यासाठी कि त्यांत मिळणा-या पदार्थांमुळे ग्रिबायेदव मॉस्कोच्या कोणत्याही
रेस्टॉरेन्टला मागे टाकायचा, प्रत्येक
पदार्थ अत्युत्तम प्रतिचा असायचा, आणि अगदीच
माफ़क दरांत मिळायचा.
म्हणून त्या वार्तालापांत
आश्चर्य करण्यासारखं काहींच नव्हतं, जो ह्या
सत्य ओळींच्या लेखकाने एकदा ग्रिबायेदवचा बाहेर,
जाळीच्या जवळ ऐकला होता :
“अम्रोसी,
तू
आज रात्री कुठे जेवणार आहेस?”
“ही पण काय विचारायची गोष्ट
आहे, फोका! इथेच! अर्चिबाल्द अर्चिबाल्दोविचने माझ्या
कानांत सांगितलंय की आज जेवणांत एक खास प्रकारचा मासा आहे, एक
सर्वोत्तम पदार्थ.”
“तुला जगण्यांची कला
माहितीये, अम्रोसी!” दीर्घ श्वास भरून हडक्या,
पस्त
फोकाने, ज्याच्या मानेवर एक गळू होता,
गुलाबी
ओठांच्या, महाकाय, सोनेरी
केस, गोबरे गाल असलेल्या कवी अम्रोसीला म्हटलं.
“माझ्यांत अशी कोणची विशेष योग्यता
नाहीये,” अम्रोसीने त्याचा विरोध करंत म्हटलं,
“फक्त माणसां सारखं जगण्याची साधारणशी इच्छा आहे. फोका,
तुला
हेच म्हणायचं आहे न, की हा विशिष्ठ प्रकाराचा मासा ‘कलीजे’
रेस्टॉरेन्टमधे
सुद्धां मिळतो. पण ‘कलीजे’मधे
त्याची किंमत आहे तेरा रूबल्स आणि पंधरा कोपेक्स, आणि
आमच्याकडे पाच पन्नास. शिवाय, ‘कलीजे’तील
मासा तीन दिवस शिळा असतो; आणि ह्या
गोष्टीची पण ग्यारंटी नाहीये की ‘कलीजे’
मधे
थियेटरच्या जवळच्या रस्त्यावरून घुसून आलेला पहिलांच तरुण हातांतले द्राक्षाचे
गुच्छे तुमच्या थोबाड्यावर मारणार नाही. नाही, मी
‘कलीजे’च्या अगदीच
विरोधांत आहे.” गस्त्रोनोमच्या सम्पूर्ण गल्लीत अम्रोसीचा जोरदार आवाज घुमला,
“फोका, तू मला पटवण्याचा प्रयत्न नको
करू!”
“मी तुला पटवण्याचा प्रयत्न
बिल्कुल करंत नाहीये,” फोका बडबडला,
“घरी सुद्धां तर जेवूं शकतो.”
“मी तुमचा आज्ञाकारी सेवक
आहे,” अम्रोसी आपलंच तुणतुणं वाजवंत होता,
“ मी कल्पना करूं शकतो, की तुझी
बायको कशी आपल्या बिल्डिंगच्या कॉमन-किचन मधे विशेष मास्याचे कटलेट्स करंत असेल.
ही...ही...ही! गुडबाय, फोका! आणि गुणगुणंत ओसरीवर
ताणलेल्या तंबूकडे निघाला.
एह-हे-हे...हो,
बस
झालं, गप बसा! मॉस्कोच्या जुन्या
नागरिकांच्या मनांत प्रख्यांत ग्रिबायेदवच्या आठवणी अजून शिल्लक आहेत! तुम्हीं
कोणत्या फालतू मास्याबद्दल बोलतांय! हा तर अगदीच बेकार पदार्थ आहे,
प्रिय
अम्रोसी! भरपूर मांस असलेला, उच्च कोटीचा
स्टर्जन, चांदीच्या प्लेटमधे त्याचे स्लाइसेस,
ज्यांना
क्रे फिशच्या शेपट्यांनी आणि ताज्या कैविअर ने सजवलेलं असायचं?
आणि
छोट्या छोट्या प्लेट्समधे पांढरे मश्रूम्स कोकिळेच्या अंड्याबरोबर?
आणि
चिमण्यांचं नरम-नरम मांस तुम्हांला आवडलं नाही कां? आळंब्यांबरोबर?
आणि
लावा पक्षी? साडे दहा रूबल्सचा?
आणि
संगीतमय वातावरण? आणि अत्युत्तम,
विनयपूर्ण
सेवा! आणि जुलै महिन्यांत, जेव्हां
सम्पूर्ण परिवार गावांतल्या समर कॉटेजमधे असतो आणि तुम्हांला अत्यावश्यक साहित्यिक
कार्यकलापामुळे शहरांतंच थांबावं लागतंय – तेव्हां ओसरीत द्राक्षाच्या वेली खाली,
सोनेरी
डिजाइनच्या प्लेटमधे, चकचक करणा-या टेबलक्लॉथवर प्रेतानेर
सूप! आठवतंय, अम्रोसी? ह्यांत
विचारायची काय गोष्ट आहे? तुमच्या
ओठांकडे बघूनंच कळतंय की तुम्हांला ते सगळं आठवतंय. तुमच्या ह्या साधारण मास्याची
त्या सगळ्याशी तुलनांच नाही! आणि मोट्ठा पाणलावा पक्षी, सारस,
बगळे,
ऋतु
प्रमाणे जंगली पक्षी, घशांत शिट्टी वाजवणारी दारू?
बस
झालंय, वाचकहो, तुम्हीं
हरवून जाल! माझ्या बरोबर या!...
जेव्हां बेर्लिओज़
पत्रियार्शीवर मेला, त्या रात्री साडे अकरा वाजतां
ग्रिबायेदवच्या वरच्या मजल्यावर फक्त एकांच खोलीत उजेड होता,
तिथे
सुमारे बारा साहित्यकार मीटिंगसाठी दाटीने बसलेले होते आणि मिखाइल
अलेक्सान्द्रोविचची वाट बघंत होते.
टेबलांवर,
खुर्च्यांवर
आणि दोन्हीं खिडक्यांच्या कट्ट्यांवर बसलेल्या ह्या लोकांचा मॉसोलितच्या
प्रबंधकाच्या खोलीत दमटपणा आणि उष्णतेमुळे दम घुटंत होता. उघड्या खिडक्यांमधून
ताज्या वा-याची छोटीशी झुळूकसुद्धां येत नव्हती. मॉस्को दिवसभरांत सिमेन्टच्या
रस्त्यांवर गोळा झालेली उष्णता बाहेर फेकत होता आणि हे स्पष्टंच होतं,
की
ह्या उष्णतेपासून रात्रीपण आराम मिळणार नव्हता. आत्याबाईंच्या घराच्या तळघरांत
असलेल्या रेस्टॉरेन्टच्या किचनमधून कांद्याचा वास येत होता. सगळेच तहानेले,
घाबरलेले
आणि रागावलेले होते.
शांत स्वभावाच्या कथाकार
बेस्कुद्निकोवने व्यवस्थितपणे कपडे घातले होते. त्याचे
डोळे प्रत्येक वस्तूकडे लक्ष देऊन बघायचे, पण
त्यांचा भाव कुणावरंच प्रकट नाही व्हायचा. त्याने घड्याळ काढली. सुई अकराच्या
अंकावर पोहोचण्यांतच होती. बेस्कुद्निकोवने घडाळ्याच्या डायलवर बोटाने ठक-ठक केलं
आणि तिला जवळंच टेबलावर बसलेल्या कवि दुब्रात्स्कीला दाखवलं. तो व्याकुळतेने आपला
पाय हलवंत होता. त्याने पिवळे रबराचे बूट घातले होते.
“खरंच,”
दुब्रात्स्की
बडबडला.
“पट्ठा कदाचित क्ल्याज़्मांत
अडकलांय,” जाड आवाजांत नस्तास्या कुकिनीश्ना
नेप्रेमेनोवाने म्हटलं. नस्तास्या मॉस्कोच्या व्यापारी वर्गातील एक अनाथ मुलगी
होती, जी लेखिका झाली होती आणि ‘नौचालक
जॉर्ज’ ह्या टोपण नावाने समुद्री बटालियन
संबंधी गोष्टी लिहायची.
“माफ़ करा!” लोकप्रिय स्केच
लेखक जाग्रिगोवने बेधडक म्हटलं, “मला तर इथे
उकळंत बसण्यापेक्षां बाल्कनींत चहा प्यायला आवडलं असतं. सभा तर दहा वाजता होणार
होती नं?”
“आजकाल क्ल्याज़्मांत खूप
चांगलं हवामान आहे...” नौचालक जॉर्जने सर्व उपस्थितांना उचकावंत म्हटलं. तिला
माहीत होतं की क्ल्याज़्मावर असलेली साहित्यकारांची ग्राम्य-कॉलनी पेरेलीगिनो सगळ्यांचीच
दुखती रग आहे. “कदाचित, आतां
कोकिळेने पण गाणं सुरूं केलं असेल. मला तर,
नेहमी शहरापासून दूरंच काम करायला आवडतं, विशेष करून
वसंत ऋतूंत.”
“तीन
वर्षापासून पैसे भरतोय, की
गलगंडाने त्रस्त बायकोला ह्या स्वर्गांत नेता येईल, पण
सध्यां तरी दूर-दूर पर्यंत आशेचा किरण दिसंत नाहीये,” विखारी
आणि दुःखी आवाजांत कादम्बरीकार येरोनिक पप्रीखिनने म्हटलं.
“हे तर ज्याचं त्याचं नशीब
आहे,” आलोचक अबाब्कोव खिडकीच्या कट्ट्यावरून भुणभुणला.
‘नौचालक
जॉर्ज’च्या डोळ्यांत आनंद तरळला. ती
आपल्या जाड्या आवाजाला किंचित मऊ करंत म्हणाली, “मित्रांनो...आपलाल्या
मत्सर नको करायला. गावांतल्या त्या कॉलनींत आहेत फक्त बावीस दाचाज़4 आणि
फक्त सातंच नवीन दाच्यांचा निर्माण करण्यांत येणारेय, आणि
आपण मॉसोलितचे सदस्य आहोंत – तीन हजार.”
“तीन हजार एकशे अकरा,”
कोप-यांतून
कुणीतरी दुरुस्ती केली.
“हूँ,
बघा,”
‘नौचालक जॉर्जने आपलं घोडं पुढे दामटलं, “करणार
काय? स्पष्टंच आहे की गावातील दाचे आपल्यापैकी
सर्वांत योग्य व्यक्तींनाच मिळाले आहेत...”
“जनरल्स!” सरंळ-सरंळ
भांडणांत पडंत स्क्रीनप्ले लेखक ग्लुखारेव म्हणाला.
बेस्कुद्निकोव कृत्रिम जांभई
देत खोलीतून बाहेर निघून गेला.
“पेरेलीगिनोच्या पाच
खोल्यांत फक्त एकटा!” तो गेल्याबरोबर ग्लुखारेव म्हणाला.
“लाव्रोविच तर सहा
खोल्यांमधे एकटा राहतोय,” देनिस्किन ओरडला,
“आणि डाइनिंग रूम मधे पूर्ण ओकचं फर्नीचर आहे!”
“ऐ, सध्यां
मुद्दा हा नाहीये,” अबाब्कोव भुणभुणला,
“मुद्दा हा आहे, की साडे
अकरा वाजलेत.”
इतक्यांत हल्ला ऐकूं आला,
कदाचित
काही माणसं भांडंत होती. लोकं घृणित पेरेलीगिनोत फोन करूं लागले,
फोनची
घण्टी दुस-यांच घरांत वाजली, जिथे
लाव्रोविच रहायचां; असं सांगण्यांत आलं की लाव्रोविच
गेलाय, आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना खूप राग
आला. मग, असंच, ललित
कला संघांत एक्स्टेन्शन नं. 930वर फोन करण्यांत आला, पण,
स्पष्टंच
आहे, तेथून कुणीच उत्तर नाही दिलं.
”तो कमींत कमी फोन तर करूंच
शकंत होता,” देनिस्किन, ग्लुखारेव
आणि क्वांत ओरडले.
ओह, ते
सगळे उगीचंच ओरडंत होते : आतां मिखाइल अलेक्सान्द्रोविच कुठेंच फोन करूं शकंत
नव्हता. ग्रिबायेदवहून दूर, खूप दूर,
एका
मोट्ठ्या हॉलमधे, हज्जारों लैम्प्सच्या प्रकाशांत,
जस्त्याच्या
तीन टेबलांवर तो पडला होता, जो काही
वेळापूर्वी मिखाइल अलेक्सान्द्रोविच होता. पहिल्या टेबलवर – निर्वस्त्र,
कोरड्या
रक्ताने माखलेला, तुटलेला हात आणि आंत घुसलेल्या
छातीचे धड, दुस-यावर तुटलेले दात आणि निस्तेज
डोळे असलेलं डोकं, ह्या डोळ्यांना आतां तीक्ष्ण भेदक
प्रकाशाचीसुद्धां भीति वाटंत नव्हती. आणि तिस-या टेबलवर पडला होता – कडक झालेल्या
चिंध्यांचा ढेर.
बिना डोक्याच्या मृत
शरीराजवळ उभे होते : फोरेन्सिक मेडिसिनचा प्रोफेसर, पैथोलॉजिस्ट
आणि शल्य क्रिया विशेषज्ञ, अन्वेषण
दलाचे प्रतिनिधि आणि मिखाइल अलेक्सान्द्रोविचच्या आजारी बायकोने फोन करून पाठवलेला
मॉसोलितचा उप-प्रबन्धक – साहित्यकार झेल्दीबिन.
झेल्दीबिनला आणण्यासाठी कार
पाठवण्यांत आली होती. सगळ्यांत आधी त्याला अन्वेषण दलाबरोबर मृतकाच्या फ्लैटमधे
नेण्यांत आलं (तेव्हां मध्य रात्र उलटून गेली होती), तेथे
त्याचे कागदपत्र सीलबंद करण्यांत आले. त्यानंतर ते सगळे शवागारांत पोहोचले.
मृतकाच्या अवशेषांच्या समोर
उभे राहून ते विचार विनिमय करंत होते, की काय
करणं जास्त चांगलंय : छाटलेलं डोकं धडाला शिवून टाकावं किंवा मृत शरीराला
ग्रिबायेदव हॉल मधे असंच ठेवण्यांत यावं आणि त्याला हनुवटीपर्यंत काळ्या कापडाने
झाकावं?
हो, मिखाइल
अलेक्सान्द्रोविच आतां कुठेच फोन करूं शकणार नव्हता. देनिस्किन,
ग्लुखारेव,
क्वान्त
आणि बेस्कुद्निकोव उगीचंच वैतागले होते आणि ओरडंत होते. बरोब्बर बारा वाजता ते
बाराही साहित्यकार वरच्या मजल्यावरून उतरून रेस्टॉरेन्ट कडे आले. तेथेपण त्यांने
मिखाइल अलेक्सान्द्रोविचला मनांतल्या मनांत खूप शिव्या दिल्या : दालनांतले सगळे
टेबल्स, स्पष्टंच आहे,
आधीच
भरले होते आणि त्यांना डिनर ह्यांच सुंदर, पण
दमट हॉल्समधे करावं लागलं.
ठीक अर्धरात्रीला
त्यांच्यापैकी पहिल्या हॉल मधे आधी काहीतरी पडलं, खणखणलं,
सांडलं
आणि उसळलं आणि तेव्हांच बारीक पुरुषी आवाज जणु गातां-गातां ओरडला “अल्लीलुइया!!”
ग्रिबायेदवचा प्रख्यात जॉज़ सुरू झाला होता. मग घामाने थबथबलेले चेहरे लखकन् चमकले,
असं
वाटलं की छतावर चित्रित घोडे जणु सजीव झालेयंत. लैम्प्सचा प्रकाश द्विगुणीत झाला,
अचानक,
जणु
कारागृहाच्या साखळ्या तोडून दोन्हीं हॉल्स नाचूं लागले आणि त्यांच्या बरोबर
दालनसुद्धां नाचूं लागलं.
ग्लुखारेव कवियत्री तमारा
पलुमेस्यात्सबरोबर नाचंत होता; क्वान्त
नाचंत होता; कादम्बरीकार झकोपोव नाचंत होता,
पिवळा
फ्रॉक घातलेल्या अभिनेत्रीबरोबर; आणि
त्याचबरोबर नाचंत होते : द्रागून्स्की, चेर्दाक्ची,
छोटा
सा देनिस्किन विशालकाय ‘नौचालक
जॉर्ज’ बरोबर; सुंदर
आर्किटेक्ट सिमेयकिना गॉल पांढरी विजार घातलेल्या अनोळखी माणसाबरोबर नाचंत होती,
ज्याने
तिला घट्ट पकडलं होतं. सगळेच नाचंत होते : आपले
आणि आमंत्रित केलेले , मॉस्कोचे आणि बाहेरहून आलेले,
क्रोन्श्दातहून
आलेला लेखक जोहान, रस्तोवचा कुणी वीत्या कूफ्तिक,
जो
कदाचित निर्देशक होता आणी ज्याच्या सम्पूर्ण गालावर एक जांभळा डाग पसरला होता;
मॉसोलितच्या
काव्य-विभागाचे प्रख्यात प्रतिनिधि नाचंत होते, जसे
की पविआनोव, बोगाखुल्स्की,
स्लाद्की,
श्पीच्किन
आणि अदेल्फिना बुज़्द्याक; काही असे
लोकंही नाचंत होते, ज्यांचा व्यवसाय माहीत नव्हता,
बॉक्सर्स
सारखे केस असलेले तरूण नाचंत होते; पैड
लावलेले खांदे असलेला कोणी दाढीवाला म्हातारा नाचंत होता, ज्याच्या
दाढींत हिरव्या कांद्याची पात अटकली होती, त्याच्या
बरोबर मोठ्या वयाची, एनिमिक मुलगी,
नारंगी
रंगाचा सिल्कचा चुरगळलेला फ्रॉक घालून नाचंत होती.
घाम निथळंत असलेले वेटर्स
नाचणा-यांच्या डोक्यांवरून बियरचे फेसाळ ग्लास नेत होते. ते भसाड्या आणि
कटुतापूर्ण आवाजांत ओरडंत होते, “क्षमा करा,
नागरिक!”
मागे कुठे माइक्रोफोनवर कोणीतरी हुकूम सोडंत होतं, “कार्स्की
एक! ज़ुब्रोव्स्का दोन!” होम स्टाइल ट्राइप!” बारीक आवाज़ आता गात नव्हता,
फक्त
“अल्लीलुइय्या!” ओरडंत होता. जॉज़च्या सोनेरी प्लेट्सचा खणखणाट कधी कधी जेवणाच्या
प्लेट्सच्या खडखडीला दाबंत होता, ज्यांना
प्लेट धुणारे धुवून–धुवून खाली किचनपर्यंत जाणा-या घसरत्या फळीवर सरकवंत होते.
थोडक्यांत म्हणजे, अगदी नरक!
आणि ह्या नरकांत
अर्धरात्रीला एक भूत अवतरलं. काळे केस आणि डैगर-टाइप दाढी असलेला एक तरूण दालनांत
आला. त्याने फ्रॉक-कोट घातला होता. दालनांत येऊन त्याने शाही थाटांत आपल्या ह्या
संपदेकडे बघितलं. रहस्यवादी म्हणतांत की एके काळी हा तरूण फ्रॉक कोट घालंत नव्हतां,
उलंट
त्याच्या कंबरेवर चामड्याचा चौडा पट्टा कसलेला असायचा, ज्यातूंन
पिस्तूलांची मूठ दिसायची. कावळ्याच्या पंखांसारखे त्याचे केस लाल रेशमी रुमालाने
बांधलेले असायचे आणि त्याच्या हुकुमाने कराईब्स्की सागरांत समुद्री दरोडेखोराची एक
ब्रिगेड जायची, जिच्या काळ्या झेण्ड्यावर एक कवटी आणि
दोन हाडांच चित्र असायचं.
पण नाही,
नाही!
हे रहस्यवाद अगदी बकवास करतांत, खोटं
बोलतांत, जगांत कुठेही कराईब्स्की नावांचा
समुद्रंच नाहीये, आणि त्यावर दरोडेखोरांची जहाजं
देखील नाही जायची, त्यांच्या पाठलाग शस्त्रांनी सज्ज
जहाजं नाही करायची, आणि तोपेचा धूरसुद्धां पाण्यावर
नाही तरंगायचा. नाही, असं काहींच नव्हतं,
अगदीच
नव्हतं. बस, फक्त हेच, रोगंट
लीपा वृक्ष आहे. त्याच्या मागे लोखंडाची जाळी आणि जाळीच्या मागे दुतर्फा झाडं
असलेला रस्ता...आणि फ्लॉवरपॉटमधे तरंगणारा बर्फ, आणि
बाजूच्या टेबलवर दारूमुळे लाल बुंद झालेले जनावरांसारखे डोळे दिसतायंत,
आणि
सगळं कसं भीतिदायक, प्रचण्ड भीतिदायक आहे...अरे
देवा...माझ्या देवा, ह्याच्यापेक्षां बरं विषंच असेल,
मला
तेंच द्या!...
आणि अचानक एका टेबलाच्या
मागून ‘बेर्लिओज़’ शब्द
उसळला. जॉज़ एकदम विस्कटला आणि थांबला, जणुं
त्याला कोणी गुद्दा मारला असावा. “काय, काय,
काय,
काय!!”
“बेर्लिओज़!!!” आणि सगळे आपापल्या जागेवरून उड्या मारून उठले आणि ओरडूं लागले.
हो, मिखाइल
अलेक्सांद्रोविचबद्दल ही भयानक बातमी ऐकून दुःखाची एक लाट पसरली. कोणी काही कारण
नसतांना उगीचंच धावपळ करूं लागला, ओरडूं
लागला, की ह्या क्षणाला सगळ्यांत महत्वाची
गोष्ट ही आहे, की आपल्या जागेवरून न हलतां एका
सामूहिक टेलिग्रामचा मजकूर ठरवावा आणि टेलिग्राम पाठवून द्यावा.
पण आम्हीं विचारतोय,
की
कसला टेलिग्राम आणि कुठे पाठवायचां? आणि कां?
मुख्य
प्रश्न आहे, कुठे? आणि
त्याला कोणत्याही प्रकारच्या टेलिग्रामची आतां काय गरंज आहे,
ज्याचं
ठेचलेलं डोकं आता शल्य क्रिया विशेषज्ञाच्या रबरी हातमोजे घातलेल्या हातांत होतं,
ज्याच्या
मानेवर आतां प्रोफेसर तीक्ष्ण सुईने भोक करणार होते? तो
मेलाय आणि त्याला आतां कोणत्याही टेलिग्रामची काहींच गरंज नाहीये. सगळं संपलंय.
आता टेलिग्राफ ऑफ़िसवर आणखी ओझं कशाला...
हो, मेलांय,
मेलांय...पण
आम्हीं तर जिवंत आहे!
हो, तर
दुःखाची लाट पसरली, पण तशीच थांबली. थांबून गेली आणि
हळू-हळू कमी होऊं लागली. कोणी-कोणी तर आपल्या टेबलवर परतला आणि आधी लपून-छपून आणि
मग खुल्लम खुल्ला वोद्काचा एक पैग पिऊन सोबत ठेवलेले पदार्थ खाऊं लागला. खरंय,
चिकन-कटलेट्सला
कशाला फेकायचं? आम्हीं मिखाइल अलेक्सांद्रोविचची
मदत कशी काय करूं शकतो? काय उपाशी
राहून? पण आम्हीं तर जिवंत आहोत!
स्वाभाविकपणे,
पियानोला
कुलूप लागलं, जॉज विखुरला;
काही
संवाददाता मृत व्यक्तिबद्दल मृत्युलेख लिहायला आपल्या ऑफिसला निघून गेले. हे कळलं
की शवागारातून झेल्दीबिन परंत आलांय. तो मृतकाच्या वरच्या मजल्यावरच्या खोलींत
बसून गेला. तेव्हांच हे पण कळलं की तोच बेर्लिओज़च्या जागेवर,
म्हणजेच प्रमुखाच्या पदावर राहील. झेल्दीबिनने कार्यकारिणीच्या बारा सदस्यांना रेस्टॉरेन्टमधून
बोलावलं. बेर्लिओज़च्या खोलीत झालेल्या आपात-बैठकीत अश्या काही प्रश्नांवर विचार
होऊं लागला, ज्यांना स्थगित करणे शक्य नव्हते.
हे प्रश्न होते : स्तंभांचा हॉल स्वच्छ करून, त्यांत
शवागाराहून आणून मृतदेह ठेवावा, तेथे
जाण्यासाठी रस्ता मोकळा करावा आणि इतरही काही, ह्या
शोकपूर्ण घटनेशी संबंधित गोष्टी.
आणि रेस्टॉरेन्ट पुन्हां
आपलं रात्रीचं जीवन जगूं लागला आणि बंद होई पर्यंत, म्हणजेच
सकाळी चार पर्यंत जगला असतां, जर एखादी
अप्रत्याशित घटना नसती घडली, ज्यामुळे रेस्टॉरेन्टच्या
पाहुण्यांना धक्कांच बसला, बेर्लिओज़च्या
मृत्युच्या बातमीपेक्षां सुद्धां जास्त.
आधी ते कोचवान5 थक्क
झाले, जे ग्रिबायेदव भवनच्या गेटवर असायचे.
सगळ्या उपस्थितांनी त्यांच्यापैकी एकाला बॉक्सवर चढून ओरडताना ऐकलं : “छिः! जरा
बघा तर!” मग जिकडे पहाल तिकडे, लोखण्डाच्या
जाळी जवळ एक उजेड दिसूं लागला, जो हळू हळू
दालनाकडे येऊं लागला. टेबलांच्या मागे बसलेले लोक आपल्या जागेवरून उठून-उठून बघूं
लागले, बघतांत काय, की
ह्या उजेडाबरोबर रेस्टॉरेन्टच्या दिशेने एक पांढरं भूत येतंय. जेव्हां ते जाळीच्या
वळणावर पोहोचलं, तेव्हां सगळेच आपापल्या टेबलाच्यामागे
फोर्कने मासा उचललेल्या अवस्थेत, डोळे
विस्फारंत जणु जमून गेले. दरबानने, जो
इतक्यातंच रेस्टॉरेन्टच्या क्लोकरूम मधून सिगरेट प्यायला बाहेर निघाला होता,
आपली
सिगरेट विझंवली आणि भुताला रेस्टॉरेन्टमधे येऊं न देण्यासाठी त्याच्याकडे जाऊं
लागला, पण माहीत नाही कां,
त्याने
असं नाही केलं आणि मूर्खासारखा गालांत हसू लागला.
आणि भूत,
जाळीचं
वळणं पार करून, बेधडक दालनांत घुसलं. आता सगळ्यांनी
बघितलं की ते काही भूत-बीत नाहीये, परंतु इवान
निकोलायेविच बिज़्दोम्नी – प्रख्यांत कवि आहे.
तो अनवाणी,
फाटक्या
पांढ-या शर्टांत होता, ज्याच्यावर समोर सेफ्टीपिनने कागदाचं
एका अज्ञात संताचं चित्र लावलं होतं, त्याने
पट्त्या पट्ट्यांची पांढरी लांब पायाची चड्डी घातली होती. इवान निकोलायेविचने
हातांत एक जळती मेणबत्ती पकडली होती. इवान निकोलायेविचच्या उजव्या गालावर
खरचटल्याची ताजी खूण होती. दालनांत सगळे चिडीचूप झाले, शांततेच्या
गहनतेचा अंदाज़ करणं कठीण होतं. एका वेटरच्या हातांतल्या प्याल्यातूंन फेसाळ बियर
फरशीवर सांडत होती.
कवीने मेणबत्ती डोक्यावर उंच
केली आणि जो-याने म्हणाला, “कसे आहांत,
मित्रांनो?”
मग
जवळच्या टेबलवर नजर टाकून विषादपूर्ण स्वरांत म्हणाला, “नाही,
तो
इथे नाहीये!”
दोन आवाज ऐकूं आले,
एक
जाडा आवाज निष्ठुरतेने म्हणाला, “काम तमाम! वात-भ्रम!”
आणि दुसरा,
घाबरलेला,
एका
स्त्रीचा आवाज म्हणाला, “पोलिसवाल्यांनी
ह्याला ह्या अवस्थेत रस्त्यावर कसं जाऊं दिलं?”
इवान निकोलायेविचने हे ऐकलं
आणि ह्याचं उत्तरपण दिलं, “दोनदा
पकडण्याचा प्रयत्न केला, स्कातेर्त्नीमधे
आणि इथेंच ब्रोन्नायावर, पण मी
जाळीवरून उडी मारून आंत आलोय, बघा गालावर
खरचटलंय!”
इवान निकोलायेविचने मेणबत्ती
वर केली आणि ओरडला, “साहित्यिक बंधूंनो!” (त्याचा जाडा
भरडा आवाज आणखीनंच जोरदार आणि उत्साही झाला), सगळेजणं,
प्लीज़,
माझं
बोलणं ऐका! तो प्रकट झालांय! लवकर त्याला पकडा, नाहीतर
तो वर्णनातीत संकटांना आमंत्रित करेल!”
“काय?
काय?
त्याने
काय म्हटलं? कोण प्रकट झालांय?”
चारीकडून
आवाज यायला लागले.
“कन्सल्टन्ट!” इवानने उत्तर
दिलं, “आणि ह्या कन्सल्टन्टने आत्तांच
पत्रियार्शीवर मीशा बेर्लिओज़ला मारून टाकलंय.”
हे ऐकतांच आतल्या हॉलमधून लोकं
दालनांत यायला लागले. इवानच्या मेणबत्तीच्या चारीकडे गर्दी जमा व्हायला लागली.
“माफ़ करा,
माफ़
करा, खरं खरं सांगा...” इवान निकोलायेविचच्या कानाजवळ
एक शांत आणि नम्र स्वर ऐकूं आला, “सांगा,
कसं
मारून टाकलं? कोणी मारून टाकलं?”
“परदेशी सलाहकार,
प्रोफेसर
आणि गुप्तचराने!” चारीकडे बघंत इवान उत्तरला.
“आणि त्याचं नाव काय आहे?”
हळूंच
पुन्हां कानाजवळ त्याच आवाजाने विचारलं.
“ओह, ओह,
नाव!”
हताश होऊन इवान ओरडला, “जर मला त्याचं नाव माहीत असतं! मी
त्याच्या विज़िटिंग कार्डवर लिहिलेलं नावंच तर नाही वाचलं...फक्त पहिलं अक्षर लक्षांत
आहे ‘व’…नाव
‘व’ अक्षराने
सुरू होतं! ‘व’ने
सुरूं होत असलेलं नाव काय होतं बरं?”
विचार करण्याच्या
आविर्भावांत कपाळाला हात लावंत इवानने स्वतःलांच विचारलं आणि मग एकदम बडबडला,
“वे,वे,वे!
वा...वो...वाग्नेर? वायनेर? वेग्नेर?
विन्तेर?”
उत्तेजनेमुळे
इवानच्या डोक्यावरचे केस उभे व्हायला लागले.
“वुल्फ?”
करुणा
भावाने एक महिला ओरडली. इवानला राग आला.
“मूर्ख!” ओरडणा-या महिलेला
नजरेने शोधंत इवान ओरडला, “इथे
वुल्फचं काय काम आहे? वुल्फचा काहीच दोष नाहीये!
वो...वो...नाही! नाही आठवणार! बरं, नागरिकहो,
लगेच
पोलिसांत फोन करा, की मोटर साइकलवर पाच बंदुकधा-यांना
पाठवावे, प्रोफेसरला पकडायला. हे सुद्धां
नक्की सांगा की त्याच्या बरोबर आणखी दोघं आहेत : एक लम्बू, चौकटवाला...चश्मा
तुटलेला...आणि एक काळा बोका, चमकदार;
तोपर्यंत
मी ग्रिबायेदवमधे त्याला शोधतो...मला वाटतंय की तो इथेंच आहे!”
इवान पुन्हां अस्वस्थ झाला,
आजूबाजूच्या
लोकांना धक्के मारंत, मेणबत्ती इकडे तिकडे फिरवूं लागला;
स्वतःवरंच
मेण सांडंत, टेबलांच्या खाली बघूं लागला.
तेवढ्यांत
एक शब्द ऐकूं आला : “डॉक्टरला बोलवा!” आणि इवानला कोणाचातरी भरलेला,
पुचकारंत
असलेला, चिकणा, चरबी
चढलेला, शिंगांच्या फ्रेमचा चष्मा लावलेला
चेहरा दिसला.
“कॉम्रेड बिज़्दोम्नी,”
तो
चेहरा थाटांत म्हणाला, “शांत व्हा! तुम्हीं आपल्या
सगळ्यांचे प्रिय मिखाइल अलेक्सांद्रोविचच्या, नाही
– फक्त मीशा बेर्लिओज़च्या मृत्युने खूप संतप्त झाले आहांत...आम्हाला हे चांगलंच
कळतंय. तुम्हांला विश्रांतीची गरज आहे. आता कॉम्रेड्स तुम्हांला नेऊन बिछान्यांत
झोपवतील आणि तुम्हीं सगळं विसरून जाल...”
“तू...” दात करकरंत इवान
मधेच म्हणाला, “तुला कळतंय का,
की
प्रोफेसरला पकडणं जरूरी आहे? आणि तू
आपल्या मूर्ख बडबडीने माझं डोकं चाटतोयस! मूर्ख!”
“कॉम्रेड बिज़्दोम्नी,
क्षमा
करा,” चेहरा लाल पडंत, मागे
होत म्हणाला, तो पस्तांवत होता की ह्या भानगडींत
कशाला पडला.
“नाही,
कुणा
दुस-याला करूं शकतो, पण तुला तर मी माफ नाही करणार!” शांत
तिरस्काराने इवान निकोलायेविच म्हणाला.
आवेगामुळे त्याचा चेहरा
विकृत झाला. त्याने पटकन मेणबत्ती उजव्या हातांतून डाव्या हातांत घेतली. झटक्याने
हात उचलला आणि ह्या सहानुभूति दाखवणा-या चेह-यावर जोराने लगावला.
तेवढ्यांत सगळ्यांनी इवानला
पकडायचं ठरवलं आणि त्याच्यावर झपटले. मेणबत्ती विझली, आणि
त्याच्या चेह-यावरून खाली घसरून पडलेला चष्मा पायांनी चिरडला गेला. इवानने भयंकर
डरकाळी फोडली, जी रस्त्यापर्यंत ऐकू गेली,
आणि
संरक्षणात्मक पवित्रा घेतला, टेबलांवरून
प्लेट्स झणझणंत खाली पडू लागल्या, बायका
ओरडूं लागल्या.
जोपर्यंत रेस्टॉरेन्टचे कर्मचारी
इवानला टॉवेल्सने बांधंत होते, खाली
क्लॉकरूमजवळ चौकीदार आणि कमाण्डरमधे असा वार्तालाप झाला:
“तू बघितलं होतं नं की तो
फक्त चड्डींत आहे?” थण्ड आवाजांत त्याने विचारलं.
“हो, आर्चिबाल्द
आर्चिबाल्दोविच!” संकोचाने दबकंत चौकीदार उत्तरला, “पण,
जर
ते मॉसोलितचे मेम्बर आहेत, तर मी
त्यांना आत जाण्यापासून कसा थांबवूं शकतो?”
“तू बघितलंस नं की तो चड्डीत
आहे?” कमाण्डरने पुन्हां विचारलं.
“क्षमा करा,
आर्चिबाल्द
आर्चिबाल्दोविच,” लाल चेह-याने चौकीदार उत्तरला,
“मी काय करूं शकंत होतो? मला पण
समजतंय की दालनांत बायका बसल्या आहेत...”
बायकांचं इथे काही काम
नाहीये, बायकांना ह्याने काही फरक पडत नाही,”
चौकीदाराला
डोळ्यांने भस्म करंत कमाण्डर म्हणाला, “पण पोलिसला
ह्याने फरक पडतो! चड्डी घातलेला माणूस मॉस्कोच्या रस्त्यांवर फक्त तेव्हांच फिरूं
शकतो, जेव्हां त्याला पोलिस पकडून नेताहेत,
आणि
ते पण, जेव्हां त्याला पोलिस स्टेशनवर नेत
असतांत! आणि तुला, जर चौकीदार आहेस,
तर
हे माहीत असायला पाहिजे, की अश्या
माणसाला बघतांच, क्षणाचाही विलम्ब न लावतां शिट्टी
फुंकणं सुरू केलं पाहिजे. तूं ऐकतोयस?”
अर्धवट पागल झालेल्या चौकीदाराने
आत, दालनांतून येत असलेले ऊई...ऊई...चे आवाज,
प्लेट्स
फेकण्याचे आवाज आणि बायकांच्या किंकाळ्या ऐकल्या.
“तर, ह्याच्यासाठी
तुझ्याशी कसं वर्तन करावं?” कमाण्डरने
विचारलं.
चौकीदारच्या चेह-याचा रंग
टाइफाइडच्या रोग्यासारखा झाला. डोळे मृतप्राय झाले. त्याला असा भास झाला की काळे,
व्यवस्थित
सावरलेले केस आगीच्या ज्वाळांनी वेढलेय. कोट गायब झाला. कमरेला बांधलेल्या बेल्ट
मधून पिस्तौलचे टोक दिसूं लागले. चौकीदाराला भास झाला की तो फासावर लटकलांय.
स्वतःच्या डोळ्यांनी त्याने आपली जीभ बाहेर निघालेली पाहिली. स्वतःचं निष्प्राण
डोकं खांद्यावर कललेलं बघितलं. त्याला लाटांचा आवाज़सुद्धां ऐकूं आला. चौकीदाराचे
गुडघे थरथरू लागले. पण तेवढ्यांत कमाण्डरने त्याच्यावर दया करंत आपली तीक्ष्ण नजर
विझवली.
“बघ, निकोलाय!
हे शेवटचं सांगतोय, आम्हांला तुझ्यासारख्या चौकीदारांची
बिल्कुल गरज नाहीये. तू चर्चचा चौकीदार हो!” येवढं सांगून कमाण्डरने शीघ्र,
स्पष्ट,
अचूक
आज्ञा दिली, “जलपान गृहातून पन्तेलेयला बोलाव.
पोलिस
रिपोर्ट. गाडी – पागलखान्यांत न्यावे,” आणि पुढे
म्हणाला, “शिट्टी वाजवं!”
जवळ-जवळ पंधरा मिनिटांनी अति
आश्चर्यचकित लोकांनी, फक्त रेस्टॉरेन्टमधूनंच नाही,
पण
रस्त्यावरून आणि रेस्टॉरेन्टच्या बगिच्यांत उघडंत असलेल्या खिडक्यांमधून पाहिलं की
कसे ग्रिबायेदवच्या गेटमधून पन्तेलेय, चौकीदार,
पोलिसवाले,
रेस्टॉरेन्टचा
वेटर आणि कवि –यूखिन बाहुलीसारख्या गुंडाळलेल्या एका तरुणाला बाहेर नेताहेत. तरूण
रडंत-रडंत ओरडत होता, र्यूखिन!वर हल्ला करायला तयार होता,
आणि
तो रडंत-रडंत ओरडला, “जंगली!”
बाहेर उभ्या असलेल्या ट्रक
ड्राइवरने चेह-यावर दुष्टपणाचे भाव आणंत इंजिन सुरू केलं, जवळंच
उभ्या असलेल्या निर्भीक गाडीवानाने आपल्या घोड्याला चाबुक मारंत म्हटलं,
“चला! मी पागलखान्यांत लोकांना घेऊन गेलेलो आहे!”
गर्दींत हल्ला होत होता.
ह्या अप्रत्याशित घटनेवर वाद विवाद होत होता. थोडक्यांत, खूपंच
ओंगळवाणं, नीच, कलंकित,
खिळवून
ठेवणारं दृश्य होतं, आणि हे तेव्हांच संपलं,
जेव्हां
तो ट्रक दुर्दैवी इवान निकोलायेविचला, पोलिसवाल्याला,
पन्तेलेयला
आणि –यूखिनला भरून ग्रिबायेदवच्या गेटच्या बाहेर घेऊन गेला.
*******
सहा
स्किज़ोफ्रेनिया, हेंच
सांगितलं
जेव्हां
मॉस्कोच्या बाहेर, नदीच्या किना-यावर स्थित, हल्लीच बनवलेल्या
प्रख्यांत मानसिक रुग्णालयाच्या अतिथि-कक्षांत पांढरा डगला घातलेला, टोकदार दाढीचा
एक माणूस आला, तेव्हां रात्रीचा दीड वाजला होता. तीन
स्वास्थ्य कर्मचारी सोफ्यावर बसलेल्या इवान निकोलायेविचवर नजर लावून होते. तिथेच
उद्विग्न कवि र्यूखिनसुद्धां होता. ज्या टॉवेल्सने इवान निकोलायेविचला बांधलं
होतं, त्यांचा ढेर आता त्याच सोफ्यावर
पडला होता. इवान निकोलायेविचचे हातपाय आता मोकळे होते.
आत येणा-या माणसाला बघतांच र्यूखिन!चा
चेहरा फिक्का पडला, तो किंचित खोकून म्हणाला,
“नमस्ते डॉक्टर!”
डॉक्टरने वाकून र्यूखिन!च्या
अभिवादनाचं उत्तर दिलं, पण
वाकतांना तो त्याच्याकडे न बघतां इवान निकोलायेविचकडे बघंत होता.
“डॉक्टर,
हा...माहित
नाही कशाला...” घाबरलेल्या दृष्टीने इवान निकोलायेविचकडे बघून र्यूखिन रहस्यमय
ढंगाने पुटपुटला, “प्रसिद्ध कवि बिज़्दोम्नी...तुम्हीं
बघतांय नं...आम्हांला शंका वाटतेय की कुठे वात-भ्रम तर नाही झाला!”
“काय ठासून प्यायलेत?”
डॉक्टरने
दात न हलवतां विचारलं.
“नाही,
प्यायलेत,
पण
येवढी नाही की एकदम...”
“झुरळं,
उंदीर,
शैतान,
आवारा
कुत्रे तर नव्हते पकडंत?”
“नाहीं,”
र्यूखिनने
घाबरंत उत्तर दिलं, “मी ह्यांना काल बघितलं होतं आणि आज
सकाळीपण. अगदी स्वस्थ्य होते...”
“मगर चड्डींत कां आहेत?
काय
सरंळ बिस्त-यातूंन उचलून आणलंय?”
“डॉक्टर,
ते
रेस्टॉरेन्टमधे ह्याच अवस्थेत आले होते.”
“आहा,
आहा!”
डॉक्टरांने संतुष्ट भावाने म्हटलं, “ही
खरचटल्याची खूण कां आहे? कुणाशी भांडले
होते कां?”
“जाळीवरून उडीमारून आत
येताना पडले होते. मग रेस्टॉरेन्टमधे एका माणसाला मारलंसुद्धां...आणि आणखीनही कुणाला...”
“बरं,
बरं,
बरं,”
डॉक्टरने
म्हटलं आणि इवानकडे वळून म्हणाला, “नमस्ते!”
”नमस्ते,
विध्वंसका!1
इवान रागाने ओरडला.
र्यूखिन घाबरला. नजर वर
करून सज्जन डॉक्टरकडे बघण्याची त्याची हिंमत नाही झाली. पण त्याने जरासुद्धां वाईट
वाटून घेतलं नाही, उलंट सवयीनुसार अगदी सहज चष्मा काढला,
आपल्या
डगल्याचं पुढचं टोक उचलून त्याला पैंटच्या मागच्या खिशांत खोवलं आणि मग इवानला
विचारलं, “तुमचं वय काय आहे?”
“तुम्हीं सगळे माझ्यापासून
दूर व्हा, नरकांत जा, खरंच
नरकांत जा!” इवान कोरडेपणाने ओरडला आणि त्याने तोंड फिरवलं.
“तुम्हीं रागावतांय कशाला?
मी
काही अप्रिय बोललो कां?”
“माझं वय तेवीस वर्ष आहे,”
उत्तेजित
होऊन इवान म्हणाला, “आणि मी तुम्हां सर्वांची कम्प्लेन्ट
करीन, आणि घाणेरड्या माणसां,
तुला
तर मी चांगलंच बघून घेईन!” त्याने –यूखिनला म्हटलं.
“तुम्हीं कशाबद्दल
कम्प्लेन्ट कराल?”
“हेंच,
की
तुम्हीं सगळे मला, एका स्वस्थ्य माणसाला बळजबरीने
पागलखान्यांत घेऊन आलांत!” इवानने रागाने म्हटलं.
आता –यूखिनने लक्ष देऊन
इवानकडे बघितलं. त्याचे हातपाय गार झाले : खरंच, त्याच्या
डोळ्यांत पागलपणाचं कोणतंच लक्षण नव्हतं. आतां ते ग्रिबायेदवमधे दिसंत होते,
तसे
निस्तेज नसून पूर्वीसारखेच स्पष्ट, पारदर्शी
दिसायला लागले होते.
‘बाप
रे!’ –यूखिन गार झाला, ‘हो,
हा
तर एकदम सामान्य आहे? ओह, काय
गडबड झाली! खरंच आम्ही ह्याला इथे कां खेचंत आणलंय? सामान्य
आहे, अगदी सामान्य, फक्त
थोडसं खरचटलंय...’
“तुम्हीं आत्तां... चकचकीत स्टूलवर
बसंत डॉक्टरने शांतिपूर्वक म्हटलं, “पागलखान्यांत
नसून दवाखान्यांत आहांत, जिथे गरज
नसल्यास कोणीही तुम्हांला बळजबरीने थांबवून ठेवूं शकंत नाही.”
इवान निकोलायेविचने
अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं, पण तरीही
तो बडबडतंच राहिला.
“देव त्यांचं भलं करो. मूर्खांच्या
गर्दीत एक तरी सामान्य माणूस निघाला, त्या
मूर्खांमधे पहिला आहे मूढ आणि प्रतिभाशून्य साश्का!”
“हा प्रतिभाशून्य साश्का कोण
आहे?” डॉक्टरने विचारलं.
“हाच र्यूखिन!” इवानने आपलं घाणेरडं बोट र्यूखिनकडे
दाखवंत म्हटलं.
तो अपमानाने तळमळला.
‘हे बक्षिस आहे माझं, धन्यवादाच्या ऐवजी!’ त्याने कटुतेने विचार केला, ‘कारण की मी ह्या सगळ्यांत गुंतलोय! ही खरोखरंच फारंच गुंतागुंतीची
परिस्थिति आहे!’
“ह्याची मानसिकता एकदम कुलाका2सारखी
आहे,” इवान निकोलायेविच पुढे
म्हणाला, त्याला र्यूखिनवर आरोप करण्याची लहर आली होती, “असा कुलाक, ज्याने सर्वहारा वर्गाचा बुरका पांघरलाय. ह्याच्या मरतुकड्या
शरीराकडे बघा आणि त्याची तुलना ह्याच्या खणखणींत कवितेशी करा, जी ह्याने एक मे3च्या निमित्ताने
लिहिली होती : हा...हा...हा... “उंच उठा!” आणि “ विखरून जा!”...आणि तुम्हीं ह्याच्या हृदयांत बघा, की तो कसला विचार करतोय...आणि तुम्हांला
आश्चर्याचा धक्काच बसेल!” इवान निकोलायेविच भयानकपणे हसला.
र्यूखिन दीर्घ श्वास घेत होता. त्याचा चेहरा लाल
झाला होता. तो फक्त एकांच गोष्टीचा विचार करंत होता की त्याने आपणहूनंच नागाला
छातीवर बोलावलंय, की तो अश्या माणसाच्या भानगडींत पडलांय, जो त्याचा कट्टर शत्रू निघालांय. रडणं तर अशासाठी होतं, की आता काही करतासुद्धां येत नव्हते : वेड्यावर
कोण रागावूं शकतो?
“फक्त तुम्हांलाच इथे, आमच्याकडे, कां आणलंय?” डॉक्टरने लक्ष देऊन बिज़्दोम्नीचे आरोप ऐकल्यावर विचारलं.
“मसणांत जावोत ते मूर्ख! मला धरून घेतलं, कोणच्यातरी चिंध्यांनी बांधून टाकलं आणि ट्रकमधे
फेकून दिलं!”
“कृपा करून हे सांगा, की तुम्हीं फक्त चड्डीतंच रेस्टॉरेन्टमधे कशाला गेले होते?”
“ह्यांत आश्चर्य करण्यासारखं काहीही नाहीये,” इवानने उत्तर दिलं, “मी मॉस्को नदींत पोहण्यासाठी उडी मारली, आणि कोणीतरी माझे कपडे चोरले, फक्त ही चड्डीच शिल्लक ठेवली. आता मी मॉस्कोत निर्वस्त्रावस्थेत कसा
फिरणार? जे होतं, तेच घातलं, कारण की मला ग्रिबायेदवच्या रेस्टॉरेन्टमधे पोहोचण्याची घाई होती.”
डॉक्टरने प्रश्नार्थक दृष्टीने र्यूखिनकडे
बघितलं. त्याने तोंड वेंगाडून उत्तर दिलं, “रेस्टॉरेन्टचं नाव हेंच आहे.”
“अहा,” डॉक्टर म्हणाला, “आणि तुम्हाला इतकी घाई कशाची होती? काही ज़रूरी मीटिंग होती?”
“मी त्या कन्सल्टन्टला पकडतोय,” इवान निकोलायेविचने उत्तर देऊन व्याकुळतेने
चारीकडे बघितलं.
“कोणच्या कन्सल्टन्टला?”
“तुम्हीं बेर्लिओज़ला ओळखतां?” इवानने अर्थपूर्ण दृष्टीने विचारलं.
“तो...संगीतकार?”
इवानला राग आला.
“कुठला संगीतकार? ओह, हो, हो, नाही. संगीतकार आणि मीशा बेर्लिओज़चं एकंच आडनाव आहे!”
र्यूखिनची काहीही बोलायची इच्छा नव्हती, पण त्याला डॉक्टरला समजवावंच लागलं.
“मॉसोलितच्या सेक्रेटरी बेर्लिओज़ला आज संध्याकाळी
ट्रामगाडीने चिरडलंय.”
“जर माहीत नाहीये, तर खोटं बोलूं नकोस,” इवान र्यूखिनवर गरजला, “तिथे तू नसून मी होतो. त्याने मुद्दाम ट्रामखाली त्याचा निकाल
लावला.”
“धक्का दिला?”
“कसला धक्का?” ह्या बिनबुडाच्या प्रश्नाने इवान पुन्हां क्रोधित झाला, “त्याच्या सारख्याला तर धक्का देण्याचीपण गरंज
नाहीये! तो असे-असे चमत्कार करूं शकतो, की बस बघतंच रहा! त्याला आधीच माहीत होतं, की बेर्लिओज़ ट्रामखाली येणारेय!”
“तुमच्या शिवाय ह्या कन्सल्टन्टला आणखी कोणी बघितलंय?”
“हीच तर मुश्किल आहे, फक्त मी आणि बेर्लिओज़नेंच त्याला बघितलं होतं.”
“बरं, त्या खुन्याला पकडण्यासाठी तुम्हीं कोणचे उपाय केलेत?” डॉक्टरने वळून पांढरं एप्रन घातलेल्या नर्सकडे
बघितलं, जी एका कोप-यांत टेबलाच्या मागे बसली होती. नर्सने फॉर्म काढला आणि
ती रिकाम्या जागा भरूं लागली.
“मी हे उपाय केलेंत : किचनमधून मेणबत्ती उचलली...”
“ही?” डॉक्टरने तुटलेल्या मेणबत्तीकडे बोट दाखवंत विचारलं, जी नर्सच्या समोर टेबलावर येशूच्या फोटोच्या जवंळ
पडली होती.
“हीच, आणि...”
“आणि हा फोटो कशासाठी?”
“अरे हो, येशूचा फोटो...” इवानचा चेहरा लाल झाला, “ह्या फोटोमुळेंच तर मी खूप घाबरलो,” त्याने पुन्हां र्यूखिनकडे बोट दाखवलं, “गोष्ट अशी आहे की तो, कन्सल्टन्ट, तो, मी स्पष्टंच सांगेन... त्याचा ताब्यांत काही दुष्ट शक्ती आहेत...आणि
त्याला पकडणंसुद्धां अशक्य आहे.”
स्वास्थ्य परिचारक माहीत नाही कां, हाथ लटकवंत उभे होते आणि एकटक इवानकडे बघंत होते.
“हो...” इवानने आपलं बोलणं सुरूं ठेवलं, “नक्कीच ताब्यांत आहेत! हे एक निर्विवाद सत्य आहे, त्याने स्वतः पोंती पिलातशी गप्पा मारल्या आहेत.
हो, माझ्याकडे असं बघण्याची
काही गरंज नाहीये! मी खरंच सांगतोय! सगळं बघितलंय त्याने – दालन, आणी ताडाची झाडं...थोडक्यांत असं की तो पोंती
पिलातच्या जवळ होता, ही गोष्ट मी शप्पत घेऊन सांगू शकतो.”
“मग, पुढे सांगा...”
“तर, मी येशूच्या चित्राला छातीला लावलं आणि पळूं लागलो...”
तेवढ्यांत घडाळ्याने दोन ठोके दिले.
“एहे-हे!!” इवान उद्गारला आणि सोफ्यावरून उठला, “दोन वाजून गेलेत आणि मी तुमच्याबरोबर वेळ वाया
घालवतोय. क्षमा करा, टेलिफोन कुठेय?”
“टेलोफोन दाखवा,” डॉक्टरने परिचारकांना सांगितलं.
इवानने टेलिफोनचा रिसीवर उचलला आणि महिला
परिचारिकेने हळूंच र्यूखिनला विचारलं, “ह्यांचं लग्न झालंय कां?”
“एकटांच आहे!” र्यूखिनने घाबरून उत्तर दिलं.
“प्रोफसयूज़चे (व्यावसायिक संघाचे) सदस्य?”
“हो, आहे.”
“पोलिस?” इवान टेलिफोनवर ओरडंत होता, “पोलिस? ड्यूटीवाले कॉम्रेड, ताबडतोब पाच मोटरसाइकल स्वारांना मशीनगन्स घेऊन परदेशी कन्सल्टन्टला
पकडायला पाठवा...काय? मला घ्यायला या, मी स्वतः तुमच्या बरोबर येईन...मी कवि बिज़्दोम्नी पागलखान्यांतून
बोलतोय...तुमचा पत्ता काय आहे?” रिसीवर हाताने झाकून इवानने हळूंच डॉक्टरला विचारलं, “हैलो, तुम्हीं ऐकतांय नं? बकवास!” अचानक इवान भडकला आणि त्याने रिसीवर भिंतीवर मारला. मग तो
डॉक्टरकडे वळला, त्याच्याकडे हात देत कोरडेपणाने ‘पुन्हां भेटूंया’ म्हटलं आणि निघायला लागला.
“माफ करा, तुम्हीं जाल कुठे?” डॉक्टरने इवानच्या डोळ्यांत बघंत विचारलं, “दाट काळोख्या रात्रींत, चड्डी घालून! तुमची तब्येत बरी नाहीये, इथेच थांबून जा!”
“जाऊं द्या ना,” इवान परिचारकांना म्हणाला जे त्याचा मार्ग रोखंत उभे होते, “सोडाल किंवा नाही?” डरकाळी मारंत कवि ओरडला.
र्यूखिन थरथरायला लागला, पण महिला परिचारिकेने टेबलवर लावलेलं एक बटन दाबलं, त्याच बरोबर टेबलावर एक चमकदार डब्बा आणि
किटाणुरहित इंजेक्शनची बाटली प्रकट झाली.
“अस्सं, तर हे असं आहे!” इवान रानटी, आहत स्वरांत म्हणाला, “ठीकाय! गुडबाय...” आणि तो डोकं वर करून खिडकीच्या पडद्याकडे धावला.
जोरदार टक्कर झाली, पण खिडकीच्या न फुटणा-या काचाने त्याला थोपून धरलं, पुढच्यांच क्षणी इवान परिचारकांच्या हातांत पडला
होता. त्याच्या घशातून घरघरीचा आवाज येत होता. तो चावायच्या पवित्र्यांत होता आणि
किंचाळंत होता :
“कसे-कसे काच तुम्हीं लोकांनी लावून
ठेवलेत!...सोडा! सोडा, म्हणतोय, सोडा!”
डॉक्टरच्या हातांत सुई चमकली. नर्सने झटक्याने
जुन्या ढील्या-ढाल्या शर्टाची बाही फाडली आणि हळुवारपणे इवानचा हात धरला. ईथरचा
वास घुमला. इवान चार माणसांच्या हातात ढीला पडला. डॉक्टरने चपळतेने ह्या क्षणाचा
फायदा घेत इवानच्या हातात सुई खुपसली. ते इवानला आणखी काही क्षण धरून होते आणि मग
त्याला सोफ्यावर टाकून दिलं.
“दरोडेखोर!” इवान ओरडला आणि त्याने सोफ्यावरून उडी
मारली, पण त्याला पुन्हां सोफ़्यावर ढकललं, जसंच त्याला सोडलं, तो पुन्हां उडी मारायचा बेतांत होता, पण मग आपणहूनंच तिथेंच बसून गेला. तो गप्प झाला, रानटीपणाने इकडे तिकडे बघितलं, मग एकदम एक जांभई दिली, आणि कटुतेने हसला.
“पकडलंच, शेवटी,” आणखी एक जांभई देऊन तो म्हणाला. एकदम लोळला, डोकं उशीवर ठेऊन, लहान मुलांसारखी मूठ गालाखाली ठेऊन, आवाजांत कटुतेचा लेशही न आणतां, झोपाळू स्वरांत बडबडू लागला :
“फार छान...तुम्हांलाच ह्याची किंमत मोजावी लागेल. मी सावध केलंय, आता तुम्हांला जे वाटेल, ते करा! मला आता सगळ्यांत जास्त पोंती पिलातची काळजी आहे...पिलात...”
आणि त्याने डोळे बंद केले.
“अंघोळ, एकशे सतरा नंबरची स्वतंत्र खोली आणि सोबत चौकीदार,” डॉक्टरने चष्मा घालतां घालतां आदेश दिला. र्यूखिन
पुन्हां एकदा थरथरला : पांढरी दारं काही आवाज न करतां उघडली. त्यांच्या मागे
कॉरीडोरमधे मंद प्रकाश होता. कॉरीडोरमधून रबराची चाकं असलेला स्ट्रेचर आला
ज्याच्यावर शांत पडलेल्या इवानला टाकलं. तो पुन्हां कॉरीडोरमधे चालला गेला, त्याच्या मागे दारं बंद झाले.
“डॉक्टर,” घाबरलेल्या र्यूखिनने हळूंच विचारलं, “म्हणजे हा खरोखरंच आजारी आहे?”
“ओह, हो,” डॉक्टर म्हणाला.
“त्याला झालं काय आहे?” र्यूखिनने नम्रतेने विचारलं.
थकलेल्या डॉक्टरने त्याच्याकडे बघून सुस्त आवाजांत
उत्तर दिलं, “चलन आणि वाणी प्रक्रियांचा उन्माद...भ्रमात्मक निष्कर्ष...कारण, कदाचित, जटिल आहे...स्किज़ोफ्रेनिया झाल्याचा अंदाज करूं शकतो. तसेंच दारूची
सवयपण आहे...”
डॉक्टरच्या बोलण्यांतून र्यूखिनला काहीच समजलं
नाही. त्याने अंदाज लावला की इवान निकोलायेविचची अवस्था खराब आहे आणि त्याने दीर्घ
श्वास घेऊन विचारलं, “आणि तो कुण्या कन्सल्टन्टबद्दल काय म्हणंत होता?”
“कदाचित त्याने कोणालातरी बघितलंय, ज्याने त्याच्या कल्पनाशक्तिला धक्का पोहोचलांय.
कदाचित त्याने ह्याला सम्मोहित केलं असावं...”
काही मिनिटांनी ट्रक र्यूखिनला परत मॉस्कोला घेऊन
चालला होता. उजेड होत होता, आणि रस्त्यावर जळंत असलेल्या ट्यूब लाइट्सचा प्रकाश अप्रिय वाटंत
होता. ड्राइवर चिडला होता, की त्याची रात्र वाया गेली होती. त्याने सम्पूर्ण ताकदीने ट्रक भरधाव
सोडला आणि घडी-घडी इकडे तिकडे वळवूं लागला. आणि जंगल गायब झालं. दूर, मागे कुठेतरी राहिलं, नदी कोप-यांत दबकली. ट्रकच्या समोर विभिन्न प्रकारचे दृश्य येत गेले
: चौकीदाराची पोस्ट असलेल्या काही फ़ेन्सिंग्स, लाकडाने लादलेल्या गाड्या, झाडांचे खुंट, काही काठ्या, काठ्यांवर काही रील्स, रेतीचे ढीग, जमीन – कालव्यांच्या बारीक धारांनी सजलेली – असं वाटंत होतं, की मॉस्को आतां आलंच; मॉस्को बस, कोप-याच्या मागेच आहे आणि गाडी तिथेंच थांबेल.
र्यूखिन जोरजोरांत उसळंत होता, त्याला हिचके बसंत होते. एका झाडाचं खुण्ट, ज्यावर तो बसला होता, घडी घडी त्याच्या खालून निसटायचा प्रयत्न करंत होतं, रेस्टॉरेन्टचे टॉवेल्स, ज्यांना पोलिसवाला आणि पंतेलेय फेकून ट्रॉलीबसने परत चालले गेले होते, सम्पूर्ण ट्रकमधे विखुरले होते. र्यूखिनने
त्यांना आवरायचा प्रयत्न केला पण मग कटुतेने विचार केला, ‘जाऊं दे मसणांत! मी कशाला मूर्खासारखा चक्कर खात बसूं...?’ त्याने लातेने त्यांना दूर फेकलं. त्यांच्याकडे
बघणंसुद्धां बंद केलं.
मुशाफिराचा मूड खूप खराब होता. स्पष्ट होतं की
पागलखान्याच्या ट्रिपने त्याच्या मनावर खोलवर परिणाम केला होता. र्यूखिन
समजण्याचा प्रयत्न करंत होता, की त्याला कोणची गोष्ट त्रास देतेय. निळ्या बल्बांचा कॉरीडोर, जो त्याच्या डोक्यांतून निघंत नव्हता? ही भावना की बुद्धिभ्रंशाहून जास्त दुर्भाग्य
जगांत कोणतेंच नाहीये. हो, हो, हे पण. पण ही तर एक सामान्य समज होती. ह्याच्याशिवायसुद्धां आणखी
काहीतरी होतं, ते काय? अपमान? अगदी बरोबर, हो, अपमानजनक शब्द, जे बिज़्दोम्नीने सरंळ त्याच्या तोंडावर फेकून मारले होते. मुद्दा हा
आहे, की ते शब्द फक्त
अपमानजनकंच नव्हते, पण हा, की ते सत्य होते.
कवि आता इकडे तिकडे बघंत नव्हता. तो फक्त ट्रकच्या
घाणेरड्या फरशीकडे बघंत होता. मग त्याने स्वतःलांच दोष देत काही पुटपुटायला
सुरुवात केली.
‘हो, कविता...तो बत्तीस वर्षाचा आहे! पुढे काय होणारेय? पुढे तो दरवर्षी काही कविता करंत राहील – म्हातारपणा पर्यंत? हो, म्हातारपणापर्यंत. ह्या कवितांनी त्याला काय फ़ायदा होईल? प्रसिद्धी? काय फालतूपणा आहे! कमीत कमी स्वतःला तरी नको फसवूं. जो कसल्याही
वेड्यावाकड्या कविता लिहितो, त्याला कधीही प्रसिद्धी नाही मिळूं शकंत. वेड्यावाकड्या कशाला? खरंच म्हटलं, अगदी खरं! र्यूखिनने स्वतःला प्रताडित करंत म्हटलं – जे काही मी
लिहितो, त्याच्यापैकी कश्शावरसुद्धां मी विश्वास नाही करंत!...’
ह्याच विचारांमधे बुडालेल्या कविला एक झटका बसला.
त्याच्या खालची फरशी आता उसळंत नव्हती. र्यूखिनने डोकं वर केलं आणि पाहिलं की तो
मॉस्कोला पोहोचलांय, मॉस्कोत उजाडंत होतं, ढग सोनेरी प्रकाशांत न्हायलेंत, तरुमंडित राजपथाच्या वळणावर अन्य अनेक वाहनांच्या रांगेत ट्रक उभा
आहे आणि त्याच्यापासून थोड्याच दूरीवर धातूने बनलेला एक माणूस4 झाडांनी
झाकलेल्या आळीकडे अलिप्ततेने बघतोय.
आजारी कविच्या मनांत काही विचित्र विचार तरळले : ‘हे आहे वास्तविक सफलतेचं उदाहरण,’ र्यूखिन ताणून ट्रकमधे उभा राहिला आणि त्याने
अलिप्तपणे उभ्या असलेल्या त्या लौह-पुरुषाला मारण्यासाठी हात उचलंला : ‘त्याने जीवनांत जे पण केलं, त्याच्याबरोबर जे काही झालं, सगळ्याचा त्याला फायदांच झाला, सगळ्या घटनांनी त्याला प्रसिद्धीच दिली! पण त्याने
केलं काय! मला कळंत नाहीये...तूफानी धुंध...ह्या शब्दांमधे काहीतरी खासंच
आहे? कळंत नाहीये! किस्मत वाला
आहे, किस्मत वाला!’ र्यूखिनने म्हटलं आणि तेवढ्यांत त्याला जाणवलं की
त्याच्या पायाखालचा ट्रक सरकतोय, ‘मारून टाकलं, गोळीने उडवून दिलं ह्याला त्या श्वेत सैनिकाने आणि अमर केलं...’
वाहनांची रांग पुढे सरकली. एकदम आजारी आणि
म्हातारा झालेला कवि दोन मिनिटातंच ग्रिबायेदवच्या दालनांत पोहोचला. दालन रिकाम
झालं होतं. कोप-यांत काही लोक आपली दारू संपवत होते आणि त्यांच्यांत एक उद्घोषक
घट्ट टोपी घालून, शैम्पेनचा ग्लास हातांत धरून धावपळ करंत होता.
टॉवेल्सच्या मागे लपलेल्या र्यूखिनची आर्चिबाल्द
आर्चिबाल्दोविचची टक्कर झाली आणि त्याने लगेच कविला त्या घाणेरड्या टॉवेल्समधून
मुक्त केलं. जर दवाखान्यांत आणि मग ट्रकमधे र्यूखिन अतिशय त्रस्त नसता झाला, तर त्याने अवश्य आनंदाने सांगितलं असतं की दवाखान्यांत
काय काय घडलं आणि आपल्या कल्पनेने जास्त चटकदार करूनंच सांगितलं असतं. पण सध्यां
तो त्या मनःस्थितीतंच नव्हता. त्याशिवाय, र्यूखिनची निरीक्षण शक्ति कितीही कमी असली, तरी ह्या क्षणी, ट्रकच्या कटु अनुभवानंतर, त्याने जीवनांत पहिल्यांदा ह्या समुद्री डाकूला तीक्ष्ण नजरेने
बघितलं आणि त्याला समजलं की, जरी तो बिज़्दोम्नीबद्दल प्रश्न विचारंत होता, मधे मधे “ओय-ओय-ओय!” म्हणंत होता, तरी बिज़्दोम्नीच्या भविष्याबद्दल तो पूर्णपणे उदासीन होता. त्याला
त्याच्याबद्दल जरासुद्धां दया वाटंत नव्हती. ‘शाबास! एकदम बरोबर!’ र्यूखिनने उन्मादपूर्ण, आत्मनाशक कटुतेने विचार केला आणि पागलपणाच्या कहाणीला मधेंच थांबवून
विचारलं, “आर्चिबाल्द आर्चिबाल्दोविच, मला थोडी वोद्का...”
समुद्री डाकू चेह-यावर सहानुभूतिचा भाव आणंत
पुटपुटला, “ मी समजूं शकतो...आत्ता घ्या...” आणि त्याने खूण करून वेटरला बोलावलं.
पंधरा मिनिटाने र्यूखिन अगदी एकटा बसून मास्याशी
खेळंत वोद्काचे ग्लास वर ग्लास पीत होता. त्याला कळंत होतं आणि तो स्वीकारपण करंत
होता, की त्याच्या जीवनांता आता काहीही सुधारणा शक्य नाही, फक्त विसरणंच जास्त चांगलंय.
कविने आपली रात्र वाया घालवली, जेव्हां इतर व्यक्ति हर्षोल्लासांत गुंग होते, आता तो समजून चुकला, की गेलेल्या रात्रीला परतवणं अशक्य आहे. फक्त लैम्पपासून दूर आकाशांत
डोकं वर करून बघणंच शिल्लक राहिलं होतं, हे समजायला की रात्र निघून गेली होती, कधीच परत न येण्यासाठी. वेटर्स घाई घाईने टेबल्सवरून टेबलक्लॉथ्स
गोळा करंत होते. दालनाच्या जवळपास फिरण्या-या मांजरींवर सकाळची सावली होती.
स्वतःला सावरण्यांस असमर्थ सकाळ कवीवर कोसळली.
*********
सात
शापित फ्लैट
जर दुस-या दिवशी सकाळी
कोणी स्त्योपा लिखादेयेवला सांगितलं असतं, की
“स्त्योपा, जर तू लगेच नाही उठला, तर तुला गोळी मारतील!” तर स्त्योपा आपल्या जड, मुश्किलीने ऐकू येणा-या आवाजांत म्हणाला असतां, “मारूं देत, माझं जे मनांत येईल ते करू द्या,
पण मी उठणार नाही!”
असं
नव्हतं की त्याला उठायचं नव्हतं. त्याला असं वाटंत होतं की तो डोळेच नाही उघडूं
शकणार, कारण की जसांच तो असं करेल, डोक्यांत वीज कडकडेल
आणी त्याचे तुकडे-तुकडे करून टाकेल. ह्या डोक्यांत वजनदार घंटे वाजंत होते. डोळ्यांच्या
बुब्बुळांच्या आणि बंद पापण्यांच्या मधे सोनेरी हिरवी किनार असलेले तपकिरी गोळे
फिरंत होते. त्याला मळमळंत होतं,
पण त्याला हे सुद्धां कळंत होतं की
ह्या मळमळण्याचा संबंध एका त्रासदायक ग्रामोफोनमधून येणा-या बेसु-या आवाजाशी होता.
स्त्योपा
ने आठवण्यांचा प्रयत्न केला,
पण त्याला फक्त एकंच गोष्ट आठवली की कदाचित
काल, तो कुठेतरी हातांत रुमाल पकडून उभा होता आणि
कोणत्यातरी महिलेचं चुम्बन घ्यायचा प्रयत्न करंत होता, ज्याच्यानंतर त्याने तिला
सांगितलं, की दुस-या दिवशी बरोब्बर दुपारी तो तिच्या घरी येईल, महिलेने ‘नाही’
सांगंत म्हटलं : “नाही, नाही, मी घरी नसणार!” पण स्त्योपा हट्टंच करंत होता :
“काहीही म्हण, पण मी तर येणारंच!”
ती
महिला कोण होती? आता किती वाजलेत? कोणची तारीख आहे? कोणचा महिना आहे?
स्त्योपाला नक्की माहीत नव्हतं आणि
सगळ्यांत वाईट ही गोष्ट होती,
की त्याला हे सुद्धां कळंत नव्हतं की
तो सध्यां कुठे आहे! त्याने कमीत कमी ही शेवटची गोष्ट समजण्यासाठी डाव्या डोळ्याची
चिकटलेली पापणी उघडण्याचा प्रयत्न केला. अंधुक प्रकाशांत कोणची तरी वस्तु चमकंत
होती. शेवटी स्त्योपाने आरशाला ओळखलं आणि त्याला समजलं की तो आपल्या पलंगावर, म्हणजेच भूतपूर्व जवाहि-याच्या पलंगावर पडलाय. पापणी उघडतांच डोक्यावर जणू
घणाचे घाव पडूं लागले,
आणि त्याने विव्हळंत पटकन डोळा बंद
केला.
चला, आम्हीं सांगून टाकतो : स्त्योपा लिखादेयेव, वेराइटी थियेटरचा
डाइरेक्टर सकाळी आपल्या त्यांच फ्लैट मधे जागा झाला, ज्यांत तो मृतक बेर्लिओज़बरोबर
राहात होता. हा फ्लैट सदोवाया स्ट्रीटवर U आकाराच्या सहामजली
बिल्डिंगमधे होता.
इथे
हे सांगावं लागेल, की हा फ्लैट, 50 नम्बरचा, बदनाम तर नाही,
पण तरीही विचित्र रूपांत चर्चेत
असायचा. दोन वर्षांपूर्वी ह्याची मालकीण दे’फुज़ेर ह्या
जवाहि-याची बायको होती. पन्नास वर्षांची अन्ना फ्रान्त्सेव्ना दे’फुज़ेरने, जी खूप चपंळ आणि आदरणीय महिला होती, पाचपैकी तीन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. एका माणसाला, ज्याचं, आडनाव,
कदाचित, बिलामुत होतं, आणि दुस-या – आडनाव हरवलेल्या माणसाला.
आणि
मागच्या दोन वर्षांपासून ह्या फ्लैटमधे विचित्र घटना व्हायला लागल्यात. ह्या
फ्लैटमधून लोक काहीही मागमूस न सोडतां गायब व्हायला लागले1.
एकदा, एका सुट्टीच्या दिवशी फ्लैटमधे एक पोलिसवाला आला. त्याने दुस-या भाडेकरूला (ज्याचं आडनाव हरवलं होतं) बाहेर प्रवेशकक्षांत बोलावलं आणि म्हटलं, की त्याला एका कागदावर सही करण्यासाठी पोलिस स्टेशनवर बोलावलंय. भाडेकरूने
अन्ना फ्रान्त्सेव्नाच्या विश्वासू मोलकरणीला, अन्फीसाला सांगितलं
की तो दहा मिनिटांत परत येईल. येवढं सांगून तो पांढरे हातमोजे घातलेल्या चुस्त
दुरुस्त पोलिसवाल्याबरोबर चालला गेला. पण तो दहा मिनिटांनीच काय, पण कधीच परत नाही आला. ह्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट ही झाली की
ताच्याबरोबरंच तो पोलिसवालासुद्धां नेहमीसाठी गायब झाला.
धार्मिक
प्रवृत्तीच्या, आणि स्पष्ट सांगायचं तर अंधविश्वासी, अन्फीसाने खूप वैतागलेल्या अन्ना फ्रान्त्सेव्नाला सांगितलं, की हा काळ्या जादूचा प्रकार आहे आणि तिला चांगलंच माहितीये की भाडेकरू आणि
पोलिसवाल्याला कोणी खेचून नेलंय,
पण रात्री त्याचं नाव नाही घेणार. पण
काळा जादू जर कां एकदा सुरू झालां,
तर त्याला कसंही करून थांबवणे शक्य
नाहीं. दुसरा, हरवलेल्या आडनावाचा भाडेकरू, मला असं आठवतंय की,
सोमवारी गायब झाला होता, आणि बुधवारी बिलामुत जणुं जमीनींत गडप झाला, पण वेगळ्या
परिस्थितींत. सकाळी,
रोजच्यासारखी, ऑफिसची कार त्याला न्यायला आली आणि घेऊन गेली, पण त्याला रोजच्या
सारखं परंत नाही आणलं आणि पुन्हां कधी इकडे फिरकलीसुद्धां नाही.
बिलामुतच्या
पत्नीचं दुःख आणि भीति अवर्णनीय आहे,
पण, हाय, दोन्हींही जास्त दिवस नाही टिकले. त्याच संध्याकाळी अन्फीसाबरोबर दाचाहून, जेथे अन्ना फ्रान्त्सेव्ना घाईघाईने निघून गेली होती, परंत आल्यावर त्यांना बिलामुतची बायकोपण घरांत नाही दिसली. हे पण कमीच आहे :
बिलामुतच्या दोन्हीं खोल्यांचे दारं सीलबंद दिसले.
कसे
तरी दोन दिवस गेले. तिस-या दिवशी अनिद्रेने त्रस्त अन्ना फ्रान्त्सेव्ना पुन्हां
घाईघाईने दाचावर निघून गेली...हे सांगावं लागेल की ती परत नाही आली.
एकटी
राहिलेली अन्फीसा मनसोक्त रडून घेतल्यावर रात्री दोन वाजतां झोपली. तिचं पुढे काय
झालं, माहीत नाही, पण दुस-या फ्लैट्समधे
राहणा-यांनी सांगितलं की फ्लैट नं. 50मधे जणु रात्रभर लाइट जळंत होता आणि खटखट होत होती. सकाळी कळलं की
अन्फीसासुद्धां नाहीये.
गायब
झालेल्या लोकांबद्दल आणि ह्या शापित फ्लैटबद्दल लोक अनेक प्रकारच्या गोष्टी सांगंत
होते, जसं की काटकुळी, देवभीरू अन्फीसा एका
पिशवींत अन्ना फ्रान्त्सेव्नाचे पंचवीस बहुमूल्य हीरे घेऊन गेली; की दाच्याच्या लाकडं ठेवण्याच्या खोलींत त्याच प्रकारचे कित्येक हीरे आणी
सोन्याच्या अनेक मोहरा सापडल्यांत,
आणि अश्याच काही काही गोष्टी; पण जी गोष्ट आम्हांला माहीत नाही, ती ठामपणे नाही
सांगणार.
काहींही
झालं असो, हा फ्लैट फक्त एक आठवडा रिकामा आणि सीलबंद राहिला, त्यानंतर त्यांत राह्यला आले मृतक बेर्लिओज़ – आपल्या बायको बरोबर आणि हाच
स्त्योपा – आपल्या बायको बरोबर. स्वाभाविकंच आहे की जसेच ते ह्या घरांत राहूं
लागले, त्यांच्या बरोबरसुद्धां सैतान जाणे काय काय होऊं
लागलं. फक्त महिन्याभरांतच दोघांच्या बायका गायब झाल्या, पण काही मागमूस ठेवल्याशिवाय नाही. बेर्लिओज़च्या बायकोबद्दल ऐकण्यांत आलं की
ती खारकोवमधे एका बैले प्रशिक्षकाबरोबर दिसली; आणि स्त्योपाची बायको
बोझेदोम्कांत सापडली,
जिथे, असं सांगतांत, की वेराइटीच्या डाइरेक्टरने आपल्या असीमित प्रभावाने तिला ह्या अटीवर एक
खोली मिळवून दिली, की ती सदोवायावर पुन्हां दिसायला नको...
हो, तर, स्त्योपा विव्हळंत होता. त्याला आपली मोलकरीण ग्रून्या
हिला बोलावून तिच्याकडून पिरामिदोनची गोळी मागावीशी वाटली, पण त्याला कळंत होतं,
की असं करणं मूर्खपणाचं
होईल...ग्रून्याकडे काही गोळी-बीळी नसेल. त्याने मदतीसाठी बेर्लिओज़ला बोलवायचा
प्रयत्न केला. दोनदा विव्हळंत बोलावलं,
“मीशा...” पण तुम्ही समजूं शकता, की त्याला उत्तर नाही मिळालं. फ्लैटमधे पूर्ण शांतता होती.
पायाच्या
बोटांना थोडसं हलवतांच समजला,
की तो मोजे घालूनंच झोपला होता.
थरथरणारे हात अंगावर फिरवंत तो हे समजण्याचा प्रयत्न करूं लागला, की पैंट घातली आहे,
किंवा नाही, पण समजलंच नाही.
शेवटी
त्याला जाणीव झाली,
की जणु सगळ्यांनी त्याला सोडून दिलंय
आणि तो अगदी एकटा आहे;
त्याची मदत करणारं कुणीच नाहीये आणि
त्याने ठरवलं की कितीही प्रयत्न करावे लागले तरी उठायचंच.
स्त्योपाने
चिकटलेल्या पापण्यांना प्रयत्नपूर्वक सोडवंत आरशांत पाहिलं, स्वतःच प्रतिबिम्ब त्याला विस्कटलेले केस, सुजलेला काळा निळा
चेहरा आणि सुजलेले डोळे,
घाणेरडा, चुरगळलेला शर्ट, टाय, मोजे आणि अण्डरवियर घातलेल्या माणसाच्या रूपांत दिसलं.
असं
त्यानी आरशाच्याआत स्वतःला पाहिलं आणि आरशाच्याबाहेर काळा सूट आणी काळी टोपी
घातलेल्या एका माणसाला पाहिलं.
स्त्योपा
पलंगावर उठून बसला. जेवढे शक्य होते,
तेवढे आपले रक्तासारखे लाल डोळे
विस्फारून त्याने अपरिचिताकडे बघितलं.
आपल्या
जाड्या भरड्या आवाजांत अपरिचितानेंच परदेशी लकबीत “गुड मॉर्निंग, परम प्रिय स्तिपान बग्दानोविच!” म्हणंत शांतता भंग केली.
थोडं
थांबून, अतोनात प्रयत्नाने स्त्योपा बोलूं शकला, “तुम्हाला काय पाहिजे?”
आणि स्वतःचाच आवाज न ओळखून त्याला
धक्कांच बसला. त्याने “तुम्हांला” तारसप्तकांत, “काय” मंदसप्तकांत
म्हटलं, आणि त्याच्या
तोंडून “पाहिजे” निघालंच नाही.
मैत्रीपूर्वक
हसून, अपरिचिताने हि-याचं त्रिकोणी फ्रेम असलेलं सोन्याचं
घड्याळ काढून अकरा वेळा वाजवलं आणि म्हणाला, “अकरा! बरोब्बर
तासभरापासून मी तुम्हीं उठण्याची वाट बघतोय, कारण की तुम्हीं मला
दहा वाजतां यायला सांगितलं होतं. हा मी आलोय!2
स्त्योपाने
पलंगाजवळच्या खुर्चीवर अंदाजाने पैंट शोधली आणि पुटपुटला, “माफ़ करा...”
पट्कन
पैंट घालून भसाड्या आवाजांत म्हणाला,
“कृपा करून तुमचं नाव सांगाल कां?”
त्याला
बोलताना खूप त्रास होत होता. प्रत्येक शब्दागणिक जणु कुणीतरी डोक्यांत एक सुई
टोचंत होतं, ज्यामुळे त्याला
नारकीय यातना होत होत्या.
“काय? तुम्हीं माझं नावसुद्धां विसरलांत?” आणि अपरिचित हसला.
“माफ़
करा...” स्त्योपा बडबडला. त्याला भास होत होता, की हे हैंगओव्हरचं
नवीनंच लक्षण आहे: त्याला वाटलं की पलंगाच्या जवळची फरशी कुठेतरी गायब झालीयं, आणि आत्ता ह्याच क्षणी तो उलटा लटकून सैतानाच्या मावशीकडे पाताळांत जाऊन
पोहोचेल.
“प्रिय
स्तिपान बग्दानोविच,”
पाहुणा भेदक स्मित करंत म्हणाला,” गोळी-बिळीने काही फायदा नाही होणार, जुनी म्हण आठवां –
जशास तसं. फक्त एकच गोष्ट तुम्हांला परत शुद्धिवर आणू शकते आणि ती आहे वोद्काच्या
दोन पैग्सबरोबर काही तिखंट,
चमचमीत ब्रेकफास्ट.”
स्त्योपा
लबाड होता आणि आजारी असूनसुद्धां त्याला कळंत होतं, की जेव्हां तो ह्या
अवस्थेत पकडलांच गेलाय,
तर सगळं स्पष्ट कबूल केलंच पाहिजे.
“स्पष्टंच
सांगायचं तर,” तो जीभेची थोडीशी हालचाल करंत सांगायला लागला, “काल मी थोडी...”
“बस, पुढे एकही शब्द नाही!” पाहुणा म्हणाला आणि खुर्चीसकट एका बाजूला सरकला. स्त्योपाने
डोळे विस्फारून पाहिलं की छोट्याश्या टेबलवर एक ट्रे ठेवला गेलाय, त्यांत पांढ-या ब्रेडचे स्लाइसेस, बाउलमधे दाबलेले
कैवियर, प्लेटमधे मश्रूमचं लोणचं, बंद वाडग्यांत आणखी
काहीतरी आणि जवाहि-याच्या बायकोच्या मोठ्या काचेच्या सुरईत वोद्का अशी सामग्री
होती. स्त्योपाला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, की ह्या सुरईवर
पाण्याचे थेंब जमले होते. पण ह्याचं कारण स्पष्ट होतं – सुरई बर्फाच्या प्लेटमधे
ठेवली होती.
अपरिचिताने
स्त्योपाच्या आश्चर्याला मानसिक आजाराच्या सीमेपर्यंत न जाऊं देता पटकन अर्धा पैग
वोद्का त्याच्या समोर ठेवली.
“आणि
तुम्हीं?” स्त्योपाने विचारलं.
“आनंदाने!”
थरथरत्या
हाताने स्त्योपाने प्याला ओठांना लावला आणि अपरिचिताने एकाच घोटांत आपला पैग पिऊन
टाकला. कैवियर चघळंत स्त्योपाने मोठ्या मुश्किलीने म्हटलं, “तुम्हीं...काय...खाल?”
“माफ़
करा, मी कधीच काहीही खात नाही,” अपरिचित म्हणाला आणि
त्याने दुसरा पैग बनवला.
वाडग्याचं
झाकण उघडतांच त्यांत टॉमेटो सॉसमधे सॉसेज आढळले.
डोळ्यासमोरची
ती शापित हिरवळ विरघळूं लागली,
बोलूं लागली, आणि मुख्य म्हणजे स्त्योपाला सगळं आठवलं. हे, की काल हे स्खोद्नी
येथे झालं होतं, स्केच चित्रकार खुस्तोवच्या दाचावर, जिथे हाच खुस्तोव टैक्सीत बसवून स्त्योपाला घेऊन गेला होता. आठवलं की कशी
मेट्रोपोलजवळ त्यांनी टैक्सी ठरवली होती. तेव्हां तिथे कोणी अभिनेता, नाही, अभिनेता नाही...अटैचींत ग्रामोफोन घेतलेला, हो, हो,
हो, दाचांतच झालं होतं हे
सगळं! आणि त्याला आठवलं की त्या ग्रामोफोनमुळे कुत्रे ओरडू
लागले होते. बस, फक्त त्या महिलेशी, जिचं स्त्योपा चुम्बन
घेऊं पाहत होता, बोलणं झालं नाही...सैतान जाणे, कोण होती ती...कदाचित रेडिओवर काम करंत असावी, किंवा नाही.
अश्या
प्रकारे कालच्या घटना हळू-हळू स्पष्ट होत होत्या, पण स्त्योपाला आता ही
गोष्ट गोंधळांत टाकंत होती,
की त्याच्या शयनगृहांत हा अपरिचित
वोद्का आणि खाण्यापिण्याचं सामान घेऊन घुसला कसा. हे माहिती करणं मूर्खपणा ठरणार
नाही!
“तर, कदाचित, आता तुम्हांला माझं नाव आठवलं असेल?”
पण
स्त्योपाने झेपून मंदस्मित केलं आणि हात हालवून दिले.
“चला, जाऊं द्या! मला वाटतंय की तुम्हीं वोद्का नंतर लगेच पोर्टवाइन घेतली असावी!
असं करणं बरोबर होतं कां?”
“मी
तुम्हांला विनंती करतो की कृपा करून ही गोष्ट आपल्या दोघांमधेच राहूं द्या...”
स्त्योपाने गहि-या नजरेने त्याच्याकडे बघंत म्हटलं.
“ओ, शंकाच नाही, बिल्कुल शंका नाही! पण खुस्तोवबद्दल मी काही करूं
शकणार नाही.”
“तुम्हीं
खुस्तोवला ओळखतां?”
“काल
तुमच्या ऑफिस रूममधे ह्या माणसाला ओझरतं पाहिलं होतं, पण त्याच्या चेह-यावर
एक धावती नजर टाकतांच कळतं की तो कसा माणूस आहे : बदमाष, भांडखोर, चाटुकार आणि संधिसाधू!”
‘अगदी बरोबर!’ ह्या तंतोतंत,
बरोबर आणि संक्षिप्त परिभाषेने
हबकलेल्या स्त्योपाने विचार केला.
हो, कालचा दिवस तुकड्या तुकड्यांत आठवंत होता, पण तरीही वेराइटीच्या
डाइरेक्टरची अस्वस्थता कमी नाही झाली. कारण हे होतं की ह्या कालच्या दिवसांत एक
खूप मोट्ठं काळं भोक होतं. ह्या चौड्या टोपीवाल्या अपरिचिताला स्त्योपाने काल
आपल्या ऑफिसरूममधे बघितलंच नव्हतं.
“काळ्या
जादूचा प्रोफेसर वोलान्द3,”
स्त्योपाचा अवघडपणा बघून पाहुण्याने
जाड्या आवाजांत सगळं काही व्यवस्थित सांगायला सुरुवात केली.
काल
दुपारी तो परदेशांतून मॉस्कोत आला होता आणि लगेच स्त्योपाला भेटून आपल्या
कलाकार-मंडळाचा वेराइटींत प्रोग्राम ठरवण्याबद्दल त्याने प्रस्ताव ठेवला.
स्त्योपाने मॉस्कोच्या क्षेत्रीय दर्शक कमिटीत फोन करून प्रोफेसरचा प्रस्ताव
स्वीकार केला (स्त्योपाचा चेहरा पांढरा पडला आणि तो डोळे मिचकावू लागला), प्रोफेसरबरोबर सात कार्यक्रम करण्याच्या कॉन्ट्रैक्ट वर सही केली
(स्त्योपाचं तोंड उघडंच राहिलं),
असं ठरवलं की जास्त माहितीसाठी वोलन्द
उद्या सकाळी (म्हणजे,
आज सकाळी) दहा वाजतां त्याच्या घरी
येईल...आणि वोलान्द आलांय!
येथे
आल्यावर त्याला मोलकरीण ग्रून्या भेटली, जिने सांगितलं की ती
आत्ताचं आली आहे, ती रोज येत-जात असते, बेर्लिओज़ घरी नाहीये, आणि जर पाहुण्याला स्तिपान बग्दानोविचला भेटायचं असेल तर त्याने सरळ
त्याच्या बेडरूम मधे जावं. स्तिपान बग्दानोविचला इतकी गाढ झोप लागते, की त्याला उठवायची जवाबदारी ती नाहीं घेऊं शकंत. स्तिपान बग्दानिविचची
अवस्था बघून कलाकाराने ग्रून्याला वोद्का आणि खण्यापिण्याच्या वस्तू आणायला
जवळंच्याच दुकानांत पाठवलं,
आणि बर्फासाठी मेडीकल शॉपमधे...
“तुमचा
हिशेब करण्याची परवानगी द्या,
प्लीज़,” पस्त झालेला स्त्योपा
किंचाळला आणि आपला पर्स शोधूं लागला.
“ओह, हा काय मूर्खपणा आहे!” पाहुणा कलाकार खिदळला आणि त्याने पुढे काहीही ऐकण्यास
नकार दिला.
अश्या
प्रकारे, वोद्का आणि खाण्यापिण्याच्या सामानाबद्दल तर समजलं
होतं, पण तरीही स्त्योपाकडे बघून दया येत होती : त्याला ठाम
विश्वास होता, की त्याने ह्या वोलान्दला काल बघितलंच नव्हतं, आणि भले ही तुम्हीं मला फाशीवर चढवा, पण ह्याच्याबरोबर
कॉन्ट्रैक्टसंबंधी काही गोष्टंच नाही झाली. हो, खुस्तोव होता, पण वोलान्द नव्हता.
“प्लीज़, कॉन्ट्रैक्ट दाखवा,”
स्त्योपाने हळूच म्हटलं.
“घ्या, घ्या...”
स्त्योपाने
तो कागद बघितला आणि जणु दगडंच झाला. सगळं अगदी बरोबर होतं. सगळ्यांत आधी, स्वतः स्त्योपाची फर्राटेदार सही! कोप-यांतून डोकावंत असलेली फिनडाइरेक्टरची4
तिरप्या अक्षरांत लिहिलेली अनुमति, जी कलाकार वोलान्दला
सात कार्यक्रमांसाठी स्वीकृत 35,000 रूबल्सपैकी 10,000 द्यायची सिफारश
करंत होती. त्यावरही शिरजोरी,
म्हणजे ह्याच्याच बाजूला वोलान्दची
स्वीकृति होती, जी हे दर्शवंत होती की त्याला हे 10,000 रूबल्स मिळालेंत!
हे
सगळं काय आहे? दुर्दैवी स्त्योपाने विचार केला आणि त्याचं डोकं गरगरू
लागलं. स्मृतिभ्रंश होतोय की काय?
पण, स्पष्टंच आहे, की कॉन्ट्रैक्ट दाखवल्यानंतर त्याच्याबद्दल आश्चर्यासारख्या, रागीट अश्या कोणत्यांच विचाराला काही अर्थंच नव्हता, उलट ही असभ्यतांच दिसली असती. स्त्योपाने पाहुण्याकडून एका मिनिटासाठी बाहेर
जाण्याची परवानगी घेतली आणि तसांच,
मोजे घातलेलाच बाहेर प्रवेशकक्षांत
पळाला जिथे टेलिफोन होता. जातां जातां तो किचनकडे तोंड वळवून ओरडला, “ग्रून्या!”
पण
कोणीच उत्तर नाही दिलं. आतां त्याने बेर्लिओज़च्या खोलीच्या दाराकडे पाहिलं, जो प्रवेशकक्षातंच उघडंत होता,
आणि तिथेच, जसं म्हणतांत, स्टेच्यू झाला. दाराच्या हैण्डलवर त्याने दोरीला लटकलेली मेणाची मोट्ठी सील5 पाहिली. नमस्कार! – स्त्योपाच्या डोक्यावर जणु
कुणीतरी घणाने मारलं. बस,
येवढंच शिल्लक होतं! आणि स्त्योपाचे
विचार जणु आगगाडीच्या दोन्हीं रुळांवर धावूं लागले, पण एकांच दिशेने, आणि सैतानंच जाणे कुणीकडे, जसं साधारणपणे दुर्घटनेच्या वेळेस होतं. स्त्योपाच्या डोक्यांत चाललेल्या
खळबळीचं वर्णन करणं कठीण आहे. एकीकडे गार वोद्का आणी अविश्वसनीय कॉन्ट्रैक्ट
आणणा-या काळ्या टोपीवाल्याची भुताटकी;
आणि दुसरीकडे दारावर लटकलेली सील! जणु
काही हे सांगंत होती की बेर्लिओज़ने काहीतरी गडबड केलीय; कोणी विश्वासपण नाही
करणार; ओय,
ओय, नाही करणार विश्वास!
पण, तरीही सील तर आहेच! हूँ...
लगेच
स्त्योपाच्या डोक्यांत त्या लेखाबद्दल उलट-सुलट विचार यायला लागले, जो त्याने मिखाइल अलेक्सान्द्रोविचच्या पत्रिकेंत छापण्यासाठी त्याच्या
हातांत ज़बर्दस्तीने खुपसला होता. तसं,
ही आपली आपसांतली गोष्ट आहे, की लेख अगदीच फालतू होता! काही कामाचा नाही, आणि
पारिश्रमिकसुद्धां कमींच होतं...
लेखाची
आठवण झाल्यावर लगेच त्याच्या डोक्यांत तो संदेहास्पद वादविवाद तरळून गेला, जो चोवीस एप्रिलला रात्री जेवतांना त्या दोघांमधे झाला होता. त्या
वार्तालापाला संदेहास्पद म्हणणं बरोबर नाहीये (कारण की स्त्योपा अशा
वार्तालापांत कधीच भाग घेत नाही),
पण हा वाद विवाद कोणच्या तरी अनावश्यक
विषयावर होता. सार्वजनिक ठिकाणी, निश्चितंच, त्यावर खुलून बोलणं शक्य नव्हतं. सील लागायच्या आधी ह्या वार्तालापाला
कोणीही ‘फालतू’
म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण सील लागल्यावर...
‘ओह, बेर्लिओज़, बेर्लिओज़!’
स्त्योपाचं डोकं जणु उकळंत होतं – ‘माझ्या डोक्यांत हा विचार घुसंत नाहीये!’
पण
तो जास्त वेळ शोकमग्न नाही राहूं शकला आणि स्त्योपाने वेराइटी थियेटरच्या
फिनडाइरेक्टर रीम्स्कीचा नंबर फिरवला. स्त्योपाची अवस्था फारंच विचित्र झाली होती
: एकीकडे ही भीति होती,
की त्या परदेशी पाहुण्याला ह्या
गोष्टीचा राग येईल,
की कॉन्ट्रैक्ट दाखवल्यावरसुद्धां
स्त्योपा त्याची शहानिशा करतोय;
आणि फिनडाइरेक्टरशी बोलणंसुद्धां
कठिणंच काम होतं. त्याला स्पष्टपणे विचारणं तर शक्यंच नव्हतं की ‘मी काल काळ्या जादूच्या प्रोफेसरबरोबर 35,000रूबल्सच्या
कॉन्ट्रैक्टवर सही केलीय कां?’
असं विचारणं बरोबर नाहीये!
“हैलो!”
टेलिफोनच्या रिसीवरमधून रीम्स्कीचा कर्कश, अप्रिय आवाज आला.
“नमस्कार, ग्रिगोरी दानिलोविच,”
स्त्योपाने हळूंच म्हटलं, “मी लिखोदेयेव बोलतोय. गोष्ट अशी आहे, की...अ...अ...माझ्याजवळ
बसलाय तो...अ...कलाकार वोलान्द...तर...मला हे विचारायचं होतं, की आज संध्याकाळचा प्रोग्राम नक्की झालायं कां?”
“आह, काळा जादू?” रिसीवरमधे रीम्स्की बोलला, “इतक्यांत जाहिराती
तयार होतीलंच.”
“अहा,” मरतुकड्या आवाजांत स्त्योपा म्हणाला, “भेटूं या...”
“तुम्हीं
लवकरंच येताय नं? रीम्स्कीने विचारलं.
“अर्ध्या
तासांत,” स्त्योपाने म्हटलं आणि रिसीवर टांगून आपल्या गरम
डोक्याला दोन्ही हातांनी गच्च दाबलं. आह, हा काय गडबड घोटाळा
होऊन बसलाय! माझ्या बुद्धिला काय झालंय, लोकांनो? आँ?
प्रवेश
कक्षांत जास्त वेळ थांबणं ठीक नव्हतं. स्त्योपाने लगेच डोक्यांत एक योजना आखली : आपल्या विसरभोळेपणाला कोणताही प्रयत्न करून लपवायला हवं, आणी आता सगळ्यांत आधी परदेशी पाहुण्याला मोठ्या शिताफ़ीने हे विचारायला हवं, की तो वेराइटीमधे संध्याकाळी काय दाखवणार आहे? स्त्योपा
टेलिफोनपासून वळला आणि तेव्हांच,
खोलीतल्या आरशांत, जो आळशी ग्रून्याने बरेंच दिवसांत स्वच्छ नव्हता केला, त्याने स्पष्टपणे एका विचित्र माणसाला पाहिलं : खांबासारखा उंच, बिनफ्रेमचा चश्मा घातलेला (आह. जर इवान निकोलायेविच येथे असतां! त्याने ह्या
नमुन्याला लगेच ओळखलं असतं). ही आकृति एकदा दिसून लगेच गायब झाली. स्त्योपाने
उत्तेजनेने डोळे विस्फारून खोलींत बघितलं, आणि त्याला दुसरा
धक्का बसला, कारण की आतां आरशांत एक हृष्ट-पुष्ट बोका प्रकट होऊन
पुन्हां लुप्त झाला.
स्त्योपाच्या
हृदयाची धडधड जणु बंद पडली,
तो अडखळला.
‘हे सगळं काय आहे?’ त्याने विचार केला, ‘मला वेड तर नाही लागंत आहे?
हे प्रतिबिम्ब कसलेंत?’ त्याने प्रवेश कक्षांत बघितलं आणि ओरडला:
“ग्रून्या! हा बोका इथे कां फिरतोय? कुठून आलांय आणि त्याच्याबरोबर आणखी कोण आहे?”
“घाबरू
नका, स्तिपान बग्दानोविच,” आवाज ऐकू आला, पण ग्रून्याचा नसून शयनगृहांत बसलेल्या पाहुण्याचा, “हा बोका माझा आहे. काळजी करूं नका. आणि ग्रून्यासुद्धां नाहीये, मी तिला वरोनेझला पाठवलंय,
तिच्या गावांत, कारण ती कुरकुर करंत होती,
की तुम्हीं तिला बरेंच दिवसांत सुट्टी
नाही दिली.”
हे
शब्द इतके आकस्मिक आणि निरर्थक होते,
की स्त्योपाला वाटलं की त्याने काही
चूक ऐकलंय. गडबडून तो आपल्या शयनगृहाकडे दुडदुड धावला आणि उंबरठ्यावरंच जणु थिजून
गेला. त्याचे केसं उभे राहिले,
कपाळावर घामाचे थेंब आले.
शयनगृहांत
पाहुणा आता एकटा नव्हता,
तो आपल्या सम्पूर्ण कम्पनीबरोबर होता.
दुस-या खुर्चीत तोच माणूस बसला होता,
जो आत्तांच आरशांतून प्रकट झाला होता.
आता तो स्पष्ट दिसंत होता : पंखांसारख्या मिश्या, चश्म्याचा एक काच
चमकंत होता आणि दुसरा गायब होता. शयनगृहांत आणखीही वाईट वस्तू दिसंत होत्या : गादी
असलेल्या स्टूलवर मांडी घालून जो तिसरा प्राणी बसला होता, तो आणखी कुणी नसून तोच अकराळ-विकराळ बोका होता, ज्याने एका पंजांत
वोद्काचा पैग आणि दुस-यांत मश्रूम लावलेला फोर्क धरला होता.
प्रकाश, जो शयनगृहांत तसाही कमी होता,
स्त्योपाला गुल होतांना दिसला – कदाचित
असेच पागल होत असतील!’
त्याच्या मनांत विचार आला आणि त्याने
भिंतीचा आधार घेऊन स्वतःला सावरलं.
“मी
बघतोय, की तुम्हांला थोडं आश्चर्य वाटतंय, परमप्रिय स्तिपान बग्दानोविच?”
वोलान्दने स्त्योपाला म्हटलं, ज्याचे दात किटकिटंत होते,
“खरं म्हणजे आश्चर्याची गोष्टंच नाहीये.
हे माझे सहयोगी आहेत.”
बोक्याने
वोद्काचा पैग संपवतांच स्त्योपाचा हात दाराच्या चौकटीवरून खाली घसरला.
“आणि
ह्या सहयोग्यांना राहायला जागा पाहिजे,”
वोलान्द बोलंतच होता, “म्हणजेच, ह्या फ्लैटमधे
आपल्या चौघांपैकी एक जास्तीचा आहे. मला वाटतंय की तो जास्तीचा म्हणजे
तुम्हीं आहांत!”
“तेंच
आहेत! तेंच आहेत!” स्त्योपासाठी बहुवचनाचा प्रयोग करंत, बकरीसारख्या आवाजांत
चौकटवाला लम्बू म्हणाला,
“विशेषकरून मागच्या काही दिवसांपासून तर
फारंच डुक्करपणा करतांयत,
सारखी दारू पीत असतांत, आपल्या पदाचा दुरुपयोग करून बायकांशी संबंध जोडतांत, काहींच काम करंत नाहींत,
आणि करूंपण नाहीं शकंत, कारण की जे पण काम त्यांना देण्यांत येतं, ते त्यांना समजतंच नाही.
आपल्या अधिका-यांच्या डोळ्यांत धूळ झोकतांत!”
“सरकारी
कार उगीचंच दौडवतांत!” मश्रूम चघळंत बोका रुसलेल्या आवाजांत म्हणाला.
आणि
तेवढ्यांत ह्या फ्लैटमधे चौथी आणि अंतिम घटना घडली, जेव्हां स्त्योपा
फरशीवर जवळ-जवळ घसटंत दाराच्या चौकटीला खरचटू लागला.
आरशांतून
सरळ खोलीत उतरला एक छोटा,
पण असाधारण रुंद खांदे असलेला माणूस, ज्याने डोक्यावर हैट घातली होती आणि ज्याचा एक दात बाहेर निघाला होता. ह्या
दाताने त्याच्या तश्याही घाणेरड्या असलेल्या व्यक्तित्वाला आणखीनंच अस्तव्यस्त
केलेलं होतं. वरून त्याचे केसही लाल रंगाचे होते.
“मला,” हा नवीन माणूस वाद विवादांत टपकला, “समजंत नाहीये की हा
डाइरेक्टर कसा काय झाला!”
लाल
केस वाला अनुनासिक स्वरांत बोलंत होता, “हा तर तसलांच डाइरेक्टर आहे,
जसा मी बिशप आहे!”
“तू
तर बिल्कुल बिशप सारखा नाही वाटंत,
अज़ाज़ेलो6!” बोक्याने आपल्या
प्लेटमधे सॉसेजचा तुकडा टाकंत म्हटलं.
“तेंच
तर मी म्हणतोय!” लाल केसवाल्याचं नाक बोललं, आणि वोलान्दकडे वळून
तो आदरपूर्वक म्हणाला,
“महाशय, ह्याला मॉस्कोच्या
सगळ्या सैतांनाच्या पुढ्यांत फेकण्याची परवानगी द्या!”
“फेकून
दे!!!” अचानक आपले केस ताठ करंत बोका गुरगुरला.
तेव्हां
स्त्योपाच्या चारीकडे शयनगृह गरगर फिरूं लागलं, त्याचं डोकं उंबरठ्यावर
आपटलं आणि शुद्धं हरपंत तो विचार करूं लागला, ‘मी मरतोय...’
पण
तो मेला नाही. हळू हळू डोळे उघडल्यावर त्याने बघितलं की तो दगड्याच्या कोणच्यातरी
वस्तूवर बसलाय. त्याच्या चारीकडे कशाचा तरी गोंगाट ऐकूं येत होता. नीट डोळे
उघडल्यावर त्याने बघितलं की तो समुद्राचा गोंगाट होता, लाटा अगदी त्याच्या
पायांना स्पर्श करंत होत्या,
थोडक्यांत सांगायचं म्हणजे, तो अगदी समुद्रावर बनलेल्या लाकडी प्लेटफॉर्मच्या कोप-यावर बसलेला आढळला, त्याच्या खाली चमचमणारा समुद्र आणि मागे टेकडीवर असलेलं एक सुंदर शहर होतं.
स्त्योपाला
समजलं नाही, की ह्या परिस्थितींत त्याला काय करायला पाहिजे आणि तो
थरथरत्या पायांनी प्लेटफॉर्म पार करून समुद्र तटाकडे जाऊं लागला.
ह्या
प्लेटफॉर्मवर एक माणूस उभा होता,
जो सारखा सिगरेट पीत होता आणि
समुद्राच्या पाण्यांत थुंकंत होता. त्याने स्त्योपाकडे रानटीपणाने पाहिलं आणि
थुंकणं थांबवलं. स्त्योपाला एक उपाय सुचला : तो सिगरेट पिणा-या अपरिचितासमोर
गुडघ्यांवर बसला आणी म्हणाला,
“मी विनंती करतो, कृपा करून मला सांगा,
की हे कोणचं शहर आहे?”
“एकदाचा...!”
हृदयहीन सिगरेटधारी म्हणाला.
“मी
प्यायलो नाहीये,” भसाड्या आवाजांत स्त्योपा म्हणाला, “मी आजारी आहे,
मला काही तरी झालंय, मी आजारी आहे...मी कुठे आहे?
हे कोणचं शहर आहे?”
“अहं, याल्टा...”
स्त्योपाने
दीर्घ श्वास घेतला,
तो अडखळून एका कुशीवर पडला आणि त्याचं
डोकं प्लेटफॉर्मच्या गरम दगडावर आपटलं.
*****
आठ
प्रोफेसर आणि कविमधे युद्ध
अगदी तेव्हांच जेव्हां याल्टांत शुद्ध स्त्योपाला
सोडून चालली होती, म्हणजे जवळजवळ साडे अकरा वाजतां,
ती
इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीकडे परतली, जो एका
दीर्घ आणि शांत निद्रेतून तेव्हांच उठला होता. थोडा वेळ तर तो विचार करंत होता,
की
ह्या चमचमीत सुरेख टेबल ठेवलेल्या, पांढ-या
भिंती असलेल्या, आणि पांढरे पडदे असलेल्या अनोळखी खोलीत
तो कसा काय आला, ज्यांच्या बाहेर त्याला सूर्याचा
प्रकाश जाणवंत होता.
इवानने डोक्याला झटका देऊन
बघितलं की दुखंत नाहीये आणि तेवढ्यांत त्याला आठवलं, की
तो दवाखान्यांत आहे. ह्या विचाराने बेर्लिओज़च्या मृत्यूची आठवण करून दिली : पण आज
ह्या आठवणीने त्याला जास्त धक्का नाही बसला. गाढ झोप झाल्यामुळे इवान थोडा शांत
झाला होता. आता तो शांत डोक्याने स्पष्टपणे विचार करूं शकंत होता. स्वच्छ,
नरम,
मऊ
बिछान्यावर काही वेळ निश्चल पडून राहिल्यावर इवान ने जवळंच घण्टीचं बटन बघितलं.
उगीचंच वस्तूंना हात लावायच्या सवयीने इवानने बटन दाबलं. त्याला काही आवाज येण्याची,
किंवा
कोणीतरी येण्याची अपेक्षा होती, पण
ह्याच्या अगदी उलटंच झालं. इवानच्या पायथ्याशी बसवलेल्या एका मातकट सिलिंडरमधे
प्रकाश झाला आणि त्यावर चमकते अक्षरं प्रकट झाले, “पेय”.
थोडा वेळ स्थिर राहिल्यावर हा सिलिंडर गरगर फिरूं लागला आणि “नर्स” हा शब्द दिसेपर्यंत
फिरंत होता. ह्या हुशार सिलिंडरने इवानला हैराण
केलं. “नर्स”च्या नंतर आता सिलिंडरवर “डॉक्टरला बोलवां” हे वाक्य आलेलं होतं.
“हूँ”... इवान विचार करूं
लागला की ह्या खोडकर सिलिंडरचं काय करायला हवं.
शेवटी त्याला मार्ग
सापडलांच. जसंच इवानने “सहायक डॉक्टर” शब्द आल्याबरोबर दुस-यांदा बटन दाबलं,
तो
थांबला. त्यांतील लाइट विजला आणि खोलीत पांढरा एप्रन घातलेल्या एका सहृदय महिलेने
प्रवेश केला. तिने इवानला म्हटलं, “नमस्ते!”
इवानने उत्तर नाही दिलं,
कारणं
की ह्या परिस्थितींत त्याला हे “नमस्ते” म्हणजे विचित्रंच वाटलं. खरंच होतं – एका
स्वस्थ्य माणसाला दवाखान्यांत फेकून दिलं होतं आणि असं दाखवतांयेत की हे बरोबरंच
होतं.
त्या महिलेने चेह-यावरून
सहानुभूतिचा भाव ढळूं दिला नाही आणि एक बटन दाबून खिडकीचे पडदे दूर सारले.
खोलीच्या फरशीला लागत असलेल्या चौड्या आणि हलक्या जाळींतून सूर्य खोलींत डोकावला.
जाळीच्या मागे एक बाल्कनी दिसली, तिच्या
मागे वळंण घेत असलेल्या नदीचा किनारा आणि नदीच्या दुस-या किना-यावर पाइन वृक्षांच
प्रसन्न वाटणारं जंगल.
“कृपा करून स्नान करून घ्या,”
महिलेने
म्हटलं आणि तिच्या हातांच्या खालची भिंत सरकली, जिच्यामागे
सर्व सामग्रीने सुसज्जित स्नानगृह आणि शौचालय दिसलं.
जरी इवानने ठरवलं होतं,
की
तो ह्या महिलेशी बोलणार नाही, तरी
स्नानगृहांत नळातूंन येत असलेल्या पाण्याच्या प्रचण्ड धारेला बघून तो स्वतःवर ताबा
नाही ठेवूं शकला आणि उपहासाने म्हणाला, “काय थाट
आहे! जणु मेट्रोपोलमधे आहे!”
“ओह, नाही,”
महिला
गर्वाने म्हणाली, “त्याच्यापेक्षांही जास्त चांगलं आहे,
अश्या
प्रकारचं साहित्यतंर परदेशांतसुद्धां कुठे मिळणार नाही; वैज्ञानिक
आणि डॉक्टर मुद्दाम आमचं हॉस्पिटल बघायला येतांत. दररोज पंधरा टूरिस्ट्स, परदेशी,
येतांत.”
‘परदेशी
टूरिस्ट’ शब्द ऐकतांच इवानला कालच्या
कन्सल्टेन्टची आठवण झाली. त्याच्या डोळ्यासमोर धुकं पसरलं. तिरप्या डोळ्यांनी बघंत
त्याने म्हटलं, “परदेशी टूरिस्ट...कित्ती डोक्यावर
चढवतां तुम्हीं परदेशी टूरिस्ट्सला! त्यांच्यांत कितीतरी प्रकारचे लोक असतांत. काल
मी अशांच एका टूरिस्टला भेटलो होतो, आणि नसती
कटकट उत्पन्न झाली.”
आणि तो पिंती पिलातबद्दल सांगणारंच होता, पण त्याने
स्वतःला थांबवलं, हे समजून, की
ह्या महिलेला ह्या सगळ्या भानगडीशी काहींच घेणं-देणं नाहीये;
ती
त्याची मदत तर करूंच नाही शकणार.
आंघोळ झाल्यावर इवानला ते
सगळं देण्यांत आलं, ज्याची आंघोळीनंतर एका पुरुषाला
आवश्यकता असते : इस्तरी
केलेला शर्ट, अंतर्वस्त्र,
मोजे...पण
हे तर काहीच नाही, त्या महिलेने अलमारीचं दार उघडून
दाखवलं आणी विचारलं, “काय घालणार, गाऊन
की पायजमा?”
जबर्दस्ती ह्या नव्या आवासांत
कैद झालेला इवान महिलेच्या बिनधास्तपणाने घाबरला, त्याने
तिला जवळ-जवळ ढकलून दिलं आणि चुपचाप घडी घातलेल्या पायजम्यांच्या गड्डींत बोट
घुसवलं.
नंतर इवान निकोलायेविचला
रिकाम्या आणि निःशब्द कॉरीडोरमधून एका खूप मोठ्या खोलींत नेण्यांत आलं. इवानने,
ज्याने
सगळ्या घटनांचा उपहासपूर्वक सामना करण्याचं ठरवलं होतं, लगेच
अलौकिक उपकरणांनी सज्ज ह्या खोलीला “फैक्टरी-किचन” हे नाव देऊन टाकलं.
असं करण्यांचपण एक कारण
होतं. ह्या खोलीत अनेक लहान आणि मोठ्या अलमा-या होत्या, ज्या
चकचकीत, निकलच्या वेगवेगळ्या उपकरणांने गच्च
भरल्या होत्या. जटिल आकाराच्या काही खुर्च्या होत्या, चमकदार
शेड्स असलेले फुगरे-फुगरे लैम्पस, असंख्य
बाटल्या, गैसचे बर्नर्स,
विजेचे
तार, आणि अन्य अनेक असे उपकरण ज्यांच्याबद्दल कोणालाच
माहिती नव्हती.
खोलींत आल्यावर इवानजवळ तीन
लोक आले – दोन महिला आणि एक पुरुष – सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते. सगळ्यांत
आधी त्याला कोप-यांत असलेल्या एका टेबलाजवळ नेण्यांत आलं, स्पष्टंच
होतं, की त्याला काही विचारणार होते.
इवानने आपल्या स्थितिचा विचार केला. त्याच्यासमोर तीन पर्याय होते. पहिला पर्याय
खूप मस्त वाटला : ह्या लैम्पस आणि चकाकणा-या वस्तूंवर तुटून पडायचं,
त्यांचे
तुकडे करायचे आणि अश्या प्रकारे त्याला बळजबरीने येथे थांबवून घेतल्याबद्दल विरोध
प्रकट करायचा. पण पण आजचा इवान कालच्या इवानपेक्षां खूप वेगळा होता,
म्हणून
पहिला पर्याय त्याला संदेहास्पद वाटला : हे लोक असा निष्कर्ष काढूं शकतात की तो एक
धोकादायक मानसिक रोगी आहे. म्हणून इवानने हा विचार डोक्यांतून काढून टाकला. दुसरा
: लगेच पोंती पिलात आणि त्या कन्सल्टेन्टची गोष्ट सुरूं करावी. पण कालच्या
अनुभवाने हे सिद्ध झालं होतं, की ह्या
गोष्टीवर एकतर कोणी विश्वासंच नाही ठेवणार किंवा अर्थाचा अनर्थ काढला जाईल. म्हणून
इवानने हा पर्याय पण सोडून दिला आणि तिस-या पर्यायाबद्दल विचार करूं लागला :
चुपचापंच रहायचं.
पूर्ण प्रकारे असं करणं जमलं
नाही आणि इच्छा नसतानासुद्धां काही प्रश्नांचे उत्तरं द्यावेच लागले,
थोडक्यांत
असो किंवा कपाळावर आठ्या घालून.
इवानला त्याच्या पूर्वीच्या
आयुष्याबद्दल विचारण्यांत आलं, हे सुद्धां
की त्याला सुमारे पंधरा वर्षांपूर्वी स्कार्लेट-फीवर (जांभळा संसर्गजन्य ताप –
अनु.) कशामुळे आणि केव्हां झाला होत. इवानच्या उत्तरांनी एक सम्पूर्ण पान
भरल्यावर, ते उलटलं आणि पांढरे कपडे घातलेल्या
महिलेने इवानच्या नातेवाईकांबद्दल विचारपूस सुरूं केली. प्रश्नांची सरबत्तीच सुरूं
झाली : कोण मेलं, केव्हां, कशाने;
दारुड्या
होता कां? गुप्त आजाराने ग्रस्त होता कां…अश्यांच
प्रकाराचं आणखीही बरंच काही. शेवटी पत्रियार्शी पार्क मधे घडलेल्या कालच्या घटनेचं
वर्णन करायला सांगण्यांत आलं, पण सगळं
ऐकूनही कोणीच चकित झालं नाही, आणि
पिलातच्या गोष्टीनेपण त्यांना काहींच आश्चर्य नाही झालं.
आता त्या महिलेने इवानला
पुरुषाच्या ताब्यांत दिलं, आणि त्याने
अगदीच वेगळा पवित्रा घेतला.
त्याने इवानला काहीही
विचारलं नाही, त्याने इवानच्या शरीराचं तापमान
मोजलं, त्याची नाडी बघितली,
इवानच्या
डोळ्यांत बघितलं, त्यांच्यांत लैम्पने प्रकाशाचा झोत
फेकला. आता पुरुषाच्या मदतीला दुसरी महिला पुढे आली; इवानच्या
कमरेंत काहीतरी घुसवलं, पण दुखलं
नाही, त्याच्या छातीवर एका लहानश्या
हातोड्याने काही चिन्ह बनवण्यांत आले. हातोड्याने गुडघ्यांवर मारलं,
ज्याने
इवानचे पाय उडूं लागले, बोटांत
काही तरी घुसवून त्यांतून रक्त काढण्यांत आलं, कोपरांतपण
काहीतरी घुसवलं, हातांत रबरी ब्रेसलेट्स घालण्यांत
आले.
इवान मनांतल्या मनांत
कटुतेने हसला आणि विचार करूं लागला की ह्या सगळ्याचा शेवट किती विचित्र आणि
मूर्खपणे होतोय. जरा विचार करा! कुठे तर तो सगळ्यांना त्या अनोळखी
कन्सल्टेन्टपासून संभावित धोक्याबद्दल सावध करणार होता, त्याला
पकडायला चालला होता आणि कुठे स्वतःच ह्या रहस्यमय खोलींत येऊन पोहोचलाय,
आणि वलोग्दांत नेहमी दारूच्या नशेंत धुंद असणा-या,
आपल्या फ्योदर काकाबद्दल वेडेपणाच्या गोष्टी सांगू लागला. ओफ,
हा
मूर्खपणा सहन होत नाहीये!
शेवटी त्यांनी इवानला एकदाचं
सोडलं. त्याला पुन्हां आपल्या खोलीत नेण्यांत आलं, तिथे
त्याला ब्रेड-बटर, दोन हाफ़बॉयल्ड अण्डी आणि कॉफी
देण्यांत आली.
इवानने दिलेले सगळे पदार्थ
खाऊन-पिऊन टाकले, आणि त्याने ठरवलं की तो ह्या
हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरची वाट पाहील.
ह्याच प्रमुखाचं लक्ष स्वतःकडे खेचण्याची आणि त्याच्याकडून न्याय मिळविण्याची आशा
इवानला अजूनही होती.
हा प्रमुख त्याचं ब्रेकफास्ट
संपल्यावर थोड्यांच वेळांत प्रकट झाला. अप्रत्याशितपणे इवानच्या खोलीचं दार उघडलं
आणि पांढरे डगले घातलेले बरेंच लोक खोलीत आले. त्यांच्या पुढे-पुढे एखाद्या एक्टर
सारखी सफाचट दाढी केलेला, सुमारे
पंचेचाळीस वर्षाचा व्यक्ति चालंत होता. त्याचे डोळे सुंदर, पण
तीक्ष्ण होते आणि तो सज्जन वाटंत होता. टीमचे सगळे सदस्य त्याच्याकडे सन्मानाने
आणि लक्षपूर्वक बघंत होते, आणि त्याचं
आगमन एखाद्या समारंभासारखं वाटलं. ‘पोंती
पिलात सारखा!’ - इवानच्या डोक्यांत आलं.
खरोखरंच तो प्रमुख होता. तो
खुर्चीत बसला, बाकी सगळे उभेच राहिले.
“डॉक्टर स्त्राविन्स्की,”
आगंतुकाने
इवानला आपला परिचय दिला आणि सहृदयतेने त्याच्याकडे बघितलं.
“घ्या,
अलेक्सान्द्र
निकोलायेविच,” एक नीटनेटक्या दाढीवाला म्हणाला आणि
त्याने प्रमुखाच्या हातांत वर-खाली, पुढे-मागे
लिहिलेला कागद दिला. ही इवानबद्दल माहिती होती.
‘पूर्ण
कथांच लिहून टाकली!’ इवानने विचार केला. प्रमुख अभ्यस्त
नजरेने तो कागद वाचंत “ओह...ओह...” पुटपुटंत होता. त्याचबरोबर चारीकडे उभ्या
असलेल्या लोकांशी एका कळत नसलेल्या भाषेंत काही वाक्य बोलला.
‘हासुद्धां लैटिनमधे, पिलात सारखा, बोलतोय...’ निराशेने इवान विचार
करूं लागला. पण तेवढ्यांत एक शब्द ऐकून तो चकित झाला. हा शब्द होता
“स्किज़ोफ्रेनिया’ – ओह, हेंच तर तो नीच परदेशी पत्रियार्शींत म्हणाला होता, त्याच शब्दाची आता
प्रोफेसर स्त्राविन्स्कीने पुनरावृत्ति केलीय.
‘हे पण त्याला माहीत
होतं!’ इवानने व्याकुळतेने
विचार केला. प्रमुखाची जणु सवंय होती, की जे काही त्याला सांगंत होते, त्याच्याशी तो सहमत
व्हायचा आणि त्यावर हर्ष प्रकट करंत म्हणायचा, “फार छान, फार छान...”
“फार छान!” स्त्राविन्स्की
कागद परंत करताना कोणाला तरी म्हणाला आणी मग तो इवानकडे वळला, “तुम्हीं कवि आहांत?”
“हो, कवि आहे,” इवानने खूप
नैराश्याने उत्तर दिलं आणि त्याला कवितेच्याप्रति एक अवर्णनीय घृणा वाटली. आपलीच
कविता,
जी
त्याला तोंडपाठ होती, अप्रिय वाटली.
चेह-यावर आठ्या घालंत त्याने
स्त्राविन्स्कीला विचारलं, “तुम्हीं प्रोफेसर आहांत?”
ह्यावर स्त्राव्न्स्कीने
नम्रतेने आणि आपलेपणाने डोकं हलवलं.
“आणि तुम्हीं – इथले प्रमुख
आहांत?”
इवानने
आपली गोष्ट सुरूं ठेवली.
स्त्राविन्स्कीने ह्यावर
डोकं हलवलं.
“मला तुमच्याशी बोलायचंय,” इवान निकोलायेविचने
अर्थपूर्ण स्वरांत म्हटलं.
“मी पण त्यासाठींच आलोय,” स्त्राविन्स्कीने
उत्तर दिलं.
इवानला वाटलं की आतां योग्य
वेळ आलीये,
आणि तो
म्हणाला,
“मुद्दा
असा आहे,
की मला
पाग़ल ठरवून टाकलंय. कुणालांच माझं म्हणणं ऐकायचं नाहीये...”
“ओह, नाही! आम्हीं नीट लक्ष देऊन
तुमचं म्हणणं ऐकू.” स्त्राविन्स्की अत्यंत गंभीरतेने, त्याला सांत्वना देत
असल्यासारखा,
म्हणाला, “आणि कोणत्याही
परिस्थितींत तुम्हांला पागल ठरवूं देणार नाही.”
“तर, मग नीट लक्ष देऊन ऐका, काल संध्याकाळी
पत्रियार्शी तलावावर मी एका रहस्यमय व्यक्तीला भेटलो, कदाचित परदेशी होता, ज्याला बेर्लिओज़च्या
मृत्युबद्दल आधीच माहीत होतं आणि ज्याने स्वतः पोंती पिलातला बघितलंय.”
सगळेजण पापणी सुद्धां न
हलवतां इवानचं म्हणणं ऐकंत होते.
“पिलातला? पिलात, जो येशू ख्रिस्ताच्या
काळांत होता!” डोळे बारीक करून इवानकडे बघंत स्त्राविन्स्कीने विचारलं.
“तोच.”
“आहा!” स्त्राविन्स्कीने
म्हटलं,
“आणि
हा बेर्लिओज़ ट्रामगाडीखाली मेला नं?”
“माझ्यांच डोळ्यांसमोर काल
पत्रियार्शीवर ट्रामखाली आला, ज्याच्याबद्दल ह्या रहस्यमय व्यक्तिने...”
“पोंती पिलातच्या ओळखीचा?” स्त्राविन्स्कीने
अत्यंत समजदारीने विचारलं.
“त्यानेच”, इवानने ज़ोर देत
स्त्राविन्स्कीचा अंदाज घेत म्हटलं, “त्यानेच आधीच सांगून टाकलं होतं, की अन्नूश्काने
सनफ्लॉवर ऑइल सांडलेलं आहे...आणि तो त्याच ठिकाणी पाय घसरून पडला! तुम्हांला हे
कसं वाटतंय?”
इवानने
रहस्यमय ढंगाने म्हटलं. त्याला आशा होती की त्याचा शब्दांचा चांगला प्रभाव पडेल.
पण काहीही प्रभाव नाही पडला
आणि स्त्राविन्स्कीने पुढचा प्रश्न विचारला, “पण ही अन्नूश्का आहे कोण?”
ह्या प्रश्नाने इवान थोडासा
गोंधळला. त्याच्या कपाळावर आठी पडली. त्याने पडत्या आवाजांत म्हटलं, “अन्नूश्काचं इथे काही
काम नाहीये. सैतान जाणे ती कोण आहे. सदोवायावर राहणारी कोणी मूर्ख असेल. महत्वाचं
हे आहे,
की
त्याला आधीपासूनंच ह्या तेलाबद्दल माहीत होतं. तुम्हांला कळतंय ना?”
“चांगलंच कळतंय,” स्त्राविन्स्कीने
गंभीरतेने म्हटलं, आणि कविच्या गुडघ्यांना हात लावंत म्हणाला, “ काळजी नका करूं आणि
पुढे सांगा.”
“हो, सांगेन,” इवानने
स्त्राविन्स्कीच्यांच सुरांत म्हटलं. आपल्या कटु अनुभवावरून त्याला समजलं होतं की
त्याच्यासाठी गंभीरतांच जास्त चांगली आहे, “हो, तो...तो, भयानक माणूस...खोट
सांगतो की तो कन्सल्टेन्ट आहे, आणि काही असाधारण शक्ति त्याच्या ताब्यांत
आहेत...उदाहरणार्थ, त्याचा पिच्छा करंत राहा पण त्याला पकडणं अशक्य आहे. त्याच्या
बरोबर एक जोडीपण आहे, एक मस्त जोडी, अगदी अफलातून : एक लम्बू, तुटका चश्मा घातलेला; आणि त्याच्याशिवाय, एक मोट्ठा
अकराळ-विकराळ बोका, जो ट्राममधे आपणहून प्रवास करतो. ह्याच्या शिवाय...” इवान खूप
उत्साहाने न थांबता बोलंत होता, “तो स्वतः पोंती पिलातच्या दालनांत होता, ह्यांत शंका
घेण्याचं काहींच कारण नाहीये. ही काय भानगड आहे? त्याला लगेच पकडणं ज़रूरी आहे, नाही तर तो प्रचण्ड
विनाश करेल.”
“म्हणूनंच तुम्हीं म्हणतांय
की त्याला पकडलं पाहिजे? तुमचं म्हणणं मी बरोबर समजलोय नं?” स्त्राविन्स्कीने
विचारलं.
‘हा माणूस हुशार आहे,’ इवानने विचार केला, ‘स्वीकार करावं लागेल, की कधी-कधी
बुद्धिजीवी लोकांत सुद्धां बुद्धिमान लोकं सापडतांत. हे नाकारतं येणार नाही!’ आणि त्याने उत्तर
दिलं,
“अगदी
बरोबर! आणि मी ह्या गोष्टीवर जोर कां नको देऊं? तुम्हीं स्वतःच समजू शकता!
पण इथे मलांच जबर्दस्ती थांबवून ठेवलंय, डोळ्यांत लैम्पचा उजेड खुपसतायंत, बाथरूममधे आंघोळ
घालतांत,
फ्योदर
काकाबद्दल विचारतांत!...आणि ते तर फार पूर्वीपासून ह्या जगांत नाहीये! मी मागणी
करतो की मला लगेच सोडण्यांत यावे.”
“वाह! काय म्हणता! अतिसुंदर!”
स्त्राविन्स्की म्हणाला, “सगळं स्पष्ट झालंय. खरं म्हणजे एका निरोगी माणसाला
हॉस्पिटलमधे ठेवण्यांत काही अर्थंच नाहीये? ठीक आहे...मी तुम्हांला लगेच
इथून जाऊ देईन,
जर
तुम्हीं सांगाल,
की तुम्हीं
निरोगी आहे. सिद्ध करायची गरज नाहीये, फक्त सांगा. तर, तुम्हीं निरोगी आहांत?”
सम्पूर्ण शांतता पसरली आणि
ती लट्ठ महिला,
जी
सकाळी इवानची काळजी घेत होती, प्रशंसापूर्ण नजरेने प्रोफेसरकडे बघायला लागली, आणि इवानला पुन्हां
एकदां वाटलं,
‘खरंच
बुद्धिमान आहे!’
त्याला प्रोफेसरचा प्रस्ताव
आवडला,
पण
उत्तर देण्याआधी त्याने बरांच वेळ विचार केला आणि मग कपाळावर आठ्या घालंत ठामपणे
म्हणाला,
“मी, निरोगी आहे.”
“सुंदर!” स्त्राविन्स्कीच्या
डोक्यावरंच ओझं जणु दूर झालं, “जर असं आहे, तर चला, सगळ्या गोष्टींवर तार्किक
दृष्ट्या विचार करूं या. तुमचा कालचा दिवसंच बघा,” तो वळला आणि त्याला लगेच
इवानशी संबंधित केस-पेपर देण्यांत आला. “त्या अनोळखी माणसाला शोधताना, जो स्वतःला पोंती
पिलातचा परिचित म्हणतो, तुम्हीं काय काय नाही केलं!” स्त्राविन्स्कीने आपली
लांब बोटं वर करंत कधी इवानकडे तर कधी कागदाकडे बघितलं, “आपल्या छातीवर क्रॉस आणि
मूर्ति लटकवली. बरोबर?”
“बरोबर,” इवानने तुसडेपणाने
म्हटले.
“फ़ेन्सिंग पार करताना आपला
चेहरा जख्मी केला. बरोबर? विझलेली मेणबत्ती घेऊन रेस्टॉरेन्टमधे घुसले, फक्त, फक्त चड्डी घालून
आणि कोणाला तरी मारलंसुद्धां. तुम्हांला हात-पाय बांधलेल्या अवस्थेंत इथे आणलं.
इथे आल्यावर तुम्हीं पोलिसला फोन करून गोळा-बारूद पाठवायला सांगितलं. मग खिडकीतून
उडी मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर? आता प्रश्न हा आहे, की अश्याने कोणाला पकडणं
शक्य आहे कां?
आणि जर
तुम्हीं सामान्य आहांत, तर तुम्हीं स्वतःच म्हणाल : बिल्कुल नाही. तुम्हाला
इथून जायचंय?
खुशाल
जा.
पण
फक्त येवढं विचारू द्या, की इथून तुम्हीं जाणार कुठे?”
“नक्कीच पोलिसांत,” इवान आतां थोडासा
नरम पडला. प्रोफेसरच्या नजरेसमोर त्याला हरवल्यासारखं वाटंत होतं.
“इथून सरंळ?”
‘हूँ.”
“आणि आपल्या फ्लैटवर नाही
जाणार?”
स्त्राविन्नस्कीने
लगेच विचारलं.
“तिथे जाण्यासाठी वेळ
नाहीये. जो पर्यंत मी फ्लैटवर जाईन, तो निसटून जाईल.”
“असं आहे! आणि तुम्हीं
पोलिसांना सांगणार काय आहे?”
“पोंती पिलातबद्दल,” इवान निकोलायेविचने
म्हटलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली.
“हूँ, अति सुंदर!”
स्त्राविन्स्की नम्रपणे उद्गारला आणि दाढीवाल्याकडे वळून म्हणाला, “फ्योदर वासिल्येविच, नागरिक बिज़्दोम्नीला
शहरांत जायला सुट्टी द्या. पण ही खोली अशीच राहू द्या. चादरीसुद्धां बदलूं नका, दोन तासांत नागरिक
बिज़्दोम्नी परंत इथेच येतील. चला, मग...” मग तो कविकडे वळून म्हणाला, “तुमच्या सफलतेची
कामना मी नाही करणार, कारण तुमच्या सफलतेंत मला तसूभरही विश्वास नाहीये. आपण लौकरंच
पुन्हां भेटूं!” आणि तो उठला. त्याच्या बरोबर आलेले लोकं सुद्धां हालले.
“मी पुन्हां इथे येईनंच
कशाला?”
उत्तेजित
होऊन इवानने विचारलं.
स्त्राविन्स्की जणुं ह्याच
प्रश्नाची वाट पाहत होता, तो लगेच पुन्हां बसला आणि म्हणाला, “कारंण, की जसेंच तुम्हीं
चड्डी घालून पोलिस स्टेशनवर जाऊन म्हणाल की तुम्हीं पोंती पिलातला ओळखणा-या
व्यक्तीला भेटला आहांत – ते लगेच तुम्हांला इथे घेऊन येतील, आणि तुम्हीं पुन्हां
ह्याच खोलींत दिसाल.”
“इथे चड्डीचा काय प्रश्न आहे?” त्रस्त होऊन इवानने
इकडे तिकडे बघंत विचारलं.
“मुख्य कारंण तर असेल पोंती
पिलात,
पण
त्याच बरोबर चड्डी सुद्धां, कारंण की हे सरकारी कपडे तर आम्हीं तुमच्या अंगावरून
काढून घेऊं आणि तुम्हांला तुमचे कपडे परत देऊं. तुम्हांला इथे फक्त चड्डींत आणलं
होतं. वरून,
तुम्हांला
तुमच्या फ्लैटमधेपण नाही जायचंय, तरी मी त्याबद्दल विचारलंसुद्धां होतं. मग येते
पिलातची गोष्ट...आणि तुमच्या विरुद्ध बनतं एक भक्कम कारंण!”
आता इवान निकोलायेविचला काही
तरी झालं. त्याची इच्छा शक्ति जणु चूर-चूर झाली. त्याला वाटलं की तो खूप अशक्त
झालांय. त्याला कोणाच्यातरी सल्ल्याची गरंज आहे.
“मग काय करायला हवं?” आता त्याने नम्रतेने
विचारलं.
“आता कसं!” स्त्राविन्स्की
म्हणाला,
“आता
तुम्हीं समजूतदारपणा दाखवतांय! आता मी तुम्हांला सांगेन की तुमच्या बरोबर खरोखर
काय घडलंय. काल कोणीतरी तुम्हांला पोंती पिलातची गोष्ट सांगून खूप घाबरवलं आणि
त्याच भीतिच्या प्रभावाखाली तुम्हीं शहरांत फिरंत होते आणि पोंती पिलातबद्दल सांगत
होते. स्वाभाविक आहे, की तुम्हांला पागल समजण्यांत आलं. आतां तुमच्यासाठी हेंच चांगलं
आहे,
की
तुम्हीं अगदी शांत राहा. म्हणूनंच तुमचं येथे राहणे आवश्यक आहे.”
“पण त्याला पकडणं आवश्यक
आहे!” इवान चिरचिरंत विनती करूं लागला.
“ठीक आहे, पण त्यासाठी
तुम्हींच कां धावपळ करावी? तुम्हीं एका कागदावर ह्या व्यक्तीशी संबंधित सगळे
आरोप आणि संदेह लिहून द्या. ह्याच्यापेक्षां आणखी सोपा दुसरा मार्ग काय असूं शकतो
की तुमच्या ह्या अर्जाला योग्य ठिकाणी पाठवून द्यावे. जर तुम्हीं म्हणतां, तसा तो अपराधी आहे, तर ही भानगड लगेच
संपेल. पण फक्त एक अट आहे ; आपल्या मेंदूवर जोर नका टाकू आणि पोंती पिलातबद्दल
शक्य तितका कमी विचार करा. सांगायला काय कमी गोष्टी आहेत! सगळ्यांवर तर विश्वास
नको ठेवायला.”
“समजलो!” इवान दृढतेने
म्हणाला,
“कृपा
करून मला कागद आणि पेन द्या.”
“कागद आणि छोटी पेन्सिल
द्या...” स्त्राविन्स्कीने लट्ठ महिलेला सांगितलं. पुन्हां इवानला म्हणाला, “पण मी तुम्हांला हा
सल्ला देईन की आज नका लिहूं.”
“नाही, नाही आजंच, कोणत्याही
परिस्थितींत आजंच,” इवान उत्तेजनेने म्हणाला.
“बरं ठीक आहे. फक्त आपल्या
मेंदूवर ताण नका देऊं. आज शक्य नाही होणार, उद्यांच होईल.”
“तो पळून जाईल!”
“ओह, नाही,” स्त्राविन्स्कीने
दृढतेने प्रतिवाद करंत म्हटलं, “तो कुठे नाही जाणार, हा माझा शब्द आहे. आणि
लक्षांत ठेवा,
इथे
तुमची सर्व प्रकारे मदत करतील, जिच्याशिवाय तुमचं कोणतंच काम होणार नाहीये. तुम्हीं
ऐकताय नं?”
एकदम
रहस्यमय आवाजांत स्त्राविन्स्कीने विचारलं आणि इवान निकोलायेविचचे दोन्हीं हात
धरले. त्यांना आपल्या हातांत घेऊन तो एकटक इवानच्या डोळ्यांत बघंत होता आणि म्हणंत
होता,
“इथे
तुमची मदत करतील...तुम्हीं माझा आवाज ऐकतायं?” इथे तुमची मदत करतील...इथे
तुमची मदत करतील...तुम्हांला आराम मिळेल...इथे शांतता आहे... इथे तुमची मदत
करतील...”
इवान निकोलायेविचने
अप्रत्याशितपणे जांभई दिली, त्याच्या चेह-याचे भाव सौम्य व्हायला लागले.
“हो, हो...” तो हळूंच म्हणाला.
“हो, हे छान आहे, सुन्दर!” आपल्या
सवयीनुसार स्त्राविन्स्कीने बोलणं बंद करताना म्हटलं आणि उठला, “गुड बाय!” त्याने
इवानशी हस्तांदोलन केलं आणि बाहेर निघताना दाढीवाल्याकडे वळून म्हणाला, “हो, ऑक्सीजन देऊन
बघा...आणि स्नान.”
काही क्षणानंतर इवानच्यासमोर
स्त्राविन्स्की नव्हता, आणि त्याचे चेलेपण नव्हते. खिडकीच्या जाळीच्या बाहेर, वसन्त ऋतूच्या
दुपारच्या प्रसन्न उन्हांत, नदीच्या दुस-या किना-यावर पाइन वृक्षांच सुंदर जंगल चमकंत
होतं.
********
नऊ
करोव्येवच्या
युक्त्या
निकानोर इवानोविच बसोय, मॉस्कोच्या
सादोवाया स्ट्रीटवर असलेल्या 302 बी नम्बरच्या बिल्डिंगच्या हाउसिंग सोसाइटीचे1
प्रमुख, बुधवार आणि गुरूवारच्यामधल्या
रात्री खूप उद्विग्न होते आणि अनेक भानगडींमधे अडकले होते. ही तीच बिल्डिंग आहे,
जिथे
स्वर्गीय बेर्लिओज़ राहत होता.
तुम्हांला आठवतंच असेल,
की
मध्यरात्रीच्या सुमारास एक कमिटी, ज्यांत
झेल्दीबिन होता, त्या बिल्डिंगमधे आली. निकानोर
इवानोविचला बोलावून बेर्लिओज़च्या मृत्युची सूचना दिली आणि त्याच्याबरोबर 50
नम्बरच्या फ्लैटमधे गेले.
तिथे मृत व्यक्तीच्या वस्तू
आणि त्याची हस्तलिखितं सील केली. ह्या वेळेस तिथे काम करणारी मुलगी ग्रून्या नव्हती,
आणि
छिचोर स्तिपान बग्दानोविचसुद्धां नव्हता. कमिटीने निकानोर इवानोविचला सांगितलं की
मृत व्यक्तीची हस्तलिखितं ते तपासासाठी नेताहेत; त्याचं
घर म्हणजे तीन खोल्या (ज्यांत जवाहि-याच्या बायकोचं स्टडी रूम,
ड्राइंग
रूम आणि डाइनिंग रूम होतं) हाउसिंग सोसाइटीच्या ताब्यांत राहतील,
आणि
मृत व्यक्तीच्या वस्तू, त्याच्या
जवळच्या नातेवाइकांचा पत्ता लागेपर्यंत, ह्याच
बिल्डिंगमधे सुरक्षितपणे ठेवल्या जातील.
बेर्लिओज़च्या मृत्युची बातमी
पूर्ण बिल्डिंगमधे अद्भुत गतिने पसरली. गुरुवारी सकाळी सात वाजेपासूनंच बसोयच्या
टेलिफोनची घंटी सारखी वाजूं लागली. लोकं स्वतः अर्ज घेऊन येऊं लागले,
हे
सिद्ध करण्यासाठी की मृतकाच्या राहत्या घरावर त्यांचाच हक्क आहे. दोन तासांत
निकानोर इवानोविचकडे असे 32 अर्ज आले.
ह्या अर्जांमधे काय नव्हतं
लिहिलं : विनंती होती, धमकी होती, अटी
होत्या, आमिष होतं, स्वतःच्या
खर्चाने डागडुजी करण्याबद्दल लिहिलं होतं, जागा
कमी पडंत असल्याचं रडगाणं होतं आणि दरोडेखोरांसोबत एकाच घरांत राहण्याच्या
अशक्यतेबद्दल लिहिले होते. ह्या अर्जांमधे डोळ्यांत पाणी आणणारं वर्णन होतं :
कोटाच्या खिशांतून पैसे गायब व्हायचं फ्लैट नं 31मधे, फ्लैट
न मिळाल्यास दोन माणसांचा आत्महत्या करण्याचा निश्चय आणि एक अवैध गर्भ असल्याची
स्वीकृतिपण होती.
निकानोर इवानोविचला त्याच्या
फ्लैटच्या प्रवेश कक्षांत बोलावण्यांत आलं, त्याची
बाही पकडून कुजबुजंत, डोळे
मिचकावंत वचन देण्यांत आलं, की त्याला
आपल्या विभिन्न कर्जांमधून मुक्ती मिळेल.
हा मानसिक छळ जवंळ जवंळ
दुपारी एक वाजेपर्यंत चालला होता, जोपर्यंत
निकानोर इवानोविच आपला फ्लैट सोडून हाउसिंग सोसाइटीच्या ऑफ़िसमधे पळून गेला. पण
जेव्हां त्याने पाहिलं की इथे सुद्धां लोकं त्याची वाट बघताहेत,
तेव्हां
तो तिथूनसुद्धां पळून गेला; कसांतरी
पिच्छा पुरवणा-या लोकांपासून लपंत-छपंत, जे सिमेन्टच्या
अंगणांत त्याचा पाठलाग करंत होते, तो सहाव्या
प्रवेश द्वारांत लपला आणि लिफ्टने पाचव्या मजल्यावर पोहोचला,
जिथे
हा शापित फ्लैट नं. 50 होता.
थोडा श्वास घेऊन,
घामाने
डबडबलेल्या निकानोर इवानोविचने फ्लैटची घंटी वाजवली, पण
कुणींच दार उघडलं नाही. त्याने पुन्हां-पुन्हां घण्टी वाजवली आणि रागांत बडबडायला
सुरुवात केली. तरीही कोणीच दार नाही उघडलं. निकानोर इवानोविचचा धीर सुटंत होता.
त्याने
आपल्या खिशांतून डुप्लिकेट चाव्यांचा गुच्छा काढला आणि आधिकारिक भावाने दार उघडून
आंत गेला.
“ऐ, काम
वाली!” अंधा-या कॉरीडोरमधे निकानोर इवानोविच ओरडला, “काय
नाव आहे? ग्रून्या? तू
नाहीये कां?”
कोणीच उत्तर दिलं नाही.
तेव्हां निकानोर इवानोविचने
स्टडी रूमच्या दाराची सील तोडली, आपल्या ब्रीफकेसमधून
एक छोटाशी फोल्डिंग फुटपट्टी काढली आणि स्टडी रूममधे घुसला.
घुसायला तर तो घुसून गेला,
पण
दारावरंच विस्फारलेल्या डोळ्यांनी उभाच राहिला, आणि
वरून थरथरूंसुद्धां लागला.
मृतकाच्या लिहिण्याच्या टेबलाशी
एक अनोळखी माणूस बसला होता, चौकटीचा
कोट घातलेला एक लम्बू, त्याने जॉकी सारखी टोपी घातली होती
आणि दोरीचा चष्मा लावला होता...हो, एका
शब्दांत, तोच.
“तुम्हीं कोण आहांत,
श्रीमान?”
निकानोर
इवानोविचने घाबरंत विचारलं.
“ब्बा! निकानोर इवानोविच...”
अकस्मात् प्रकट झालेला नागरिक चिरक्या आवाजांत ओरडला आणि त्याने उत्साहाने अचानक
प्रमुखाशी हस्तांदोलन केलं, ह्या
स्वागताने निकानोर इवानोविच जरापण खूश नाही झाला.
“माफ करा,”
तो
साशंकतेने म्हणाला, “तुम्हीं कोण?
तुम्हीं
कोणी शासकीय अधिकारी आहांत कां?”
“ओफ, निकानोर
इवानोविच!” अनोळखी माणूस हसंत उद्गारला, “शासकीय आणि
अशासकीय काय असतं? हे तर ह्या गोष्टीवर अवलम्बून आहे,
की
तुम्हीं एखाद्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघतांय; हे
परिस्थितिजन्य आणि ब-यांच अटींवर अवलम्बून आहे. आज मी एक अशासकीय अधिकारी आहे,
आणि
उद्या, शासकीय! ह्याच्या उलंटसुद्धां असूं
शकतं, निकानोर इवानोविच,
आणि
काय-काय नाहीं होऊं शकंत!”
ह्या तर्काने हाउसिंग
सोसाइटीच्या प्रमुखाचं जरासुद्धा समाधान नाही झालं. मुळांत शंकेखोर असल्यामुळे
त्याने अंदाज लावला की त्याच्यासमोर बडबड करंत उभा असलेला हा माणूस नक्कीच अशासकीय असला पाहिजे आणि त्याचबरोबर
रिकामटेकडा आणि बढाईखोर सुद्धां आहे.
“तुम्हीं आहांत कोण?
तुमचं
आडनाव काय आहे?” प्रमुखाने गंभीर होत विचारलं आणि तो
अनोळखी माणसाजवळ जाऊ लागला.
“माझं आडनाव...” प्रमुखाच्या
गंभीरतेने जराही न घाबरतां तो नागरिक म्हणाला, “समजा,
करोव्येव.
तुम्हीं काही खाणार कां, निकानोर इवानोविच?
अगदी
नि:संकोच! हँ?”
“माफ करा,”
काहीशा
अभद्रतेने निकानोर इवानोविच उत्तरला, “इथे खाण्यांची
काय गरंज आहे! (हे स्वीकार करावंच लागेल, जरी चांगलं
वाटंत नसलं तरी, की निकानोर इवानोविच स्वभावाने
काहीसा उद्धट होता.) मृतकाच्या अर्ध्या भागाला गिळंकृत करण्याची परवानगी नाहीये!
तुम्हीं इथे काय करतांय?”
“तुम्ही बसा तर खरं,
निकानोर
इवानोविच, बिल्कुल घाबरूं नका...” तो नागरिक जराही
न घाबरतां डरकाळला आणि त्याने प्रमुखाकडे खुर्ची सरकावली.
निकानोर इवानोविच रागाने लाल
झाला, त्याने खुर्ची ढकलून दिली आणि
जो-याने विचारलं, “तुम्हीं आहांत कोण?”
“मी, जसं
तुम्हीं बघतांय, ह्या फ्लैटमधे राहायला आलेल्या खास
परदेशी पाहुण्याचा दुभाष्या आहे,” स्वतःला
करोव्येव म्हणवणा-या त्या व्यक्तीने आपला परिचय दिला आणि घाणेरड्या जोड्याच्या
टाचेने टक्-टक् करूं लागला.
निकानोर इवानोविचने तोंड उघडलं.
ह्या फ्लैटमधे एखाद्या परदेशी माणसाचं असणं, तेसुद्धां
दुभाष्याबरोबर, त्याच्यासाठी विचित्र होतं,
म्हणून
त्याने आणखी स्पष्टीकरण मागितलं.
दुभाष्याने आनंदाने सांगितलं
की परदेशी कलाकार मिस्टर वोलान्दला वेराइटी थियेटरचे डाइरेक्टर स्तिपान बग्दानोविच
लिखादेयेवने त्यांच्या ह्या परदेशी दौ-याच्या दरम्यान, जो
सुमारे एका आठवड्याचा आहे, ह्याचं
फ्लैटमधे राहण्याचं आमंत्रण दिलंय. ह्याबद्दल त्याने कालंच निकानोर इवानोविचला
पत्र लिहून परदेशी पाहुण्याला एका आठवड्यासाठी राहायची परवानगी देण्याची विनंती
केली होती, कारण स्वतः लिखादेयेव याल्टाला
जाणार होते.
“त्याने मला काहीही लिहिलेलं
नाहीये,” प्रमुख विस्मयाने म्हणाला.
“तुम्हीं आपल्या ब्रीफकेसमधे
जरा बघां तरी, निकानोर इवानोविच,”
करोव्येवने
गोड आवाजांत म्हटले.
निकानोर इवानोविचने खांदे
उचकावले, ब्रीफकेस उघडली आणि त्याला
लिखादेयेवचं पत्र मिळालं.
“ह्याचाबद्दल मी विसरलो कसां?”
विस्फ़ारलेल्या
डोळ्यांनी त्या लिफाफ्याकडे बघंत निकानोर इवानोविच बडबडला.
“होतं,
होतं,
निकानोर
इवानोविच,” करोव्येव फाटक्या आवाजांत ओरडला,
“विसरभोळेपणा, विसरभोळेपणा
आणि थकवा आणि वाढलेलं ब्लड प्रेशर, माझ्या
प्रिय मित्रा, निकानोर इवानोविच! मी पण भयंकर
विसराळू आहे. दारूच्या एका पैगसोबंत मी तुम्हांला माझ्या जीवनाच्या काही घटना
सांगेन, तर तुम्हीं हसता-हसता लोट पोट होऊन जाल!”
“लिखादेयेव याल्टाला केव्हां
जाणार आहे?”
“ते तर निघून गेले,
निघून
गेले!” दुभाष्या ओरडला, “ते कारमधे
भटकंत असतील! सैतानंच जाणे की ते कुठे आहेत.” आणि दुभाष्याने एक हात असा हलवला,
जणु
पवनचक्कीचा पंख आहे.
निकानोर इवानोविचने म्हटलं,
“त्या परदेशी पाहुण्याला माझं स्वतः भेटणं फार जरूरी आहे.”
दुभाष्याने चक्क नाही म्हटलं,
“हे अशक्य आहे. तो कामांत आहे, बोक्याला
कपडे घालतोय.”
“तुम्हांला वाटलं तर
बोक्याला दाखवूं शकतो,” करोव्येवने प्रस्ताव ठेवला.
आतां निकानोर इवानोविचने
नाही म्हटलं, तेव्हां दुभाष्याने प्रमुखासमोर एक
झणझणीत प्रस्ताव मांडला, “असं आहे,
की वोलान्द महाशय कोणत्याही परिस्थितींत हॉटेलमधे राहणार नाहीयेत,
आणि त्यांना मोठ्या जागेंत राहायची सवय आहे, तर
प्रमुख त्यांना एका आठवड्यासाठी, म्हणजे
त्यांचा मॉस्कोचा कार्यक्रम आटोपेपर्यंत, हा
सम्पूर्ण फ्लैट वापरण्याची, म्हणजेच
मृत व्यक्तीच्या खोल्यांचा उपयोग करण्याची परवानगी देतील कां?
मृतकाला
तर ह्याने काही फरक नाही पडणार.” शिट्टीसारख्या आवाजांत करोव्येव पुटपुटला,
“हे तर तुम्हांलापण पटेलंच, निकानोर
इवानोविच, त्याला फ्लैटची काही गरज नाहीये नं?”
निकानोर इवानोविचने क्षीण
प्रतिकार करंत म्हटलं की परदेशी लोकांना ‘मेट्रोपोल’मधे
राहावं लागतं, न की कोणाच्या खाजगी फ्लैटमधे...”
“मी स्वतःच सांगतोय नं,
की
तो चक्रम आहे... सैतानंच जाणे तो कोण आहे?” करोव्येव
फुसफुस करंत म्हणाला, “पण त्याला नकोय! त्याला हॉटेल
आवडतंच नाही! इथे बसतांत हे परदेशी!” करोव्येवने आपल्या मानेवर बोट खुपसंत मोठ्या
आत्मीयतेने म्हटलं, “विश्वास ठेवा,
प्राण
खाऊन टाकतांत! येतांत...आणि हेरगिरीसाठी तरी येतांत, डाकिणीच्या
औलादासारखे , किंवा आपल्या नख-यांनी डोकं खाऊन
टाकतांत : हे आवडंत नाही, ते आवडंत
नाही!...आणि तुम्हांला तर निकानोर खूपंच फायदा आहे. पैशांच्या बाबतींत तो
पुढे-मागे नाही बघणार,” करोव्येवने डोळ्यांच्या कोप-यांतून
इकडे-तिकडे बघंत म्हटलं आणि मग प्रमुखाच्या कानांत कुजबुजला,
“करोडपति आहे!”
दुभाष्याच्या प्रस्तावांत एक
व्यावहारिक अर्थ लपलेला होता. प्रस्ताव बरांच भारी होता, पण
दुभाष्याच्या सांगण्याची लकब तेवढी भारी नव्हती; काही
तरी संदेहास्पद होतं त्याचा बोलण्याच्या लकबींत, त्याचा
कपड्यांमधे, त्याच्या त्या दयनीय चष्म्यांत.
ह्यासगळ्यामुळे प्रमुखाच्या मानगुटीवर जणु एक अज्ञात भीति बसली होती;
पण
तरीही त्याने हा प्रस्ताव स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. ह्यासाठी कारण हे होतं,
की
ही सोसाइटी तोट्यांत चालली होती. हिवाळ्याच्या आधी घरांना गरम ठेवण्यासाठी पेट्रोल
विकंत घेणं आवश्यक होतं. त्याकरितां काय-काय करावं लागेल, माहीत
नाही. परदेश्याच्या पैश्यांने हे काम सहजा-सहजी होऊन जाईल आणि बरंच काही शिल्लकपण
उरेल. पण चतुर आणि सावधगिरी बाळगणा-या निकानोर इवानोविचने म्हटलं,
की
आधी त्याला ह्याबाबत इनटूरिस्ट-ब्यूरोंत विचारावं लागेल.
“मी समजूं शकतो,”
करोव्येव
खिदळला, “न विचारतां कसं?
विचारावंच
लागेल, हा राहिला टेलिफोन,
निकानोर
इवानोविच, पट्कन बोलून घ्या! पैशांची काळजी
नका करूं,” तो प्रमुखाला प्रवेश कक्षांत
ठेवलेल्या टेलिफोनकडे नेत कुजबुजला, “त्याच्याकडून
नाही तर कुणाकडून घेणार! जर तुम्हीं बघितलं असतं, की
नीत्सेमधे त्याचा कित्ती शानदार बंगला आहे! पुढच्या उन्हांळ्यांत,
जेव्हां
तुम्हीं परदेश दौ-यावर जालं, तर नक्कीच
जा बघायला – चकितंच व्हाल!”
इनटूरिस्ट ब्यूरोचं काम
फोनवरंच अप्रत्याशितपणे आणि प्रमुखाला हैराण करणा-या शीघ्रतेने झालं. असं कळलं,
की
त्यांना आधीपासूनंच माहिती आहे, की वोलान्द
महाशय लिखादेयेवच्या फ्लैटमधे राहणं पसंत करतील आणि त्यांना काहीच आपत्ति नाहीये.
“सुंदर,
अति
सुंदर!” करोव्येव आनंदाने ओरडला.
त्याच्या ह्या प्रसन्नतेने
थोडं घाबरून प्रमुख म्हणाला, की हाउसिंग
सोसाइटी एका आठवड्यासाठी फ्लैट नं. 50 कलाकार वोलान्दला भाड्याने द्यायला तयार
आहे. भाडं राहील...निकानोर इवानोविचने थोडा विचार करून म्हटलं,
“एका दिवसाचे 500 रूबल्स.”
आता करोव्येवने प्रमुखाला
पूर्णपणे चित करून टाकलं. चोरा सारखा डोळा मारंत त्याने बेडरूमकडे बघितलं,
जिथून
लट्ठ बोक्याच्या हल्क्या पावलांचा आवाज़ येत होता, तो
शिट्टी सारख्या आवाजांत म्हणाला, “म्हणजे,
एका
आठवड्यासाठी – 3500 रूबल्स?”
निकानोर इवानोविचला वाटलं,
की
आता तो म्हणेल, “कित्ती हावरे आहांत तुम्हीं,
निकानोर
इवानोविच!” पण करोव्येव एकदम वेगळंच बोलला, “ही
पण काही रक्कम आहे! पाच मागा, तो देईल.”
विस्मित,
स्तब्ध
निकानोर इवानोविचला कळलंच नाही, की तो कसा
मृतकाच्या टेबलाजवळ गेला, जिथे
करोव्येवने पट्कन् आणि अगदी सहजपणे ह्या अनुबंधाच्या दोन प्रती तयार केल्या. मग,
जणु
तो हवेंत तरंगत त्यांना घेऊन बेडरूममधे गेला आणि परत आला; दोन्हीं
प्रतींवर परदेशी कलाकाराची सही होती. प्रमुखानेपण अनुबंधावर हस्ताक्षर केलं.
करोव्येवने पावती मागितली पाच...
“मोठ्या अक्षरांत,
मोठ्या
अक्षरांत, निकानोर इवानोविच...हजार रूबल्स...”
आणि तो खूप विनोदशीरपणे म्हणाला, “एक,
दोन,
तीन...”
आणि त्याने को-या करकरीत नोटांच्या पाच गड्ड्या प्रमुखाकडे सरकावल्या.
करोव्येवच्या चुटक्या आणि
ताशे-यांबरोबर नोटांची मोजणी झाली, जसं : ‘नोटांना
मोजणं आवडतं’, ‘आपली नजर – खरं माप’
वगैरे.
पैसे मोजल्यावर प्रमुखाने
आपल्या कागदपत्रांमधे नमूद करण्यासाठी परदेशी कलाकाराचं पासपोर्ट घेतलं,
मग
पासपोर्ट, पैसे आणि अनुबंध ब्रीफकेसमधे
ठेवल्यावर तो थोडावेळ तिथेच घुटमळला आणि लाजंत लाजंत काही टिकिटं मागूं लागला...
“काय कमाल आहे!” करोव्येव
किंचाळला, “तुम्हांला किती टिकिटं पाहिजेत,
निकानोर
इवानोविच, बारा, पंधरा?”
विस्मित प्रमुखाने स्पष्ट
केलं, की त्याला फक्त दोनंच टिकिटं
पाहिजेत, एक स्वतःसाठी आणि दुसरं आपल्या
बायकोसाठी – पेलागेया अंतोनोव्नासाठी.
करोव्येवने लगेच एक नोटबुक
काढलं आणि एका कागदावर पहिल्या रांगेत दोन माणसांसाठी एक चिट्ठी लिहून दिली. तो
कागद दुभाष्याने उजव्या हाताने, हळूंच निकानोर
इवानोविचच्या हातांत खुपसला आणि डाव्या हाताने प्रमुखाच्या दुस-या हातांत करकरीत
नोटांचं जाडजूड बण्डल ठेवलं. त्या बण्डलवर नजर पडतांच निकानोर इवानोविच लाल झाला
आणि त्याला आपल्यापासून दूर सारू लागला.
“असं नसतं,”
तो
बडबडला.
“मला काही ऐकायचं नाहीये,”
करोव्येव
अगदी त्याच्या कानांत कुजबुजला, “आमच्याकडे
नसतं, परदेशांत असतं. तुम्हीं त्याच्या
अपमान करतांय, निकानोर इवानोविच,
हे
चांगलं नाहीये. तुम्हीं काम केलंय...”
“खूप कडक तपासणी आणि कठोर
शिक्षा होईल,” प्रमुख हळूंच म्हणाला आणि त्याने आपल्या
डोळ्याच्या कोप-यांतून इकडे-तिकडे बघितलं.
“आणि प्रत्यक्षदर्शी कुठे
आहेत?” करोव्येव दुस-या कानांत कुजबुजला,
“मी तुम्हांला विचारतोय, कुठांय ते?
तुम्हीं
पण काहीतरीच बोलता!”
आणि मग,
जसं
नंतर प्रमुखाने स्पष्ट केलं, एक
आश्चर्यकारक घटना घडली. नोटांच हे बण्डल स्वतःच त्याच्या ब्रीफकेसमधे घुसलं.
त्याच्यानंतर थोडा अशक्त, थोडा
पांगुळल्यासारखा असा निकानोर इवानोविच पाय-यांवर आला. त्याच्या डोक्यांत विचारांच
काहूर माजलं होतं. तिथे नीत्सेतला बंगला फिरंत होता, आणि
एक प्रशिक्षित बोका, आणि हा विचारसुद्धां की
प्रत्यक्षदर्शी खरंच नव्हते, आणि हे पण
की टिकिटं बघून पेलागेया अंतोनोव्नाला खूप आनंद होईल. हे सगळे विखुरलेले,
पण
आनंद देणारे विचार होते. पण तरीही त्याच्या मनांत खोलवर कुठेतरी जणु एक सुई गडंत
होती. ही काळजीची पीडा होती. त्याबरोबरंच, तिथेंच
पाय-यांवरंच प्रमुखाला ह्या विचाराने झोडंपलं, की
तो दुभाष्या स्टडीरूम मधे कसा घुसला, जेव्हां की
दार सीलबंद होतं! आणि त्याने, निकानोर
इवानोविचने, ह्याबद्दल त्याला कां नाहीं
विचारलं? थोडा वेळ तो पाय-यांकडे साण्डासारखा
बघंत राहिला, पण मग त्याने ह्या विचाराला
डोक्यातूंन काढून टाकायचं ठरवलं आणि निश्चय केला की फालतूच्या विचारांनी स्वतःला
विचलित होऊं देणार नाही...
जसांच प्रमुख फ्लैटबाहेर
पडला, बेडरूममधून एक जाडा आवाज आला,
“मला हा निकानोर इवानोविच आवडला नाही. तो हावरंट आणि बेइमान आहे. असं
होऊं शकेल कां, की तो पुन्हां येथे नाही येणार?”
“महाशय,
तुम्हीं
हुकूम करा!” कुठून तरी करोव्येवने उत्तर दिलं, पण
थरथरत्या, बेसु-या आवाजांत नाही,
तर
स्पष्ट खणखणीत आवाजांत.
आणि लगेच त्या पापी दुभाष्याने
प्रवेश कक्षांत येऊन टेलिफोनवर काही नम्बर फिरवून,
काय माहीत कशाला, रहस्यमय आवाजांत म्हटलं,
“हैलो! तुम्हांला हे सांगणं माझं कर्तव्य आहे,
की
सादोवाया स्ट्रीटच्या 302 नंबरच्या बिल्डिंगच्या हाउसिंग सोसाइटीचा प्रमुख बसोय परकीय
मुद्रेत2 लाच घेतो. ह्या क्षणी त्याच्या 35 नंबरच्या फ्लैटच्या
शौचालयाच्या वेन्टिलेटरमधे वर्तमान पत्रांत गुण्डाळलेले चारशे डॉलर्स आहेत. मी
ह्याच बिल्डिंगमधे अकरा नंबरच्या फ्लैटमधे राहणारा तिमोफेई क्वास्त्सोव बोलतोय. पण
माझी विनंती आहे, की माझं नाव गुप्तंच राहू द्यावं.
मला भीति आहे, की प्रमुख माझा सूड घेईल.
आणि त्या दुरात्म्याने
टेलिफोनचं रिसीवर लटकवून दिलं.
फ्लैट नं. 50मधे आणखी काय
झालं, हे तर माहीत नाही,
हो,
हे
मात्र माहीत आहे, की निकानोर इवानोविचच्या घरी काय
झालं. घरी पोहोचल्याबरोबर त्याने स्वतःला शौचालयांत बंद करून घेतलं आणि
ब्रीफकेसमधून ते नोटांच बण्डल काढलं, जे
दुभाष्याने त्याच्या हातांत ठेवलं होतं. त्याने पुन्हां एकदा मोजून खात्री करून
घेतली, की बण्डलमधे चारशे रूबल्सच आहेत. हे
बण्डल वर्तमान पत्रांत गुण्डाळून त्याला वेन्टिलेटरवर ठेऊन दिलं.
पाच मिनिटानंतर प्रमुख
आपल्या छोट्याश्या डाइनिंगरूमच्या टेबलाशी बसला होता. बायकोने किचनमधून व्यवस्थित
कापलेली हेरिंग आणली, जिला हिरव्या कांद्याने सजवलं होतं.
निकानोर इवानोविच एक छोटा पैग बनवून प्यायला, दुसरा
बनवला, प्यायला. फोर्कवर हेरिंगचे तीन
तुकडे लावले...तेवढ्यांत घण्टी वाजली आणि पेलागेया अन्तोनोव्नाने वाफ निघंत असलेलं
एक भांडं टेबलवर ठेवलं, ज्याला
बघताक्षणीच कळंत होतं की ह्या दाट सूपच्या भांड्यात ते आहे,
ज्याच्यापेक्षा
जास्त स्वादिष्ट जगांत सम्पूर्ण जगांत काहीच नाहीये – मैरो बोन!
लाळ गिळंत निकानोर इवानोविच कुत्र्यासारखा
ओरडला, “चुलींत जा! खाऊंसुद्धां नाही
देत...कोणालाच घुसू नको देऊ...मी घरी नाहीये, बिल्कुल
नाहीये! फ्लैटबद्दल विचारलं तर सांग की काळजी करूं नका, एका
आठवड्यानंतर मीटिंग होईल...”
बायको प्रवेशद्वाराकडे धावली
आणि निकानोर इवानोविचने वाफ निघंत असलेल्या भांड्यांतून चमचाने तिला काढलं,
लांबीत
चटकलेल्या मैरो बोनला. त्याच क्षणी डाइनिंग रूममधे दोन नागरिक घुसले,
आणि
त्यांच्याबरोबर माहीत नाही कां चेहरा पिवळा पडलेली पेलागेया अन्तोनोव्ना. त्या
नागरिकांना बघतांच निकानोर इवानोविचसुद्धां पांढरा फ़टक पडला आणि उठून उभा राहिला.
“शौचालय कुठे?”
पहिल्या
नागरिकाने विचारलं, ज्याने पांढ-या रंगाचं जैकेट घातलं होतं.
डाइनिंग टेबलावर काहीतरी
वाजलं (हा निकानोर इवानोविचच्या हातांतून सुटलेल्या चमच्याचा आवाज होता).
“इकडे,
इकडे,”
पेलागेया
अन्तोनोव्ना पट्कन् म्हणाली.
आगंतुक लगेच कॉरीडोरकडे
गेले.
“झालं काय आहे?”
निकानोर
इवानोविचने आगंतुकांच्या मागे मागे येत विचारलं, “आमच्या
फ्लैटमधे काहीही आपत्तिजनक नाहीये...तुमचे आयडेन्टिटी कार्ड्स?
माफ़
करा...”
पहिल्या आगंतुकाने
चालता-चालता निकानोर इवानोविचला आपलं आयडेन्टिटी कार्ड दाखवलं आणि दुसरा त्याच
क्षणी शौचालयांत कमोडवर उभा राहून आपला हात वेन्टिलेटरमधे घालताना दिसला. निकानोर
इवानोविचच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. वर्तमान पत्राचा कागद दूर सरकवला गेला,
पण
बण्डलमधे रूबल्स नसून काही अनोळखी नोट होते, निळे-निळे,
हिरवे-हिरवे,
ज्यांच्यावर
एका म्हाता-याचं चित्र होतं. पण निकानोर इवानोविचला सगळं अस्पष्टंच दिसंत होतं,
त्याच्या
डोळ्यांसमोर काही गोल-गोल चट्टे तरंगत होते.
“वेन्टिलेटरमधे डॉलर्स आहेत,”
पहिल्याने
विचारमग्न होऊन म्हटलं आणि अत्यंत हळुवारपणे आणि प्रेमाने निकानोर इवानोविचला
विचारलं, “हे पैकेट तुमचं आहे?”
“नाही!” निकानोर इवानोविच
घाबरला, “शत्रूंनी फेकलं असेल!”
“होतं,”
पहिल्याने
सहमति दर्शवत मान हालवली, आणि
पुन्हां हळुवारपणेच पुढे म्हणाला, “तरीही
बाकीचे तर द्यावेंच लागतील.”
“माझ्याकडे नाहीयेत!
देवाशप्पथ नाहीये, मी कधीही त्यांना हातांत सुद्धां
नाही धरलं!” प्रमुख वैतागून ओरडला.
तो टेबलवर वाकला,
खडखड
करंत त्याचं ड्रावर काधलं, आणि
त्यांतून ब्रीफकेस काढून काहीतरी असंबद्ध असं बडबडंत राहिला,
“हे बघा, अनुबन्ध...तो
सापाचं पिल्लू, दुभाष्या,
फेकून गेलाय…करोव्येव...चष्मा घातलांय!”
त्याने ब्रीफकेस उघडली,
त्यांत
बघितलं, हात टाकला आणि...त्याच्या चेहरा
काळा ठिक्कर पडला आणि त्याने ब्रीफकेस सूपमधे फेकून दिली. ब्रीफकेसमधे काहीही
नव्हतं : स्तिपानचं पत्र नव्हतं, अनुबंध
नव्हतं, परदेशी कलाकाराचं पासपोर्ट नव्हतं,
पैसे
नव्हते, थियेटरचे टिकिटंसुद्धां
नव्हते...काहीच नाही, फक्त ब्रीफकेसच्या आत लागलेलं कापडाचं
अस्तर होतं.
“कॉम्रेड्स!” प्रमुख
अनैसर्गिक आवाजांत ओरडला, “त्यांना
पकडा! आमच्या बिल्डिंगमधे सैतानी ताकत घुसलीय!”
पण तेवढ्यांत पेलागेया अन्तोनोव्नाला
न जाणे काय झालं, कारण ती हात हलवंत ओरडायला लागली,
“कबूल करून घे इवानोविच! तुझ्यासाठी चांगलं होईल!”
निकानोर इवानोविचच्या
डोळ्यांत रक्त उतरलं. तो बायकोच्या डोक्यावर मूठ उगारंत भसाड्या आवाजांत ओरडला,
“ओफ, मूर्ख, पापीण!”
आता तो हवालदील होऊन
खुर्चीवर पडला. स्पष्टंच होतं की त्याने नियतीसमोर हार पत्करली होती.
ह्याच वेळी प्रमुखाच्या
फ्लैटच्या किल्लीच्या भोकाला कधी डोळा, तर कधी
कान लावून तिमोफेइ कन्द्रात्येविच क्वास्त्सोव उत्सुकतेने चिटकून उभा होता.
पाचंच मिनिटांत अंगणांत
उभ्या असलेल्या त्या बिल्डिंगमधे राहणा-यांनी बघितलं की हाउसिंग सोसाइटी प्रमुख
दोन माणसांबरोबर निघून बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होता. सगळ्यांनी
बघितलं की निकानोर इवानोविचकडे लपवण्यासाठी तोंडंच नव्हतं; तो
घसटंत चालला होता, दारुड्यासारखा,
आणि
काहीतरी बडबडंत होता.
ह्याच्या एक तासानंतर तो
अनोळखी परदेशी पाहुणा फ्लैट नं. अकरामधे प्रकट झाला, अगदी
तेव्हांच, जेव्हां तिमोफेइ कन्द्रात्येविच
दुस-या लोकांना चघळून-चघळून सांगंत होता, की
प्रमुखाला कसं पकडलं. अनोळखी माणसाने बोटाने तिमोफेइ कन्द्रात्येविचला किचनमधून
प्रवेश कक्षांत बोलावलं. त्याला काहीतरी सांगितलं आणि त्याच्याचबरोबर कुठेतरी गायब
झाला.
*******
दहा
याल्टाच्या बातम्या
जेव्हां
निकानोर इवानोविचच्या घरी ही दुर्दैवी घटना घडंत होती, अगदी तेव्हांच बिल्डिंग
नंबर 302 पासून थोड्यांच अंतरावर,
त्यांच सादोवाया स्ट्रीटवर असलेल्या
वेराइटी थियेटरच्या फिनडाइरेक्टर रीम्स्कीच्या कैबिनमधे दोन माणसं होते : स्वतः
रीम्स्की आणि वेराइटीचा एडमिनिस्ट्रेटर वारेनूखा1 .
थियेटरच्या
दुस-या मजल्यावर असलेल्या ह्या मोट्ठ्या कैबिनच्या दोन खिडक्या सादोवाया स्ट्रीटवर
उघडायच्या, आणि एक,
जी फिनडाइरेक्टरच्या पाठीमागे होती, वेराइटीच्या वसन्तोद्यानांत उघडंत होती, जिथे शीतल
रेस्टॉरेन्ट्स, शूटिंग गैलरी आणि थियटरचा खुला मंच होता. कैबिनमधे
लिहिण्याच्या मोठ्या टेबलासमोर भिंतीवर टांगलेल्या जुन्या पोस्टर्सचा मोठा ढीग
होता, एका छोट्या टेबलवर पाण्याचा जग ठेवलेला होता, चार खुर्च्या पडल्या होत्या आणि एका कोप-यांत एका जुन्या ‘शो’च धुळीने माखलेलं मॉडल सुद्धा होतं. आणि स्पष्टंच आहे
की ह्या व्यतिरिक्त कैबिनमधे एक घाणेरडा, रंग उडालेला, अज्वलनशील छोटा-सा कैश बॉक्सपण होता – रीम्स्कीच्या डावीकडे, टेबलाच्या बाजूला.
टेबलाशी
बसलेला रीम्स्की सकाळ पासूनंच रागांत होता, तर, ह्याच्या उलंट वारेनूखा खूप प्रसन्न आणि उत्साही दिसंत होता. बस, फक्त त्याच्या ऊर्जेच्या,
प्रसन्नतेच्या सदुपयोगाचा सध्यां काही
मार्ग दिसंत नव्हता.
आतां
वारेनूखा फुकट टिकिटं मागणा-यांपासून लपून फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे बसला होता.
हे फुकटे त्याचं जगणं कठिण करून टाकायचे, विशेषकरून नवा
प्रोग्राम व्हायच्या सुमारास. आज,
संयोगाने, असांच दिवस होता.
जशींच
टेलिफोनची घण्टी वाजली,
वारेनूखाने रिसीवर उचलला आणि खोटं
बोलायला लागला, “कोणाला बालावूं? वारेनूखाला? तो नाहीये, थियेटरच्या बाहेर गेलाय.”
“तू
एकदां पुन्हां लिखादेयेवला फोन करं,
प्लीज़,” रीम्स्कीने त्रासून
म्हटलं.
“तो
घरी नाहीये. मी आधीच कार्पोवला पाठवलं होतं. फ्लैटमधे कोणीच नाहीये.”
“सैतानंच
जाणे काय भानगड आहे,”
रीम्स्की केल्कुलेटरकडे बघंत म्हणाला.
दार
उघडलं आणि एका पोराने इतक्यातंच छापलेल्या जाहिरातींच मोट्ठं बण्डल खेचंत आंत
आणलं. हिरव्या कागदावर मोठ्या-मोठ्या लाल-लाल अक्षरांमधे छापलं होतं:
पहा,
आज आणि
दररोज
वेराइटींत
अतिरिक्त शो,
प्रोफेसर
वोलान्द
काळ्या जादूचे
प्रयोग
आणि
त्याचे
सम्पूर्ण रहस्योद्घाटन!
वारेनूखाने प्रसन्नतेने थोडं
दूर सरकून मॉडेलवर टाकलेले हे पोस्टर्स बघितले आणि पोराला लगेच सगळे पोस्टर्स
चारीकडे लावण्याचा हुकूम दिला.
“खूप
सुन्दर आहे, डोळ्यांत भरतंय,” वारेनूखा पोरगा निघून
गेल्यावर म्हणाला.
“आणि
मला हा विचार बिल्कुल नाही आवडला!” शिंगाची फ्रेम असलेल्या आपल्या चष्म्यांतून खाऊ
की गिळू दृष्टीने पोस्टर्सकडे बघंत रीम्स्की म्हणाला, “मला तर आश्चर्य
वाटतंय की त्याला ह्या ‘शो’ची परवानगी मिळाली कशी!”
“नाही, ग्रिगोरी दानिलोविच,
असं नका म्हणूं; ही एक विचारपूर्वक केलेली चाल आहे. सगळं रहस्यतर ह्या रहस्योद्घाटनांत आहे.”
“माहीत
नाही, काहींच माहीत नाही; काही बिंग-विंग नाहीये, आणि तो नेहमी असलेंच अफलातून विचार मांडत असतो. कमीतकमी, त्याने ह्या जादुगाराला एकदां दाखवलं तरी असतं! कमीतकमी तू तरी त्याला
बघितलं असतं? हे सगळं तो कुठे शिकलाय, सैतानंच जाणे!”
असं
कळलं की वारेनूखानेपण रीम्स्कीसारखंच जादुगाराला पाह्यलं नव्हतं. काल स्त्योपा ‘वेड्या सारखा’
(रीम्स्कीच्या शब्दांत) फिनडाइरेक्टरकडे
धावंत-पळंत आला, हातांत एक अनुबंध घेऊन, आणि लगेच पैसे
देण्यासाठी गळ घातली. आणि हा जादुगार,
माहीत नाही, कुठे होता, स्त्योपाला सोडून त्याला आणखी कुणीही बघितलं नव्हतं.
रीम्स्कीने
घड्याळ काढून बघितलं – दोन वाजून पाच मिनिटं झाले होते, आणि तो अगदीच वैतागून
गेला. बरोबरंच होतं. लिखादेयेवने सुमारे अकरा वाजतां फोन करून सांगितलं होतं की
अर्ध्या तासांत वेराइटीला पोहोचतोय,
पण तो नाही आला; वरून आपल्या फ्लैटमधून सुद्धां गायब झालाय!
“माझं
काम खोळंबलंय!” रीम्स्की विव्हळंत हस्ताक्षर न केलेल्या कागदांच्या फाइलमधे बोट
गडवंत म्हणाला.
“कुठे
तो बेर्लिओज़सारखा ट्रामच्या खालीतर नाही आला?” वारेनूखाने टेलिफोनचा
रिसीवर कानाला लावंत म्हटलं,
ज्याच्यातून सारखे खोल, आशाहीन आवाज येत होते.
“किती
चांगलं झालं असतं जर...” रीम्स्कीने हळू आवाजांत दात खात म्हटले.
तेवढ्यांत
कैबिनमधे युनिफॉर्मचे जैकेट आणि काळा स्कर्ट, डोक्यावर कैप आणि
पायांत चपला असलेली एक महिला आली. आपल्या बेल्टला लटकलेल्या छोट्याश्या पर्समधून
तिने एक पांढरा चौकोर लिफाफा आणि नोटबुक काढली आणि विचारलं, “इथे वेराइटी कोण आहे?
तुमच्यासाठी सुपर लाइटनिंग2
टेलिग्राम आहे, सही करा!”
वारेनूखाने
त्या महिलेच्या नोटबुकमधे पक्ष्यांसारखी सही केली आणि ती बाहेर जातांच लिफाफा
उघडला.
टेलिग्राम
वाचून तो डोळ्यांची उघडझाप करूं लागला आणि त्याने लिफाफा रीम्स्कीपुढे केला.
टेलिग्राममधे
लिहिलं होतं : “याल्टा मॉस्को. वेराइटी. आज साडे अकरा वाजता नाइटशर्ट आणि पैन्ट मधे, जोडे न घातलेला, भु-या
केसांचा पागल लिखादेयेव स्वतःला वेराइटीचा डाइरेक्टर सांगत असताना सापडला.
याल्टाच्या गुप्तचर विभागाला टेलिग्राम पाठवा : डाइरेक्टर लिखादेयेव कुठे आहे.”
“नमस्कार, काय म्हणता राव!” रीम्स्की विस्मयाने म्हणाला, “आणखी एक कमाल!”
“तोतया
द्मित्री3”,
वारेनूखाने म्हटलं आणि टेलिफोनच्या
रिसीवरमधे सांगू लागला,
“टेलिग्राफ़ ऑफिस? वेराइटी अकाउन्ट.
सुपर लाइटनिंग टेलिग्राम घ्या...तुम्हीं
ऐकताय नं? ‘याल्टा,
गुप्तचर विभाग...डाइरेक्टर लिखादेयेव
मॉस्कोत फिनडाइरेक्टर रीम्स्की’...”
याल्टाच्या
खोटारड्याबद्दल ही बातमी ऐकूनसुद्धां वारेनूखा टेलिफोनवर स्त्योपाला शक्यता
असलेल्या सगळ्या ठिकाणांवर शोधायचा प्रयत्न करंत होता, आणि स्पष्टंच आहे, की कुठेच सफल नाही झाला. तो विचारंच करंत होता की आता कुठे फोन करावा, येवढ्यांत तीच महिला,
जी पहिला टेलिग्राम घेऊन आली होती, पुन्हां प्रकट झाली. तिने आणखी एक लिफाफा वारेनूखाच्या हातांत दिला. पट्कन
लिफाफा उघडून टेलिग्राम वाचल्यावर वारेनूखाच्या तोंडातून शिट्टीचा आवाज निघाला.
“आता
आणखी काय आहे?” रीम्स्कीने घाबरंत, थरथरंत विचारलं.
वारेनूखाने
चुपचाप त्याच्याकडे टेलिग्राम दिला. फिनडाइरेक्टरने वाचलं : “विनंती विश्वास करा
याल्टांत फेकलं सम्मोहन वोलान्द गुप्तचरला टेलिग्राम करा पुष्टि करा लिखादेयेवची.”
रीम्स्की
आणि वारेनूखाने एकमेकांना डोके भिडवून पुन्हां टेलिग्राम वाचला आणि दुस-यांदा
वाचल्यावर एकमेकांकडे एकटक बघू लागले.
“नागरिक
हो!” ती महिला संतापली,
“सही करा, नंतर वाटेल तितकं
गप्प राहा! मला टेलिग्राम्स वाटायलापण जायचं आहे.”
वारेनूखाने
टेलिग्रामवरून नजर न काढतां वाकडी-तिकडी सही केली, आणि ती महिला चालली
गेली.
“तुझ्याशीतर
तो सुमारे अकरा वाजतां बोलला होता नं?”
एडमिनिस्ट्रेटरने पूर्ण अविश्वासाने
विचारलं.
“हो, मला तर गम्मतंच वाटतेय,”
रीम्स्की कर्कश स्वरांत ओरडला, “बोलला असेल किंवा नसेल;
पण ह्या वेळेस तो याल्टांत असूंच शकंत
नाही! हे हास्यास्पद आहे!”
“तो
प्यालेला आहे...” वारेनूखा म्हणाला.
“कोण
प्यालेला आहे?” रीम्स्कीने विचारलं आणि दोघं पुन्हां एकमेकाकडे बघू
लागले.
ह्यांत
काही शंकाच नव्हती,
की याल्टाहून कोण्या खोटारड्याने किंवा
वेड्यानेच टेलिग्राम पाठवला होता : पण आश्चर्य ह्या गोष्टीचं होतं, की याल्टाचा हा रहस्यमय माणूस वोलान्दला कसं ओळखतो, जो फक्त कालंच मॉस्कोला आलाय?
त्याला लिखादेयेव आणि वोलान्दच्या
संबंधाबद्दल कसं कळलंय?
“सम्मोहन,” वारेनूखाने त्या टेलिग्राममधे छापलेला शब्द पुन्हां उच्चारला, “त्याला वोलान्दबद्दल कसं काय माहीत झालं?” त्याने पापण्यांची
फडफड केली आणि एकदम निर्णयात्मक स्वरांत ओरडला, “ओह, नाही! मूर्खपणा,
मूर्खपणा, मूर्खपणा!”
“हा वोलान्द, सैतान त्याला घेऊन जाओ,
थांबला कुठेय?” रीम्स्कीने विचारलं.
वारेनूखाने
लगेच इनटूरिस्ट ब्यूरोला फोन केला आणि रीम्स्कीला आश्चर्याचा प्रचण्ड धक्का देत
म्हणाला, की वोलान्द लिखादेयेवच्या फ्लैटमधे थांबलाय. नंतर
त्याने तिथे फोन केला आणि टेलिफोनमधून त्याला खोल-खोल सिग्नल्संच ऐकूं येत राहिले. सिग्नल्सच्या मधून-मधून कुठून तरी दुरून एक जाडा, निराश, रडका आवाज़ गात असल्यासारखं ऐकूं आलं : “...खडकांत माझा विसावा...4”
आणि वारेनूखाने ठरवलं की टेलिफोनचा तारेंत कुठून तरी रेडिओ ‘शो’चे आवाज़ मिसळलेंत.
“फ्लैट
मधून काही आवाज नाहीये,”
वारेनूखाने रिसीवर परंत ठेवंत म्हटलं, “पुन्हां फोन करून बघतो...”
तो
आपलं वाक्य पूर्ण करायच्या आतंच दारांत तीच महिला प्रकट झाली आणि दोघं, रीम्स्की आणि वारेनूखा,
तिच्या स्वागतासाथी उठून उभे राहिले
आणि आतां त्या महिलेने पांढ-याच्या ऐवजी एक काळा कागद काढला.
“आता
हे बरंच मजेदार होत चाललंय,”
लवकर लवकर जाणा-या महिलेकडे बघंत
वारेनूखा कुजबुजला. रीम्स्कीने पट्कन तो कागद घेतला होता.
फोटोग्राफिक
पेपरच्या काळ्या पार्श्वभूमिवर काळ्या ओळी स्पष्ट दिसंत होत्या.
“प्रमाणित
करण्यासाठी माझं अक्षर,
माझ्या हस्ताक्षराची टेलिग्रामने
पुष्टि करा, वोलान्दवर गुप्त नजर ठेवा – लिखादेयेव.”
थियेटरच्या
आपल्या वीस वर्षाच्या नौकरींत वारेनूखाने बरेच चमत्कार पाहिले होते, पण ह्या वेळेस त्याला असं वाटलं की त्याची मति गुंग होत चाललीय आणि तो काहीच
नाही म्हणूं शकला, त्याच्या तोंडातून फक्त येवढंच निघालं, “हे अशक्य आहे!”
पण
रीम्स्कीने असं नाही केलं. तो उठला,
आणि दार उघडून बाहेर स्टूलवर बसलेल्या
रिसेप्शनिस्टला म्हणाला,
“पोस्टमैन शिवाय आणखी कुणाला आंत नको येऊं
देऊं!” आणि त्याने आतून कुलूप लावून घेतलं.
मग
त्याने टेबलावरून कागदांचा गट्ठा उचलला आणि लक्ष देऊन फोटोग्राफमधे लिहिलेल्या, स्त्योपाच्या डावीकडे झुकलेल्या मोठ्या मोठ्या अक्षरांना फ़ाइल्समधे
लिहिलेल्या त्याच्या निर्णयांशी आणि हस्ताक्षरांशी मिळवून बघूं लागला. वारेनूखा
टेबलवर जवळ-जवळ पालथा झाला आणि रीम्स्कीच्या गालावर गरम श्वास सोडूं लागला.
शेवटी
फिनडाइरेक्टरने दृढतेने सांगितलं,
“हे त्याचंच अक्षर आहे.” आणि वारेनूखा
जणु त्याच्या प्रतिध्वनिसारखा उत्तरला:
“त्याचंच
आहे.”
रीम्स्कीच्या
चेह-याकडे बघून त्यांत झालेले बदल पाहून वारेनूखा चकित झाला. आधीच कृश असलेला
फिनडाइरेक्टर आणखीनंच कृश झाला होता,
आणखीनंच म्हातारा झाला होता. शिंगाच्या
चष्म्याने झाकलेल्या त्याच्या डोळ्यांमधे नेहमीचं बोचरेपण नव्हतं. त्यांच्यांत
दिसंत होते काळजी आणि दुःख.
वारेनूखाने
ते सगळं केलं, जे विकट परिस्थितीत सापडलेला एक माणूस करतो. तो
कैबिनमधे दोनदा धावला,
दोनदा सुळावर चढवल्या सारखे हात वर
केले, पिवळ्या-पिवळ्या पाण्याचा पूर्ण ग्लास पिऊन टाकला आणि
विस्मयाने म्हणाला,
“समजंत नाहीये! नाही स-म-जं-त!”
पण
रीम्स्की खिडकीकडे बघून खूप ताणांत काही तरी विचार करंत होता. फिनडाइरेक्टरची
परिस्थिती खूप कठीण झाली होती. ह्या असाधारण घटनांसाठी जवाबदार असलेले साधारण कारणं
स्पष्ट करणे जरूरी होतं.
डोळे
बारीक करंत फिनडाइरेक्टरने नाइटशर्ट आणि जोडे न घातलेल्या स्त्योपाची कल्पना केली, जो आज सुमारे साडे अकरा वाजतां कोणच्या तरी अकल्पनीय अतिशीघ्रगामी विमानांत
चढंत होता आणि तोच स्त्योपा तेवढ्यांत वाजता मोजे घालून याल्टाच्या विमानतळावर उभा
होता...सैतानंच जाणे हे काय होतंय!
कदाचित
स्त्योपाने आपल्या फ्लैटमधून त्याला फोनंच नसेल केला? नाही, तो स्त्योपांच होता. तो काय स्त्योपाचा आवाज नाही ओळखंत? जरी आज स्त्योपा त्याच्याशी बोलला नसेल, तरीही काल, संध्याकाळी, आपल्या कैबिनमधून तेच फालतू अनुबंध-पत्र घेऊन आला
होता आणि फिनडाइरेक्टरला आपल्या छिचोरपणाने मनःस्ताप देऊन गेला होता. पण थियेटरमधे
काही न कळवतां तो एकदम गेला कसा?
ट्रेनने असो, किंवा विमानाने?
जर काल संध्याकाळी तो विमानाने जरी
गेला असला, तरीही आज दुपारपर्यंत याल्टाला निश्चितंच नाही पोहोचूं
शकंत; की पोहोचला असेल?
“इथून
याल्टा किती दूर आहे?”
रीम्स्कीने विचारलं.
वारेनूखाने
धावपळ थांबवली आणि गरजला,
“सगळा विचार केला! ट्रेनने गेलं तर इथून
सेवस्तोपोल पर्यंत एक हजार पाचशे किलोमीटर्स, याल्टापर्यंत आणखी
आठशे किलोमीटर्स जोडून घ्या,
पण विमानाने निश्चितंच थोडं कमी आहे.”
हूँ...हो...ट्रेनने
जाण्याचा प्रश्नंच नाहीये. मग कसं?
फाइटर प्लेनने? बिनजोड्याच्या स्त्योपाला कोण फाइटर प्लेनमधे बसूं देईल? कदाचित, त्याने याल्टाला पोहोचल्यावर जोडे काढले असावेत? तरीही तोच प्रश्न : कां?
आणि जोडे घालून फाइटर प्लेन मधे...पण
फाइटर प्लेनचा प्रश्नंच कुठे येतोय?
बातमी तर ही आहे, की तो गुप्तचर पोलिसकडे साडे अकरा वाजतां आला, आणि मॉस्कोत माझ्याशी
बोलंत होता टेलिफोनवर...घ्या...आणि रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर स्वतःच्या घडाळीचं
डायल दिसूं लागलं...त्याला आठवली घडाळ्याच्या काट्यांची स्थिति. खतरनाक! ती वेळ
होती अकरा वाजून वीस मिनिट. ह्याचा अर्थ काय झाला? असं समजां, की जरी माझ्याशी बोलल्यावर लगेच स्त्योपा विमानतळावर पळाला आणि जवळ जवळ पाच
मिनिटांनी त्यांत बसला,
तरीपण...अविश्वसनीय..., निष्कर्ष हा निघतो,
की विमानाने फक्त पाच मिनिटांत एक
हजारापेक्षा जास्त किलोमीटर्स पार केलेत? म्हणजे एका तासांत 12,000 किलोमीटर्सच्या वेगाने विमान उडंत होतं! हे तर अशक्यंच आहे, म्हणूनंच तो याल्टांत नाहीये.
मग
काय शक्यता आहे? सम्मोहन?
पृथ्वीवर अशी कोणतीच सम्मोहन शक्ति
नाहीये, जी एखाद्या माणसाला हज्जारो किलोमीटर्स दूर फेकून
देईल! कदाचित त्याला भ्रम झाला असेल की तो याल्टांत आहे! त्याला तर कदाचित स्वप्नं
पडतंय, पण काय याल्टाच्या गुप्तचर पोलिसलासुद्धा स्वप्नंच
पडतंय! नाही...माफ़ करा,
असं नसतं!...पण टेलिग्रामतर ते तिथूनंच
पाठवताहेत?
फिनडाइरेक्टचा
चेहरा भीतीने विवर्ण झाला. ह्याच वेळेस दाराचं हैण्डल बाहेरून फिरवलं, मुरगळलं जात होतं आणि ओरडणा-या रिसेप्शनिस्टचा आवाज ऐकूं येत होता:
“नाही!
नाही जाऊ देणार! वाटलं तर मला मारून टाका! ज़रूरी मीटिंग चाललीये!”
रीम्स्कीने
स्वतःवर जमेल तितका ताबा ठेवंत टेलिफोन उचलला आणि म्हणाला, “याल्टासाठी सुपर-अर्जेंट कॉल द्या.”
“शाबास!”
वारेनूखा अर्थपूर्ण हास्य करंत उद्गारला.
पण
याल्टाला कॉल लागलांच नाही. रीम्स्कीने टेलिफोनचं रिसीवर ठेवलं आणि म्हणाला, “काय पीडा आहे,
लाइन बिघडली आहे.”
स्पष्ट
होतं की लाइनच्या बिघाडाने त्याला खूपंच उद्विग्न केलं आणि विचार करायला भाग पाडलं.
थोडा वेळ विचार करून त्याने एका हातांत पुन्हां रिसीवर उचलला आणि दुस-या हाताने
त्यांत जे बोलंत होता,
ते लिहूं लागला:
“सुपर
लाइटनिंग टेलिग्राम घ्या. वेराइटी. हो. याल्टा. गुप्तचर पोलिस. हो. “आज सुमारे साडे अकरा वाजतां लिखादेयेव माझ्याशी मॉस्कोत फोनवर बोलला.
त्यानंतर तो ड्यूटीवर नाही आला,
टेलिफोनवर त्याला धुंडू नाही शकले.
निर्दिष्ट कलाकारावर नजर ठेवण्याचा बंदोबस्त करतोय. हस्ताक्षर सत्यापित करतोय.
फिनडाइरेक्टर रीम्स्की.”
“”खूप
हुशारीचं काम केलंय !” वारेनूखा ने विचार केला, पण तो पूर्णपणे विचार
नाही करूं शकला; कारण त्याच्या डोक्यांत एक विचार चमकला, “वेडेपणा आहे! तो याल्टांत असूंच नाही शकंत!”
येवढ्यांत
रीम्स्कीने असं केलं की सगळे टेलिग्राम्स आणि त्याने स्वतः पाठवलेल्या टेलिग्रामची
कॉपी व्यवस्थित ठेवून त्यांना एका लिफ़ाफ्यांत घातलं, लिफाफा बंद केला, त्याच्यावर काही शब्द लिहिले आणि वारेनूखाकडे देत म्हणाला, “ताबडतोब, इवान सावेल्येविच, स्वतः जा. त्यांनाच5
निर्णय घेऊ दे.”
‘ही खरोखरंच
बुद्धिमानीचं काम आहे,”
वारेनूखाने विचार केला आणि लिफाफ्याला
आपल्या ब्रीफकेसमधे लपवून ठेवलं. मग त्याने एक शेवटचा प्रयत्न करण्यासाठी
स्त्योपाच्या फ्लैटचा नंबर फिरवला. रिसीवरमधून येणारे आवाज ऐकले आणि अत्यंत
प्रसन्नतेने आणि रहस्यपूर्ण ढंगाने डोळा मारला, आणि तोंड वेंगाडलं.
रीम्स्कीने त्याच्याकडे मान वळवली.
“मी कलाकार वोलान्दशी बोलूं शकतो कां?”
अत्यंत गोड आवाजांत वारेनूखाने
विचारलं.
“ते
व्यस्त आहेत,: रिसीवरमधून खणखणीत आवाज उत्तरला, “कोण बोलतंय?”
“वेराइटीचा
एडमिनिस्ट्रेटर, वारेनूखा.”
“इवान
सावेल्येविच?” रिसीवर आनंदाने ओरडला, “तुमचा आवाज ऐकून खूप
आनंद झाला! तुमची तब्येत कशी आहे?”
“धन्यवाद!” वारेनूखा
आश्चर्याने उत्तरला,
“मी कोणाशी बोलतोय?”
“सहायक!
त्यांचा सहायक आणि दुभाष्या करोव्येव.” रिसीवर खिदळला, “मी तुमचा सेवेंत हजर
आहे, प्रिय इवान सावेल्येविच! माझ्यासाठी काही काम असेल तर
निःसंकोच सांगा. ठीकाय?”
“माफ़
करा, स्तिपान बग्दानोविच सध्यां घरी नाहीत का?”
“ओह, नाहीये! नाहीये!” रिसीवर ओरडला,
“चालले गेले.”
“कुठे?”
“शहराच्या
बाहेर, मोटरमधे हिंडायला!”
“क्...काय? हि...हिंडायला?
आणि ते परत केव्हां येणारेत?”
“म्हणंत
होते की मोकळ्या हवेंत थोडा श्वास घेऊन लवकरंच येईन!”
“असं
आहे...” वारेनूखा त्रासून म्हणाला,
“थैन्क्स! कृपा करून वोलान्द महाशयांना
सांगा, की त्यांचा ‘शो’ आज कार्यक्रमाच्या तिस-या भागांत आहे.”
“ठीक
आहे. असं कसं! निश्चितंच. लगेच. ज़रूर. सांगेन,” रिसीवरमधून तुटक-तुटक
उत्तर आलं.
“शुभेच्छा,” वारेनूखा आश्चर्याने म्हणाला.
“कृपा
करून माझ्याकडूनपण,”
रिसीवर म्हणाला. “सर्वश्रेष्ठ हार्दिक
शुभेच्छा घ्या! सफलतेसाठी. शांति आणि
सुखासाठी. सगळ्यांचसाठी!”
“बघितलंस, नक्कीचं! मी आधीच सांगितलं होतं!” एडमिनिस्ट्रेटर संतापाने म्हणाला, “काही याल्टा-वाल्टाला नाहीं गेला, तो गेला आहे कारमधे
हिंडायला!”
“जर
असं असेल, तर...” फिनडाइरेक्टर रागाने लाल झाला. “हा तर
डुक्करपणा आहे, ज्याला काही नावंच नाहीये!”
“आठवलं!
आठवलंय! पूश्किनोमधे ‘याल्टा’
नावांच ‘बार’ उघडलंय! सगळं स्पष्ट आहे! तो तिथे गेला, पिऊन तर्र झाला आणि
आता तिथून टेलिग्राम्स पाठवतोय!”
“हे
अतीच झालंय!” आपला गाल कुस्करंत रीम्स्की म्हणाला आणि त्याच्या डोळ्यांतून
रागाच्या ठिणग्या निघूं लागल्या,
“हे हिंडणं-फिरणं त्याला खूप महागांत
पडेल!”
पण
त्याचा आवेश लगेच कमी झाला आणि तो अविश्वासाने म्हणाला, “पण, असं कसं, गुप्तचर पोलिस...”
“फालतूपणा
आहे! ही सगळी त्यानेच केलेली गंमत आहे,”
एडमिनिस्ट्रेटर मधेच त्याला टोकंत
म्हणाला, “तर,
हा लिफाफा घेऊन जाऊं?”
पुन्हां
दार उघडलं आणि पुन्हां अवतीर्ण झाली तीच...’ती!’ माहीत नाही कां अत्यंत विषादाने रीम्स्कीने विचार केला आणि ते दोघं आत
येणा-या महिला पोस्टमैनच्या स्वागतासाठी उभे राहिले.
आता
टेलिग्राममधे लिहिलं होतं:
सत्यापन करण्यासाठी धन्यवाद,
लगेच पाचशे पाठवा गुप्तचर
पोलिसला. उद्या मॉस्कोसाठी विमानांत बसेन – लिखादेयेव.
“तो
पागल झालांय...” पस्त होत वारेनूखा म्हणाला.
रीम्स्कीने
चाव्यांची खणखण करंत अज्वलनशील कैश बॉक्समधून पैसे काढले, पाचशे रूबल्स मोजले,
घण्टी वाजवली, एका कर्मचा-याला ते रूबल्स दिले आणि त्याला टेलिग्राफ ऑफिसमधे पाठवलं.
“माफ
करा, ग्रिगोरी दानिलोविच,” स्वतःच्या डोळ्यांवर
विश्वास न ठेवतां वारेनूखाने म्हटलं,
“माझ्या मते तुम्हीं उगीचंच पैसे वाया
घालवताय!”
“ते
परंत मिळतील,” रीम्स्कीने हळूंच म्हटलं, “त्याला ह्या
पिकनिकबद्दल व्यवस्थित उत्तर द्यावं लागेल,” आणि ब्रीफकेसकडे बोट
दाखवंत वारेनूखाला म्हटलं,
“तू जा. इवान सावेल्येविच, उशीर नको करूं.”
वारेनूखा
ब्रीफकेस घेऊन कैबिनच्या बाहेर धावला. तो खाली उतरला आणि टिकिट-खिडकी समोर आज
पर्यंतची सर्वांत लाम्ब रांग बघून टिकिट-खिडकीवर बसलेल्या मुलीकडे गेला. मुलीने
सांगितलं की आणखी तास भरांत हाउसफुल होण्याची शक्यता आहे, कारण की जसंच नवीन पोस्टर लावलं,
लोकं लाटे सारखे धावत आले. त्याने
मुलीला हॉलमधे समोरच्या लाइनींत आणि बॉक्समधे तीस सर्वांत चांगल्या सीट्स राखून
ठेवायला सांगितल्या आणि ‘शो’साठी फुकट ‘पास’ मागणा-यांना कटवंत आपल्या ऑफिसमधे लपला, कारण की त्याला टोपी
घ्यायची होती. तेवढ्यांत टेलिफोन किंचाळला.
“यस!”
“इवान
सावेल्येविच?” रिसीवरमधून किळसवाणा, जाडा-सा आवाज आला.
“ते
थियेटरमधे नाहीयेत!” वारेनूखा ओरडणारंच होतां की रिसीवरने त्याला मधेच थांबवलं, “वेडेपणा करूं नकोस,
इवान सावेल्येविच; आणि ऐकं, हे टेलिग्राम्स कुठेही नको नेऊं आणि कुणाला
दाखवूंसुद्धां नको!”
“कोण
बोलतंय?” वारेनूखा गरजला, “हा वेडेपणा बंद करा, नागरिक! तुम्हांला लगेच हुडकून काढतील! तुम्हीं कोणच्या नंबरवरून बोलतांय?”
“वारेनूखा,” तोच भयंकर आवाज म्हणाला,
“तुला रशियन भाषा कळंत नाही कां? हे टेलिग्राम्स कुठेही घेऊन जाऊं नकोस.”
“ओह, तुम्हीं ऐकणार नाही?”
एडमिनिस्ट्रेटर वेडापिसा झाला, “बघूनंच घ्या! तुम्हांला ह्याची किंमत मोजावी लागेल!” आणि त्याने एखादी
धमकीसुद्धां दिली, पण मग एकदम चुप झाला, कारण की त्याला वाटलं, की त्याचा आवाज कोणी ऐकतंच नाहीये.
त्याच्या
ऑफिस-रूम मधे एकदम अंधार झाला. वारेनूखा बाहेर धावला. आपल्यामागून दार धाडकन् बंद
केलं आणि बाजूच्या रस्त्याने वसंतोद्यानाकडे पळाला.
एड्मिनिस्ट्रेटर
खूपंच उत्तेजित आणि उत्साहाने थबथबलेला होता. ह्या वात्रट टेलिफोन कॉलनंतर
त्याच्या मनांत थोडीशी सुद्धा शंका उरली नाही, की ही गुंडांची टोळी
फालतूचे चाळे करतेय,
आणि ह्याच चाळ्यांचा लिखादेयेवच्या
गायब होण्याशी संबंध होता. ह्या दुराचा-यांचं बिंग फोडण्याची तीव्र इच्छा
एडमिनिस्ट्रेटरला अस्वस्थ करंत होती. आणि कितीही विचित्र वाटंत असलं तरी त्याच्या
मनांत एक प्रसन्नतेचा आभास तरळूं लागला. असं अनेकदां होतं, जेव्हां एखाद्या माणसाला आकर्षणाचे केंद्र व्हायचे असते, एखादी सनसनाटीची बातमी कुठेतरी पोहोचवायंची असते.
वसंतोद्यानांत
हवा एड्मिनिस्ट्रेटरच्या चेह-याला मारंत होती आणि त्याच्या डोळ्यांत धूळ टाकंत
होती; जणु त्याच्या रस्ता अडवतेय, त्याला चेतावनी
देतेय. दुस-या मजल्यावर कोणचीतरी खिडकी धडाम् वाजली, तिची काच फुटतां-फुटतां
वाचली. लिण्डन आणि मैपल वृक्षांचे शेंडे एक विचित्रसा, भयानकसा आवाज करंत
होते. मधेच उजेड, मधेच अंधार होत होता. एडमिनिस्ट्रेटरने डोळे चोळून
बघितलं की मॉस्कोच्या आकाशांत पिवळ्या किनारीचं एक वादळं गरजंत पुढे वाढतंय.
कुठेतरी विजेचा कडकडाट होत होता.
कितीही
घाईंत असला, तरीही वारेनूखाच्या मनांत एकाएकी एका सेकंदासाठी जाऊन
बघण्याची तीव्र इच्छा झाली,
की मैकेनिकने लैम्पवर जाळी लावलीयं की
नाही.
शूटिंग
गैलरीच्या जवळून जाताना वारेनूखा लिलीच्या दाट झुडुपांपर्यंत पोहोचला, ज्यांच्यामधे निळ्या रंगाचं टॉयलेट होतं. मैकेनिक सधलेला कारीगर होता. पुरुष
कक्षांत लैम्पने धातूची जाळी घालून घेतली होती, पण एडमिनिस्ट्रेटरला
ह्या गोष्टीचं फार दुःख झालं की दाटून येणा-या अंधारांत सुद्धां स्पष्ट दिसंत होतं
की सगळ्या भिंतींवर कोळश्याने आणि पेन्सिलीने काहीतरी लिहिलेलं होतं.
“आता
ही काय भानगड आहे...” एडमिनिस्ट्रेटरने तोंड उघडलंच होतं की त्याला आपल्या मागे
गुरगुरणारा आवाज ऐकूं आला,
“इवान सावेल्येविच, तुम्हींच आहांत नं?”
वारेनूखा
थरथरला. तो वळला आणि त्याने आपल्या मागे एका लट्ठ्या बुटक्याला पाहिलं, कदाचित बोक्यासारखा आकार होता त्याचा.
“हो, मीच आहे,” वारेनूखाने उर्मटपणे उत्तर दिलं.
“फार-फार
आनंद झाला...” चीं-चीं करंत बोक्यासारखा लट्ठ्या म्हणाला आणि त्याने एकदम वळून
वारेनूखाच्या कानावर इतकी जोरदार थप्पड मारली की एडमिनिस्ट्रेटरच्या डोक्यावरची
टोपी उडून कमोडच्या भोकांत जाऊन अशी गायब झाली, जसे गाढवाच्या
डोक्यावरून शिंग.
लट्ठ्याच्या
थप्पंडने टॉयलेटमधे असा उजेड झाला,
जणु वीज चमकलीय, वीज कडकडण्याचा आवाजपण आला. मग पुन्हां एकदा उजेड झाला आणि वारेनूखासमोर
आणखी एक माणूस अवतरला – छोटासा,
पण खेळाडूसारखे खांदे असलेला, आगीसारखे लाल केस असलेला,
एका डोळ्यांत फूल पडलेला, तोंडातून एक तीक्ष्ण दात बाहेर निघंत असलेला. ह्या दुस-याने
एडमिनिस्ट्रेटरच्या दुस-या कानावर थप्पड ठेवून दिली. ह्याला प्रतिसाद म्हणून
आकाशांत पुन्हां वीज कडकडली आणि टॉयलेटच्या लाकडाच्या छप्परवर मुसळधार पाऊस पडूं
लागला.
“काय
करतोस, मित्रा,”
वेडावलेला एडमिनिस्ट्रेटर कुजबुजंत
म्हणणार होता, पण तेव्हांच त्याला वाटलं, की सार्वजनिक
प्रसाधन-कक्षांत एका निःशस्त्र माणसावर हल्ला करणा-या गुंडांसाठी ‘मित्र’ हा शब्द योग्य नाहीये, आणि त्याने भसाड्या
आवाजांत म्हणायचा प्रयत्न केला
: “नाग...” पण तेव्हांच एक तिसरी
भयानक थप्पड, न जाणे कुठून पडली की त्याच्या नाकांतून रक्त निघून
कोटाच्या बाहीवर सांडलं.
“तुझ्या
ब्रीफकेसमधे काय आहे बांडगुळा!”
बोक्या सारखा लट्ठ्या तीक्षण आवाजांत ओरडला, “टेलिग्राम्स? आणि तुला टेलिफोनवर चेतावनी दिली होती नं, की त्यांना कुठेही
नेऊं नकोस? सांगितलं होतं की नाही? मी तुलांच विचारतोय!”
“दिली
होती चे-ता-वनी-वनी...” एडमिनिस्ट्रेटरचा दम घुटंत होता.
“तरीही
तू धावलांस? ब्रीफकेस इकडे दे, गोचिड्या!” त्याच
विषारी आवाजांत, जो टेलिफोनवर ऐकला होता, दुसरा ओरडला आणि
त्याने वारेनूखाच्या थरथरत्या हातांतून ब्रीफकेस हिसकावून घेतली.
आणि
त्या दोघांनी एडमिस्ट्रेटरच्या बाह्या पकडल्या, त्याला उद्यानांतून
ढकलून सादोवाया स्ट्रीटवर घेऊन गेले. वादळ थैमान घालंत होतं. रस्त्याच्या बाजूच्या
नालींत पाणी साँय-साँय करंत होतं,
फेस उसळंत लाटा उंच –उंच उठंत होत्या, छप्परांवरून पाणी पाइप्सवर प्रहार करंत होतं, रस्त्यांवर फेसाळ
पाणी धावंत होतं. सादोवाया वरून सगळ्यांच जीवित वस्तू वाहून गेल्या होत्या. इवान
सावेल्येविचला वाचवणारं कुणीच नव्हतं. मातकट पाण्यांतून उड्या मारंत, कडकडणा-या विजेच्या प्रकाशांत न्हायलेले ते डाकू एका सेकंदांत अर्धमेल्या
एडमिनिस्ट्रेटरला बिल्डिंग नं.
302 पर्यंत घेऊन आले, तिच्या प्रवेश द्वाराकडे वळले,
जिथे
आपले स्टॉकिंग्स आणि जोडे हातांत पकडून दोन बाया भिंतीला टेकून उभ्या
होत्या. मग ते सहाव्या प्रवेश द्वारांत घुसले. मति गुंग झालेल्या वारेनूखाला
पाचव्या मजल्यावर नेलं आणि चांगल्यांच माहीत असलेल्या स्त्योपा लिखादेयेवच्या
अंधा-या खोलींत फरशीवर धाडकन् टाकून दिलं.
आता
दोन्हीं डाकू गायब झाले आणी त्याजागेवर प्रकट झाली एकदम निर्वस्त्र मुलगी – लाल
केस असलेली, फास्फोरससारख्या चमकणा-या डोळ्यांची.
वारेनूखा
समजून चुकला, की आता त्याच्याबरोबर सर्वांत भयंकर घटना होणार आहे
आणि तो विव्हळून भिंतीकडे सरकला. मुलगी त्याच्याजवळ गेली आणि तिने आपले पंजे
त्याच्या खांद्यांमधे रुतवले. वारेनूखाचे केस उभे राहिले, कारण की ओल्या,
थंडगार कोटमधून सुद्धां त्याला कळलं, की हे पंजे त्याच्या कोटापेक्षांही जास्त थंड आहेत, ते बर्फासारखे गार आहेत.
“ये, तुझं चुम्बन घेते,”
मुलगी प्रेमाने म्हणाली आणि
वारेनूखाच्या अगदी डोळ्यांसमोर ते चमकणारे डोळे प्रज्वलित झाले. वारेनूखाची शुद्ध
हरपली, त्याला चुम्बनाचा अनुभवसुद्धां नाही घेता आला.
******
अकरा
इवानचे दोन रूप
नदीच्या
पलिकडच्या किना-याचं जंगल,
जे आत्ता तासभरापूर्वी मे महिन्याच्या
दुपारच्या उन्हांत चमकंत होतं,
अचानक मलूल झालं, त्याचे रंग विखुरले आणि अंधारांत वितळून गेलं.
खिडकीच्याबाहेर
मुसळधार पाऊस पडंत होता. आकाशांत राहून-राहून वीज चमकून जात होती, आकाश जणु कोसळण्याच्या बेतांत होतं आणि रोग्याच्या खोलींत भीतिदायक रंग भरंत
होतं.
इवान
चुपचाप रडंत होता. तो पलंगावर बसून मातकट, उसळत्या, फेसाळ नदीकडे बघंत होता. विजेच्या प्रत्येक कडकडाटाबरोबर तो विव्हळंत होता
आणि चेहरा हातांने झाकंत होता. इवानने लिहिलेले कागद चारीकडे उडंत होते. वादळ
यायच्या आधी खोलींत घुसलेल्या वा-याने त्यांना इकडे तिकडे फेकलं होतं.
त्या
खतरनाक कन्सल्टेन्टबद्दल एक अर्ज लिहिण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्न असफल झाला
होता. त्याने डॉक्टरची लट्ठ सहायिका,
प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाकडून पेन्सिल
आणी कागद मागितला आणि टेबलाशी बसून लिहायला सुरुवात केली. सुरुवातीच्या ओळी मोठ्या
झोकांत लिहिल्या;
“पोलिसकडे
मॉसोलितचा सदस्य इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीचे निवेदन. काल संध्याकाळी मी
स्वर्गीय एम.ए.बेर्लिओज़सोबत पत्रियार्शी तलावावर गेलो...”
तेवढ्यांत
तो वैतागला, विशेषकरून ‘स्वर्गीय’ शब्दामुळे. फार आश्चर्याची गोष्ट लिहून टाकली होती त्याने – स्वर्गीयसोबंत
गेला? मृतकतर चालंत नाहीत नं! ठीकंच आहे, असं लिहिल्याने त्याला खरंच पागल समजतील.
असा
विचार करून इवान निकोलायेविचने ह्या पंक्त्यांमधे सुधार करायचं ठरवलं. पुन्हां
लिहिलं :
“एम.ए.
बेर्लिओज़सोबंत, जो नंतर मेला...” ह्याने पण संतुष्ट नाही झाला. तिस-यांदा
लिहिलं, जे पहिल्या दोनपेक्षांही वाईट होतं : “...बेर्लिओज़सोबत, जे ट्रामखाली आले होते...” लगेच त्याला आठवंण झाली की ह्या नावाचा एक
संगीतकारपण आहे, म्हणून त्याने लिहिलं...”संगीतकाराबरोबर नाही...”
ह्या
दोन्हीं बेर्लिओज़ांच्या भानगडीपासून दूर राहण्यासाठी इवानने पुन्हां खूप सशक्त
स्टाइलमधे लिहिण्याचा प्रयत्न केला,
ज्याने वाचणा-याचं लक्ष एकदम
त्याच्याकडे आकर्षित होईल. त्याने लिहिलं की बोका ट्रामगाडींत बसला होता, मग डोकं कापल्याच्या घटनेकडे वळला. कापलेल्या डोक्याने आणि कन्सल्टेन्टच्या
भविष्यवाणीने त्याचं लक्ष पोंती पिलातकडे वळवलं. इवानने निश्चय केला की आपल्या
विचारांना स्पष्टपणे समजावण्यासाठी पोंती पिलातची पूर्ण गोष्ट लिहिली पाहिजे, त्या क्षणापासून जेव्हां तो रक्तवर्णी किनारीच्या पांढ-या अंगरख्यांत
हिरोदच्या महालाच्या स्तंभ असलेल्या दालनांत अवतीर्ण झाला होता.
इवान
खूप मेहनतीने लिहीत होता. लिहिलेल्याला घडी घडी पुसून नवीन शब्द लिहीत होता.
त्याने पोंती पिलात आणि मागच्या पंजांवर उभ्या असलेल्या बोक्याचे चित्र
काढण्याचापण प्रयत्न केला. पण ह्या चित्रांचा काही उपयोग नाही झाला. जसा-जसा तो
पुढे-पुढे लिहीत होता,
त्याचा लेख जास्तीतजास्त क्लिष्ट, गुंतागुंतीचा,
न समजण्यासारखा होत गेला.
जेव्हां
आकाशांत दुरून धुरकट किनारीचं भीतिदायक वादळ पुढे वाढंत होत आणि शेवटी त्याने
जंगलाला पूर्णपणे झाकून टाकलं;
जेव्हां सोसाट्याचं वारं वाहूं लागलं, तोपर्यंत इवान अगदी शिथिल झाला होता. त्याला कळून चुकलं की त्याच्याने हा
अर्ज नाही लिहिला जाणार,
म्हणून त्याने विखुरलेल्या कागदांना
गोळा करायचा प्रयत्न नाही केला आणि निराश होऊन निःशब्द रडूं लागला.
सहृदय
प्रास्कोव्या फ़्योदोरोव्ना वादळाच्या दरम्यान इवानला बघायला आली. तिला हे बघून खूप
दुःख झालं की तो रडतोय. कडकडणा-या विजेची रोग्याला भीति न वाटो, म्हणून तिने पडदे बंद केले;
फरशीवर पडलेले कागद गोळा केले आणि
त्यांना घेऊन डॉक्टरकडे पळाली. लवकरंच जंगल पूर्वीसारखं झालं. स्वच्छ निळ्या
आकाशाखाली त्याचं एक एक झाड दिसू लागलं आणि नदीचं पाणीसुद्धां शांत झालं. इवानची
पीडा हळू-हळू कमी होऊं लागली;
आता कवि शांतचित्त होऊन पलंगावर पडल्या
पडल्या आकाशातील इंद्रधनुष्य पाहात होता.
संध्याकाळपर्यंत
असंच राहिलं, त्याच्या लक्षांतपण आलं नाही, की केव्हां इंद्रधनुष्य विखुरलं,
केव्हां आकाश उदास होऊन गहिरं झालं, आणि केव्हां जंगल पुन्हां काळं झालं.
गरम
गरम दूध पिऊन इवान पुन्हां लोळला. त्याला आश्चर्य वाटलं, की त्याच्या विचारांत इतकं परिवर्तन कसं झालं. त्याच्या स्मृतींत आता तो
दुष्ट बोका आतां इतका दुष्ट नव्हता वाटंत, कापलेल्या डोक्याची
इतकी भीति नव्हती वाटंत आणि त्याच्याबद्दल विचार करणं सोडून इवानच्या मनांत असले
विचार आले, की हे हॉस्पिटल इतकं वाईट नाहीये, की स्त्राविन्स्की खूप हुशार आहे, त्याच्याशी बोलणं
चांगलं वाटतं. वादळानंतर संध्याकाळचं वारं गोड आणि सुखद वाटंत होतं.
दुःखाचं
हे घर झोपलं होतं. शांत कॉरीडोर्समधे मातकट पांढरे बल्ब्स विजले होते, त्यांच्या ठिकाणी मंद निळे बल्ब्स जळंत होते. दारांच्या बाहेर कॉरीडोरच्या
रबरी फरशीवर परिचारिकांच्या सतर्क,
सावध पावलांचा आवाज हळू-हळू कमी होत
होता.
इवानला
आता प्रसन्न वाटंत होतं. पडल्या-पडल्या तो मंद प्रकाश फेकणा-या बल्बकडे बघून घेत
होता, किंवा जंगलाच्या मागून डोकावणा-या चंद्राकडे. त्याबरोबरंच
स्वतःशीच बोलंत होता.
‘जर बेर्लिओज़
ट्रामखाली येऊन मेला तर मी इतका उत्तेजित कशाला झालो?’ कविने कारण मीमांसा
करंत विचार केला, ‘शेवटी,
तो चिखलांत जरी पडला तरी मला त्याचं
काय! मी आहे कोण त्याचा?
मी काय त्याचा मित्र आहे, किंवा व्याही?
जर नीट विचार केला, तर, मी त्याला ओळखंतदेखील नव्हतो. खरंच मला त्याच्याबद्दल
असं कितीसं माहीत आहे?
फक्त येवढंच, की तो टकल्या भयंकर गोड बोलणारा होता.’ मग न जाने कुणाला
संबोधित करंत कविने पुढे विचार केला,
“मी त्या रहस्यमय कन्सल्टेन्ट, जादूगर आणि काळ्या आणि रिकाम्या डोळ्याच्या सैतान प्रोफेसरमुळे इतका वेडा
कां झालो? इतकी धावपळ कां केली? त्याच्या मागावर कां
गेलो? चड्डी घालून, हातांत मेणबत्ती घेऊन, आणि रेस्टॉरेन्टमधे त्याच्यामुळे इतका धिंगाणा कां केला?’
‘पण, पण, पण,”
अचानक कुठेतरी, न कानांत, न डोक्यांत जुन्या इवानने नव्या इवानला गंभीरतेने
म्हटलं, “बेर्लिओज़चं डोकं कापलं जाणारेय, हे तर त्याला आधीपासून माहीत होतं? मी काळजी कशी नसती
केली?”
“काय
म्हणतोस मित्रा!” नव्या इवानने जुन्या इवानचा विरोध करंत म्हटलं – “इथे काही तरी
गोलमाल आहे, येवढंतर एका लहान मुलालासुद्धां कळतं. तो शंभर टक्के
रहस्यमय व्यक्ति आहे. हीच तर गंमत आहे! माणूस व्यक्तिशः पोंती पिलातला ओळखंत होता.
तुम्हांला आणखी काय पाहिजे?
आणि पत्रियार्शीवर इतका धिंगाणा
घालण्यापेक्षां त्याला हे विचारणं जास्त चांगलं नसतं का झालं, की पोंती पिलात आणि कैदी हा-नोस्त्रीचं पुढे काय झालं?”
“आणि
मी न जाने काय विचार करूं लागलो! मुख्य गोष्ट ही आहे, की मासिक पत्रिकेच्या
संपादकाला ट्रामगाडीने चिरडून टाकलं. तर काय. पत्रिका निघणं बंद होईल? करणार तरी काय;
माणूस नश्वर आहे आणि आकस्मिक रूपाने
त्याचा नाश होतो. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांति देवो! दुसरा सम्पादक
येईल...कदाचित पहिल्यापेक्षां जास्तं गोड बोलणारा.”
किंचित
डुलकी घेतल्यावर नव्या इवानने जुन्याला विचारलं:
“मग, ह्या सगळ्यांत मी कोण ठरलो?”
“मूर्ख,” कुठून तरी जाडा-सा आवाज आला. हा जुन्या इवानचा आवाज नव्हतां, नव्या इवानचासुद्धां नव्हता. ह्याचं त्या कन्सल्टेन्टच्या आवाजाशी खूप साम्य
होतं.
माहीत
नाही कां, इवानला “मूर्ख” शब्द ऐकून राग नाही आला, त्याला आश्चर्यंच झालं. तो हसला आणि अर्धनिद्रितावस्थेत शांत झाला. इवान
पर्यंत हलक्या पावलांनी एक स्वप्न पोहोचलं, ज्यांत त्याला
हत्तीच्या पायासारखं लिण्डन वृक्ष दिसलं. बाजूने बोका निघून गेला. भीतिदायक नाही, पण आनंद देणारा. निद्रादेवी थोपटून इवानला झोपवणारंच होती, की अचानक जाळीचं दार आवाज न करतां उघडलं. मग बाल्कनींत एक रहस्यमय आकृति
प्रकट झाली, जी स्वतःला चंद्राच्या प्रकाशापासून लपवंत होती. तिने
इवानला बोटाच्या इशा-याने धमकावलं. इवान न घाबरतां पलंगावरून उठला. त्याने पाहिलं
की बाल्कनींत एक माणूस उभा आहे. ह्या माणसाने ओठांवर बोट नेत म्हटल – “श् श्!”
*******
बारा
काळा जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन
भोकाभोकांची
पिवळी टोपी घातलेला,
नासपातीच्या आकाराचं लाल नाक असलेला, चौकटीची पैन्ट आणि पॉलिश केलेले जोडे घातलेला एक बुटका माणूस वेराइटीच्या
स्टेजवर एक साधारण दुचाकी सायकल चालवंत प्रविष्ट झाला. फॉक्स्ट्रॉटच्या
स्वरलहरींच्या पार्श्वभूमीवर त्याने एक चक्कर मारला. मग तो विजयी मुद्रेंत ओरडला, ज्याने सायकल मागच्या चाकावर सरळ उभी राहिली. मागच्या चाकाला चालवंत तो बुटका
माणूस पाय वर करून डोक्यावर उभा राहिला. अत्यंत निपुणतेने त्याने समोरच्या चाकाचे
स्क्रू उघडून त्याला सायकलीतून काढून टाकलं आणि फक्त मागच्या चाकावर दोन्हीं
हातांनी पैडल फिरवंत सायकल चालवंत राहिला.
एका
उंच धातुच्या दांड्यावर,
ज्याच्या टोकावर एक सीट लावलेली होती
आणि एक चाक फिट केलेलं होतं,
भरलेल्या अंगाची, भुरे केस असलेली मुलगी जाळीदार ब्लाउज आणी चांदीचे तारे शिवलेला स्कर्ट
घालून आली. ती स्टेजवर गोल गोल चक्कर मारूं लागली. तिच्याजवळ आल्यावर बुटक्या
माणसाने आपल्या पायाने डोक्यावरची टोपी काढून तिचं अभिवादन केलं आणि स्वागतार्थ
वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढूं लागला.
शेवटी
आठ वर्षाचा, म्हाता-या चेह-याचा एक मुलगा स्टेजवर आला आणि दोन्हीं
मोठ्या कलाकारांचामधे आपल्या लहानग्या सायकलसकट फिट झाला, जिच्यावर मोटरचा भोंगा लावला होता.
ह्या
तिघांनी काही वेळ चक्कर लावले आणि बैण्डच्या हल्ल्यांत स्टेजच्या अगदी टोकापर्यंत
आले. समोरच्या रांगेत बसलेले दर्शक धक्क झाले आणि मागच्या बाजूस झुकले, कारण की दर्शकांना असं वाटंत होतं, की हे त्रिकूट आपल्या
सायकलींसकट स्टेजच्या समोरच्या ऑर्केस्ट्रा-पिटवर जाऊन आदळेल.
पण
सगळ्या सायकली अगदी त्याच वेळी थांबल्या, जेव्हां पुढचं चाक वादकांच्या
डोक्यांवर पडणारंच होतं. सायकल स्वार ‘आप्प’
करंत ओरडले आणि खाली उतरून दर्शकांच
अभिवादन करूं लागले. भु-या केसांची मुलगी दर्शकांकडे फ्लाइंग किस फेकंत राहिली आणि
लहान मुलगा आपल्या भोंग्यावर हास्यास्पद आवाज काढंत राहिला.
सम्पूर्ण
हॉल टाळ्यांच्या गडगडाटाने भरून गेला,
निळ्या पडद्याने दोन्हींकडून सरकंत
सायकल स्वारांना झाकून टाकलं;
दारांवर हिरव्या प्रकाशांत चमकणारे ‘निर्गम’ शब्द विझले आणी ट्रेपेज़ीच्या जाळींत गुम्बदाच्या वर, सूर्यासारखे पांढरे गोळे जळूं लागले. शेवटच्या ‘शो’ पूर्वीचं मध्यांतर झालं होतं.
फक्त
एक माणूस असा होता,
ज्याला ज्यूलीच्या फैमिलीने
दाखवलेले सायकलचे खेळ बिल्कुल पसंत नाही आले, तो होता ग्रिगोरी
दानिलोविच रीम्स्की. तो आपल्या ऑफ़िसच्या खोलींत अगदी एकटा बसून आपले पातळ ओठ चावंत
होता. त्याचा चेहरा सारखा थरथरंत होता. लिखादेयेवच्या अप्रत्याशितपणे गायब
होण्याच्या घटनेशी वारेनूखाच्या अचानक गायब होण्याची घटनापण जोडली गेली होती.
रीम्स्कीला
माहीत होतं, की तो कुठे चाललांय, पण तो गेला तर
खरं...पण परंत नाही आला! रीम्स्कीने खांदे उंचावत स्वतःलाच विचारलं, “पण कां?”
आणि आश्चर्याची गोष्ट ही
होती की त्याच्यासारख्या फिनडाइरेक्टरसाठी सगळ्यांत सोपं होतं त्या ठिकाणी फोन
करणं, जिथे वारेनूखा गेला होता आणी माहिती
काढणं की त्याला काय झालंय, पण
रात्रीचे दहा वाजेपर्यंत तो ह्याबाबत काही निर्णय नाही घेऊ शकला.
शेवटी रात्री दहा वाजतां
त्याने ठरवलं की फोन करावा. टेलिफोनचा रिसीवर उचलतांच त्याला कळलं की त्याचा
टेलिफोन बंद पडलाय. चौकीदारने सांगितलं की थियेटरचे बाकी सगळे फोनसुद्धां बंद
आहेत. ह्या अप्रिय घटनेने, जिला
अलौकिक नाही म्हणता येणार, फिनडाइरेक्टरला
हलवून टाकलं, पण त्याबरोबरंच तो खूषपण झाला,
टेलिफोन
करण्यापासून वाचला!
जेव्हां फिनडाइरेक्टरच्या
डोक्याच्या अगदी वरचा लाल रंगाचा बल्ब लागला आणि उघडझाप करूं लागला,
जी
मध्यांतराची खूण होती, तेव्हांच चौकीदाराने येऊन सांगितलं
की परदेशी कलाकार आलाय. फिनडाइरेक्टर हृदय जणु बंदंच झालं, घोर
निराशेने तो पर्यटक पाहुण्याच्या स्वागतासाठी पुढे आला, कारण
की त्याचं स्वागत करण्यासाठी कोणी उरलंच नव्हतं.
मोट्ठ्या मेक-अप रूममधे,
जिथे
सिग्नलची घंटा वाजंत होती, बरेंच लोक
काही ना काही कारणाने उत्सुकतेने डोकावंत होते. तिथे चमकते ड्रेसेस घातलेले आणि
डोक्यावर पगडी बांधलेले जादूगर होते; विणलेलं
जैकेट घातलेला स्केटर होता; पावडर
लावल्याने पिवळा-पिवळा जाणवंत असलेला संयोजक आणि मेकअपमैन दिसंत होते.
आगंतुक पाहुण्याने सगळ्यांना
आपल्या अभूतपूर्व लाम्बीच्या मस्त फिटिंगच्या फ्रॉककोटने आणि काळ्या नकाबने
प्रभावित केलं होतं. ह्याच्याही पेक्षा अद्भुत होते ह्या काळ्या जादुगाराचे दोन
सहायक : तुटका चश्मा घातलेला चौकटीवाला लम्बू आणि काळा लट्ठया बोका. बोका मागच्या
पायांवर चालंत मेकअप रूम मधे आला आणि सोफ्यावर बसून उघडझाप करणारे विजेचे बल्ब्स
बघूं लागला.
रीम्स्कीने चेह-यावर हसूं
आणायचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेह-यावर कटुता आणि
दुष्टता पसरली. त्याने वाकून जादूगाराचं अभिवादन केलं, जो
बोक्याच्या बाजूला सोफ्यांत बसला होता. हस्तांदोलन नाही झालं. चौकटीच्या लम्बूने
स्वतःच आपला परिचय ‘ह्यांचे सहायक’
असं
म्हणून दिला. फिनडाइरेक्टरला ह्या गोष्टीचं आश्चर्य झालं आणि त्याला हे आवडलं पण
नाही: अनुबन्धांत कोणत्याच सहायकाचा उल्लेख नव्हता.
खूप कटुतेने आणि बळजबरीने
ग्रिगोरी दानिलोविचने आपल्या डोक्यावर येत असलेल्या चौकटीच्या लम्बूला विचारलं की
कलाकार महाशयांच सामान कुठे आहे.
“आमचे स्वर्गातले हीरे,
बहुमूल्य
डाइरेक्टर महोदय,” फाटक्या आवाजांत जादुगाराच्या
सहायकाने म्हटले, “आमचं सामान सदा आमच्या बरोबरंच असतं.
हे
बघा! एक, दोन, तीन!”
आणि आपले हडकुळे बोटं रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर नाचवंत त्याने अचानक बोक्याच्या
कानामागून रीम्स्कीचं सोनेरी घड्याळ पट्ट्यासकट काढलं. हे घड्याळ आत्तापर्यंत
फिनडाइरेक्टरच्या कोटाच्या आत घातलेल्या जैकेटच्या खिशांत चेनने लटकवलेलं होतं.
रीम्स्कीने इच्छा
नसतानासुद्धां आपलं पोट धरलं. तिथे उपस्थित सगळेजण आश्चर्याने ओरडले आणि दारांतून
डोकावणारा मेकअपमैन ‘वाह-वाह’ करूं
लागला.
“तुमचं घड्याळ आहे?
प्लीज़,
घ्या!”
चौकटीचा लम्बू म्हणाला आणि आपल्या घाणेरड्या हाताने घड्याळ रीम्स्कीपुढे केलं.
“ह्याच्याबरोबर ट्राममधे नका
बसू...” संयोजकाने मेकअपमैनला हळूंच पण प्रसन्नतेने म्हटलं.
पण बोक्याने आणखी एक कमाल
केला, जो घड्याळ्याच्या जादूपेक्षा
कितीतरी पटींनी चांगला होता. तो अचानक सोफ्यावरून उठला आणि मागच्या पंजांने चालंत
ड्रेसिंग़ टेबलजवळ ठेवलेल्या तिपाईजवळ गेला; पुढच्या
पंज्याने तिपाईवर ठेवलेल्या काचेच्या मोट्ठ्या बाटलीचं झाकंण उघडून ग्लासमधे पाणी ओतलं,
पाणी
पिऊन झाल्यावर परंत झाकण लावलं आणि मेकअपच्या रुमालाने आपल्या मिश्या पुसल्या.
ह्यावेळेस कोणाच्यांच तोंडून
आवाजदेखील नाही निघाला, सगळ्यांचे
तोंड उघडेच राहिले, फक्त मेकअपमैन खिदळला,
“ओह, कमाल आहे!”
तिस-यांदा घंटी वाजली. सगळे
लोक अन्य चमत्कारांच्या आशेने मेकअपरूम मधून निघून गेले.
एका मिनिटाने दर्शक हॉलमधे
लाइट्स बंद झाले, पडद्याच्या समोर,
खाली
लावलेल्या लैम्पचा लाल प्रकाश येऊं लागला. पडद्याच्या मागून स्टेजवर आला एक जाडा,
लहान
मुलासारख्या प्रसन्न चेह-याचा, चिक्कण
दाढी केलेला, चुरगळलेला चोगा आणि घाणेरडे कपडे
घातलेला माणूस. हा होता सम्पूर्ण मॉस्कोला परिचित आणि प्रिय असलेला संयोजक जॉर्ज
बेंगाल्स्की.
“तर, नागरिक
हो...” बेंगाल्स्कीने मुलांसारखं स्मित करंत म्हणायला सुरुवात केली,
“आता आपल्या समोर येणार आहेत...” आणि बेंगाल्स्कीने आपलंच म्हणणं
मधेच तोडंत दुस-यांच स्टाइलमधे म्हणायला सुरुवात केली, “मी
बघतोय की तिस-या सेक्शनमधे दर्शकांची संख्या वाढलीये. आमच्याकडे आज अर्धं मॉस्को
आलंय! काही दिवसांपूर्वी मी आपल्या एका मित्राला भेटलो होतो. मी विचारलं : “आजकाल
तू आमच्याकडे कां येत नाहीस? काल
आमच्याकडे अर्धं मॉस्को आलेलं होतं.” त्याने उत्तर दिलं, “मी
उरलेल्या अर्ध्या मॉस्कोंत राहतो.” बेंगाल्स्की
थोडा थांबला, ह्या अपेक्षेने,
की
लोक हसतील, पण जेव्हां कोणीच नाही हसलं तेव्हां
तो म्हणाला, “तर, प्रस्तुत
आहे प्रसिद्ध परदेशी कलाकार मिस्टर वोलान्द - आपल्या काळ्या जादूचे कमाल घेऊन
आलेले! पण, आपल्याला तर माहीतंच आहे...”
बेंगाल्स्की विद्वत्तापूर्ण स्मित करंत म्हणाला, “की
काळ्या जादूच अस्तित्व नसतं, तो फक्त एक
भ्रम आहे; आणि मिस्टर वोलान्दला सगळ्या
प्रकारचे जादू अवगत आहेत; जे ह्या
कार्यक्रमाच्या सगळ्यांत मनोरंजक भागांत प्रकट होईल – हा कार्यक्रम आहे जादूच्या
कलाकौशल्याचे रहस्योद्घाटन, आणि आम्हां
सगळ्यांना ह्या प्रक्रियेंत आणि तिच्या रहस्योद्घाटनाचे कुतूहल आहे,
म्हणून
मी वोलान्द महाशयांना आमंत्रित करतो...”
येवढं म्हणून बेंगाल्स्कीने
आपल्या दोन्ही हातांना अभिवादनाच्या मुद्रेंत हलवंत पडद्याकडे इंगित केलं,
आणि
हलका आवाज करंत पडदा उघडला.
जादूगाराचं आपल्या उंच
किडकिडीत सहायक आणि मागच्या पंजांवर चालंत येणा-या बोक्याबरोबर प्रवेश करणं जनतेला
खूप आवडलं.
“खुर्ची!” वोलान्दने हळूंच
आज्ञा दिली, आणि लगेच माहीत नाही कुठून आणि कशी
स्टेजवर एक खुर्ची प्रकट झाली, जिच्यावर
बसून जादुगार म्हणाला, “मला हे सांग,
लाडक्या फागोत,” वोलान्द चौकटीच्या लम्बूकडे वळला,
ज्याचं
स्पष्ट आहे की करोव्येव व्यतिरिक्त आणखी एक नाव होतं, “तुला
काय वाटतंय, मॉस्कोची जनता खूप बदललीयं?”
जादुगाराने जनतेकडे बघितलं,
जिला
हवेतून प्रकट झालेली खुर्ची बघून धक्का बसला होता.
“बरोबर म्हणतांय,
साहेब!”
फागोत-करोव्येवने पण हळूंच आवाजांत उत्तर दिलं.
“तू बरोबर म्हणतोस,
लोक
खूप बदललेत; बाहेरून, मला
वाटतं, अगदी तसेच, जसं
हे शहर बदललंय. त्यांच्या वेशभूषेबद्दल तर काही म्हणायलांच नको,
पण
आता दिसतांत ह्या...काय म्हणतांत...ट्रामगाड्या, मोटरगाड्या...”
“बसेस,”
फागोत
नम्रतेने पुढे म्हणाला.
जनता लक्षपूर्वक हे संभाषण
ऐकंत होती, ह्या भावनेने की ही जादूच्या
प्रयोगांची प्रस्तावना आहे. रंगमंचाचा पार्श्वभाग कलाकार आणि रंगकर्मी ह्यांनी
खचाखच भरला होता आणि त्यांच्यामधे रीम्स्कीचा तणावग्रस्त, निस्तेज
चेहरा दिसंत होता.
बेंगाल्स्की,
जो
स्टेजच्या एका कोप-यावर होता, बेचैन
व्हायला लागला; त्याने एक भुवई वर केली आणि ह्या
रिकाम्या क्षणाचा फायदा घेत म्हणाला, “परदेशी
कलाकार मॉस्कोने विस्मित झालेले वाटतांत, जे
तांत्रिकदृष्ट्या खूप विकसित झालंय, आणि
मॉस्कोवासियांनीसुद्धां त्यांना प्रभावित केलंय,” इथे
बेंगाल्स्कीने दोनदा स्मितहास्य केलं : पहिलांदा – खाली बसलेल्या दर्शकांसाठी,
आणि
दुस-यांदा – बाल्कनीत बसलेल्या लोकांसाठी.
वोलान्द,
फागोत
आणि बोक्याने आपले चेहरे संयोजकाकडे वळवले.
“मी काय विस्मयाचं प्रदर्शन
केलंय?” जादुगाराने फागोतला विचारलं.
“बिल्कुल नाही,
महाशय,
तुम्हीं
कोणत्याही प्रकाराच्या विस्मयाचं काहीच प्रदर्शन केलेलं नाहीये,”
त्याने
उत्तर दिलं.
“मग,
हा माणूस काय म्हणतोय?”
“ते तर तो असंच खोटं बोललाय!”
खणखणीत आवाजांत सम्पूर्ण थियेटरला सम्बोधित करंत चौकटीवाला सहायक म्हणाला आणि
बेंगाल्स्कीकडे वळून तो पुन्हां म्हणाला, “अभिनंदन,
तुमचं,
महाशय
खोटारडे!”
बाल्कनीतून हसण्याचे आवाज
घुमले. बेंगाल्स्कीने थरथरंत आपले डोळे दाखवले.
“पण मला,
स्पष्टंच
आहे, तेवढी उत्सुकता नाहीये बसेसमधे,
टेलिफोन्समधे
आणि इतर ...”
“उपकरणांमधे!” लम्बू
म्हणाला.
“अगदी बरोबर,
धन्यवाद!”
हळू-हळू भारी-भरकम आवाजांत जादुगार म्हणाला, “मला
ह्या गोष्टींत उत्सुकता आहे, की काय
ह्या लोकांच्या अंतरात्म्यांतदेखील काही परिवर्तन झालंय?”
“हो, महाशय,
हा
फार महत्वपूर्ण प्रश्न आहे.”
स्टेजच्या पार्श्वभागांत लोक
डोळ्यांच्या कोप-यांतून एकमेकांकडे बघूं लागले आणि खांदे उचकावूं लागले.
बेंगाल्स्कीचा चेहरा लाल झाला होता. रीम्स्कीचा पिवळा, पण
तेवढ्यांत हॉलमधे सुरूं झालेल्या उत्सुकतेकडे बघून जादुगार म्हणाला,
“आपण बरंच बोललोय, प्रिय
फागोत, आणि जनता ‘बोर’
होऊं
लागलीय. चल, सुरुवातीला काही सोपांसा खेळ दाखवून
दे.”
हॉलमधे थोडीशी हालचाल झाली.
फागोत आणि बोका वेगवेगळ्या दिशांकडे सरकले. फागोतने आपली बोटं नाचवंत म्हटलं,
“तीन, चार!” आणि हवेतूंन एक पत्त्यांची
गड्डी अवतरली. तिला फेटून त्याने अश्या प्रकारे सोडलं, की
ती एका रिबिनसारखी दिसूं लागली. बोक्याने ह्या रिबिनीला पकडून परंत सोडलं. फागोतने
घरट्यांत दुबकलेल्या पक्ष्यासारखं आपलं तोंड उघडलं आणि सापासारख्या वळवळंत
असलेल्या रिबिनीचा एक-एक पत्ता गिळून टाकला.
बोक्याने मागचा उजवा पंजा
फिरवंत झुकून जनतेचं अभिवादन केलं. हॉल टाळ्यांचा गडगडाटाने दुमदुमून गेला.
“अप्रतिम,
शाबास!”
लोक ओरडले.
फागोतने खाली बसलेल्या
लोकांकडे बोट दाखवलं आणि त्यांना संबोधित करंत म्हणाला:
“मेहेरबान,
कदरदान!
ह्या वेळेस पत्त्यांची गड्डी सातव्या रांगेत बसलेल्या पार्चेव्स्कीच्या खिशांत आहे
– तीन रूबलचा नोट आणि कोर्टाच्या त्या समनच्या मधे, ज्यांत
त्यांना मैडम जेल्कोवायाचं कर्ज फेडण्याच्या संबंधांत बोलावलंय.”
समोरच्या रांगांमधे बसलेल्या
लोकांमधे गडबड व्हायला लागली, लोकं
उठून-उठून बघायला लागले आणि शेवटी एका नागरिकाने, ज्याचं
नाव खरंच पार्चेव्स्की होतं, विस्मयाने
आणि भीतीने आपल्या खिशांतून पत्त्यांची गड्डी काढली आणि तिला हवेंत फिरवूं लागला,
हे
न समजल्याने की तिचं करायचं तरी काय.
“ती तुमच्या जवळंच राहू द्या,
आठवणीसाठी!”
फागोत ओरडला, “काल संध्याकाळी डाइनिंग टेबलवर
तुम्हीं खरंच सांगंत होता की जुगाराशिवाय मॉस्कोंत राहणं कठीण झालं असतं.”
“नेहमीचीचं चाल आहे!”
बाल्कनीतून आवाज आला, “हा त्यांचाच माणूस आहे.”
“तुम्हांला असं वाटतंय?”
डोळे
बारीक करून बाल्कनीकडे बघंत फागोत गरजला, “मग तर
तुम्हीं सुद्धां आमचेच आहांत, कारण की पत्त्यांची
गड्डी आतां तुमच्या खिशांत आहे!”
बाल्कनींत काही हालचाल झाली
आणि एक आश्चर्यमिश्रित किंचाळी ऐकूं आली.
“अगदी बरोबर! त्याच्यांच जवळ
आहे! ही घ्या, ही आहे! थांब! हो,
ही
तर दहा-दहा रूबल्सच्या नोटांची गड्डी आहे!”
खाली बसलेल्या लोकांनी वळून
बघितलं. बाल्कनींत बसलेल्या एका माणसाच्या खिशांतून बैंकेत बनवलेली गड्डी निघाली,
जिच्यावर
लिहिलं होतं “एक हज़ार रूबल”.
आजूबाजूला बसलेले लोकं
त्याच्यावर ओणवे होऊं लागले, आणि तो
घबारलेल्या अवस्थेत बैंकेकडून चिकटवलेला कागद फाडून हे बघण्याचा प्रयत्न करंत होता,
की
नोट खरे आहेत की जादूचे.
“अरे देवा! खरे आहेत!
दहा-दहा रूबल्सचे नोट!” बाल्कनीतूंन प्रसन्न किंचाळ्या ऐकूं आल्या.
“माझावरसुद्धां हा
पत्त्यांचा चमत्कार करा,” हॉलच्या
मधोमध बसलेला एक जाडा ओरडला.
“ओह, आनंदाने!”
फागोतने उत्तर दिलं, “पण फक्त तुमच्यावरंच कां?
आपण
सगळेच ह्या खेळांत कां सामिल होऊं नये!” आणि त्याने हुकुम दिला,
“कृपा करून वर बघा! एक!” त्याच्या हातांत पिस्तौल दिसूं लागली,
तो
ओरडला, “दोन!” पिस्तौलची नळी वर गेली. तो
ओरडला, “तीन!” पिस्तौल चालायचा आवाज आला आणि
हॉलमधे पांढ-या कागदांचा पाऊस पडूं लागला. ते हॉलमधे तरंगत होते;
इकडे-तिकडे,
बाल्कनीवर,
ऑर्केस्ट्रावर,
स्टेज
वर...काही क्षणानंतर नोटांचा हा पाऊस आणखी दाट होत-होत खुर्च्यांपर्यंत पोहोचून
गेली. दर्शक त्यांना पकडूं लागले.
शैकडो हात उचलले गेले;
दर्शकांनी
नोटांच्या आर-पार प्रकाशित स्टेजकडे पाहिलं आणि त्यांच्यावर छपलेल्या चिन्हांना
लक्षपूर्वक बघितलं – ते खरे होते. नोटांच्या वासाने तर काही शंकांच नाही सोडली: हा
ताज्या छापलेल्या नोटांचा सुगंध होता. आधी प्रसन्नतेने आणि मग विस्मयाने सम्पूर्ण
थियेटर व्यापून गेलं. चारीकडून आवाज येत होते, “नोट,
नोट!”
विस्मयजनित किंचाळ्या, “आह, आह!”
ऐकूं येत होत्या. आणि खिदळणंसुद्धा ऐकूं येत होतं. कोणी-कोणीतर रांगंत-रांगंत
खुर्च्यांच्या खाली उडून पोहोचलेल्या नोटांना पकडंत होतं. बरेंच लोक खुर्च्यांवर
उभे राहिले आणि तरंगणा-या सैतान नोटांना पकडूं लागले. पोलिसचे शिपाई दंग झाले होते
आणि कलाकार निःसंकोच स्टेजच्या पार्श्व भागांतून निघून बाहेर येऊं लागले.
ड्रेस सर्कलमधे एक आवाज ऐकूं
आला, “तू हिला कां पकडतोयं? ही
माझी आहे. माझ्याकडे उडून आली होती!” आणि दुसरा आवाज म्हणाला,
“धक्का कशाला मारतोयंस? मी पण
धक्का मारीन!” तेवढ्यांत हॉलमधे पोलिसवाल्याची हैट दिसली. हॉलमधून कोणालातरी पकडून
नेलं.
लोकांची उत्तेजना वाढंतच
होती आणि जर फागोतने हवेंत फूक मारून नोटांचा हा पाऊस थांबवला नसता,
तर
न जाणे ती कोणच्या थराला पोहोचली असती.
दोन तरूणांनी अर्थपूर्ण
नजरेने एकमेकांकडे पाहिलं आणि हसंत आपल्या जागेवरून उठून सरंळ जलपानगृहाकडे
निघाले. थियेटरमधे धिंगाणा चालू होता, सगळ्यांच
दर्शकांच्या डोळ्यांत चमक होती. माहित नाही हे कसं थांबलं असतं,
जर
बेंगाल्स्की हिम्मत करून आपल्या जागेवरून नसतां उठला. स्वतःवर नियंत्रण ठेवंत आधी
त्याने सवयीनुसार आपले हात चोळले, आणि खणखणीत
आवाजांत म्हणाला, “तर, नागरिक
हो, आत्तांच आपण सामूहिक सम्मोहनाचे एक उदाहरण
पाहिले, हा एक वैज्ञानिक प्रयोग होता,
जो
हे सिद्ध करंत होता, की कोणत्याही प्रकारचा जादू,
कोणत्याही
प्रकारचा चमत्कार नसतोंच. आम्हीं वोलन्द महाशयला विनंती करतो की ह्या प्रयोगामागचं
रहस्य आम्हांला समजावून सांगावं. आतां, नागरिक हो,
तुम्हीं
बघाल की हे, नोटांसारखे कागद तसेच गायब होतील,
जसे
ते प्रकट झाले होते.”
त्याने टाळी वाजवली,
पण
कोणीचं त्याचा साथ नाही दिला. त्याच्या चेह-यावर विश्वासपूर्ण स्मित होतं,
पण
डोळ्यांमधे ह्या विश्वासाचा मागमूसही नव्हता, त्यांच्यांत
दिसंत होती प्रार्थना.
जनतेला बेंगाल्स्कीचं भाषण
आवडलं नाही. हॉलमधे पूर्ण शांतता पसरली, जिला तोडलं
चौकटीच्या लम्बूने.
“हे पुन्हां खोटं बोलण्याचं
उदाहरण आहे...” तो जो-याने म्हणाला, “नागरिक हो!
नोट खरे आहेत!”
“हुर्रे!” वरून कुठून तरी
भारी-भरकम आवाज आला.
“पण हा,”
फागोतने
बेंगाल्स्कीकडे बोट दाखवंत म्हटलं, “मला त्रास
देतोय. सतत मूर्खासारख बोलतंच चाललाय. त्याला कुणी विचारो, किंवा
न विचारो, खोट्या-नाट्या बडबडीने सगळ्या ‘शो’चा
विचका करतोय! ह्याचं काय करायला पाहिजे?”
“ह्याचं
डोकंच छाटलं पाहिजे,” बाल्कनीतून कोणीतरी गंभीरतेने
सुचवलं.
“तुम्हाला काय वाटतं?
हे चांगल होईल?” फागोत ह्या मूर्खतापूर्ण
प्रस्तावावर खिदळला, “ह्याचं डोकं छाटावं?
काय
कल्पना आहे! बेगेमोत!” तो बोक्याकडे बघून ओरडला, “असंच
कर! एक, दोन, तीन!!”
आणि, एक
अप्रत्याशित घटना घडली. बोक्याचे काळे केस उभे राहिले, तो
भीतीदायक आवाजांत ओरडला, मग त्याने
आपल्या अंगाला गोल-गोल केलं आणि बेंगाल्स्कीच्या छातीकडे चित्त्यासारखी झेप घेतली,
तिथून
त्याच्या डोक्यावर उडी मारली. संयोजकाची मान आपल्या पंजांनी कुरतडंत त्याने दोन
झटक्यांत त्याच्या भरलेल्या मानेपासून डोकं तोडून घेतलं.
थियेटरमधे बसलेले अडीच हजार
लोक एका आवाजांत किंचाळले. तुटलेल्या नसांमधून कारंज्यासारखं उसळंत रक्त खाली पडून
कोट आणि अंगरख्याला भिजवंत होतं. डोकं नसलेलं धड आपल्या पायांवर काही वेळ उभं
राहिलं आणी मग लटपटंत जमिनीवर बसून गेलं. हॉलमधे महिलांच्या उन्मादयुक्त किंचाळ्या
ऐकूं येत होत्या. बोक्याने डोकं फागोतला दिलं, ज्याने
त्याला केसांने धरून दर्शकांना दाखवलं, आणि हे
डोकं एकदम ओरडलं, “डॉक्टरला बोलवा!”
“तू पुन्हां प्रत्येक
गोष्टींत आपलं खोटारडं नाक खुपसशील?” फागोतने
रडंत असलेल्या डोक्याला दरडावून विचारलं.
“नाही,
कधींच
नाही!” डोकं भसाड्या आवाजांत उत्तरलं.
“देवासाठी,
त्याला
नका छळूं!” अचानक बॉक्समधून एका महिलेचा आवाज ऐकूं आला, आणि
जादुगार त्या दिशेकडे वळला.
“तर, नागरिक
हो, ह्याला माफ़ करायचं कां?” फागोतने
हॉलकडे बघंत विचारलं.
“माफ करून टाका! माफ़ करून
टाका!” आधी फक्त महिलांचे आवाज आले. नंतर त्यांत पुरुषांचे आवाजपण मिसळले.
“काय हुकूम आहे,
आका?”
फागोतने
नकाबपोशाला विचारलं.
“जाऊं दे.” तो विचार करंत
उत्तरला, “हे लोकं साधारण माणसांसारखेच आहेत.
पैश्यावर प्रेम करतांत, पण हे तर
नेहमीच होत आलंय...मानवाला पूर्वीपासूनंच पैसा प्रिय आहे, मग
तो कशाचा पण बनवलेला असो...चमड्याचा असो, किंवा
कागदाचा, पितळेचा असो,
किंवा
सोन्याचा. क्षुद्रपणा आहे, आणखी
काय...पण कधी-कधी त्यांच्या हृदयांतपण दयाभावना जागृत होते...साधारण
लोकं...थोडक्यांत सांगायचं तर पूर्वीच्या लोकांसारखेच आहेत...क्वार्टर्सच्या
समस्येने त्यांना बिघडवून टाकलंय...” त्याने आदेश दिला, “डोकं
परंत ठेवून दे.”
बोक्याने अत्यंत कुशलतेने
डोकं परंत मानेवर ठेवलं आणि ते आपल्या जागेवर असं बसलं जसं काही तिथून कधी निघालंच
नव्हतं. आश्चर्याची गोष्ट तर ही होती की जखमेचं काही चिन्हही शिल्लक नाही उरलं.
बोक्याने आपल्या पंजांने बेंगाल्स्कीचा कोट आणि अंगरखा झटकून टाकला. त्यावरचे
रक्ताचे डागसुद्धां गायब झाले.
फागोतने बसलेल्या
बेंगाल्स्कीला उभं केलं. त्याच्या अंगरख्याच्या खिशांत नोटांची एक गड्डी टाकली आणि
त्याला हे म्हणंत स्टेजवरून घालवून दिलं, “इथून निघून
जा! तूं नसलांस की जास्त चांगलं वाटतं!”
उगीचंच इकडे-तिकडे बघून अडखळंत-अडखळंत
संयोजक अग्निशामक यंत्राजवळ पोहोचलांच होता, की
त्याची तब्येत बिघडली, तो दयनीय स्वरांत ओरडला,
“डोकं, माझं डोकं!”
काही लोक त्याच्याजवळ धावले,
ज्यांत
रीम्स्कीपण होता. सूत्रधार रडंत होता, हातांनी
हवेंत जणु काही पकडंत होता आणि बडबडंत होता:
“माझं डोकं परंत द्या! परंत
द्या डोकं! क्वार्टर घेऊन घ्या, पेन्टिंग्स
घेऊन घ्या, फक्त डोकं परंत द्या!”
चपरासी डॉक्टरला बोलवायला
धावला. बेंगाल्स्कीला मेकअपरूम मधे सोफ़्यावर झोपवण्यांचा प्रयत्न केला,
पण
तो उठून-उठून पळंत होता. तो हळू-हळू आक्रामक होत चालला होता. एम्बुलेन्स बोलवावी
लागली. जेव्हां दुर्दैवी संयोजकाला तिथून घेऊन गेले, तेव्हां
रीम्स्की परंत स्टेजकडे धावला. त्याने बघितलं की तिथे अजूनही नवीन-नवीन विचित्र
गोष्टी होतायंत. हो, आता, कदाचित,
थोड्यावेळा
पूर्वी, जादुगार, आपल्या
रंग उडालेल्या खुर्चीबरोबर गायब झालेला होता, पण
दर्शकांना कदाचित ह्याची जाणीवंच नव्हती झाली. त्यांचं लक्ष फागोतच्या विचित्र
हालचालीनेच वेधलं होतं.
आणि फागोतने तडफडंत असलेल्या
संयोजलाला पाठवल्यानंतर दर्शकांना म्हटलं:
“चला,
शेवटी
ह्या ‘बोरिंग’ माणसापासून
मुक्ति मिळाली. चला, आता ‘मीना-बाजार’
सुरूं
करूं या!”
त्याच क्षणी स्टेजवर फारसी
गालिचे प्रकट झाले, मोट्ठे-मोट्ठे आरसे दिसूं लागले,
त्यांच्यावर
हिरवा-हिरवा प्रकाश पडंत होता; आरश्यांच्या
अधे-मधे होते शो-केसेस. ज्यांच्यांत वेगवेगळ्या रंगाचे आणि डिज़ाइन्सचे सुरेख फारसी
पोषाक लटकंत होते. दुस-या शो-केसेसमधे शैकडो टोप्या होत्या – महिलांसाठी –
पंखांच्या, बिनपंखांच्या,
घुंघरू
लावलेल्या, बिना घुंघरूच्या. शैकडो जोडे होते –
काळे, पांढरे, पिवळे,
चामड्याचे,
उंच
टाचेचे, लेस लावलेले,
स्टोन्स
लावलेले. जोड्यांच्या शोकेसेसच्या मधे दिसंत होते सेंटचे शो केसेस,
ज्यांत
ठेवलेल्या क्रिस्टलच्या कुप्यांमधे प्रकाशाचे किरण लपा-छिपी खेळंत होते. लेडीज़
पर्सेसचा तर जणु पहाडंच लागलेला होता – चित्त्याच्या चामड्याचे,
रेशमी,
मखमली,
त्यांच्या
मधे लाम्ब-सोनेरी लिपस्टिक-केसेसचा ढेर लागला.
सैतान जाणे कुठून लाल केस
असलेली एक सुंदर मुलगी, काळा ड्रेस
घालून स्मित करंत सेल्सगर्लच्या स्टाइलमधे शो-केसेसजवळ टपकली. मुलगी फारंच सुरेख
होती...फक्त तिच्या मानेवर असलेल्या जखमेच्या खुणेला सोडलं तर तिच्यांत काहीही
न्यून नव्हतं.
फागोतने अत्यंत गोड हास्य
पसरंत म्हटलं की हे दुकान जुन्या पोषाकांच्या आणि जोड्यांच्या बदल्यांत नवीन पोषाक
आणि नवीन जोडे देणारेय, पैरिसच्या
फैशनचे. प्रसाधन सामग्री आणि पर्सेस बद्दलसुद्धां त्याने हेच सांगितलं.
बोका मागच्या पंजांवर चालूं
लागला, पुढच्या पंजांने त्याने दार
उघडायच्या मुद्रेचा अभिनय केला.
मुलगी गोड,
पण
किंचित भसाड्या आवाजांत काहीतरी गाऊ लागली, जे
कळंत नव्हतं. हो, हॉलमधे बसलेल्या महिलांचचे हावभाव
बघून कळंत होतं की हे बरंच मनोरंजक होतं:
“गेर्लेन,
शानेल
नंबर पाच, मित्सुको, नार्सिस,
नुआर,
ईवनिंग
ड्रेसेस, कॉकटेल पार्टीसाठी ड्रेस...”
फागोत दूर सरकला,
बोक्याने
अभिवादन केलं आणि मुलीने काचेचे शोकेसेस उघडले.
“या!” फागोत गरजला,
“संकोच करू नका, लाजू नका!”
जनता बुचकळ्यांत पडली,
पण
आत्तापर्यंत कुणीच स्टेजवर यायचं धाडंस नव्हतं केलं. शेवटी दहाव्या रांगेतून सावळ्या
रंगाची एक मुलगी स्मित करंत उठली, जणू तिला
ह्या सगळ्याची काहीच फिकिर नव्हती, तिला फक्त
असंच बघायचं होतं; मुलगी बाजूला असलेल्या पाय-या चढून
स्टेजवर आली.
“शाबाश!” फागोत ओरडला,
“पहिल्या पाहुण्याचं स्वागत आहे! बेगेमोत, खुर्ची!
जोड्यांपासून सुरुवात करूं, मैडम!”
सावळी मुलगी खुर्चीवर बसली,
आणि
फागोतने लगेच तिच्यापुढे जोड्यांचा ढीग लावला. त्या श्यामलेने आपल्या उजव्या
पायाचा जोडा काढला, गुलाबी जोडा घालून बघितला,
गालिच्यावर
एक-दोनदा पायाने धम्-धम् केलं, टाच
बघितली.
“हे चावणांरतर नाही?”
तिने
विचारमग्न मुद्रेने विचारलं.
फागोतला दुःख झालं,
“काय म्हणताय!” बोक्यालासुद्धां आवडलं नाही,
त्यानेपण
रागाने म्याऊँ-म्याऊँ केलं.
“मी ही जोडी घेते,
महाशय,”
सावळ्या
मुलीने अत्यंत गरिमेने दुसरापण जोडा घालंत म्हटलं.
तिचे जुने जोडे पडद्यामागे
फेकले गेले, आणि ती सुद्धां फागोत आणि लाल
केसांच्या मुलीसोबंत पडद्याच्या मागे गेली, फागोतच्या
हातांवर हैंगरवर लटकलेले अनेक फैशनेबल ड्रेसेस होते. बोका किंचित संकोचला,
मदत
करूं लागला आणि भाव खाण्यासाठी त्याने आपल्या मानेंवर एक टेप लटकावून घेतला.
एक मिनिटाने ती असा पोषाक
घालून आली, की लोकांने आपाआपल्या हृदयावर हात
ठेवले. ही बहाद्दर मुलगी आश्चर्यकारकपणे सुंदर दिसंत होती. ती आरश्यासमोर थांबली,
तिने
आपले उघडे खांदे बघितले, केसावर हात
फिरवला आणि वळून आपली पाठ बघूं लागली.
आमची फर्म आठवणीसाठी
तुम्हांला ही भेट देतेय,” फागोतने
तिला सेंटची कुपी ठेवलेला डबा देत म्हटलं.
“धन्यवाद!” सावळ्या मुलीने
म्हटलं आणि ती आपल्या सीटकडे जाऊ लागली. जोपर्यंत ती चालंत होती,
दर्शक
उचकून-उचकून त्या डब्याकडे बघंत होते.
आता तर चारी बाजूंनी स्टेजवर
महिलांची गर्दी येऊं लागली. ह्या लोंढ्यांत, उत्तेजनेच्या
वातावरणांत, हास्यांत, खिदळण्यांत
आणि उसास्यांमधे एका पुरुषाचा आवाज ऐकूं आला : “मी तुला नाही जाऊ देणार!” नंतर
बाईचा आवाज आला, “तानाशाह, दुष्ट!
आह, माझा हात तर नको पिरगळूं!”
महिला पडद्यामागे गायब होत
होत्या, आपला घातलेला ड्रेस तिथे फेकून नवीन
पोषाकांत बाहेर येत होत्या. सोनेरी पायाच्या तिपायांवर महिलांची मोट्ठी रांग बसली
होती, ज्या नवीन जोडे घालून-घालून खूप ताकदीने
गालीच्यावर पाय आपटंत होत्या. फागोत गुडघ्यांवर उभा राहून जोडे चढवायला मदत करंत
होता तर पर्सेस आणि जोड्यांच्या ओझ्याने दमलेला बोका शो केसेसमधून जोडे
काढून-काढून तिपाईपर्यंत आणंत होता आणि पुन्हां शोकेसेसकडे परतंत होता.
मानेवर जखमेची खूण असलेली
मुलगी अधून-मधून दिसंत होती आणि शेवटी थकून ती फक्त फ्रेंच भाषेतंच बडबडू लागली.
आश्चर्याची गोष्ट ही होती, की तिने
अर्धा शब्द उच्चारतांच सगळ्या बायका, ज्यांना
बिल्कुल फ्रेंच येत नव्हती, त्यासुद्धां,
तिचं
म्हणणं पूर्णपणे समजून जायच्या.
येवढ्यांत लवकर-लवकर स्टेजवर
येणा-या माणसाने सगळ्यांना चकित केलं. तो धावतंच स्टेजवर पोहोचला आणि म्हणाला,
की
त्याच्या बायकोला फ्लू झालांय म्हणून तो विनंती करतोय की तिच्यासाठीपण काही तरी
देण्यांत यावे. हे सिद्ध करण्यासाठी की तो खरंच विवाहित आहे,
तो
आपला पासपोर्ट दाखवायलासुद्धां तयार होता. ह्या पत्नीप्रेमी पतीच्या विनंतीचं
जोरदार हास्याने स्वागंत झालं, फागोतने
गरजंत म्हटलं की तो पासपोर्ट न बघतांच ह्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास करतोय आणि
त्याने त्याला दोन रेशमी स्टॉकिंग्स दिले. बोक्याने आपल्याकडून लिप्स्टिकची ट्यूब
दिली.
ज्या महिलांना उशीर झाला
होता, त्या स्टेजकडे धावंत येत होत्या.
स्टेजवरून हसंत-हसंत भाग्यशाली महिला बॉल डान्सच्या वेश-भूषेंत,
ड्रैगनचे
डिजाइन असलेल्या स्टॉकिंग्समधे, फॉर्मल
ड्रेसमधे, एका भुवईवर झुकलेल्या टोपीमधे खाली
उतरंत होत्या.
तेवढ्यांत फागोतने घोषणा
केली की उशीर झाल्यामुळे बरोब्बर एक मिनिटाने दुकान उद्या संध्याकाळपर्यंत बंद
करण्यांत येत आहे. आतां तर चेंगरा-चेंगरी आपल्या चरम सीमेवर पोहोचली. महिलांनी
सगळी लाज-शरम गुण्डालून ठेवली, संकोच न
बाळगतां त्या जे हातांत येईल तेच खेचून घेत होत्या. एक महिला वादळासारखी
पडद्याच्या मागे घुसली आणि तिथे आपला घातलेला पोषाक फेकून देऊन जो तिच्या हातांत
आला, तोच ड्रेस घालून बाहेर आली. हा होता मोठाल्या
फुलांचा गाउन, त्याबरोबरंच तिने सेन्टच्या दोन
कुप्या पण हस्तगत केल्या.
बरोब्बर एक मिनिटानंतर
पिस्तौलचा आवाज ऐकूं आला. आरसे गायब झाले, शो-केसेस
आणि तिपाया जमिनीत गडप झाले, गालीचे आणि
पडदा हवेंत विरघळून गेले. शेवटी जुने जोडे आणि जुन्या पोषाकांचा पहाडसुद्द्धां
गायब झाला आणि शिल्लक राहिला फक्त स्टेज – गंभीर, रिकामा
आणि नग्न.
आता ह्या घटनाक्रमांत एका
नवीन व्यक्तिने प्रवेश केला.
बॉक्स नं. 2 मधून एक जड,
खणखणीत,
जोरदार
आवाज आला : “तरीपण, कलाकार महाशय,
आमची
मागणी आहे की तुम्हीं लवकरंच आपल्या ह्या युक्त्यांचं सगळ्यांसमोर रहस्योद्घाटन
करावे; विशेष करून तुम्हीं जो नोटांचा कमाल
दाखवला, त्याबद्दल. त्याचबरोबर
संयोजकालासुद्धां स्टेजवर परंत आणावे. दर्शकांना त्याच्या भविष्याबद्दल काळजी
वाटते.”
हा आवाज होता आज संध्याकाळचे
प्रमुख पाहुणे असलेल्या अर्कादी अपोलोनोविच सिम्प्लेयारोवचा,
जे
मॉस्कोच्या थियेटर्सच्या ध्वनि-संयोजन समितीचे प्रमुख होते.
अर्कादी अपोलोनोविच बॉक्समधे
दोन महिलांबरोबर बसले होते. एक होती मोठ्या वयाची, फैशनेबल,
महागडा
ड्रेस घातलेली; आणि दुसरी – तरूण,
आकर्षक,
साध्या
ड्रेसमधे. पहिली, जसं की नंतर लिहिलेल्या रिपोर्टने
स्पष्ट झालं, त्यांची पत्नी होती आणि दुसरी,
एक दूरची नातेवाईक, जिला अभिनेत्री व्हायचं होतं.
सरातोवहून आलेली ही तरुणी अर्कादी अपोलोनोविचच्याचं फ्लैटमधे राहात होती आणि
थियेटर जगतांला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.
“क्षमा
करा!” फागोत म्हणाला, “मी दिलगीर आहे. रहस्योद्घाटन
करण्यासारखं काहीच नाहीये, सगळं
स्पष्ट आहे.”
“नाही,
माफ़
करा! रहस्योद्घाटनतर झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या ह्या अद्भुत युक्त्या
बुचकळ्यांत टाकतायंत. दर्शक समुदाय मागणी करतोय की तुम्हीं त्यांना समजवावे!”
“दर्शक समुदाय,”
सिम्प्लेयारोवला
मधेच टोकंत तो धीट जोकर म्हणाला, “काहीच
म्हणंत नाहीये. पण अर्कादी अपोलोनोविच,
तुमच्या
ह्या हार्दिक विनंतीकडे लक्ष देत, मी,
रहस्योद्घाटन
करूंनच टाकतो. पण त्यासाठी मला एक छोटासा प्रयोग करायची अनुमति द्याल कां?”
“कां नाही,”
अर्कादी
अपोलोनोविचने सौजन्यानेम्हटले, “पण त्याचं
सुद्धा रहस्य उलगडावं लागेल!”
“कबूल आहे,
कबूल
आहे! तर, अर्कादी अपोलोनोविच,
तुम्हांला
विचारण्याची परवानगी द्या की काल संध्याकाळी तुम्हीं कुठे होते?”
ह्या अनपेक्षित आणि
धृष्ठतापूर्वक विचारलेल्या प्रश्नाने अर्कादी अपोलोनोविचच्या चेह-याचा रंग पार
उडाला.
“काल संध्याकाळी अर्कादी
अपोलोनोविच ध्वनि संयोजन समितीच्या मीटिंगमधे होते,” त्यांच्या
पत्नीने झटक्याने उत्तर दिलं आणि पुढे म्हणाली, “पण,
मला
समजंत नाहीये की ह्या प्रश्नाचा जादूच्या प्रयोगांशी काय संबंध आहे?”
“उई, मैडम!”
फागोतने ठासून म्हटलं, “स्वाभाविकंच आहे की तुम्हांला नाही
समजणार. मीटिंगबद्दल तुम्ही पूर्णपणे भ्रमांत आहांत. मीटिंगचा बहाना करून,
जी
काल संध्याकाळी होणारंच नव्हती, अर्कादी
अपोलोनोविचने आपल्या ड्राइवरला चिस्तीये प्रूदीत असलेल्या ध्वनि संयोजन समितीच्या
बिल्डिंगसमोर सुट्टी दिली (सम्पूर्ण थियेटर स्तब्ध झालं), आणि
स्वतः बसने योलोखोव्स्काया रोडवर प्रवासी थियेटरची अभिनेत्री मीलित्सा अन्द्रेयेव्ना
पोकोबात्काकडे गेले. तिच्यासोबत ते जवळ-जवळ चार तास होते.”
“ओह!” स्तब्धतेंत कोणाचंतरी
विव्हळणं ऐकू आलं.
अर्कादी अपोलोनोविचची तरुण
नातेवाईक हळू, पण भयानक आवाजांत हसू लागली.
“आता समजलं!” ती म्हणाली,
“मला फार पूर्वीपासूनंच शंका होती. आतां तर स्पष्टंच झालं की ह्या
प्रतिभाहीन बाईला लुइज़ा1चा रोल कसा मिळाला!”
तिने अचानक आपल्या छोट्याश्या,
पण
वजनदार छत्रीने अर्कादी अपोलोनोविचच्या डोक्यावर प्रहार केला.
धूर्त फागोत,
जो
खरं म्हणजे करोव्येवपण होता, ओरडला,
“नागरिकहो, हा होता
रहस्योद्घाटनाचा एक नमूना, ज्यासाठी
अर्कादी अपोलोनोविच इतका हट्ट करंत होते!”
“बेशरम,
तू
अर्कादी अपोलोनोविचला हात लावायची हिंमत कशी केली?” अर्कादी
अपोलोनोविचची बायको गरजली. ती आपल्या विशालकाय आकारांत बॉक्समधे उभी होती.
नातेवाइक तरुणीला सैतानी हास्याचा दुसरा झटका आला.
“माझ्याशिवाय त्यांना दुसरं
कोण हात लावूं शकतं?” आणि दुस-यांदा छत्री अर्कादी
अपोलोनोविचच्या डोक्यावर आपटल्याचा आवाज आला.
“पोलिस! हिला घेऊन जा,”
सिम्प्लेयारोवची
बायको इतक्या भयंकर आवाजांत ओरडली की कित्येकांच्या हृदयाची धडधड थांबली.
आणि तेव्हां बोका उडी मारून
माइक्रोफोनजवळ गेला आणि मानवी आवाजांत म्हणाला, “शो
संपलाय!” ऑर्केस्ट्रा! मार्च कापा!!”
मतिहीन झालेल्या निर्देशकाने
न उमजून, की काय करतोय,
यंत्रवत्
आपली छडी फिरवली, पण ऑर्केस्ट्रा सुरूं नाही झाला,
झंकार
ऐकू नाही आला, साजिंद्यांनी पकड नाही घेतली,
फक्त
बोक्याच्या घाणेरड्या विशेषणाप्रमाणे जणुं कापंत असल्यासारखं,
विसंगत
मार्च वाजवणं सुरू केलं.
क्षणभरासाठी असं वाटलं,
की
कदाचित कधीतरी, दक्षिणी ता-यांच्या खाली,
कोणच्यातरी
कॅफ़ेंत काही-काही न समजणारे, धुंद,
तरंगत
असल्यासारखे ह्या मार्चचे शब्द ऐकले होते:
आमच्या साहिबे आज़मला
आवडतांत पाळीव पक्षी
आणि आनंद देतांत त्यांना
सुंदर मुली!!!
कदाचित, असे
कुठलेही शब्दंच नव्हते, पण ह्याच
चालीवर दुसरे कोणचे शब्द होते, फालतू
सारखे, पण मुख्य गोष्ट ही नाहीये. मुख्य
गोष्ट ही आहे, की वेराइटी थियेटरमधे ह्या
प्रकारानंतर गोंधळंच झाला. सिम्प्लेयारोवच्या बॉक्सकडे पोलिस धावले. काही मनचले
बॉक्सच्या रेलिंगवर चढून गेले, विषारी
हास्याचे फेर ऐकूं येत होते. वेड्यासारख्या किंचाळ्या, ज्या
ऑर्केस्ट्राच्या सोनेरी प्लेट्सच्या खणखणाटांत दबून गेल्या.
स्पष्ट दिसंत होतं,
की
स्टेज अचानक रिकामा झाला, फागोत आणि
तो दुष्ट बोका बेगेमोत हवेंत विलीन झाले, गायब झाले,
अगदी
तसेच जसा तो जादूगार काही वेळापूर्वी आपल्या रंग उडालेल्या खुर्चीसकट गायब झाला
होता.
***********
तेरा
हीरोचा
प्रवेश
तर, अनोळखी
माणसाने इवानला बोटाने धमकावले आणि तो कुजबुजला, “श् श्...!”
इवानने पाय पलंगावरून
खाली घेतले आणि बघूं लागला. बाल्कनीतून चिकण्या चेह-याचा, काळे केस
असलेला आणि तरतरीत नाकाचा एक माणूस उत्तेजित डोळ्यांनी खोलींत डोकावंत होता.
जवळपास अडतीस वर्षांच्या ह्या माणसाच्या कपाळावर केसांची एक बट रुळंत होती.
जेव्हां
ह्या रहस्यमय आगंतुकाला विश्वास झाला,
की इवान खोलींत एकटाच आहे, तर त्याने इकडची-तिकडची चाहुल घेतली आणि उडी मारून आत आला. आता इवानने
बघितलं, की तो हॉस्पिटलच्या कपड्यांमधे आहे. लांब अंतर्वस्त्र, जोडे, खांद्यावर भु-या रंगाचा गाउन.
आगंतुकने
इवानला डोळा मारंत किल्ल्यांचा जुडगा आपल्या खिशांत लपवला आणि विचारलं, “मी बसू काँ?” आणि इवानने खूण केल्यावर खुर्चीत बसला.
“तुम्हीं
इथे आलांत कसे? धमकावणारं बोट आठवून इवानने कुजबुजंत विचारलं, “बाल्कनीच्या जाळीच्या दारांवर तर कुलूप आहे नं.?”
दारांवरतर
कुलुपं आहेत,” पाहुणा सांगू लागला, “पण प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना खूपच लाघवी,
पण विसराळू बाई आहे. मी
महिन्याभरापूर्वी तिचा किल्ल्यांचा जुडगा पार केला, आणि अशा प्रकारे मी
बाल्कनींत येऊं शकतो,
जी सगळ्या खोल्यांना वळसा घालते.
म्हणूनंच मी कधी कधी आपल्या शेजा-याला भेटू शकतो.”
“जर
तुम्हीं बाल्कनीत येऊं शकता,
तर उडी मारून पळूं देखील शकता. की उँची
जास्त आहे?” इवानने कुतूहलाने विचारलं.
“नाही,” पाहुणा ठामपणे म्हणाला,
“उंचीची भीति मला नाही वाटंत. पळंत
ह्यासाठी नाही, की पळून जाणार कुठे.” मग थोडं थांबून म्हणाला, “तर, बसूं या?”
“”बसूं
या...” इवानने त्याच्या तपकिरी आणि अत्यंत व्याकुळ डोळ्यांमधे डोकावंत म्हटलं.
“हो...”
पाहुण्याने उत्साहाने विचारले,
“पण, तू आक्रामक तर
नाहीयेस नं.? मला हल्ला,
अत्याचार, सतावणं, पाठलाग करणं...हे सगळं बिल्कुल सहन नाही होत. विशेषकरून माणसाची किंकाळी मी
ऐकूंच शकंत नाही, मग ती दुःखाने फोडलेली किंकाळी असो, किंवा पागलपणाची. पहिले तुम्हीं मला सांगा, तुम्हीं धोकादायक तर
नाहीये नं.?”
“काल
मी रेस्टॉरेन्टमधे एका माणसाचं थोबाड लाल केलं होतं,” कवीने फुशारकी मारंत
स्वीकार केलं.
“कारण?” पाहुण्याने दटावून विचारलं.
“हो, मान्य करतो, काहीच कारण नव्हतं,” इवानने गोंधळून उत्तर
दिलं.
“निर्ल्लजपणा
आहे,” पाहुण्याने आपलं मत सांगून पुढे म्हटलं, “आणि तुम्हीं काय म्हणालांत, थोबाड लाल केलं? हे सिद्ध नाही झालंय की माणसाकडे असतं काय, थोबाड की चेहरा; कदाचित चेहराच असतो. तुम्हीं...मुक्क्यांने...नाही, असं नाही चालणार, ही सवय सोडावी लागेल.”
अशा
प्रकारे इवानला दटावून पाहुण्याने विचारलं:
“व्यवसाय?”
“कवि,” इवानने रुक्षतेने म्हटलं.
आगंतुकाला
आवडलं नाही.
“आह, माझ्याबरोबर असंच का
होतं!” तो उद्गारला, पण मग लगेच स्वतःला सावरंत विचारूं लागला, “तुझं नाव काय आहे?”
“बिज़्दोम्नी.”
“ओय, ओय!” पाहुण्याच्या कपाळावर
आठ्या पडल्या.
“तुम्हाला
काय माझा कविता आवडंत नाहींत?” इवानने उत्सुकतेने विचारलं.
“बिल्कुल
नाही आवडंत.”
“तुम्हीं
कोणत्या वाचल्यायंत?”
“मी
तुझी एकही कविता नाही वाचली,” पाहुण्याने अगदी रुक्षपणे म्हटलं.
“मग
तुम्ही असं कसं म्हणू शकता?”
“ओह, असं पण काय आहे त्यांत?” पाहुणा म्हणाला, “जसं की मी इतरांच्या कविता
वाचल्याच नाहीत? आणि
मग...त्यांच्यात खास असं काय आहे? मी स्वीकार करतो, की त्या चांगल्या आहेत. तुम्हीं स्वतःच सांगा, तुमच्या कविता खरंच चांगल्या आहेत कां?”
“अद्भुत
आहेत!” इवानने निडरतेने दिलखुलास उत्तर दिलं.
“लिहिणं
बंद करा,” आगंतुकाने जणु विनंती करंत म्हटलं.
“वचन
देतो! शप्पथ घेतो!” इवानने दरबारी थाटांत म्हटलं.
ह्या
शपथ विधिवर हात मिळवणी करून शिक्का मोर्तब झालं, तेवढ्यांत कॉरीडोरमधे हल्क्या पावलांचा आणि कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज
आला.
“श्...” पाहुणा कुजबुजला आणि बाल्कनींत उडी
मारून त्याने जाळीचं दार बंद करून घेतलं.
प्रास्कोव्या
फ्योदोरोव्नाने खोलींत डोकावून इवानला विचारलं की त्याला कसं वाटतंय. त्याला
अंधारांत झोपायचंय, की त्याच्यासाठी लाइट राहू द्यायचा? इवानने म्हटलं की लाइट जळू द्यावा. पेशन्टला ‘गुड नाइट’ म्हणून
प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना निघून गेली. जेव्हां सगळ्यादूर सामसूम झाली तेव्हां
पाहुणा परंत आला.
त्याने
तसंच कुजबुजंत इवानला सांगितलं की 119नंबरच्या खोलींत एका लाल रंगाच्या लट्ठ्याला
आणलंय, जो
नेहमी वेन्टिलेटरमधे ठेवलेल्या नोटांबद्दलंच बडबड करंत असतो. तो ठामपणे सांगतोय की
सादोवाया भागांत सैतानी शक्तीच आगमन झालंय.
“पूश्किनला
तोंड भरून शिव्या देतोय आणि सारखा म्हणतोय : ‘कुरोलेसोव, वन्स
मोर, वन्स
मोर!’ पाहुणा
उत्तेजनेने थरथरंत होता. थोडा शांत झाल्यावर तो बसला आणि पुढे म्हणाला, “देव त्यांचं रक्षण करो!”
आणि इवानशी होत असलेला संवाद पुढे वाढवंत म्हणाला,
“तर, तुम्हांला इथे कशाला आणलंय?”
“पोंती
पिलात मुळे,” तोंड वाकडं करून, फरशीकडे बघंत इवानने उत्तर दिलं.
“काय?!” सावधगिरीबद्दल विसरून
पाहुणा ओरडला आणि मग त्याने स्वतःच्या हाताने तोंड बंद केलं, “किती विचित्र गोष्ट आहे!
प्लीज़, प्लीज़
मला सर्व काही सांगा!”
माहीत
नाही कां, इवानला
वाटलं की तो ह्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवूं शकतो. त्याने आधी काहीशा संकोचाने, लाजंत आणि मग निडर होऊन
पत्रियार्शी पार्कमधे काल घडलेली घटना सांगितली. ह्या रहस्यमय चावी-चोराच्या
रूपांत त्याला आपली व्यथा-कथा ऐकणारा सहृदय श्रोताच भेटला होता! पाहुण्याने इवानला
वेडा नाही ठरवलं, त्याची
कथा सम्पूर्ण तल्लीनतेने ऐकली आणि जशी-जशी गोष्ट पुढे वाढंत होती, तो अधिकाधिक उत्तेजित होत
गेला. मधून-मधून तो इवानला टोकंतसुद्धां होता, “हो, हो!
पुढे, पुढे, प्लीज़, पण देवासाठी एकसुद्धां
शब्द सोडूं नका!”
इवानने
पण अगदी पूर्णपणे सगळं सांगितलं. त्याला स्वतःला पण खूप चांगलं वाटंत होतं. तो
बोलंत राहिला, बोलंत
राहिला आणि त्या प्रसंगापर्यंत आला जेव्हां लाल किनारीच्या पांढ-या अंगरख्यांत
पोंती पिलातने बाल्कनींत प्रवेश केला.
तेव्हां
पाहुण्याने प्रार्थनेच्या मुद्रेंत हात जोडले आणि बुदबुदला:
“ओह, मी हाच तर अंदाज केला
होता! ओह, माझा
अंदाज अगदी खरा होता!”
बेर्लिओजच्या
भयानक मृत्युबद्दल श्रोत्याने एक रहस्यपूर्ण टिप्पणी केली, त्याच्या डोळ्यांत कटुता
झळकू लागली:
“मला
एका गोष्टीचं दुःख आहे, की ह्या बेर्लिओज़च्या जागेवर आलोचक लातून्स्की किंवा साहित्यकार म्स्तिस्लाव
लाव्रोविच नव्हते,” – आणि जणुं स्वतःशीच बोलला: “पुढे!”
कण्डक्टरला
पैसे देणा-या बोक्याच्या वर्णनावर तर पाहुणा खूप खुश झाला आणि जेव्हां इवान आपल्या
पंज्यांवर उड्या मारंत मिशांजवळ पैसे ठेवलेल्या बोक्याची नक्कल करंत होता, तेव्हां तर त्याची
हसता-हसता पुरेवाट झाली.
“आणि
अशा प्रकारे...” ग्रिबोयेदोवमधे घडलेल्या घटनेबद्दल सांगताना उदास झालेल्या इवानने
म्हटलं, “मी इथे येऊन पोहोचलो.”
पाहुण्याने
सांत्वना देत इवानच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाला, “दुर्दैवी कवि! पण, मित्रा, तू
स्वतःच ह्या सगळ्या भानगडीसाठी जवाबदार आहेस. त्याच्याशी इतकं अघळ-पघळ बोलण्याची
आणि उर्मटपणा करण्याची काही गरजंच नव्हती. त्याचाच प्रसाद तुला मिळाला. तुला तर ‘धन्यवाद’ म्हणायला पाहिजे, की तू स्वस्तांत सुटला.”
“पण, खरं तर, तो आहे कोण?” इवानने तावातावाने मुक्का
दाखवंत विचारले.
पाहुण्याने
उत्तरादाखल इवानला एक प्रश्न विचारला, “तू घाबरणार तर नाहीं? आपण सगळे निराश लोक आहोत...डॉक्टर्स, इंजेक्शन वगैरे तर नाही ना होणार?”
“नाही, नाही!” इवान अधीरतेने
ओरडला, “सांगा न, तो
कोण आहे?”
“ठीक
आहे,” पाहुणा म्हणाला आणि अत्यंत गंभीरतेने आणि शांतपणे म्हणाला, “काल पत्रियार्शी तलावाच्या
किना-यावर तुमची भेट झाली होती सैतानाशी.”
इवान
घाबरला नाही, कारण
त्याने तसं वचन दिलं होतं, पण तो अगदी आतपर्यंत हादरला.
“हे
अशक्य आहे! सैतानाचं अस्तित्वच नाहीये!”
“माफ़
करा! कमीत कमी तुम्हांला तरी असं म्हणायला नको. तुम्ही पहिले व्यक्ति आहांत ज्याला
त्याच्यामुळे दुःख भोगावं लागलंय. तुम्ही इथेच पागलखान्यांत बसले राहा आणि विचार
करंत बसा की तो नाहीये. कमाल आहे!”
इवान
प्रतिवाद नाही करूं शकला.
“ज्या
क्षणी तुम्हीं त्याचं वर्णन करूं लागलात, मला अंदाज येत गेला की काल तुम्हांला कोणाशी बोलायचं भाग्य लाभलं. मला तर
बेर्लिओज़चं आश्चर्य वाटतंय! पण तुम्ही अगदी बालिश आहांत,” पाहुण्याने दिलगिरीच्या
स्वरांत म्हटले, “त्याच्याबद्दल मी कितीतरी ऐकलंय, थोड फार वाचलंपण आहे! ह्या प्रोफेसरच्या पहिल्याच वर्णनाने माझा संदेह दूर
झाला. त्याला न ओळखणं अशक्य आहे, मित्रा! पण तुम्हीं...तुम्हीं मला पुन्हां माफ करा, जर मी चुकंत नसलो, तर अगदीच कच्चे आहांत?”
“नक्कीच,” इवानला ओळखणं कठीण होतं.
“आणि...चेहरापण, ज्याचं वर्णन तुम्ही करंत
होते...वेगवेळ्या रंगाचे डोळे, भिवया! माफ़ करा, तुम्हीं कदाचित ‘फाउस्ट’ ऑपेराबद्दलसुद्धां
नाही ऐकलंय?”
इवान
खूपच गोंधळला आणि लाल होत, माहीत नाही कां, याल्टाच्या सेनिटोरियमच्या कोणच्यातरी यात्रेबद्दल बडबडू लागला...
“हेच
तर...हेच तर...मला जरासुद्धां आश्चर्य नाही वाटलं! पण बेर्लिओज़ने, मी पुन्हां म्हणतो, त्याने मला धक्काच
पोहोचवलांय. त्याने न केवळ बरंचसं वाचलं होतं, तो अतिशय धूर्त देखील होता. पण वोलान्द तर मोठ्या-मोठ्या धूर्त लोकांच्या
डोळ्यांत सुद्धा धूळ झोकू शकतो, तर बेर्लिओज़ कुठे लागतोय!”
“काय...”
आता ओरडायची पाळी इवानची होती.
“हळू!”
इवानने
कपाळावर हात मारला आणि कुजबुजला, “बरोबर आहे, बरोबर
आहे, त्याच्या
विज़िटिंग कार्डवर ‘व’ अक्षर
होतं. अरे, अरे, अरे; तर अशी गोष्ट होती!” तो
काही वेळ चुप राहिला. बावरला होता. जाळीच्या पलिकडे तरंगणा-या चंद्राकडे बघंत
त्याने विचारलं, “तर, तो, खरंच पोंती पिलातजवळ हजर
होता? त्याचा
तेव्हां जन्म झालेला होता कां? आणि सगळे मला वेडा म्हणतात!” इवानने दाराकडे बोट दाखवंत म्हटलं.
“आपण
सत्याचा सामना करूं या,” पाहुणा तोंड वळवून ढगांमधे पळणा-या रात्रीच्या मुशाफिराकडे बघंत म्हणाला, “तू आणि मी वेडे आहोत, नाही कसं म्हणायचं! बघ ना, त्याने तुला बुद्धू बनवलंय
आणि तू त्याच्या जाळ्यांत अडकलास; तुझी मनःस्थिति ह्यासाठी अनुकूल होती. तू जे सांगतोयंस, ते खरोखरंच घडल होतं. किती
विचित्र गोष्ट आहे, की मनोवैज्ञानिक स्त्राविन्स्कीने पण तुझा विश्वास नाही केला. त्याने तुला
बघितलं होतं?” (इवानने डोकं हलवलं). “तुझ्याशी गोष्टी करणारा पिलातच्या जवळसुद्धां होता, काण्टसोबत ब्रेकफास्टच्या
टेबलाशीपण बसला होता. आणि आता तो मॉस्कोत आलाय.”
“सैतानंच
जाणे तो इथे काय-काय करेल! कसंही करून त्याला पकडलंच पाहिजे नं?” नवीन इवानमधे पुन्हां
जुन्या इवानने डोकं वर करंत अविश्वासाने म्हटलं.
“तू
प्रयत्नतर केलांच होता, पस्तावशील,” पाहुणा उपहासाने म्हणाला, “मी तर म्हणतो की कुणीच असा प्रयत्न करूं नये. तो जे काही करेल, कदाचित चांगलंच करेल. आह, आह! मला कित्ती वाईट वाटतंय की त्याची भेट तुझ्याशी झाली, माझ्याशी नाही! माझं तर
सगळंच स्वाहा झालंय, पण ह्या भेटीसाठी मी प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाचा हा किल्ल्यांचा
जुडगासुद्धां देऊन टाकला असता, देण्यासारखं दुसरं काही तर माझ्याजवळ नाहीये, मी निर्धन आहे!”
“पण
तुला तो कशाला हवाय?”
पाहुणा
उदास झाला, थोडा
डळमळला आणि बरांच वेळ शांत राहून म्हणाला, “बघ, किती
विचित्र गोष्ट आहे, मी इथे त्याच्याचमुळे आलोय, ज्याच्या मेहेरबानीने तूं आलाय. हो, त्याच पोंती पिलात मुळे,” पाहुण्याने भयभीत नजरेने इकडे-तिकडे बघंत म्हटलं,
“गोष्ट अशी आहे, की साधारण वर्षभरापूर्वी मी पोंती पिलातबद्दल एक कादम्बरी लिहिली होती.”
“तू
लेखक आहेस?” कवीने उत्सुकतेने विचारलं.
पाहुण्याचा
चेहरा काळवंडला, त्याने
इवानला मुक्का दाखवंत म्हटलं, “मी मास्टर आहे,” तो गंभीर झाला आणि त्याने आपल्या गाउनच्या खिशांतून एक काळी टोपी काढली, ज्याच्यावर पिवळ्या रेशमी
धाग्याने ‘एम’ अक्षर भरलेले होते. त्याने
टोपी घातली आणि इवानला आपली सम्पूर्ण काया फिरून-फिरून दाखवूं लागला, जणु त्याला सिद्ध करायचं
होतं की तो – मास्टर आहे, “तिने स्वतः आपल्या हातांनी ही टोपी माझ्यासाठी बनवली आहे,” त्याने रहस्यमय आवाजांत
सांगितलं.
“तुझं
आडनाव काय आहे?”
“आता
माझ काही नाव किंवा आडनाव नाहीये,” विचित्र पाहुणा नैराश्याने म्हणाला, “मी त्याचा त्याग केलांय, अगदी तसांच, जसा
जीवनाच्या इतर वस्तूंचा केला. त्याबद्दल विसरूं या.”
“कमींत
कमी तू कादंबरीबद्दल तरी सांग,” इवानने अगदी सभ्यतेने विनंती केली.
“तर
ऐकं, माझं
जीवन, खरोखरंच, साधारण नाहीये,” पाहुण्याने सांगायला
सुरुवात केली.
…इतिहासाची पदवी घेतल्यावर
दोन वर्षापूर्वीपर्यंत तो मॉस्कोच्या एका म्यूज़ियममधे काम करंत होता. त्याबरोबरंच
भाषांतर देखील करायचा.
“कोणच्या
भाषेतून?” इवानला आता मजा वाटू लागली.
“मातृभाषेव्यतिरिक्त
मला आणखी पाच भाषा येतात,” पाहुण्याने सांगितले, “इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लैटिन आणि ग्रीक.
इटालियनसुद्धां थोडीफार वाचू शकतो.”
“वस्ताद
आहेस!” इवानच्या स्वरांत ईर्ष्या होती.
इतिहासकार
एकटाच राहात असे. त्याचे कुणी नातेवाईक नव्हते, मॉस्कोमधे कुणी ओळखीचं सुद्धा नव्हतं. आणि, एक दिवस त्याने एक लाख रूबल्स जिंकले. “मला कित्ती आनंद झाला असेल, ह्याची तुम्ही कल्पनापण
करूं शकंत नाही. काळ्या टोपीवाला
पाहुणा तसंच कुजबुजंत पुढे म्हणाला, “जेव्हां मी मळक्या कपड्यांच्या टोपल्यांत हात घातला आणि टिकिट बघितलं: त्याच्यावर तोच नम्बर होता, जो वर्तमान पत्रांत छापलेला होता! स्टेट बॉण्ड1...” त्याने
समजावलं, “मला त्यांनी म्यूज़ियममधे दिला होता.”
एक
लाख जिंकल्यावर ह्या रहस्यमय पाहुण्याने हे केलं, की पुस्तकं विकत घेतली, म्यास्नित्स्कायाच्या आपल्या खोलीला राम राम ठोकला...
“ऊ...ऊ, तो अगदी कबुत्तरखाना
होता...” पाहुण्याने फिर्यादी सुरांत म्हटले.
...आणि
अर्बातच्या जवळ एका घर मालकाकडून घर भाड्याने घेतलं.
“घर
मालक म्हणजे काय, माहीत
आहे कां?” पाहुण्याने इवानला विचारलं आणि लगेच स्पष्ट केलं, ‘
हे काही थोडेशे बदमाश आहेत, जे मॉस्कोमधे सही-सलामत शिल्लक उरलेयंत.’ तर, घरमालकाकडून
दोन खोल्या भाड्याने घेतल्या. ह्या खोल्या बगिच्याने वेढलेल्या एका लहानश्या
घराच्या तळमजल्यावर होत्या. म्यूज़ियमची नौकरी सोडून दिली आणि पोंती पिलातबद्दल
कादम्बरी लिहूं लागला.
“आह, ते सोनेरी दिवंस होते,” चमकत्या डोळ्यांनी वक्ता
म्हणाला, “एकदम स्वतंत्र घर, त्यांत प्रवेश कक्ष – सिंक असलेला,”
त्याने थोड्याश्या गर्वाने सांगितले, “अगदी गेटकडून येणा-या
पायवाटेकडे उघडणा-या छोट्या-छोट्या खिडक्या, समोरंच, चार
पावलांवर फ़ेन्सिंगला लागून लिली, लिण्डन आणि मैपलचे सुगंधित झाडं! आहा, आहा, आहा!
हिवाळ्यांत मला कधी कधी कुणाचे काळे पाय दिसायचे आणि त्यांच्या खाली करकर करणारा
बर्फाचा आवाज ऐकूं यायचा. माझ्या खोलीची शेकोटी सदा पेटलेली असायची. पण अचानक बहर आला आणि
घाणेरड्या काचेच्या पलिकडे मी लिलीच्या नग्न फांद्यांना हिरवे वस्त्र घालताना पाहिलं.
आणि तेव्हां, मागच्या
वसंत ऋतूंत,
एक अशी सुखद गोष्ट घडली, जी एक लाख रूबल्स जिंकण्यापेक्षांही जास्त महत्वपूर्ण होती. तसं, एक लाख पुष्कळ असतांत, हे तर तूसुद्धां मान्य
करशील.”
“बरोबर
म्हणतोयंस,” लक्ष देऊन ऐकंत इवान उत्तरला.
“मी
खिडक्या उघडल्या आणि अगदी लहान, दुस-या खोलींत, बसू लागलो.” पाहुण्याने हावभाव करंत सांगितलं,
“हा दिवान, त्याच्यासमोर आणखी एक दिवान, त्यांच्यामधे एक छोटंसं टेबल, त्यावर सुंदरसा नाइट लैम्प, आणि तिकडे, खिडकीजवळ
पुस्तकं; आणि
इथे – लहानसं राइटिंग टेबल; आणि समोरच्या चौदा वर्गमीटर्सच्या खोलीत – पुस्तकं, पुस्तकं आणि शेकोटी! आहा, काय ते दिवंस! – लिलीचा
सुगंध! माझं डोकं थकून हल्लक व्हायचं, पिलात शेवटाकडे वाटचाल करंत होता...”
“पांढरा
अंगरखा, लाल
किनार! मी समजतोय!” इवान उद्गारला.
“अगदी
बरोबर! पिलात धावत होता, समाप्तिकडे, समाप्तिकडे, आणि मला माहीत होतं की
कादम्बरीचे शेवटचे शब्द असतील : ‘जूडियाचा पाचवा न्यायाधीश, अश्वारोही पोंती पिलात’. मग, साहजिक
आहे, मी
हिंडायला निघून जायचो. एक लाख बरीच मोठी रकम होती. माझ्याकडे राखाडी रंगाचा सूट होता.
किंवा एखाद्या स्वस्त रेस्टॉरेन्टमधे जेवायला निघून जायचो. अर्बातमधे एक छानसं
रेस्टॉरेन्ट आहे, माहीत
नाही आता ते आहे किंवा नाही.”
पाहुण्याचे
डोळे विस्फारले आनी तो चंद्राकडे बघंत पुढे म्हणाला:
“ती
हातांत घाणेरडे, उत्तेजित
करणारे पिवळे फुलं घेऊन चालली होती. सैतान जाणे त्या फुलांच काय नाव आहे, पण काय माहीत कां ते
सगळ्यांत आधी मॉस्कोमधेच दिसतांत. ही फुलं तिच्या काळ्या हलक्या कोटावर विसंगतंच
वाटंत होती. ती पिवळे फुलं घेऊन चालली होती! घाणेरडा रंग आहे. त्वेर्स्काया
स्ट्रीट वरून ती एका गल्लीत शिरली आणि तिने एकदम वळून माझ्याकडे बघितलं.
त्वेर्स्काया स्ट्रीट माहीत आहे ना? त्वेर्स्कायावर हज़ारो लोक जात होते, पण मी शप्पथ घेऊन सांगतो की तिने फक्त मला बघितलं. आणि उत्तेजनेने नाहीं, तर काहीश्या पीडेने.
तिच्या सौंदर्याने मला तेवढं घायाळ नाही केलं, जेवढं तिच्या डोळ्यांत असलेल्या असाधारण, समजू न शकणा-या एकटेपणाने!
“त्या
पिवळ्या रंगामुळे मीसुद्धां गल्लीत वळलो आणि तिच्या मागे-मागे चालू लागलो. आम्ही
त्या वाकड्या-तिकड्या, कंटाळवाण्या गल्लींत चुपचाप चालंत होतो; मी एका बाजूला आणि ती दुस-या बाजूला. आणि, कल्पना करा, गल्लींत
एकही चिटपाखरू नव्हतं. मी व्याकुळ होतो, कारण मला असं वाटंत होतं, की माझं तिच्याशी बोलणं गरजेचं होतं. आणि मी धास्तावलो होतो, की मी एकही शब्द बोलूं शकणार नाही आणि ती तिथून निघून जाईल, मी तिला पुन्हां कधीही बघू
शकणार नाही.
“आणि, बघा, ती एकदम म्हणाली:
“तुम्हांला
माझी फुलं आवडलीत?”
“मला
चांगलंच आठवतंय की त्या गल्लीत तिचा आवाज कसा घुमला होता; किंचित जाड, थांबंत-थांबंत - त्याची प्रतिध्वनि गल्लीत घुमली आणि
घाणेरड्या पिवळ्या भिंतीवर आदळून परत फिरली.
मी
लगेच तिच्याकडे जात म्हटलं, “नाही!”
“तिने
आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि मी, लगेच, अप्रत्याशितपणे, चक्क समजून चुकलो की ही
तीच आहे, जिच्यावर
मी आयुष्यभर प्रेम करतोय! झाला नं चमत्कार, हँ? तू
नक्की म्हणशील, वेडा
आहे कां?”
“मी
काहीच म्हणंत नाहीये,” इवानने उत्तर दिलं आणि म्हणाला, “पुढे सांग नं, प्लीज़!”
पाहुणा
पुढे म्हणाला:
“हो, तिने आश्चर्याने माझ्याकडे
बघितलं आणि पुन्हां विचारलं, ‘तुम्हांला फुलं आवडंत नाहीत?”
तिच्या
आवाजांत, कदाचित, आक्रामकता होती. मी तिच्या
बरोबर-बरोबर चालंत होतो, तिच्या पावलाशी पाऊल मिळवंत आनि मला जरा सुद्धां संकोच वाटंत नव्हता.
“नाही, आवडतांत फुलं, पण ही, असली नाहीं,” मी म्हटलं.
“मग
कसली?”
“मला
गुलाब आवडतो.”
“मला
दुःख झालं की मी असं कां म्हटलं, कारण की ती किंचित लाजली आणि तिने फुलं खड्ड्यांत फेकून दिले. मी चाटंच
पडलो. मी फुलं उचलून तिच्या हातांत देऊं लागलो, पण तिने हसून त्यांना दूर सारलं. मीच फुलं हातांत धरून चालू लागलो.
असे
चुपचाप आम्हीं तोपर्यंत चालंत होतो, जोपर्यंत तिने ती फुलं माझ्या हातांतून खेचून फुटपाथवर नाही फेकून दिली. मग
तिने आपल्या सुरेख काळा हातमोजा घातलेल्या हातांत माझा हात घेतला आणि आम्हीं बरोबर
चालूं लागलो.”
“मग?” इवानने विचारलं, “कृपा करून सगळं सांगा, काहीही सोडूं नका.”
“मग?” पाहुण्याने उलंट प्रश्न
केला, “मग काय झालं, तुम्हीं स्वतःच अंदाज़ लावूं शकता. त्याने डोळ्यांत अचानक आलेल्या अश्रूंना
उजव्या हाताने पुसलं आणि सांगू लागला – “आमच्या समोर जसं अचानक मूर्तिमंत प्रेम
उसळून प्रकट झालं; जणु
एखाद्या निर्मनुष्य गल्लींत ज़मिनीतून कोणी मारेकरी प्रकट होतो, त्याने आम्हां दोघांना दचकवलंच!
जशी
वीज दचकवते, जसा
फिनिश सुरा दचकवतो!
नंतर
तिने मला सांगितलं, की अशी ‘अचानक’ सारखी गोष्ट नव्हतीच, खरं म्हणजे आम्ही दोघं फार
पूर्वी पासून एकमेकावर प्रेम करंत आलोय, एक-दुस-याला न ओळखता, न बघता. ती कोण्या दुस-या माणसाबरोबर राहात होती आणि मी सुद्धां तेव्हां…त्या...काय नाव...”
“कोणाबरोबर?” इवानने विचारलं.
“त्याच...ओह, तीच...अ...” पाहुणा बोट
मोडंत म्हणाला.
“तुमचं
लग्न झालं होतं कां?”
“हो, हो, म्हणूनंचतर मी आठवायचा
प्रयत्न करतोय...लग्न झालं...वारेन्काशी, की मानेच्काशी, नाही, वारेन्काशी...रेघा-रेघांचा
ड्रेस घातलेली...म्यूज़ियम...पण मला आठवंत नाहीये.
“मग
ती म्हणाली, की
हातांत पिवळी फुलं घेऊन त्यादिवशी ती ह्याचसाठी निघाली होती की मी तिला ओळखावं, आणि जर असं नसतं झालं तर
ती विष खाऊन मरून गेली असती, कारण तिचं जीवन एकदम पोकंळ आहे.”
“हो, प्रेमाने एका क्षणांत
आम्हाला चकित केलं, मी ही गोष्ट त्याच दिवशी एका तासानंतर समजून गेलो, जेव्हां कुठेच लक्ष न देता
क्रेमलिनच्या नदीकडच्या भिंतीजवळ पोहोचलो. आम्ही अशा प्रकारे बोलंत होतो, जणु कालंच एकमेकांपासून
दूर झालो होतो, जणु
एकमेकांना वर्षानुवर्षे ओळखंत होतो. दुस-या दिवशी पुन्हां तिथेंच, मॉस्को नदीच्या किना-यावर
भेटण्याचं वचन देऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि सांगितल्याप्रमाणे भेटलो.
मेचा सूर्य आम्हांला आलोकित करायचा. आणि लवकरंच ती माझी बायको झाली, उघडपणे नाही, गुप्तपणे.
“ती
रोज माझ्याकडे यायची, मी सकाळपासूनंच तिची वाट बघायचो. आपली अस्वस्थता लपविण्यासाठी मी उगीचंच
टेबलावर पडलेल्या वस्तू इकडे-तिकडे करायचो. ती यायच्या दहा मिनिटांपूर्वीच मी
खिडकींजवळ बसून जायचो आणि गेटचा कानोसा
घ्यायचो. आणि बघा : तिच्याशी माझी भेट व्हायच्या आधी आमच्या अंगणांत क्वचितचं कुणी
यायचं, खरं-खरं
सांगायचं म्हटलं तर कुणीच नाही यायचं; आणि आता, मला
असं वाटायचं की जणु सम्पूर्ण शहरंच आमच्याकडे धावत येतंय. गेट वाजायचं, हृदय धडधडायचं, पण हाय, माझ्या खिडकीलगतच्या
पायवाटेवर दिसायची घाणेरड्या जोड्यांची एक जोडी. चाकूची धार करणारा. कोणाला पाहिजे
चाकूची धार करणारा? कशाची धार करायचीय? कुठले चाकू? कसले
चाकू?
“ ती गेटमधून एकदांच आत
यायची, पण
हृदय त्याआधी दहा तरी वेळा धडधडून जायचं. मी खोटं नाहीं सांगत. नंतर जेव्हां तिची
यायची वेळ व्हायची आणि घड्याळांत बारा वाजायचे, हृदय तोपर्यंत धडधडंत राही, जोपर्यंत पावलांचा आवाज न करतां, चुपचाप, स्टीलचे
सुंदर बकल्स लावलेले काळे जोडे माझ्या खिडकीसमोरून जायचे.
“कधी
कधी ती खोडकरपणाने दुस-या खिडकीजवळ थांबून आपल्या जोड्याच्या नोकेने काचेवर ठक-ठक
करायची. मी लगेच खिडकीजवळ धावायचो. जोडा गायब व्हायचा; काळी, उजेडाला
रोखणारी मखमल लुप्त व्हायची आणि मी तिच्यासाठी घराचे दार उघडायचो.
“आमच्या
प्रेमाबद्दल कुणालांच कळलं नाही, हे मी अगदी पैजेवर सांगू शकतो, खरं तर असं कधी होत नाही. पण ह्या बाबतीत तिच्या नव-याला , किंवा परिचितांना पत्ता
देखील लागला नाही. त्या जुन्या घरांत, ज्याच्या तळघरांत मी राहायचो, लोकांना फक्त येवढचं माहीत होतं, की माझ्याकडे कुणी बाई येते, पण तिचे नाव कुणालांच माहीत नव्हते.”
“पण
ती आहे कोण?” इवानने विचारलं, त्याला ह्या प्रेम प्रकरणांत कमालीची उत्सुकता वाटंत होती.
पाहुण्याने
खुणेनेंच सांगितलं की तो कधीसुद्धां कुणालाही ह्याबद्दल सांगणार नाही. त्याने आपली
गोष्ट चालू ठेवली.
इवानला
कळून चुकले की मास्टर आणि ती अनोळखी महिला एकमेकांवर इतकं प्रेम करंत होते की
त्यांना दूर करणे अशक्य होते. इवान आपल्या कल्पनेंत तळमजल्यावरच्या दोन खोल्या
बघंत होता, तिथे
लिलीच्या
झाडांमुळे आणि कम्पाउन्डच्या भिंतीमुळे नेहमी अंधुक प्रकाश असायचा; महोगनीचं जुनं फर्नीचर, अलमारी, त्यावर घड्याळ, जी दर तीस मिनिटांनी घंटे
वाजवायची, आणि
पुस्तकं – खालपासून वरपर्यंत – आणि छोटीशी शेकोटी.
इवानला
हे पण कळलं की त्याचा पाहुणा आणि त्याची रहस्यमय बायको आपल्या संबंधांच्या
सुरुवातीलाच समजून चुकले होते की त्या दिवशी त्वेर्स्काया रोडवर आणि नंतर गल्लींत
नशीबंच त्यांना खेचंत घेऊन गेलं होतं आणि हे सुद्धां, की अनंत काळासाठी त्यांचा जन्म एकमेकांसाठीच झालाय.
पाहुण्याच्या
वर्णनावरून इवानला कळले, की हे प्रेमी आपला दिवस कसे घालवायचे. आल्याबरोबर ती एप्रन घालायची आणि त्या
छोट्याश्या खोलींत, जिथे त्या रुग्णाचं प्रिय वाश-बेसिन होतं, लाकडाच्या टेबलवर केरोसिन-स्टोव पेटवून नाश्ता तयार करायची. मग समोरच्या
खोलींत टेबलवर नाश्ता ठेवायची. जेव्हां मे महिन्यांत विजा कडकडायच्या, मुसळधार पाऊस पडायचा आणि
त्यांच्या अंधुक पडलेल्या खिडक्यांच्या जवळून पाणी झरझर वाहंत, ह्या आरामशीर घरट्यांत
घुसायचा प्रयत्न करायचं, त्यावेळेस प्रेमी शेकोटी पेटवायचे आणि त्यांत बटाटे भाजायचे. बटाट्यांमधून
वाफ निघायची, त्यांचे
काले पडलेले सालटं बोटांनापण काळ करायचे. तळघरांत हास्याचे पडसाद ऐकूं यायचे; पावसानंतर बागेतील झाडं
आपल्या ओल्या फांद्या काढून फेकायचे. पावसाळ्यानंतर दमंट उन्हाळा आला आणि
फ्लॉवरपॉटमधे, ब-याच
प्रतीक्षेनंतर दोघांच्या पसंतीचे गुलाब सजू लागले.
तो, ज्याने आपलं नाव मास्टर
सांगितलं होतं, लिहीत
बसायचा आणि ती, केसांत
आपले नाजुक बोटं घालून लिहिलेली पानं पुष्कळदां वाचायची आणि वाचून झाल्यावर ह्या
टोपीवर विणकाम करूं लागायची. कधी-कधी ती अलमारीच्या खालच्या खणासमोर उक्कड बसायची
किंवा टेबलवर चढून वरच्या खणासमोर उभी राहायची आणि कापडाने शैकडो पुस्तकांचे धुळीने
माखलेले कवर्स पुसायची. ती त्याच्या प्रसिद्धीची कामना करायची, त्याला काम करायची प्रेरणा
द्यायची आणि तेव्हांच ती त्याला ‘मास्टर’ म्हणूं
लागली. ती जूडियाच्या पाचव्या न्यायाधीशाबद्दल लिहिल्या जाणा-या शब्दांची वाट
बघायची, जोरजोरांत
कादम्बरीतील आपल्या आवडीचे अनेक वाक्य म्हणायची आणि सांगायची की ही कादम्बरी
म्हणजे तिचा प्राण आहे.
कादम्बरी
पूर्ण झाली ऑगस्टच्या महिन्यांत, एका टाइपिस्टने त्याच्या पाच प्रति टाइप केल्या. शेवटी तो क्षणसुद्धां येऊन
पोहोचला, जेव्हाँ
गुप्त विसावा सोडून कठोर जगांत जायचं होतं.
“आणि
मी जगांत निघालो, कादम्बरी
हातांत घेऊन, आणि
तेव्हां माझा जीवन संपुष्टांत आल,” मास्टर कुजबुजला आणि त्याने मान खाली घातली. पिवळा रेशमी ‘एम’ असलेली बिचारी काळी टोपी
बरांच वेळ इकडे तिकडे हलंत होती. मग त्याने उरलेली कथापण सांगितली, पण आता त्याच्या क्रम
तुटला होता. फक्त एकंच गोष्ट समजंत होती की इवानच्या पाहुण्याच्या जीवनांत काहीतरी
भीषण घटना घडली होती.
“मी
साहित्य जगांत पहिल्यांदाच आलो होते, पण आता, जेव्हां
सगळंच संपलं आहे आणि माझा अंत जवळ आहे, मी त्याबद्दल विचार करताना हादरून जातो!” मास्टर उद्विग्नतेने पुटपुटला आणि
त्याने आपला हात वर केला – “हो, त्याने मला धक्कांच दिला, आह, कसला
धक्का दिला!”
“कुणी?” उद्विग्न वक्त्याची विचार
श्रूंखला मधेच तुटायच्या भीतीने इवाननेसुद्धां हळुवारपणेच विचारलं.
“त्याच
सम्पादकाने, मी
सांगतोय नं, सम्पादकाने!
तर त्याने माझी कादम्बरी वाचली. तो माझ्याकडे असा बघत होता, जणू माझा गाल सुजलाय. घडी
घडी वाकड्या डोळ्यांने एका कोप-याकडे बघायचा आणि उगीचंच खी-खी करायचा. उगीचंच पाण्डुलिपि
चुरगळायचा आणि घुर्र-घुर्र करायचा. जे प्रश्न त्याने मला विचारले, ते पण अगदी मूर्खासारखे
होते. कादम्बरीबद्दल काहीच न विचारतां, त्याने मला हे विचारलं की मी आहे तरी कोण, कुठून आलोय, खूप
दिवसांपासून लिहितोय कां, आणि माझ्याबद्दल कुठेच, कशी,
काही चर्चा नाहीये; आणि त्याने अगदीच मूर्खासारखा प्रश्न विचारला : मला असल्या विचित्र विषयावर
कादम्बरी लिहिण्यास कोणी प्रवृत्त केलंय?”
“त्याने
प्रश्न विचारून-विचारून मला हैराण केलं, मी त्याला सरंळ-सरंळ विचारलं की तो माझी कादम्बरी छापणार आहे किंवा नाही.
“
तेव्हां तो गडबडून गेला आणि म्हणाला, की तो एकटा ह्या संदर्भांत कोणतांच निर्णय घेऊं शकंत नाही, ही कादम्बरी सम्पादक
मण्डळाच्या इतर सदस्यांने वाचली पाहिजे; विशेषकर आलोचक लातून्स्की आणि अरीमान, तसंच साहित्यकार म्स्तिस्लाव लाव्रोविचने2 तर वाचलीच पाहिजे.
त्याने मला दोन आठवड्यानंतर यायला सांगितलं.
मी
दोन आठवड्यानंतर परंत गेलो. माझं स्वागत केलं एका मुलीने, जिचे डोळे नेहमी खोटं
बोलण्यामुळे सतंत आपल्या नाकाकडेच बघायचे.”
“ती
लाप्शोन्निकोवा आहे, सम्पादकाची सेक्रेटरी,” इवानने किंचित स्मित करंत म्हटलं. तो त्या जगाला चांगलंच ओळखंत होता, ज्याचं विद्रूप वर्णन
आत्ताच त्याच्या पाहुण्याने केलं होतं.
“असेल,” त्याला एकदम मधेच थांबवंत
पाहुणा म्हणाला, “तर तिने मला माझी खूपंच चिक्कट झालेली, चुरगळलेली कादम्बरी परंत केली. माझी
नजर टाळंत लाप्शोन्निकोवाने सांगितलं, की सध्या प्रकाशन गृहाकडे पुढच्या दोन वर्षांसाठी भरपूर साहित्य आहे, म्हणून माझी कादम्बरी
छापण्याचा प्रश्नंच नाहीये.
“त्यानंतर
मला काही आठवंत नाही,” मास्टर डोळे पुसंत बडबडला, “आठवतांत फक्त कादम्बरीच्या आवरणावर विखुरलेल्या लाल पाकळ्या आणि माझ्या
प्रियतमेचे डोळे. हो, ते डोळे मला अजूनही लक्षांत आहेत.”
इवानच्या
पाहुण्याची गोष्ट आतां असम्बद्ध होत गेली, तो इकडच्या-तिकडच्या गोष्टीपण तींत घुसवंत होता. कधी तो पावसाबद्दल बोलायचा
आणि त्यामुळे त्याच्या आरामशीर घरांत होणा-या त्रासाबद्दल, कधी म्हणायचा की तो
कुठेतरी निघून गेला. कुजबुजंत ओरडायचा आणि म्हणायचा की तो तिला जरासुद्धां दोष
नाही देत, जिने
त्याला ह्या संघर्षांत ढकललं होतं – ओह, नाही, जरासुद्धां
नाही.
“आठवतंय, आठवतंय, वर्तमानपात्रांत ठेवलेलं
ते शापित परिशिष्ट,” पाहुणा कुजबुजला आणि त्याने दोन्हीं हातांनी वर्तमानपत्राचं चित्र काढलं.
पुढे सांगितलेल्या असंबद्ध वाक्यांनी इवानला कळलं, की दुस-या एका संपादकाने वर्तमानपत्रांत कादम्बरीचा एक मोठा अंश छापला होता, त्याच्या कादम्बरीचा, जो स्वतःला मास्टर
म्हणायचा.
पाहुण्याच्या
म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टीला दोन दिवससुद्धां झाले नव्हते, की आणखी एका
वर्तमानपत्रांत आलोचक अरीमानचा3 लेख छापून आला. लेखाचं शीर्षक होतं, ‘सम्पादकाच्या पंखांखाली
दडलेला शत्रू’, लेखांत म्हटलं होतं की इवानच्या पाहुण्याने सम्पादकाच्या अनुभवहीनतेचा आणि
बेअक्कलपणाचा फायदा घेऊन येशुआ ख्रिस्ताच्या औचित्यास छापण्याचा प्रयत्न केला आहे.
“हो, आठवलंय, आठवलंय!” इवान ओरडला, “पण मी विसरून गेलो की
तुमचं नाव काय छापलं होतं!”
“माझ्या
नावाला विसरून जाऊया, मी पुन्हां सांगतो, आता माझं काही नाव नाहीये,” पाहुण्याने उत्तर दिलं, “प्रश्न नावाचा नाहीये. आणखी एका दिवसाने आणखी एका वर्तमान पत्रांत
म्स्तिस्लाव लाव्रोविचचा लेख आला, ज्यांत लेखकाने पिलातवाद आणि ईश्वराच विद्रूप वर्णन करणा-या त्या माणसावर
जमून प्रहार करण्यास सांगितले होते, ज्याने त्याला (पुन्हां तो शापित शब्द!) प्रेसमधे खेचले होते.
“
‘पिलातवाद’ शब्दाने स्तंभित होऊन मी
तिसरा पेपर उघडला. त्यांत दोन लेख होते : पहिला लातून्स्कीचा आणि दुस-याच्या खाली
होते अक्षरं ‘न.ए.’. मी तुला ठामपणे सांगतो, की लातून्स्कीच्या
लेखासमोर अरीमान आणि लाव्रोविचचे लेख अगदीच पांचट होते. फक्त येवढंच म्हणणं पुरेसं
आहे, की
लातून्स्कीच्या लेखाचं शीर्षक होतं ‘लढवय्या रूढिवादी’ 4. माझ्याबद्दल लिहिलेल्या लेखांत मी इतका मग्न झालो होतो, की ती केव्हां (दार बंद
करायचेसुद्धां मी विसरून गेलो होतो) ओली छतरी आणि भिजलेले वर्तमानपत्र घेऊन
माझ्यासमोर उभी राहिली, हे सुद्धां मला कळलं नाही. तिचे डोळे आग पाखडंत होते, हात थरथरंत होते आणि
गारठले होते. आधी तर ती मला बिलगून माझं चुम्बन घेत राहिली आणि मग टेबलवर हात
मारंत म्हणाली, की
ती लातून्स्कीला विष देऊन देईल.”
इवान
गोंधळून किंचित खाकरला, पण काही बोलला नाहीं.
“दिवस
अगदीच उदास, निर्जीव
होते. कादम्बरी लिहून झाली होती, करण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं, म्हणून आम्हीं दोघं फक्त हेच करायचो, की शेकोटीसमोर गालिच्यावर बसून ज्वाळांकडे बघंत राहायचो. आता आम्ही
पूर्वीपेक्षा जास्त वेळ एकमेकांपासून दूर राहायचो. ती हिंडायला निघून जायची. आणि
मी आपल्या स्वतःमधे, आपल्या वास्तविक रूपांत यायचो, जसं माझ्या आयुष्यांत फार कमी झालंय... अचानक, अप्रत्याशितपणे मला एक मित्र भेटला. जरा विचार करा, तसा मी लोकांपासून दूरंच
राहतो, अनोळखीपणाचा
आव आणतो, लोकांना
भेटलो तरी अविश्वासाने, संशयाने; आणि
बघा, आता
माझ्या मनांत एक अनोळखी, अप्रत्याशित, न जाणे कोणच्या रंग-रूपाचा माणूस सर्वांत जास्त भरला होता आणि तो मला
सर्वांत जास्त आवडायचासुद्धां.
तर, त्या दुर्दैवी काळांत
आमच्या बगीच्याचे गेट उघडले. मला आठवतंय, दिवस हेमन्त ऋतूतला, प्रसन्न होता. ती घरी नव्हती. गेटमधून एक माणूस आला. तो माझ्या घरमालकाकडे
काही कामानिमित्त आला होता; परंत बागेंत आला आणि लगेच माझ्याशी दोस्ती करून घेतली. त्याने सांगितले की तो पत्रकार आहे. तो मला
इतका आवडला होता, की
मला अजूनही त्याची फार आठवण येते. मग तो माझ्याकडे वारंवार येऊं लागला. मला कळलं, की तो माझ्या बाजूच्यांच
फ्लैटमधे राहातो, अगदी
अश्याच फ्लैटमधे, पण
तो अगदीच लहान आहे वगैरे, वगैरे. त्याना मला कधीच स्वतःच्या घरी नाही बोलावले. माझ्या बायकोला तो
बिल्कुलंच नाही आवडला, पण मी त्याची तारीफ़ंच करायचो. तेव्हां ती म्हणाली:
“जे
तुझ्या मनांत येईल, ते कर; पण
मी सांगून ठेवते, की
मला हा माणूस अगदी किळसवाणा वाटतो.”
मी हसलो. पण विचार
करण्यासारखी गोष्ट होती, की त्याने मला येवढं आकर्षित कां केलं होतं? खरं म्हणजे एक साधा सरळ माणूस आपल्या पोटांत काहीतरी रहस्य दवडल्याशिवाय
इतका चित्तवेधक असूंच शकंत नाही. अलोइज़ी...हो, मी सांगायला विसरलो की माझ्या नव्या मित्राचं नाव अलोइज़ी मगारिच होतं...तो
रहस्यमय माणूस होता. इतक्या हुशार माणसाला मी आपल्या जीवनांत कधीच भेटलो नव्हतो, आणि भेटणारही नाही. जर
वर्तमान पत्रांतील एखाद्या टिप्पणीचा अर्थ मला कळला नाही, तर अलोइज़ी चुटक्या वाजवंत
मला समजावून द्यायचा, जणु काही हा त्याच्यासाठी डाव्या हाताचा खेळ असायचा. दैनंदिन जीवन आणि
त्याच्याशी संबंधित समस्यांबद्दलसुद्धां असेच व्हायचे. पण हे तर काहीच नाही. मला
आकर्षित केलं त्याच्या साहित्य-प्रेमाने. जोपर्यंत माझी सम्पूर्ण कादम्बरी त्याने
माझ्याकडून वाचून नाही घेतली, तो स्वस्थ नाही बसला; कादम्बरीबद्दल त्याने खूपंच चांगला अभिप्राय दिला, पण सम्पादकाची ह्याबद्दल
काय प्रतिक्रिया होती हेसुद्धां अचूक सांगितलं, जणू त्यावेळेस तो तिथे हजर होता. त्याचे निष्कर्ष अगदी शंभर टक्के बरोबर
असायचे. शिवाय त्याने हेसुद्धां सांगितलं की माझी कादम्बरी कां नाही प्रकाशित होऊं
शकली. त्याने सरळ-सरळ सांगून टाकलं की अमुक-अमुक अध्याय काढून टाकावा लागेल...
वर्तमान
पत्रांमधे तीव्र आलोचनात्मक लेख येतंच राहिले. सुरुवातीला तर मी हसण्यावारी नेत
असे, पण
जशी-जशी त्यांची संख्या वाढंत गेली, माझ्या वागण्यांत फरक पडूं लागला. दुस-या प्रकारची प्रतिक्रिया होती –
आश्चर्याची. ह्या लेखांच्या प्रत्येक पंक्तीत काही न काही खोंटं आणि अविश्वसनीय
ज़रूर असायचं; भले
ही ते मोठ्या दमदार शैलींत लिहिलेले कां नसो. मला असं वाटायचं, की ह्या लेखांचे लेखक ते
नाहीं सांगंत आहेत, जे त्यांना खरोखर सांगायचंय, म्हणूनंच त्यांची आलोचना इतकी तीव्र होत चाललीय. मग आली तिसरी अवस्था –
भीतीची. भीति त्या लेखांची नाहीं, पण अश्या वस्त्तूंची ज्यांचा कादम्बरीशी जरासा सुद्धा सम्बंध नव्हता. जसं, मला अंधाराची भीति वाटू
लागली. अर्थात, ही
अवस्था मानसिक रोगाची, वेडेपणाची होती. मला रात्रभर लाइट उघडा ठेवून झोपावे लागे, कारण की नेहमी भीति
वाटायची, की
बंद खिडक्यांतून लांब-लांब तंतूंचा कोणी ऑक्टोपस उडी मारून खोलीत शिरेल.
“माझी
प्रियतमासुद्धां बरीच बदलली होती, जरी मी तिला ऑक्टोपसबद्दल काहींच सांगितले नव्हते, तरी तिला कळंत होतं की
माझ्याबरोबर काही तरी विचित्र घडतंय. ती कृश झाली, फिक्कट पडली, तिचं हसूं जणु कुठेतरी हरवलं. ती माझी क्षमा मागायची, फक्त येवढंच म्हणायची, की तिच्याचमुळे माझ्यावर
हा प्रसंग ओढवलाय. तिने जर कादम्बरी पूर्ण करायचा हट्ट नसता केला, तर हे सगळं झालंच नसतं, तिने जर कादम्बरीचा एक अंश
छापण्याचा हट्ट नसता केला, तर सगळं जग माझ्यामागे लागलं नसतं. तिने म्हटलं की मी सर्व काही सोडून एक
लाख रूबल्समधून उरलेल्या रकमेंत दक्षिणेंत ब्लैक-सी च्या किना-यावर जाऊन राहावे.
“ती
खूपंच हट्ट करूं लागली आणि मला तिच्याशी वाद घालायचा नव्हता, (मला पूर्वाभास झाला होता
की मी ब्लैक-सीला नाही जाऊं शकणार) मी शब्द दिला की लवकरंच जाईन; पण तिने म्हटलं की माझं
टिकिट तीच काधेल. तेव्हां मी उरलेले पैसे, जे जवळ-जवळ दहा हजार रूबल्स होते, तिच्या हातांत दिले.
“येवढे
कशाला?” तिला आश्चर्य झाला. मी म्हटलं की मला चोरांची भीति वाटते, आणि मी जाईपर्यंत हे धन
सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. तिने पैसे पर्समधे ठेवले आणि माझं चुम्बन घेत
म्हणाली, की
मला अश्या स्थितींत सोडून जाण्यापेक्षां मरण बरं, पण घरी तिची वाट बघंत असतील, तिचा नाइलाज आहे आणि ती उद्या पुन्हां येईल. तिने मला कशालांच न घाबरण्याची
विनंती केली.
“हे
झालं ऑक्टोबरमधे, संध्याकाळच्या
अंधुक प्रकाशांत. ती चालली गेली. ती गेल्यावर मी लाइट न लावतां सोफ्यावर लोळलो आणि
माझा डोळा लागला. अचानक मला असा आभास झाला की खोलींत ऑक्टोपस आहे. अंधारांत
चाचपडंत मी लैम्प लावला. माझ्या पॉकेट-वाचमधे रात्रीचे दोन वाजले होते. मी स्वतःला
आजारी अनुभवंत झोपलो होतो, उठल्यावर खरोखरंच आजारी झालो होते. मला वाटलं, की शिशिराचा अंधार खिडक्यांच्या काचांतून आत घुसतोय आणि मी त्यांत बुडंत
चाललोय. मी आपलं मानसिक संतुलन हरवून बसलो होतो. मी किंचाळंत कुणाकडेतरी
जाण्यासाठी हातपाय मारूं लागलो, मग तो वरच्या मजल्यावर राहणारा माझा घरमालक कां नसो. मी वेड्यासारखा हात-पाय
मारूं लागलो. उरली-सुरली शक्ति एकवटून मी शेकोटीजवळ आलो आणि आत ठेवलेल्या लाकडांचा
जाळ केला. जेव्हां ते चटचट आवाज करंत जळूं लागले आणि शेकोटीच्या लहानश्या दारावर
आवाज करूं लागले, तेव्हां
मला थोडा सा धीर आला. मी समोरच्या खोलींत गेलो, तिथे लाइट लावला, पांढ-या वाइनची बाटली काढली आणि तिचं झाकंण काढून बाटलीनेच गटगट पिऊ लागलो.
माझी भीतो आता पुष्कळ कमी झाली होती – घर मालकाकडे जाण्याऐवजी मी शेकोटीजवळ आलो, मी शेकोटीच दार उघडलं, ज्याने गरम हवा माझ्या
हातांना आणि चेह-याला भाजूं लागली आणि कुजबुजली: ‘तुला कळतंय ना, की माझ्यावर आपत्ति ओढवलीयं?...ये, ये, ये!’
“पण
कोणीच नाही आलं. शेकोटींत ज्वाळा गरजंत होत्या, खिडकीवर पाऊस आदळंत होता. आणि मग जणु काही ह्या सगळ्याचा अंतिम चरण येऊन
ठेपला. मी टेबलाच्या ड्रावरमधून जाडजूड कादम्बरीचं हस्तलिखित आणि ड्राफ्ट-नोट्स
काढले आणि त्यांना जाळू लागलो. हे फार कठीण काम आहे, कारण की लिहिलेला कागद सहजासहजी जळंत नाही. आपल्या नखांना जखमी करंत मी पानं
फाडंत गेलो. त्यांना लाकडांच्या मधे उभं ठेवत गेलो आणि चिमट्याने आत घुसवंत गेलो.
त्यांची राख मधून-मधून कागदांना लवकर-लवकर जळूं देत नव्हती, राख ज्वाळांचा गळा दाबंत होती, पण मी तिच्याशी संघर्ष
करंत राहिलो आणि माझी कादम्बरीसुद्धां जबर्दस्त प्रतिकार करून सुद्धां नष्ट होत
गेली. माझ्या डोळ्यांसमोर चिर परिचित शब्द नाचंत होते. पिवळेपण खालून वर सरकंत
पानांना वेढा घालंत होतं. पण शब्द ज्वाळांमधूनसुद्धां चमकंत होते. ते फक्त
तेव्हांच लुप्त झाले, जेव्हां कागद काळे झालेत आणि मी चिमट्याने त्यांचा चुरा करंत राहिलो.
इतक्यांत
खिडकीवर हळूच खरचटल्याचा आवाज आला. माझं हृदय उसळलं आणि मी शेवटची पानं शेकोटीत
फेकून दार उघडण्यासाठी धावलो. पाय-या तळघरांतून अंगणाकडच्या दारापर्यंत जात
होत्या. कसा तरी धडपडंत मी दाराजवळ पोहोचलो आणि विचारलं:
“कोण
आहे?”
“आणि
त्या आवाजाने, तिच्या
आवाजाने उत्तर दिलं, “मी आहे...”
“माहीत
नाही कसं मी दार उघडलं. आत येतांच ती मला बिलगली. ती पूर्ण ओली होती. ओले गाल, विस्कटलेले केस, थरथरणारी काया. मी फक्त
येवढंच म्हणू शकलो:
“तू...तू?” आणि माझा आवाज तुटला.
आम्ही खाली धावलो. तिने पटकन् कोट काढून फेकला आणि आम्हीं लगेच पहिल्या खोलीत आलो.
हलक्या आवाजांत ओरडून तिने उघड्या हातांनी शेकोटीतून ती शेवटची पानं बाहेर काढली, जी जळायची राहून गेली होती.
खोलीत धूर भरला होता. मी पायांनी आग विझवली. ती सोफ्यावर लवंडली आणि हुंदके
देत-देत रडंत राहिली.
ती
थोडी शांत झाल्यावर मी म्हटलं, “मला ह्या कादम्बरीचा तिटकारा वाटतो आणि मला भीति वाटते. मी आजारी आहे. मला
खूप भीति वाटतेय.”
ती
उठली आणि म्हणाली, “अरे देवा, तू
कित्ती आजारी आहेस! कां? कशासाठी? पण
मी तुला वाचवीन, वाचवीन
मी तुला. हे काय झालंय?”
“मी
धुराने आणि रडण्याने सुजलेल्या तिच्या डोळ्यांत बघितलं. मला भास झाला की तिचे थंड
हात माझ्या कपाळाला थोपटंत आहेत.
“मी
तुझा इलाज करीन, तुला
बरं करीन,” ती पुटपुटली, माझ्या खांद्यांना पकडून म्हणाली, “तू तिला पुनर्जीवित करशील. ओह, हिची एक प्रत मी माझ्याजवंळ कां नाही ठेवली!”
ती
रागाने दात-ओठ खात होती, काहीसं असंबद्ध पुटपुटंत होती. मग ओठ दाबून किनारीवर जळलेली पानं गोळा करूं
लागली. कादम्बरीच्या मधलाच कोणचा तरी प्रसंग होता, आठवंत नाही कोणचा. तिने ती पानं ओळीने लावली, त्यांना एका कागदांत गुण्डाळलं. त्यावर एक रिबिन बांधली. तिच्या हालचालीवरून
असं वाटंत होतं की तिने काहीतरी निश्चय केला आहे आणि स्वतःवर ताबा मिळवला आहे.
तिने थोडीशी वाइन मागितली आणि पिऊन झाल्यावर शांतपणे म्हणाली:
“बघ, अशी द्यावी लागते
खोटेपणाची किंमत...” ती बोलंत होती, “माझी आणखी खोटं बोलायची इच्छा नाही. मी आत्तांसुद्धां तुझ्याजवळ थांबू शकते, पण हे मला अशा प्रकारे
करायचं नाहीये. माझी अशी इच्छा नाहीये, की त्याने नेहमी हा विचार करावा, की मी रात्री त्याच्या घरांतून पळून गेले. त्याने मला कधीच काही दुःख नाही
दिलं. त्याला अचानकंच बोलावले. त्याच्या फैक्ट्रीत आग लागलीय. पण तो लवकरंच परंत
येईल. मी उद्या सकाळी त्याला सगळं सांगून टाकेन. सांगून देईन की माझं कुणा
दुस-यावर प्रेम आहे आणि मग मी नेहमीसाठी तुझ्याकडे येऊन जाईन. बोल, तू नाही तर म्हणणार नाहींस?”
“माझी
लाडकी, भोळी
सखी,” मी तिला म्हटलं, “मी तुला असं करण्याची परवानगी नाही देणार. माझं भविष्यतर अंधारांत आहे आणि
माझी अशी बिकुल इच्छा नाही, की माझ्याबरोबर तू सुद्धां कणाकणाने नष्ट व्हावंस.”
“फक्त
हेंच कारण आहे?”
“फक्त
हेंच!”
तिच्या
जिवांत जीव आला. ती मला बिलगली. माझे खांदे थोपटंत म्हणाली, “तर मी पण तुझ्याबरोबरंच
मरेन. सकाळी मी तुझ्याकडे येतेय.”
“बस, हीच माझ्या जीवनातली, मला आठवणारी शेवटची गोष्ट
आहे. बाहेरच्या खोलींतून येणारी प्रकाशाची किरण...त्या उजेडांत विस्कटलेली केसांची
बट...तिची हैट आणि निश्चयाने भरलेले तिचे डोळे, बाहेरच्या उंबरठ्यावर असलेला अंधार आणि पांढरं पैकेटसुद्धां आठवतंय.
“मी
तुला सोडायला आलो असतो, पण माझ्यांत एकटं परंत यायची हिंमतंच नाहीये. मला भीति वाटतेय.”
“घाबरू
नको. बस, काही
घण्टे वाट बघ. उद्या सकाळी मी तुझ्याबरोबर असेन,”
– हेंच तिचे शेवटचे शब्द होते.
“श्...श्...श्...!”
तेव्हांच रोग्याने स्वतःला थांबवंत म्हटले आणि बोट वर केलं, “आजची पूर्णचंद्राची रात्र
खूप बेचैन आहे.”
तो
बाल्कनींत लपला. इवानने कॉरीडोरमधे चाकांच्या गाडीचा आवाज ऐकला, कोणीतरी हळूच विव्हळलं
किंवा ओरडलं.
जेव्हां
सर्वत्र सामसूम झाली, तेव्हां पाहुणा पुन्हां परंत आला आणि त्याने सांगितलं की 120नम्बरच्या खोलीत
कोणी तरी आलंय. एका अश्या माणसाला आणलंय जो ही विनंती करतोय की त्याचं डोकं त्याला
परत मिळावं. दोघंही उत्तेजनेमुळे गप्प बसले. काही वेळ शांत राहून आपल्या संभाषणावर
परतले. पाहुण्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं, पण रात्र खरोखरंच खूप बेचैन होती. कॉरीडोरमधून अजूनही आवाज येत होते म्हणून
पाहुण्याने इतक्या हळू आवाजांत इवानच्या कानांत सांगायला सुरुवात केली, की फक्त कवीलाच त्याचं
बोलणं ऐकूं येत होतं, पहिलं वाक्य सोडून जे काही त्याने ऐकलं ते असं होतं:
“ती
गेल्यावर पंधरा मिनिटांनी माझ्या खिडकीवर ठकठक झाली...”
मनोरुग्णाने
इवानच्या कानांत जे काही सांग़ितलं, त्याने त्याला स्पष्टपणे खूपंच अशांत केलं होतं. त्याच्या चेह-यावर घडी-घडी
शहारे येत होते. त्याच्या डोळ्यांत भीति आणि रानटीपणाचे भाव तरंगंत होते. तो
घडी-घडी चंद्राकडे बोट दाखवंत होता, जो केव्हांचाच बाल्कनीतून निघून गेलेला होता. जेव्हां बाहेरून येणारे सगळे
आवाज शांत झाले, तेव्हां
इवानचा पाहुणा थोडं दूर सरकून बसला आणि म्हणाला:
“तर, जनवरीच्या मध्यांत, रात्री, त्याच कोटांत, ज्याच्या गुंड्या आता तुटून
गेल्या होत्या5, मी आपल्या अंगणांत थण्डीत कुडकुडंत होतो. माझ्यामागे बर्फाच्या टेकड्या, लिलीचे लपलेले झुडुपं
होते. माझ्यासमोर होत्या पडदे लावलेल्या माझ्या खिडक्या, ज्यांच्यांतून मंद प्रकाश
येत होता. मी पहिल्या खिडकीजवळ गेलो आणि ऐकूं लागलो - माझ्या खोलींत पियानो वाजंत
होता; मी
फक्त ऐकूंच शकंत होतो, दिसंत काहीच नव्हतं. कांही वेळ थांबून मी बाहेर गल्लींत निघून आलो. बर्फाचं
तूफान सैतानी नाच करंत होतं. माझ्या पायांत कडमडणा-या एका कुत्र्याने मला घाबरवून
टाकलं. मी रस्त्याच्या दुसरीकडे धावलो, थण्डी आणि भीति, जे माझे सवंगडीच झालेले होते, मला उन्मादापर्यंत घेऊन गेले. माझ्याकडे कोणताही विसावा नव्हता. माझ्या
गल्लीसमोरून जाणा-या ट्रामगाडीखाली जीव देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही विकल्प
नव्हता. दुरून मी प्रकाशाने भरलेले, बर्फाने आच्छादित डबे पाहिले आणि बर्फावर त्यांची करकर ऐकली. पण मित्रा, समस्या ही होती, की भीतीने माझ्या प्रत्येक
अणुरेणूंत घर केलेलं होतं, आणि मी ट्रामगाडीला सुद्धां असांच घाबरलो, जसा कुत्र्याला बघून घाबरलो होतो. माझ्या आजारापेक्षा वाईट ह्या दवाखान्यांत
आणखी दुसरा आजार नाहीये, हे मी ठामपणे सांगू शकतो!”
“पण
तुम्हीं तिला कळवूं शकले असते,” इवानने बिचा-या मनोरुग्णाबद्दल दिलगिरी प्रकट करंत म्हटलं, “शिवाय तिच्याकडे तुमचे
पैसे पण तर आहेत? कदाचित
तिने संभाळून ठेवले असतील?”
“ह्यांत
काही शंकांच नाहीं, ठेवलेच आहेत संभाळून. पण तू कदाचित मला समजूं शकला नाहीस? किंवा, कदाचित, मीच आपली गोष्ट सांगण्याची
क्षमता हरवून बसलोय. मला ह्या गोष्टीचं जरासुद्धां दुःख नाहीये, कारण मला आता तिची गरंजच
नाहीय. तिच्या समोर...” पाहुण्याने
दूर अंधारांत दृष्टी लावंत म्हटलं, “ह्या पागलखान्याचं पत्र पडलं असेल. आता तूंच सांग, ह्या पत्त्यावरून मी तिला
कसा पत्र पाठवूं शकतो? मानसिक रुग्ण? तू चेष्टा करतोय, मित्रा! तिला दुःख देऊं? मी हे नाही करूं शकत.”
इवानकडे
ह्या तर्काचे उत्तर नव्हते, पण चुपचाप बसलेल्या इवानला पाहुण्याची पीडा जाणवंत होती, त्याच्याबद्दल सहानुभूति
वाटंत होती.
पाहुण्याने
आठवणींत हरवून काळी टोपी घातलेलं आपलं डोकं हलवलं आणि म्हणाला, “गरीब बिचारी, मला विश्वास आहे, की ती मला विसरलीच असेल!”
“तुम्हीं
बरे पण होऊं शकता...” इवानने संकोचून म्हटलं.
“माझा
आजार असाध्य आहे,” पाहुणा शांतपणे म्हणाला, “जेव्हां स्त्राविन्स्की म्हणतो, की तो मला माझं जीवन परंत आणून देईल, तेव्हां माझा विश्वास नाही बसंत. तो एक सहृदय माणूस आहे आणि मला फक्त
सांत्वना देऊं इच्छितोय. पण मी ही गोष्टसुद्धां नाकारू शकत नाही, की मी आतां पूर्वीपेक्षा
बरांच सुधारलोय. तर, मी कुठे होतो? बर्फ, त्या
उडत्या ट्रामगाड्या. मला माहीत होतं की हे हॉस्पिटल सुरू झालेल आहे आणि मी
सम्पूर्ण शहर पार करून येथे येण्यासाठी पाईच निघालो. वेडेपणा! कदाचित, शहरातूंन बाहेर निघून
बर्फामुळे जमूनंच गेलो असतो. पण सौभाग्याने वाचलो. एका लॉरीमधे काही बिघाड झाला
होता, मी
ड्राइवरकडे आलो. हे ठिकाण चार किलोमीटर्स दूर होतं. ड्राइवरला माझ्यावर दया आली.
लॉरी इकडेच येत होती. आणि तो मला इथे घेऊन आला. माझ्या पायांची बोटं जमून गेली
होती, पण
त्यांना बरं केलंय. आता चार महिन्यापासून मी येथे आहे. मला इथे इतकं वाईट नाही
वाटंत. माणसाने मोठ्या-मोठ्या योजना बनवूं नये, खरंच! जसं, मी
जगभर फिरायचं स्वप्न पाहत होतो, पण कदाचित ते माझ्या नशिबांत नाहीये. मी ह्या जगाचा एक छोटा सा भागंच बघूं
शकतो. हा भाग सर्वोत्तम तर नाहींच, पण वाईटसुद्धां नाहीये. आता लौकरंच उन्हाळा येईल. प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना
म्हणते, की
बाल्कनीवर वेल पसरेल. किल्ल्यांच्या जुडग्याने माझं काम सोपं केलंय. रात्री चंद्र
असेल. ओह, तो
लपलाय! थोडंसं बरं वाटतंय. अर्धी रात्र संपलीसुद्धा. आता मी निघालो”
“पिलात
आणि येशुआचे पुढे काय झाले?” इवानने विनंती करंत म्हटलं, “मला ऐकायचं आहे. सांगा नं!!”
“ओह, नाही, नाही,” पाहुणा थरथर कापत म्हणाला, “आपल्या कादम्बरीच्या
आठवणीनेच मला कापरं भरतं. पत्रियार्शीवर जो तुला भेटला होता, तोच बरोबर सांगू शकतो.
संभाषणाबद्दल धन्यवाद! पुन्हां भेटूं!”
आणि
इवानच्या काही लक्षांत येण्याअगोदरंच हलक्या आवाजाने जाळीचं दार बंद झालं. पाहुणा
गायब झाला.
**********
चौदा
कोंबड्याचा जय असो
मानसिक ताण सहन नाही करूं
शकला रीम्स्की आणि ‘शो’ संपल्यानंतरच्या औपचारिकतांची
वाट न बघतां आपल्या ऑफ़िसकडे धावला. तो टेबलाशी बसून सुजलेल्या डोळ्यांनी समोर
पडलेल्या जादुई नोटांकडे बघूं लागला. फिनडाइरेक्टरची बुद्धि निर्बुद्धीपर्यंत
पोहोचली होती. बाहेरून सारखा हल्ला ऐकूं येत होता. लोकांचे थवे वेराइटी थियेटरमधून
बाहेर निघंत होते. फिनडाइरेक्टरच्या कानांत अचानक पोलिसच्या शिट्टीचा आवाज आला. ही
शिट्टी कधीच सुखद घटनेची सूचना देत नाही. पण जेव्हां शिट्टीचा आवाज पुन्हां ऐकूं
आला आणि त्याच्या मदतीला आणखी एक ज़ोरदार, जास्त शक्तिशाली, लांब शिट्टी आली, मग रस्त्यावरून
विचित्रसा हो-हल्ला, रानटीपणे हसण्याचे, छेड काढण्याचे आवाज ऐकूं आले, तेव्हां फिनडाइरेक्टर समजून
गेला की पुन्हां काहीतरी लफ़डा झालेला आहे. इच्छा नसतांनासुद्धां त्याच्या डोक्यांत
हाच विचार चमकला, की ह्याचा संबंध नक्कीच काळ्या-जादूच्या जादुगार आणि त्याच्या
सहायकांनी दाखवलेल्या किळसवाण्या प्रयोगाशीच आहे. तीक्ष्ण कानांचा फिनडाइरेक्टर
बिल्कुल चूक नव्हता.
जसंच त्याने सादोवायाकडे
उघडणा-या खिडकीतून बाहेर बघितलं, त्याचा चेहरा वाकडा-तिकडा झाला आणि कुजबुजण्याऐवजी
फुत्कार करंत तो म्हणाला, “मला माहीत होतं!”
रस्त्यावर लावलेल्या
लैम्प्सच्या तीव्र प्रकाशांत त्याने आपल्या अगदी खाली, फुटपाथवर एका महिलेला
पाहिलं. ती फक्त जांभळ्या रंगाच्या अंतर्वस्त्रांमधे होती. हाँ, तिच्या डोक्यावर
टोपी आणि हातांत छत्री होती.
ह्या बावरलेल्या महिलेभोवती, जी कधी खाली बसंत
होती,
तर कधी
पळायचा प्रयत्न करंत होती, रानटीपणे हसणा-यांची, छेड काढणा-यांची गर्दी होती.
गर्दीचं प्रचण्ड, किळसवाणं हास्य चालूंच होतं. ह्या हास्याने फिनडाइरेक्टरला आपल्या
पाठीच्या कण्यांत थण्ड लाट वाहंत असल्याचा अनुभव झाला. महिलेच्या जवळंच एक माणूस
डोलंत होता,
जो
आपला कोट काढायचा प्रयत्न करंत होता, पण बावचळल्यामुळे त्याला बाहींत अडकलेला हातंच
बाहेर काढतां येत नव्हता.
किंकाळ्या आणि प्रचण्ड हास्य
एका दुस-या जागेवरूनपण ऐकूं आलं – डाव्या प्रवेश द्वाराजवळून. तिकडे डोकं
वळवल्यावर ग्रिगोरी दानिलोविचला दुसरी महिला दिसली, गुलाबी अंतर्वस्त्रांत. ती
रस्त्यावरून फुटपाथवर उडी मारायचा प्रयत्न करंत होती, म्हणजे प्रवेश द्वारांत शरण
घेता येईल,
पण
गर्दी तिचा रस्ता रोखंत होती आणि आपल्या हावरटपणा आणि फैशनची ही सावज, गरीब बिचारी, जिला फागोतच्या
फर्मने ठगलं होतं, ह्याक्षणी फक्त एकंच विचार करंत होती, की जमिनींत सामावून जावं.
पोलिसवाला त्या दुर्दैवी महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करंत होता. शिट्टी वाजवंत
तो पुढे येत होता आणि त्याच्या मागे-मागे होते टोप्या घातलेले काही टारगट लोकं.
हेच तर हसंत होते, तिची छेड काढंत होते.
मिशा असलेला एक मरतुकडा कोचवान
पट्कन पहिल्या निर्वस्त्र महिलेजवंळ आला, त्याने आपल्या हडकुळ्या, मरियल घोड्याला
तिच्याजवळ थांबवलं. मुच्छडचा चेहरा आनंदाने उजळला. रीम्स्कीने आपल्या कपाळावर हात
मारला,
तिरस्काराने
थुंकून तो खिडकीपासून दूर झाला.
थोडा वेळ टेबलापाशी बसून तो
रस्त्यावरून येणारे आवाज ऐकंत राहिला. आतां अनेक ठिकाणांहून शिट्ट्यांचे आवाज ऐकूं
येत होते. मग हळू-हळू त्यांचा जोर कमी होत गेला. रीम्स्कीला आश्चर्य वाटलं, की हा सगळा लफ़डा खूपंच
कमी वेळांत संपला.
हात-पाय हालवायची, जवाबदारीचा कडु घोट
पिण्याची वेळ येऊन ठेपली होती. तिस-या अंकात टेलिफोन दुरूस्त करून झाले होते; टेलिफोन करायचा होता, ह्या सगळ्या
भानगडीची सूचना द्यायची होती, मदत मागवायची होती, ह्या लफड्यांतून बाहेर
पडायचं होतं,
लिखादेयेवच्या
डोक्यावर खापंर फोडून स्वतःला वाचवायचं होतं वगैरे, वगैरे...थू...थू...सैतान! वैतागलेल्या
फिनडाइरेक्टरने दोनदां टेलिफोनच्या रिसीवरकडे हात नेऊन मागे घेतला. तेवढ्यांत ऑफिसच्या
ह्या मृतप्राय शांततेत फिनडाइरेक्टरसमोरचा टेलिफोन आपणहूनंच वाजूं लागला; तो थरथरू लागला, बर्फासारखा गारठला. ‘मी खूपंच हवालदील
झालोय,’
त्याने
विचार केला आणि रिसीवर उचलला. उचलतांच जणुं त्याला विजेचा शॉक बसला आणि त्याचा
चेहरा पंढराफटक पडला. रिसीवरमधून एका महिलेचा शांत, पण रहस्यमय कामासक्त आवाज
कुजबुजला:
“कुठेही फोन करूं नकोस, रीम्स्की! परिणाम
वाईट होईल!”
रिसीवर शांत झाला.
रीम्स्कीला अनुभव झाला की पाठीच्या मणक्यावर असंख्य मुंग्या चालताहेत; रिसीवर ठेवून त्याने
माहीत नाही कां आपल्या मागे असलेल्या खिडकीतून बाहेर बघितलं. नाजुक पानांने अर्धवट
झाकलेल्या मैपल वृक्षाच्या फांद्यांमधून, ढगाच्या पारदर्शी आवरणांतून डोकावंत असलेला
चंद्र दिसला. न जाणे कां, रीम्स्की ह्या फांद्यावरून नजर नाही काढूं शकला आणि
जसा-जसा तो त्यांच्याकडे बघंत होता, एक अनामिक भीति त्याला वेढून घेत होती.
मोठ्या प्रयत्नाने त्याने
चंद्राच्या प्रकाशांत न्हायलेल्या खिडकीपासून आपला चेहरा दूर केला आणि खुर्चीतून
उठू लागला. फोन करण्याचा प्रश्नंच नव्हता. ह्या क्षणी फिनडाइरेक्टरच्या डोक्यांत
फक्त एकंच विचार होता – लवकरांत लवकर ह्या थियेटरमधून बाहेर पडायचं.
तो बाहेरचा कानोसा घेऊं
लागला: थियेटर सामसूम होतं. रीम्स्कीला समजलं की बरांच वेळापासून दुस-या मजल्यावर तो
एकटांच आहे. ह्या विचाराने त्याला पुन्हां एक बालिश, अदम्य भीतिचा अनुभव झाला. तो
ह्या विचाराने थरथरू लागला की आता त्याला निर्मनुष्य कॉरीडोर्समधून आणि
पाय-यांवरून एकटंच जावं लागेल. वैतागून त्याने टेबलावर समोरंच पडलेले जादूचे नोट
आपल्या ब्रीफकेसमधे कोंबले, स्वतःवर थोडंफार नियंत्रण ठेवण्यासाठी खाकरंत घसा
स्वच्छ केला,
पण
खोकला सुद्धां अशक्त-सा, भसाडाचं निघाला.
त्याला भास झाला की ऑफिसच्या
दाराखालून एक कुजका दमंटपणा त्याच्याजवळ येतोय. फिनडाइरेक्टरच्या पाठीवर शहारे
आले. तेवढ्यांत अचानक घडाळ्याने बारा टोले मारायला सुरुवात केली. टोल्यांच्या
आवाजाने फिनडाइरेक्टर शहारला. जेव्हां त्याला बंद असलेल्या दाराच्या भोकांतून विलायती
चावी फिरण्याचा आवाज ऐकूं आला, तेव्हां तर त्याच्या हृदयाची धडधड देखील थांबली.
ओल्या,
थण्डगार
हातांत ब्रीफकेस घट्ट धरलेल्या रीम्स्कीला वाटलं की जर ही सरसर आणखी काही वेळ
चालूं राहिली तर त्याच्या स्वतःवरचा ताबा सुटेला आणि तो जोराने किंचाळेल.
शेवटी कोणाच्या तरी
प्रयत्नाने दार उघडलं आणि आवाज न करता आत आला वारेनूखा. रीम्स्की जसा उभा होता, तसांच बसून गेला, कारण की त्याचे
पायंच त्याला जुमानंत नव्हते. एक मोट्ठा श्वास घेऊन त्याने खुशामदी थाटांत मंद
हास्य केले आणि हळूंच म्हणाला, “अरे देवा, तू मला कित्ती घाबरवलंस!”
हो, त्याच्या अश्या अचानक
येण्याने कोणीपण घाबरलंच असतं, पण रीम्स्कीला त्याच बरोबर आनंदसुद्धा झाला. ह्या
गुंतागुंतीचा कमीत कमी एक तार तरी मोकळा झाला होता.
“सांग, सांग, लवकर सांग!”
रीम्स्कीने हा तार पकडंत भसाड्या आवाजांट म्हटलं, “ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे?”
“माफ़ कर...” आगंतुक दार बंद
करंत खोल आवाजांत म्हणाला, “मला वाटलं की तू निघून गेलास,” आणि वारेनूखा टोपी न काढतां
येऊन रीम्स्कीच्या समोरच्या खुर्चीत बसून गेला.
वारेनूखाच्या उत्तरांत असा
काही बेजवाबदारपणा होता जो, जगांतल्या सर्वोत्तम सेस्मोग्राफला टक्कर देऊं
शकणा-या रीम्स्कीच्या संवेदनशील मनाला खुपला. असं कां? जर वारेनूखाला असं वाटंत
होतं,
की
फिनडाइरेक्टर निघून गेलाय, तर तो त्याच्या ऑफिसमधे कां आला? त्याचं स्वतःचं ऑफ़िस
तर आहे?
ही
झाली पहिली गोष्ट. दुसरी ही, की तो कोणत्याही प्रवेश द्वाराने आला असतां, तरी कोणच्या न
कोणच्या चौकीदाराशी त्याचा सामना झालांच असतां, त्यांना तर आदेश दिलेला होता, की ग्रिगोरी
दानिलोविच आणखी काही वेळ आपल्या ऑफ़िसमध्ये थांबणार आहेत.
पण तो जास्त वेळ ह्या
विचित्रतेबद्दल विचार नाही करूं शकला. मुख्य मुद्दा हा नव्हता.
“तू फोन कां नाही केलास? ही याल्टाची भानगड
काय आहे?”
“तेच, जे मी म्हणंत होतो,” किंचित विव्हळंत
वारेनूखा म्हणाला, जणू त्याचा दात दुखतोय, “तो पूश्किनोच्या बारमधे सापडला.”
“पूश्किनोत? म्हणजे मॉस्कोच्या
जवळंच?
पण
टेलिग्राम तर याल्टाहून आला होता!”
“कुठला याल्टा? कसला याल्टा? पूश्किनोच्या तार
मास्टरला दारू पाजली आणि दोघंही मस्ती करायला लागले, ‘याल्टा’च्या नावाने तार
पाठवणं अशीच खोडी होती.”
“ओ हो...ओ हो...बरंय, बरंय...” रीम्स्की
बोलंत नव्हतां –
सुरांत
गात होता. पिवळ्या प्रकाशांत त्याचे डोळे चमकू लागले. डोळ्यांसमोर बेशरम
स्त्योपाला नौकरीवरून काढून टाकण्याचं मनोरम चित्र तरळूं लागलं. मुक्ति! लिखादेयेव
नावाच्या ह्या पीडेपासून सुटका होण्याचं स्वप्न फिनडाइरेक्टर न जाणे कधी पासून
पाहत होतां! कदाचित स्तिपान बग्दानोविचला सस्पेण्ड होण्याहूनही जास्त शिक्षा
मिळेल...
“व्यवस्थित सांग!” रीम्स्की
पेपरवेटची खटखट करंत म्हणाला.
वारेनूखा व्यवस्थितपणे सांगू
लागला. जसांच तो तिथे पोहोचला, जिथे फिनडाइरेक्टरने त्याला पाठवले होते, त्यांनी लगेच त्याला
बसवून त्याचं बोलणं ऐकायला सुरुवात केली. कोणीही, नक्कीच, हे मानायला तयार
नव्हतं,
की
स्त्योपा याल्टांत असूं शकतो. सगळ्यांनाच वारेनूखाचं म्हणणं पटलं की तो
पूश्किनोच्या ‘याल्टा’त असूं शकतो.
“पण सध्यां तो कुठे आहे?” वैतागलेल्या
फिनडाइरेक्टरने मधेच टोकंत त्याला विचारलं.
“आणखी कुठे असूं शकतो…” एडमिनिस्ट्रेटरने
तोंड वाकडं करून हसंत म्हटलं, “स्पष्टंच आहे, नशा उतरवणा-या केंद्रांत!”
“बरं, बरं, धन्यवाद!”
वारेनूखा सांगत होता.
जसा-जसा तो सांगत होता, रीम्स्कीच्या डोळ्यांसमोर लिखादेयेवच्या दांडगाईची
साखळी खुलंत गेली. ह्या साखळीची प्रत्येक कडी आधीच्या कडीहून जास्त भयंकर होती.
दारू पिऊन पूश्किनोच्या टेलिग्राफ-ऑफ़िसच्या लॉनवर टेलिग्राफ-क्लर्कसोबत डान्स करणं
– फालतूश्या हार्मोनियमच्या चालीवर! आणि धिंगाणा तरी कसला घातला! भीतीने थरथरणा-या
महिलांच्या मागे धावणं, ‘याल्टा’च्या वेटरशी मारामारी! ‘याल्टा’च्या फरशीवर हिरव्या
कांद्याच्या पाती फेकून दिल्यांत! पांढ-या ड्राय ‘आय दानिला’ दारूच्या आठ बाटल्या
फोडून टाकल्या! टैक्सीवाल्याचं मीटर तोडून टाकलं, कारण की तो स्त्योपाला आपली
गाडी द्यायला नाही म्हणाला. ज्या नागरिकांनी मधे पडायचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांत
देण्याची धमकी दिली! नुसता सैतानी नाच!
स्त्योपाला मॉस्कोच्या
थियेटरशी संबंधित सगळेच लोक ओळखंत होते, आणि सगळ्यांना माहीत होतं, की तो चांगला माणूस
नव्हता. पण हे,
जे
एडमिनिस्ट्रेटर त्याच्याबद्दल सांगंत होता, ते तर स्त्योपासाठीसुद्धां
भयंकर होतं. हो,
भयंकर!
खूपंच भयंकर...!
रीम्स्कीची बोचरी नजर
एडमिनिस्ट्रेटरच्या चेह-याला जणु छेदत होती आणि जसा जसा तो पुढे बोलंत गेला, त्याचे डोळे जास्त
उदास व्हायला लागले. जशी-जशी एडमिनिस्ट्रेटरची गोष्ट फुलंत गेली आणि रंगंत
गेली...तसा तसा फिनडाइरेक्टरचा त्याच्यावरचा विश्वास कमी होत गेला. जेव्हां
वारेनूखाने सांगितलं की धिंगाणा घालणा-या स्त्योपाने त्या लोकांचासुद्धां विरोध
केला,
जे
त्याला मॉस्कोला घेऊन जायला आले होते, तेव्हां फिनडाइरेक्टरला पूर्ण विश्वास झाला की
अर्ध्या रात्री परंत आलेला एडमिनिस्ट्रेटर अगदी खोट बोलतोय! धडधडीत खोटं!
सुरुवातीपासून शेवट पर्यंत फक्त खोटं!
वारेनूखा पूश्किनोला गेलेला
नव्हता,
आणि स्त्योपापण तेथे नव्हता. दारूच्या नशेंत तार
पाठवणारा क्लर्कसुद्धां नव्हता; बारमधे फुटलेल्या बाटल्याही नव्हत्या आणि स्त्योपाला
दोरखंडाने बांधलंसुद्धां नव्हतं...असं काहींच झालेलं नव्हतं.
जसाच फिनडाइरेक्टर ह्या
निष्कर्षापर्यंत पोहोचला, की एडमिनिस्ट्रेटर खोटं बोलतोय, त्याच्या सम्पूर्ण
शरीरांत भीतीची लाट पसरली – डोक्यापासून पायांपर्यंत. त्याला पुन्हां असा भास झाला
की दुर्गंधियुक्त दमटपणा खोलीत पसरंत चाललाय. त्याने एडमिनिस्ट्रेटरच्या
चेह-यावरून एका मिनिटासाठीसुद्धां नजर दूर नाही केली, जो आपल्याच खुर्चीत
वाकडा-तिकडा होत होता, आणि सतंत निळा प्रकाश फेकणा-या लैम्पच्या सावलीतून बाहेर न
पडण्याचा प्रयत्न करंत होता. एका वर्तमानपत्राने तो जणु त्रास देणा-या ह्या
प्रकाशापासून स्वतःला वाचवंत होता. फिनडाइरेक्टर फक्त हाच विचार करंत होता की ह्या
सगळ्याचा अर्थ काय असूं शकतो? निर्मनुष्य इमारतीत इतक्या उशीरा येऊन तो धादांत खोटं
का बोलतोय?
एका
अनामिक भीतीने फिनडाइरेक्टरला हळू हळू वेढून घेतलं. रीम्स्कीने असं दाखवलं की वारेनूखाच्या
हालचालींवर त्याचं बिल्कुल लक्ष नाहीये, पण तो त्याच्या गोष्टीचा एक शब्दही न ऐकतां
फक्त त्याच्या चेह-याकडे टक लावून बघंत राहिला. काहीतरी विचित्र होतं, जे पूश्किनोमधल्या
गोष्टीहूनही जास्त अविश्वसनीय होतं आणि हे होतं - एडमिनिस्ट्रेटरच्या चेह-यांत आणि
सवयींत झालेला बदल.
त्याने आपल्या टोपीचा
बदकासारखा कोपरा चेह-यावर कितीही खेचला, ज्याने चेह-यावर सावली पडंत राहिली, किंवा लैम्पच्या
प्रकाशापासून स्वतःला वाचवण्यासाठी वर्तमानपत्राला कितीही फिरवंत राहिला – तरीही
फिनडाइरेक्टरला त्याच्या चेह-याच्या उजव्या बाजूला नाकाच्या जवळ मोट्ठा निळा डाग
दिसलांच. शिवाय नेहमी लाल दिसणारा एडमिनिस्ट्रेटर एकदम पांढरा फटक पडला होता आणि
माहीत नाही कां,
ह्या
दमट रात्री सुद्धां त्याच्या मानेवर एक जुना रेघारेघांचा स्कार्फ गुंडाळलेला होता.
तसंच आपल्या अनुपस्थितीत तो मिटक्या मारण्याची आणि चोखण्याची घाणेरडी सवंय पण
शिकून गेला होता; त्याचा आवाज सुद्धां बदलला होता, पहिल्यापेक्षां जाडा आणि
भसाडा,
डोळ्यांत
चोरी आणि भीतीचं अजब मिश्रण होतं – इवान सावेल्येविच वारेनूखा नक्कीच बदलला होता.
आणखी पण काही होतं, जे फिनडाइरेक्टरला खूपंच
उद्विग्न करंत होतं. ते काय होतं, हे त्याला आपलं जळजळंत असलेलं डोकं लढवून आणि निरंतर
वारेनूखाकडे बघंत राहूनसुद्धां समजलं नव्हतं. त्याला फक्त येवढंच कळंत होतं की हे
काहीसं अजून पर्यंत न बघितलेलं, अप्राकृतिक असं होतं, जे एडमिनिस्ट्रेटरला
चांगल्याच ओळखीच्या जादुई खुर्चीशी जोडंत होतं.
“शेवटी त्याच्यावर काबू करण्यांत यश आलं, आणि त्याला
गाडींत कोंबलं,” वारेनूखाची भिणभिण चालूं होती,
तो
वर्तमानपत्राच्या आडून बघंत होता आणि हाताच्या पंजाने निळा डाग लपवंत होता.
रीम्स्कीने आपला हात पुढे
केला आणि टेबलावर यंत्रवत् बोटं नाचवंत इलेक्ट्रिक घण्टीच बटन दाबून टाकलं.
त्याच्या हृदयांत धक्क झालं. त्या रिकाम्या बिल्डिंगमधे घण्टीचा कर्कश आवाज ऐकूं
यायला पाहिजे होता, पण असं नाही झालं. घण्टीचं बटन निर्जीवपणे टेबलांत घुसंत गेलं.
बटन निर्जीव होतं आणि घण्टी बिघडवली गेली होती.
फिनडाइरेक्टरची लबाडी
वारेनूखापासून लपू नाही शकली. त्याने डोळ्यांने अंगार ओकंत दरडावंत विचारलं, “घण्टी कां वाजवतोयंस?”
“अशीच वाजली,” दबक्या आवाजांत
फिनडाइरेक्टरने उत्तर दिलं आणी तिथून आपला हात उचलंत मरियल आवाजांत विचारलं, “तुझ्या चेहर-यावर हे
काय आहे?”
“कार घसरली, दाराच्या हैण्डलवर
आदळलो,”
वारेनूखा
ने त्याची नजर टाळंत म्हटलं.
“खोटं! खोटं बोलतोय!”
आपल्याच विचारांत मग्न फिनडाइरेक्टर म्हणाला आणि त्याचे डोळे विस्फारले, आणि तो खुर्चीच्या
पाठीला चिकटून गेला.
खुर्चीच्या मागे, फरशीवर एकमेकांत
गुंतलेल्या दोन सावल्या पडल्या होत्या – एक काळी आणि जाड, दुसरी पातळ आणि भूरी.
खुर्चीची पाठ,
आणि
तिच्या टोकदार पायांची सावली स्पष्ट दिसंत होती, पण पाठीच्या वरती
वारेनूखाच्या डोक्याची सावली नव्हती, अगदी तशीचं, जशी खुर्चीच्या पायांखाली
एडमिनिस्ट्रेटरच्या पायांची सावली नव्हती.
“त्याची सावली पडंत नसते!”
आपल्याच विचारांत रीम्स्की पिसाटासारखा ओरडला. त्याचं सर्वांग थरथरूं लागलं.
वारेनूखाने डोळ्यांच्या
कोप-यातूंन पाहिलं, रीम्स्कीचं घाबरणं आणि खुर्चीच्या मागे लागलेली त्याची नजर बघून
तो समजून गेला की त्याचं बिंग फुटलंय.
वारेनूखा खुर्चीतून उठला, फिनडाइरेक्टरनेपण
असंच केलं,
आणि
दोन्हीं हातांत ब्रीफकेस घट्ट धरून टेबलपासून एक पाय दूर सरकला.
“दुष्टाने ओळखलंय!
नेहमीपासूनंच हुशार आहे,” रागाने दात-ओठ खात फिनडाइरेक्टरच्या चेह-यासमोर
वारेनूखा पुटपुटला आणि अचानक खुर्चीतून उडी मारून पट्कन विलायती कुलुपाचं बटन खाली
केलं. फिनडाइरेक्टरने बगिच्यांत उघडणा-या खिडकीकडे सरकंत हताश होऊन पाहिलं.
चंद्राच्या प्रकाशांत न्हायलेल्या ह्या खिडकीला चिटकलेला एका नग्न मुलीचा चेहरा
आणि हात त्याला दिसला. मुलगी खिडकीचा खालचा बोल्ट उघडण्याचा प्रयत्न करंत होती.
वरचा बोल्ट उघडलेला होता.
रीम्स्कीला भास झाला की टेबल
लैम्पचा प्रकाश कमी होत चाललाय आणी टेबल झुकतंय. रीम्स्कीला जणु बर्फाच्या लाटेने
वेढून घेतलं. त्याने स्वतःला सांभाळलं, नाहीतर तो पडलांच असता. उरल्या-सुरल्या
ताकदीने ओरडायच्या ऐवजी तो फक्त कुजबुजत्या स्वरांत म्हणाला, “वाचवा...”
वारेनूखा दाराकडे लक्ष ठेवंत
त्याच्यासमोर उड्या मारंत होता, हवेंत बराच वेळ झुलंत होता. वाकड्या-तिकड्या बोटांनी
रीम्स्कीला खुणा करंत होता, फुत्कार करंत होता, खिडकींत उभ्या असलेल्या
मुलीला डोळा मारंत होता.
मुलीने चट्कन आपलं लाल
केसांचं डोकं वेन्टिलेटरमधे घुसवलं आणि हाताला शक्य तितकं लांब करून खिडकीच्या
खालच्या चौकटीला खरचटूं लागली. तिचा हात रबरासारखा लांब होत गेला आणि त्याच्यावर
मृतप्राय हिरवंटपणा पसरला. शेवटी हिरव्या मृतप्राय बोटांनी बोल्टचं वरचं टोक पकडून
फिरवलं. खिडकी उघडूं लागली. रीम्स्की अत्यंत अशक्त आवाजांत ओरडला, भिंतीला टेकून
त्याने ब्रीफकेसला आपल्या समोर ढालीसारखं धरलं. तो समजून चुकला की समोर मृत्यु उभा
आहे.
खिडकी पूर्णपणे उघडली, पण खोलींत रात्रीची
ताजी हवा आणि लिण्डन वृक्षांच्या सुवासाऐवजी तळघराचा दुर्गंध घुसला. मृत मुलगी
खिडकीच्या चौकटीवर चढली. रीम्स्कीला तिच्या छातीवर सडल्याचे डाग स्पष्टपणे दिसले.
आणि ह्याच वेळेस अकस्मात
कोंबड्याचा प्रसन्न आरव बगिच्यातून तरंगंत आला. तो शूटिंग गैलरीच्या मागे असलेल्या
त्या लहानग्या बिल्डिंगमधून आला होता, जिथे कार्यक्रमांसाठी पाळलेले पक्षी ठेवलेले
होते. एक मोट्ठा, प्रशिक्षित कोंबडा आरवला आणि त्याने संदेश दिला की मॉस्कोत
पूर्वेकडून सूर्योदय होत आहे.
रानटी आवेशामुळे मुलीचं तोंड
विकृत झालं,
ती गुरगुरली, आणि दाराजवळ असलेला
वारेनूखा किंचाळला आणि हवेतून फरशीवर आला.
कोंबडा पुन्हां आरवला; मुलीने दातांची
किटकिट केली आणि तिचे लाल केस उभे झाले. कोंबड्याची तिसरी आरोळी होतांच ती वळली
आणि उडून गायब झाली. तिच्या मागे-मागे वारेनूखापण उडीमारून आणि हवेंत सपाट होऊन, उडणा-या क्यूपिड
सारखा,
हवेंत
तरंगंत हळू-हळू टेबलाच्या वरून खिडकीतून बाहेर निघून गेला.
बर्फासारखा पांढरा फट्ट, एकही काळा केस
नसलेला म्हातारा, जो काही वेळापूर्वी रीम्स्की होता, दाराकडे धावला, चावी फिरवून, दार उघडून अंधा-या
कॉरीडोरमधे पळूं लागला. पाय-यांच्या वळणावर भीतीने विव्हळंत, चाचपडंत त्याने
विजेचं बटन शोधलं आणि पाय-या प्रकाशांत न्हाऊन गेल्या. पाय-यांवर हा थरथरणारा
म्हातारा पडला,
कारण
त्याला असं वाटलं की पाठीमागून वारेनूखाने त्याच्यावर उडी मारलीय.
खाली आल्यावर त्याने लॉबीमधे
स्टूलवरंच बसल्या-बसल्या झोपलेल्या चौकीदाराकडे पाहिलं, रीम्स्की चोरपावलांनी
त्याच्या जवळून गेला आणि मुख्य दरवाज्यातून बाहेर धावला, रस्त्यावर आल्यावर त्याला
थोडं बरं वाटलं. तो इथपर्यंत शुद्धीवर आला की दोन्हीं हातांनी डोकं धरल्यावर
त्याला टोपी ऑफ़िसमधेंच विसरून आल्याची जाणीव होऊं शकेल.
स्पष्टंच आहे, की तो टोपी घ्यायला
परंत नाही गेला,
आणि एक
दीर्घ श्वास घेऊन जवळच्या सिनेमा हॉलच्या कोप-यावर दिसंत असलेल्या लाल लाइटकडे
धावला. एका मिनिटातच तिथे पोहोचला. कोणीच कार नव्हतं थांबवंत.
“लेनिनग्रादच्या ट्रेनवर चल, चहासाठी देईन!” आपलं
हृदय पकडून मुश्किलीने श्वास घेत म्हातारा म्हणाला.
“गैरेजमधे चाललोय...”
ड्राइवर तुच्छतेने म्हणाला आणि त्याने गाडी वळवली.
तेव्हां रीम्स्कीने ब्रीफकेस
उघडून पन्नास रूबल्सची नोट काढली आणि ड्राइवरच्या समोरच्या खिडकीजवळ नाचवली.
काही क्षणातंच घरघर करंत कार
विजेसारखी सादोवाया रिंगरोड वर धावली. म्हातारा सीटवर डोकं टेकून बसला आणि
ड्राइवरच्या जवळच्या आरशांत रीम्स्कीने बघितली ड्राइवरची प्रसन्न नजर आणि आपली
बावरलेली नजर.
स्टेशनच्या इमारतीसमोर
कारमधून उडी मारून समोर दिसला त्या पांढ-या ड्रेसवाल्या माणसाला ओरडून म्हटलं, “फर्स्ट क्लास! एक!
तीस देईन!” त्याने ब्रीफकेसमधून नोट काढले, “फर्स्ट क्लासचं नाही तर सेकण्ड
क्लासच दे! ते सुद्धां नसलं तर ऑर्डिनरी दे!”
त्या माणसाने चमकत्या
घड्याळाकडे बघून रीम्स्कीच्या हातांतून नोट खेचून घेतले.
ठीक पाच मिनिटांनी
स्टेशनच्या काचा लावलेल्या गुम्बदाखालून लेनिनग्रादवाली गाडी निघाली आणि अंधारांत
लुप्त झाली. तिच्याच बरोबर रीम्स्कीसुद्धां गायब झाला.
***********
पंधरा
निकानोर इवानोविचचं
स्वप्न
हा अनुमान करणं कठीण नाहीये, की लाल चेह-याचा जाड्या, ज्याला हॉस्पिटलच्या 119नंबरच्या खोलींत आणलं होतं, निकानोर इवानोविच बसोय होता.
पण
त्याला प्रोफेसर स्त्राविन्स्कीकडे लगेच नाही आणलं, काही वेळ दुस-या जागेंत1 ठेवून मग त्याला इथे पाठविण्यांत आलं.
ह्या
दुस-या जागेबद्दल निकानोर इवानोविचला फारंच कमी आठवतंय. त्याला फक्त टेबल, अलमारी आणि सोफा – येवढंच
लक्षांत होतं.
तिथे
निकानोर इवानोविचला, ज्याला रक्त-दाब आणि मानसिक उत्तेजनेमुळे आपल्या डोळ्यांसमोर सगळंच अगदी
अस्पष्ट दिसंत होतं, काही प्रश्न विचारण्यांत आले. पण हे संभाषण बरंच विचित्र आणि क्लिष्ट होतं, खरं म्हणजे त्यांतून काहीच
निष्कर्ष नाही निघाला.
पहिलाच
प्रश्न, जो
त्याला विचारण्यांत आला, तो होता – “तुम्हीं, निकोलाय इवानोविच बसोय, सादोवायाच्या बिल्डिंग नंबर 302बी च्या हाउसिंग सोसाइटीचे प्रेसिडेण्ट आहांत?”
ह्यावर
निकोलाय इवानोविचने भयंकर हास्य केलं आणि म्हणाला:
“मी
निकानोर आहे, शंकाच
नाही, निकानोर!
पण मी प्रेसिडेण्ट कुठून झालो!”
“म्हणजे
काय?” डोळे बारीक करून निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“म्हणजे
असं...” तो म्हणाला, “की जर मी प्रेसिडेण्ट आहे, तर मला लगेच समजायला पाहिजे होतं, की तो एक दुष्ट शक्ति आहे! नाहीं तर, हे सगळं काय आहे? चश्मा तुटलेला...फाटके कपडे घातलेला...तो कोण्या परदेशी पाहुण्याचा दुभाष्या
कसा काय असूं शकतो?”
“कोणाबद्दल
बोलतांय?” निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“करोव्येव!”
निकानोर इवानोविच ओरडला, “आमच्या बिल्डिंगच्या पन्नास नंबरच्या फ्लैटमधे घुसून गेलाय. लिहा: करोव्येव!
त्याला लगेच पकडलं पाहिजे. लिहा: सहावं प्रवेश द्वार. तिथेच आहे तो.”
“डॉलर्स
कुठून घेतले?” अत्यंत प्रेमाने निकानोर इवानोविचला विचारण्यांत आलं.
“सर्वशक्तिमान, सर्वव्यापी ईश्वर,” निकानोर इवानोविच म्हणाला, “सगळं बघतोय. आणि मला पण
तिथेच जायचं आहे. मी डॉलर्सला कधी हात सुद्धां लावला नाही आणी मला शंकासुद्धां नाही
आली, की
हे कसले नोट आहेत! जर मी गुन्हा केला असेल, तर परमेश्वर मला शिक्षा देईल.” कधी आपला शर्ट खेचत, कधी त्याला ढीला करंत, कधी क्रॉसचं चिन्ह बनवंत
भावपूर्ण स्वरांत निकानोर इवानोविच सांगंत गेला, “घेतले! घेतले, पण आपले सोवियत नोट घेतले! घेऊन सहीसुद्धां केली. वाद-विवाद नाही करंत; आमचा सेक्रेटरी
प्रोलेझ्नेव पण चांगला माणूस आहे, खूपंच चांगला आहे! मी खुल्लम-खुल्ला सांगतोय की हाउसिंग सोसायटींत सगळे चोर
आहेत. पण डॉलर्स मी नाही घेतले!”
जेव्हां
त्याला म्हटलं, की
वेडा असण्याचं नाटक करूं नको आणि सरंळ सांग की बाथरूमच्या वेन्टिलेटरमधे डॉलर्स कुठून
आले, तेव्हां
निकानोर इवानोविच गुडघ्यांवर बसून, तोंड उघडून मागे-पुढे हलूं लागला, जणु त्याला लाकडी फरशीच्या पट्ट्या गिळायच्या आहेत.
“तुम्हीं
म्हणाल तर...” तो पुटपुटला, “मी माती खायला तयार आहे, हे सिद्ध करायला, की मी डॉलर्स नाही घेतले? आणि करोव्येव, तो तर सैतान आहे!”
सहनशक्तीचीसुद्धां
एक सीमा असते. विचारपूस करणा-यांनी आता आपला आवाज उंच केला होता. ते
चेतावनीसुद्धां देत होते, की आता निकानोर इवानोविचची माणसासारखं बोलायची वेळ आलेली आहे.
तेवढ्यांत
ती सोफेवाली खोलीं निकानोर इवानोविचच्या घाबरलेल्या किंचाळीने भरून गेली, तो उडी मारून उभा राहिला
होता, “बघा, बघा, तिथे आहे! अलमारीच्या
मागे! बघा, कसां
चिडवतोय! त्याचा चश्मा...पकडा! खोलींत पवित्र पाणी शिंपडा!”
निकानोर
इवानोविचचा चेहरा फक्क झाला होता, थरथर कापंत तो हवेत क्रॉसच चिन्ह बनवंत होता. दाराजवळ धावंत जाऊन परंत येत
होता, कोणचीतरी
प्रार्थना बुदबुदंत होता आणि शेवटी फक्त असंबद्ध बडबड करूं लागला.
दिसंत
होतं की निकानोर इवानोविचची मानसिक स्थिति वार्तालाप करण्यासारखी नव्हती. त्याला
एका वेगळ्या खोलींत नेऊन बसवलं, जिथे तो थोडा शांत झाला. आता तो फक्त प्रार्थना करंत होता आणि अधून-मधून
हुंदके देत होता.
सादोवाया
स्ट्रीटवर गेले, फ्लैट
नम्बर 50मधे एक टीम पाठवण्यांत आली, पण तिथे करोव्येव-बिरोव्येव किंवा त्याला ओळखणारा कुणीच नव्हता. तो फ्लैट, जिथे मृतक बेर्लिओज़ आणि
याल्टाला गेलेला लिखादेयेव राहात होते, बिल्कुल रिकामा होता. खोलीतल्या अलमा-या सील केलेल्या होत्या आणि
त्यांच्यावर मेणाची सील चुपचाप बसली होती. हे सगळं बघून सादोवायावरून परंत आले.
त्यांच्याच बरोबर बिल्डिंगमधून वैतागलेला, घाबरलेला हाउसिंग सोसाइटीचा सेक्रेटरी प्रोलेझ्नेव होता.
संध्याकाळी
निकानोर इवानोविचला स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलमधे आणलं. तिथे त्याने इतका
धुमाकूळ घातला, की
स्त्राविन्स्कीच्या आज्ञेप्रमाणे त्याला झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं. अर्धी
रात्र उलटल्यावर निकानोर इवानोविचचा डोळा लागला. तो 119नंबरच्या खोलींत झोपला होता
आणि मधून-मधून विव्हळंत होता.
हळू-हळू
त्याची झोप गाढ झाली. त्याने कुशी बदलणं आणि विव्हळणं बंद केलं. त्याचा श्वास एका
लयीत चालू लागला; तेव्हां
त्याला खोलींत एकटं राहू दिलं.
निकानोर
इवानोविचने एक स्वप्न पाहिलं, जे स्पष्टपणे त्याच्या आजच्या दुःखाशी संबंधित होतं. त्याने बघितलं की
सोनेरी तुता-या घेतलेले काही लोकं त्याला पकडून समारोहपूर्वक एका भव्य चमचमणा-या
दाराकडे घेऊन चाललेत. ह्या दारापर्यंत येऊन त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी जणु
त्याच्या सम्मानार्थ स्वागत गीत वाजवणं सुरूं केलं. तेवढ्यांत आकाशवाणी झाली:
“स्वागत
आहे, निकानोर
इवानोविच! डॉलर्स
द्या!”
निकानोर
इवानोविचने आश्चर्याने वर बघितलं, तिथे काळ्या रंगाचा लाउडस्पीकर लावलेला होता.
मग
न जाणे कसा तो एका थियेटरमधे आला, जिथे सोनेरी छताला शानदार झुम्बर लटकले होते आणि भिंतीवर क्विन्क्वेट2
लैम्प्स लावले होते. सगळं अगदी तसंच होतं, जसं एका शानदार छोट्याशा थियेटरमधे असतं. स्टेजवर मखमली पडदा होता, दाट काळपट-लाल रंगाचा, सोनेरी तारे शिवलेला, प्रॉम्प्टिंग बॉक्स होता, दर्शकसुद्धां होते.
निकानोर
इवानोविचला हे बघून आश्चर्य वाटलं की दर्शक एकाच वर्गाचे – पुरुष वर्गाचे होते, आणि सगळे माहीत नाही कां, दाढीवाले होते. त्याला
ह्या गोष्टीचंसुद्धां आश्चर्य वाटलं की तिथे खुर्च्या नव्हत्या, सगळे फरशीवरंच बसले होते; फरशी मस्त पॉलिश केलेली, चिक्कण होती.
ह्या
नवीन वातावरणाचा संकोच दूर सारून निकानोर इवानोविचसुद्धां इतरांसारखा, एका लाल दाढीवाल्या
लट्ठ्या आणि एक फिक्कट चेह-याच्या बेढब नागरिकांच्या मधे फरशीवर मांडी घालून बसून
गेला. कोणीही आगंतुकाकडे लक्ष नाही दिले.
इतक्यांत
घंटीचा मंजुळ आवाज ऐकूं आला, हॉलचे लाइट्स बंद झाले, पडदा उघडला आणि स्टेजवर दिसलं एक टेबल आणि खुर्ची. टेबलावर ठेवली होती
सोनेरी घण्टी. पार्श्वभूमिवर काळ्या रंगाचं मखमल लावलेलं होतं.
विंगमधून
ईवनिंग जैकेट घातलेला, चिकण्या चेह-याचा, केसांचा व्यवस्थित भांग पाडलेला एक सुरेख तरुण कलाकार आला. दर्शकांमधे
हालचाल झाली आणि सगळे स्टेजकडे बघूं लागले. कलाकार बॉक्सकडे आला आणि हात चोळूं
लागला.
“बसले
आहांत?”3 त्याने गोड, भारदस्त
आवाजांत स्मित करंत दर्शकांना विचारलं.
“बसलोय, बसलोय...” अनेक जाड्या, बारीक आवाजांच्या समूहाने
उत्तर दिलं.
“हुँ...”
कलाकारा विचारांत गढल्यासारखा म्हणाला, “तुम्हीं कित्ती बोर झाला आहांत, मला काय माहीत नाहीये! दुसरे लोक रस्त्यांवर हिंडतांत, मौजमस्ती करतांत, वसंत ऋतूच्या सूर्याचा
आनंद घेतात, आणि
तुम्हीं इथे दमट हॉलमधे ज़मिनीवर पडले आहांत! हा कार्यक्रम काय इतका मनोरंजक आहे? जाऊं द्या, आपली-आपली आवंड असते,” कलाकार दार्शनिकासारखा बोलला.
मग
त्याने आपला स्वर आणि बोलण्याची पद्धत बदलून प्रसन्नतेने जोरांत म्हटलं, “तर, कार्यक्रमाचे पुढील कलाकार
आहेत – निकानोर इवानोविच बसोय, हाउसिंग सोसाइटीचे प्रेसिडेण्ट आणि ‘संतुलित आहार’ भोजनालयाचे प्रमुख. निकानोर इवानोविच, या!”
दर्शकांने
टाळ्या वाजवून सूत्रधाराला प्रतिसाद दिला. चकित निकानोर इवानोविचने विस्फारलेल्या
डोळ्यांनी चारीकडे बघितलं, सूत्रधाराने आपल्या चेह-यावर येत असलेल्या उजेडाला हातांनी थांबवंत हॉलमधे
बसलेल्या निकानोर इवानोविचला शोधून काढलं आणि खुणेने त्याला स्टेजवर यायला
सांगितलं. निकानोर इवानोविचला कळलंसुद्धां नाही की तो कसा स्टेजवर पोहोचला.
त्याच्या
डोळ्यांवर स्टेजच्या समोरून आणि खालून येणारा रंगीत बल्ब्सचा प्रकाश आदळला; ज्याच्यामुळे दर्शकांसमवेत
हॉल अंधारांत गडप झाला.
“तर, निकानोर इवानोविच, एक उदाहरण प्रस्तुत करा,” युवा कलाकार मोठ्या
प्रेमाने म्हणाला, “आणि डॉलर्स देऊन टाका.”
एकदम
शांतता पसरली. निकानोर इवानोविचने दीर्घ श्वास घेऊन हळू आवाजांत म्हटलं:
“देवाची शप्पथ घेऊन सांगतो की...”
पण
तो हे शब्द पूर्णपणे म्हणूपण शकला नाही, की हॉलमधे “हाय...हाय...” चे आवाज यायला लागले. निकानोर इवानोविच गोंधळून
गप्प झाला.
“तुमचं
म्हणणं मला जेवढं कळलंय...” सूत्रधार म्हणाला, “त्याप्रमाणे तुम्ही देवाची शप्पथ घेऊन हे सांगणार होते, की तुमच्याकडे डॉलर्स
नाहीयेत?” आणि त्याने सहानुभूतिने निकानोर इवानोविचकडे पाहिलं.
“अगदी
बरोबर, माझ्याकडे
नाहीयेत...” निकानोर इवानोविचने उत्तर दिलं.
“तर…” कलाकाराने विचारलं, “धृष्ठतेसाठी क्षमा करा, त्या फ्लैटच्या शौचालयांत
400 डॉलर्स कुठून आले, ज्यांत फक्त तुम्हीं आपल्या बायकोबरोबर राहता?”
“जादूचे
असतील!” अंधारांत कोणीतरी उपहासाने टिप्पणी केली.
“अगदी
बरोबर...जादूचेच होते,” अत्यंत नम्रतेने निकानोर इवानोविच अंधा-या हॉलला, किंवा पब्लिकला संबोधित करंत म्हणाला, “सैतानी शक्ति, चौकटीचा शर्ट घातलेल्या दुभाष्याने ते फेकले आहेत.”
हॉलमधे
पुन्हां अप्रसन्न कल्लोळ होऊं लागला, जेव्हां आवाज किंचित शांत झाले तेव्हां कलाकार म्हणाला, “बघा, कश्या-कश्या
ला-फोन्तेनच्या गोष्टी मला ऐकाव्या लागतांत. 400 डॉलर्स फेकून गेला! आता तुम्हीं:
इथे तुम्हीं सगळे डॉलर्सवाले आहांत! मी तुम्हांला विचारतो – ह्या गोष्टीवर विश्वास
ठेवणे शक्य आहे कां?”
“आमच्याकडे
काही डॉलर्स-बीलर्स नाहीयेत.” हॉलमधून काही आहत स्वर ऐकूं आले, “पण ह्या गोष्टीवर मात्र
कोणीच विश्वास ठेवणार नाही.”
“
मी पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे,” कलाकार ठामपणे म्हणाला, “आणि मी तुम्हांला विचारतो: कोणची वस्तू फेकली जाऊं शकते?”
“लहान
मूल!” हॉलमधे कोणीतरी ओरडलं.
“अगदी
बरोबर,” सूत्रधार म्हणाला, “लहान मूल, निनावी
पत्र, जाहिरात, खतरनाक कार वगैरे...वगैरे, पण चारशे डॉलर्स कोणीच
नाही फेकणार, कारण
जगांत असा मूर्ख कोणीच नाहीये,” निकानोर इवानोविचकडे बघून सूत्रधार निराशेने आणि त्याच्यावर ठपका ठेवंत म्हणाला, “तुम्हीं मला दुःखी केलंय
निकानोर इवानोविच! मला तुमच्यावर खूप भरोसा होता. तर, हे, काही
जमलं नाही.”
हॉलमधे
निकानोर इवानोविचकडे बघंत लोक शिट्ट्या वाजवूं लागले.
“डॉलर्स
आहेत त्याच्याकडे,” हॉलमधून बरेचसे आवाज आले, “अशांच लोकांमुळे प्रामाणिक लोकपण मारले जातात.”
“त्याच्यावर
राग नका काढू,” सूत्रधार सौम्यपणे म्हणाला, “तो स्वीकार करेल,” आणि निकानोर इवानोविचकडे आपल्या निळ्या, अश्रूपूर्ण डोळ्यांनी बघंत पुढे म्हणाला,
“तर, निकानोर इवानोविच, आपल्या जागेवर जा.”
ह्याच्यानंतर
सूत्रधारने घण्टी वाजवून घोषणा केली, “मध्यांतर, दुष्टांनो!”
हादरलेला
निकानोर इवानोविच, जो
अप्रत्याशितपणे ह्या कार्यक्रमाचा एक भाग झालेला होता, माहीत नाही कसा, परंत फरशीवर आपल्या जागेवर पोहोचला. त्याने बघितलं, की हॉलमधे पूर्णपणे अंधार
झालाय, भिंतीवर
लाल चमकदार अक्षरं प्रकट होऊं लागले : ‘डॉलर्स द्या!’
थोड्या
वेळाने पडदा पुन्हां उघडला आणि सूत्रधार म्हणाला, “सेर्गेइ गेरार्दोविच दुंचिल, कृपा करून स्टेजवर या.”
दुंचिल
एक सहृदय, पण
आजा-यासारखा, जवळ-जवळ
पन्नास वर्षांचा माणूस होता.
“सेर्गेइ
गेरार्दोविच,” सूत्रधार त्याला म्हणाला, “तुम्हीं इथे दीड महिन्यापासून आहांत, पण तरीही उरलेले डॉलर्स द्यायला तयार होत नाहीये, आणि देशाला परदेशी मुद्रेची भयंकर आवश्यकता आहे आणि ती तुमच्या काही
कामाचीसुद्धां नाहीये. तरीही तुम्हीं आपलंच तुणतुणं वाजवताय. तुम्हीं तर समजदार
आहांत. तुम्हांला सगळं कळतंय. तरीही माझ्याकडे येत नाहीये.”
“मी
दिलगीर आहे, ह्या
बाबतीत मी काहीही करूं शकंत नाही, कारण की माझ्याजवळ आत डॉलर्स खरंच नाहीयेत,”
दुंचिलने शांतपणे सांगितलं.
“कमीत
कमी हीरे-जवाहिरात तरी असतील?” कलाकाराने विचारलं.
“हीरे-जवाहिरातपण
नाहीये.”
कलाकाराने
मान खाली केली आणि किंचित विचार करून त्याने टाळी वाजवली. विंगमधून मध्यम वयाची, फैशनेबल कपडे घातलेली एक
महिला आली. तिच्या कोटाला कॉलर नव्हती आणि टोपी, सुरेख, विणलेली
होती. महिला किंचित उत्तेजित वाटंत होती, पण दुंचिलने निर्विकार भावाने तिच्याकडे पाहिलं.
“ही
महिला कोण आहे?” सूत्रधाराने दुंचिलला विचारलं.
“ही
माझी बायको आहे,” दुंचिलने मोठेपणाने म्हटलं आणि किंचित तिरस्काराने बायकोच्या लांब मानेकडे
बघितलं.
“माफ़
करा, मैडम
दुंचिल, आम्हीं
तुम्हांला त्रास दिला,” सूत्रधार महिलेला म्हणाला, “मुद्दा हा आहे, की आम्हांला विचारायचं आहे, की तुमच्या नव-याकडे आणखी डॉलर्स आहेत कां?”
“त्याने
तेव्हांच सगळं देऊन टाकलं होतं,” किंचित त्रासून मैडम दुंचिलने म्हटलं.
“जर
असं आहे,” सूत्रधार म्हणाला, “तर आम्हांला लगेच सेर्गेइ गेरार्दोविचचा निरोप घ्यावा लागेल, काय करणार! सेर्गेइ
देरार्दोविच, वाटलं
तर तुम्हीं थियेटरमधून बाहेर जाऊ शकता...” सूत्रधारने शानदार अभिवादन केलं.
दुंचिल
ऐटींत वळला आणि विंगकडे जाऊं लागला.
“एक
मिनिट!” सूत्रधार त्याला थांबवंत म्हणाला, “जातां-जातां आमच्या कार्यक्रमाचा आणखी एक आइटम दाखवण्यांची परवानगी द्या,” आणि त्याने दुस-यांदा टाळी
वाजवली.
मागचा
काळा पडदा दूर झाला आणि नृत्याचा पोषाक घातलेली एक सुंदर, तरुण मुलगी हातांत सोनेरी
ट्रे घेऊन स्टेजवर आली. ट्रेमधे रिबिनीने बांधलेली एक जाड गड्डी आणि हि-यांचा
नेकलेस होता, ज्यांतून
चारीकडे निळ्या, पिवळ्या आणि लाल ज्वाळा निघंत होत्या.
दुंचिलने
एक पाय मागे घेतला आणि त्याचा चेहरा फक्क झाला. हॉलमधे स्तब्धता पसरली.
“अठरा
हजार डॉलर्स आणि चाळीस हजार स्वर्ण मुद्रांचं नेकलेस,”
कलाकाराने विजयी मुद्रेने म्हटलं, “लपवून ठेवलं होतं सेर्गेइ
गेरार्दोविचने खारकोव शहरांत आपली प्रेयसी इडा हरक्युलोव्ना बोर्सच्या फ्लैटमधे, जिला भेटण्याचं सौभाग्य
आम्हाला लाभलं आणि जी मोठ्या आनंदाने हा बेशकीमती, पण एकाच व्यक्तिसाठी निरर्थक खजिन्याला येथे घेऊन आली. खूप-खूप धन्यवाद, इडा हरक्युलोव्ना!”
सुन्दरीने
स्मित करंत आपले दात दाखवले. तिच्या मखमली पापण्या थरथरल्या.
सूत्रधार
दुंचिलला म्हणाला, “आणि तुमच्या गरिमामय मुखवट्यामागे लपलेला आहे एक हावरा कोळी, एक खतरनाक फसव्या आणि
खोटारडा. आपल्या हट्टामुळे तुम्ही दीड महिना सगळ्यांना त्रास देत राहिले. आता सरळ
घरी जा आणि तिथे तुमची बायको तुमच्यासाठी
जो नर्क बनवेल, तीच
तुमची शिक्षा आहे.”
दुंचिल
कोलमडून पडणारंच होता की कोणाच्यातरी मजबूत हातांनी त्याला सावरलं. तेवढ्यांत
समोरच्या पडद्याची घरघर ऐकूं आली आणि सगळे त्याच्यामागे लपले.
उन्मत्त टाळ्यांनी
हॉल इतका हादरला की निकानोर इवानोविचला झुमरांतील प्रकाश उसळंत असल्यासारखा भासला, आणि जेव्हां समोरचा काळा
पडदा दूर झाला तेव्हां स्टेजवर एकटा सूत्रधार होता. त्याने टाळ्यांच्या गडगडाची
दुसरी फेरी थांबवत अभिवादन केलं आणि बोलूं लागला:
“दुंचिलच्या
रूपांत आपल्यासमोर एका विशिष्ठ प्रकारच्या गाढवाने अभिनय केला होता. मी तुम्हांला
कालंच सांगून टाकलं होतं की परदेशी चलन लपवण्यांत काहीही फायदा नाहीये. त्याचा
उपयोग कोणीही, कधीही
नाही करू शकंत, मी
ठामपणे सांगतो. आता ह्या दुंचिललांच घ्या. त्याला लट्ठ पगाराची नौकरी आहे, कोणच्या गोष्टीची कमतरतापण
नाहीये, त्याच्याकडे
मस्त फ्लैट आहे, बायको
आहे, सुरेख
प्रेयसीदेखील आहे. तर मग, सुखा-समाधानाने राहण्याऐवजी ह्या सैतानाने हीरे-जवाहिरात आणि डॉलर्स लपवले.
परिणाम काय झाला? सगळ्यांच्या
समोर बिंग फुटलं. आणि कौटुम्बिक कलहाला सुद्धां आमंत्रण दिलं. तर, आणखी कोणाला द्यायचेत? कोणी आहे? तर, आता कार्यक्रमाचा पुढचा
आइटम आहे – पूश्किनच्या “लोभी सरदार”4 च्या काही अंशांच प्रस्तुतिकरण.
प्रस्तुत करताहेत प्रसिद्ध ड्रामा आर्टिस्ट कुरोलेसोव साव्वा पतापोविच, ज्यांना आम्हीं विशेष
आग्रह करून इथे बोलावलंय.”
चपळ, गलेलट्ठ, चिकण्या चेह-याचा, लांब फ्रॉक कोट आणि
पांढ-या टायमधे हा कुरोलेसोव पट्कन रंग़मंचावर आला.
काहीही प्रस्तावना न करतां, त्याने उदास चेह-यावर एक विशिष्ठ भाव आणून भुवया आकुंचित केल्या आणि सोनेरी
घण्टीकडे बघंत नाटकी आवाजांत म्हणाला, “जसा एक मस्त-मवाली लपाछिपी
खेळण्या-या व्यभिचारिणीला भेटायची वाट बघतो...”5
आणि
कुरोलेसोवने स्वतःबद्दल ब-यांच वाईट गोष्टी सांगितल्या. निकानोर इवानोविच ऐकंत होता, की कशी एक दुर्दैवी विधवा
त्याच्यासमोर मुसळधार पावसांत गुडघे टेकून रडंत होती, पण कुरोलेसोवला दया नाही आली. स्वप्न बघेपर्यंत निकानोर इवानोविचला
पूश्किनच्या रचनांबद्दल काहीही माहिती नव्हती पण तो पूश्किनला चांगलंच ओळखायचा आणि
जवळ-जवळ रोजचं अश्या प्रकारे म्हणायचा, जसं : “आणि फ्लैटचं भाडं, काय पूश्किन6 देणारेय? किंवा “पाय-यांवरचा बल्ब, कदाचित पूश्किनने काढलांय?”; केरोसिन ऑइल, कदाचित पूश्किन विकंत आणेल?”
पण
आतां पूश्किनच्या एका रचनेशी परिचय झाल्यावर निकानोर इवानोविच उदास झाला. त्याच्या
डोळ्यांसमोर पावसांत भिजंत, आपल्या अनाथ मुलांसोबंत गुडघे टेकणा-या महिलेचा चेहरा तरंगला. त्याच्या
मनांत आलं : ‘कमालीचा
आहे हा कुरोलेसोवपण!’
आणि
तो, मोठमोठ्याने
आपले दोष स्वीकार करून पश्चात्ताप करंत होता. शेवटी तर त्याने निकानोर इवानोविचला
खूपंच गोंधळांत टाकलं, कारण की अचानक तो अश्या व्यक्तीशी वार्तालाप करूं लागला, जो स्टेजवर नव्हतांच. त्या
व्यक्तीचं उत्तरपण स्वतःच देऊं लागला. कधी तो स्वतःला ‘सम्राट’, तर कधी ‘सामन्त’; कधी ‘बाबा’, तर कधी’ बेटा’; कधी ‘तुम्हीं’, तर कधी ‘तू’ म्हणून संबोधित करंत होता.
निकानोर इवानोविचला फक्त एकंच गोष्ट समजली, की कलाकार खूप वाईट प्रकारे मेला. त्याचे शेवटचे शब्द होते : “किल्ल्या!
माझ्या किल्ल्या!” मग तो जमिनीवर पडला. भसाड्या आवाजांत रडंत-रडंत त्याने आपली टाय
काढून टाकली.
मेल्यानंतर
कुरोलेसोव उठला. आपल्या कपड्यांवरची धूळ झटकून त्याने दर्शकांचं अभिवादन केलं, आणि नाटकीपणाने हसंत, टाळ्यांच्या मंद आवाजांत, हळू-हळू दूर होत गेला.
सूत्रधार
म्हणाला, “आत्तांच आपण साव्वा पतापोविचच्या झकास अभिनयांत “लोभी सरदार” बघितला. ह्या
सरदाराला आशा होती, की त्याच्याजवंळ अप्सरा धावत येतील आणि काही सुखद चमत्कार होतील. पण, जसं तुम्हीं बघितलं, की असं काहीही नाही झालं. ना
तर अप्सरा आल्या, ना
कवींनी त्याच्या साठी प्रशंसात्मक गीत लिहिले; त्याच्यासाठी स्मारंकसुद्धां नाही बांधले; ह्या उलंट तो खूप दुर्दैवीपणाने मेला – हृदय बंद पडल्याने, आपल्या पेटीवर, जी डॉलर्स आणि
हीरे-जवाहिरातांनी गच्च भरलेली होती, तो नरकांत गेला. मी चेतावनी देतो, की जर तुम्हींसुद्धां डॉलर्स परंत नाही केले, तर तुमचापण ह्यापेक्षांही वाईट, नाहीतर असांच अंत होईल!” माहीत नाही, हा पूश्किनच्या कवितेचा प्रभाव होता, की सूत्रधाराच्या भाषणाचा, पण हॉल मधून एक लाजरा आवाज आला, “मी डॉलर्स देतो.”
“कृपा
करून स्टेजवर या!” सूत्रधाराने अंधा-या हॉलमधे लक्ष देऊन बघंत म्हटलं.
आणि
रंगमंचावर दिसला पांढ-या केसांचा छोटा माणूस, ज्याच्या चेह-याकडे बघून असं वाटंत होतं, की त्याने जवळ-जवळ तीन आठवड्यांपासून दाढी नाही केलीय.
“माफ़
करा, तुमचं
नाव सांगाल का?” सूत्रधारने विचारलं.
“कनाव्किन
निकोलाइ!” आगंतुकाने लाजंत उत्तर दिलं.
“ओह, खूप
आनंद झाला नागरिक कनाव्किन, तर?”
“देतोय,” कनाव्किनने हळूच म्हटलं.
“किती?”
“एक
हजार डॉलर्स आणि दहा रुबल्सच्या 20 स्वर्ण मुद्रा.”
“शाबाश!
म्हणजे, जे
काही तुमच्याजवळ आहे, ते सगळं?”
सूत्रधाराने
सरळ कनाव्किनच्या डोळ्यांत पाहिलं. कनाव्किनला असा भास झाला, जणु ह्या डोळ्यांतून त्याच्या
शरीराच्या आर-पार जाणारे किरण निघताहेत, जश्या एक्स-रे किरण असतांत. हॉलमधे लोक श्वाससुद्धा घेणं विसरले.
“मला
विश्वास आहे!” एकदांच सूत्रधार म्हणाला आणि त्याने आपली नजर दूर केली, “पूर्ण विश्वास आहे! हे
डोळे खोटं नाही बोलंत आहेत, मी तुम्हांला कित्तीदा संगितलंय की तुम्हीं सर्वांत मोठी चूक ही करता की, माणसाच्या डोळ्यांच महत्व
लक्षांत नाही घेत. लक्षांत ठेवा, जीभ खोटं बोलूं शकते, पण डोळे – कधीच नाही! जेव्हां तुम्हाला एखादा अनपेक्षित प्रश्न विचारण्यांत
येतो, तर
तुम्हीं जरा सुद्धां विचलित नाही होत, एका क्षणांत स्वतःवर ताबा मिळवतां; सत्य लपवायला काय म्हणायचंय, हे ठरवून टाकतां; मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर देता; तुमच्या चेह-यावरची एकही रेषा नाही थरथरंत – पण, आह, ह्या
एका प्रश्नाने तुमच्या अंतर्मनांत जे वादळ उठलं होतं, ते उसळून डोळ्यांपर्यंत येऊन धडकतं. बस, मग, सगळंच
संपतं! डोळे तुमचं रहस्य सांगून टाकतांत आणि तुम्हीं पकडले जाता!”
आवेशात
इतकं भाषण दिल्यावर सूत्रधाराने खूप प्रेमाने कनाव्किनला विचारलं, “कुठे लपवलेत?”
“माझी
आत्या परखोव्निकोवाकडे, प्रिचिस्तेन्कात...”
“ओह कुठे...थांब...क्लाव्दिया इलीनिच्नाकडे
तर नाही?”
“हो!”
“असं, हो, हो, हो! छोटसं घर? समोर छोटाशा बगीचा? माहितीये, माहितीये! तिथे कुठे
लपवलेत?”
“कबाडखान्यांत, एनिमाच्या डब्ब्यांत...”
सूत्रधारने
हात जोडले.
“असं
कुठे बघितलंय?” त्याने अत्यंत हताश होऊन म्हटलं, “तिथे त्यांना ओल येईल, बुरशी लागेल! काय अश्या लोकांच्या हातांत डॉलर्स दिले पाहिजेत? हूँ? अगदी लहान मुलांसारखं वागणं...अरे
देवा!”
कनाव्किन
स्वतःपण समजून गेला की त्याने घाणेरड काम केलंय, ज्याची त्याला शिक्षा मिळालीये. त्याने मान खाली घातली.
“पैसे,” सूत्रधार पुढे म्हणाल्या, “सरकारी बैंकेत ठेवायला
पाहिजे, त्यांच्यासाठी
मुद्दाम बनवलेल्या कोरड्या आणि सुरक्षित खोल्यांमधे, आत्याबाईंच्या कबाडखान्यांत तर कधीच नाही. तिथे उंदीर त्यांना खाऊन टाकतील, कनाव्किन! तुम्हीं तर
मान्यवर व्यक्ती आहांत.”
कनाव्किनला
कळंत नव्हतं, की
स्वतःला कुठे लपवावं, तो कोटाच्या कॉलरशी खेळंत राहिला.
“जाऊं
द्या!” सूत्रधार किंचित नरम पडला, “जो आपल्या जुन्या सवयी सोडून देतो...” आणि मग अचानक म्हणाला, “
हो, म्हणजे एकदमंच, ज्याने तिथे दुस-यांदा कार घेऊन जायला नको...ह्या आत्याकडे तिचे स्वतःचे डॉलर्सपण
आहेत कां? हो?”
कनाव्किनला
वाटलं नव्हतं की हे प्रकरण असं उलटेल, तो थरथरला. थियेटरमधे शांतता पसरली.
“ऐ
कनाव्किन,” अतिशय प्रेमाने सूत्रधार म्हणाला, “मी तर ह्याची तारीफ केली होती. ह्याने तर उगाचंच गुंतागुंत वाढवली! हे
चांगलं नाहीये, कनाव्किन!
मी आतांच डोळ्यांबद्दल बोलंत होतो. मला विश्वास आहे, की आत्याबाईकडे आहेत, तर मग उगाचंच कां सतावतांय?”
“आहेत!”
कनाव्किन एकदम ओरडला.
“शाबास!”
सूत्रधार ओरडला.
“शाबास!”
हॉल गरजला.
जेव्हां
टाळ्या थोड्या थांबल्या, तेव्हां सूत्रधाराने कनाव्किनचं अभिनंदन केलं, त्याच्याशी हस्तांदोलन केलं, त्याला कारने घरी सोडायचा प्रस्ताव मांडला आणि एका अन्य व्यक्तीला त्याच
कारमधे आत्याबाईला कार्यक्रमासाठी महिला थियेटरमधे आणण्याची आज्ञा दिली.
“हो, मी विचारणार होतो की
आत्याबाईंने सांगितलं नाही का, की तिने स्वतःचे डॉलर्स कुठे लपवून ठेवलेय?”
सूत्रधाराने कनाव्किनला सिगरेट आणि तिला पेटवण्यासाठी
काडी पुढे करंत म्हटलं. तो कश घेता-घेता निराशेने हसला.
“विश्वास
करतो, विश्वास
करतो,” दीर्घ श्वास घेऊन कलाकार म्हणाला, “ती म्हातारी भाच्याला तर काय, सैतानाला सुद्धां नाही सांगणार! चला, तिच्या हृदयांत मानवी भावना जागवण्याचा प्रयत्न करूं या. कदाचित तिच्या
हृदयाचे सगळे तार सडले नसतील. ठीक आहे, कनाव्किन, शुभेच्छा!”
कनाव्किन
आनंदाने आपल्या घरी निघून गेला. सूत्रधाराने पुन्हां विचारलं की आणखी कोणाला
डॉलर्स द्यायचेत कां, पण हॉल शांतच राहिला.
“अरे
देवा, विचित्र
लोक आहेत!” खांदे उचकावून सूत्रधार म्हणाला आणि पडद्याने त्याला लपवून टाकलं.
लाइट्स बंद झाले, थोडा वेळ अंधार राहिला आणि अंधारांत कुठून तरी दुरून एक उदास स्वर ऐकूं आला:
सोन्याचे ढेर पडलेत तिथे, आणि ते सगळे आहेत माझे! 7
मग
कुठून तरी दोनदा टाळ्यांचा आवाज आला.
“महिला
थियेटरमधे कोणी महिला डॉलर्स देते आहे,” अचानक निकानोर इवानोविचच्या बाजूला बसलेला लाल दाढीवाला म्हणाला आणि दीर्घ
श्वास घेऊन म्हणाला, “ओह, जर
माझ्याकडे हंस नसते! भल्या माणसा, माझ्याकडे लिआनोज़वमधे फायटर हंस आहेत. माझ्या शिवाय ते मरून जातील. पक्षी
नाजुक आहे, फायटर
आहे, त्याला
उडायचंय...ओह, जर
हंस नसते! पूश्किनच्या गोष्टीने कोणी माझं समाधान नाही करूं शकंत,” त्याने पुन्हा दीर्घ श्वास
घेतला.
तेवढ्यांत
हॉलमधे प्रखर प्रकाश झाला. निकानोर इवानोविचला स्वप्न पडलं, की हॉलच्या सगळ्या
दारांतून पांढरे कपडे घातलेले, हातांमधे पळ्या घेतलेले स्वयंपाकी आत येतायंत. त्यांने सूपचं पातेलं आणि
काळ्या ब्रेडची मोट्ठी ट्रे खेचंत आत आणली. दर्शकांमधे आनंदाची लाट पसरली.
स्वयंपाकी खूप चपळतेने थियेटरमधे फिरून-फिरून ब्रेड आणि बाउल्समधे सूप टाकून
दर्शकांना देत होते.
“खा, मित्रांनो!” ते ओरडंत होते, “आणि लपवलेले डॉलर्स देऊन
टाका, उगाचंच
इथे कशाला बसून आहांत? हे फालतू अन्न कोण खाईल. घरी जा, मस्त खा-प्या!”
“तू, काका, इथे कां बसलांय?” लाल मानेचा एक जाडा
स्वयंपाकी एकुलतं एक कोबीचं पान तरंगंत असलेल्या सूपचं बाउल देतां-देता निकानोर
इवानोविचला विचारू लागला.
“नाहीं1
नाही! माझ्याकडे नाहीये!” खूप भयानक आवाजांत निकानोर इवानोविचने उत्तर दिलं, “समजायचा प्रयत्न कर, खरंच नाहीयेत!”
“नाहीयेत?” स्वयंपाकीसुद्धां गरजला, “नाहीयेत?” बायकांसारख्या बारीक
आवाजांत त्याने पुचकारंत विचारलं.
“नाहीं, नाहीं,” तो हळू-हळू बडबडंत-बडबडंत
सहायक डॉक्टर प्रास्कोव्या फ्योदोरोव्नाच्या रूपांत परिवर्तित झाला.
ती
विव्हळणा-या निकानोर इवानोविचच्या खांद्यावर हात फिरवंत होती. तेव्हां स्वयंपाकी
धूर होऊन उडून गेले आणि पडदेवालं थियेटरसुद्धां गायब झालं. निकानोर इवानोविचने
डबडबलेल्या नेत्रांनी हॉस्पिटलची आपली खोली बघितली. बघितले पांढरे कपडे घातलेले
दोन व्यक्ती. हे स्वयंपाकी नव्हते जे इथे-तिथे आपलं नाक खुपसंत होते, हे डॉक्टर होते. त्यांच्या
बरोबर होती प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना, हातांत सूपचं बाउल नाही, पण जाळीने झाकलेली इंजेक्शनच्या सिरींजची प्लेट धरून.
“ही
काय थट्टा आहे!” निकानोर इवानोविच खूप कटुतेने म्हणाला, जेव्हां त्याला इंजेक्शन दिलं जात होतं, “माझ्याकडे नाहीयेत, नाहीयेत! पूश्किनलांच त्यांना डॉलर्स देऊ द्या...नाहीयेत!”
“नाहीये, नाहीये,” त्याला पुचकारंत सहृदय
प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना म्हणाली.”नाही तर नाही, काही हरकत नाही!”
इंजेक्शन
दिल्यानंतर निकानोर इवानोविचला थोडं हल्कं वाटलं. तो लगेच गाढ झोपून गेला.
पण
त्याच्या किंचाळ्यांने 120नंबरच्या खोलीत उत्तेजना पसरली, जिथे पेशन्ट उठून बसला आणि
आपलं डोकं शोधू लागला. 118नंबरच्या खोलीत मास्टर उत्तेजित होऊन निराशेने चंद्राकडे
बघंत हात चोळू लागला. त्याला आठवली होती आपल्या जीवनातली शेवटची शरदाची रात्र, दाराच्या खालून खोलीत
प्रवेश करणारी उजेडाची किरण आणि विस्कटलेले केस.
118नंबरच्या
बाल्कनीतून ही उत्तेजना इवानकडे पोहोचली. तो उठून बसला आणि रडू लागला.
पण
डॉकटरने लवकरंच ह्या उत्तेजित, दुःखी माणसांना शांत केलं. ते पुन्हां झोपी गेले. सगळ्यांत शेवटी झोपला इवान, जेव्हां नदीच्या पाण्यावर
सकाळ होऊं लागली होती. औषध घेतल्यावर एका शांत लाटेने त्याला झाकलं. त्याचं शरीर
शिथिल झालं. त्याला डुलकी येऊं लागली. तो झोपला. शेवटचा आवाज जो त्याने ऐकला, तो जंगलांत चिमण्यांच्या किलबिलाटाचा होता. पण लवकरंच सगळं शांत झालं. तो
स्वप्न पाहू लागला, की बाल्ड-माउन्टेनच्या मागे सूर्यास्त होऊ लागलाय आणि माउन्टेनभोवती दुहेरी
सुरक्षा पंक्तींचा घेरा आहे...
**********
सोळा
मृत्युदण्ड
बाल्ड-माउन्टेनच्या मागे सूर्यास्त
होऊ लागला होता आणि ह्या माउन्टेनभोवती
दुहेरी सुरक्षा पंक्तींचा घेरा पडला होता.
ती अश्वारोही तुकडी, जिने दुपारी
न्यायाधीशाचा मार्ग अडवला होता, वेगाने शहराच्या हेब्रोन गेटकडे जात होती. तिच्यासाठी
रस्ता आधीच मोकळा करण्यांत आला होता. कप्पादोसिया पायदळ तुकडीचे सैनिक लोकांना, खेचरांना आणि
उंटांना रस्त्याच्या दोन्हीं बाजूंना ढकलंत होते आणि ही तुकडी धूळ उडवंत त्या
ठिकाणी पोहोचली,
जिथे
दोन रस्ते मिळंत होते: दक्षिणी मार्ग जो बेथलहम शहराकडे जात होता, आणि उत्तर-पश्चिमी
मार्ग,
जो
याफाकडे जात होता. अश्वारोही तुकडी उत्तर-पश्चिमी मार्गाकडे धावली. त्याच कप्पादोसियाचे
सैनिक रस्त्याच्या दोन्हीकडे विखुरले होते, आणि त्यांनी वेळेवरंच
उत्सवासाठी येर्शलाइमला जाणा-या सगळ्या काफल्यांना रस्त्यावरून दूर केलेलं होतं.
रस्त्याच्या दोन्हीकडे कप्पादोसियन सैनिकांच्या मागे भक्तांची गर्दी उभी होती; ते गवतावर गाडलेल्या
आपल्या पट्ट्या-पट्ट्यांच्या तंबूंमधून बाहेर आले होते. एक किलोमीटर गेल्यावर ह्या
तुकडीने विद्युत वेगाने जाणा-या तुकडीलासुद्धां मागे सोडलं. आणखी एक किलोमीटर
गेल्यावर ती बाल्ड-माउण्न्टेनच्या पायथ्याशी पोहोचली. इथे पोहोचल्यावर तिने
चुटकीसरशी माउन्टेनला चारीकडून वेढा घातला, फक्त याफाकडून येण्यासाठी
थोडीशी जागा सोडली.
काही वेळाने ह्या तुकडीच्या
मागे-मागे आणखी एक तुकडी तिथे आली. पहाडावर जवळ-जवळ एक फर्लांग चढून ती सुद्धां
मुकुटाच्या आकारांत माउन्टेनवर विखुरली.
शेवटी मार्क क्रिसोबोयेवच्या
नेतृत्वात ‘सेन्चुरी’ तिथे पोहोचली.
रस्त्याच्या दोन्हीं बाजूला दोन-दोनच्या पंक्तीत सैनिक चालंत होते. त्यांच्यामधे
गुप्तचर तुकडीबरोबर गाडीवर तिन्हीं कैदी होते, ज्यांच्या गळ्यांत पांढरे
तक्ते लटकले होते. प्रत्येक तक्त्यावर अरबी आणि ग्रीक भाषेंत लिहिलं होतं ‘दरोडेखोर आणि
क्रांतिकारी’.
कैद्यांच्या
गाडीमागे होत्या दुस-या गाड्या, ज्यांच्यावर ठेवले होते वध-स्तम्भ, दोरखण्ड, फावडे, बादल्या आणि
कु-हाडी. ह्या गाड्यांमधे सवार होते सहा वधिक. त्यांच्यामागे घोड्यांवर जात
होते अश्वारोही तुकडीचा प्रमुख मार्क, येर्शलाइमच्या मंदिर-सुरक्षा तुकडीचा नायक आणि
टोप घातलेला तो माणूस, ज्याच्याशी पिलात महालाच्या अंधा-या खोलीत काही क्षण बोलला होता.
सगळ्यांत शेवटी होती सैनिकांची श्रृंखला आणि त्यांच्या मागे-मागे जवळ-जवळ दोन हजार
उत्सुक लोकांची गर्दी चालंत होती. भीषण नारकीय उष्णतेला न घाबरतां हे लोक हे
मनोरंजक दृश्य बघायला जात होते.
शहरातल्या उत्सुक लोकांच्या
गर्दीत आता उत्सुक भक्तांची गर्दीपण मिसळली, ज्यांना बिना काही अडथळ्याचे
मिरवणुकीच्या अगदी मागे येऊं दिलं होतं. उद्घोषकांचे बारीक आवाज घडी-घडी तेच सांगत
होते,
जे
दुपारी पिलातने म्हटले होते. ह्या आवाजाबरोबर सगळे पुढे वाढंत होते, बाल्ड-माउन्टेनकडे.
अश्वारोही तुकडीने दुस-या
घे-यापर्यंत सगळ्यांना जाऊ दिलं, पण वरच्या तुकडीने फक्त त्यांनाच पुढे जाऊं दिलं, ज्यांचा
म्रुत्युदण्डाशी संबंध होता, आणि मग विद्युत गतिने गर्दीला माउन्टेनच्या चारीकडे
ढकलून दिलं. आता गर्दीतले लोकं वरून पायदळ सैनिकांच्या आणि खालून अश्वारोही
तुकडीच्या मधे फसले होते. मृत्युदण्डाच्या प्रक्रियेला ते पायदळ सैनिकांच्या
मधून-मधून बघूं शकंत होते.
मिरवणुकीला बाल्ड-माउन्टेनवर
चढून तीन घंट्यापेक्षा जास्त लोटले होते. सूर्य बाल्ड-माउन्टेनच्या खाली जाऊं
लागला होता,
पण
उष्णता अजूनही असहनीय होती. दोन्हीं पंक्तीतील सैनिक ह्या उष्णतेने तडफडंत होते, कंटाळून गेले होते
आणि मनांतल्या मनांत तिन्हीं दरोडेखोरांना शिव्या देत-देत त्यांना लवकरंच मरण यावं
अशी कामना करंत होते.
अश्वारोही तुकडीचा छोटा-सा
नायक घामाने लथपथ झाला होता. त्याचा पांढरा शर्ट पाठीवर काळा झाला होता. तो माउन्टेनच्या
खालच्या भागांत सारखा फिरंत होता. तो पहिल्या तुकडीच्या जवळ पाण्याने भरलेल्या चामड्याच्या
मशकेजवळ जायचा आणि तिच्यातूंन थोडं-थोडं पाणी घेऊन घोटभर प्यायचा आणि आपल्या
पगडीला ओलं करून घ्यायचा. ह्याने थोडंसं बरं वाटायचं. तो पुन्हां त्या धुळीने
भरलेल्या रस्त्यावर फिरू लागायचा, जो माउन्टेनच्या वर जात होता. त्याची लांब तलवार त्याच्या
चामड्याच्या जोड्यांना सारखी लागंत होती. नायक आपल्या सैनिकांना सहनशक्तीचं उदाहरण
द्यायचा प्रयत्न करंत होता, पण त्यांची कीव येऊन त्याने जमिनीवर इकडे तिकडे
गाडलेल्या खांबांवर आपले पांढरे कोट पसरून तम्बू बनवण्याची आज्ञा दिली. ह्या
तम्बूंच्या सावलीत सीरियन्स निर्मम सूर्यापासून स्वतःच रक्षण करंत होते. मशका
बघतां-बघतां रिकाम्या होत होत्या. अनेक तुकड्यांचे सैनिक पाळी-पाळीने मल्बेरीच्या
वाळक्या झाडांखाली असलेल्या त्या गढूळ झ-याजवळ पाणी प्यायला येत होते, जो आता ह्या सैतानी
उन्हांत आपल्या शेवटच्या घटका मोजंत होता. तिथेंच, अस्थिर सावलीखाली कंटाळलेले
साईसपण आपल्या शांत घोड्यांना धरून उभे
होते.
सैनिकांचा थकवा आणि
दरोडेखोरांना ते देत असलेल्या शिव्या समजंत होत्या. न्यायाधीशाची भीति, की मृत्युदण्डाच्या
वेळेस तो घृणा करंत असलेल्या येर्शलाइम शहरांत दंगा होऊं शकतो, निराधार ठरली होती.
जेव्हां मृत्युदण्डानंतरचा चौथा घण्टा चालू होता, तेव्हां पायदळ सैनिक आणि
अश्वारोही सैनिकांच्या दोन्हीं सुरक्षा पंक्तींच्या मधे, आशंका असूनसुद्धां एकही
माणूस शिल्लक नव्हता. सूर्याच्या उष्णतेने गर्दीला होरपळल्यानंतर तिला परंत
येर्शलाइमला पाठवून दोलं होतं. तिथे फक्त न जाणे कोणाचे दोन कुत्रे उरले होते, जे माहीत नाही कसे
माउन्टेनवर पोहोचले होते. ते पण गर्मीने बेचैन होते आणि जीभ बाहेर काढून धापा
टाकंत होते,
त्या
हिरव्या पालींकडे लक्ष न देतां, ज्यांच्यावर ह्या भीषण गर्मीचा काहींच असर नव्हता, आणि ज्या दगडांच्या
आणि काटेरी झुडुपांच्या मधे आरामांत फिरंत होत्या.
कैद्यांना सोडवण्याचा कोणीही
प्रयत्न नाही केला, सैनिकांनी गच्च भरलेल्या येर्शलाइममधेही नाही आणि घेराबंद
बाल्ड-माउन्टेनवरसुद्धां नाही; आणि गर्दी शहराकडे परतू लागली, कारण की मृत्युदण्ड
बघणं येवढं मनोरंजक नव्हतं, आणि शहरांत संध्याकाळी साज-या होणा-या ईस्टरच्या
सणाची तयारी धामधुमीने चालू होती.
रोमन सैनिकांची वरची पंक्ति
अश्वारोही सैनिकांपेक्षा जास्त वैतागली होती. क्रिसोबोयने फक्त येवढंच केलं, की सैनिकांना
शिरस्त्राणाऐवजी पाण्यांत भिजवलेली पांढरी पगडी बांधायची परवानगी दिली होती – पण
त्याने सैनिकांना भाले धरून तिथेच उभं राहायला सांगितलं होतं. तो स्वतःसुद्धा
पांढरी, पाण्यांत न
भिजवलेली पगडी घालून फाशी देणा-यांपासून थोडांच दूर फिरंत होता. त्याने आपल्या
शर्टावरून वाघाचे तोंड असलेले चांदीचे मेडल्स पण नव्हते काढले, पायांतील कवच, तलवार, खंजीरसुद्धां नव्हते
काढले. सूर्याचे किरण सरळ क्रिसोबोयवर पडंत होते. त्याच्यावर तर काही असर होत
नव्हता,
पण
मेडल्सच्या वाघांकडे बघणं अशक्य होतं. त्यांच्यातून निघंत असलेली उकळत्या चांदीची
चमक डोळ्यांना जणु गिळून टाकंत होती. क्रिसोबोयच्या विद्रूप चेह-यावर थकवा किंवा
अप्रसन्नता – काहीही दिसंत नव्हतं, आणि असं वाटंत होतं जणु हा भीमकाय सेन्चुरियन पूर्ण
दिवस,
पूर्ण
रात्र,
आणखी
एक दिवस,
म्हणजे
जेवढे पाहिजे तेवढे दिवस असांच चालंत राहू शकतो. असांच चालू-फिरू शकतो तांबा जडवलेल्या
भारी-भरकम पट्ट्यावर हात ठेऊन; असांच गंभीरतेने कधी वध स्तंभावर लटकलेल्या
कैद्यांकडे,
किंवा
श्रृंखलाबद्ध सैनिकांकडे बघंत, तसांच उदासीनतेने जोड्याच्या टोकाने पायांखाली आलेले, काळानुसार पांढरे
पडलेले हाडांचे तुकडे आणि लहान-लहान दगड दूर सरकवंत.
टोप घातलेला तो माणूस
वध-स्तंभांपासून काही दूर एका तिपाईवर बसला होता. तो आनंदी वाटंत होता, जरी तो काही हालचाल
करंत नव्हता,
तरी
कधी-कधी कंटाळल्यामुळे रेती खुरचटंत होता.
आम्ही सांगितलंय की पायदळ
सैनिकांच्या वेढ्याच्या बाहेर एकसुद्धा माणूस नव्हता, पण हे पूर्णपणे सत्य नाहीये.
एक माणूस तर होता तिथे, पण तो सगळ्यांना दिसंत नव्हता. तो त्या बाजूला नव्हता, जिथून माउन्टेनवर
जाण्यासाठी मोकळा रस्ता होता, आणि जिथून मृत्युदण्डाचं दृश्य स्पष्ट दिसूं शकंत
होतं. तो होता उत्तरी कोप-यावर, तिथे, जिथून माउन्टेनवर चढणं कठीण होतं; जमीन उबड-खाबड होती; जिथे खिंडारं आणि
फटी होत्या;
जिथे
एका अरुंद फटींत, कसातरी जगण्यांचा प्रयत्न करंत आकाशाने श्राप दिलेल्या कोरड्या
पृथ्वीवर अंजीराचं एक मरगळलेलं झाड उभं होतं.
ह्याच सावली नसलेल्या
झाडाखाली हा एकटा दर्शक जमून बसला होता. मृत्युदण्डाशी त्याला काही देणं-घेणं नव्हतं.
पण तो म्रुत्युदण्डाच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे चार तासांपासून तिथेच होता. हे खरं आहे
की मृत्युदण्ड बघण्यासाठी त्याने सर्वांत खराब जागा निवडली होती. इथूनसुद्धां
वध-स्तम्भ दिसंत होते; सैनिकांच्या वेढ्याच्या पलिकडे सेन्चुरियनच्या छातीवरचे दोन चमकंत
असलेले बिंदु दिसंत होते. येवढंच पुरे होतं ह्या माणसासाठी ज्याला कुणाचाही त्रास
नको होता आणि जो सर्वांपासून लपण्याचा प्रयत्न करंत होता.
पण चार तासांपूर्वी, मृत्युदण्डाच्या सुरुवातीला, हा माणूस असं काही
करंत होता,
की
त्याच्याकडे कोणाचंही लक्ष जाऊं शकंत होतं, कदाचित म्हणूनंच आता त्याने
आपला पवित्रा बदलला होता आणि आता तो एकटा होता.
तेव्हां, जशीच मिरवणूक
माउन्टेनच्या वरती पोहोचली, तो, गोंधळलेला, तिथे आला, जसं उशीरा येणारा माणूस
करतो. तो मुश्किलीने श्वास घेत होता आणि चालंत नसून धावंत होता. त्याला माउन्टेनच्या
वरती जायचं होतं, तो लोकांना धक्के मारंत होता, पण जेव्हां त्याने बघितलं की
सैनिकांचा वेढा इतरांप्रमाणे त्याच्याही समोर पडलेला आहे, तेव्हां त्याने चेतावनी
देणा-या घोषणांकडे लक्ष न देतां, वेढ्यांत घुसून वर, वध-स्तंभांच्या अगदी जवळ
जायचा बालिश प्रयत्न केला, जिथे कैद्यांना गाडीतूंन उतरवलं होतं. ह्याच्यासाठी
त्याच्या छातीवर भाल्याच्या दुस-या टोकाचा मार बसला आणि तो उडी मारून सैनिकांपासून
दूर झाला,
तो
ओरडला,
पण
वेदनेमुळे नव्हे तर निराशेमुळे. भाला मारणा-या सैनिकाकडे त्याने धुंद आणि उदासीन
नजरेने पाहिलं,
जणु
त्याला शारीरिक पीडेची जाणीवंच नव्हती.
खोकंत, धापा टाकंत, छाती पकडून तो
माउन्टेनच्या मागच्या बाजूला धावला, ह्या आशेने, की उत्तरी भागांत त्याला आत जायला एखादी फट
सापडेल. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेढा बंद झाला होता. आणि वेदनेने
विद्रूप झालेल्या चेह-याच्या त्या माणसाला गाड्यांच्या जवळ जायचा आपला विचार
बदलावा लागला,
ज्यांच्यातून
आता वध-स्तम्भ उतरवंत होते. ह्या प्रयत्नांनी त्याला काही प्राप्त होण्यासारखं नव्हतं, फक्त तो पकडला जाऊ
शकंत होता. आजच्या दिवशी जेलखान्यांत बंद राहण्याचा त्याचा उद्देश्य नव्हता.
म्हणून तो मागच्या भागाकडे
चालला गेला,
जिथे
बरीच शांतता होती. तिथे त्याला कोणी त्रास देऊं शकंत नव्हतं.
आता हा काळ्या दाढीवाला, ऊन आणि अनिद्रेने
लाल आणि जळजळणा-या डोळ्यांनी बघंत असलेला माणूस एका खडकावर बसून दुःखी होत होता.
तो उसासे भरंत होता आणि सतत भटकण्यामुळे जीर्ण आणि निळ्यापासून मातकट झालेला आपला कोट
सरकवून भाल्याने जखमी झालेली, घाणेरडा घाम वाहत असलेली छाती उघडी करायचा; कधी असहनीय वेदनेने
आकाशाकडे डोळे करून त्या तीन गिद्धांचा मागोवा घ्यायचा, जे लवकरंच प्राप्त होणा-या
जेवणाच्या आशेने चक्कर लावंत होते; किंवा पिवळ्या झालेल्या जमिनीकडे बघायचा जिथे
कुत्र्याचं अर्ध सडलेलं शरीर पडलं होतं, आणि ज्याच्या चारीकडे पाली धावंत होत्या.
त्या माणसाची वेदना इतकी
जास्त होती,
की
कधी-कधी तो स्वतःशीच बडबडूं लागायचा.
“ओह, कित्ती मूर्ख आहे मी!” तो
खडकावर मागे-पुढे झुलंत आणि नखांनी आपली काळी छाती खाजवंत बडबडला, “मूर्ख, मूर्ख बाई, कायर! माणूस नाहीं, मुरदाड आहे!”
त्याने चुप होऊन मान खाली
केली आणि लाकड्याच्या सुरईतून पाणी प्यायला, पाणे प्यायलावर त्याला थोडी
हुशारी वाटली. आता तो कोटाच्याखाली लपलेल्या चाकूला हात लावून पहायचा, किंवा खडकावर आपल्या
समोर लेखणी आणि दौतीच्या बाजूला पडलेल्या चर्मपत्राला हात लावायचा.
ह्या ताडपत्रावर लिहिलेलं
होतं:
“काळ धावतोय, आणि मी, लेवी मैथ्यू बाल्ड
माउन्टेनवर आहे,
मृत्यु
अजून आली नाहीये!”
पुढे लिहिलं होतं:
“सूर्य अस्त होतोय, अजून अंत नाही.”
आता लेवी मैथ्यूने हताश होऊन
लिहिलं:
“अरे देवा! त्याला इतकं का छळतो
आहेस?
त्याला
लवकर मुक्ति दे.”
येवढं लिहून तो पुन्हा
विव्हळला आणि आपली छाती खाजवूं लागला.
लेवीच्या निराशेचे कारण ते
दुर्भाग्य होतं,
ज्याने
त्याला आणि येशुआला जखडून ठेवलं होतं. तो आपल्या चुकीवरपण पस्तावंत होता. परवा
दुपारी येशुआ आणि लेवी येर्शलाइमच्या जवळ बेथनींत एका माळ्याकडे थांबले होते, जो येशुआच्या
उपदेशांनी बरांच प्रभावित होता. सम्पूर्ण सकाळ दोन्हीं पाहुणे बगीच्याच्या कामांत
यजमानाची मदत करंत होते आणि ते संध्याकाळी येर्शलाइमला जाणार होते. पण काय माहीत
कां,
येशुआ
लवकरंच एकटाच निघून गेला, असं सांगून की त्याला शहरामधे जरूरी काम आहे. बस, हीच पहिली चूक होती
लेवी मैथ्यूची. त्याने येशुआला एकट्याला कां जाऊं दिलं!
मैथ्यू संध्याकाळीसुद्धां
येर्शलाइमला नाही जाऊ शकला. त्याच्या पूर्ण अंगाला भयानक खाज सुटली. त्याला खूप
ताप आला. शरीर जणु आगींत होरपळंत होतं, दात किटकिटंत होते, प्रत्येक क्षणाला तो पाणी
मागंत होता,
त्याला
हलतांसुद्धा येत नव्हतं. तो माळ्याच्या पडवींत घातलेल्या बिछान्यावर पडला होता.
शुक्रवारी सकाळीच त्याचा डोळा उघडूं शकला, जेव्हां त्याचा आजार त्याला
तितक्याचं आश्चर्यजनक रीत्या सोडून गेला, जसां तो आला होता. जरी त्याला अशक्तपणा वाटंत
होता,
त्याचे
पाय अडखळंत होते, तरीही भावी दुर्भाग्याच्या आशंकेने ग्रस्त तो माळ्याच्या घरून
निघून येर्शलाइमला गेला. तिथे त्याने बघितलं, की त्याची भीति खरी होती.
अनर्थ घडलेला होता. लेवी जाऊन गर्दीत उभा राहिला. त्याने न्यायाधीशाला
मृत्युदण्डाची घोषणा करताना ऐकलं.
जेव्हां अभियुक्तांना
बाल्ड-माउन्टेनवर नेत होते, तेव्हां लेवी मैथ्यू उत्सुक लोकांच्या गर्दीबरोबर
धावत होता. तो येशुआला कळवायचा प्रयत्न करंत होता, की तो, म्हणजे लेवी, इथेच आहे, त्याच्याजवळ, त्याने अंतिम
यात्रेंतसुद्धां त्याची सोबंत सोडली नाहीये. तो प्रार्थना करतोय की येशुआची पीडा
लवकरांत लवकर संपली पाहिजे, त्याला लवकर मरण आलं पाहिजे. पण येशुआची नजर दूर, जिथे त्याला नेत
होते,
तिकडे
लागली होती,
त्याने
लेवीला बघितलंच नाही.
जेव्हां ही मिरवणूक अर्धा
मील पुढे गेली,
तेव्हांच
मैथ्यूच्या डोक्यांत, ज्याला सैनिक-श्रृंखलेच्या अगदी जवळचे लोक धक्के मारंत होते, एक साधा-सरळ, पण अफलातूनी विचार
चमकला. तो स्वतःवरंच चरफडला, की हा विचार त्याच्या डोक्यांत आधी कां नाही आला.
सैनिकांची श्रृंखला दाट नव्हती. दोन-दोन सैनिकांच्यामधे थोडीशी जागा होती. जर
हुशारीने काम केलं तर तो त्यांच्यामधून निसटून कैद्यांच्या गाडीपर्यंत येशुआकडे
जाऊं शकतो. तेव्हां येशुआच्या पीडेचा अंत होऊन जाईल.
बस, एक क्षणंच पुरेसा आहे येशुआच्या
पाठींत सुरा भोसकून हे सांगायला की, ‘येशुआ! मी तुला मुक्ति देऊन स्वतःसुद्धा तुझ्याजवळ
येतोय! मी,
मैथ्यू, तुझा एकुलता एक आणि
विश्वसनीय शिष्य!’ आणि जर आणखी एक क्षण मिळाला, तर स्वतःलासुद्धां त्याच
चाकूने मारता येईल; वध-स्तंभाच्या यातनांपासून सुटण्यासाठी लेवीला, जो भूतपूर्व
कर-संग्राहक होता, ह्या शेवटच्या गोष्टीचं इतकं महत्व नव्हतं. कसं मरावं, ह्याबाबत तो उदासीन
होता. त्याला फक्त हीच काळजी होती की येशुआला, ज्याने कधीच कोणाचंही वाईट
केलं नव्हतं,
लगेच
यातनांपासून मुक्ति मिळावी.
योजनातर खूप चांगली होती पण
त्यांत एक खामी होती – ती अशी, की लेवीकडे चाकू नव्हता. त्याच्याकडे एकसुद्धां पैसा
नव्हता.
स्वतःवरंच चिडंत लेवी
गर्दीतून निघून शहराकडे धावला. त्याच्या जळजळत्या डोक्यांत फक्त एकंच गरम विचार
होता की शहरातून कसांतरी एक चाकू मिळवून लगेच मिरवणुकींत परत यायचं.
तो शहराच्या महाद्वारापर्यंत
पोहोचला,
आतमधे
प्रवेश करणा-या अनेक कारवांच्यामधून आपल्या डावीकडे एक ब्रेडचं दुकान बघितलं. धापा
टाकणा-या लेवीने स्वतःला सांभाळंत दुकानांत घुसून विक्रेत्याचं अभिवादन केलं.
त्याला अलमारीच्या वरती ठेवलेली ब्रेड देण्याची विनंती केली, जी त्याला आवडली
होती. जशीचं विक्रेता मुलगी ब्रेड काढण्यासाठी मागे गेली, त्याने पट्कन तीक्ष्ण धारीचा
ब्रेड कापायचा चाकू उचलला आणि दुकानांतून पळाला. काही मिनिटातंच तो याफाच्या
रस्त्यावर होता. पण मिरवणूक आता दिसंत नव्हती. तो धावंत होता. मधून-मधून अडखळून
जमिनीवर पडंत होता, काही वेळ निश्चल पडून, दीर्घ श्वास घ्यायचा. येर्शलाइमकडे जाणारे लोक
त्याला बघून आश्चर्य करंत होते. तो पडला राहून ऐकंत होता, की त्याचं हृदय किती जोराने
धडधड करतंय,
फक्त
छातींतंच नाही,
पण
डोक्यांत आणि कानांत सुद्धा. थोडा वेळ श्वास घेऊन तो पुन्हां पळूं लागायचा, पण आता – हळू हळू.
जेव्हां त्याने धुळीचे लोट उडवंत जाणारी मिरवणूक बघितली, तेव्हां तो माउन्टेनच्या जवळ
पोहोचलेला होता.
“अरे देवा...” लेवी
विव्हळला. त्याला कळंत होतं, की उशीर झालाय. आणि त्याला उशीर झालांच होता.
मृत्युदण्डाला चार तास झाले
तेव्हां लेवीची वेदना आपल्या चरम सीमेवर पोहोचली. तो निरर्थक बडबड करूं लागला.
खडकावरून उठून त्याने उगीचंच आता निरर्थक झालेल्या चाकूने जमिनीवर आघात केला, अंजीरच्या झाडाला
लात मारली,
पाणी फेकून
दिलं,
डोक्यावरचा
टोप काढून फेकला आणि आपले विरळ केस पकडून तो स्वतःलाच प्रताडित करूं लागला.
तो स्वतःला शिव्या-शाप देत
होता,
गुरगुर
करंत होता,
थुंकंत
होता आणि आपल्या आई-वडिलांनापण शिव्या देत होता, की त्यांने कसल्या मूर्खाला
जन्म दिलांय.
जेव्हां त्याने पाहिलं की
शिव्या-शापाचा काहीच असर होत नाहीये आणि त्यांने ह्या खदखदंत असलेल्या भट्टीत
काहीही बदलणार नाहीये, तेव्हां त्याने आपल्या वाळक्या हातांच्या मुठी वळून सूर्याकडे
ताणल्या,
जो
हळू-हळू खाली गडगडंत होता, लाम्ब-लाम्ब सावल्या सोडंत भूमध्य सागरांत पडण्यासाठी, आणि देवाकडे लवकरंच
काही चमत्कार करण्याची मागणी केली की. त्याने मागणी केली की देवाने लगेच येशुआकडे
मृत्युला पाठवावे.
डोळे उघडून त्याने बघितलं की
माउन्टेनवर सगळं अगदी तसंच आहे, फक्त सेन्चुरियन मार्कच्या छातीवरचे धगधगणारे डाग आता
विजले होते. सूर्य वध-स्तंभांवर लटकवलेल्या कैद्यांच्या पाठीत, ज्यांचे तोंड
येर्शलाइमकडे होते, आपले किरण टोचंत होता. तेव्हां लेवी ओरडला:
“मी तुला श्राप देतो, देवा!”
भसाड्या आवाजांत तो ओरडला की
ईश्वर अन्यायी आहे आणि आता तो त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार.
“तू बहिरा आहेस!” लेवी ओरडला, “जर बहिरा नसतास तर
माझी प्रार्थना ऐकून त्याला लगेच मारून टाकलं असतं.”
डोळे मिटून लेवी आकाशांतून
वीज पडण्याची वाट पाहू लागला, जी त्याच्यावरसुद्धां पडली असती, पण असं काहीच झाल
नाही,
आणि, पापण्या न उघडतां तो
आकाशाकडे तोंड करून विषारी आणि अपमानजनक शब्द बोलंत राहिला. आपल्या सम्पूर्ण
निराशेबद्दल सांगितल्यानंतर तो इतर धर्मांबद्दल आणि देवी-देवतांबद्दल सांगू लागला.
हो,
दुस-या
देवाने कधीच असं होऊं दिलं नसतं, की येशुआसारखा माणूस वध-स्तंभावर लटकताना सूर्याच्या
किरणांनी होरपळून जाईल.
“मीच चुकलो!” भसाड्या
आवाजांत लेवी ओरडला, “तू दुष्टांचा देव आहेस! मंदिरांमधे होत असलेल्या होम-हवनाच्या
धुराने तुझे डोळे बंद केले आहेत कां, की तुझ्या कानांना फक्त भक्तांची प्रशंसाच
ऐकूं येते?
तू
सर्वशक्तिमान नाहीस! तू काळा देव आहे, दरोडेखोरांचा देव, त्यांचा रक्षक, त्यांची आत्मा; मी तुला श्राप
देतो!”
तेवढ्यांत भूतपूर्व
कर-संग्राहकाच्या चेह-यावर काही तरी सरसर झाली, पायांच्या खालीपण काहीतरी
सरकलं. पुन्हां एकदा सरसर झाली. तेव्हां त्याने डोळे उघडून पाहिलं, की सगळंच, त्याच्या शापामुळे
किंवा काही अन्य कारणाने, बदलून गेलंय. सूर्य समुद्रांत पोहोचायच्या आधीच गायब
झालेला होता,
ज्याच्यांत
तो दर संध्याकाळी बुडायचा, त्याला गिळून पश्चिमेकडून आकाशांत एक भयानक ढग
निडरतेने पुढे वाढंत होतं. त्याची किनार पांढ-या फेसासारखी होती, काळ्या आवरणांतून
घडी-घडी पिवळी चमक दिसंत होती. ढग गरजलं, त्याच्यांतून थोड्या-थोड्या वेळाने अग्निशलाका
निघूं लागल्या. याफाच्या रस्त्यावर, मरगळलेल्या हिन्नोम घाटीत भक्तांच्या तंबूंवर, जे अचानक ह्या
वादळाच्या तडाख्यांत सापडले होते, धुळीचे लोट उठंत होते. लेवी गप्प झाला. तो समजण्याचा
प्रयत्न करंत होता, की येर्शलाइमला झाकणारं हे वादळ काय दुर्दैवी येशुआचं नशीब बदलेल
कां. तो त्या अग्निशलाकांकडे बघून प्रार्थना करूं लागला, की येशुआच्या वधंस्तंभावर
वीज पडू दे. आकाशाच्या स्वच्छ भागाकडे बघंत, जिथपर्यंत अजून वादळ नव्हतं
पोहोचलं,
आणि
जिथे वादळापासून स्वतःला वाचविण्यासाठी गिधाडे एका पंखावर गिरक्या घेत होती, लेवी पश्चात्ताप
करूं लागला,
की
त्याने श्राप देण्यांत इतकी घाई कां केली, आता देव त्याची प्रार्थना
बिल्कुल नाही ऐकणार.
लेवीने माउन्टेनच्या
पायथ्यांवर नजर ताकली : जिथे आधी अश्वारोही उभे होते, तिथे आता बरंच काही बदललं
होतं. उंचीवरून लेवीला स्पष्ट दिसंत होतं, की सैनिकांनी कसे पट्कन
जमिनीत गाडलेले भाले उखडले, आपल्या अंगावर कोट पांघरले, साईस कसे काळ्या घोड्यांची
लगाम खेचून रस्त्यावर सरपंट धावताहेत. स्पष्ट होतं की सेना परतंत होती. लेवीने
उडणा-या धुळीपासून वाचवण्यासाठी हातांनी चेहरा झाकून घेतला. तो विचार करूं लागला, की अश्वारोही
तुकडीच्या परतण्याचा अर्थ काय असूं शकतो? त्याने नजर वर केली तर बघितलं की लाल रंगाचा
फौजी कोट घातलेली एक आकृति वधस्थळाकडे जाते आहे. आणि तेव्हां चांगल्या परिणामाच्या
अपेक्षेने भूतपूर्व कर-संग्राहकाचं मन थोडं शांत झालं.
मृत्युदण्डानंतरच्या पाचव्या
तासांत माउन्टेनवर चढणारा व्यक्ति होता सेना-कमाण्डर, जो येर्शलाइमहून आपल्या
सहायकाबरोबर येत होता. क्रिसोबोयने खूण करतांच सैनिकांची श्रृंखला मोकळी झाली आणि
सेंचुरियनने ट्रिब्यूनला सलामी दिली. कमाण्डरने क्रिसोबोयला एकीकडे बोलावून
पुटपुटंत काहीतरी सांगितलं. सेंचुरियनने त्याला पुन्हां सलामी दिली. तो वधिकांकडे गेला
जे वध-स्तंभांजवळंच दगडांवर बसले होते. ट्रिब्यून पुढे येऊन तिपाईवर बसलेल्या
माणसाकडे आला. त्या माणसाने उठून त्याचे हार्दिक स्वागत केले. ट्रिब्यूनने त्याला
हळूंच काहीतरी सांगितलं आणि ते वध-स्तंभांकडे आले. आता त्यांच्याबरोबर मंदिराच्या
सुरक्षा कमिटीचा प्रमुख पण होता.
क्रिसोबोयने वध-स्तंभांजवळ
पडलेल्या पोते-यांकडे तिरप्या नजरेने पाहिलं, जे काही वेळा पूर्वी
अपराध्यांची पोषाक होते आणि ज्यांना घेण्यासाठी वधिकांनी नकार दिला होता.
क्रिसोबोयने दोन वधिकांना बोलावून आज्ञा दिली, “माझ्या मागे या!”
जवळच्या वध-स्तंभावरून
भसाड्या आवाजांत निरर्थक गाण ऐकूं येत होतं. त्याच्यावर लटकावलेला गेस्तास
माश्यांमुळे आणि सूर्यामुळे मृत्युदण्डानंतर तीन तासांतच वेडा झाला होता. आता तो
द्राक्षांबद्दल गाण म्हणंत होता. पण पगडीने झाकलेल्या आपल्या डोक्याला तो
मधून-मधून हलवंत होता, तेव्हां आळसावलेल्या माश्या त्याच्या चेह-यावरून उडून जायच्या आणि
पुन्हां येऊन तिथेंच बसायच्या.
दुस-या वध-स्तंभावरचा दिसमास
अन्य दोघांपेक्षा जास्त तडफडंत होता, कारण की त्याची शुद्ध हरपली नव्हती, कानांनी खांद्यांवर
मारता यावं ह्यासाठी तो घडी-घडी आपलं डोकं हलवंत होता, कधी उजवीकडे, तर कधी डावीकडे.
ह्या दोघांपेक्षा जास्त सुखी
होता येशुआ. पहिल्याच तासांत त्याला गुंगी येऊ लागली, तो पगडी सुटलेलं आपलं डोकं
लटकावून शुद्ध हरवून बसला. माश्यांनी पूर्णपणे त्याचा चेहरा झाकून टाकला. आता
त्याचा चेहरा काळ्या वळवळणा-या पदार्थाने झाकलेला वाटंत होता. पोटावर, काखेंत, छातीवर
जाड्या-जाड्या घोडमाश्या बसून त्याच्या उघडं, पिवळं अंग चोखंत होत्या.
टोप घातलेल्या व्यक्तीच्या
हुकुमानुसार एका वधिकाने भाला उचलला आणि दुस-याने वध-स्तंभाजवळ बादली आणि स्पंजचा
तुकडा आणला. पहिल्या वधिकाने भाला उंच करून येशुआच्या दोन्हीं हातांत टोचला, जे क्रॉसच्या
दोन्हीं टोकांवर दोराने बांधलेले होते. कृश शरीर, ज्याच्या बरगड्या दिसंत
होत्या,
किंचित
शहारलं. वधिकाने भाल्याचं टोक पोटावर फिरवल. तेव्हां येशुआने डोकं उचललं, माश्या भिणभिण करंत
उडून गेल्या. लटकलेल्या येशुआचा माश्या चावल्याने सुजलेला चेहरा दिसला; तरंगंत असलेल्या
डोळ्यांचा हा चेहरा ओळखू येत नव्हता.
पापण्या उघडून हा-नोस्त्रीने
खाली बघितलं. त्याचे स्वच्छ डोळे मलूल झाले होते.
“हा-नोस्त्री”, वधिक म्हणाला.
हा-नोस्त्रीने सुजलेल्या
ओठांची किंचित हालचाल करंत दरोडेखोरांसारख्या भसाड्या आवाजांत विचारलं,
“तुला काय पाहिजे? माझ्याकडे कशाला
आलायंस?”
“पी!” वधिक म्हणाला आणि
पाण्यांत बुडवलेला स्पंजचा तुकडा भाल्याच्या टोकावर सवार होऊन येशुआच्या ओठांजवळ
पोहोचला. त्याच्या डोळ्यांत थोडीशी चमक आली, तो अत्यंत अधीरतेने ते पाणी
चोखू लागला. जवळच्या वध-स्तंभावरून दिसमासचा आवाज ऐकूं आला:
“हा अन्याय आहे! मी पण
तसलांच दरोडेखोर आहे, जसा हा आहे.”
दिसमासने सरळ व्हायचा
प्रयत्न केला,
पण तो
हलूं नाही शकला. दोराच्या वलयांने त्याच्या हातांना तीन ठिकाणी वध-स्तंभाशी जखडून
ठेवलं होतं. त्याने पोट ताणलं, नखांनी वध-स्तंभाला पकडलं आणि रागाने येशुआच्या
वध-स्तंभाकडे आपलं डोकं फिरवलं.
धुळीच्या वादळानी त्या
जागेला झाकून टाकलं, गाढ अंधार पसरला. जेव्हां धूळ उडून गेली तेव्हां सेंचुरियन ओरडला:
“दुस-या स्तंभावर, चुप रहा!”
दिसमास चुप झाला. येशुआने पाण्यांत बुडवलेल्या
स्पंजपासून दूर होऊन मोठ्या प्रयत्नाने गोड आणि विश्वासपूर्ण आवाजांत बोलण्याचा
प्रयत्न केला,
पण
आवाज घरघरंतच निघाला. तो वधिकाला म्हणाला,
“त्यालासुद्धां पाणी
पाज.”
अंधार वाढंतंच होता. ढगांनी
अर्ध आकाश झाकून टाकलं होतं. येर्शलाइमकडे वाढंत येणारे पांढरे, उकळते ढग काळ्या
ओलसर अग्निशलाकांनी नटलेल्या घनघोर काळ्या ढगांच नेतृत्व करंत होते.
माउन्टेनच्या अगदी वर वीज कडाडली.
वधिकाने भाल्याच्या टोकावरून स्पंज काढून घेतलं.
“महामहिमच्या महानतेचे गुण
गा!” त्याने घोषणा केली आणि हळूच भाला येशुआच्या छातीत खुपसला. तो थरथरला आणि
पुटपुटला,
“महामहिम...”
त्याच्या पोटावर रक्ताची धार
वाहू लागली. खालचा जबडा थरथरला आणि त्याचं डोकं कलंडलं.
वीज दुस-यांदा कडकडली, वधिकाने दिसमासला
पाणी पाजलं आणि तेच शब्द म्हटले:
“महामहिमचे गुण गा!” आणि
त्यालापण मारून टाकलं.
मतिहीन झालेला गेस्तास
वधिकाला आपल्या जवळ बघतांच घाबरून ओरडला, पण जसांच त्याच्या ओठांना ओला स्पर्श जाणवला, त्याने विव्हळून
पाणी चोखायला सुरुवात केली. काही क्षणांनी त्याच शरीर पण लटकू लागल, जितकं दोरखण्ड
असल्या मुळे लटकूं शकंत होतं.
टोपवाला माणूस वधिक आणि
सेन्चुरियनच्या मागे-मागे चालला होता आणि त्याच्या मागे होता मंदिराच्या सुरक्षा
दलाचा नायक. पहिल्या स्तम्भाजवळ थांबून टोपवाल्या माणसाने लक्षपूर्वक येशुआच्या
लहुलुहान शरीराकडे बघून त्याच्या टाचांना आपल्या पांढ-या हातांनी स्पर्श केला आणि
आपल्या बरोबरच्या माणसांना म्हणाला:
“मेला.”
हीच क्रिया दुस-या दोन्हीं
वधस्तंभाजवळही झाली.
ह्याच्यानंतर ट्रिब्यूनने सेन्चुरियनला
खूण केली आणि ते मंदिराच्या सुरक्षा-दलाचा नायक आणि टोपवाल्या माणसाबरोबर
माउन्टेनवरून खाली उतरूं लागले. अर्धवट अंधार झाला, विजा जणु आकाशाला चिरू
लागल्या.
त्यांतून
अचानक आगीचा लोळ उठला आणि सेन्चुरियनची किंकाळी, “घेरा काढा!” त्या गर्जनेत
विरून गेली. आनंदी सैनिक आपले टोप घालंत माउन्टेनवरून खाली धावले. अंधाराने
येर्शलाइमला पूर्णपणे झाकून टाकलं.
मुसळधार पावसाने सेंचुरियनला
अर्ध्या रस्त्यांत झोडपलं. पाउस इतका प्रचण्ड होता, की खाली पळणा-या सैनिकांना
पकडण्यासाठी पाण्याच्या खळखळत्या धारा वाहू लागल्या. सैनिक ओल्या मातीवर घसरूं
लागले,
पडू
लागले. ते मुख्य मार्गावर पोहोचण्याचा प्रयत्न करंत होते, जिथे खळखळत्या पाण्यांत
तार-तार भिजलेली अश्वारोही तुकडी येर्शलाइमला चालली होती. काही मिनिटांनी वादळ, पाणी आणि अग्नीच्या तांडवात
माउन्टेनवर फक्त एकंच माणूस उरला होता. तो उगीचंच चोरलेला चाकू सांभाळंत, निसरड्या जागांपासून
स्वतःला वाचवंत,
शक्य
तो आधार शोधंत, कधी-कधी गुडघ्यांवर रांगत
वध-स्तम्भांकडे जाऊं लागला. कधी तो अंधारांत पूर्णपणे लुप्त व्हायचा, तर कधी विजेचा
प्रकाश त्याला आलोकित करून जायचा. वध-स्तंभांच्या जवळ पोहोचल्यावर त्याने आपला
लथपथ झालेला कोट काढून फेकला, फक्त एका शर्टांत तो येशुआच्या पायांना बिलगला. त्याने सगळ्या दो-या
कापल्या,
खालच्या
क्रॉसवर चढला,
येशुआच्या
शरीराचं आलिंगन करंत त्याचे दोन्ही हात मोकळे केले. येशुआचं ओलं, नग्न शरीर लेवीला
बरोबर घेऊन जमिनीवर पडलं. लेवी त्याला आपल्या खांद्यांवर उचलणारंच होता, तेवढ्यांत एका
विचाराने त्याला थांबवलं. त्याने तिथेच, पाण्यांत बुडालेल्या जमिनीवर त्या शरीराला
सोडलं आणि अडखळंत, घसरंत बाकीच्या दोन वध-स्तंभांकडे गेला. त्याने त्यांचे दोरपण
कापले आणि आणखी दोन मृत शरीर जमीनीवर कोसळले.
आणखी काही क्षणानंतर
माउन्टेनच्या शिखरावर उरले होते फक्त तेच दोन मृत शरीर आणि तीन रिकामे वध-स्तम्भ. पाणी
ह्या शरीरांवर जोरांत प्रहार करंत त्यांना उलटं-पालटं करंत होतं.
ह्या वेळेस माउन्टेनवर ना तर
लेवी होता,
ना
येशुआचं शरीर.
********
सतरा
एक भानगडींचा दिवस
शुक्रवारी
सकाळी, म्हणजे त्या दुर्दैवी ‘शो’च्या दुस-या दिवशी, वेराइटी थियेटरचे सगळे उपस्थित
कर्मचारी – अकाउन्टेन्ट वसीलि स्तेपानोविच लस्तोच्किन, दोन कैशियर्स, तीन टाइपिस्ट मुली, दोघी तिकिटं देणा-या, चपरासी, पडदा उघडणारे आणि झाडू
मारणारे – म्हणजे सगळेंच, जे उपस्थित होते आपल्या सीटच्या ऐवजी सादोवाया रस्त्याकडे उघडण्या-या खिडक्यांच्या
चौकटींवर बसून बघंत होते, की वेराइटीच्या भिंतीपलीकडे काय चाललंय. वेराइटीच्या भिंतीच्याखाली हज्जारो
लोकांची दोन ओळींची रांग होती, जिचा दुसरा कोपरा दूर, कुठे तरी कुद्रिन्स्काया चौकावर संपंत होता. दोन्हीं ओळींच्या सुरुवातीला
मॉस्कोच्या थियेटर जगताचे कमीत कमी 20-25 प्रसिद्ध व्यक्ति होते.
ह्या
लांब ओळी ब-याच उत्तेजित वाटंत होत्या; येणा-या-जाणा-या लोकांचं लक्ष आपसूकंच तिथे होणा-या वार्तालापाकडे आकर्षित
होत होतं. ते सगळे कालच्या त्या जादूच्या अप्रतिम ‘शो’ बद्दल
गरमागरम चर्चा करंत होते. ह्याच गोष्टींनी अकाउन्टेन्ट वसीलि स्तेपानोविचसुद्धां
घाबरला होता. काल तो थियेटरमधे नव्हता. गेट-कीपर देव जाणे काय सांगंत होते...आणि
हेपण की ‘शो’च्या नंतर काही भद्र महिला
अभद्र अवस्थेंत रस्त्यावर धावंत होत्या...आणि असंच काही तरी. लाजाळू आणि शांत
स्वभावाचा वसीलि स्तेपानोविच ह्या सगळ्या गोष्टी ऐकतांना फक्त डोळ्यांची फडफड करंत
होता, त्याला
कळंत नव्हंत की काय केलं पाहिजे, पण काही न काही करणं तर भागंच होतं नं, कारण ह्या वेळेस वेराइटीत उपस्थित असलेल्या कर्मचा-यांमधे तोच एक वरिष्ट
अधिकारी होता.
दहा
वाजता-वाजता टिकिट घेण्या-यांची लाइन इतकी लाम्ब झाली की ह्याची माहिती पोलिसला
सुद्धां झाली; आश्चर्यजनक
तत्परतेने पायदळ आणि अश्वारोही तुकड्या तिथे पाठवण्यांत आल्या, ज्यांनी ह्या ओळींमधे
थोडंफार अनुशासन ठेवलं. पण जवळ-जवळ एक किलोमीटर लांब हा अनुशासित नाग काही कमी
मनोरंजक नव्हता, ज्याने
सादोवायावर लोकांना चकित केलं होतं.
ही तर होती वेराइटीच्या बाहेरची परिस्थिति, पण आतलं वातावरणसुद्धां काही आनंदी नव्हतं. सकाळपासूनंच लिखादेयेव, रीम्स्की, कैश ऑफ़िस, टिकिट-खिडकी आणी वारेनूखाच्या कैबिन्समधे टेलिफोनच्या घंट्या वाजू
लागल्या. आधी तर वसीलि स्तेपानोविच
आणि टिकिट-विक्रेता
मुलीने आणि गेटकीपर्सने टेलिफोनवर विचारंत असलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण थोड्याच वेळाने त्यांने तिकडे लक्षंच देणं बंद केलं; कारण की त्यांच्याजवळ ह्या प्रश्नांचे काही उत्तरंच नव्हते, की लिखोदेयेव, वारेनूखा आणि रीम्स्की कुठे आहेत. पहिले
त्यांनी सांगितलं, की ‘लिखादेयेव आपल्या फ्लैटमधे आहे,’ पण तिकडून उत्तर
आलं की त्यांनी फ्लैटवर फोन केलेला आहे, तिथे त्यांना असं
सांगण्यांत आलं, की लिखादेयेव वेराइटीत आहे.
एका
घाबरलेल्या महिलेने फोनवर मागणी केली, की तिला रीम्स्कीचा पत्ता सांगण्यांत यावा, जेव्हां तिला सल्ला दिला, की तिने रीम्स्कीच्या पत्नीला फोन करावा, तर टेलिफोनचं रिसीवर हुंदके देतं म्हणालं, की तीच रीम्स्कीची पत्नी आहे आणि तिच्या नव-याचा काही पत्तांच नाहीये. काहीतरी
विचित्रंच घडू लागलं. झाडू लावणा-या बाईनी सगळ्यांना सांगून टाकलं, की जेव्हां ती फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे साफ-सफाई करायला गेली, तेव्हां तिने बघितलं की
कैबिनचं दार सताड उघडं आहे, सगळे लाइट्स चालू आहेत, बगिच्याकडे उघडणा-या खिडकीचा काच तुटलेला आहे, खुर्ची जमिनीवर पडलेली आहे आणि कैबिनमधे कुणीच नाहीये.
दहा
वाजल्यानंतर मैडम रीम्स्काया तीरासारखी वेराइटीत घुसली. ती रडंत होती आणि हात
चोळंत होती. वसीलि स्तेपानोविच पूर्णपणे गडबडून गेला, त्याला समजंत नव्हतं की तिला काय सल्ला द्यावा.
साडे
दहा वाजता पोलिस आली. त्यांने पहिलाच तर्कसंगत प्रश्न विचारला, “नागरिकांनो हे काय चाललंय? झालं काय आहे?”
घाबरलेल्या, विवर्ण झालेल्या वसीलि
स्तेपानोविचला पुढे करून सगळे मागे झाले. सगळं काही खरं खरं सांगावंच लागलं आणि
स्वीकार करावं लागलं की वेराइटीचे सगळे प्रशासनिक अधिकारी – डाइरेक्टर, फिनडाइरेक्टर आणि
एडमिनिस्ट्रेटर माहीत नाही कुठे गायब झालेयंत; कालच्या कार्यक्रमानंतर सूत्रधाराला मानसिक चिकित्सालयांत पाठवण्यांत आलंय
आणि हे, की
कालचा ‘शो’ खूपंच लज्जास्पद
होता.
हुंदके
देत रडणा-या मैडम रीम्स्कीला जितकं शक्य होतं, तितकं समजावून घरी पाठवलं आणि खूप उत्सुकतेने झाडू मारणा-या बाईला
विचारण्यांत आलं, की
तिने फिनडाइरेक्टरच्या कैबिनला कोणच्या अवस्थेत पाहिलं होतं. सगळ्या कर्मचा-यांना
आपल्या-आपल्या जागेवर जाऊन काम करायला सांगितलं. थोड्याच वेळांत तीक्ष्ण कानांच्या, सुदृढ, सिगरेटच्या राखेच्या
रंगाच्या, तीक्ष्ण
नजर असलेल्या कुत्र्याला घेऊन तपास करणारी टीम आली. वेराइटीच्या कर्मचा-यांची
कुजबुज सुरू झाली की हा कुत्रा कुणी साधारण कुत्रा नसून सुप्रसिद्ध डिटेक्टिव
कुत्रा तुज़्बुबेन आहे. खरं म्हणजे तो तोच होता. त्याच्या हालचाली बघून लोक दंग
झाले. फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे घुसल्याबरोबर त्याने आपले तीक्ष्ण, पिवळे दात दाखवंत गुरगुरणं
सुरूं केलं. मग तो पोटावर लोळला आणि डोळ्यांत वेदना आणि रानटीपणाचा भाव आणून
तुटलेल्या खिडकीजवळ सरकला. आपल्या भीतिवर नियंत्रण ठेवंत त्याने खिडकीच्या चौकटीवर
उडी मारली आणि आपलं तीक्ष्ण मुस्कट वर करून रागाने आणि बेभानपणे किंचाळू लागला. तो
खिडकीतून दूर व्हायला तयार नव्हता, गुरगुरंत होता, थरथरंत होता आणि खाली उडी मारायच्या बेतात होता.
कुत्र्याला
कैबिनमधून बाहेर आणून कॉरीडोरमधे सोडलं, जिथून तो प्रवेश द्वारातून बाहेर निघून रस्त्यावर आला आणि आपल्या बरोबर
धावंत असलेल्या पोलिसवाल्यांना टैक्सी-स्टैण्ड पर्यंत घेऊन आला. इथे आल्यावर
त्याच्या तपासाचा माग हरवला. ह्याच्यानंतर तुज़्बुबेनला परंत नेण्यांत आलं.
तपास-टीम वारेनूखाच्या कैबिनमधे बसली. इथेंच त्यांनी वेराइटीच्या त्या सगळ्या कर्मचा-यांना
एक-एक करून बोलावलं, जे कालच्या ‘शो’ला
उपस्थित होते. तपास-टीमला प्रत्येक पावलावर अप्रत्याशित विघ्नांचा सामना करावा
लागंत होता. तपासाचं काम घडी-घडी ठप्प होत होतं.
“जाहिराती
होत्या?”
होत्या
तर खरं. पण रात्रीच्या रात्री त्यांच्यावर नवीन जाहिराती चिटकवल्या होत्या आणि
आतां काहीही करा, एक
सुद्धां जाहिरात उपलब्ध नव्हती. जादुगार आला कुठून होता? पण त्याला ओळखंत कोण होतं!
त्याच्याशी काही अनुबंधतर केला असेल नं?
“केलाच
असेल,” घाबरलेल्या वसीलि स्तेपानोविचने उत्तर दिलं.
“जर
केला असेल तर तो अकाउन्टेन्टच्या विभागांतूनंच गेला असेल ना?”
“जायलांच
हवा होता,” आणखी जास्त व्यथित होत वसीलि स्तेपानोविचने म्हटलं.
“मग
तो कुठेय?”
“नाहीये,” अकाउन्टेन्टने हात हलवंत
आणि जास्तंच विवर्ण होत उत्तर दिलं. आणि खरंच, त्या अनुबंधाचा कुठेच पत्ता नव्हता; ना तर अकाउन्ट्स डिपार्टमेन्टमधे, ना फिनडाइरेक्टरच्या कैबिनमधे, ना लिखोदेयेवकडे आणि वारेनूखाच्या टेबलवर सुद्धां नाही.
ह्या
जादुगाराचं नाव काय होतं? वसीलि स्तेपानोविचला माहीत नाही, तो कालच्या ‘शो’ला
आलांच नव्हता. गेट कीपर्सला माहीत नाही, टिकिट विक्रेताने डोक्यावर जोर दिला, विचार करू लागली, विचार करू लागली आणि शेवटी म्हणाली, “वो...कदाचित, वोलान्द.”
पण, कदाचित वोलान्द नसेलही? कदाचित वोलान्द नसेल? कदाचित, फोलान्द असेल.”
विचारपूस
केल्यावर कळलं की परदेशी टूरिस्ट-ब्यूरोमधे अश्या कोणत्याच जादुगाराबद्दल काहीच
माहिती नव्हती, ज्याचं
नाव वोलान्द असेल किंवा फोलान्द असेल.
कुरियर-बॉय
कार्पोवने सांगितलं की कदाचित हा जादुगार लिखोदेयेवच्या फ्लैटमधे थांबला होता.
लगेच सगळे लोक तिथे पोहोचले. तिथे कुणी जादुगार नव्हतांच. लिखोदेयेव स्वतःसुद्धां
नव्हता. मोलकरीण ग्रून्या नव्हती; आणि ती कुठे गायब झाली, ह्याबद्दल कोणीच काहीही सांगू शकलं नाहीं. हाउसिंग सोसाइटीचा प्रेसिडेण्ट
निकानोर इवानोविच नव्हता, प्रोलेझ्नेवसुद्धां नव्हता.
काही
तरी विचित्रसं झालं होतं: सगळेच उच्च प्रशासनिक अधिकारी गायब झाले होते; काल एक विचित्र-सा, लाजिरवाणा ‘शो’ झाला होता, आणि कोणी, कोणाच्या सांगण्यावरून
त्याचं आयोजन केलं होतं – माहीत नाही.
ह्याच
गडबडींत दुपार झाली, जेव्हां तिकिट-खिडकी उघडणार होती. पण आता तो प्रश्नंच नव्हता. वेराइटीच्या
प्रवेश द्वारावर एक मोट्ठं नोटिस लावण्यांत आलं : “आजचा ‘शो’ रद्द करण्यांत येत आहे.”
बाहेर असलेल्या रांगेत असंतोष पसरला, पण काही वेळ बाचा-बाची केल्यावर ती रांग तुटूं लागली. सुमारे तासभरानंतर
सादोवायावर तिचा मागमूसदेखील उरला नाही. तपास-टीमसुद्धां कोण्या दुस-या ठिकाण्यावर
आपला तपास सुरूं ठेवायला निघून गेली. चौकीदारांशिवाय बाकी सगळ्या कर्मचा-यांची
सुट्टी करण्यांत आली. वेराइटीच गेट बंद करण्यांत आलं.
अकाउन्टेन्ट
वसीलि स्तेपानोविचला लगेच दोन कामं करायचे होते. पहिलं हे, की मनोरंजन-कमिटीत जाऊन
कालच्या ‘शो’ बद्दल रिपोर्ट करायची होती; आणि दुसरं, कालच्या ‘शो’तून प्राप्त झालेली 21,711 रूबल्सची धनराशी
कमिटीच्या फायनान्स सेक्शनमधे जाऊन जमा करायची होती.
व्यवस्थित
आणि आज्ञाकारी वसीलि स्तेपानोविचने वर्तमानपत्राच्या कागदांत नोटांचे बण्डल
गुंडाळले, त्यावर
एक दोरी बांधली, त्याला
बैगमधे ठेवलं आणि दिलेल्या निर्देशांनुसार बस किंवा ट्रामच्या ऐवजी टैक्सी
स्टैण्डवर गेला.
तिथे
उभ्या असलेल्या तीन टैक्सी चालकांनी हातांत फुगलेली बैग घेऊन लवकर-लवकर येणा-या
प्रवाश्याला बघितलं, तिघंचे तिघं माहीत नाही कां, रागाने त्याच्याकडे पाहंत आपल्या गाड्या घेऊन पसार झाले.
त्यांच्या
ह्या वागणुकीमुळे स्तंभित होऊन अकाउन्टेन्ट बराच वेळ हा विचार करंत पुतळ्यासारखा
उभांच राहिला की ह्याच्या अर्थ काय असूं शकतो!
तीन
मिनिटांने एक रिकामी टैक्सी येताना दिसली, चालकाने प्रवाश्याला बघून तोंड वाकडं केलं.
“टैक्सी
रिकामी आहे कां?” आश्चर्याने खाकरंत वसीलि स्तेपानोविचने विचारलं.
“आधी
पैसे दाखवं,” रागावलेल्या ड्राइवरने त्याच्याकडे न बघतांच म्हटलं.
वसीलि
स्तेपानोविच आणखीनंच बुचकळ्यांत पडला आणि त्याने ती बहुमूल्य बैग बगलेंत दाबून दहा
रूबल्सचा एक नोट काढून ड्राइवरला दाखवला.
“नाही
जाणार!” त्याने तुसडेपणाने उत्तर दिलं.
“माफ
करा...” अकाउन्टेन्ट म्हणणार होता, पण ड्राइवरने त्याला मधेच टोकंत विचारलं, “तीन रूबल्सचे नोट आहे?”
अकाउन्टेन्ट
स्तब्ध झाला. त्याने तीन रूबल्सचे दोन नोट काढून ड्राइवरला दाखवले.
“बसा,” तो ओरडला आणि त्याने मीटर इतक्या
जो-याने फिरवलं, की
ते तुटतां-तुटतां राहिलं, “चला!”
“चिल्लर
नाहीये कां?” अकाउन्टेन्टने हळुवारपणे विचारलं.
“पूर्ण
खिसा भरलाय चिल्लरने!” ड्राइवर गरजला आणि समोरच्या छोट्याश्या आरश्यांत त्याचे
रक्तासारखे लाल डोळे दिसले, “हे तिस-यांदा झालंय आज माझ्यासोबत. इतरांबरोबरसुद्धां असंच झालं. कोण्या एका
डुकराच्या पिल्लाने दहाची नोट दिली आणि मी त्याला चिल्लर परंत दिली – साडे चार
रूबल...उतरून गेला, बदमाश! पाच मिनिटांनी बघतो काय, की दहाच्या नोटेऐवजी आहे, नरज़ानच्या बाटलीचं लेबल! ड्राइवरने काही न छापता येण्यासारख्या शिव्या
हासडल्या. दुस-यांदा झालं ज़ुब्रास्काच्या पुढे. दहाची नोट! तीन रूबलची चिल्लर परंत
केली. चालला गेला! मी आपल्या पर्समधे हात घातला -गप् - एक मधमाशी माझ्या बोटाला
चावली! आणि दहाची नोट नाहीये! ओ...ह!” ड्राइवरने पुन्हां काही न छापण्यासारख्या
शिव्या दिल्या, “काल ह्या वेराइटीमधे (असभ्य शब्द) कोण्या एका सरड्याच्या पिल्लाने दहाच्या
नोटांचा जादू दाखवला होता (असभ्य शिवी).”
अकाउन्टेन्टची
वाचांच बंद झाली. त्याने काही कसमसंत असं दाखवलं, जणु तो पहिल्यांदाच ‘वेराइटी’ हा
शब्द ऐकतोय, आणि
विचार करूं लागला : ‘तर अशी गोष्ट आहे, भोगा...’
आपल्या
गंतव्यावर पोहोचल्यावर टैक्सी-ड्राइवरला व्यवस्थित पैसे देऊन अकाउन्टेन्ट मनोरंजन
कमिटीच्या बिल्डिंगमधे घुसला आणि कॉरीडोरमधून कमिटीच्या प्रमुखाच्या ऑफिसकडे चालू
लागला आणि त्याला लगेच जाणवलं की तो चुकीच्या वेळेवर आलाय. मनोरंजन कमिटीच्या
ऑफिसमधे भयानक गोंधळ माजला होता. अकाउन्टेन्टच्या जवळून एक पत्रवाहक मुलगी धावंतच
गेली, तिच्या
डोक्यावरचा रूमाल सुटलेला होता आणि डोळे विस्फारले होते.
“नाही, नाही, नाही, माय डियर्स!” माहीत नाही, कुणाकडे बघंत ती ओरडली, “कोट आणि पैन्ट तर तीच आहे, पण कोटाच्या आत कुणीच नाहीये!”
ती
धावंत जाऊन एका दारामागे लपली आणि तिच्या मागोमाग कप-बश्या फुटण्याचे आवाज ऐकूं
येऊं लागले. सेक्रेटरीच्या कैबिनमधून अकाउन्टेन्टचा परिचित, कमिटीच्या पहिल्या
सेक्टरचा प्रमुख वादळासारखा धावंत बाहेर आला, पण तो इतका घाबरलेला होता, की आपल्या अकाउन्टेन्ट मित्रालासुद्धां ओळखू नाही शकला, आणि तो पण कुठेतरी लपून
गेला.
ह्या
सगळ्याला घाबरून अकाउन्टेन्ट सेक्रेटरीच्या कैबिनपर्यंत पोहोचला, जे कमिटी-प्रमुखाच्या
ऑफिसचे प्रवेश-कक्षंच होतं, इथे आल्यावर जणु त्याच्यावर वज्राघातंच झाला.
ऑफिसच्या
बंद दरवाज्याच्या मागे आवाज गरजंत होता, हा आवाज निःसंदेह कमिटी-प्रमुख – म्हणजे प्रोखोर पेत्रोविचचा होता. ‘कोणाला तरी रागावताहेत कां?” घाबरलेल्या अकाउन्टेन्टने
विचार केला, पण
खोलींत वाकून पाहिल्यावर वेगळंच दृश्य दिसलं: चामड्याच्या खुर्चीच्या पाठीला डोकं टेकवून, खूपंच विव्हळंत, हातांत ओला रुमाल धरून
खोलीच्या मध्यापर्यंत पाय पसरून प्रोखोर पेत्रोविचची सुंदर सेक्रेटरी आन्ना
रिचार्दोव्ना पडली होती.
आन्ना
रिचार्दोव्नाच्या पूर्ण हनुवटीवर लिप्स्टिक पसरली होती, आणि पापण्यांवरून गुलाबी कोमल गालांवर मस्कराच्या काळा धारा वाहत होत्या.
कोणालातरी
आंत येताना पाहून आन्ना रिचार्दोव्नाने उडीच मारली, ती अकाउन्टेन्टचा कोट पकडून त्याला बिलगली आणि किंचाळू लागली, “अरे देवा! कमीत कमी एक तरी
बहाद्दर निघाला! सगळे पळून गेले, सगळ्यांनी विश्वासघात केला! चल, चल, त्याच्याजवळ
चलूं! मला समजंत नाहीये, की काय करायला हवं!” आणि रडंट-रडंत ती अकाउन्टेन्टला खेचंत खोलीच्या आत घेऊन
गेली.
खोलींत
घुसल्याबरोबर अकाउन्टेन्टच्या हातातून बैग सुटून खाली पडली आणि त्याचे विचार गड्ड-मड्ड
झाले. आता हे तर सांगावंच लागेल की असं कां झालं.
एका
मोट्ठ्या राइटिंग टेबलामागे, ज्याच्यावर एक भली मोट्ठी शाईची दौत ठेवलेली होती, रिकामा सूट बसला होता आणि
शाईत न बुडवतां, म्हणजेच
कोरड्या पेन ने कागदावर काहीतरी लिहीत होता. सूटच्या सोबत टायपण होता, कोटाच्या खिश्यातून बॉलपेन
डोकावंत होता, पण
कॉलरच्या वर मानंच नव्हती, डोकंसुद्धां नव्हतं; तसंच कोटाच्या बाह्यांमधून मनगटपण दिसंत नव्हते. सूट कामांत गुंतला होता आणि
त्याचं चारीकडे चाललेल्या धुमाकूळाकडे बिल्कुल लक्ष नव्हतं. कोणाच्यातरी येण्याची
चाहूल लागतांच कोटाने खुर्चीत काही हालचाल केली आणि कॉलरच्यावर अकाउन्टेन्टला परिचित
असलेला प्रोखोर पेत्रोविचचा आवाज घुमला:
“काय
झालंय? दारावर
लिहिलंय न की आत्ता कोणालाच भेटू शकंत नाही!”
सुंदर
सेक्रेटरीने एक हुंदका दिला आणि हात चोळंत ओरडली, “बघतांय नं? तो
नाहीये! नाहीये! त्याला परंत आणा, परंत आणा!”
आता
दारांतून कुणी डोकावलं, ओरडलं आणि छूमंतर झालं. अकाउन्टेन्टला भास झाला की त्याचे पाय थरथरताहेत आणि
तो खुर्चीच्या कोप-यावर बसून गेला, पण तो आपली बैग उचलायला नाही विसरला. आन्ना रिचार्दोव्ना अकाउन्नटेट
अकाउन्टेन्टच्या आजूबाजूला उड्या मारंत होती. ती त्याचा कोट धरून किंचाळली, “जेव्हां तो सैतानाची शप्पथ
घ्यायचा, मी
त्याला नेहमी थांबवायची! आता स्वतःच सैतान झालाय!”
आता
ती टेबलाजवळ धावली आणि आपल्या गोड सुरेल आवाजांत, जो रडण्यामुळे किंचित जाड झाला होता, विचारायला लागली, “प्रोशा! तू कुठे आहेस?”
“कोण
‘प्रोशा’?” सूटने खुर्चीत आणखीनंच
खचंत जो-याने विचारलं.
“नाही
ओळखंत! मला नाही ओळखंत! तुम्हांला कळतंय?”
सेक्रेटरी रडू लागली.
“कृपा
करून ऑफिसमधे रडू नका,” सूट आता चिडला होता. त्याने ठराव लिहिण्यासाठी बाह्यांनी को-या कागदांचा
गट्ठा आपल्याकडे ओढला.
“नाही, नाही बघवंत मला हे सगळं!”
असं म्हणून आन्ना रिचार्दोव्ना रडतंच सेक्रेटरीच्या कैबिनकडे पळाली, तिच्या मागे अकाउन्टेन्टसुद्धां
बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा धावला.
“कल्पना
करा, मी
बसलेय,” उद्विग्न आन्ना रिचार्दोव्ना अकाउन्टेन्टचा हात धरून सांगू लागली, “आणि खोलीत आला एक बोका –
काळा, हृष्ट-पुष्ट, जणु बोका नसून
हिप्पोपोटेमस होता तो. मी त्याला ‘शुक् शुक्!’
केलं. तो बाहेर पळून गेला, मग खोलीत घुसला बोक्यासारख्या चेह-याचा एक लट्ठ माणूस आणि म्हणाला, “तर, मैडम, तुम्हीं पाहुण्यांना ‘शुक् शुक्!’ म्हणता?” तो निर्लज्ज सरळ प्रोखोर
पेत्रोविचकडे धावला. मी ओरडंत होते: “वेड लागलंय कां?” आणि तो दुष्ट सरंळ खोलीत घुसून प्रोखोर पेत्रोविचच्या समोरच्या खुर्चीत बसून
गेला. आणि तो...सहृदय माणूस आहे, पण लवकर घाबरून जातो, तो भडकला! मी वाद नाही घालणार. बैलासारखा काम करणारा, लवकर चिडणारा, भडकला : “तुम्हीं असे कसे
सूचना न देता आत घुसले?” आणि तो धीट माणूस निलाजरेपणाने हसंत खुर्चीत जमून बसला आणि म्हणाला, “मी कामाबद्दल बोलायला
आलोय.” प्रोखोर पेत्रोविच रागाने म्हणाला,
“मी व्यस्त आहे!” आणि कल्पना करा – तो म्हणाला, “तुम्हीं जराही व्यस्त
नाहीये...” आँ? प्रोखोर
पेत्रोविचची सहनशक्ती संपली आणि तो ओरडला,
“ही काय कटकट आहे? ह्याला इथून घेऊन जा, आह, जर
मला सैतानानंच नेलं असतं तर किती छान झालं असतं!” आणि तो, कल्पना करा, हसून म्हणाला, “सैतानाने नेलं असतं? हे तर होऊ शकतं!” आणि एकदम
‘झन्’ झालं, मी ओरडूपण नाही शकले, बघते काय : तो
नाहीये...तो...बोक्यासारख्या माणूस आणि हा...सूट इथे बसलाय...हें...हें....हें!!!”
आन्ना रिचार्दोव्नाचे ओठ, दात सगळे गड्ड मड्ड झाले आणि ती भें S S S करंत रडू लागली.
हुंदके थांबवून तिने श्वास
घेतला,
पण
आणखीनंच काही अकल्पनीय बडबडू लागली:
“आणि लिहितोय, लिहितोय, लिहितोच आहे! पागल
होऊन जाईन! टेलिफोनवर गोष्टी करतोय! सूट! सगळे पळून गेले, सश्यांसारखे!”
अकाउन्टेन्ट नुसता उभा होता
आणि थरथरंत होता. पण शेवटी भाग्यानेच त्याला ह्यातून सोडवलं. सेक्रेटरीच्या
कैबिनमधे शांतपणे, व्यस्त भावाने पोलिस घुसले...दोन पोलिस वाले. त्यांना बघून
सेक्रेटरी आणखीनंच जो-याने रडू लागली. ती रडंत होती आणि प्रमुखाच्या ऑफिसकडे हात
दाखवंत होती.
“रडायचं नसतं, नागरिक, रडू नका,” पहिला पोलिसवाला
शांतपणे म्हणाला. अकाउन्टेन्टला समजलं, की त्याची इथे काही गरज नाहीये आणि तो
खोलीच्या बाहेर सटकला, एका मिनिटानंतर तो मोकळ्या हवेंत श्वास घेत होता. त्याच्या
डोक्यांत झण्-झण् होत होती. ह्या झणझणाटांत गेट कीपरने बोक्याबद्दल सांगितलेल्या
गोष्टी तरंगंत होत्या, ज्याने कालच्या ‘शो’मधे भाग घेतला होता. ‘ओ...हो...हो! कुठे तो आमचांच
बोका तर नव्हता?’
जेव्हां कमिटीच्या ऑफिसमधे
काम नाही झालं,
तेव्हां
सभ्य वसीलि स्तेपानोविचने तिच्या दुस-या शाखेंत जायचा विचार केला, जी वगान्स्कोव्स्की चौरस्त्यावर
होती. स्वतःला काहीसं संयत करण्याच्या दृष्टीने तो पायीच तिथपर्यंत गेला.
मनोरंजन कमिटीची ही शहरातली
शाखा रस्त्यापासून आत असलेल्या एका जुन्या, पापुद्रे निघंत असलेल्या
महालांत होती,
जो
आपल्या वेस्टीब्यूल मधल्या लाल ग्रेनाइटच्या स्तंभांसाठी प्रसिद्ध होता.
पण आज आगंतुक स्तंभांमुळे नाही, पण त्यांच्या खाली
होत असलेल्या गडबडीने हैराण होत होते. काही आगंतुक टेबलाच्या मागे बसलेल्या एका महिलेजवळ
उभे होते,
जी एका
टेबलावर काही मनोरंजक साहित्य ठेवून विकंत होती. ह्या क्षणी ती दर्शकांना काहीच
दाखवंत नव्हती आणि नुसती रडंत होती. आगंतुकांच्या प्रश्नांना नुसते हात हालवून
उत्तर देत होती;
आणि
त्याच वेळेस वरती, खाली, कोप-यांतून, सगळ्याच विभागांत जवळ-जवळ वीस टेलिफोन्स वाजंत होते.
थोडंसं रडून, ती महिला एकदम
थरथरली आणि उन्मादाने किंचाळली, “पुन्हां तेच!” आणि ती थरथरत्या आवाजांत तार सप्तकांत
गाऊ लागली:
सुन्दर सागर पवित्र
बायकाल...1
पाय-यांवरून खाली उतरंत
असलेला पत्रवाहक न जाणे कुणाला मुक्के दाखवंत ह्या महिलेबरोबर जाड्या, कुंद आवाजांत गाऊ
लागला:
सुंदर जहाज बैरेल
सिस्कोची!...2
ह्या दोन आवाजांमधे आणखी
आवाजही मिसळूं लागले. हळू हळू हे समूहगान सम्पूर्ण इमारतीत घुमूं लागलं. जवळच्याच
रूम नंबर 6 मधे,
जिथे
अकाउन्ट्स-कन्ट्रोलर सेक्शन होतं, कोणाचातरी जाड, भसाडा आवाज वेगळांच ऐकूं येत
होता. टेलिफोनच्या घंट्या जणु ह्या कोरसला पार्श्व संगीत देत होत्या.
हेय्, बार्गुज़िन3...खेळ
लाटांशी!...
पत्रवाहक पाय-यांवर गरजला.
मुलीच्या चेह-यावर अश्रू
ओघळले,
तिने
दात मिटण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तोंड आपणहूनंच उघडलं आणि ती सगळ्यांत उंच
स्वरांत गाऊ लागली.
जर, तरुण असता जवळपास!
चुपचाप असलेल्या आगंतुकांना ह्या गोष्टीचं
आश्चर्य होत होतं, की वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असूनसुद्धा सगळेच कर्मचारी अश्या
प्रकारे गात होते, जणु ते एका समूहांत उभे आहेत आणि सगळेंच कोणच्यातरी अदृश्य
निर्देशकाकडे बघंत गात होते – जसे त्याच्या निर्देशांच पालन करताहेत.
वगान्स्कोव्स्की
चौरस्त्यावरून जाणारे लोक त्या बिल्डिंगच्या प्रवेश द्वाराजवळ थबकायचे आणि तिथल्या
प्रसन्न आणि उल्लसित वातावरणावर आश्चर्य करंत निघून जायचे.
पहिलं पद संपल्यावर गाणं
अचानक थांबलं,
जणु
निर्देशकाच्या छडीने त्यांना एकदम थांबवलं असावं. पत्रवाहक बडबडला आणि माहीत नाही
कुठे लपून गेला. तेवढ्यांत प्रवेश द्वार उघडलं आणि त्यांतून समर-कोट घातलेला, ज्याच्या खालून
पांढ-या गाउनचे कोपरे दिसंत होते, एक व्यक्ति प्रकट झाला, त्याच्याबरोबर आला
पोलिसवाला.
“काही तरी करा, डॉकटर, विनंती करते...”
मुलगी उन्मादाने ओरडली.
मनोरंजन कमिटीच्या शाखेचा
सेक्रेटरी धावंत पाय-यांवर आला आणि स्पष्ट दिसंत होतं, की तो अपमान आणि लाजेने लाल
होत अडखळंत बोलूं लागला:
“बघताय न डॉक्टर, कदाचित ही सामूहिक
सम्मोहनाची घटना आहे...म्हणून, आवश्यक आहे...” तो आपलं वाक्य पूर्णसुद्धां करू शकला
नाही,
की
त्याच्या शब्दांनी घात केला आणि तो अचानक गाऊ लागला:
शील्का आणि
नेरचिन्स्क4...
“मूर्ख!” मुलगी ओरडली तर खरं, पण हे नाही कळलं की
ती कोणावर राग काढतेय, आणि पुढे काही म्हणायच्या ऐवजी ती सुद्धां एक उंच तान घेऊन शील्का
आणि नेरचिन्स्कची प्रशंसा करंत गाऊ लागली.
“स्वतःवर ताबा ठेवा! गाण बंद
करा!” डॉक्टर सेक्रेटरीकडे वळला.
स्पष्ट होतं, की सेक्रेटरी स्वतःसुद्धा
हे गाण थांबवण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होता, पण गाण थांबवण्याच्या ऐवजी
तो स्वतःपण जोरजोराने गात राहिला आणि ह्या समूहगानाबरोबर त्या चौरस्त्यावरून
जाणा-या-येणा-यांना सांगत होता, की रानांत कोणत्याही श्वापदाने त्याच्यावर हल्ला नाही
केला आणि शिका-यांची गोळी त्याला स्पर्श नाही करूं शकली!
हे पद संपल्याबरोबर डॉक्टरने
मुलीच्या तोंडांत औषधाचे काही थेंब टाकले आणि मग तो सेक्रेटरी आणि इतर
कर्मचा-यांना औषध पाजण्यासाठी धावला.
“माफ करा, मैडम,” वसीलि स्तेपानोविचने
अचानक मुलीला विचारलं, “तुमच्या इथे काळा बोका तर नव्हता आला?”
“कुठला बोका? कसला बोका?” रागांत मुलगी ओरडली, “गाढव बसलाय आमच्या
ऑफ़िसमधे,
गाढव!”
आणि पुढे म्हणाली, “ऐकतोय, तर ऐकू दे! मी सगळं सांगून टाकेन.” आणि तिने खरंच
सगळं सांगून टाकलं.
झालं असं होतं, की
मनोरंजन-कमिटीच्या ह्या शाखेच्या प्रमुखाला, ज्याने “हॉबी-क्लासेस”चा
सत्यानाश करून टाकला होता (मुलीच्या शब्दांत) वेगवेगळ्या मनोरंजक कार्यक्रमांशी
संबंधित क्लब्स बनवायचा शौक चढला.
“प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ
झोकली!” मुलगी गरजली.
ह्या वर्षांत त्याने लेरमन्तोव5-अध्ययन
क्लब,
बुद्धिबळ, तलवार, पिंग-पाँग आणि
घोडेस्वारी शिकण्यासाठी क्लब्स बनवले. उन्हांळा येता-येता पर्वतारोहण आणि
नौकाचालनाचेही क्लब्स बनवण्याची धमकी दिली.
“आणि आज, लंच-टाइम मधे तो आत
आला,
आणि
आपल्याबरोबर एका घाणेरड्या माणसाला हात धरून आणलं,” मुलगी सांगंत होती, “माहीत नाही तो कुठून
आला होता – चौकड्याची पैन्ट घातलेला, तुटका चश्मा, आणि... थोबाड असं की त्याचं
वर्णनंच करूं शकंत नाही!”
आणि ह्या आगंतुकाची, मुलीच्या
म्हणण्याप्रमाणे, लंच करंत असलेल्या सगळ्या कर्मचा-यांशी असं सांगून ओळख दिली की तो
कोरस आयोजित करण्याच्या कलेचा विशेषज्ञ आहे.
संभावित पर्वतारोहणाच्या
चाहत्यांचे चेहरे पडले, पण प्रमुखाने लगेच सर्वांची समजूत घातली. तो विशेषज्ञ
विनोद करंत होता, हसंत होता आणि शपथेवर सांगंत होता की कोरससाठी खूपंच कमी वेळ लागतो, आणि त्याचे फायदे
खूप आहेत.
मुलीच्या सांगण्याप्रमाणे
सगळ्यांत आधी उड्या मारल्या ह्या ऑफिसचे सगळ्यांत मोट्ठे ‘चमचे’, फानोव आणि कसार्चुकने, हे सांगून की ते सगळ्यांत आधी आपलं नाव देताहेत. आता
बाकीच्या लोकांना कळून चुकलं की ह्या क्लबला थांबवणं कठीण आहे, म्हणून सगळ्यांने
आपले-आपले नाव दिले. हे ठरवलं की गाण्याची प्रैक्टिस दुपारी लंच-टाइममधे होईल, कारण बाकीचा सगळा
वेळ लेरमन्तोव आणि तलवारींसाठी ठेवलेला होता. प्रमुखाने हे दाखवण्यासाठी की
त्यालासुद्धा स्वरांच ज्ञान आहे, गायला सुरुवात केली आणि पुढे सगळं जणु स्वप्नांतच
घडलं,
चौकटीवाला
विशेषज्ञ गरजला:
“सा-रे-ग-म!” गाण्यापासून
स्वतःला वाचवण्यासाठी अलमा-यांच्या मागे लपलेल्या लोकांना खेचून-खेचून बाहेर काढलं.
त्याने कसार्चुकला सांगितलं की त्याची स्वराची पकडं छान आहे; दात दाखवंत
सगळ्यांना म्हाता-या संगीतज्ञाचा आदर करायला सांगितलं, मग बोटांवर ट्यूनिंग-फोर्कने
खट्-खट् करंत वायलिन वादकाला ‘सुंन्दर सागर’ वाजवायला सांगितलं.
वायलिन झंकारलं, सगळेच वाद्य वाजू
लागले...खूप सुरेखपणे. चौकटीवाला खरोखरंच आपल्या कलेंत निष्णात होता. पहिले कडवे
पूर्ण झाले. तेव्हां तो विशेषज्ञ एका मिनिटासाठी क्षमा मागून जो गेला...तो गायबंच
झाला. सगळ्यांना वाटलं, की तो खरंच एका मिनिटाने परंत येईल. पण दहा मिनिटं
झाली तरी तो परंत नाही आला. सगळे खूश झाले, की तो पळून गेला.
आणि अचानक सगळ्यांनी दुसरे
कडवे गायला सुरुवात केली. कसार्चुक, ज्याला जरासुद्धा स्वरांच ज्ञान नव्हतं, पण ज्याचा आवाज खूप
उंच होता,
सगळ्यांच
नेतृत्व करंत होता. गाणं पूर्ण झालं. विशेषज्ञाचा पत्ताच नव्हता! सगळे आपापल्या
जागेवर आले,
पण
कोणीही बसू शकलं नाही, कारण सगळेंच आपल्या इच्छेविरुद्ध गातंच राहिले. थांबणं शक्यंच नव्हतं! तीन मिनिट चूप राहायचे, पुन्हा गाऊ लागायचे!
चूप राहायचे – गाऊ लागायचे! तेव्हां सगळ्यांना समजलं की काहीतरी गडबड झालीये.
ऑफिसचा प्रमुख तोंड लपवून आपल्या खोलींत लपून बसला.
मुलीची गोष्ट पूर्ण झाली.
औषधाचा तिच्यावर काहीही परिणाम झालेला नव्हता.
जवळ जवळ पंधरा मिनिटांने
वगान्स्कोव्स्की चौकांत तीन ट्रक्स आले, त्यांत प्रमुखासह ऑफिसच्या सगळ्या
कर्मचा-यांना कोंबण्यांत आलं.
जसांच पहिला ट्रक निघायच्या
तयारीत होता,
आणि तो
ऑफिसच्या कम्पाउण्डमधून बाहेर निघून चौकांत आला, सगळ्यांच कर्मचा-यांनी, जे एक दुस-याच्या खांद्यावर
हात ठेवून उभे होते, आपापले तोंड उघडले आणि सम्पूर्ण चौकांत ते लोकप्रिय गाण घुमूं
लागलं. दुस-या ट्रकने ह्याला साथ दिली आणि तिस-याने पण. तसेच जात राहिले.
रस्त्यावरून जाणारे लोक ह्या ट्रक्सवर नजर टाकायचे आणि निघून जायचे. त्यांना वाटलं, की ही कदाचित एखादी
पिकनिक पार्टी आहे, जी शहराच्या बाहेर जातेय. खरं म्हणजे ते शहराच्या बाहेरंच जात
होते,
पण
पिकनिकवर जात नसून प्रोफेसर स्त्राविन्स्कीच्या मनोरुग्णालयांत.
अर्ध्या तासानंतर पूर्णपणे
मतिहीन अकाउन्टेन्ट मनोरंजन ऑफिसच्या वित्तीय शाखेत पोहोचला, ह्या आशेने की
सरकारी रकमेपासून त्याला मुक्ति मिळेल.
आधीच्या अनुभवावरून बरंच
काही शिकून अत्यंत सतर्कतेने त्याने त्या लांबोळ्या हॉलमधे डोकावून पाहिलं, जिथे सोनेरी अक्षर
असलेल्या मातकट काचांच्यामागे कर्मचारी बसले होते. इथे अकाउन्टेन्टला कोणत्याही
प्रकारच्या गडबडीचे लक्षण नाही दिसले.
एका अनुशासित ऑफिससारखंच
वातावरण होतं.
वसीलि स्तेपानोविचने त्या
खिडकींत डोकं घुसवलं, जिच्यावर लिहिलं होतं ‘धनराशी जमा करा’, आणि तिथे बसलेल्या अपरिचित कर्मचा-याचं
अभिवादन करून त्याने पैसे जमा करण्याचा फॉर्म मागितला.
“तुम्हांला कां पाहिजे?” खिडकीवाल्या
कर्मचा-याने विचारलं.
अकाउन्टेन्ट गोंधळला.
“मला रक्कम जमा करायचीय, मी वेराइटीतून
आलोय.”
“एक मिनिट,” कर्मचा-याने उत्तर
दिलं आणि लगेच जाळीने खिडकींत असलेलं भोक बंद करून टाकलं.
“कमाल आहे!” अकाउन्टेन्टने
विचार केला. त्याला आश्चर्य वाटणं स्वाभाविकंच होतं. जीवनांत पहिल्यांदाच त्याचा
समोर अशी परिस्थिती उद्भवली होती. सगळ्यांनाच माहितीये कि पैसे घेणं किती कठीण
आहे: हज्जार विघ्न येऊं शकतात.
शेवटी जाळी उघडली. आणि अकाउन्टेन्ट
खिडकीकडे बघूं लागला.
“तुमच्याकडे काय खूप मोठी
रकम आहे?”
कर्मचा-याने
विचारलं.
“एकवीस हजार सातशे अकरा
रूबल्स.”
“ओहो!” कर्मचारी न जाणे कां
उपहासाने म्हणाला आणि त्याने अकाउन्टेन्टकडे हिरवा फॉर्म सरकावला. अकाउन्टेन्टला
हा फॉर्म चांगलाच माहीत होता. त्याने लवकरंच तो भरला आणि बैगेंत ठेवलेल्या पैकेटची
दोरी सोडू लागला. जेव्हां त्याने पैकेट उघडलं, त्याक्षणीच त्याच्या
डोळ्यांसमोर पूर्ण खोली गरगर फिरू लागली. त्याची तब्येत बिघडली. तो पीडेने बरळूं
लागला.
त्याच्यासमोर परदेशी नोट
फडकंत होते,
ह्यांत
होते : कैनेडियन डॉलर्स, ब्रिटिश पौण्ड्स, हॉलैण्दचे गुल्देन, लात्वियाचे लाट्स, एस्तोनियाचे
क्रोन...
“हा तोच आहे, वेराइटीच्या
शैतानांपैकी एक” – मूक झालेल्या अकाउन्टेन्टच्या डोक्यावर जाडा-भसाडा आवाज घुमला.
आणि वसीलि स्तेपानोविचला त्याचक्षणी अटक झाली.
********
अठरा
दुर्दैवी पाहुणे
अगदी त्याच वेळेस, जेव्हा मेहनती
अकाउन्टेन्ट टैक्सीने निघून लिहिणा-या सूटशी जाऊन भिडणार होता, कीएवहून मॉस्कोला
येणा-या ट्रेनच्या आरामशीर, स्लीपर कोच नम्बर 9 मधून अन्य प्रवाश्यांबरोबर हातांत
एक लहानशी फाइबरची सूटकेस घेऊन मॉस्को स्टेशनवर एक सज्जन प्रवासी उतरला. हा
प्रवासी दुसरा-तिसरा कुणी नसून स्वर्गवासी बेर्लिओज़चा मामा, कीएवच्या भूतपूर्व
इन्स्टीट्यूट रोडवर राहणारा अर्थशास्त्री-नियोजक, मैक्समिलियन अन्द्रेयेविच
पप्लाव्स्की होता. मैक्समिलियन अन्द्रेयेविचच्या मॉस्कोला येण्याचं कारण तो
टेलिग्राम होता,
जो
त्याला परवा संध्याकाळी मिळाला होता आणि ज्याच्यांत लिहिलं होतं:
“मला
आत्ता-इतक्यांतच ट्रामगाडीने चिरडलंय पत्रियार्शी जवळ. अंतिम संस्कार शुक्रवारी
दुपारी तीन वाजता येऊन जा – बेर्लिओज़”
मैक्समिलियन
कीएवच्या हुशार लोकांपैकी एक समजला जायचा, आणि तो खरोखरंच हुशार होता.
पण अत्यन्त हुशार माणूसपण हा टेलिग्राम वाचून बुचकळ्यांतच पडेल. जर एखादा माणूस
स्वतःच तार पाठवतोय, की त्याला ट्रामगाडीने चिरडलंय, तर ह्याचा अर्थ असा झाला की
तो जीवन्त आहे. पण मग अंतिम संस्कार कशाला? किंवा त्याची परिस्थिति इतकी
खराब आहे,
की
त्याला आपल्या मृत्युची पूर्व सूचना मिळाली आहे? हे शक्य आहे, पण वेळेबद्दलची
माहिती विचित्र आहे : त्याला कसं कळलं की त्याचा अंतिम संस्कार शुक्रवारी दुपारी
तीन वाजता करण्यांत येणारे? फार विचित्र टेलिग्राम आहे!
पण हुशार माणसांना
अश्यासाठीच हुशार म्हणतांत, की ते गुंतागुंतीच्या परिस्थितीलासुद्धा सोडवतांत.
अगदी सोपंय. चूक झालेली आहे आणि त्यामुळे अर्थ बदललाय. हा शब्द ‘मला’ बेर्लिओज़च्या जागेवर
कोणच्यातरी दुस-या टेलिग्राममधून आलेला आहे, जो ह्या वाक्याच्या शेवटी ‘बेर्लिओज़’ झालेला आहे. अश्या
प्रकारे वाचल्याने टेलिग्रामचा निरोप स्पष्ट होत होता, पण तो दुर्दैवी होता.
बायकोला स्तब्ध
करणा-या दुःखाची तीव्रता किंचित कमी झाल्यावर मैक्समिलियन अन्द्रेयेविच लगेच
मॉस्कोला जाण्याची तयारी करूं लागला.
मैक्समिलियन अन्द्रेयेविचचं
एक गुपित सांगावंच लागेल. ह्यांत काही शंकाच नाही, की त्याला आपल्या बायकोच्या
ह्या भाच्याच्या असमय आणि अचानक मृत्यूचं खूप दुःख झालं होतं. पण एक व्यावहारिक
व्यक्ति असल्यामुळे त्याला कळंत होतं, की अंतिम संस्कारांत त्याचं हजर राहणं आवश्यक
नव्हतं. तरीसुद्धा मैक्समिलियन अन्द्रेयेविचला लवकरंच मॉस्कोला पोहोचायचं होतं.
कारण काय होतं?
कारण
एकंच होतं – फ्लैट! मॉस्कोत फ्लैट? ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती. माहीत नाही कां
मैक्समिलियन अन्नद्रेयेविचला कीएव आवडंत नव्हतं1 आणि मॉस्कोला जाऊन
राहण्याचा विचार त्याला काही दिवसांपासून इतका सतावंत होता, की त्याची रात्रीची
झोप उडाली होती. आता त्याला वसन्त ऋतूत द्नेप्रला येत असलेला पूर उल्हासित करंत
नव्हता,
जेव्हां
खालच्या बेटांना बुडवंत ती क्षितिजाशी एकरूप होऊन जायची. आता त्याला प्रिन्स
व्लादीमिरच्या स्मारकापासून सुरू होणारं प्राकृतिक दृश्य बघून आनंद होत नव्हता. व्लादीमिर पहाडावर
जाणा-या विटांच्या रस्त्यावर वसन्त ऋतूत नाचणारे उन्हाचे ठिपके बघून तो खूश नव्हता
होत. ह्या सगळ्याचा त्याला कंटाळ आला होता, त्याला फक्त एकंच गोष्ट हवी
होती – मॉस्कोला स्थित्यंतर करणं.
त्याने इन्स्टीट्यूट रोडच्या
आपल्या फ्लैटला मॉस्कोच्या एखाद्या छोट्या फ्लैटशी बदलण्यासाठी वर्तमान पत्रांत
जाहिराती दिल्या, पण काही परिणाम नाही झाला. असल्या प्रस्तावासाठी कोणीही तयार
नव्हतं आणि समजा चुकून कुणी भेटला, तरी त्याची मागणी खूपंच विचित्र असायची.
ह्या टेलिग्रामने
मैक्समिलियन अन्द्रेयेविचला चकितंच केलं. हा तो क्षण होता, ज्याला गमावणं अक्षम्य ठरलं
असतं. व्यावहारिक लोकांना कळतं की असे अवसर घडी-घडी येत नसतात.
थोडक्यांत म्हणजे, कोणत्याही
भानगडीशिवाय मॉस्कोच्या भाच्याचा सादोवाया स्ट्रीटवर असलेला फ्लैट वारसाहक्काने
मिळवतां येणार होता. हो, हे गुंतागुंतीचं होतं, फारंच गुंतागुंतीचं, पण कसंही करून हा
गुंता सोडवायचांच होता. अनुभवी मैक्समिलियन अन्द्रेयेविचला माहीत होतं, की ह्या दिशेने
पहिलं आणि अनिवार्य पाऊल होतं : लवकरांत लवकर, कसंही करून, मृत भाच्याच्या तीन खोल्यांच्या
फ्लैटमधे जाऊन थांबणं आणि तिथे आपलं नाव नोंदवणं, भले ही थोड्याच काळासाठी कां
नसो.
शुक्रवारी दुपारी
मैक्समिलियन अन्द्रेयेविच सादोवायाच्या बिल्डिंग नंबर 302च्या त्या खोलीत शिरला, जिथे हाउसिंग
कमिटीचं ऑफिस होतं.
एका चिंचोळ्या खोलींत, जिच्या भिंतीवर
नदींत बुडालेल्या व्यक्तींना कसं पुनर्जीवित करता येईल, हे चित्रांच्या माध्यमाने
दाखवणारा एक जुना चार्ट लटकंत होता – लाकडी टेबलामागे उत्तेजित डोळ्यांने
इकडे-तिकडे बघंत असलेला, दाढी वाढवलेला, मध्यम वयाचा एक माणूस अगदी
एकटा बसला होता.
“मी कमिटीच्या प्रमुखाला
भेटू शकतो कां?”
अर्थशास्त्री-नियोजकाने
आपली सूटकेस जवळच्याच खुर्चीवर ठेवून, हैट काढंत अत्यंत सभ्यतेने विचारलं.
असं वाटलं, की ह्या साधारण
प्रश्नाने त्या माणसाला खूप उद्विग्न केलंय. त्याचा चेहरा विवर्ण झाला. उत्तेजनेने
डोळ्यांच्या कोप-यांतून इकडे-तिकडे बघंत तो पुटपुटला की प्रमुख नाहीये.
“तो काय आपल्या फ्लैटमधे आहे?” पप्लाव्स्कीने विचारलं, “मला जरूरी काम आहे.”
बसलेल्या माणसाने पुन्हां
विसंगत उत्तर दिलं. पण तरीही हे कळंत होतं, की प्रमुख आपल्या घरी
नाहीये.
“केव्हां येणार आहे?”
ह्या प्रश्नाचं त्या बसलेल्या
माणसाने काहींच उत्तर नाही दिलं आणि डोळ्यांत दुःखाचा भाव आणंत तो खिडकीच्या बाहेर
पाहूं लागला.
“ओ हो!” चतुर असलेल्या
पप्लाव्स्कीने स्वतःशीच म्हटलं आणि तो सेक्रेटरीबद्दल विचारूं लागला.
मानसिक तणावामुले त्या
माणसाचा चेहरा लाल झाला. त्याने पुन्हां मरतुकड्या आवाजांत सांगितलं, की सेक्रेटरी सुद्धा
नाही...सेक्रेटरी आजारी आहे...”
“ओह हो!” पप्लाव्स्कीने
पुन्हां स्वतःशीच म्हटलं आणि विचारलं, “पण कमिटीत कोणी तरी असेलंच ना?”
“ मी आहे,” अशक्त आवाजांत त्या
माणसाने म्हटलं.
“बघा,” पप्लाव्स्कीने जोर
देत म्हटलं,
“मी आपल्या
भाच्याचा,
मृत
बेर्लिओज़चा,
एकुलता
एक वारस आहे. जसं तुम्हाला माहीत आहे, तो पत्रियार्शीजवळ मरून गेला, आणि नियमांप्रमाणे
मला त्याच्या फ्लैट, जो तुमच्या ह्या बिल्डिंगमधे 50 नंबरवर आहे, वारसाहक्काने
मिळायला पाहिजे...”
“मला काहीच माहीत नाही, मित्रा,” त्याला मधेच टोकंत
तो माणूस अत्यंत वेदनेने म्हणाला.
“पण, माफ करा,” खणखणीत आवाजांत
पप्लाव्स्की म्हणाला, “तुम्ही हाउसिंग कमिटीचे सदस्य आहांत, आणि तुमचं कर्तव्य...”
तेवढ्यांत खोलीत एक माणूस
घुसला. त्याला बघतांच टेबलाच्या मागे बसलेल्या माणसाच्या चेहरा फिक्का पडला.
“तुम्ही कमिटीचे सदस्य
पित्नाझ्को आहांत?’
“हो,” मुश्किलीने ऐकू आलं.
येणा-याने त्या माणसाच्या
कानांत काहीतरी सांगितलं, ज्याने तो घाबरून खुर्चीवरून उठला आणि काहीच क्षणांत
त्या रिकाम्या खोलीत पप्लाव्स्की एकटाच उरला.
‘ओह, काय कटकट आहे! हे
जरूरी होतं का,
की ते
सगळेच्या सगळे एकदमंच...,’ पप्लाव्स्की निराश होऊन विचार करू लागला आणि तो
सिमेन्टचं अंगण पार करून फ्लैट नं. 50कडे धावला.
अर्थशास्त्री-नियोजकाने
घण्टी वाजवल्याबरोबर दार उघडलं आणी मैक्समिलियन अन्द्रेयेविच अंधा-या प्रवेश-कक्षांत
घुसला. त्याला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की दार कुणी उघडलं? प्रवेश-कक्षांत फक्त
एका जाड्या-जुड्या बोक्या शिवाय, जो एका खुर्चीवर बसला होता, दुसरं कुणीही नव्हतं.
मैक्समिलियन अन्द्रेयेविचने
खोकलून पायांचा आवाज केला, तेव्हां कुठे स्टडी रूमच दार उघडलं आणि करोव्येव
बाहेर आला. मैक्समिलियन अन्द्रेयेविचने आपल्या गरिमेप्रमाणे वाकून त्याचं अभिवादन
केलं आणि म्हणाला, “माझ नाव पप्लाव्स्की आहे. मी मामा...”
त्याने आपलं वाक्य पूर्ण
सुद्धां केल नव्हतं, की करोव्येवने खिशांतून घाणेरडा रुमाल काढला, त्यांत नाकासकट आपला
चेहरा लपवला आणि रडायला लागला.
“...मृतक बेर्लिओज़चा...”
“काय म्हणता, काय म्हणता,” करोव्येव रुमाल दूर
करून त्याला टोकंत म्हणाला, “तुम्हांला बघितल्याबरोबर मी समजलो, की तुम्हीं तेच
आहांत!” त्याचा चेहरा अश्रूंनी भिजला आणि तो बारीक आवाजांत ओरडंत राहिला, “कित्ती मोट्ठं दुःख
आहे नं?
हे
सगळं काय होतंय?
आँ?”
“ट्रामगाडीने चिरडून टाकलं?” पप्लाव्स्कीने
फुसफुसंत विचारलं.
“अगदी पूर्ण चकनाचूर करून
टाकलं,”
करोव्येव
ओरडला आणी त्याच्या चष्म्याच्या खालून अश्रूंची धार वाहू लागली, “अगदी आर-पार झाली.
मी तर तिथेच होतो, विश्वास ठेवा – खट्! डोकं तिकडे! उजवा पाय – टक् दोन भाग! डावा –
टक् दोन भागांत! असं करतांत ह्या ट्रामगाड्या!” जास्त सहन करूं शकला नाही
करोव्येव! तो आरसा लावलेल्या भिंतीत नाक खुपसून हुंदके देत थरथरू लागला.
बेर्लिओज़चा मामा ह्या
अपरिचित माणसाच्या अश्या वागण्याने क्षुब्ध झाला. ‘असं म्हणतांत की ह्या काळांत
सहृदय व्यक्ती नसतात!’ असा विचार करता-करता त्याच्या डोळ्यातूनसुद्धां धार वाहू लागली.
पण लगेच मनांत संशयाचं वादळ उठलं, एक दुष्ट विचार त्याच्या मनाला डसू लागला, की कुठे हा
संवेदनशील प्राणी बेर्लिओज़च्या घरांत घुसून हा फ्लैट गिळंकृत करण्याच्या विचारांत
तर नाहीये ना,
कारण
की अश्या घटना पण झालेल्या आहेत.
“माफ करा, तुम्ही काय माझ्या
स्वर्गीय मीशाचे मित्र होते?” त्याने बाहीने आपला कोरडा डावा डोळा पुसंत विचारलं, उजव्या डोळ्याने तो
दुःखाने पछाडलेल्या करोव्येवच्या चेह-याचे भाव वाचायचा प्रयत्न करंत होता. पण तो
इतक्या जो-याने रडंत होता की “टक्क दोन तुकडे!” सोडून काही समजतंच नव्ह्तं. बराचं वेळ रडून
झाल्यावर शेवटी करोव्येव भिंतीपासून दूर झाला आणि म्हणाला, “नाही, आणखी सहन नाही करूं
शकंत! जाऊन वलेरीनचे तीनशे थेंब घेतो!” आणि पप्लाव्स्कीकडे आपला रडका चेहरा करून
म्हणाला,
“अश्या
असतांत ह्या ट्रामगाड्या!”
“माफ़ करा, मला टेलिग्राम
तुम्हीं पाठवला होता?” हा रडका माणूस कोण असूं शकतो, ह्या जटिल कोड्यावर डोकं
खपवंत मैक्समिलियन अन्द्रेयेविचने विचारलं.
“त्याने!” करोव्येवने
बोक्याकडे बोट दाखवंत म्हटलं.
पप्लाव्स्कीचे डोळे
विस्फारले. त्याला वाटलं, की त्याच्या ऐकण्यांत काही तरी चूक झालीये.
“नाहीं, आता माझ्यांत हिम्मत
नाहीये,”
नाक
फुरफुरंत करोव्येव बोलत राहिला, “मला सारखं आठवतंय : पायांवर चाक, एक एक चाक दहा-दहा
मणाचे...टक्! जातो, जाऊन झोपण्याचा प्रयत्न करतो, झोप लागली तर विसरून जाईन, आणि तो
प्रवेश-कक्षांतून चालला गेला.
आता बोक्याने हालचाल केली, त्याने खुर्चीवरून उडी
मारली,
मागच्या
पायांवर उभा राहिला, समोरचे पंजे कमरेवर ठेवले आणि आपलं तोंड उघडून म्हणाला, “हो, मीच टेलिग्राम
पाठवला होता,
मग?”
मैक्समिलियन अन्द्रेयेविचचं
डोकं गरगरू लागलं, हात-पाय सुन्न झाले, त्याच्या हातांतून सूटकेस पडली आणि तो
बोक्याच्या समोरच्या खुर्चीवर बसूनंच गेला.
“मी कदाचित रशियनमधेच
विचारतोय,”
बोक्याने
गंभीरतेने म्हटलं, “पुढे काय?”
पण पप्लाव्स्कीने काही उत्तर
नाही दिलं.
“पासपोर्ट!2” बोका
गुरगुरला आणी त्याने आपला गुबगुबीत पंजा पुढे केला.
पप्लाव्स्कीला बोक्याच्या
अंगा-यासारख्या दोन डोळ्यांशिवाय दुसरं काहीही दिसंत नव्हतं. त्याने पट्कन सु-यासारखा खिशातून पासपोर्ट काढून बोक्यासमोर
धरला. बोक्याने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला काळ्या फ्रेमचा चष्मा उचलला, चष्मा लावला, ज्याने तो आणखीनंच
विचित्र दिसूं लागला आणि त्याने हात नाचवंत पप्लाव्स्कीच्या थडथड उडंत असलेल्या
हातातून पासपोर्ट हिसकावून घेतला.
‘विचित्र गोष्ट आहे:
मी बेशुद्ध होऊं की नाही?’ पप्लाव्स्कीने विचार केला. दुरून करोव्येवची हालचाल
ऐकूं येत होती. सगळी खोली वलेरीनच्या वासाने भरून गेली होती, त्यांतच अत्तर आणि
आणखी कोणचातरी मळमळ आणणारा वासपण मिसळून गेला होता.
“हा पासपोर्ट कुणी दिलांय?” बोक्याने वाचंत
विचारलं. उत्तर नाही आलं.
“चारशे बारा नम्बरच्या
ऑफिसने...” उल्ट्या धरलेल्या पासपोर्टवरून हात फिरवंत बोका पुटपुटला, “हो – नक्कीच! मला हे
पासपोर्ट ऑफिस माहितीये! तिथे वाट्टेल त्याला पासपोर्ट देऊन टाकतांत! आणि मी, तुमच्यासारख्याला, नक्कीच पासपोर्ट
नसता दिला! कोणत्याही परिस्थितीत नसता दिला! तुमच्या तोंडाकडे बघतांच एकदम नाही
म्हणालो असतो!” बोक्याला इतका राग आला, की त्याने पासपोर्ट जमिनीवर फेकून दिला.
“अंतिम-संस्काराच्या वेळेस तुमची उपस्थिती निरस्त करण्यांत येत आहे,” बोका ऑफिसरच्या
थाटांत बोलंत राहिला, “जा, आपल्या शहरांत परंत जा!” आणि दाराकडे बघून फिस्कारला, “अजाजेलो!”
त्याने बोलावल्यावर एक
ठेंगणा,
लंगडंत
चालणारा,
काळा
घट्ट कोट घातलेला, कमरेंत बांधलेल्या पट्ट्यांत चाकू खोचलेला, लाल केस असलेला, एक पिवळा सुळा बाहेर
आलेला,
उजव्या
डोळ्यांत फूल पडलेला माणूस प्रवेश कक्षांत आला.
पप्लाव्स्कीचा दम घुटू लागला, तो खुर्चीतून उठला
आणि छातीवर हात ठेवून अडखळला.
“अज़ाज़ेलो, घेऊन जा,” बोक्याने हुकूम दिला
आणि खोलीतून बाहेर निघून गेला.
“पप्लाव्स्की,” आगंतुकाने हळूच
अनुनासिक स्वरांत म्हटलं, “अपेक्षा आहे, की तुम्हांला सगळ समजलंय?”
पप्लाव्स्कीने मान हलवली.
“लगेच कीएवला परंत जा,” अज़ाज़ेलोने आपलं
बोलणं चालू ठेवलं, “तिथे पाण्याहूनही शांत, गवताहूनही लहान होऊन बैस आणि मॉस्कोच्या
कोणत्याही फ्लैटचं स्वप्नसुद्धां पाहू नको, कळलं?”
तो ठेंगणा, ज्याने पप्लाव्स्कीच्या
मनांत आपल्या सुळ्याने, चाकूने आणि वाकड्या डोळ्याने भयानक दहशत भरली होती, अर्थशास्त्रीच्या
फक्त खांद्यापर्यंतच पोहोचंत होता, पण खूप चपळतेने आणि व्यवस्थितपणे हालचाल करंत होता.
सगळ्यांत आधी त्याने
पासपोर्ट उचलून मैक्समिलियन अन्द्रेयेविचच्या हातांत दिला, जो त्याने आपल्या मरतुकड्या
हाताने परंत घेतला. मग अज़ाज़ेलो नावाच्या ह्या माणसाने एका हाताने त्याची सूटकेस
उचलली आणी दुस-या हाताने दार उघडून बेर्लिओज़च्या मामाला हात धरून पाय-यांपर्यंत
घेऊन गेला. पप्लाव्स्की भिंतीला चिटकला. कोणत्याही किल्ली शिवाय अज़ाज़ेलोने सूटकेस
उघडली आणि तिच्यातूंन एक पाय असलेली फ्राइड कोंबडी काढली, जी तेलाने भिजलेल्या कागदांत
बांधलेली होती. त्याने कोंबडी जमिनीवर ठेवली. मग दोन जोडी अंतर्वस्त्र काढले, दाढी करायचा उस्तरा
काढला,
एक
पुस्तक आणि एक चामड्याची ‘केस’ सुद्धां काढली आणि कोंबडीला सोडून बाकी सगळं सामान
पायाने पाय-यांवर ढकलून दिलं, मग रिकामी सूटकेसपण तिथेंच फेकून दिली. तिच्या खाली
पडण्याच्या आवाजावरून कळंत होतं, की तिचं झाकण तुटून वेगळं झालेलं आहे.
मग लाल केसांच्या त्या
सैतानाने कोंबडीला पाय धरून उचललं आणि त्यानेंच पप्लाव्स्कीच्या मानेवर इतक्या
जोराने प्रहार केला की कोंबडीचं शरीर वेगळं झालं आणि पाय अज़ाज़ेलोच्या हातांत
राहिला. “अब्लोन्स्कीच्या घरांत सगळं उलट-पुलंट झालं3,” महान लेखक
टॉल्स्टॉयने अश्या परिस्थितीचं वर्णन करताना लिहिलं होतं. अगदी असंच त्याने आताही
म्हटलं असतं. हो, पलाव्स्कीच्या डोळ्यांसमोर सगळं गड्ड-मड्ड झालं. त्याच्या
डोळ्यांसमोर विजेची एक रेघ चमकली, जिच्या मागे-मागे जणु काळा नाग तरंगंत गेला, ज्याने मेच्या त्या
दुपारी निमिष मात्रासाठी अंधार केला आणि पप्लाव्स्की खाली पाय-यांवर तरंगतंच गेला, हातांत पासपोर्ट
पकडून. पाय-यांच्या वळणावर येता-येता त्याच्या पायाने खिडकीचा काच खणकन् फुटला आणि
तो पायरीवर बसलेला आढळला. त्याच्याच बरोबर तरंगत होती ती बिनपायाची कोंबडी, जी आणखी पुढे निघून
गेली आणि पाय-यांच्या खोलांत पडली. वर थांबलेल्या अज़ाज़ेलोने कोंबडीचा पाय स्वच्छ
करून आपल्या खिशांत टाकला, मग तो फ्लैटमधे परंत चालला गेला आणि दार धाड्कन बंद
झालं. ह्याच वेळेस खालून सतर्क पावलांचा आवाज ऐकू आला.
आणखी एक मजला खाली धावल्यावर
पप्लाव्स्की तिथेंच पडलेल्या लाकडी बेंचवर बसला आणि तेव्हां कुठे त्याने श्वास
घेतला.
एक मध्यम उंचीचा माणूस, खूपंच विचित्रसा, दुर्मुखलेल्या चेह-याचा, टसरचा जुना सूट
घातलेला,
हिरवी
रिबिन लावलेली कडक हैट घालून पाय-या चढंत होता. पप्लाव्स्कीला बघून तो त्याच्याजवळ
थांबला.
“महाशय, कृपा करून सांगा, की फ्लैट नं. 50
कुठे आहे,”
त्या
माणसाने दुःखी आवाजांत विचारलं.
“वर,” पप्लाव्स्कीने पट्कन उत्तर
दिलं.
“खूप खूप धन्यवाद, महाशय,” तसल्यांच निराश
आवाजांत सांगून तो माणूस वर चढला, आणि पप्लाव्स्की उठला आणि धावंत खाली जाऊ लागला.
आता प्रश्न हा उद्भवतो, की मैक्सिमिलियन
अन्द्रेयेविच काय पोलिस स्टेशनवर रिपोर्ट करण्यासाठी जात होता, की त्याच्यावर दिवसा
ढवळ्या हल्ला झालेला आहे? नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो.
पोलिस स्टेशनवर जाऊन हे सांगणं की चश्मा लावलेल्या बोक्याने त्याचं पासपोर्ट वाचलं
आणि मग घट्ट कोट घातलेल्या माणसाने चाकूने...नाही, मित्रांनो, मैक्समिलियन खरोखरंच
समजदार माणूस होता.
आत्ता पर्यंत तो खाली
पोहोचला होता. त्याच्या अगदी समोर होता गोडाउनच्या आत जाण्याचं दार. ह्या दाराचा
काच तुटलेला होता. पप्लाव्स्कीलने पासपोर्ट खिशांत लपवलं आणि वरून फेकलेल्या
आपल्या वस्तू सापडतील, ह्या आशेने इकडे तिकडे बघू लागला. पण त्यांचं कुठे नामोनिशान
नव्हतं. पप्लाव्स्कीला स्वतःवरंच
आश्चर्यदेखील झालं, की त्याला हरवलेल्या वस्तूंच दुःख कां नाही होत आहे. आता त्याच्या
डोक्यांत एक वेगळाच मनोरंजक आणि लुभावणारा विचार ठाण मांडून बसला होता: ह्या
दुस-या व्यक्तीवर त्या फ्लैटमधे काय होईल? बरोबरंच आहे : ज्या अर्थी
त्याने विचारलं होतं, की तो फ्लैट कुठे आहे, त्या अर्थी असा अर्थ निघतो, की तो तिथे
पहिल्यांदा चाललाय. कदाचित तो त्या चाण्डाल-चौकडीच्या हातांत पडणारेय, जी फ्लैट नं. 50मधे
घुसून गेली होती. पप्लाव्स्कीला वाटंत होतं, की तो माणूस लवकरंच तिथून
बाहेर निघेल. कोणत्याच भाच्याच्या कोणच्याही अंतिम संस्कारांत जाण्याबद्दल आता
मैक्समिलियन अन्द्रेयेविच विचारसुद्धां करंत नव्हता आणि कीएवला जाणारी गाडी
सुटायला अजून बरांच अवकाश होता. अर्थशास्त्री इकडे-तिकडे बघून गोडाउनमधे घुसून गेला.
तेवढ्यांत दूर,
वरून, दार बंद व्हायचा
आवाज आला. ‘आता तो आत घुसला!’ पप्लाव्स्कीच्या
हृदयाची धडधड क्षणभारासाठी जणू एकदम थांबली. गोडाउनमधे बराच गारठा होता. उंदरांचा
आणि जोड्यांचा घाण वास येत होता. मैक्समिलियन अन्द्रेयेविच लाकडाच्या एका
ओंडक्यावर बसून वाट पाहू लागला. ही जागा अगदी बरोबर होती, इथून सहाव्या सेक्शनचं दार
दिसंत होतं.
पण कीएवच्या माणसाला
अपेक्षेपेक्षा जास्त वाट बघावी लागली. पाय-या न जाणे कां रिकाम्या होत्या. आरामांत
सगळं ऐकू येत होतं. शेवटी पाचव्या मजल्याचं दार धाड्कन बंद झालं. पप्लाव्स्कीच्या
हृदयाची धडधड थांबली. ‘हो, त्याच्या पायांचा आवाज आहे. खाली येतोय.’ ह्या फ्लैटच्या अगदी
खाली असलेल्या चौथ्या मजल्यावरच्या फ्लैटचं दार उघडलं. पावलांचा आवाज थांबला. एका
बाईचा आवाज...दुःखी व्यक्तीचा आवाज...हो, हा त्याचाचं आवाज आहे...कदाचित असं काहीसं
म्हणंत होता,
“सोड, येशू
ख्रिस्तासाठी...” पप्लाव्स्कीचा कान तुटलेल्या काचेला चिटकला. ह्या कानाने ऐकला
एका बाईच्या हसण्याचा आवाज, लवकर-लवकर खाली येणा-या पावलांचा निडर आवाज; आणि त्या बाईच्या
पाठीची झलक दिसली. हातांत रेक्ज़िनचा हिरवा पर्स धरून ती बाई मुख्य दारांतून निघून
अंगणांत गेली आणि त्या व्यक्तीच्या पावलांचा आवाज पुन्हां येऊ लागला. “आश्चर्य
आहे. तो परंत फ्लैटमधे चाललाय. कुठे तोसुद्धा ह्या चौकडीतलाच तर नाही? हो, परंत जातोय. पुन्हा
वरचं दार उघडलं,
आणखी
वाट पाहूं या...”
ह्यावेळेस थोडी कमी वाट
बघावी लागली. दाराचा आवाज. पावलांची चाहूल. पावलांचा आवाज थांबला. एक घाबरलेली
किंचाळी. मांजरीची म्याऊ-म्याऊ. चाहूल लवकर-लवकर, थांबत-थांबत, खाली, खाली, खाली!
पप्लाव्स्कीचं ध्येय पूर्ण
झालं. घडी-घडी क्रॉसच चिन्ह बनवंत आणि काही-काही पुटपुटंत तो दुर्दैवी माणूस जणु
उडतंच आला,
बिन
टोपीचा,
चेह-यावर
वेडेपणाचा भाव,
टकल्या
डोक्यावर खरचटल्याच्या खुणा आणि पैन्ट पूर्ण ओली. तो घाबरून बाहेरच्या दाराचं
हैण्डल फिरवू लागला, भीतिमुळे हे सुद्धां विसरला की दार बाहेरच्या बाजूला उघडतं की
आतल्या बाजूला. शेवटी दार उघडलंच आणि तो बाहेर, अंगणाच्या उन्हांत उडंत आला.
तर, फ्लैटचा तपास पूर्ण झाला
होता,
आपल्या
मृत भाच्याबद्दल, त्याच्या फ्लैटबद्दल जराही विचार न करतां मैक्समिलियन
अन्द्रेयेविच त्या धोक्याबद्दल विचार करून थरथरू लागला, जो त्याच्यावर आला असता. तो
फक्त : “समजलं! सगळं समजलं!” येवढंच बडबडंत बाहेर कम्पाउण्डमधे पळाला. काही
मिनिटांनी एक ट्रॉली-बस अर्थशास्त्री-नियोजकाला कीएवला जाणा-या रेल्वे स्टेशनकडे
घेऊन गेली.
जोपर्यंत अर्थशास्त्री खाली
गोडाउनमधे बसला होता, त्या ठेंगण्या माणसाबरोबर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तो ठेंगणा
माणूस वेराइटीमधे रेस्टॉरेन्ट चालवायचा आणि त्याचं नाव होतं अन्द्रेइ फोकिच सोकव.
जोपर्यंत वेराइटीत विचारपूस होत होती, अन्द्रेइ फोकिच त्या सगळ्या पासून दूरंच
राहिला,
फक्त
एक गोष्ट विचार करण्यासारखी होती, ती अशी, की तो नेहमीपेक्षां जास्तंच दुःखी दिसू लागल
आणि त्याने पत्रवाहक कार्पोवला हे पण विचारलं की तो जादुगार कुठे थांबलाय.
अश्या प्रकारे, अर्थशास्त्रीला
विचारून रेस्टॉरेन्टवाला पाचव्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने फ्लैट नं, 50ची घंटी वाजवली.
दार लगेच उघडलं, पण थोडसं थरथरंत, थोडसं अडखळंत
रेस्टॉरेन्टवाला लगेच आत नाही घुसला. गोष्टंच तशी होती. दार उघडणारी एक मुलगी होती
– जिने लेसच्या एप्रनशिवाय आणखी काहीच घातलं नव्हतं, डोक्यावर पांढरा टोप होता.
हो,
पायांत
सोनेरी जोडे होते. मुलीची शरीरयष्टी, तिचे नाकडोळे चांगले होते, फक्त एक गोष्ट खटकंत
होती,
तिच्या
मानेवर एक लालसर जखमेची खूण होती
“घण्टी वाजवलीच आहे तर या!”
मुलीने रेस्टॉरेन्टवाल्यावर आपले हिरवंट, निर्लज्ज डोळे रोखून म्हटलं.
अन्द्रेइ फोकिचचं तोंड उघडंच
राहिलं,
तो
डोळ्यांची उघडझाप करंत, टोपी काढून प्रवेश-कक्षांत आला. इतक्यात तिथे ठेवलेला
टेलिफोन खणखणला. ती निर्लज्ज मोलकरीण एक पाय खुर्चीवर ठेवून टेलिफोनचा रिसीवर
उचलून म्हणाली,
“हैलो!”
रेस्टॉरेन्टवाल्याला कळंत
नव्हतं,
की
आपली दृष्टी कुठे फिरवावी, एका पायावरून दुस-या पायावर आपलं शरीर हलवंत तो विचार
करंत होता:
‘काय मोलकरीण
आहे ह्या परदेश्याची! छिः, कित्ती किळसवाणी!’ आणि ह्या किळसवाण्या वस्तूपासून
स्वतःला वाचविण्यासाठी तो इकडे-तिकडे बघू लागला.
हा मोठा, किंचित अंधारा
प्रवेश कक्ष विचित्र-विचित्र वस्तूंनी आणि कपड्यांनी भरलेला होता. खुर्चीच्या
पाठीवर लाल लाइनिंग असलेला एक दफन-झगा होता. ड्रेसिंग टेबलाच्या
छोट्याश्या स्टूलवर सोनेरी मुठेची एक लाम्ब तलवार ठेवली होती. चांदीच्या मुठी
असलेल्या तीन तलवारी कोप-यांत एखाद्या छतरी किंवा छडी सारख्या उभ्या होत्या आणि रेन्डियरच्या
शिंगांवर गरुडाचे पंख असलेले शिरस्त्राण टांगलेले होते.
“हो,” मोलकरीण फोनवर बोलंत होती, “काय? सामंत मायकेल? ऐकतेय. हो! कलाकार
महोदय आज घरीच आहेत. हो, तुम्हांला भेटून त्यांना आनंद होईल. हो, पाहुणे...चोगा किंवा
काळा कोट. काय?
रात्री
बारा वाजता.” बोलणं संपवून तिने रिसीवर जागेवर ठेवला आणि रेस्टॉरेन्टवाल्याकडे वळली, “तुम्हीं कां आलांत?”
“मला नागरिक कलाकाराला
भेटायचे आहे.”
“काय? खुद्द त्यांना?”
“हो, त्यांनाच,” रेस्टॉरेन्टवाल्याने
रडक्या आवाजांत म्हटलं.
“विचारते,” मुलगी बुचकळ्यांत
पडून म्हणाली आणि मृत बेर्लिओज़च्या खोलीचं दार थोडंसं उघडून म्हणाली, “सरदार, एक ठेंगणा माणूस
आलाय,
जो
म्हणतोय की त्याला महोदयांना भेटायचंय.”
“येऊं दे,” खोलीच्या आतून
करोव्येवचा फाटका आवाज़ आला.
“जा, ड्राइंगरूममधे चालले जा,” मुलीने इतक्या सहज
म्हटलं,
जणु
तिने पूर्ण कपडे घातलेयंत, आणि ड्राइंगरूमचं दार उघडून प्रवेश कक्षांतून बाहेर
निघून गेली.
तिथे जाताना, जिथे जायला त्याला
सांग़ितलं होतं,
हॉटेलवाला
आपल्या कामाबद्दल विसरूनंच गेला, इतकं आश्चर्य त्याला ही खोली बघून झालं.
मोट्ठ्या-मोट्ठ्या खिडक्यांच्या रंगीत काचांमधून (ही होती कोणताही मागमूस न ठेवतां
हरवलेल्या जवाहि-याच्या बायकोची कल्पना) खोलीत एक विचित्र-सा प्रकाश येत होता, जो साधारणपणे चर्च
मधल्या प्रकाशासारखा होता. जुन्या भव्य शेकोटींत वसंत ऋतूचा गरम दिवस असून सुद्धा
आग जळंत होती. पण तरीही खोलीत जरा सुद्धां गरम नव्हतं वाटंत, उलट आगंतुकाला
कबरेंत असल्यासारख्या गारठ्याने आणि थंडीने वेढून घेतलं. शेकोटीसमोर वाघाच्या
कातड्यावर प्रेमाने ज्वाळांकडे बघंत काळा बोका बसला होता. एक टेबलसुद्धां होतं, ज्याच्यावर नज़र
पडतांच देवभीरू रेस्टॉरेन्टवाला थरथरला. टेबलावर चर्चमधे असलेले किमखाब होते.
किमखाबावर ढेरपोट्या, बुरशी लागलेल्या आणि धुळीने माखलेल्या अनेक बाटल्या पडल्या
होत्या. बाटल्यांच्या मधे एक प्लेट होती जिला बघतांक्षणींच कळंत होतं की ती ख-या
सोन्याची आहे. शेकोटीजवळ ठेंग़णा, लाल केस असलेला, कमरेत चाकू खोचलेला माणूस
स्टीलच्या लांब तलवारीवर टोचून मांसाचे तुकडे भाजंत होता, आणि आगीत त्याचा रस
थेंब-थेंब करंत पडंत होता आणि चिमणीतून धूर बाहेर निघंत होता. खोलींत भाजंत
असलेल्या मांसाचाच नाही तर आणखीही कोणचातरी सुगंध पसरला होता, अत्तर आणि लोभानचा
मिश्रित सुगंध,
ज्यामुळे
रेस्टॉरेन्टवाल्याच्या (ज्याने वर्तमान पत्रांत बेर्लिओज़च्या दुर्दैवी मृत्यु आणि
त्याच्या राहण्याच्या जागेबद्दल वाचलं होतं) मनांत एक विचार आला की कुठे
बेर्लिओज़साठी चर्चमधे करण्यांत येणारी पनिखीदा4 सर्विस इथेंच तर नाही
करण्यांत आली,
पण
ह्या विचाराला विसंगत समजून त्याने डोक्यांतून काढून टाकलं.
थक्क झालेल्या
रेस्टॉरेन्टवाल्याला अचानक एक भारी-भरकम आवाज ऐकू आला, “बोला, मी तुमच्यासाठी काय
करू शकतो?”
आता रेस्टॉरेन्टवाल्याने
अंधारांत बसलेल्या त्याला ओळखलं, ज्याची त्याला गरंज होती.
काळ्या जादूचा विशेषज्ञ एका
खूप मोठ्या,
कमी
उंचीच्या पलंगावर बसला होता, ज्यावर ब-याच उश्या पडल्या होत्या. रेस्टॉरेन्टवाल्याला
असं वाटलं की त्या कलाकाराच्या अंगावर फक्त काळे अंतर्वस्त्र आणि काळे टोकदार
जोडेच होते.
“मी,” रडक्या आवाजांत
रेस्टॉरेन्टवाला म्हणाला, “वेराइटी थियेटरच्या रेस्टॉरेन्टचा प्रमुख आहे...”
कलाकाराने बहुमूल्य
खड्यांच्या अंगठ्या असलेला आपला हात पुढे केला, जणु त्याला
रेस्टॉरेन्टवाल्याचं तोंड बंद करायचंय, आणि उत्तेजित होत म्हणाला, “नाही, नाही, नाही! पुढे एकही
शब्द नाही! कोणत्याच परिस्थितीत आणि कधीच नाही! तुमच्या रेस्टॉरेन्टचा एकही पदार्थ
मी तोंडांत ठेवूं शकंत नाही! काल, आदरणीय महोदय, मी तुमच्या काउंटरच्या जवळून
गेलो होतो आणि आतापर्यंत ना तर तिथली स्टर्जन विसरूं शकलोय, ना ही मेंढीच्या
दुधाचं ‘चीज़’! माझ्या लाडक्या! चीज़
हिरव्या रंगाचं नसतं, तुम्हांला कोणी तरी बुद्धू बनवलंय. ते तर पांढरं असायला पाहिजे. आणि, हो, चहा? बस गटाराचं पाणी! मी
स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की एका गबाळ्या मुलीने बादलीभर पाणी तुमच्या समोवारमधे
ओतलं,
जेव्हां
की समोवार चहा देतंच होते. नाहीं, लाडक्या, हे अशक्य आहे!”
“माफ करा...” अचानक झालेल्या
ह्या हल्ल्याने चकित होऊन अन्द्रेइ फोकिच म्हणाला, “मी ह्या कामासाठी नाही आलो, आणि स्टर्जनचं इथे
काही काम नाहीये...”
“काम कसं नाहीये, जर ती सडलेली असेल
तर?”
“स्टर्जन दुस-या श्रेणीच्या
ताजेपणाची पाठवली होती,” रेस्टॉरेन्टवाल्याने खुलासा केला.
“माझ्या लाडक्या, हा मूर्खपणा आहे!”
“मूर्खपणा कसा?”
“दुस-या श्रेणीचं ताजेपण –
हाच मूर्खपणा आहे! ताजेपणा बस एकचं असतो – प्रथम श्रेणीचा, तोच अंतिम श्रेणीचा पण
असायला हवा. आणि जर स्टर्जन दुस-या श्रेणीची आहे, तर ह्याचा अर्थ असा झाला, की ती शिळी आहे!”
“मी माफी मागतो,” रेस्टॉरेन्टवाल्याने
पुन्हां बोलायचा प्रयत्न केला. त्याला कळंत नव्हतं की ह्या हल्ल्याला कसं
थांबवावं.
“तुम्हांला माफी नाही मिळू
शकंत,”
त्याने
ठामपणे म्हटलं.
“मी ह्या कामासाठी नव्हतो
आलो!” एकदम वैतागून रेस्टॉरेन्टवाल्याने म्हटलं.
“ह्या कामासाठी नाही?” परदेशी जादुगाराला
खूप आश्चर्य झालं, “तर मग अशी कोणची गोष्ट असू शकते, जिने तुम्हांला माझ्यापर्यंत
खेचून आणलंय?
जर मी
विसरलो नाहीये,
तर
तुमच्या व्यवसायाशी संबंधित मी फक्त एकाच महिलेला ओळखत होतो, ते पण फार-फार
पूर्वी,
जेव्हां
तुम्हीं ह्या जगांत आलेसुद्धां नव्हते. चला, ठीकाय, मला आनंद झाला.
अजाजेलो! रेसटॉरेन्ट प्रमुखाला बसण्यासाठी स्टूल सरकंव.”
मांस भाजंत असलेल्या माणसाने
आपल्या सुळ्याने रेस्टॉरेन्टवाल्याला घाबरवंत हळूच ओकवृक्षाचं एक स्टूल
त्याच्याकडे सरकवलं. बसण्यासाठी खोलीत दुसरं काही नव्हतंच.
रेस्टॉरेन्टवाल्याने म्हटलं, “खूप आभारी आहे,” आणि तो स्टूलवर
बसला.
बसताक्षणीच स्टूलचा मागचा
पाय चर्रर् र्... करंत लगेच तुटला आणि रेस्टॉरेन्टवाला विव्हळंत अत्यंत पीडेने
धप्पकन् फरशीवर आदळला. पडता-पडता त्याच्या दुस-या पायाने दुस-या स्टूलला धक्का
दिला,
जो
त्याच्या समोर ठेवलेला होता आणि त्याच्या पैण्टवर रेड वाइनचा पूर्ण ग्लास सांडला
जो त्या स्टूलवर ठेवला होता.
कलाकार उद्गारला, “ओह! तुम्हांला लागलं
तर नाही?”
अज़ाज़ेलोने
रेस्टॉरेन्टवाल्याला उठण्यास मदत केली आणि त्याला बसायला आणखी एक स्टूल दिला.
रेस्टॉरेन्टवाल्याने दुःखी आवाजांत पैण्ट काढून तिला शेकोटीसमोर वाळवण्याचा
यजमानाचा सल्ला नाकारला आणि अत्यंत अस्वस्थपणे ओल्या कपड्यांत दुस-या स्टूलवर
संभाळून बसला.
“मला खाली बसायला आवडतं,” कलाकाराने बोलायला
सुरुवात केली,
“अश्या
खालच्या जागेवरून पडायची तेवढी भीति नसते. हो, तर आपण स्टर्जनवर थांबलो
होतो?
माझ्या
लाडक्या! ताज़ं,
ताज़ं
आणि ताज़ं...हेच प्रत्येक हॉटेलवाल्याचं ध्येय असलं पाहिजे. हो, घ्या, स्वाद बघा...”
लगेच शेकोटीच्या लाल उजेडात
रेस्टॉरेन्टवाल्यासमोर तलवार चमकली, आणि अज़ाज़ेलोने सोन्याच्या प्लेटमधे वाफ़ निघत असलेला
मांसाचा तुकडा ठेवला, त्यावर लिंबाचा रस पिळला, आणि दोन दात असलेला सोन्याचा
फोर्क ठेवून प्लेट रेस्टॉरेन्टवाल्यासमोर केली.
“आभारी आहे...मी...”
“नाही, नाही, खा.”
रेस्टॉरेन्टवाल्याने
शिष्ठाचारवश तुकडा तोंडात टाकला आणि त्याला लगेच कळलं, की तो खरोखरंच एका खूपंच ताज्या
आणि फारंच स्वादिष्ट पदार्थाचा स्वाद घेतोय. पण तो रसाळ, सुगंधित मांसाचा तुकडा चोखता-चोखता
रेस्टॉरेन्टवाला पुन्हां एकदा पडता-पडता वाचला. बाजूच्या खोलीतून एक मोट्ठा काळा
पक्षी उडंत आला आणि रेस्टॉरेन्टवाल्याच्या टकल्या डोक्याला आपल्या पंखाने दाबून
निघून गेला. ‘अरे देवा!’ घाबरंट, जसे सगळेच हॉटेलवाले
असतात,
अन्द्रेइ
फोकिच ने विचार केला...’काय फ्लैट आहे!’
“वाइनचा एक पैग? पांढरी, लाल? दिवसाच्या ह्या
वेळेस तुम्हांला कोणच्या देशाची वाइन घ्यायला आवडेल?”
“आभारी आहे...मी...”
“ मूर्खपणा! तर मग फाशांचा
खेळ खेळू या?
की
तुम्हांला दुसरा कोणचा खेळ आवडतो? दमीनो, पत्ते?”
“खेळंत नाही,” रेस्टॉरेन्टवाला आता
थकला होता.
“वाईट गोष्ट आहे,” यजमान बोलणं संपवंत
म्हणाला,
“ठीकाय, तुमची मर्जी, पण असे माणसं अत्यंत
धूर्त असतात जे दारू, जुगार, सुंदर महिलांची संगत आणि जेवताना वार्तालाप करण्यापासून
स्वतःला दूर ठेवतात. असे लोकं या तर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असतात, किंवा आजूबाजूच्या
लोकांशी घृणा करतात. हे पण खरं आहे, की ह्याला अपवाद असूं शकतात. कधी-कधी तर माझ्या बरोबर
उत्सवाच्या टेबलाशी अत्यंत धूर्त लोक बसलेले असायचे!...तर, सांगा तुमचं काय काम आहे?”
“काल तुम्हीं बरेंच चमत्कार
दाखवलेत...”
“मी?” जादुगार आश्चर्याने म्हणाला, “दया करा. मी तर असलं
काही करंत नसतो!”
“चूक झाली,” रेस्टॉरेन्टवाल्याने
लगेच म्हटलं,
“हो, तो काळ्या जादूचा
खेळ...”
“हो, ओह, हो, हो! माझ्या लाडक्या, मी तुला खरी गोष्ट
सांगून टाकतो: मी काही कलाकार-बिलाकार नाहीये. मला तर फक्त मॉस्कोवासियांना एकत्र
बघायचं होतं आणि ह्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे थियेटरंच होती. हे बघा, माझ्या
सहयोग्याने...” त्याने बोक्याकडे खूण करंत म्हटलं, “सगळा तमाशा आयोजित केला होता, मी तर फक्त
बसल्या-बसल्या मॉस्कोवासियांना बघत होतो. पण असे त्रस्त नका होऊं, आणि मला सांगा, की त्या ‘शो’ची अशी कोणती गोष्ट
होती,
जिच्यासाठी
तुम्हीं इथे आले?”
“जर तुम्हीं बघितलं असतं, की ‘शो’च्या दरम्यान छतातून
कागद उडून खाली येत होते,” रेस्टॉरेन्टवाल्याने आपला आवाज़ खाली करून, घाबरून इकडे-तिकडे
बघितलं,
“ – आणि
त्यांना सगळ्यांनी उचलून घेतलं, मग एक तरुण माझ्याकडे रेस्टॉरेन्टमधे आला, मला दहा रूबल्सची एक
नोट दिली आणि मी त्याला चिल्लर परंत केली...साडे आठ रूबल्स...मग दुसरा आला.”
“तरुण?”
“नाही, मोठा माणूस, मग तिसरा, चौथा...मी सगळ्यांना
चिल्लर देत होतो. आणि आज, जेव्हां आपला कैश-बॉक्स बघू लागलो, तर काय पाहतो –
नोटांच्या ऐवजी होते कागदांचे तुकडे! रेस्टॉरेन्टला एकशे नऊ रूबल्सचा भुरदण्ड
बसला.”
“ओय, ओय, ओय!” जादुगाराने सहानुभूति
दाखवली,
“त्यांना
काय खरे नोट वाटले? मला विश्वास आहे की त्यांनी मुद्दाम तसं नसेल केलं.”
रेस्टॉरेन्टवाल्याने दुःखी
चेहरा करून वाकड्या डोळ्यांने इकडे-तिकडे पाहिलं, पण बोलला काहीच नाही.
“ते बदमाश होते कां?” जादुगाराने
उत्सुकतेने पाहुण्याला विचारलं, “मॉस्कोवासियांमधे बदमाशसुद्धां आहेत कां?”
ह्या प्रश्नाच्या उत्तरांत
रेस्टॉरेन्टवाला इतक्या कटुतेने हसला की काही शंकाच नाही उरली : हो, मॉस्कोत बदमाशसुद्धा
आहेत.
“खूप नीचतेची गोष्ट आहे!”
वोलान्द उत्तेजित होऊन म्हणाला, “तुम्हीं एक गरीब व्यक्ति आहांत... तुम्ही काय – खरंच
गरीब आहांत?’
रेस्टॉरेन्टवाल्याने मान
झुकवली,
स्पष्ट
होतं की तो गरीब आहे.
“तुमच्याकडे किती पैसा आहे?”
प्रश्न खूपंच सहृदयतेने विचारलेला
होता,
पण
होता तर असभ्यंच. रेस्टॉरेन्टवाला संकोचला.
“दोनशे एकोणपन्नास हजार
रूबल्स,
बैंकेच्या
पाच खात्यांत,”
बाजूच्या
खोलीतून चिरचिरा आवाज आला., “आणि घरांत फरशी खाली दहा-दहा रूबल्सच्या दोनशे स्वर्ण
मुद्रा आहेत.”
रेस्टॉरेन्टवाला आपल्या
स्टूलवर जणु चिटकून गेला.
“ही तर काही मोठी रकम नाहीये,” वोलान्दने
सहनुभूतीने आपल्या पाहुण्याला म्हटलं, “तसं पाहिलं तर तुम्हाला तिची गरजही नाहीये.
तुम्हीं केव्हां मरणार आहे?”
आता तर रेस्टॉरेन्टवाला
काळजीत पडला.
“हे ना तर कोणाला माहीत आहे
आणि ना ही कोणाचा ह्याच्याशी संबंध आहे.”
“हो, कोणालांच माहीत नाहीये,” तोच घृणित आवाज
खोलीतून ऐकू आला, “विचार कर, न्यूटनची बाइनोमियल थ्योरम! हा ठीक नऊ महिन्यांनी पुढच्या
फेब्रुवारीत लिवरच्या कैन्सरने फर्स्ट मॉस्को युनिवर्सिटीच्या हॉस्पिटलच्या चौथ्या
नंबरच्या वार्ड मधे मरेल.”
रेस्टॉरेन्टवाल्याचा चेहरा
पिवळा पडला.
“नऊ महीने,” वोलान्दने विचारांत
पडंत म्हटलं,
“दोनशे
एकोणपन्नास...ह्याचा अर्थ झाला, की दर महिन्यांत सुमारे सत्तावीस हजार? थोडे कमीच आहे, पण साध्या-सुध्या
जगण्यासाठी भरपूर आहेत. शिवाय ह्या स्वर्ण मुद्रा सुद्धां आहेत ना.”
“...सोन्याच्या नाण्यांचा
काहीही उपयोग होणार नाहीये,” पुन्हां तोच आवाज आला, ज्याने रेस्टॉरेन्टवाल्याची
छाती बर्फासारखी गार पडली, “अंद्रेइ फोकिचच्या मृत्युनंतर लवकरंच ती बिल्डिंग
पाडली जाईल आणि स्वर्ण मुद्रा सरकारी बैंकेत जमा होतील.”
“मी तर तुम्हांला दवाखान्यांत
भरती व्हायचा सल्ला नाही देणार,” कलाकार पुढे म्हणाला, “वार्डमधल्या आशाहीन
आजा-यांचे विव्हळणे, ओरडणे ऐकंत मरण्यांत काही अर्थ नाहीये. ह्या सत्तावीस हजारांनी
उत्सव कां न साजरा करावा आणि मग विष पिऊन ‘दुस-या लोकांत’ वास्तव्य करावं, संगीताच्या मधुर
स्वर लहरी ऐकंत,
मदमस्त
सुंदर मुली आणि साहसी मित्रांच्या गराड्यांत?”
रेस्टॉरेन्टवाला स्तब्ध बसून
राहिला आणि जणू एकदम म्हातारा झाला. त्याच्या डोळ्यांच्या चारीकडे काळे वर्तुळं
पडले,
गाल
खोल गेले आणि खालचा जबडा लटकून गेला.
“आपण तर कल्पनेंत हरवलो,” यजमान उद्गारला, “कामाबद्दल बोलूं या.
तुमच्याकडे आहेत का ते कागदाचे तुकडे? दाखवा.”
रेस्टॉरेन्टवाल्याने क्षुब्ध
होत खिशांतून कागदांत बांधलेली गड्डी काढली आणि तिला उघडतांच जणु दगड झाला, तिथे खरोखरंच
दहा-दहाचे नोट होते.
“माझ्या लाडक्या, तू खरोखरंच आजारी
आहे,”
वोलान्दने
खांदे उचकावंत म्हटलं.
रेस्टॉरेन्टवाला भयानकपणे
हसंत स्टूलवरून उठला.
“आणि,” तो पुन्हां चीं-चीं
करू लागला,”
आणि जर
ते पुन्हां...”
“हूँ,” कलाकार विचार करू
लागला,
“तर
पुन्हां आमच्याकडे या. कृपा होईल! तुम्हांला भेटून खूप आनंद झाला.”
तेवढ्यांत करोव्येव त्या
खोलीतून उडी मारून बाहेर आला, तो रेस्टॉरेन्टवाल्याचा हात पकडून आवेशाने हलवू लागला
आणि घडी-घडी अन्द्रेइ फोकिचला सांगू लागला, की त्यांच्या तर्फे
सगळ्यांना नमस्कार सांगावा. रेस्टॉरेन्टवाला काहीही न समजता प्रवेश कक्षाकडे जाऊ
लागला.
“हैला, सोडून ये!” करोव्येव
किंचाळला.
पुन्हां तीच निर्लज्ज लाल
केस असलेली वस्त्रहीन मुलगी प्रवेश कक्षांत होती. रेस्टॉरेन्टवाला स्वतःला आक्रसून
घेत दारातून निघाला, तो पुटपुटला, “गुडबाय!” आणि दारुड्यासारखा चालू लागला. थोडा खाली
गेल्यावर तो थांबला, पाय-यांवर बसून गेला, कागदांत बांधलेले नोट काढून बघू लागला, ते सुरक्षित होते.
तेवढ्यांत ह्या मजल्यावर
असलेल्या फ्लैटच्या दारातून हिरवा पर्स घेतलेली बाई निघाली.
पाय-यांवर बसून नोटांकडे
बघंत असलेल्या ह्या माणसाकडे बघून तिने स्मित केलं आणि म्हणाली, “आमची पण काय
बिल्डिंग आहे! हा सकाळी-सकाळी पिऊन बसलाय...पाय-यांचा काच पुन्हां फुटला आहे,”
लक्षपूर्वक रेस्टॉरेन्टवाल्याकडे
बघंत ती पुढे म्हणाली, “हे, तुझे नोट अण्डे तर नाही न देणारेय! थोडेशे मलाचं दिले असते! आँ?”
“मला सोड, येशू साठी,” रेस्टॉरेन्टवाला
घाबरून पैसे लपवूं लागला. ती बाई खो-खो करंत हसंत सुटली, “तुला केसाळ सैतान घेऊन जावो!
मी तर गंमत करंत होते...” आणि ती खाली चालली गेली.
रेस्टॉरेन्टवाला हळू-हळू
उठला. आपली हैट नीट करण्यासाठी त्याने हात वर नेला. तेव्हांच त्याला कळलं की
डोक्यावर हैटंच नाहीये. परंत तिथेंच जायच्या विचाराने त्याला धडकी भरली, पण हैटसाठी दुःख होत
होतं. थोडा विचार करून तो परंत गेला आणि त्याने घण्टी वाजवली.
“आता आणखी काय पाहिजे?” त्या दुष्ट हैलाने
विचारलं.
“मी आपली हैट विसरलो...”
रेस्टॉरेन्टवाला आपल्या टकल्या डोक्यांत बोटं गडवंत कुजबुजला. हैला वळली.
रेस्टॉरेन्टवाला कल्पनेंत तिच्यावर थुंकला आणि त्याने डोळे बंद केले. जेव्हां
त्याने डोळे उघडले तेव्हां हैलाने त्याला त्याची हैट आणि काळ्या मुठीची तलवार
दिली.
“ही माझी नाहीये,” तो तलवार दूर करंत
आणि पट्कन हैट घालंत पुटपुटला.
“तुम्हीं काय बिना तलवारीचे
आले होते?”
हैलाला
आश्चर्य वाटलं.
रेस्टॉरेन्टवाला काहीतरी
कुजबुजंत लगेच खाली धावला. माहीत नाही कां, त्याच्या डोक्याला विचित्रसा
भास होत होता आणि हैट मधे खूप गरम वाटंत होतं; त्याने हैट काढली आणि भीतीने
उडी मारून हळूंच किंचाळला. त्याच्या हातांत मखमली टोप होता, कोंबडीच्या
घाणेरड्या पंखांने सजवलेला. रेस्टॉरेन्टवाल्याने क्रॉसची खूण बनवली. तेवढ्यातंच ते
मखमल म्याऊँ-म्याऊँ करू लागलं, छोट्याश्या काळ्या पिल्लांत परिवर्तित झालं आणि
पुन्हां अंद्रेइ फोकिचच्या डोक्यावर उडीमारून त्याच्या टकलाला आपल्या नखांनी खरचटू
लागलं. रानटीपणाने किंचाळंत रेस्टॉरेन्टवाला खाली पळूं लागला आणि मांजरीचं पिल्लू
त्याच्या डोक्यावरून पडून वर पळालं.
मोकळ्या हवेंत आल्यावर
रेस्टॉरेन्टवाला तीरासारखा मुख्य द्वाराकडे लपकला आणि त्याने नेहमीसाठी त्या
सैतानी फ्लैट नंबर 302ला राम-राम ठोकला.
सगळ्यांना माहितीये की त्याच्यासोबत
पुढे काय घडलं. कोप-यावर पोहोचून त्याने रानटीपणाने इकडे-तिकडे पाहिलं, जणु काही तरी
शोधतोय. एक मिनिटानंतर तो रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या औषधाच्या दुकानांत
होता. जसंच त्याने विचारलं, “कृपा करून मला हे सांगा...” – तशीच काउन्टरच्या मागे
उभी असलेली मुलगी ओरडली, “नागरिक! तुमचं तर सम्पूर्ण डोकं खरचटलंय!...”
पाच मिनिटांत
रेस्टॉरेन्टवाल्याचं डोकं बैण्डेजमधे बांधलं गेलं. त्याने माहिती काढली की
लिवरच्या रोगांचे सगळ्यांत जास्त मानलेले विशेषज्ञ आहेत प्रोफेसर बर्नार्ड्स्की
आणि कूज़्मिन. त्यांच्यापैकी जवळ कोण आहे, हे विचारल्यावर माहीत झालं की कूज़्मिन, बस एक घर सोडून
असलेल्या छोट्याश्या पांढ-या बंगल्यांत राहतो. तो आनंदाने वेडांच झाला आणि दोनंच
मिनिटांत तो त्या बंगल्यांत होता. हे घर फार जुनं होतं, पण खूप खूप आरामशीर होतं.
रेस्टॉरेन्टवाल्याला आठवलं की पहिले त्याची गाठ पडली एका म्हाता-या आयाशी, जिने त्याची हैट
घेण्यासाठी हात पुढे केला, पण हैट नव्हतीच, म्हणून नर्स तोंड हलवंत कुठे
तरी निघून गेली.
तिच्या जागेवर कमानीच्या
खाली,
आरश्याजवळ
एक मध्यम वयाची महिला दिसली, जिने लगेच म्हटलं की डॉक्टरकडे एकोणीस तारखेच्या आधी
वेळ नाहीये. रेस्टॉरेन्टवाल्याने पट्कन ठरवलं की काय करायला हवं. विझंत असलेल्या
नजरेने त्यानी कमानीच्या पलिकडे पाहिलं, जिथे एका प्रवेश-कक्षासारख्या खोलींत तीन
माणसं वाट पाहात होते आणि तो कुजबुजला:
“मी मरणाच्या दारांत आहे...”
त्या महिलेने अविश्वासाने रेस्टॉरेन्टवाल्याच्या
पट्ट्या बांधलेल्या डोक्याकडे पाहिलं आणि किंचित बिचकंत म्हणाली, “ओह, असं आहे...” आणि
तिने त्याला कमानीच्या पुढे जाऊ दिलं.
इतक्यांत समोरचं दार उघडलं
आणि त्यांत सोनेरी फ्रेमचा चष्मा चमकला, एप्रन घातलेली महिला म्हणाली, “नागरिक हो, हा पेशन्ट आधी
जाईल.”
रेस्टॉरेन्टवाला इकडे तिकडे
बघूं सुद्धां नाही शकला, की तो कूज़्मिन समोर आढळला. ह्या लांबट खोलीत कोणतीच
भयानक,
विचित्र
आणि दवाखान्यासारखी गोष्ट नव्हती.
“काय झालंय?” गोड आवाजांत कूज़्मिनने
विचारलं आणि उत्सुकतेने पट्ट्या बांधलेल्या डोक्याकडे बघू लागला.
“आत्ताच विश्वसनीय लोकांकडून
ऐकून आलोय,”
रेस्टॉरेन्टवाल्याने
रानटीपणाने भिंतीवर लावलेल्या एका ग्रुप फोटोकडे बघंत म्हटलं, “की येत्या
फेब्रुवारीत मी लिवरच्या कैन्सरने मरणार आहे. विनंती करतो की हे थांबवा!”
प्रोफेसर कूज़्मिन जसा बसला
होता,
तसांच
खुर्चीच्या आरामशीर पाठीला टेकला.
“माफ करा, मला समजंत नाहीये...
तुम्ही...डॉक्टरकडे गेले होते? तुमच्या डोक्याला पट्ट्या कां बांधल्या आहेत?”
“कसला डॉक्टर? कुठला डॉक्टर?...जर तुम्ही त्या
डॉक्टरला बघितलं असतं!” त्याने दातांची किटकिट केली, “डोक्याकडे लक्ष नका देऊ, त्याचा इथे काही संबंध
नाहीये,”
रेस्टॉरेन्टवाल्याने
उत्तर दिलं,
“डोक्यावर
थुंका,
त्याची
इथे गरज नाहीये. लिवरचा कैन्सर, थांबवा, प्लीज़!”
“पण हे तुम्हाला कोणी सांग़ितलं?”
“त्याच्यावर विश्वास ठेवा,” रेस्टॉरेन्टवाला
वैतागून म्हणाला, “त्याला माहीत आहे!”
“मला काहीही कळंत नाहीये,” खांदे उचकावंत
डॉक्टरने आपली खुर्ची टेबलापासून दूर सरकवली, आणि म्हणाला, “त्याला कसं कळलं की
तुम्ही केव्हां मरणार आहे? विशेषकरून, तेव्हां, जेव्हां तो डॉक्टर नाहीये?”
“चार नम्बरच्या वार्ड मधे,” रेस्टॉरेन्टवाला
म्हणाला.
आता प्रोफेसरने आपल्या
पेशन्टकडे पाहिलं, त्याच्या डोक्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओल्या पैण्टकडे बघंत
विचार करू लागला, “ह्यांचीच कमी होती! पागल!” त्याने विचारलं, “तुम्हीं वोद्का पीता
नं?”
“मी तिला कधी हातसुद्धां
लावला नाहीये,”
रेस्टॉरेन्टवाल्याने
उत्तर दिलं.
एका मिनिटानंतर तो
बिनकपड्यांचा,
थंडगार
रेक्ज़िन लावलेल्या लांब टेबलवर पडला होता, आणि डॉक्टर त्याचं पोट दाबंत
होता. सांगावं लागेल की रेस्टॉरेन्टवाला बरांच खूश झाला. प्रोफेसरने ठामपणे
सांगितलं की आत्ता, कमीत कमी ह्या क्षणाला, रेस्टॉरेन्टवाल्याच्या शरीरांत कैन्सरचं
कोणतंही लक्षण नाहीये, पण जर असं आहे...म्हणजे, जर त्याला आशंका आहे आणि कोण्या वैदूने त्याला
भीति दाखवलीय,
तर
सगळ्या टेस्ट्स करवून घेणं उत्तम होईल...प्रोफेसरने एका चिट्ठीवर काहीतरी लिहिलं, हे समजावण्यासाठी की
कुठे जावं लागेल, काय न्यावं लागेल. शिवाय आणखीही एक चिट्ठी लिहिली प्रोफेसर बूरेला
जो न्यूरोपैथोलोजिस्ट होता. रेस्टॉरेन्टवाल्याला सांगण्यांत आलं की त्याची मानसिक
अवस्था खूप बिघडलेली आहे.
“तुम्हांला किती द्यायचे, प्रोफेसर?” हळुवार आणि थरथरत्या
आवाजांत रेस्टॉरेन्टवाल्याने आपल्या खिशांतून नोटांचं पैकेट काढंत विचारलं.
“तुम्हाला वाटतील तेवढे,” प्रोफेसर रुक्षतेने
उत्तर दिलं.
रेस्टॉरेन्टवाल्याने तीस
रूबल्स काढून टेबलावर ठेवले, मग अप्रत्याशितपणे, जणू मांजरासारख्या हातांची
हालचाल करंत त्यांच्या वर खणखणीत नाण्यांचा वर्तमान पत्रांत गुंडाळलेला ढेर ठेवून
दिला.
“हे काय आहे?” कूज़्मिनने मिशांवर
ताव देत विचारलं.
“संकोच नका करू, नागरिक प्रोफेसर,” रेस्टॉरेन्टवाला
कुजबुजला,
“तुम्हाला
विनंती करतो – कैन्सरला थांबवून द्या!”
“लगेच आपलं सोनं उचला,” प्रोफेसरने
स्वाभिमानपूर्वक म्हटलं, “तुम्हीं आपल्या डोक्याकडे लक्ष द्या, ते जास्त चांगल होईल.
उद्यांच यूरिन-टेस्ट करवून घ्या, जास्त चहा नका पिऊ आणि मीठ बिल्कुल नका खाऊ.”
“सूपमधे सुद्धां नाही?” रेस्टॉरेन्टवाल्याने
विचारलं.
“कशातंच नाही,” कूज़्मिनने हुकूम
दिला.
“ए..ख...” रेस्टॉरेन्टवाला
निराशेने उद्गारला, प्रेमाने प्रोफेसरकडे बघंत त्याने सोन्याची नाणी उचलली आणि न
वळतां मागे दाराकडे सरकू लागला.
त्या दिवशी प्रोफेसरकडे
जास्त पेशन्ट्स नव्हते आणि संध्याकाळ पर्यंट शेवटचा पेशन्टसुद्धां चालला गेला.
एप्रन काढताना प्रोफेसरने तिकडे बघितलं जिथे रेस्टॉरेन्टवाला नोट ठेवून गेला होता, आणि बघतो काय, की तिथे एकही नोट
नाहीये,
उलट ‘अब्राऊ दूर्सो’ वाइनचे तीन लेबल्स
पडले आहेत.
“सैतान जाणे हा काय प्रकार
आहे!” एप्रनचा कोपरा ज़मीनीला लावंत कागदाच्या तुकड्यांना हातात घेत कूज़्मिन बडबडला
– “तो फक्त पागलंच नव्हता, पण बदमाशसुद्धां होता! पण मला समजंत नाहीये, की त्याला
माझ्याकडून कशाची अपेक्षा होती? यूरिन-टेस्ट साठी सिफारिश पत्र? ओह! तो माझा ओवरकोट
घेऊन गेला!” तसाच एका हातांत एप्रन घातलेला तो बाहेरून प्रवेश कक्षाकडे गेला आणि
ओरडला,
“क्सेनिया
निकितीश्ना! बघा, सगळे ओवरकोट सुरक्षित आहेत ना?”
त्याला कळलं की सगळे ओवरकोट
सुरक्षित आहेत.
पण
जेव्हां प्रोफेसर एप्रन काढून परंत टेबलाजवळ आला तर त्याची नजर थबकली आणि तो
पुतळ्यासारखा झाला. त्या जागेवर, जिथे बाटलीचे लेबल्स पडलेले होते, एक लहानसं काळं, घाणेरडं मांजरीच
पिल्लू समोर पडलेल्या प्लेट मधून दूध पीत होतं.
“हे काय आहे, काही कळेल का? हे तर...” त्याला
जाणीव होत होती की डोकं गार पडंत चाललय.
प्रोफेसरची हल्की आणि असहाय
किंचाळी ऐकून क्सेनिया निकितीश्ना धावंत आली आणि त्याला सांत्वना देऊ लागली, असं सांगून की
कदाचित कोणीतरी पेशन्ट मांजरीचं पिल्लू सोडून गेलाय, प्रोफेसरांकडे बरेचदां असं
होतं.
“कदाचित गरीब असेल,” क्सेनिया
निकितीश्नाने समजावलं, “आणि आपल्याकडे नक्कीच...”
ते विचार करूं लागले की ह्या
पिल्लाला कोणी फेकून दिलं असेल. दोघांना पोटांत अल्सर असलेल्या म्हातारीचा संशय
आला.
“नक्की, तीच,” क्सेनिया
निकितीश्नाने म्हटलं, “ तिने असा विचार केला असेल, की मला तर मरायचंच आहे, आणि तिला मांजराच्या
पिल्लावर दया आली असेल.”
“पण, विचार करा,” कूज़्मिन ओरडला, “मग दूध! तेसुद्धां
बरोबर आणलं?
प्लेटपण?”
“तिने पाकिटांत दूध आणलं
असेल,
इथे
येऊन प्लेटमधे टाकून दिलं,” क्सेनिया निकितीश्नाने समजावलं.
“काहीही कारण कां न असो, ह्या मांजराच्या
पिल्लाला आणि प्लेटला इथून काढा,” कूज़्मिनने म्हटलं आणि तो क्सेनिया निकितीश्नाबरोबर
दारापर्यंत आला. जेव्हां परंत आला तर चित्र अगदीच बदललेलं होतं.
खुंटीवर एप्रन टांगताना, प्रोफेसरने हसण्याचा
आवाज ऐकला;
त्याने
बाहेर बघितलं,
आणि स्पष्ट
आहे,
दगडासारखा
झाला. अंगणांत फक्त शर्ट घातलेली एक बाई समोरच्या वराण्ड्याकडे पळंत होती.
प्रोफेसरला माहीत होतं, की ती मारिया अलेक्सान्द्रोव्ना होती. खिदळण्याचा
आवाज एका तरुणाचा होता.
“काय आहे हे?” कूज़्मिनने
तिटका-याने म्हटलं.
तेवढ्यंत भिंतीच्या मागे, प्रोफेसरच्या
मुलीच्या खोलींत पियानोवर ‘अलिलुय्या...’ गाणं वाजू लागलं, आणि प्रोफेसरच्या
पाठीमागे चिमणीची किलबिल ऐकूं आली. तो वळला, आणि बघतो काय, की टेबलवर एक लट्ठ
चिमणी फुदकंत होती.
‘हूँ...चुपचाप...’ प्रोफेसरने विचार
केला,
‘जेव्हां
मी खिडकीपासून दूर झालो, तेव्हां ही उडून खोलीत आलीय. सगळं ठीक आहे,’ प्रोफेसरने स्वतःला
समजावलं,
पण
त्याला वाटंत होतं, की सगळं ठीक नाहीये. सगळंच गडबड आहे, ह्याच चिमणीमुळे. तिच्याकडे
लक्ष देऊन बघताना प्रोफेसरला वाटलं की ही साधारण चिमणी नाहीये. ती दुष्ट चिमणी
डाव्या पायावर वाकून पडंत होती, पंखांची फडफड करंत होती, मान वळवंत होती – म्हणजे
पियानोवरच्या गाण्यावर फॉक्सट्रॉट करंत होती, जणु दारूच्या गुत्त्यांत
कुणी दारुडा असतो. शक्य तेवढी बदमाशी करंत होती, निलाजरेपणाने प्रोफेसरकडे
बघंत डोळा मारंत होती. कूज़्मिनचा हात टेलिफोनवर पडला आणि तो आपला सहपाठी बूरे
ह्याला फोन करूं लागला, हे विचारायला, की साठ वर्षाच्या वयांत
अश्या चिमण्यांचा काय अर्थ असतो, विशेषकरून तेव्हां, जेव्हां डोकं अचानक गरगरू
लागतं?
येवढ्यांत चिमणी मोट्ठ्या
शाईच्य दौतीवर बसून गेली, जी प्रोफेसरला कुणी तरी भेट दिली होती, त्यांत घाण करून
टाकली (मी गंमत नाही करंत), मग वर उडून हवेंत तरंगली, एका झटक्यांत सन् 1894मधे
युनिवर्सिटीहून निघालेल्या स्नातकांच्या ग्रुप फोटोवर आपल्या, जणू लोखंडासारख्या
चोचेने प्रहार केला. फोटोचा काच अगदी चूर-चूर झाला आणि मग ती खिडकीच्या बाहेर उडून
गेली. प्रोफेसरने टेलिफोनचा नंबर बदलून दिला आणि बूरेच्या ऐवजी ‘जळू-ब्यूरो’5ला फोन करून सांगून
टाकलं,
“मी
प्रोफेसर कूज़्मिन बोलतोय. माझ्या घरी लगेच जळू पाठवून द्या.”
रिसीवर ठेवून जसांच तो मागे
वळला,
प्रोफेसरला
पुन्हां धक्काच बसला. टेबलाच्या मागे नर्ससारखा स्कार्फ़ डोक्यावर बांधलेली एक
महिला हातांत बैग घेऊन बसली होती, जिच्यावर लिहिलं होतं, ‘जळू’. तिच्या तोंडाकडे बघतांच
प्रोफेसर किंचाळला. तो एका पुरुषाचा चेहरा होता, वाकडा, तोंडातून निघून
कानापर्यंत जाणारा एक दात होता. त्या महिलेचे डोळे निर्जीव होते.
“हे पैशे मी ठेवून घेते,” पुरुषी आवाजांत ती
नर्स म्हणाली,
“इथे
पडून राहण्यांत काही अर्थ नाही”. मग तिने पक्ष्यांसारख्या हाताने ते लेबल्स उचलून
घेतले आणि हवेंत विलीन होऊं लागली.
दोन घण्टे झाले, प्रोफेसर आपल्या
शयन-कक्षांत पलंगावर बसला होता. त्याच्या भुवयांवर, कानांच्या मागे, मानेवर जळू चिकटले
होते. कूज़्मिनच्या पायांजवळ, जे जाड्या रेशमी ब्लैंकेटखाली होते म्हातारा, पांढ-या मिश्या
असलेला प्रोफेसर बूरे बसला होता. तो अत्यंत सहानुभूतिने कूज़्मिनकडे बघंत होता आणि
त्याला धीर देत होता, की हा सगळा निव्वळ मूर्खपणा आहे. खिडकीतून रात्र डोकावंत होती.
मॉस्कोत त्या रात्री आणखी
काय-काय विचित्र आणि भयानक घटना घडल्या, आम्हांला माहीत नाही आणि आम्हांला माहिती सुद्धां
करून घ्यायची नाही, कारण की आम्हांला ह्या सत्यकथेच्या दुस-या भागांत जायचंय.
माझ्या बरोबर या, वाचकगण!
*********
भाग – 2
एकोणीस
मार्गारीटा
माझ्या मागे, वाचका! तुला कुणी
सांगितलंय की जगांत खरं-खुरं, प्रामाणिक, शाश्वत
प्रेम नाहीये? खोटारड्याची घाणेरडी जीभंच छाटली
जाईल!
माझ्या मागे ये,
माझ्या
वाचका, फक्त माझ्याच मागे,
आणि
मी तुला असं प्रेम दाखवीन!
नाही! मास्टर चुकंत होता,
जेव्हां
तो त्या दिवशी मध्यरात्र उलटून गेल्यावर हॉस्पिटलमधे दुःखाने इवानूश्काला सांगत
होता, की ती त्याला विसरली. हे शक्यंच
नव्हते. ती निश्चितंच त्याला विसरली नव्हती.
आधी तर ते गुपित सांगतो,
जे
मास्टरला इवानूश्कासमोर सांगायची इच्छा नव्हती. त्याच्या प्रेयसीचं नाव होतं
मार्गारीटा निकोलायेव्ना1. मास्टरने गरीब बिचा-या कवीला तिच्या बद्दल
जेपण सांगितलं होतं, ते सगळं खरं होतं. त्याने आपल्या
प्रेयसीच अगदी खरं-खुरं चित्र काढलं होतं. ती सुंदर होती आणि हुशारपण होती. त्याचबरोबर
आणखी एक गोष्टही सांगतो – मी ठामपणे सांगू शकतो, की
अनेक महिला आपलं जीवन मार्गारीटा निकोलायेव्नाच्या जीवनाशी बदलण्यासाठी काहीही
द्यायला तयार झाल्या असत्या. अपत्य नसलेली तीस वर्षांची मार्गारीटा एका प्रख्यात
विशेषज्ञाची बायको होती, ज्याने
शासनासाठी एक खूपंच महत्वपूर्ण शोध लावला होता. तिचा नवरा तरुण,
सुंदर,
सहृदय,
प्रामाणिक
होता आणि आपल्या बायकोचा सम्मान करायचा. मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या
नव-याबरोबर अर्बातच्या जवळ एका गल्लीत एका मोठ्या आलीशान घरांत राहायची. घराच्या
चारीकडे सुरेख बाग होती. मन मोहून घेणारी जागा! जो पण इथे येईल तो हेच म्हणेल.
ज्याला जायचं असेल, त्याने माझ्याकडे यावं,
मी
त्याला पत्ता सांगेन, वाट दाखवेन – ते घर अजूनही शाबूत
आहे.
मार्गारीटा निकोलायेव्नाला
पैशांची गरंज नव्हती. मार्गारीटा निकोलायेव्ना वाट्टेल ते विकंत घेऊं शकंत होती.
तिच्या नव-याच्या परिचितांमधे मजेदार लोक होते. मार्गारीटा निकोलायेव्नाने कधीच
स्टोव्हला हातसुद्धां लावला नव्हता. मार्गारीटा निकोलायेव्नाला कम्युनिटी फ्लैटमधे
राह्ण्याचे धोके माहीत नव्हते. थोडक्यांत...ती सुखी होती कां?
एका
क्षणासाठीही नाही! तेव्हांपासून, जेव्हां
एकोणीस वर्षाच्या वयांत तिचं लग्न झालं आणि ती ह्या घरांत आली,
सुख
म्हणजे काय असतं, हे तिला कळलंच नाही. अरे देवा! ह्या
बाईला काय पाहिजे होतं?! पाहिजे
काय होतं ह्या सुन्दरीला जिच्या डोळ्यांमधे सदा एक अनाकलनीय चमक असायची?
ह्या
भुवनमोहिनीची काय इच्छा होती, जी तिरप्या
नेत्र कटाक्षाने घायाळ करायची आणि वसंत ऋतूंत लाजाळूच्या फुलांनी स्वतःला सजवायची?
कळंत
नाही. मला माहीत नाही. स्पष्ट होतं,
तिने
खरंच सांगितलं होतं. तिला पाहिजे होता तो – मास्टर, भव्य
प्राचीन महाल नाही, स्वतंत्र बगीचा नाही,
पैसे
पण नाही. ती त्याच्यावर प्रेम करंत होती, तिने खरंच
सांगितलं होतं.
मला, खरं
सांगणा-या कथाकाराला, परक्या माणसालासुद्धां ह्या
विचाराने खूप दुःख झालं, की
मार्गारीटाने काय भोगलं असेल, जेव्हां
दुस-या दिवशी ती मास्टरच्या घरी आली (सुदैवाने तिचं आपल्या नव-याशी बोलणं नव्हतं
झालं, कारण की तो ठरलेल्या वेळेवर घरी परतला
नव्हता), काय-काय सहन केलं असेल तिने,
हे माहीत झाल्यावर, की मास्टर गायब झालांय.
तिने त्याच्याबद्दल माहिती
मिळविण्यासाठी सगळं केलं, पण तिला
काहीच कळलं नाही. तेव्हां ती परंत आपल्या आलीशान घरांत परंत आली आणि पूर्वीप्रमाणे
तिथेच राहू लागली.
“हो, हो,
हो,
तीच
चूक!” मार्गारीटाने हिवाळ्यांत शेकोटीजवळ बसून ज्वाळांकडे बघंत म्हटलं,
“त्या रात्री मी त्याच्याकडून परतंच कां आले?
कां?
हा
तर मूर्खपणा आहे! मी वचन दिल्याप्रमाणे दुस-या दिवशी गेले होते,
पण
तोपर्यंत उशीर झाला होता. मी दुर्दैवी लेवी मैथ्यूसारखीच परंत आले,
खूप
उशीरा!
ह्या सगळ्या शब्दांना काही
अर्थ नव्हता, कारण की जर ती खरंच त्या रात्री
मास्टरकडे थांबलीही असती, तर काय
बदललं असतं! ती काय त्याला वाचवूं शकली असती? आम्ही
म्हटलं असतं, मूर्खपणा आहे! पण आम्ही त्या निराश बाईसमोर
असं नाही म्हणणार.
ह्या दुःखांत मार्गारीटाने
सम्पूर्ण हिवाळा घालवला आणि वसन्त ऋतु आला. त्याच दिवशी, शुक्रवारी,
जेव्हां
विचित्र प्रकारचा गोंधळ चालला होता, ज्याच्यामागे
मॉस्कोत आलेल्या काळ्या जादूच्या जादुगाराचा हात होता; जेव्हां
बेर्लिओज़च्या मामाला कीएवला परंत पाठवलेलं होतं, जेव्हां
अकाउन्टेन्टला पकडलं होतं आणि कित्येक वेड्या-वाकड्या, अनाकलनीय
घटना घडल्या होत्या, मार्गारीटा दुपारच्या सुमारास
आपल्या शयन-कक्षांत उठली, जे तिच्या
आलीशान घराच्या बुरूज असलेल्या भागांत होतं.
उठल्यावर मार्गारीटा रडली
नाही, जसं बहुधा व्हायचं;
कारण
की ती ह्या पूर्वाभासाने जागी झाली होती, की आज काही
न काही नक्की होणारेय. ह्या पूर्वाभासाला, हरवूं
न देण्यासाठी, ती त्याला हृदयांत सांभाळंत
गोंजारंत राहिली, दृढ करंत राहिली.
“मला
विश्वास आहे,” मार्गारीटा उत्साहाने कुजबुजली,
“मला पूर्ण विश्वास आहे! काही न काही जरूर होईल! असं होऊंच नाही
शकंत की काहीच नाही होणार, नाही तर
मला इतकं दुःख कां झेलावं लागलं असतं? मला मान्य
आहे की मी खोटं बोलंत होते, धोका देत
होते आणि लोकांपासून लपून एक रहस्यमय जीवन जगंत होते, पण
मला इतकी कठोर शिक्षां तर व्हायला नको...काही न काही तर ज़रूर होणारेय,
कारण
की असं असूच शकंत नाही, की एखादी गोष्ट निरंतर होतंच राहावी. शिवाय,
माझं
स्वप्न खरं होतं, मी ठामपणे सांगू शकते...
उन्हांत चमकणा-या लाल
पडद्यांकडे बघंत, उतावीळपणे कपडे बदलताना आणि तीन
आरशांच्या ड्रेसिंग टेबलासमोर आपले छोटे-छोटे कुरळे केस विंचरंत मार्गारीटा
स्वतःशीच बोलंत होती.
त्या रात्री मार्गारीटाने
पाहिलेलं स्वप्न अद्भुत होतं. गोष्ट अशी होती, की
आपल्या दुःखाने ओथंबलेल्या हिवाळ्याच्या दिवसांत तिने कधीच मास्टरला स्वप्नांत
पाहिलं नव्हतं. रात्री तो तिला सोडून द्यायचा आणि ती फक्त दिवसांच दुःखी व्हायची.
आणि आतां तो स्वप्नांत सुद्धा आला.
मार्गारीटाने स्वप्नांत एक
अनोळखी जागा पाहिली - उदास,
भयाण,
आरंभिक
वसंत ऋतूच्या ढगाळ आकाशाखाली. तिने बघितलं ते तुकड्यांच, उडतं
आकाश आणि त्याच्या खाली चिमण्यांचा मौन थवा. एक ओबंड-धोबंड पुल,
ज्याच्या
खाली लहानशी मातकंट वसंती नदी; उदास,
दयनीय,
अर्धनग्न
झाडं; एकुलतं एक मैपलचं झाड – झाडांच्या
मधे, कोणच्यातरी फेन्सिंगच्या मागे,
लाकडाचं
घर, कदाचित – स्वयंपाकघर होतं,
किंवा
स्नानगृह, सैतानंच जाणे काय होतं ते!
आजूबाजूला सगळं मरगळलेलं, निर्जीवसं
इतकं उदास की पुलाच्या जवळच्या त्या मैपलच्या झाडाला लटकून जावसं वाटावं.
ना
तर वा-याची सळसळ, ना ढगाची सरसर,
ना
ही जीवनाचं एखादं चिन्ह. ही तर नरकासारखी जागा आहे जिवन्त माणसासाठी!
आणि विचार करा,
त्या
लाकडी घराचं दार उघडतं आणि त्यांतून निघाला – तो. बरांच दूर आहे,
पण
तोच होता. स्पष्ट दिसंत होता. कपडे इतके फाटलेले होते, की
कळंत नव्हतं की त्याने काय घातलंय. केस विस्कटलेले, दाढी
वाढलेली. डोळे आजा-यासारखे,
उत्तेजित.
हाताच्या खुणेने तिला बोलावंत होता. त्या निर्जीव वा-यांत तडफडणारी मार्गारीटा उंचसखल
रस्त्यावर त्याच्याकडे धावली, आणि
तेवढ्यांत तिची झोप उघडली.
“ह्या स्वप्नाचा दोन पैकी
एकंच अर्थ असू शकतो,” मार्गारीटा निकोलायेव्ना स्वतःशीच
तर्क करंत होती. “जर तो मेलेला आहे, आणि मला
बोलवतोय, तर ह्याचा अर्थ असा झाला की तो माझ्यासाठी
आलांय आणि मी लवकरंच मरणारेय. हे फार चांगलं होईल, कारण
की तेव्हां माझ्या वेदनेचा अंत होऊन जाईल. जर तो जिवन्त आहे,
तर
ह्या स्वप्नाचा फक्त एकंच अर्थ आहे, तो मला
स्वतःची आठवंण करून देतोय. त्याला म्हणायचंय की आम्ही पुन्हां भेटूं. हो,
आम्ही
भेटूच, फार लवकर.”
ह्याच उद्विग्न अवस्थेत
मार्गारीटाने कपडे बदलले आणि स्वतःला विश्वास देत राहिली की सगळं ठीक-ठाक होणारेय.
आणि अशा संधीचा फायदा घेतला पाहिजे. नवरा पूर्ण तीन दिवसांसाठी दौ-यावर गेलांय. हे
तीन दिवस तिचे स्वतःचे आहेत, कोणीही
तिला कशाहीबद्दल विचार करण्यापासून थांबवू शकणार नाही, त्याच्याबद्दल
जो तिला आवडतो. वरच्या मजल्यावरच्या ह्या पाच खोल्या, हे
पूर्ण घर, ज्याच्याबद्दल मॉस्कोच्या लाखों
लोकांना ईर्ष्या वाटते, तिच्या
पूर्ण ताब्यांत आहेत.
पण तीन दिवसांचे स्वातंत्र्य
मिळाल्यावर मार्गारीटाने ह्या आलीशान फ्लैटमधली सर्वांत चांगली जागा नाही निवडली.
चहा पिऊन झाल्यावर ती एका अंधा-या, खिडक्या
नसलेल्या खोलींत गेली, जिथे सूटकेसेस आणि दोन मोट्ठ्या
अलमा-यांमधे जुनं, रद्दी सामान ठेवलेलं होतं. उकिडवे
बसून तिने पहिल्या अलमारीचा खालचा खण उघडला. रेशमी चिंध्यांच्या ढिगा-यातून तिने
आपल्या जीवनातली एकुलती एक मौल्यवान वस्तू बाहेर काढली. मार्गारीटाच्या
हातांत तपकिरी चामड्याचा एक जुना अल्बम होता, ज्यांत
मास्टरचा फोटो होता, बैंकेचं पासबुक होतं,
ज्यांत
त्याच्या नावावर दहा हजार जमा होते; सिगरेटच्या
चमचमीत कागदांत ठेवलेल्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या,
आणि
टाइप केलेला मजकूर असलेल्या एका मोठ्या आकाराच्या रजिस्टरचा काही भाग,
ज्याचा
खालचा भाग जळून गेला होता.
ह्या खजिन्यासह आपल्या
शयनगृहांत आल्यावर मार्गारीटा निकोलायेव्नाने तीन आरशांच्या ड्रेसिंग टेबलावर फोटो
ठेवला आणी आपल्या गुडघ्यांवर अर्धवंट जळालेलं रजिस्टर ठेवून जवळ-जवळ तासभर बसून
राहिली. ती रजिस्टरची पानं उलटंत होती आणि
आगीतून शाबूत राहिलेला, आदी आणि
अंत नसलेला मजकूर वाचंत होती: “...भूमध्य सागरांतून आलेल्या अंधाराने
न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला भयानक
अन्तोनियो बुरुजाशी2 जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले,
आकाशातून
एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित पंखवाल्या देवतांच्या मूर्ती,
तोपांसाठी
बनवलेल्या भोकांसहित हसमनचा प्रासाद3… बाजार,
काफिले,
सराय,
गल्ल्या
आणि तलाव...सगळ्यांना झाकून टाकलं. महान शहर येर्शलाइम हरवलं,
जणू
त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं....”
मार्गारीटाला पुढे वाचायचं
होतं, पण पुढे, फक्त
वाकड्या-तिकड्या काळ्या रेघांशिवाय काही नव्हतंच.
आपले अश्रू पुसंत मार्गारीटा
निकोलायेव्नाने रजिस्टर ठेवून दिलं, ड्रेसिंग
टेबलवर दोन्हीं कोपरं ठेवून,
मास्टरच्या फोटोवरून नजर न काढतां, बरांच वेळ
आरश्यांत प्रतिबिंबित होत राहिली. शेवटी अश्रू वाळले. मार्गारीटाने आपल्या
खजिन्याला व्यवस्थितपणे सांभाळून ठेवलं. आणि काही मिनिटांनेच तो पुन्हां रेशमी
चिंध्यांच्या आंत, अंधा-या खोलीच्या अलमारींत परंत
गेला, आणि अंधा-या खोलीच कुलूप खट्कन बंद
झालं.
मार्गारीटा निकोलायेव्नाने
हिंडायला जाण्यासाठी प्रवेश कक्षांत येऊन कोट घातला. तिची
सुंदर मोलकरीण नताशा विचारूं लागली की जेवणासाठी काय बनवायचे आणि ‘काहीही
कर’, असं उत्तर ऐकून, ती
विरंगुळ्यासाठी मालकिणीसोबत गोष्टी करूं लागली. ती काही-बाही सांगंत होती,
तिने
असंपण सांगितलं की काल थियेटरमधे एका जादुगाराने असा जादू दाखवला, की
सगळे दंगंच झाले; त्याने सगळ्यांना परदेशी अत्तराच्या
दोन-दोन कुप्प्या दिल्या आणि स्टॉकिंग्ज़सुद्धां फुकटांत दिल्या;
आणि
मग, जसांच तो ‘शो’
संपला
आणि प्रेक्षक बाहेर निघाले, सगळं – फट्
– सगळे जणं अगदी नंगे दिसायला लागले! मार्गारीटा निकोलायेव्ना प्रवेश कक्षांत
आरश्यासमोर लोळूं लागली आणि पोट धरून हसंत राहिली.
“नताशा! तुला लाज नाही वाटंत?”
मार्गारीटा
निकोलायेव्नाने म्हटलं, “तू तर
चांगली शिकलेली, समजदार मुलगी आहेस;
लोक
‘क्यू’मधे
उभ्या-उभ्या काही-बाही बोलंत असतांत आणि तू सुद्धां तेच बडबडते!”
नताशाचा चेहरा लाल झाला,
तिने
तावातावाने म्हटलं की कोणी खोटं नाही बोलंत आहे आणि आज तिने स्वतःसुद्धां अर्बातच्या
डिपार्टमेन्टल स्टोअरमधे एका बाईला पाहिलं, जी
स्टोअरमधे जोडे घालून आली होती आणि जशींच ती पैसे देऊं लागली,
तिच्या
पायांतले जोडे गायब झाले आणि ती फक्त स्टॉकिंग्ज़्समधेंच राहिली. तिचे डोळे
विस्फारले! टाचेवर एक भोक होतं! आणि हे जोडेपण तिने त्याच ‘शो’मधे
घेतले होते.”
“तशीच गेली?”
“तशीच गेली!” नताशा ओरडली
आणि असं वाटून की मालकिणीला अजूनही विश्वास नाहीये, ती
आणखीनंच लाल झाली, “हो, मार्गारीटा
निकोलायेव्ना, काल रात्री पोलिसवाल्यांनी शंभर
माणसांना पकडून नेलं. हा ‘शो’
पाहून
निघालेल्या बायका फक्त अंतर्वस्त्रांत त्वेर्स्काया रस्त्यावर धावंत होत्या!”
“हो, हे
तर दार्याने सांगितलंय,” मार्गारीटा
निकोलायेव्ना म्हणाली. “मी ब-याच दिवसांपासून बघतेय, की
ती एक नंबरची खोटारडी आहे.”
हा गंमतशीर वार्तालाप
नताशासाठी आश्चर्याने संपला. मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या शयन कक्षांत गेली आणि
तिथून एक जोडी स्टॉकिंग्ज़ आणि यूडीकलोनची कुपी घेऊन परतली. नताशाला हे सांगून की
तिलासुद्धां जादू दाखवायचांय, तिने
दोन्हीं वस्तू तिला भेट देत म्हटलं की ती फक्त तिला हीच विनंती करतेय की फक्त
स्टॉकिंग्ज़ घालून त्वेर्स्कायावर धावूं नको आणि दार्यावर विश्वास नको ठेवूं.
एकमेकींचा मुका घेऊन मोलकरीण आणि मालकीण आपापल्या मार्गाला लागल्या.
ट्रॉलीबसच्या आरामशीर नरम
सीटवर टेकून बसलेली मार्गारीटा निकोलायेव्ना अर्बातला जांत होती. कधी ती स्वतःच्या
विचारांत हरवून जायची, तर कधी आपल्या समोर बसलेल्या दोन
नागरिकांची कुजबूज ऐकायची.
आणि ते,
ह्या
भीतीने मधून मधून मान वळवून इकडे-तिकडे बघंत, की
त्यांचं बोलणं कुणी ऐकंत तर नाहीये, कोणच्यातरी
विचित्र घटनेबद्दल कुजबुजंत होते. गलेलट्ठ, डुकरासारखे
मोठे मोठे डोळे असलेला, जो
खिडकीच्या जवंळ बसला होता, अगदी हळू
आवाजांत बोलंत होता. तो आपल्या बारक्या सहप्रवाश्याला सांगंत होता,
की
ताबूत काळ्या कपड्याने झाकावं लागलं...
“अशक्य,”
सन्न
झालेला बारका कुजबुजला, “असं तर
कधीच ऐकलं नाही...मग झेल्दीबिनने काय केलं?”
ट्रॉलीबसच्या एकसारख्या घरघराटांत खिडकीच्या जवळून काही शब्द
ऐकूं आले:
“छापा...तपास...स्कैण्डल,
बस,
गूढ!”
ह्या असंबद्ध तुकड्यांना
व्यवस्थित जोडून मार्गारीटा निकोलायेव्नाला समजलं की कुण्या मृत व्यक्तीचं –
कोणाचं – त्यांनी नाव नव्हतं घेतलं, आज सकाळी
ताबूतमधून डोकं चोरीला गेलंय. म्हणूनंच झेल्दीबिन इतका उद्विग्न आहे. ह्या
लोकांचापण, जे ट्रॉलीबसमधे कुजबुजंत होते,
बिनडोक्याच्या
मृतकाशी काहीतरी संबंध आहे.
“फुलं विकंत घेता येतील कां?”
बारक्याने
काळजीने विचारलं, “तू म्हणतोय की अंतिम संस्कार दोन
वाजता आहे?”
शेवटी मार्गारीटा
निकोलायेव्ना त्यांचं बोलणं ऐकून कंटाळली. ही गूढ कुजबुज, ताबूताच्या
आतून डोकं चोरी गेल्याची, तिला बेचैन
करूं लागली, आणि हे बघून की आता तिला
ट्रॉलीबसमधून उतरायचंय, तिला आनंद
झाला.
काही मिनिटांनी मार्गारीटा
निकोलायेव्ना क्रेमलिन-वॉलच्या खाली एका बेंचवर अश्या प्रकारे बसली होती,
की
तिला मानेझ4 हॉल दिसंत होता.
मार्गारीटाने चमकत्या
सूर्याकडे डोळे बारीक करून पाहिलं, आजच्या
आपल्या स्वप्नाची आठवण केली. तिला हेसुद्धां आठवलं की बरोब्बर वर्षभरापूर्वी
आजच्याच दिवशी, ह्याच वेळेस,
ह्याच
बेंचवर ती त्याच्याबरोबर बसलेली होती आणि तिची काळी पर्स अगदी अशीच,
तिच्या
बाजूला पडलेली होती. आज तो तिच्याजवळ नव्हता, पण
मार्गारीटा निकोलायेव्ना आपल्या विचारांत फक्त त्याच्याशीच बोलंत होती: “जर तुला
निर्वासित केलं आहे, तर स्वतःबद्दल काही कळवंत कां
नाहीयेस? लोकं आपल्या ठाव-ठिकाणा सांगतातंच
की. आता तुझे माझ्यावर प्रेम नाहीये कां? नाहीं,
न
जाणे कां, ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही
बसंत; म्हणजे, तुला
निर्वासित केलं, आणि तू मरून गेलास...तर, प्लीज़,
मला
सोडून दे, मला जगण्याचं स्वातंत्र्य दे,
मोकळ्या
वा-यांत श्वास घेऊं दे.” मार्गारीटा निकोलायेव्नाने स्वतःच त्याच्याकडून उत्तर
दिलं, “तू स्वतंत्र आहेस...मी काय तुला
पकडून बसलोय?” मग तिनेंच विरोध देखील केला,
“नाहीं, हे
कसलं उत्तर आहे! नाही,
तू
माझ्या विचारांतूनसुद्धां दूर निघून जा, तेव्हां मी
मुक्त होईन.”
लोक मार्गारीटा
निकोलायेव्नाच्या जवळून जात होते. एका पुरुषाने छान कपडे घातलेल्या, सुन्दर आणि एकट्या
बाईकडे डोळ्याच्या कोप-यांतून बघितलं आणि तो किंचित खोकून त्याच बेंचच्या टोकाला
बसला ज्याच्यावर मार्गारीटा निकोलायेव्ना बसली होती. धाडंस करून तो बोलूं लागला:
“आज हवामान फारंच
सुरेख आहे...”
पण मार्गारीटा
निकोलायेव्नाने त्याच्याकडे इतक्या दुःखाने बघितलं, की तो उठून चालला गेला.
“हा होता, नमूना,’ मनांतल्या मनांत
मार्गारीटाने त्याला सांगितलं, ज्याने तिचं सर्वस्व व्यापून टाकलं होतं, “मी ह्या माणसाला कां
पिटाळून लावलं?
मला
कंटाळवाणं वाटंतय आणी ह्या प्रेमवीरामधे काहीही वेडं-बेंद्रं नव्हतं, फक्त तो ‘फारंच’ शब्द किती
मूर्खासारखा होता? मी इथे, ह्या भिंतीखाली एकटी, घुबडासारखी कां बसलेय? मी जीवनांतून बाहेर
कां फेकले गेलेय?”
ती अगदी पार दुःखांत बुडून
गेली आणि आपली शुद्धं हरपूं लागली. पण तेवढ्यांत अचानक तीच, सकाळची आशेची आणि
उत्तेजनेची लाट तिच्या छातींत उसळ्या मारूं लागली. “हो, काही ना काही नक्कीच
होणारेय!” त्याच लाटेने तिला दुस-यांदा धक्का दिला आणि तिला कळलं की ह्या लाटेत
आवाज आहे. शहराच्या कल्लोळांत जवळ येत असलेल्या बैण्ड आणि तुता-यांचे आवाज ऐकूं
आले.
सर्वांत पुढे दिसला
बगीचाच्या जाळीजवळून जात असलेला अश्वारोही सैनिक, त्याच्या मागे तीन पायदळ
सैनिक. मग हळू-हळू पुढे सरकणारा ट्रक, वादकांसह. मग हळू-हळू चालणारी उघडी, नवीन शव-गाडी, त्यांत
पुष्पचक्रांनी झाकलेलं ताबूत, आणि चारी कोप-यांवर – चार उभी माणसं: तीन पुरुष, एक बाई. दुरूनसुद्धां
मार्गारीटाला दिसलं, की ह्या अंत्य-संस्कार गाडींत उभ्या असलेल्या, मृतकाच्या
अंत्ययात्रेबरोबर जाणा-या माणसांचे चेहरे अगदी विक्षिप्तासारखे दिसंत होते.
मागच्या डाव्या कोप-यावर उभ्या असलेल्या बाईच्या चेह-यावर तर ही विक्षिप्तपणाची
भावना अगदी स्पष्ट दिसंत होती. ह्या महिलेच्या गोब-या गालांना जणु आंतमधून काहीतरी
रहस्य फुगवंत होतं आणि तिच्या भिरभिरणा-या डोळ्यांत द्वयर्थी ठिणग्या होत्या. असं
वाटंत होतं,
की
आत्तां,
इतक्यांतंच
ही बाई मृतकाकडे बघून डोळा मारंत म्हणेल: “असं कधी बघितलंय कां? गूढ!” गाडीच्या
मागे-मागे, हळू-हळू पायी चालणा-या जवळ-जवळ तीनशे लोकांचे चेहरेपण अश्याच विभ्रमांत
दिसंत होते.
मार्गारीटाने डोळ्यांनीच
ह्या मिरवणुकीला निरोप दिला आणि दूर जात असलेल्या उदास तुर्की बैण्डचा आवाज ऐकंत, जो सारखा ‘बूम्स, बूम्स’ करंत होता, विचार करूं लागली :
कित्ती विचित्र शवयात्रा आहे...आणि कित्ती पीडा आहे ह्या ‘बूम्स’मधे! आह, खरंच, मी सैतानाकडे आपली
आत्मासुद्धां गहाण ठेवली असती, फक्त हे जाणून
घेण्यासाठी की तो जिवन्त आहे किंवा नाही. आणि हो, हे माहीत करायला चांगलंच
वाटेल की ह्या, असल्या विक्षिप्त
चेह-यांनी कुणाला दफन करताहेत?’
“मिखाइल अलेक्सान्द्रोविच
बेर्लिओज़ला,”
तिच्याजवळंच
एक अनुनासिक पुरुषी आवाज ऐकूं आला, “मॉसोलितच्या प्रेसिडेन्टला”
विस्मित मार्गारीटा वळली आणि
तिने आपल्या बेंचवर एका नागरिकाला पाहिले, जो नक्कीच चुपचाप येऊन तिथे बसून
गेला होता,
जेव्हां
मार्गारीटा शव-यात्रा बघण्यांत गुंग होती, कदाचित शेवटचा प्रश्न तिने
आपल्या विसरभोळेपणामुळे मोठ्याने विचारला होता.
तोपर्यन्त शवयात्रा
अधून-मधून थांबंत-थांबंत चालली होती, कदाचित सिग्नल्समुळे असेल.
“हो,” अनोळखी नागरिक पुढे म्हणाला, “त्यांची मानसिक
अवस्था खूप विचित्र आहे. मृतकाला घेऊन तर जात आहेत, पण विचार करताहेत की त्याचं
डोकं गेलं कुठे!”
“कसलं डोकं?” मार्गारीटाने ह्या
अकस्मात् टपकलेल्या व्यक्तीकडे बघंत विचारलं...हा माणूस कमी उंचीचा, लाल केस असलेला होता, त्याचा एक दात बाहेर
निघालेला होता;
त्याने
कलफ़ केलेला शर्ट, रेघा-रेघांचा छानसा सूट आणि चकचकीत चामड्याचे जोडे घातले होते.
डोक्यावर कडक हैट होती. टाय भडक रंगाचा होता. आश्चर्याची गोष्ट ही होती, की ह्या नागरिकाच्या
खिशांतून,
जिथे
साधारणपणे पुरुष रुमाल किंवा पेन ठेवतात, कोंबडीचं कुरतडलेलं हाड डोकावंत होतं.
“हो, असं आहे बघा,” लाल केसवाल्याने
समजावले,
“आज
सकाळी ग्रिबोयेदोव हॉलमधे मृतकाचं डोकं ताबूतमधून पळवलंय.”
“असं कसं शक्य आहे?” मार्गारीटाने इच्छा
नसतानासुद्धां विचारलं, तेव्हांच तिला ट्रॉलीबसमधे होत असलेली कुजबुज आठवली.
“सैतानंच जाणे कसं केलं!”
लाल केसवाल्याने ऐसपैस उत्तर दिलं, “मला वाटतं की बेगेमोतला ह्याबद्दल विचारायला हवं.
मोठ्या खुबीने पळवलंय. कित्ती मोट्ठं स्कैण्डल झालं! आणि मुख्य म्हणजे, हे कळलंच नाही, की कुणाला आणि
कशासाठी पाहिजे होतं ते डोकं?”
मार्गारीटा निकोलायेव्ना
स्वतःच्याच भानगडींत कितीही मग्न असली, तरीसुद्धां ती ह्या अनोळखी नागरिकाच्या
बडबडीने एकदम दचकली.
“माफ़ करा!” अचानक ती
उद्गारली,
“कोणच्या
बेर्लिओज़चं?
हा तोच
तर नाही. ज्याच्याबद्दल आज पेपरमधे...”
“तोच, तोच...”
“म्हणजे, हे सगळे साहित्यकार
आहेत,
जे
ताबूताच्या मागे-मागे जात आहेत?” मार्गारीटाने विचारलं आणि तिने दात-ओठ खाल्ले.
“निश्चितंच, तेच आहेत!”
“आणि तुम्हीं त्यांना ओळखतां?”
“प्रत्येकाला,” लाल केसवाल्याने
उत्तर दिलं.
“मला सांगा,” मार्गारीटाने गूढ
आवाजांत विचारलं, “त्यांच्यांत समालोचक लातून्स्की आहे कां?”
“कसा नसणार?” लाल केसवाल्याने
उत्तर दिलं,
“तो
बघा,
चौथ्या
ओळींत,
कोप-यावर.”
“तो, भु-या केसांचा?” डोळे बारीक करंत
मार्गारीटाने विचारलं.
“राखाडी रंगाच्या...बघा, त्याने डोळे
आकाशाकडे उंचावलेय.”
“धर्मगुरूसारखा?”
“हो – हो!”
पुढे मार्गारीटाने काहीही
विचारलं नाही,
फक्त
लातून्स्कीकडे बघंत राहिली.
“तुम्हीं, कदाचित,” स्मित करंत लाल
केसवाल्याने म्हटलं,
“ह्या लातून्स्कीचा द्वेष करतां?”
“मी आणखी कुणाचापण द्वेष
करते,”
दात
खात मार्गारीटा म्हणाली, “पण हे सगळं सांगण्यांत मला काहीही रस नाही.”
येवढ्यांत शवयात्रा पुढे
चालू लागली होती, पायी चालणा-या माणसांच्या मागे अनेक मोटर गाड्या होत्या.
“हो, ह्यांत रस घेण्यासारखं आहे
तरी काय,
मार्गारीटा
निकोलायेव्ना!”
मार्गारीटा दचकली, “तुम्हीं मला ओळखतां?”
उत्तर देण्याऐवजी लाल
केसवाल्याने हैट काढून अभिवादन केलं.
‘एकदम दरोडेखोरासारखा
चेहरा आहे!’
मार्गारीटाने
ह्या अचानक भेटलेल्या माणसाकडे बघंत विचार केला.
“पण मी तुम्हांला नाही ओळखंत,” मार्गारीटाने
रुक्षपणे म्हटलं.
“तुम्हीं मला कश्या ओळखालं!
पण मला तुमच्याकडे कामानिमित्त पाठवलंय.”
मार्गारीटाचा चेहरा पडला, ती एकदम मागे झाली.
“हे तुम्हीं आधीच सांगू शकंत
होता,”
ती
म्हणाली,
“पण
तुम्हीं नाही नाही ती बडबंड करंत राहिले, कापून नेलेल्या डोक्याबद्दल! तुम्हीं मला अटक
करणार आहांत कां?”
“तसं काही नाही,” लाल केसवाला उद्गारला, “ही काय पद्धत आहे :
जर कुणी तुमच्याशी बोलूं लागलं, तर तो अटकंच करेल! तुमच्याशी फक्त काम आहे.”
“काही समजंत नाहीये, काय काम आहे?”
लाल केसवाल्याने इकडे-तिकडे
बघंत गूढ आवाजांत म्हटलं, “आज संध्याकाळी तुम्हांला आमंत्रण देण्यासाठी मला पाठवलंय.”
“काय बरळतांय, कसलं आमंत्रण?”
“एका सम्माननीय परदेशी
माणसाकडे,”
लाल
केसवाल्याने अर्थपूर्ण स्वरांत डोळे बारीक करंत म्हटलं.
मार्गारीटाला खूप राग आला.
“एका नवीनंच प्रकारचे लोक
आले आहेत: रस्त्यावरचे दलाल,” तिने उठतां-उठतां म्हटलं.
“ह्या विशेषणासाठी धन्यवाद!”
लाल केसवाला वाईट वाटून म्हणाला आणि मार्गारीटाला पाठीमागून शिवी देत म्हणाला, “मूर्ख!”
“नालायक!” तिने वळून उत्तर
दिलं पण तेवढ्यांत आपल्या मागे लाल केसवाल्याचा आवाज ऐकला:
“...भूमध्य सागरांतून आलेल्या अंधाराने
न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला भयानक
अन्तोनियो बुरुजाशी जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले, आकाशातून
एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित पंखवाल्या देवतांच्या मूर्ती,
तोपांसाठी
बनवलेल्या भोकांसहित हसमनचा प्रासाद… बाजार,
काफिले,
सराय,
गल्ल्या
आणि तलाव...सगळ्यांना झाकून टाकलं. महान शहर येर्शलाइम हरवलं,
जणू
त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं....” अशीच तूं पण लुप्त होशील आपल्या जळक्या
पुस्तकासह आणि वाळलेल्या गुलाबांसह! इथे बेंचवर एकटी बसून राहा आणि त्याची विनवणी
करंत बस, की त्याने तुला मुक्त करावं,
मोकळ्या
वा-यांत श्वास घेऊं द्यावा, तुझ्या
विचारांतून दूर होऊन जावे!”
पांढ-याफटक चेह-याने
मार्गारीटा परंत बेंचकडे वळली. लाल केस वाल्याने डोळे बारीक करंत तिच्याकडे
बघितलं.
“मला काही कळतंच नाहीये,”
मार्गारीटा
निकोलायेव्ना हळूंच म्हणाली, “ठीक आहे,
कादम्बरीबद्दल
तर तुम्हीं माहिती काढूं शकता...डोकावून, चुपचाप
वाचून...नताशा फितूर झालीये? हो?
पण
माझ्या विचारांबद्दल तुम्हांला कसं कळलं?” वेदनेने
कपाळ्यावर आठ्या आणंत ती पुढे म्हणाली, “मला सांगा,
तुम्हीं
आहांत तरी कोण? कोणत्या ऑफ़िसमधे काम करतां?”
“काय कटकट आहे.,”
लाल
केसवाला कुजबुजला आणि मोठ्याने म्हणाला, “माफ करा,
मी
तुम्हांला आधीच सांगितलंय, की मी
कोणत्याही ऑफिसमधून नाही आलो! बसून जा!”
मार्गरीटाने चुपचाप त्याचं
म्हणणं ऐकलं, पण बसतां-बसतां पुन्हां विचारलं,
“तुम्हीं कोण आहांत?”
“ठीकाय,
माझं
नाव आहे अजाजेलो, पण ह्याने तुम्हांला काहीही कळणार
नाही.”
“तुम्हीं मला सांगणार नाही
का, की कादम्बरीबद्दल आणि माझ्या मनांतल्या विचारांबद्दल
तुम्हांला कसं कळलं?”
“नाही सांगणार,”
अजाजेलोने
रुक्षतेने उत्तर दिलं.
“पण तुम्हांला त्याच्याबद्दल
थोडं फार तरी माहीत आहे ना?” त्याची
विनवणी करंत मार्गारीटा कुजबुजली.
“हो, चला,
समजा,
माहीत
आहे.”
“मी विनंती करते: फक्त येवढं
सांगा, की तो जिवंत आहे कां?
मला
छळूं नका!”
“हो, जिवंत
आहे, जिवंत आहे,” अगदी
मनांत नसल्यासारखा अजाजेलो म्हणाला.
“अरे देवा!!”
“कृपा करून रडणं-ओरडणं न
करतां बोलूं या,” नाक वर चढवून अजाजेलो म्हणाला.
“ओह, माफ़
करा, माफ़ करा,” आता
आज्ञाकारी आणि नम्र झालेली मार्गारीटा म्हणाली, “मी
उगीचंच तुमच्यावर रागावले. पण हे तर तुम्हींसुद्धां स्वीकार कराल,
की
असं रस्त्यातंच एखाद्या बाईला आमंत्रित केलं तर...माझे काही पूर्वाग्रह नाहीत,
पण
विश्वास करा...” मार्गारीटा नाखुषीने हसली, “मी
कधीही कोणत्याच परदेशी माणसाला भेटंत नाही आणि त्यांच्याशी बोलायचीसुद्धां माझी
इच्छा नाहीये...आणि शिवाय, माझा
नवरा... माझी कहाणी अशी आहे, की मी
ज्याच्याबरोबर राहतेय, त्याच्यावर प्रेम करंत नाही. मला
त्याच्याकडून फक्त चांगुलपणा आणि सहृदयतांच मिळालीये...”
ही असंबद्ध बडबड ऐकून
अजाजेलो कंटाळलेल्या स्वरांत म्हणाला, “कृपा करून
एक मिनिट चुप राहा.”
मार्गारीटा लहान मुलासारखी
चूप झाली.
“मी तुम्हांला अश्या परदेशी
माणसाकडे घेऊन जाणारेय, जो
तुम्हांला जरासुद्धां इजा करणार नाही, आणि
कोणत्याही चिटपाखरालासुद्धां ह्याबद्दल काहीच कळणार नाही. अगदी शब्द देतो.”
“त्याला माझी काय गरंज पडली?”
चोरून
बघंत मार्गारीटाने विचारलं.
“ते तुम्हांला नंतर कळेल.”
“कळलंय...मला स्वतःला त्याला
समर्पित करावं लागेल,” विचारांत गुंतून मार्गारीटा
म्हणाली.
अजाजेलो धृष्ठतेने हसला आणि
म्हणाला, “जगातील कोणतीही स्त्री,
मी
पैजेवर सांगतो, ह्या गोष्टीचं स्वप्न बघंत असेल,”
हसण्यामुळे अजाजेलोचं तोंड वाकडं झालं, “पण
तुम्हांला निराश व्हावं लागेल, असं काहीही
होणार नाही.”
“कसा आहे हा परदेशी!” त्रस्त
होऊन मार्गारीटा इतक्या मोठ्याने उद्गारली, की
येणारे-जाणारे तिच्याकडे वळून बघूं लागले, “आणि
त्याच्याकडे जाण्यांत माझा काय हेतू असूं शकतो?”
अजाजेलो तिच्याकडे वाकून
म्हणाला, “हेतू तर चांगलांच आहे...तुम्हीं
संधीचा फायदा घेणार आहांत...”
“काय?”
मार्गारीटा
किंचाळली आणी तिचे डोळे गोल-गोल फिरूं लागले, “जर
मी तुमच्या बोलण्याचा खरा अर्थ समजले आहे, तर
तुम्हीं ह्या गोष्टीकडे इंगित करतांय की तिथे मला त्याच्याबद्दल कळेल?”
अजाजेलोने चुपचाप डोकं
हलवलं.
“येईन!” मार्गारीटा पूर्ण
ताकदीनिशी ओरडली आणि अजाजेलोचा हात धरून म्हणाली, “जिथे
म्हणाल, तिथे येईन!”
अजाजेलोने सुटकेचा श्वास
घेतला आणि बेंचच्या पाठीशी टेकून बसला, त्याने
पाठीने बेंचवर लिहिलेलं नाव ‘न्यूरा’
झाकून
टाकलं आणि उपहासाने म्हणाला, “ह्या बायका
म्हणजे कटकटंच असतात!” त्याने खिशांत हात घालून पाय पसरले, “मलांच,
उदाहरणार्थ,
ह्या
कामासाठी कां पाठवलंय! बेगेमोतसुद्धां येऊं शकंत होता, तो
सगळीकडे अगदी फिट्ट बसतो...”
मार्गारीटा केविलवाणेपणाने
हसंत म्हणाली, “तुम्हीं मला आपल्या उखाण्यांने आणि
संमोहनाने दुःखी करणं थांबवा...मी एक दुःखी बाई आहे, आणि
तुम्हीं ह्याचा फायदा उचलतांय...मी कोणच्यातरी भानगडींत अडकणार आहे,
पण
शप्पथ घेऊन सांगतेय, की फक्त त्याच्यासाठीच,
कारण
की त्याच्याबद्दल सांगून तुम्हीं मला आशेचा किरण दाखवलांय. ह्या उलंट-सुलंट
गोष्टींनी तर माझं डोकंच भणभणू लागलंय...”
“नाटक नाही,
नाटक
नाही,” तोंड वाकडं करंत अजाजेलो म्हणाला,
“माझ्या परिस्थितीचापण विचार करा. एडमिनिस्ट्रेटरला झापंड मारणं,
किंवा
मामाला घरांतून हाकलून लावणं, किंवा
कुणावर गोळी चालवणं किंवा असली एखादी हल्की-फुल्की गंमत करणं – हे माझं वैशिष्ट्य
आहे, पण प्रेम करणा-या बायकांशी बोलणं,
माफ़
करा! मी अर्ध्या तासापासून तुमची मनधरणी करतोय...तर, तुम्हीं
चलणार आहे?”
“चलणारेय!,”
मार्गारीटा
निकोलायेव्नाने संक्षिप्त उत्तर दिलं.
“तर मग कृपा करून हे घ्या,”
अजाजेलोने
खिशातूंन सोन्याची एक गोल डबी काढून मार्गारीटाच्या समोर करंत म्हटलं,
“हो, हिला लपवून ठेवा,
नाहीतर
येणारे-जाणारे बघतील. तुम्हांला ह्याची गरंज पडेल, मार्गारीटा
निकोलायेव्ना, मागच्या सहा महिन्यांत दुःखाने
तुम्हीं खूपंच म्हाता-या दिसूं लागल्या आहांत.”
मार्गारीटा लाली-लाल झाली,
पण
ती काहीच बोलली नाही, आणि अजाजेलो बोलंत राहिला,
“आज रात्री बरोबर साडे नऊ वाजतां, सम्पूर्णपणे
विवस्त्र होऊन हे क्रीम चेह-यावर आणि पूर्ण अंगावर चोपडा. त्याच्यानंतर मनांत येईल
ते करा, पण टेलिफोनपासून दूर नका जाऊं. दहा
वाजतां मी फोन करून तुम्हांला सांगेन की पुढे काय करायचंय. तुम्हांला काहीही करावे
लागणार नाहीये, तुम्हांला इच्छित जागेवर नेण्यांत
येईल आणि तुम्हांला काहीही त्रास होणार नाही, समजलं?”
मार्गारीटा थोडावेळ चुपचाप
राहिली, मग म्हणाली, “समजलं.
ही वस्तू अस्सल सोन्याची आहे, वजनावरूनंच
कळतंय. मला, चांगलंच समजतंय की मला विकंत
घेताहेत आणि नंतर एखाद्या काळ्या धंद्यांत लावतील, ज्याची
मला फार मोठी किंमत द्यावी लागणार आहे.”
“हे काय झालं?”
अजाजेलो
फुंकारंत म्हणाला, “तुम्हीं पुन्हां?”
“नाही,
ऐका!”
“क्रीम परंत द्या!”
मार्गारीटाने ती डबी घट्ट
पकडली आणि म्हणाली:
“नाहीं,
थांबा!...मला
माहितीये की मी काय करायला निघालेय. पण हे सगळं फक्त त्याच्यासाठीच आहे. मला जगांत
आणखी कोणत्यांच वस्तूची अपेक्षा नाहीये. पण मला तुम्हांला फक्त येवढंच सांगायचंय
की जर तुम्हीं मला मारून टाकलं, तर तुम्हांलाच
लाज वाटेल! हो, लाजंच वाटेल! मी प्रेमासाठी जीव
देते आहे!” आणि मार्गारीटामे हृदयावर हात मारंत सूर्याकडे बघितलं.
“परंत द्या!” अजाजेलो रागाने
फुत्कारला, “परंत देऊन टाका,
चुलींत
जाऊ द्या हे सगळं! बेगेमोतलांच पाठवूं देत तुमच्याकडे.”
“ओह, नाही!”
मार्गारीटा येणा-या-जाणा-यांना चकित करंत जो-याने ओरडली, “मी
काहीही करायला तयार आहे. ही क्रीमची कॉमेडीदेखील करायला तयार आहे. सैतानाकडे
जायलापण तयार आहे! नाही देणार!”
“ब्बा!” एकदम अजाजेलो गरजला
आणि बगीच्याच्या भिंतीकडे डोळे विस्फारून बघंत त्याने एकीकडे बोट दाखवलं.
मार्गारीटाने तिकडे वळून
पाहिलं, जिकडे अजाजेलोने बोट दाखवलं होतं,
आणि
तिथे काही विशेष न आढळल्यामुळे परंत त्याच्याकडे वळली ह्या अचानकंच फुटलेल्या
“ब्बा!”चा अर्थ विचारायला, पण अर्थ
सांगणारं कुणी तिथे नव्हतंच : मार्गारीटा निकोलायेव्नाचा हा गूढ मित्र गायब झाला होता.
मार्गारीटा निकोलायेव्नाने पट्कन पर्समधे हात घालून बघितलं,
ज्यांत
तिने ह्या किंचाळीपूर्वी ती डबी लपवली होती. तिने खात्री करून घेतली,
की
डबी तिथेच आहे. मग आणखी काहीही विचार न करतां मार्गारीटा पट्कन
अलेक्सांद्र-गार्डनच्या बाहेर धावली.
*******
वीस
अजाजेलोचं क्रीम
संध्याकाळच्या
स्वच्छ आकाशांत लटकलेला चंद्र मैपल वृक्षाच्या फांद्यांमधून दिसंत होता. लिण्डन आणि अकासियाची झाडं बगीचाच्या
जमिनीवर वाकड्या-तिकड्या रेघा आणि ठिपके बनवंत होती. तीन पट असलेली खिडकी, जिचे पडदे बंद होते,
विजेच्या बेफाम प्रकाशांत न्हाऊन गेली
होती. मार्गारीटा निकोलायेव्नाच्या शयनकक्षांत सगळेच दिवे जळंत होते आणि खोलीतल्या
पसा-याला उजागर करंत होते. पलंगावर,
ब्लैन्केटच्या वरती मोजे, स्टॉकिंग्ज़ आणि अंतर्वस्त्र
विखुरले होते. उतरवून टाकलेले अंतर्वस्त्र वैतागाने चिरडलेल्या सिगारेटच्या
पाकिटाजवळ फेकले होते. जोडे पलंगाजवळच्या छोट्याश्या तिपाईवर अर्धवट प्यायलेल्या
कॉफीच्या कपाजवळ आणि ऐशट्रेच्या बाजूला, ज्यांत अर्धवंट
ओढलेल्या सिगारेटचं थोटूक पडलेलं होतं,
ठेवले होते. खुर्चीच्या पाठीवर
संध्याकाळी घालायचा काळा पोषाक लटकंत होता. खोलीत वेगवेगळ्या अत्तरांचा सुगन्ध
भरला होता, आणि त्यातंच मिसळला होता, जळत्या इस्त्रीचा
वास.
मार्गारीटा
निकोलायेव्ना आरश्यासमोर फक्त एक बेदिंग गाऊन घालून बसली होती, ज्याला नग्न शरीरावर असंच टाकलं होतं, पायांत स्वेडचे काळे
जोडे होते. घड्याळ असलेलं सोन्याचं ब्रेसलेट मार्गारीटा निकोलायेव्नाच्या समोर
अजाजेलोने दिलेल्या डबीजवळ पडलं होतं आणि मार्गारीटा निकोलायेव्ना घडाळ्यावरून नजर
दूर करंत नव्हती. मधूनंच तिला वाटायचं की घड्याळ तुटलंय आणि काटे पुढे सरकतंच
नाहीये. पण ते सरकंत होते,
हो, खूपंच हळू, आणि शेवटी मोठा काटा नऊ वाजून एकोणतीस मिनिटावर आलांच. मार्गारीटाचं हृदय जो-याने धडधडले, तिला डबी एकदम उचलतां
आली नाही. स्वतःवर ताबा ठेवंत तिने डबी उघडली आणि पाहिलं की त्यांत पिवळं, चिक्कण क्रीम होतं. तिला वाटलं की त्यातूंन दलदली चिखलाचा वास येतोय.
बोटाच्या टोकाने मार्गारीटाने थोडंसं क्रीम काढून तळहातावर ठेवलं, आता त्यातून दलदली गवताचा आणि जंगलाचा तीव्र वास येऊं लागला. ती हाताने
कपाळावर आणि गालांवर क्रीम चोळू लागली. क्रीम खूप लवकर-लवकर चोळलं जात होतं, मार्गारीटाला असं वाटलं,
की लगेच त्याची वाफसुद्धां होते आहे.
थोडा वेळ चोळल्यावर मार्गारीटाने आरशांत बघितलं आणि तिच्या हातातली डबी सुटून घड्याळ्यावर
पडली. घड्याळीची काच तडकली. मार्गारीटाने पट्कन डोळे बंद केले. मग तिने पुन्हां
स्वतःला आरशांत बघितलं आणि खो खो करंत हसू लागली.
कोप-यांवर
पातळ होत जाणा-या तिच्या भुवया क्रीममुळे जाड्या-जाड्या कमानीसारख्या होऊन
हिरव्या-हिरव्या डोळ्यांवर बसल्या होत्या. पातळशी उभंट सुरकुती, जी तेव्हां, ऑक्टोबरमधे, मास्टर गायब झाल्यावर, नाकाजवळ दिसूं लागली होती,
आता बिल्कुल दिसंत नव्हती.
कानशिलांजवळच्या पिवळ्या सावल्यासुद्धां लुप्त झाल्या होत्या, आणि डोळ्यांच्या कोप-यांवर पडलेली जाळीपण आता नव्हती. गालांची त्वचा गुलाबी
झाली होती. कपाळ नितळ आणि पांढरं शुभ्र झालं होतं, केस विखुरले होते.
तीस
वर्षाच्या मार्गारीटाकडे आरश्यांतून बघंत होती काळ्या, कुरळ्या केसांची, दात दाखवंत खोखो हसणारी एक वीस वर्षांची मुलगी.
हसणं
संपवून मार्गारीटाने एका झटक्यांत गाउन फेकून दिला आणि आपल्या सम्पूर्ण अंगावर
भरभर क्रीम चोळूं लागली. शरीर गुलाबी होऊन चमकू लागलं. मग, जणु कुणीतरी डोक्यांत टोचलेली सुई बाहेर काढून फेकून दिली. तिच्या
कानशिलांचं दुखणं थांबलं,
जे संध्याकाळी, अलेक्सान्द्रोव्स्की पार्क मधल्या भेटीनंतर सुरू झालं होतं. हातापायांचे
स्नायू बळकट झाले, मग मार्गारीटाचं शरीर अगदी हल्कं झालं.
तिने
उसळी मारली आणि पलंगापासून किंचित वर हवेंत तरंगू लागली. मग, जसं कुणीतरी तिला खाली खेचू लागलं आणि ती खाली आली.
“काय
क्रीम आहे! काय क्रीम आहे!” मार्गारीटा खुर्चीत बसंत म्हणाली.
ह्या
लेपामुळे तिच्यां फक्त बाह्य रूपातंच बदल नव्हता झाला. आता तिच्या सम्पूर्ण
अस्तित्वांत, शरीराच्या
प्रत्येक अणु-रेणूत आनन्द उसळंत होता, ज्याचा तिला क्षणोक्षणी अनुभव होत होता, हा आनन्द जणु बुडबुड्यांच्या रूपांत तिच्या अंगातून बाहेर येत होता.
मार्गारीटाला जाणीव झाली की ती मुक्त झालीये, सगळ्या बंधनांतून मुक्त. शिवाय, तिला
हे सुद्धां समजलं, की
‘ते’ झाले आहे, ज्याची जाणीव तिला सकाळी
झाली होती, आणि
आता ती हे सुन्दर घर आणि आपलं पूर्वायुष्य कायमचं सोडणार होती. पण ह्या पूर्वायुष्यातून एक विचार तिचा पिच्छा
पुरवंत होता, तो
हा, की
एक शेवटचं कर्तव्य पूर्ण करायचंय, हे नवीन, विचित्र, ‘वर’ हवेंत खेचणारं ‘काहीतरी’ होण्यापूर्वी. आणि ती, तश्याच, निर्वस्त्र अवस्थेत, शयनगृहामधून हवेंत
तरंगत-उतरंत नव-याच्या स्टडी रूममधे पोहोचली आणि टेबल लैम्प लावून टेबलाकडे वळली.
समोर पडलेल्या राइटिंग-पैडमधून एक पान फाडून त्यावर पेन्सिलने मोठ्या-मोठ्या
अक्षरांत लिहिलं:
“मला माफ कर आणि शक्य
तितक्या लवकर विसरून जा. मी नेहमीसाठी तुला सोडून जात आहे. मला शोधायचा प्रयत्न
नको करू,
त्याने
काहीही होणार नाहीये. सततच्या दुःखामुळे आणि आपदांमुळे मी चेटकी झालेय. आता मी
निघतेय. गुडबाय! मार्गारीटा.”
एकदम
हलक्या मनाने मार्गारीटा हवेंत तरंगंत आपल्या शयनगृहांत आली आणि तिच्या पाठोपाठ
धावंत आली अनेक वस्तूंनी डवरलेली नताशा. आणि ह्या सगळ्या वस्तू – हैंगर्सवर
टांगलेले अनेक पोषाक, लेसवाले रुमाल, निळे रेशमी जोडे, आणि बेल्ट - सगळं जमिनीवर विखुरलं. आणि नताशा रिकाम्या हातांनी टाळ्या वाजवूं लागली.
“काय, छान आहे नं?” बसक्या, जाड्या आवाजांत मार्गारीटा
निकोलायेव्ना ओरडली.
“हे
असं काय आहे?” नताशा मागे सरकंत कुजबुजली, “हे तुम्हीं कसं करताय, मार्गारीटा निकोलायेव्ना?’
“हा
क्रीमचा कमाल आहे! क्रीम, क्रीम!” मार्गारीटाने आरश्याकडे वळंत सोनेरी डबीकडे बोट दाखवंत उत्तर दिलं.
नताशा
जमिनीवर पडलेल्या चुरगळलेल्या ड्रेसबद्दल विसरून आरश्याकडे धावली आणि उत्तेजित
डोळ्यांनी अधाशीपणे डबीत शिल्लक उरलेल्या क्रीमकडे बघू लागली. तिचे ओठ काहीतरी
पुटपुटले. ती पुन्हां मार्गारीटाकडे वळली आणि काहीश्या आदराने म्हणाली:
“त्वचा – तर! त्वचा, हँ? मार्गारीटा निकोलायेव्ना
तुमची त्वचा तर चमकतेय!” पण लगेच तिला आठवण झाली, ती खाली पडलेल्या ड्रेसकडे वळली आणि तिला उचलून झटकू लागली.
“फेक!
फेक!” मार्गारीटा ओरडली, “जाऊं दे खड्ड्यांत, फेक! नाही, थांब, तू घे ते, माझी आठवण म्हणून. सांगतेय, माझी आठवण म्हणून ठेव ते.
जे काही खोलींत आहे, ते सगळं घेऊन घे.”
नताशा
जणु अर्धवेडी झाली. तिने स्तब्ध होऊन मार्गारीटाकडे पाहिलं, मग तिच्या मानेंत हात
घालून तिचं चुम्बन घेत ओरडू लागली:
“मुलायम!
चमकतेय! नरम! भुवया, ओह, भुवया!”
“हे
सगळे बोळे घेऊन घे, सगळ्या सेन्ट्सच्या बाटल्या घेऊन घे आणि आपल्या पेटींत लपवून टाक,” मार्गारीटा ओरडली, “पण महागड्या वस्तू नको घेऊ, नाहीतर तुझ्यावर चोरीचा आळ
येईल.”
नताशाने
जे हातात येईल ते पिशवीत टाकलं – ड्रेसेस, जोडे, स्टॉकिंग्ज़, अंतर्वस्त्र...आणि ती
शयनगृहांतून बाहेर पळाली.
तेवढ्यांत
गल्लीच्या दुस-या बाजूने कुठून तरी, उघड्या खिडकीतून गरजंत, जोरदार वाल्ट्ज़चा आवाज तरंगंत आत आला आणि
गेटकडे येणा-या कारचा आवाजपण ऐकूं आला.
“आता
अजाजेलो फोन करेल!” मार्गारीटाने ते संगीत ऐकंत म्हटलं, “तो नक्की फोन करेल! आणि तो परदेशीसुद्धां बिल्कुल धोकादायक नाहीये, हो, आता मला कळतंय, की तो बिल्कुल धोकादायक
नाहीये!”
गेटपासून
दूर जाताना कारचा हल्ला होत होता. गेट वाजलं आणि पायवाटेच्या फरशीवर पावलांची
चाहूल ऐकू आली.
‘हा निकोलाय इवानोविच आहे, पावलांच्या आवाजाने कळतंय,’ मार्गारीटाने विचार केला, ‘जातां-जातां काहीतरी
मजेदार गम्मत करायला पाहिजे.’
मार्गारीटाने
पडदा बाजूला केला आणि गुडघ्यांवर हात बांधून खिडकीच्या चौकटींत तिरपी होऊन बसली.
चंद्राचा प्रकाश उजवीकडून तिच्यावर पडंत होता. मार्गारीटाने चंद्राकडे चेहरा उचलला
आणि विचारांत गढल्यासारखे काव्यात्मक भाव चेह-यावर आणले. आणखी एक दोनदां पावलांची
खट्खट् झाली आणि मग एकदम थांबली. आणखी थोडा वेळ मुग्ध होऊन चंद्राकडे आणि शालीनता
दाखविण्यासाठी श्वास घेऊन मार्गारीटाने बगिच्याकडे तोंड वळविले आणि तिथे तिला
खरोखरंच दिसला निकोलाय इवानोविच, जो ह्याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर राहात होता. चंद्राचा प्रकाश निकोलाय
इवानोविचला चिंब करंत होता. तो बाकावर बसला होता, आणि स्पष्ट होतं, की अचानकंच त्याच्यावर धपकन् बसला होता. त्याच्या डोळ्यांवरचा चष्मा किंचित
खाली घरंगळला होता आणि त्याने आपली ब्रीफकेस पायांत घट्ट दाबून ठेवली होती.
“आs s s निकोलाय इवानोविच,” दुःखी आवाजांत मार्गारीटा
म्हणाली, “गुड ईवनिंग! तुम्हीं मीटिंगवरून येताहांत कां?”
ह्यावर
निकोलाय इवानोविचने काहीच उत्तर दिलं नाही.
“आणि
मी,” मार्गारीटा बगिच्यांत आणखीनंच ओणवून म्हणाली, “बसले आहे एकटी, बघताहांत नं, कंटाळले आहे, चंद्राकडे बघतेय आणि वाल्ट्ज़ ऐकतेय.”
मार्गारीटाने
डावा हात कानशिलावर नेत केसांची बट सावरली, मग संतापून म्हणाली:
“ही
असभ्यता आहे, निकोलाय
इवानोविच! शेवटी मी एक महिला आहे! काहीही म्हणा, जेव्हां तुमच्याशी कुणी बोलतंय, तेव्हां उत्तर न देणं म्हणजे नुसता आडमुठेपणा आहे!”
निकोलाय
इवानोविच, ज्याच्या
भु-या जैकेटचं एक एक बटन चंद्राच्या प्रकाशांत चमकंत होतं, आणि टोकदार पांढ-या दाढीचा
एक एक केस प्रकाशांत चिंब झाला होता, अचानक रानटीपणाने हसला. तो बाकावरून उठला आणि घाबरून, हैट काढण्याऐवजी ब्रीफकेस
हलवूं लागला आणि पाय वाकवले, जणू धपकन् मांडी घालून खाली बसतोय.
“ओह, निकोलाय इवानोविच, तुम्हीं कित्ती कंटाळवाणे
नमुने आहांत,” मार्गारीटा बोलंत राहिली, “खरं म्हणजे, तुम्हां
सर्वांचा मला इतका कंटाळ आलाय, की सांगू नाही शकंत, आणि मला इतका आनन्द होतोय, की मी तुमच्यापासून दूर चाललेय! जा तुम्हीं मसणांत!”
येवढ्यांत
मार्गारीटा निकोलायेव्नाच्या मागे, शयनगृहांत टेलिफिन वाजूं लागला. मार्गारीटाने खिडकीच्या चौकटीवरून उडी मारली
आणि निकोलाय इवानोविचबद्दल विसरून तिने पट्कन टेलिफोनचा रिसीवर उचलला.
“अजाजेलो
बोलतोय,” रिसीवरमधून आवाज आला.
“लाडक्या, लाडक्या अजाजेलो!”
मार्गारीटा किंचाळली.
“वेळ
झालीय! उडून बाहेर या,” रिसीवरमधे अजाजेलो म्हणाला, आणि त्याच्या आवाजावरून कळंत होतं, की मार्गारीटाची ही प्रामाणिक, प्रसन्न किंचाळी त्याला आवडली होती, “जेव्हां गेटवरून उडाल, तेव्हां ओरडून म्हणा, “अदृश्य! अदृश्य!” मग शहरावर उडा, म्हणजे सवय होईल, आणि नंतर दक्षिणेकडे, शहराच्या बाहेर, आणि सरंळ नदीवर, तुमची वाट बघतायेत!”
मार्गारीटाने
रिसीवर टांगून दिला, आणि तेवढ्यांत बाजूच्या खोलीतून कोणचीतरी लाकडी वस्तू धडपडंत येऊन दारावर
ठक्-ठक् करूं लागली. मार्गारीटाने दार उघडलं आणि फरशी स्वच्छ करायचा ब्रश, केसांची बाजू वर करून
नाचंत-नाचंत शयनगृहांत आला. आपल्या टोकाने त्याने फरशीवर ताल दिला, आडवा झाला आणि खिडकीकडे
झेप घेतली. अति उत्तेजनेने मार्गारीटा किंचाळंत सुटली आणि उडी मारून ब्रशवर बसून
गेली. आता ब्रश-स्वाराला आठवण आली, की ह्या धावपळींत ती कपडे घालणंच विसरलीये. तिने झटकन् पलंगावर उडी मारली
आनि हाताला लागेल ते उचलले. हा एक निळा शर्ट होता, त्याला कसंतरी अंगावर टाकून ती खिडकीतून बाहेर उडाली. आणि बगिच्यावर
वाल्ट्ज़चा आवाज आणखीनंच जोरांत येऊं लागला.
खिडकीतून
मार्गारीटाने खाली झेप घेतली आणि तिला बाकावर बसलेला निकोलाय इवानोविच दिसला. तो
जणू बाकाला खिळला होता आणि वेड्यासारखा वरती राहणा-यांच्या शयनगृहातून येणा-या
किंचाळ्या आणि आदळ-आपट ऐकंत होता.
“गुडबाय, निकोलाय इवानोविच!”
निकोलाय इवानोविचसमोर नाचंत-नाचंत, वाल्ट्ज़च्या आवाजावर मात करंत मार्गारीटा ओरडली.
तो
धापा टाकंत बाकावर रांगू लागला, त्याला आपल्या पंजांनी धरून आणि ब्रीफकेसला जमिनीवर आपटंत.
“गुडबाय
नेहमीसाठी! मी उडून चाललेय!” मार्गारीटाने वाल्ट्ज़च्या आवाजापेक्षाही जोरांत ओरडून
म्हटलं. तेवढ्यांत तिला वाटलं, की शर्टची काही गरंज नाहीये, आणि दुष्टपणे हसंत तिने शर्टाने निकोलाय इवानोविचचं डोकं झाकून टाकलं. काहीच
न दिसल्यामुळे निकोलाय इवानोविच बाकावरून पायवाटेवर कोसळला.
मार्गारीटाने
मागे वळून शेवटचं त्या घराकडे पाहिलं, जिथे इतके दिवस तिने दुःख सोसलं होतं, आणि तिला ज्वाळांमधे नताशाचा आश्चर्यचकित चेहरा दिसला.
“गुडबाय
नताशा!” मार्गारीटा ओरडली आणी तिने ब्रशला खेचलं, “अदृश्य, अदृश्य!”
आणखीनंच जोराने ती ओरडली आणि चेह-याला घासणा-या मैपलच्या फांद्यांमधून, गेटवरून उडून ती गल्लींत
शिरली. तिच्या मागोमाग पूर्णपणे वेडावणारे वाल्ट्ज़-संगीतसुद्धां उडंत होतं.
********
एकवीस
उड्डाण
अदृश्य आणि मुक्त! अदृश्य
आणि मुक्त! आपल्या गल्लीवर उड्डाण केल्यानंतर मार्गारीटा ह्या गल्लीला काटकोनावर
छेदंत जाणा-या एका दुस-या गल्लीत आली. केरोसिनच्या दुकानाचे तिरपे दार असलेली, ठिकठिकाणी दुरुस्त
केलेली,
खड्डे
असलेली,
वाकडी-तिकडी
आणि लांब गल्ली,
जिथे
पेल्यांमधे केरोसिन आणि कुप्यांमधे कीडे-माकोडे मारण्याचं औषधं विकलं जायच, तिने एका क्षणांत
पार केली. तेवढ्यांत तिला असं वाटलं, की पूर्णपणे अदृश्य आणि मुक्त असूनही ह्या
गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, की कोणच्या गोष्टींचा आनन्द लुटायला हवा. एखाद्या
चमत्कारामुळेंच ती अचानक थबकली आणि गल्लीच्या कोप-यांत उभ्या असलेल्या तिरप्या, जुन्या लैम्प
पोस्टला धडक देऊन मरता-मरता वाचली. त्याच्यापासून दूर वळून तिने ब्रशला घट्ट पकडून
घेतले. आता ती फुटपाथवर लटकणा-या विजेच्या तारांपासून आणि साइनबोर्ड्स पासून
स्वतःला वाचवंत किंचित मंद गतिने उडंत होती.
तिसरी गल्ली थेट अर्बातकडे
जात होती. इथे पोहोचेपर्यंत मार्गारीटाला ब्रशवर पूर्णपणे कन्ट्रोल करतां येऊं
लागला,
तिला
कळलं की ब्रश तिची लहानशी हालचालसुद्धां समजतोयं, पायाच्या किंवा हाताच्या
किंचितश्या स्पर्शाचे सुद्धां पालन करतोय; आणि हे पण की शहराच्या वरून
उडताना तिला खूपंच सावध राहावे लागणार आहे, धिंगा-मस्ती करणं बरोबर
नाहीये. तिला हे पण कळलं होतं की रस्त्यावर जात-येत असलेल्या लोकांना ही उडन-परी
दिसंत नाहीये. कोणीही डोकं वर करून बघितलं नाही, ‘बघा! बघा!’ असं ओरडलं नाही; बाजूला झालं नाही, शिट्टी वाजवली नाही, बेशुद्ध पडलं नाही, दुष्टपणाने अट्टाहास
केला नाही.
मार्गारीटा चुपचाप उडंत होती
– खूपंच हळू,
ब-यांच
खाली...जवळ-जवळ दुस-या मजल्याच्या उंचीवर. पण इतकं हळू उडंत असतानासुद्धा, झगमगणा-या अर्बातवर
येता-येता,
ती
किंचित इकडे-तिकडे झालीच, आणि तिने खांद्याने एका चमचमणा-या तबकडीला, जिच्यावर बाणाचं
चिन्ह होतं,
ठोसा
मारलांच. ह्याने मार्गारीटाला राग आला. तिने आपल्या आज्ञाकारी ब्रशला पकडलं आणि
थोडीशी बाजूला झाली, मग तिने त्या तबकडीवर हल्ला केला आणि ब्रशच्या दांड्याने तिचे
तुकडे-तुकडे करून टाकले. काचेचे तुकडे खळकन् खाली विखुरले, येणारे-जाणारे तिथेंच थबकले.
कुठून तरी शिट्टीचा आवाज आला. हे अनावश्यक काम पूर्ण करून मार्गारीटा मोठ्याने हसू
लागली. ‘अर्बातवर खूप सावंध
राहायला पाहिजे,’
मार्गारीटाने
विचार केला,
‘इथे
सगळंच इतकं गुंतागुंतीचं आहे की काही समजणंच कठीण आहे!” तिने तारांच्या मधून
उडायचा प्रयत्न केला. मार्गारीटाच्या खाली ट्रॉलीबसेसचे, बसेसचे आणि कार्सचे छप्परं
तरंगंत होते;
वरून
तिला असं वाटंत होतं, की फुटपाथांवर जणु टोप्यांच्या नद्या वाहताहेत. ह्या नद्यांतून
अधून-मधून काही वेगळ्या होऊन रात्रीच्या जगमगणा-या दुकानांच्या जबड्यांमधे सामावंत
होत्या. ‘ओह, काय गुंतागुत आहे!’ रागांत मार्गारीटाने
विचार केला,
‘इथे
वळणं अशक्य आहे. अर्बात पार केल्यावर ती आणखी उंचीवर उडू लागली, चवथ्या मजल्यापर्यंत, आणि कोप-यांत
असलेल्या थियेटरच्या झगमगणा-या बिल्डिंगच्या बाजूने होत-होत उंच-उंच घरं असलेल्या
एका अरुंद गल्लीत शिरली. ह्या घरांच्या खिडक्या उघड्या होत्या आणि सगळ्या
खिडक्यांतून रेडिओचा आवाज ऐकू येत होता. मार्गारीटा उत्सुकतेने एका खिडकीतूंन आत
डोकावली. तिला कॉमन-किचन दिसलं. स्लैबवर दोन स्टोव्ह गरजंत होते, त्यांच्याजवळ दोन
बाया उभ्या होत्या, हातांत पळ्या घेऊन, एकमेकींशी भांडंत.
“आपल्या
मागे बाथरूमचा लाइट बंद करावा, पेलागेया पेत्रोव्ना, मी तुम्हांला सांगून ठेवते,” त्या दोघींपैकी एक बाई म्हणाली, जिच्या समोरच्या भांड्यातून उकळंत असलेल्या सारातून वाफ निघंत होती, “नाहीतर आम्हीं तुम्हाला
येथून काढून टाकू!”
“तुम्हींतर
जश्या खूSSप
चांगल्या आहांत,” दुसरीने उत्तर दिलं.
“तुम्हीं
दोघीही चांगल्या आहांत,” मार्गारीटाने खिडकीतून किचनमधे येत म्हटले. भांडणा-या दोघींनी आवाजाच्या
दिशेने बघितलं आणि आपल्या हातांतल्या घाणेरड्या पळ्यांसकट जणु थिजून गेल्या.
मार्गारीटाने हळूच त्यांच्यामधून हात पुढे करून किल्ल्या फिरवल्या आणि दोन्हीं
स्टोव्स विझवून टाकले. बाया ‘ईSSS!’ म्हणंत किंचाळल्या आणि त्यांचे तोंडं उघडेच राहिले. पण मार्गारीटा किचनमधे
कंटाळली होती आणि ती परंत उडून गल्लींत आली.
ह्या
गल्लीच्या शेवटी एका आठ मजली इमारतीने तिचं लक्ष वेधून घेतलं. मार्गारीटा खाली
उतरली आणि जमिनीवर पोहोचल्यावर तिने पाहिलं की इमारतीचा दर्शनी भाग काळ्या
संगमरमरचा होता, दार
चौडं होतं, त्यांत
बसवलेल्या काचेतून दरबानाच्या कोटाच्या गुंड्या आणि सोनेरी रिबिन लावलेली टोपी
दिसंत होती, आणि
दारावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं होतं “ड्रामलिट हाउस”.
मार्गारीटा
त्या अक्षरांकडे बघंत विचार करूं लागली की ड्रामलिटचा अर्थ काय असूं शकतो. ब्रशला
बगलेंत दाबून, दरबानाला
दाराने धक्का देत मार्गारीटा आत शिरूं लागली आणि तिची नजर लिफ्टजवळ लावलेल्या
काळ्या बोर्डवर पडली, ज्यांवर पांढ-या अक्षरांत त्या बिल्डिंगमधे राहणा-या लोकांची नावं
फ्लैटनंबरसकट लिहिलेली होती. सर्वांत वर लिहिलेलं होतं “नाटककार आणि
साहित्यकारांचे आवास गृह”. ज्यामुळे मार्गारीटाच्या तोंडून हल्कीशी किंचाळी
निघाली. ती वर हवेंत उडाली आणि लवकर-लवकर बोर्डवर लिहिलेली नावं वाचू लागली :
खूस्तोव, द्वुब्रात्स्की, क्वान्त, बेस्कूद्निकोव, लातून्स्की...
‘लातून्स्की!’ मार्गारीटा भुणभुणली, “लातून्स्की! हो, हा तोच आहे! ह्यानेंच
मास्टरला मारून टाकलंय!”
दारावर
उभा असलेला दरबान आश्चर्याने डोळे फिरवंत, उचकून-उचकून त्या काळ्या बोर्डकडे बघूं लागला, हे जाणण्यासाठी की ह्या बोर्डवर लिहिलेली ती नावं एकदमंच कां आणि कशी
भुणभुणू लागली.
तोपर्यंत
मार्गारीटा एका उत्तेजनेंत घोकंत पाय-यांवर उडू लागली होती:
“लातून्स्की
– चौ-यांशी! लातून्स्की – चौ-यांशी!...
हा, डावीकडे – 82, उजवीकडे – 83, आणखी वर डावीकडे – 84, हाच! ही राहिली त्याची
नेमप्लेट – ‘ओ.
लातून्स्की.”
मार्गारीटाने
ब्रशवरून उडी मारली, आणि तिच्या गरम टाचांना फरशीचा हवा-हवासा गारवा जाणवला. मार्गारीटाने घंटी
वाजवली, एकदा, दोनदा...पण कुणीच दार नाही
उघडलं. मार्गारीटा पूर्ण ताकदीनिशी घंटीचं बटन दाबंत होती आणि लातून्स्कीच्या
घरांत होणारी घणघण ऐकंत होती. हो, आठव्या मजल्याच्या फ्लैट नं. 84मधे राहणारा माणूस जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मॉसोलितच्या प्रेसिडेन्टचा
आभारी राहणार होता, कारण की बेर्लिओज़ ट्रामगाडीखाली आला होता, आणि अशासाठी पण, की त्याच्या प्रीत्यर्थ शोकसभा आजंच संध्याकाळी ठेवली होती. लातून्स्कीचे
ग्रह खूपंच चांगले होते – म्हणूनंच त्याची मार्गारीटाशी भेट नाही झाली, जी ह्या शुक्रवारी चेटकीण
झालेली होती.
कुणीच
दार नाही उघडलं.
तेव्हां
मार्गारीटा भरधाव वेगाने खाली येऊं लागली; मज़ले मोजंत-मोजंत ती खाली पोहोचून रस्त्यावर आली. बाहेर येऊन तिने पुन्हां
एकदां सगळे मज़ले मोजले, हे निश्चित करण्यासाठी, की लातून्स्कीच्या फ्लैटच्या खिडक्या कोणत्या आहेत. निश्चितंच ह्या, कोप-यांतल्या पाच अंधा-या
खिडक्या होत्या. त्यांच्याकडे नीट बघून मार्गारीटा पुन्हां वर उडाली आणि काही
क्षणातंच उघड्या खिडकीतून अंधा-या खोलीत आली, जिथे फक्त चंद्राच्या प्रकाशामुळेच थोडासा उजेड होता. ह्या रुपेरी पट्ट्यावर
धावंत जाऊन तिने दिव्याचं बटन शोधलं. एका मिनिटांतंच पूर्ण फ्लैटमधे प्रकाश पसरला.
ब्रश कोप-यांत उभा राहिला. मार्गारीटाने व्यवस्थितपणे बघून घेतलं, की घरांत कुणीच नाहीये, आणि मग पाय-यांकडे जाणारं दार उघडून बघूं लागली, की तिथे नेमप्लेट आहे किंवा नाही. नेमप्लेट तिथेंच होती, मार्गारीटा तिकडे गेली, जिथे तिला जायचं होतं.
हो, असं म्हणतांत की आजही
आलोचक लातून्स्की त्या भयानक संध्याकाळच्या आठवणीने थरथरूं लागतो आणि आजसुद्धां
बेर्लिओज़चं नाव मोठ्या आदराने घेतो. आम्हांला काहीच माहीत नाही, की ह्या संध्याकाळी आणखी काय
काय भयानक आणि काळे कारनामे घडले असते – जेव्हां किचनमधून बाहेर आली, तेव्हां मार्गारीटाच्या
हातांत एक वजनदार हातोडा होता.
निर्वस्त्र
आणि अदृश्य उडनपरी स्वतःवर ताबा ठेऊन होती आणि स्वतःला समजावंत होती; तिचे हात मात्र अत्यंत
अधीरतेने शिवशिवंत होते. तन्मयतेने लक्ष्य साधून मार्गारीटाने पियानोच्या पट्ट्या
तोडून टाकल्या आणि पूर्ण फ्लैटभर पहिला यातनामय आवाज घुमला. निर्जीव, निर्दोष, लाकडी पेटीत जखडलेला
बेक्केरचा पियानो कण्हत होता. कीबोर्ड कोसळला, पट्ट्या चारीकडे उडूं लागल्या. त्या वाद्याचा आवाज घुमंत होता, कण्हंत होता, घरघरंत होता, वाजंत होता. हातोड्याच्या माराने बन्दुकीच्या गोळीसारखा आवाज करंत वरचं
चकचकीत झाकंण सुद्धा उडून गेलं. लवकर-लवकर दीर्घ श्वास घेत मार्गारीटाने सगळे तार
खेचून हातोड्याने त्यांचा चेंदामेंदा करून टाकला. शेवटी अगदी थकून थोडा दम
घेण्यासाठी ती खुर्चीवर लवंडली.
बाथरूममधे
पाणी पूर्ण वेगाने वाहंत होतं आणि किचनमधेसुद्धां. ‘कदाचित पाणी फरशीवर आलंय,’ मार्गारीटाने विचार केला आणि पुढे म्हणाली:
‘बसण्यांत काही अर्थ
नाहीये.’
पाण्याची
धार किचनमधून कॉरीडोरमधे धाऊ लागली होती. अनवाणी पायांनी पाण्यांत छपछप करंत
मार्गारीटा किचनमधून बादल्या भरून-भरून आलोचकाच्या स्टडीरूममधे आणंत होती आणि
टेबलाच्या खणांमधे ओतंत होती. मग हातोड्याने ह्या खोलीतल्या अलमारीचे दार
तोडल्यानंतर ती बेडरूमकडे धावली. आरसा लावलेली अलमारी तोडून झाल्यावर तिने आतून
आलोचकाचा सूट खेचून त्याला बाथरूमच्या पाण्यांत बुडवून टाकलं. बेडरूमच्या नरम, सुरेख, गुबगुबीत डबल-बेडवर शाईची
पूर्ण दौत उलटून दिली, जी तिने स्टडीरूममधून उचलून आणली होती. ह्या विनाशलीलेने तिला फार आनंद होत
होता, तरीही
तिला वाटंत होतं, की
हे तर काहींच नाहीये. म्हणून ती जे दिसेल, ते तोडंत होती. पियानोच्या खोलीतले सगळे फ्लॉवर पॉट्स तोडून टाकले. मग ती
लगेच किचनमधून चाकू आणून बेडरूममधे घुसली आणि सगळ्या चादरी कापून टाकल्या, फ्रेम केलेले फोटो फोडून
टाकले.
तिला
थकवा जाणवंत नव्हता, फक्त शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या.
ह्याच
वेळी लातून्स्कीच्या खालच्या, फ्लैट नं 82मधे नाटककार क्वान्तची मोलकरीण चहा पीत होती; तिला काहींच कळंत नव्हतं
की वरच्या फ्लैटमधून हा धावपळीचा, ठकठकीचा आवाज कां येतोय. जेव्हां तिने डोकं वर करून छताकडे पाहिलं तर तिच्या
डोळ्यादेखंत छताचा रंग पांढ-याहून मळकट निळा झाला. हा मळकंट निळा डाग हळू-हळू मोठा
होऊं लागला आणि त्यावर थेंब दिसूं लागले. आश्चर्य करंत दोन मिनिट ती तशीच बसून
राहिली; तोपर्यंत
वरच्या छतातून अगदी खरोखरचा पाऊस फरशीवर पडू लागला. आता ती गर्रकन उठली आणि तिने
धारेच्या खाली एक भांडं ठेवलं, पण त्याने काहीच फायदा नाही झाला, कारण की पाऊस आता गैसच्या शेगडीवर, भांड्यांच्या टेबलवरसुद्धां पडू लागला होता. तेव्हां क्वान्तची मोलकरीण
ओरडंत फ्लैटमधून बाहेर आली आणी पाय-यांवर धाऊ लागली...लगेच लातून्स्कीच्या
फ्लैटमधे घंट्या वाजू लागल्या.
“बस, घंट्या वाजताहेत, आता निघावं,” मार्गारीटाने म्हटलं. ती
ब्रशवर बसली आणि बाहेरून येणारा आवाज ऐकू लागली, जो ओरडंत होता, “उघंड, उघंड!
दूस्या उघंड! तुमच्याकडे काय पाणी वाहतंय? आमच्या घरी पूर आलाय.”
मार्गारीटा
एक मीटर वर उठली आणि तिने झुंबरावंर प्रहार केला. दोन बल्ब्स फुटले, चारीकडे काचेचे तुकडे
विखुरले. आता बाहेरची आरडा-ओरंड थांबली होती, पाय-यांवर धमधम ऐकूं येत होती. मार्गारीटा तरंगंत खिडकीच्या बाहेर आली आणि
तिने हातोड्याने खिडकीच्या काचेवर हल्का प्रहार केला. तो चूर चूर झाला. संगमरमरी भिंतीवर
काचेचा चुरा घरंगळला. मार्गारीटा दुस-या खिडकीकडे आली. खाली फुटपाथवर लोक धावंत
होते. खाली उभ्या असलेल्या दोन मोटारींपैकी एकीचा हॉर्न वाजला आणि ती निघाली.
लातून्स्कीच्या खिडक्यांचा सत्यानाश केल्यावर मार्गारीटा शेजारच्या फ्लैटकडे
तरंगली. आता हातोड्याचा आवाज लवकर-लवकर येऊं लागला, गल्ली आवाजांनी आणि खणखणाटाने भरून गेली. पहिल्या प्रवेशद्वारातूंन दरबान
धावंत बाहेर आला, त्याने
वर बघितलं, थोडा
वरमला: स्पष्टंच
होतं, त्याला
कळलंच नाही की करावं काय. त्याने तोंडांत शिट्टी खुपसली आणि लागोपाठ फुंकू लागला.
ह्या शिट्टीच्या आवाजाने चिडून मार्गारीटाने आठव्या मजल्याची शेवटची खिडकी फोडून
टाकली, आता
ती सातव्या मजल्यावर आली आणि इथे पण काचा फोडू लागली.
काचेच्या
दारांमागे बरांच वेळ काहीच काम न केल्याने आळसावलेला दरबान पूर्ण ताकदीने शिट्टी
फुंकंत होता, जणु
काही तो मार्गारीटाच्या मागेमागेच होता. एका खिडकीपासून दुस-या खिडकीपर्यंत तिच्या
पोहोचण्याच्या घटनारहित वेळेंत तो श्वास घेऊन घ्यायचा, आणि मार्गारीटाच्या प्रत्येक प्रहारा बरोबर गाल फुगवून शिट्टी फुंकायचा आणि
जणु काही रात्रीच्या हवेला थेट आकाशापर्यंत पोहोचवायचा.
त्याच्या
प्रयत्नांना मार्गारीटाच्या साहाय्याने खूपंच यश मिळालं. बिल्डिंगमधे दहशत पसरली.
खिडक्यांच्या शाबूत असलेल्या काचा निमिषमात्रांत चूर-चूर व्हायच्या. त्यांत
लोकांचे चेहरे दिसायचे आणि पट्कन गायब व्हायचे. उघडलेल्या खिडक्या झट्कन बंद
व्हायच्या. समोरच्या इमारतींत, खिडक्यांमधील प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर काळ्या सावल्या दिसायच्या, त्या समजण्याचा प्रयत्न
करंत होत्या, की
उगीचंच ‘ड्रामलिट’च्या नवीन इमारतींत
खिडक्यांच्या काचा कां फुटंत आहेत.
गल्लीमधे
लोक ‘ड्रामलिट’कडे पळंत होते, आणि तिच्या आंत काहीही
कारण नसताना पाय-यांवर धावंत असलेल्या लोकांची गर्दी होती. क्वान्तची मोलकरीण
पाय-यांवर धावणा-या लोकांना ओरडून-ओरडून सांगंत होती. की त्यांच्या फ्लैटमधे वरून
पाण्याची धार लागली होती, तिचा साथ देण्यासाठी खूस्तोवची मोलकरीणपण आली, जो क्वान्तच्या अगदी खाली, फ्लैट नं. 80मधे राहायचा. खूस्तोवच्या फ्लैटमधे छतातून पाणी आलं, किचनमधे आणि बाथरूममधे.
शेवटी क्वान्तच्या किचनच्या छताचा एक मोठा तुकडांच खाली पडला. चीनीचे सगळे घाण
भांडे चक्काचूर झाले, आणि नंतर मुसळधार पाणी पडू लागलं, लटकंत असलेल्या प्लास्टरमधून पाणी असं पडंत होतं, जणु बादल्या भरून-भरून ओतताहेत. मग पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आरडा-ओरडा सुरूं
झाला. चवथ्या मजल्यावर मार्गारीटा शेवटच्या आधीच्या खिडकींत डोकावली आणि तिला असं
दिसलं की एक माणूस घाबरून गैस-मास्क घालंत आहे. त्याच्या खिडकीवर हातोडा मारून
मार्गारीटाने त्याला आणखीनंच घाबरवलं, आणि तो खोलीतून गायब झाला.
हा
भयंकर हल्ला अचानकंच बंद झाला. तिस-या मजल्यावर उतरून मार्गारीटाने हलका काळा पडदा
लावलेल्या शेवटच्या खिडकींत डोकावून बघितलं. खोलींत एक मरगळलेला, शेड असलेला लैम्प जळंत
होता. छोट्याश्या पलंगावर जाळीच्या आंत एक चार वर्षाचा मुलगा बसला होता आणि भीतीने
ऐकंत होता. खोलींत कोणीच मोठा माणूस नव्हता. स्पष्टंच होतं की सगळे फ्लैटच्या
बाहेर पळून गेले होते.
“काचा
फुटताहेत,” मुलगा म्हणाला आणि त्याने हाक मारली, “मम्मी!”
कुणीच
उत्तर दिलं नाही, तेव्हां
तो म्हणाला, “मम्मी मला भीती वाटतेय.”
मार्गारीटाने
पडदा सरकवला आणि उडून खोलींत आली.
“मला
भीति वाटतेय,” मुलगा थरथरंत पुन्हां म्हणाला.
“भिऊं
नको, भिऊं
नकोस बाळा,” मार्गारीटाने वा-यामुळे भसाड्या झालेल्या गुन्हेगार आवाजाला कोमल बनवंत
म्हटलं, “हे बदमाश मुलं काचा फोडंत होते.”
“गलोलने?” मुलाचं थरथरणं थांबलं
होतं.
“हो, गलोलने, गलोलने,” मार्गारीटाने जोर देऊन
म्हटलं, “आता तू झोपून जा, बरं!”
“हा
सीन्तिक असेल,” मुलगा म्हणाला, “त्याच्याकडे गलोल आहे.”
“हो, तोच आहे, तोच तर आहे!”
मुलाने
आश्चर्याने एका कोप-याकडे बघितलं आणि म्हणाला, “आणि, तू
कुठे आहेस, आण्टी?”
“मी
नाहीये,” मार्गारीटाने उत्तर दिलं, “मी तुझ्या स्वप्नांत येईन.”
“मला असंच वाटलं,” मुलगा म्हणाला.
“तू
लोळ बघूं,” मार्गारीटाने हुकूम सोडला, “गालाखाली हात ठेव, तू मला स्वप्नांत बघूं शकशील.”
“ये, ये, स्वप्नांत ये,” मुलाने तिचं म्हणणं ऐकलं
आणि लगेचा गालाखाली हात ठेवून लोळून गेला.
“मी
तुला गोष्ट सांगेन,” मार्गारीटाने म्हटलं आणि आपला गरंम हात मुलाच्या लहान-लहान केस असलेल्या
डोक्यावर ठेवला, “पृथ्वीवर एक आण्टी राहायची. तिला काही मूल-बाळ नव्हतं, आणि जीवनांत जरापण आनन्द
नव्हता. आधीतर ती खूप रडायची, पण मग एकदम दुष्टंच झाली...” मार्गारीटा गप्प झाली. तिने हात काढून घेतला.
मुलगा झोपला होता.
मार्गारीटाने
चुपचाप हातोडा खिडकीच्या चौकटीवर ठेवला आणि खिडकीतून बाहेर उडून गेली. बिल्डिंगच्याजवळ
हलकल्लोळ माजला होता. काचेच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकलेल्या फुटपाथवर लोक ओरडंत-ओरडंत
पळंत होते. त्यांच्यांत काही पोलिसवाले पण दिसंत होते. अचानक कर्कश घण्टा वाजूं
लागली आणि अर्बातच्या दिशेने लाल रंगाची, शिडी लावलेली अग्निशामक गाडी गल्लींत येऊन ठेपली...
पुढच्या
गोष्टींमधे मार्गारीटाला रस नव्हता. तारांच्या जाळापासून स्वतःला वाचविण्यासाठी
तिने ब्रश घट्ट धरून ठेवला आणि एका क्षणांत त्या दुर्दैवी बिल्डिंगपासून दूर उडू लागली. तिच्या खालची गल्ली तिरपी होऊन मागे
राहिली. तिच्याऐवजी मार्गारीटाच्या पायांखाली आली काही छप्परं, त्यांना विभक्त करणारे, एक दुस-याला छेदंत जाणारे
रस्ते. बघतां-बघतां हे सगळं एकीकडे राहिलं आणि अग्निशलाका एकमेकाच्या जवळ येत
गेल्या आणी एकमेकांत मिसळंत गेल्या.
मार्गारीटाने
आणखी एक उडी मारली आणि छतांचं हे जाळं जणु जमिनींत गडंप झालं, त्यांच्या ठिकाणी दिसलं एक
तळं, ज्यांत
दिसंत होता थरथरणारा प्रकाश. हे तळं अचानक उभं राहू लागलं आणि मार्गारीटाच्या डोक्यावर
आलं. आता तिच्या पायांखाली चंद्र चमकंत होता. मार्गारीटाला जाणवलं की ती उल्टी
झालीये, आणि
तिने लगेच स्वतःला पुन्हां सामान्य स्थितींत आणलं. तिने मागे वळून पाहिलं तेव्हां
तळं गायब झालेलं होतं आणि तिथे, तिच्या मागे फक्त क्षितिजाचा गुलाबी प्रकाश उरला होता. तो देखील क्षणभरांत
गायब झाला. मार्गारीटाने पाहिलं की आता ती, आपल्या वर, डावीकडे, तिच्याबरोबर उडणा-या
चंद्रासोबंत एकटीच आहे. मार्गारीटाचे केस आधींच उभे राहिले होते, आणि चंद्राचा शीळ घालणारा
प्रकाश तिला न्हाऊं घालंत होता. हे बघितल्यावर की खाली प्रकाशाच्या दोन ओळी, दोन रेषांमधे परिवर्तित
होताहेत, मार्गारीटा
समजून चुकली की ती आश्चर्यजनक वेगाने उडतेय, आणि त्याहूनही आश्चर्याची गोष्ट ही, की ती जरासुद्धां थकंत नाहीये.
काही
क्षणांनी खाली, पृथ्वीवरच्या
अंधारांत विजेच्या रोशनाईचं एक नवीन तळं दिसलं, जे उडनपरीच्या पायांखालून सरकून गेलं, पण लगेच गोल-गोल फिरून जमिनींत गडप झालं. काही वेळाने - पुन्हां अगदी तसंच
दृश्य!
“शहर!
शहर!” मार्गारीटा ओरडली.
त्यानंतर
तिला दोन किंवा तीन वेळा खाली, मंद प्रकाशांत चमकणा-या, उघड्या, काळ्या
म्यानींत असलेल्या अरुंद तलवारी दिसल्या, ती समजली की ह्या नद्या आहेत.
डोकं
वर, डावीकडे
फिरवंत उडनपरी हे बघून खूश होत होती, की चंद्र तिच्या वर-वर चालतोय, वेड्यासारखा, परंत मॉस्कोकडे, आणि त्याबरोबरंच तो आपल्या जागी थांबंत देखील आहे, ज्यामुळे त्यांत एक
रहस्यमय काळी आकृति दिसंत आहे – कदाचित अजगर किंवा कुबडा घोडा, जो आपली छोटीशी मान वळवून
मागे, मॉस्कोच्या
दिशेने बघतोय.
आता
मार्गारीटाने विचार केला, की ती उगीचंच ब्रशला येवढ्या वेगाने हाकंतेय. अश्याने तिला कितीतरी
वस्तूंकडे लक्ष देऊन बघणं आणि उड्डाणाचा आनंद घेणं जमंत नाहीये. जणु काही कुणी तरी
तिला सांगंत होतं, की
तिथे, जिकडे
ती उडून चाललीये, कुणीतरी
तिची वाट बघतीलंच आणि तिला ह्या अफाट उंचीला आणि वेगाला कंटाळण्याचं काही कारण
नाहीये.
मार्गारीटाने
ब्रशचा केसांचा भाग खाली वाकवला, ज्याने त्याची शेपूट वर गेली. आपला वेग खूपंच कमी करंत ती थेट जमिनीकडे झेपावली.
ही घसरण, जशी
उडणा-या मशिनींत होते, तिला आवडली. पृथ्वी जणु उठून तिला भेटायला येत होती, आणि आतापर्यंतच्या तिच्या
आकारहीन, काळ्या
पदरांत ह्या चांदण्या रात्रींत अनेक रहस्यपूर्ण, सुंदर वस्तू दिसू लागल्या. पृथ्वी तिच्या जवळ येत होती आणि मार्गारीटाचं डोकं
हिरव्या-हिरव्या जंगलांच्या सुगंधाने घुमूं लागलं. मार्गारीटा दंवबिंदूंनी
झाकलेल्या हिरव्यागार मैदानावर पसरलेल्या धुक्यांतून जात होती; मग ती एका तळ्यावरून गेली.
मार्गारीटाच्या खाली बेडूक एका सुरांत गात होते आणि दूर कुठेतरी हृदयाला विह्वळ
करणारी एक आगगाडी हल्ला करंत होती. मार्गारीटाने लवकरंच तिला बघितलं. ती हवेंत
ठिणग्या सोडंत अळीसारखी हळू-हळू रांगंत होती. तिला पार केल्यावर मार्गारीटा आणखी
एका जलाशयावरून गेली, ज्यांत चंद्र तरंगंत होता, भव्य मैपल वृक्षांच्या शिखरांना पायांने दाबंत, ती अजून थोडी खाली आली.
मार्गारीटाला
कापल्या जाणा-या वा-याचा जोरदार आवाज जवळ येत असलेला जाणवला. हळू हळू ह्या आवाजांत
तीव्र वेगाने उडंत असलेल्या एखाद्या रॉकेटसारखा आवाज आणि एका बाईच्या खळखळून
हसण्याचा आवाज मिसळला. मार्गारीटाने तोंड फिरवून पाहिलं तर तिला दिसलं, की तिच्या जवळ एक काळी क्लिष्ट
वस्तू येत आहे. मार्गारीटाच्या जवळ येतां-येतां ती वस्तू स्पष्ट दिसू लागली.
कुणीतरी कोणत्यातरी वस्तूवर सवार होऊन उडंत असलेलं दृष्टीस पडलं. शेवटी ते अगदी स्पष्ट
दिसूं लागलं : आपला वेग कमी करून मार्गारीटाला नताशाने पकडलंच.
ती
सम्पूर्ण नग्न, हवेंत
उडणा-या मोकळ्या केसांची परवा न करतां एका जाड्या डुकरावर बसून उडंत होती, ज्याने आपल्या पुढच्या
पंजांमधे एक ब्रीफकेस धरली होती आणि चंद्राच्या प्रकाशांत मधून-मधून चमकणारा
त्याचा चश्मा, जो
नाकावरून खाली घसरला होता, डुकराच्या बरोबर, दोरीने बांधलेला उडंत होता आणि टोपी घडी-घडी डोळ्यांवर घसरंत होती. नीट
बघितल्यावर मार्गारीटाला कळलं की हा तर निकोलाय इवानोविच आहे, आणि मग तिचं गडगडाटी हास्य
जंगलांत घुमूं लागलं, जे नताशाच्या खळखळत्या हास्यांत मिसळून गेलं.
“नताशा!”
मार्गारीटा कर्कश आवाजांत ओरडली, “तू क्रीम लावलंस?”
“माझी
लाडकी!” आपल्या भसाड्या आवाजाने झोपलेल्या लिंडन-वनाला हलवंत नताशा उत्तरली, “माझी फ्रेंच राणी, मी तर ह्याच्या टकल्या
डोक्यावर सुद्धां चोपडलं, ह्याच्या!”
“राजकुमारी!”
भसाड्या आवाजांत आपल्या स्वाराला उड्या मारंत नेत डुक्कर अश्रूभरल्या आवाजांत
ओरडला.
“माझी
लाडकी! मार्गारीटा निकोलायेव्ना!” मार्गारीटाच्या जवळ येत नताशा ओरडली, “मी कबूल करतेय, की क्रीम घेतलं होतं.
आम्हांला पण जगण्याची आणि उडण्याची इच्छा होते! मला क्षमा करा, माझी सरकार, पण मी परंत जाणार नाही, कोणत्याच परिस्थितींत नाही
जाणार! ओह, हे
मस्त आहे, मार्गारीटा
निकोलायेव्ना! माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला,”
नताशाने त्या वैतागलेल्या डुकराच्या खांद्यात बोट
खुपसंत म्हटलं, “लग्नाचा प्रस्ताव! तू मला कोणत्या नावाने बोलावलंस, हँ?” ती डुकराच्या कानाजवळ
झुकंत बोलली.
“देवी,” तो भुणभुणला, “मी येवढ्या वेगाने नाही
उडूं शकंत! मी आपले महत्वपूर्ण कागदपत्र हरवून बसेन. नतालिया प्रकोफेव्ना, मी विरोध करतोय.”
“तू आणि तुझे कागदपत्र…नरकांत जा!” विकट हास्य करंत नताशा ओरडली.
“हे
काय, नतालिया
प्रकोफेव्ना!” आपलं बोलणं कुणी ऐकलं तर!” डुक्कर तिची मनधरणी करंत डरकाळला.
मार्गारीटाच्या
बाजूला उड्या मारंत नताशा हसंत-हसंत तिला सांगू लागली, की मार्गारीटा निकोलायेव्ना गेटवरून उडाल्यावर त्या घरांत काय-काय झालं.
नताशाने
कबूल केलं, की
भेट मिळालेल्या कोणत्याही वस्तूला हात लावायच्या ऐवजी तिने आपले कपडे काढून फेकले
आणि क्रीमकडे धावली, तिने ताबडतोब आपल्या अंगाला क्रीम फासलं. आतां तिच्याबरोबर अगदी तेंच झालं, जे तिच्या मालकिणीबरोबर
झालं होतं. जेव्हां नताशा आनंदाने खिदळंत आरशांत आपलं जादुई सौंदर्य न्याहाळंत
होती, तेवढ्यांतच
दार उघडलं आणि नताशाच्या समोर निकोलाय इवानोविच प्रकट झाला. तो खूपंच उत्तेजित
वाटंत होता, हातांत
आपल्या ब्रीफकेस आणि टोपीबरोबर त्याने मार्गारीटा निकोलायेव्नाचा शर्टपण धरलेला
होता. नताशाला बघतांच निकोलाय इवानोविचची जीभंच खिळली. स्वतःला थोडसं संयत करून, खेकड्यासारख्या लाल
झालेल्या निकोलाय इवानोविचने सांगितलं की खाली पडलेला शर्ट उचलून स्वतःच परंत देणं
त्याला आपलं कर्तव्यंच वाटलं....
“काय
बोललास, दुष्ट!”
खिदळंत नताशा सांगंत होती, “काय...काय म्हणाला, काय काय आणा-भाका घेतल्या! कसे माझ्या हातांत पैसे खुपसले! म्हणे, की क्लाव्दिया
पेत्रोव्नाला काSSही
कळणार नाही. काय, मी
खोटं सांगतेय कां?” नताशा डुकरावर ओरडली आणि त्याने वैतागाने डोकं हलवलं.
शयन
कक्षांत दंगा-मस्ती करणा-या नताशाने निकोलाय इवानोविचवरदेखील क्रीम चोपडलं आणि
तिला आश्चर्याचा धक्कांच बसला. खालच्या मजल्यावर राहणा-या सम्माननीय नागरिकाचा
चेहरा पाच कोपेकच्या नाण्यासारखा झाला आणि त्याचे हातपाय पंजांसारखे झाल्रे.
स्वतःला आरशांत बघितल्याबरोबर निकोलाय इवानोविच अत्यंत हताश होऊन रानटीपणाने ओरडू
लागला, पण
आता खूपंच उशीर झाला होता. काही क्षणातंच तो आपल्या स्वाराला घेऊन मॉस्कोपासून दूर, सैतान जाणे कुठेतरी उडंत
चालला होता, दुःखाने तो हुंदके देत
होता.
“मी
आपल्या सामान्य स्वरूपाला परंत करण्याची मागणी करतो!” अचानक चिडून, विनवणीसारख्या स्वरांत
डुक्कर भिणभिणलं, “मी कोणत्याही नियमाविरुद्ध असलेल्या मीटिंगमधे उडून जाणार नाहीये!
मार्गारीटा निकोलायेव्ना, तुम्हांला तुमच्या मोलकरणीला खाली उतरवावंच लागेल.”
“आह, तर आता मी तुझ्यासाठी
मोलकरीण झाले? मोलकरीण?” नताशा डुकराचा कान पिळंत
ओरडली, “आणि तेव्हां, मी देवी होते? तू मला कसं बोलावलं होतं?”
“शुक्रतारा!
वीनस!” डुक्कर मनधरणी करंत म्हणाला. आता ते दगडांच्यामधून कलकल करणा-या नदीवरून उडंत होते आणि त्याचे पंजे
अक्रोडाच्या फांद्यांना घासंत गेले.
“वीनस!
वीनस!” नताशाने एक हात कमरेवर ठेवंत आणि दुसरा चंद्राकडे उंचावून म्हटलं, “मार्गारीटा! महाराणी!
माझ्यासाठी विनंती करा, की मला डाकीणंच राहू द्यावं. तुमच्यासाठी काहीही अशक्य नाहीये, तुम्हांला शक्ति मिळाली
आहे!”
मार्गारीटाने
उत्तर दिलं, “बरं, मी
वचन देते!”
“धन्यवाद!”
नताशा ओरडून म्हणाली आणि ती पुन्हां काहीशा विषण्णतेने आणि जोराने ओरडली, “हेय! हेय! लौकर! लैकर! आणखी लौकर!’ तिने आपल्या टाचांने बिनडोक
उड्यांमुळे निमुळती झालेली डुकराची कम्बर घट्ट पकडली, तो इतक्या जोराने डरकाळला की हवा पुन्हां झणझणली. क्षणभरांत नताशा पुढे
निघून एका काळ्या ठिबक्यांत परिवर्तित झाली आणि पुन्हां दिसेनाशी झाली. तिच्या
उड्डाणाचा हल्ला-गुल्लापण हळू-हळू कमी झाला.
मार्गारीटा
पहिल्यासारखीच हळू-हळू निर्जन आणि अनोळखी जागेवर उडंत राहिली, टेकड्यांच्यावर, जिथे अजस्त्र मैपल
वृक्षांच्या मधल्या जागेंत गोल-गोल गोटे विखुरले होते, उडताना मार्गारीटा विचार करंत होती, की ती कदाचित मॉस्कोहून ब-यांच दूर आली आहे. ब्रश आतां मैपल वृक्षांच्या
शिखरांवर न उडतां, त्यांच्या
बुंध्यांच्यामधून उडंत होता, जे चंद्राच्या प्रकाशांत एकीकडून रुपेरी दिसंत होते. उडनपरीची सावली जमिनीवर
समोरच्या बाजूला पडंत होती – चंद्र आता मार्गारीटाच्या पाठीला आलोकित करंत होता.
मार्गारीटाला
असा आभास झाला की जवळंच कुठेतरी पाणी आहे आणि तिने असा अंदाज बांधला की तिचे
गंतव्य आतां जवळंच आहे. मैपलची झाडं दूर सरकंत गेली आणि मार्गारीटा हळू-हळू एका
पांढ-या उंचवट्याकडे हवेंत तरंगून गेली. ह्या उंचवट्याच्या मागे, खाली, सावलीत होती एक नदी. उंचवट्याला
लगडलेल्या झुडुपांवर धुकं लटकंत होतं, पण नदीचा दुसरा काठ समतल, खोलगट होता. तिथे, झाडांच्या एकुलत्या एका समूहाखाली अलावांत आग जळंत होती आणि काही
चालत्या-फिरत्या आकृत्या दिसंत होत्या. मार्गारीटाला असं वाटलं, की तिथून एक सुरेल, प्रसन्न संगीत ऐकूं येत
आहे. ह्याच्यापुढे, जिथवर नजर जात होती, चांदीसारख्या चमचमणा-या मैदानावर वस्ती किंवा राहत्या घरांचे नामो-निशाण
नव्हते.
मार्गारीटाने
उंचवट्याच्या खाली उडी मारली आणि पट्कन पाण्याजवंळ उतरली. ह्या हवाई-सफ़रीनंतर पाण्याने तिचं स्वागत केलं. ब्रशला दूर फेकून
तिने पाण्यांत सूर मारला. तिचं हल्कं-फुल्कं शरीर तीरासारखं पाण्यांत शिरलं आणि वर उसळलेलं पाणी
जवळ-जवळ चंद्रापर्यंत पोहोचलं. पाणी कोमंट होतं, जसं स्नानगृहांत असतं आणि पाण्यातूंन वर येऊन मार्गारीटा रात्रीच्या एकांतात
त्या नदींत पोहंत राहिली.
मार्गारीटाच्या
जवळपास कुणी नव्हतं, पण थोड्या दूरवर झुडुपांच्यामागेसुद्धां कुणाच्यातरी पोहण्याचा आवाज येत
होता.
मार्गारीटा
धावून किना-यावर आली. पोहोण्यामुळे तिचं शरीर जणु जळंत होतं, पण तिला जरासुद्धां थकवा जाणवंत
नव्हता, आणि
ती आनंदाने ओल्या-ओल्या गवतांत नाचंत होती. एकदम तिने नाचणं बंद केलं आणि ती सावध
झाली. पाण्यांत हातपाय चालवण्याचा आवाज जवळ येत होता. मग विलोच्या झुडुपांच्या
मागून,
पूर्ण नग्न, एक
जाड्या बाहेर आला. त्याच्या डोक्यावर मागच्या बाजूला झुकलेली काळी रेशमी टोपी
होती. त्याच्या टाचा चिखलाने माखलेल्या होत्या. असं वाटंत होतं, की पोहोणा-याने जणु काळे
जोडेच घातलेयत. ज्याप्रकारे त्याला धाप लागली होती आणि उचक्या येत होत्या, त्याने स्पष्ट होतं की तो
भरपूर प्यायलेला होता. नंतर ही गोष्ट आणखीनंच स्पष्ट झाली, कारण की नदीच्या
पाण्यांतूनदेखील कन्याकचा वास येऊं लागला होता.
मार्गारीटाकडे
दृष्टी गेल्यावर जाड्या तिच्याकडे एकाग्रतेने बघूं लागला, आणि मग लगेच आनंदाने
किंचाळला, “हे काय? मी
काय तिलांच बघतो आहे? क्लोदीना, ही
तूच तर आहे, आनन्दी
विधवा? तू
पण इथे?” आता तो हस्तांदोलनासाठी पुढे सरकला.
मार्गारीटा
मागे सरकली आणि शालीनतेने म्हणाली, “चुलींत जा! इथे कुणी क्लोदीना-ब्लोदीना नाहीये! जरा लक्ष दे की तू कुणाशी
बोलतो आहेस,” आणि क्षणभर थांबून तिने एक मोट्ठी न छापण्यायोग्य शिवी हासडली. ह्याचा त्या
थिल्लर जाड्यावर गंभीर परिणाम झाला.
“ओय!” तो हळुवारपणे उद्गारला आणि थरथरला, “विशाल हृदया, दैदीप्यमान महाराणी
मार्गो! मला क्षमा करा! मी चुकलोच. पण हा सगळा दोष कन्याकचा आहे, मसणांत जावो!” जाड्या एका
गुडघ्यावर बसला आणि टोपी काढून अभिवादन करंत बडबडू लागला. रशियन वाक्यांमधे फ्रेंच
वाक्यांची भेसळ करंत तो पैरिसला झालेल्या आपल्या मित्राच्या – हेस्सारच्या लग्नांत
झालेल्या रक्तपाताबद्दल बडबडू लागला, तो कन्याकबद्दल आणि स्वतःच्या भयंकर
चुकीबद्दलसुद्धां बोलला, ज्यामुळे त्याला लाजिरवाणं झालंय.
“तू
आधी पैन्ट घातली असती, डुकराच्या पिल्ला,” मार्गारीटा थोडं शांत होत म्हणाली.
जाड्याने
हसून दात दाखवले, मार्गारीटा
चिडंत नाहीये, हे
बघून तो मोठ्या उत्साहाने सांगू लागला, की त्याच्याकडे पैन्ट नाहीये, कारण की विसरभोळेपणामुळे तो तिला एनिसेइ नदीच्या काठावरंच सोडून आलाय, जिथे ह्याच्याआधी तो पोहंत
होता, पण
आता तो उडून तिथे जाईल, कारण की ती जवळंच आहे आणि पैन्ट घालून घेईल. मग हुकुमाचं पालन करंत तो
मागे-मागे सरकंत गेला आणि तो पर्यंत सरकंत गेला, जो पर्यंत पाण्यांत नाही पडला. पण पडतां-पडतांसुद्धां लहान-लहान कल्ले
असलेल्या चेह-यावर उल्हास आणि समर्पणाचं हास्य होतं.
मार्गारीटाने
एक कर्कश शिटी वाजवली आणि उडून येत असलेल्या ब्रशवर बसून नदीच्या दुस-या काठाकडे
उडाली. येथे टेकडीची सावली पडंत नव्हती. चंद्राच्या प्रकाशांत सम्पूर्ण किनारा
चमचमंत होता.
मार्गारीटाने
ओल्या गवतावर पाय ठेवल्याबरोबर विलो वृक्षांच्या खालचं संगीत तीव्र झालं आणि
अलावातूंन ठिणग्या निघू लागल्या. नाजुक, गुबगुबीत कर्णफुलांनी नटलेल्या विलो वृक्षांच्या फांद्यांखाली, ज्या प्रकाशांत स्पष्ट
दिसंत होत्या, दोन
रागांमधे फुग-या चेह-याचे बेडूक बसले होते आणि लाकडी नळ्यांनी फुंकून-फुंकून
परेड-म्यूज़िक वाजवंत होते. विलो वृक्षांच्या फांद्यांवर ह्या संगीतकारांचे नोट्स
टांगले होते आणि बेडकांच्या डोक्यांवर अलावातल्या ज्वाळांचा प्रकाश नाचंत होता.
हे
संगीत मार्गारीटाच्या सम्मानाप्रीत्यर्थ होतं. तिचं भव्य स्वागत केलं गेलं. पारदर्शी जलप-यांनी नदीच्या वर आपलं गोल-नृत्य थांबवून
झाडांच्या फांद्या हलवंत मार्गारीटाच स्वागत केलं. त्या निर्मनुष्य हिरव्या काठावर
त्यांचं अभिवादन घुमूं लागलं. निर्वस्त्र चेटकिणी विलो-वृक्षांच्या मागून उड्या
मारंत येऊन एका ओळींत उभ्या राहिल्या आणि राजसी ढंगाने वाकून अभिवादन करूं
लागल्या. कुणी एक, शेळीसारखा
पाय असलेला, उडून
तिच्या हाताला झोंबला. त्याने गवतावर रेशमी गलीचा पसरला, विचारूं लागला की
महाराणीने नदींत व्यवस्थितपणे स्नान केलं किंवा नाही, आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी विनवूं लागला.
मार्गारीटाने
तसंच केलं. शेळीसारख्या पायवाल्याने शैम्पेनचा चषक तिच्यासमोर केला, एक घोट घेतल्याबरोबर तिला
हृदयांत ऊब जाणवली. हे विचारल्यावर, की नताशा कुठेय, उत्तर मिळालं, की नताशाने आधीच स्नान उरकून घेतलं, आणि आपल्या डुकराबरोबर ती मॉस्कोला गेली आहे, हा निरोप देण्यासाठी की मार्गारीटा लौकरंच येते आहे. ती तिचा श्रृंगार
करण्यांत मदत करणारेय.
मार्गारीटा
विलो-वृक्षांच्या खाली विश्रांती घेत असताना एक घटना घडली. हवेंत एक शिट्टी तरंगली
आणि एक काळंकुट्ट शरीर हात-पाय झटकंत पाण्यांत पडलं. काही क्षणांतच
मार्गारीटाच्यासमोर तोच कल्ले असलेला जाड्या प्रकट झाला, जो इतक्या असभ्यतेने
तिच्यासमोर प्रकट झाला होता. स्पष्टंच दिसंत होतं की तो एनिसेइपर्यंत जाऊन परतला
होता, कारण
की आता तो फ्रॉक-कोट घालून तैयार होता, पण डोक्यापासून पायांपर्यंत ओला होता. कन्याकनेच त्याला दुस-यांदा फसवलं
होतं. बाहेर येता-येता तो पुन्हां पाण्यांत पडला होता, पण ह्या दुखद प्रसंगात सुद्धां त्याच्या चेह-यावरचं हसू कायम होतं. त्याला
स्मित करणा-या मार्गारीटाने जवळ येऊं दिलं.
आता
सगळे उठून उभे राहिले. जलप-यांनी आपलं नृत्य आटोपलं आणि त्या चंद्राच्या प्रकाशांत
विलीन झाल्या. शेळीसारख्या पायवाल्याने मार्गारीटाला विचारलं की ती कोणत्या
वाहनावर बसून नदीवर आलीय: आणि हे कळल्यावर की ती ब्रशवर बसून आली होती, तो म्हणाला, “ओह, ते काही आरामशीर नाहीये,” आणि त्याने क्षणांत
कोणच्यातरी दोन ठोकळ्यांना जोडून एक रहस्यपूर्ण टेलिफोन बनवला आणि हुकूम दिला, की लगेच कार पाठवण्यांत
यावी. हे लवकरंच झालं. काठावर एक शानदार उघडी कार आली. फक्त ड्राइवरच्या जागेवर
साधारण ड्राइवरच्या ऐवजी एक काळा, लांब नाकाचा, रेक्जिनची हैट आणि हातमोजे घातलेला कावळा होता, नदीचा काठ नीरव झाला. चंद्राच्या प्रकाशांत दूर उडंत जाणा-या डाकिणी वितळून
गेल्या. अलाव विझला. भु-या राखेने कोळश्यांना झाकून घेतलं.
कल्लेवाल्या
आणि शेळीसारख्या पायवाल्याने मार्गारीटाला कारमधे बसवलं आणि ती चौड्या सीटवर
पसरली. कार किंचाळली, उसळली आणि चंद्रापर्यंत वर उठली, नदीचा काठ गायब झाला, नदी लुप्त झाली. मार्गारीटा मॉस्कोकडे येऊं लागली.
********
बावीस
मेणबत्त्यांच्या
प्रकाशांत
उंचावर
उडणा-या कारची सतंत होत असलेली घर-घर जणु मार्गारीटासाठी अंगाई-गीत गात होती आणि
चंद्राचा प्रकाश तिला हल्कीशी ऊब देत होता. डोळे बंद करून चेह-यावर येणा-या
वा-याचा आनंद लुटंत ती काहीशा विषादाने त्या अनोळखी नदीच्या काठाबद्दल विचार करंत
होती, ज्याला
ती मागे सोडून आली होती आणि ज्याला कदाचित पुढे कधीच बघणार नव्हती. संध्याकाळच्या सगळ्या जादुई करामाती आणि
आश्चर्यजनक घटनांहून गेल्यावर तिला काहीसा अन्दाज तर आला होता, की तिला कुणाकडे नेण्यांत
येत आहे, पण
ती जरासुद्धां घाबरली नाही. ह्या आशेने, की तिथे तिला आपलं हरपलेलं सुख मिळेल, तिला निर्भय केलं होतं. पण ह्या सुखाबद्दल कारमधे बसून जास्त वेळ विचार
करतां आला नाही. कदाचित
कावळा आपल्या कामांत अतिशय दक्ष होता, किंवा कार मस्त होती, पण लवकरंच मार्गारीटाने डोळे उघडून बघितलं तर तिला जंगलाच्या अंधाराऐवजी
दिसला मॉस्कोच्या प्रकाशाचा सळसळंता समुद्र. काळ्या पक्षी-ड्राइवरने उडतां-उडतांच
पुढचं उजवं चाक काढलं आणि नंतर एका नीरव कब्रस्तानांत, जे दरगामीलवा भागांत होतं, कारला खाली उतरवलं. चुपचाप
बसलेल्या मार्गारीटाला आपल्या ब्रशसकट एका थडग्याजवळ उतरवून कावळ्याने कार सुरू केली.
तिला कब्रस्तानच्या मागे असलेल्या खड्ड्यांत ढकलून दिलं. कार ह्या खड्ड्यांत पडून
विस्फोट करंत नष्ट झाली. कावळ्याने सम्मानाने सलाम केला, चाकावर बसला आणि
त्याच्यासकट उडून गेला.
तेवढ्यांत
एका स्मारकाच्यामागून काळा रेनकोट दिसला. चंद्राच्या प्रकाशांत एक दात चमकला आणि
मार्गारीटाने अजाजेलोला ओळखलं. त्याने खुणेने मार्गारीटाला ब्रशवर बसण्यास
सांगितलं आणि स्वतः उडी मारून लांब दांड्यावर बसला, दोघांने जूSSम करंत झेप घेतली आणि कुणाच्याच नजरेंत न
पडतां काही क्षणांतच सादोवाया स्ट्रीटच्या बिल्डिंग नं. 302बीच्या जवळ उतरले.
जेव्हां
बगलेंत ब्रश आणि दांडा दाबून सहप्रवासी कोप-यावर पोहोचले, तेव्हां मार्गारीटाने एका
थकलेल्या माणसाला पाहिलं, त्याने टोपी आणि उंच-उंच जोडे घातले होते. कदाचित तो कुणाची तरी वाट बघंत
होता. मार्गारीटा आणि अजाजेलो कितीही हळू चालंत होते, तरीही त्या माणसाला त्यांच्या पावलांचा आवाज आलांच आणि तो उत्सुकतेने वळला, हे न कळल्यामुळे, की हा आवाज कुठून येत आहे.
दुस-या, जवळ-जवळ पहिल्यासारख्यांच
माणसाला ते भेटले सहाव्या प्रवेश द्वाराजवळ. पुन्हां तीच पुनरावृत्ति. पावलांचा
आवाज...माणूस वैतागून वळला आणि त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. जेव्हां दार उघडून
पुन्हां बंद झालं, तेव्हां
तो ह्या अदृश्य घुसणा-यांच्या मागे-मागे बघू लागला, ही गोष्ट वेगळी आहे, की त्याला काहीच दिसलं नाही.
तिसरा, जो दुस-याचीच प्रतिकृति
होता, आणि
कदाचित पहिल्याचीसुद्धां, तिस-या मजल्याच्या प्रवेश द्वाराजवळ पहारा देत होता. तो खूपंच उग्र अशी
सिगरेट ओढंत होता. त्याच्या जवळून जाताना मार्गारीटाला खोकला आला. सिगरेट ओढणारा
आपल्या बेंचवरून असा उडाला, जणु त्याला कोणी बारीक सुई टोचलीय, त्याने वैतागून इकडे-तिकडे बघायला सुरुवात केली, कठड्याकडे गेला, खाली बघितलं. येवढ्यांत मार्गारीटा आपल्या सोबत्याबरोबर फ्लैट नं. 50वर येऊन
पोहोचली होती. घंटी नाही वाजवली. अजाजेलोने आवाज न करतां आपल्या चावीने दार उघडलं.
सर्वप्रथम
मार्गारीटा ज्या गोष्टीने दचकली, तो होता - तेथे असलेला अंधार. काहींच दिसंत नव्हतं, जणु काही ती जमिनीच्या
खाली आली होती, आणि
मार्गारीटाने घाबरून अजाजेलोचा कोट पकडला, ज्याने ती अडखळूं नये. पण मग हळू-हळू दुरून, कुठून तरी वरून, एक प्रकाश किरण चमकली, आणि हळू-हळू जवंळ येऊं लागली. चालतां-चालतां अजाजेलोने मार्गारीटाच्या
बगलेंत दबलेला ब्रश काढून टाकला, जो आवाज न करतां अंधारांत लुप्त झाला. आता ते काहीश्या रुंद-रुंद पाय-यांवर
चढूं लागले, मार्गारीटाला
असं वाटलं, की
ह्या पाय-या कधींच संपणार नाहीत. तिला अचम्बा वाटला, की मॉस्कोच्या एका साधारण फ्लैटच्या लहानश्या प्रवेश कक्षांत अश्या असाधारण, अदृश्य, पण तरीही जाणवंत असलेल्या, अंतहीन ह्या पाय-या
आल्यांत तरी कुठून? पण तेव्हांच हे वर चढणं थांबलं आणि मार्गारीटाला कळलं, की ती लैण्डिंगवर उभी आहे.
तो प्रकाश जवंळ-जवंळ येत गेला आणि त्याच्या उजेडांत एका माणसाचा चेहरा दिसला; माणूस उंच आणि काळा होता, त्याने हातांत हा लैम्प
धरला होता. ते दुर्दैवी प्राणी, जे दुर्भाग्याने ह्या काही दिवसांत त्याच्या मार्गांत अडमडले होते, ह्या मंद प्रकाशांतपण
त्याला ओळखू शकले असते. हा करोव्येव होता, तोच फागोतसुद्धां होता.
हे
खरं आहे, की
करोव्येवचं रूप खूपंच बदललं होतं. फडफडणारी ज्योत तुटक्या चष्म्यावर नाही, ज्याला केव्हांच कच-याच्या
डब्यांत फेकून द्यायला हवं होतं, परन्तु एक काच असलेल्या चष्म्यावर पडंत होती. हा काचपण तडकलेलाच होता.
त्याच्या काळ्या रंगामागचं कारण होतं तो फ्रॉक-कोट, जो त्याने घातला होता. फक्त छातीवर पांढरा रंग होता.
जादुगार, कॉयर-मास्टर, सम्मोहक, अनुवादक आणि असं बरंच
काही-काही होता हा करोव्येव, सैतानालांच माहीत. करोव्येवने वाकून मार्गारीटाचं अभिवादन केलं आणि हवेंत
लैम्पला फिरवून तिला आपल्या मागे यायला सांगितलं. अजाजेलो गायब झाला.
‘फारंच विचित्र संध्याकाळ
आहे,’ मार्गारीटाने विचार केला, ‘मला काहीही अपेक्षित होतं, फक्त हे सोडून: ह्यांच्याकडे वीज गेलीये का? पण सर्वांत जास्त आश्चर्य वाटतंय, ते ह्या जागेच्या आकार-प्रकाराचं! मॉस्कोच्या फ्लैटमधे येवढं सगळं कसं
सामावूं शकतं? अशक्यंच
आहे!’
करोव्येवच्या
मेणबत्तीचा प्रकाश कितीही मंद असला तरी मार्गारीटा समजून गेली, की ती एका असीमित हॉलमधे
आहे, ज्यांत
मोठ्या-मोठ्या खांबांची रांग आहे – काळी-काळी आणि प्रथमदर्शनी अंतहीन वाटणारी. एका
दिवाणाजवळ करोव्येव थांबला, त्याने आपली मेणबत्ती एका स्टूलवर ठेऊन दिली. त्याने खुणेने मार्गारीटाला
बसायला सांगितलं आणि स्वतः तिच्या जवळंच एखाद्या चित्रासारखा स्टूलवर कोपर टेकवून
जणु थिजून गेला.
“मला
स्वतःचा परिचय देण्याची परवानगी द्यावी,”
करोव्येव खणखणला, “करोव्येव. तुम्हांला आश्चर्य होतं आहे नं, की वीज नाहीये? बचंत करताहेत, कदाचित, तुम्हीं
विचार करंत असाल नं? नाही, नाही, नाही! असं असल्यास, कोणत्याही खाटिकाला, किंवा त्यांच्यापैकी
कुणालाही, ज्यांना
थोड्यांच वेळांत तुमच्या पायांशी डोकं टेकवायचं सौभाग्य लाभणार आहे, ह्याच स्टूलवर माझं मुंडकं
छाटायला सांगा. हे तर आमच्या मालकांना विजेचा प्रकाश आवडंत नाही, म्हणून दिवे आम्हीं शेवटी, अगदी शेवटी लावणार आहोत.
तेव्हां त्यांत जरासुद्धां कपात होणार नाही. हो, प्रकाश थोडा कमीच असला, तर चांगलं राहील...”
मार्गारीटाला करोव्येव
आवडला. त्याच्या खडखडणा-या आवाजाने तिला बरांच धीर आला.
“नाही,”
मार्गारीटाने
उत्तर दिलं, “सगळ्यांत जास्त आश्चर्य मला ह्या
गोष्टीचं होत आहे, की इथे इतकं सगळं आलंच कस?”
तिने
हात फिरवून त्या मोठ्ठ्या हॉलकडे इंगित केलं.
करोव्येव गोडसं हसला,
ज्याने
त्याच्या नाकाजवळ सावल्या तरंगल्या.
“हे तर फार सोपं आहे!” त्याने
उत्तर दिलं, “ज्यांना पाचव्या आयामाबद्दल माहिती
आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही जागेला मनासारखा आकार
देणं काही कठीण नाही. आदरणीय महोदया, कित्तीही
मोठा! मी...” करोव्येव बडबडंत राहिला, “काही अश्या
लोकांना ओळखतो, ज्यांना पाचव्या तर काय,
पण
कोणत्याच आयामाबद्दल काहीही माहिती नाहीये, तरीसुद्धां
त्यांनी आपल्या जागेला मोठं करण्याचे फार सुरेख उद्योग केलेत. उदाहरणार्थ,
एका
नागरिकाला, माझ्या माहितीप्रमाणे,
‘ज़िम्ल्यानी वाल’मधे तीन
खोल्यांचा फ्लैट मिळाला. कोणत्याच पाचव्या-बिचव्या आयामाचा वापंर न करतां,
ज्यामुळे
डोकं भणभणू लागतं, त्याने पटकन त्याला चार खोल्यांचा
करून टाकला. एका खोलींत मधे पार्टीशन उभं करून, दोन
भागांत विभागलं.
“ह्या मोठ्या फ्लैटच्या ऐवजी
त्याने मॉस्कोच्या दोन वेगळ्या-वेगळ्या भागांत दोन स्वतंत्र फ्लैट्स घेतले – एक
तीन खोल्यांचा आणि एक दोन खोल्यांचा. आता त्याच्याकडे झाल्यात पाच खोल्या. तीन
खोल्यांच्या फ्लैटच्या ऐवजी त्याने आतां दोन-दोन खोल्यांचे दोन फ्लैट्स घेतले,
आणि
तुम्हीं बघितलंत ना, की तो सहा खोल्यांचा मालक झाला,
जे
मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरले होते. आता तो आपला शेवटचा आणि अत्यंत शानदार
कारनामा करायला निघाला : वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन, की
मॉस्कोच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या सहा खोल्यांच्या ऐवजी ‘ज़िम्ल्यानी
वाल’वर त्याला एक पाच खोल्यांचा फ्लैट हवाय,
पण
तेव्हांच काही कारणांमुळे, ज्यांच्यावर
त्याचे काही नियंत्रण नव्हते, त्याची
गतिविधी अचानकंच थांबली. कदाचित, अजूनही
त्याच्याजवळ एखादी खोली असेल, पण मी
तुम्हांला नक्की सांगतो, की ती
मॉस्कोमधे नाहीये. बघा, काय
कमालीचा चालबाज आहे, आणि तुम्हीं अजूनही पाचव्या आयामाबद्दल
विचार करताय!”
खरं म्हणजे मार्गारीटा
पाचव्या आयामाबद्दल जरासुद्धां विचार करंत नव्हती, पण करोव्येव अजूनही त्याच
विषयावर बोलंत होता. पण फ्लैटवाल्याची गोष्ट ऐकून ती खदखदून हसली.
करोव्येव बोलंत होता, “चला,
कामाबद्दल बोलूं या, कामाबद्दल, मार्गारीटा निकोलायेव्ना. तुम्हीं खूप हुशार महिला
आहांत, आणि, निःसंदेह, तुम्हीं समजल्या आहांत, की आमचे मालक कोण आहेत.”
मार्गारीटाच्या हृदयांत
धस्स् झालं. तिने डोकं हलवलं.
“तेच, तेच तर...” करोव्येव
म्हणाला, “आम्हीं सगळे जण लपवा-छपवी आणि
रहस्यांचे शत्रू आहोत. आमचे मालक दरवर्षी एका बॉलचं (नृत्योत्सवाचं) आयोजन करतात.
ह्याला वसन्त पौर्णिमेचा, किंवा
शतनृप नृत्योत्सव म्हणतांत. इतके लोक!” आता करोव्येवने गालावर हात ठेवला,
जणु
त्याच्या दात दुखंत आहे, “जाऊं द्या,
मी
आशा करतो, की तुम्हांला स्वतःलापण विश्वास
होईल. तर, प्रश्न असा आहे,
की
आमचे मालक ब्रह्मचारी आहेत, जसं की
तुम्हांला स्वतःला कळलंच असेल, पण होस्टेस
तर असायलाच हवी न. करोव्येवने हात हलवंत
म्हटलं, “तुम्हांला माहीतंच आहे,
की
होस्टेसशिवाय...”
मार्गारीटा एक-एक शब्द लक्ष
देऊन ऐकंत होती : तिला हृदयाच्या खाली गारवा जाणवंत होता; सुखाच्या
कल्पनेनं तिचं डोकं गरगरंत होतं.
“अशी प्रथा आहे,”
करोव्येव
पुढे म्हणाला, “की नृत्योत्सवाच्या होस्टेसचं नाव
मार्गारीटांच असायला हवं, ही झाली
पहिली गोष्ट; आणि दुसरी अशी,
की
ती स्थानीयंच असली पाहिजे आणि जसं तुम्हीं बघतांच आहांत, आम्ही
नेहमी प्रवास करंत असतो आणि सध्या मॉस्कोत आहोत. मॉस्कोमधे आम्हांला एकशे एकवीस
मार्गारीटा भेटल्यांत, पण विश्वास करा,”
करोव्येव
आपल्या मांडीवर हात मारंत म्हणाला, “एक सुद्धां
ह्या लायकीची नाही निघाली. आता शेवटी, सौभाग्याने...”
करोव्येव पुढे वाकंत
अर्थपूर्ण ढंगाने हसला, मार्गारीटाला
पुन्हां हृदयाच्या खाली गारवा जाणवला.
“थोडक्यांत...तुम्हीं ही
जवाबदारी नाकारणार तर नाही?”
“नाही नाकारणार,”
मार्गारीटाने
दृढतेने उत्तर दिलं.
“शंकांच नाही!: करोव्येवने
म्हटलं आणि लैम्प उंचावून म्हणाला, “कृपा करून
माझ्या मागे-मागे या.”
ते खांबांच्या रांगेमधून
आणखी एका हॉलमधे पोहोचले, जिथे न
जाणे कां, लिंबाचा वास येत होता,
जिथे
काहीतरी खुसफुस होत होती आणि मार्गारीटाच्या डोक्याला काहीतरी स्पर्श करून निघून
गेलं. मार्गारीटा थरथरली.
“घाबरू नका,”
खूप
प्रेमाने करोव्येवने मार्गारीटाचा हात धरून तिला धीर दिला, “बेगेमोतची
हल्की-फुल्की खोडी आहे, आणखी काही
नाही. मी तुम्हांला सल्ला देण्याचं धाडस करतो, मार्गारीटा
निकोलायेव्ना, की कधीही, कुणालाही
घाबरूं नका. हा मूर्खपणा आहे. नृत्योत्सव खूप शानदार असेल. मी तुमच्यापासून काहीही
लपवणार नाही. आपण अश्या लोकांना बघणार आहोत, जे
आपल्या काळांत अत्यंत शक्तिशाली शासक होते. पण जेव्हां मी हा विचार करतो,
की
त्या महान शक्तीपुढे, जिच्या सेवेंत मी असतो,
त्यांचं
सामर्थ्य किती क्षुद्र आहे, तेव्हां
मला हसू येतं, दुःख पण होतं – आणि हो,
तुमच्या
रक्तवाहिन्यांमधेसुद्धां तर राजसी रक्त आहे.”
“राजसी रक्त?”
मार्गारीटा
घाबरून करोव्येवला बिलगून विचारूं लागली.
“ओह, महाराणी,”
करोव्येवने
हसंत-खेळंत म्हटलं, “रक्ताशी संबंधित प्रश्न,
जगातील
सर्वांत जटिल प्रश्न आहेत! जर कुण्या पणजीआजीला विचारलं, विशेषकरून
त्यांना, ज्या आपल्या नम्रतेसाठी प्रसिद्ध
होत्या, तर बरेंचसे आश्चर्यजनक रहस्य उघडकीस येतील,
आदरणीय
मार्गारीटा निकोलायेव्ना! ह्या संदर्भात बोलताना जर मी व्यवस्थित फेटलेल्या
पत्त्यांच्या गड्डीच उदाहरण दिलं तर ते चूक नाही ठरणार. काही गोष्टी अश्या असतात
की ज्या शहरांच्या आणि राज्यांच्या सीमा जुमानत नाहीत. मी ह्या गोष्टीकडे लक्ष
वेधेन : सोळाव्या शतकांत झालेल्या कुण्या फ्रेंच महाराणीला जर कुणी सांगेल,
की
तिच्या सुंदर ग्रेट ग्रॅण्ड ग्रॅण्ड ग्रॅण्ड नातीचा अनेक वर्षांनंतर हात धरून मी
मॉस्कोच्या नृत्योत्सवांत घेऊन येईन, तर,
विचार
करा, की तिला किती आश्चर्य होईल. बघा आपण आलोय!”
आता करोव्येवने आपल्या हातांतला
लैम्प विझवला आणि तो त्याच्या हातांतून गायब झाला. मार्गारीटाने एका अंधा-या
दाराखालून येणारा उजेडाचा पट्टा बघितला. ह्या दारावर करोव्येवने हळूच टक्-टक्
केलं. मार्गारीटा इतकी उत्तेजित झाली, की तिचे
दात किटकिटू लागले आणि पाठीच्या मणक्यांत थंडगार लाट धावली. दार उघडलं. खोली
लहानंच होती, मार्गारीटाला ओक वृक्षाचा एक चौडा
पलंग दिसला, ज्याच्यावर घाणेरड्या आणि चोळामोळा
झालेल्या चादरी आणि उश्या होत्या. पलंगाच्या समोर ओकचंच कोरीव काम केलेल्या
पायांचं टेबल होतं, ज्याच्यावर पक्ष्यांच्या अणकुचीदार
पंजांच्या आकाराचा घरट्यासारखा लैम्प होता. ह्या सात सोनेरी पंज्यांमधे1 जाड्या-जाड्या
मेणबत्त्या जळंत होत्या. शिवाय टेबलावर बुद्धिबळाचा एक पटसुद्धां ठेवलेला होता –
गोट्यांसकट, ज्या खूपंच कौशल्याने बनवल्या
होत्या. छोट्याश्या गालिच्यावर छोटासा बाक पडला होता. एकीकडे टेबल होतं,
ज्याच्यावर
एक सोन्याचं भांडं आणि लैम्प होता. ह्या लैम्पच्या फांद्या सापाच्या आकाराच्या
होत्या. खोलीत गंधक आणि डिंकाचा वास होता, मेणबत्त्यांमुळे
पडणा-या सावल्या क्रॉसप्रमाणे एकमेकाला छेदत होत्या.
तेथे उपस्थित असलेल्या
लोकांपैकी मार्गारीटाने पट्कन अजाजेलोला ओळखलं, ज्याने
फ्रॉक कोट घातला होता आणि पलंगाच्या उश्याशी उभा होता. नीट-नेटका अजाजेलो त्या
डाकूसारखा बिल्कुल नव्हता दिसंत, ज्याला
पहिल्यांदा मार्गारीटाने अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे बघितलं होतं. त्याने अगदी
स्टाईलमधे मार्गारीटाचं अभिवादन केलं.
वेराइटीच्या सम्माननीय
रेस्टॉरेन्टवाल्याला बुचकळ्यांत टाकणारी निर्वस्त्र डाकीण, तीच
हैला, जिला नशिबानेच थियेटरमधल्या त्या
विचित्र कार्यक्रमाच्या रात्री कोंबड्याच्या आरवण्याने घाबरवून टाकलं होतं,
पलंगाच्याजवळ
जमिनीवर अंथरलेल्या गालिच्यावर बसली होती आणि एका भांड्यांत काहीतरी हालवंत होती,
ज्यांतून
गंधकाची वाफ निघंत होती.
ह्यांच्याशिवाय त्या खोलीत
बुद्धिबळाच्या टेबलासमोर तिपाईवर एक अवाढव्य बोका बसला होता,
ज्याने
आपल्या पंजात बुद्धिबळाच्या राजाला पकडलं होतं.
हैलाने उठून मार्गारीटाचं
अभिवादन केलं. तसेच बोक्यानेपण तिपाईवरून उडी मारून केलं, मागचा
उजवा पंजा फिरवंत त्याने राजाला खाली टाकलं आणि त्याच्या मागे-मागे पलंगाखाली
घुसला.
मेणबत्त्यांच्या मंद
प्रकाशांत भीतीने अर्धमेली झालेली मार्गारीटा हे सगळं बघंत होती. तिची नजर पलंगाकडे
वळली, ज्याच्यावर बसला होता तो,
ज्याला
थोड्याच वेळापूर्वी पत्रियार्शीवर बिचा-या इवानने ठामपणे सांगितलं होतं,
की
सैतानाचं अस्तित्वंच नाहीय. हेच अस्तित्वहीन अस्तित्व पलंगावर बसलेलं होतं.
दोन डोळे मार्गारीटाच्या
चेह-यावर स्थिर झाले – उजव्या डोळ्याची सोनेरी चमक कुणाच्याही हृदयांत खोलवर
प्रवेश करूं शकंत होती, आणि डावा
डोळा होता काळा आणि रिकामा, जणु सुईचं
भोक होतं, जणु एका अंधा-या अंतहीन विहिरीचं
तोंड. वोलान्दचा चेहरा एका बाजूने वाकडा होता, तोंडाची
उजवी कड खाली खेचलेली होती, वर टकलं
होत गेलेल्या कपाळावर दाट रेघा होत्या, ज्या भिवयांच्या
समान्तर होत्या. त्याच्या चेह-याची कातडी जणू उन्हांत नेहमीसाठी भाजली होती.
वोलान्द पलंगावर पसरून बसला
होता. त्याने घाणेरडा,
डाग
पडलेला आणि खांद्यावर ठिगंळ लावलेला फक्त एक लांब नाइट गाउन घातला होता. एक उघडा
पाय त्याने स्वतःखाली दुमडून घेतला होता आणि दुसरा पाय पसरला होता. ह्याच काळ्या
पायाचा गुडघा वाफ निघंत असलेल्या उटण्याने हैला स्वच्छ करंत होती.
मार्गारीटाने वोलान्दच्या
उघड्या, केस नसलेल्या चिकण्या छातीवर उत्तम
कलाकुसरीने बनवलेला, सोन्याच्या साखळीमधे अडकलेला काळ्या
दगडाचा भुंगा2 बघितला, ज्याच्या
पाठीवर काहीतरी लिहिलेलं होतं. वोलान्दच्या शेजारी पलंगावर एक विचित्र गोल ठेवला
होता, जो अगदी सजीव वाटंत होता,
आणि
ज्यावर एकीकडून सूर्याचा प्रकाश पडंत होता.
काही क्षण शांततेत गेले. ‘हा
मला पारखतोय,’ मार्गारीटाने विचार केला आणि आपल्या
इच्छा शक्तीने तिने स्वतःच्या थरथरणा-या पायांना काबूत केलं.
शेवटी वोलान्दने तोंड उघडलं.
तो हसला, ज्याने त्याच्या चमकणा-या
डोळ्यांतून जणु ज्वाळा निघू लागल्या, “स्वागत आहे,
महाराणी,
आणि
मी आपल्या ह्या घरच्या पोषाकाबद्दल क्षमाप्रार्थी आहे.”
वोलान्द इतक्या खालच्या
स्वरांत बोलंत होता, की काही शब्द तर अगदी घरघरल्यासारखे
वाटंत होते.
वोलान्दने पलंगावरून लांब
तलवार उचलली, डोकं खाली करून तिची नोक पलंगाखाली
घुसवली आणि म्हणाला:
“बाहेर ये! खेळ संपला,
पाहुणे
आलेत.”
“कोणत्याही परिस्थितींत नाही,”
उत्तेजनेने
करोव्येव मार्गारीटा निकोलायेव्नाच्या कानांत प्रॉम्प्टिंग करंत ओरडला.
“कोणत्याही परिस्थितींत
नाही...” मार्गारीटा बोलूं लागली.
“महाशय...” करोव्येवने
कानांत म्हटलं.
“कोणत्याही परिस्थितीत नाही,
महाशय,”
मार्गारीटाने
स्वतःवर नियंत्रण ठेवंत हसून, पण स्पष्ट
आवाजांत म्हटलं, आणि ती पुढे म्हणाली,
“मी विनंती करतेय, की कृपा
करून खेळ बंद नका करूं. मला वाटतंय की बुद्धिबळाशी संबंधित मासिकं जर ह्या खेळाला
छापतील, तर चांगले पैसे देतील.”
अजाजेलो हळूच सहमति दर्शवंत
भिणभिणला आणि वोलान्द मार्गारीटाकडे बघून जणु स्वतःशीच बोलला,
“हो, करोव्येव खरंच सांगतोय! पत्त्यांची
गड्डी किती चांगल्या प्रकारे फेटली आहे! रक्त!”
त्याने हात पुढे केला आणि
मार्गारीटाला आपल्याजवंळ बोलावलं. ती पुढे आली. तिच्या उघड्या तळपायांना फरशीची
जाणीव नव्हती होत. वोलान्दने आपला जड, दगडासारखा,
पण
गरम हात मार्गारीटाच्या खांद्यावर ठेवला, आणि तिला
स्वतःजवळ खेचून आपल्याजवंळ पलंगावर बसवलं.
“हो, तर
तुम्हीं जर इतक्या सम्मोहक आणि सहृदय आहांत,” तो
म्हणाला, “आणि, मी
हीच अपेक्षा केली होती, तर मग
कोणत्याही प्रस्तावनेशिवाय आणि आडंबराशिवाय बोलूं या...” तो पुन्हां वाकला आणि
पलंगाच्या खाली बघंत ओरडला, “पलंगाखालची
ही सर्कस किती वेळ चालणार आहे? बाहेर नीघ,
माथेफिरू
हैन्स3!”
“घोडा सापडंत नाहीये,”
दबक्या
आणि कृत्रिम आवाजांत पलंगाखालून बोका उत्तरला, “माहीत
नाही, उड्या मारंत कुठेतरी निघून गेला आणि
त्याच्या जागेवर बेडूकंच दिसतोय.”
“तुला असं तर नाही न वाटंत,
की तू एखाद्या जत्रेत आहेस?” रागावण्याचं
नाटक करंत वोलान्दने विचारलं, “पलंगाखाली
काही बेडूक-बीडूक नाहींये! ह्या फालतू गोष्टी तू वेराइटीसाठीच राहूं दे. जर तू
लगेच बाहेर नाही निघाला, तर आम्हीं
समजू, की तू हार कबूल केलीयेस,
बेशरम,
पळपुट्या!”
“कोणत्याच परिस्थितीत नाही,
मालक!”
बोका गुरगुरला आणि लगेच पलंगाखालून बाहेर आला, त्याच्या
पंजात घोडा होता.
“ह्यांना भेट...” वोलान्द
म्हणणारंच होता. पण त्याने आपलं वाक्य अर्धवंट सोडंत म्हटलं,
“नाही, मी ह्या जोकराकडे नाही बघू शकंत.
बघा, पलंगाच्याखाली त्याने आपला काय अवतार केलाय.”
येवढ्यांत धुळीने माखलेल्या
बोक्याने मागच्या पंजांवर उभं राहून मार्गारीटाचं अभिवादन केलं होतं. आता
बोक्याच्या गळ्यांत पांढरा बो-टाय लोंबकळंत होता, आणि
छातीवर एका पट्ट्याला लेडीज-दुरबीण लटकंत होती. शिवाय बोक्याच्या मिश्यापण सोनेरी
झाल्या होत्या.
“हा काय प्रकार आहे!” चकित
होऊन वोलान्द म्हणाला, “तू मिशा सोनेरी कां केल्यास?
आणि
तुला टायची गरजंच कां पडली, जर तू
पैन्टंच घातलेली नाहीये?”
“बोक्याला पैन्टची गरंज
नाहीये, मालक,” बोक्याने
अगदी सभ्यतेने उत्तर दिलं, “तुम्हीं
आता मला जोडे घालायला तर नाही नं सांगणार? जोडे
घातलेला बोका फक्त परीकथांमधेच असतो! पण तुम्हीं कधी नृत्योत्सवांत कुणालाही बिना
टायचं बघितलंय कां? मला जोकर नाही व्हायचंय आणि कुणी
मला मानगुटीला धरून बाहेर काढावे, अशी पण
माझी इच्छा नाहीये! प्रत्येक माणूस स्वतःला सजवतोच, जे
शक्य असेल त्यानेच! हेच दुरबिणीबद्दलसुद्धां मला सांगायचंय,
महोदय!”
“पण मिशा?...”
“मला कळंत नाहीये,”
बोक्याने
रुक्षतेने विरोध केला, “आज दाढी करताना अजाजेलो आणि
करोव्येवने पांढरी पावडर फासली, ती
सोनेरीपेक्षा चांगली कशी काय आहे? मी पण आपल्या
मिशांना पावडर फासली, बस्स! हो, जर
मी दाढी करंत असतो तर गोष्ट वेगळी होती! दाढीवाला बोका...हा म्हणजे चावंटपणाच झाला
असता, ही गोष्ट मला हजारदां मान्य आहे. पण
सर्वसाधारणपणे,” बोक्याने रुसंत म्हटलं,
“मी बघतोय की माझ्याबद्दल काही पूर्वाग्रह आहेत,
आणि
आता माझ्यापुढे एक गंभीर प्रश्न आहे, की मी
नृत्योत्सवांत जावं किंवा नाही? तुमचं काय
म्हणणं आहे, मालक?”
आणि बोक्याने अपमानित होऊन
इतकं वेडं-वाकडं तोंड केलं, की जणु एका
क्षणांत तो जोराने रडू लागेल.
“ओह, बदमाश,
बदमाश,”
डोकं
हलवंत वोलान्द उद्गारला, “नेहमी,
जेव्हां
तो हरणार असतो, तेव्हां अशी बडबड करतो,
जणु
कोणी सडकछाप गुंडा आहे. पट्कन खाली बस आणि ही बडबड बंद कर.”
“मी बसून जातो,”
बसता-बसता
बोका म्हणाला,”पण, शेवटच्या
शे-याचा विरोध करतो. माझं कथन बिल्कुल बडबड नाहीये, जसं
तुम्हीं एका महिलेच्या उपस्थितीत म्हटलंय, ह्याच्या
उलंट, सुंदर शब्दांत सांगितलेला एक तर्क
आहे, ज्याची तारीफ फक्त असे विद्वान करूं शकतात,
जसे
सेक्स्त एम्पिरिक, मार्त्सिआन कापेल्ला4
आणि स्वतः अरिस्टोटलसुद्धां त्याचं अगदी बरोबर मूल्यांकन करतात.”
“राजाला शह,”
वोलान्दने
म्हटलं.
“आनंदाने,
आनंदाने,”
बोका
म्हणाला आणि तो दुरबिणीने बुद्धिबळाच्या पटाकडे बघूं लागला.
“तर आता,”
वोलांद
मार्गारीटाकडे वळला, “आपल्या टीमचा परिचय तुम्हांला देतो.
हा, मूर्खाचे सोंग करणारा बोका – बेगेमोत आहे.
अजाजेलो
आणि करोव्येवला तुम्हीं भेटल्याच आहांत. ही आहे माझी सेविका,
हैला!
चुस्त, समजदार आणि असं कोणतंच काम नाहीये,
जे
ही करूं शकंत नाही.”
मार्गारीटाकडे आपल्या
हिरव्या डोळ्यांनी बघंत सुंदरी हैला हसली आणि ती आपल्या मालकाच्या गुडघ्यावर उटणं
चोळतंच होती.
“बस, येवढेच
आहेत,” वोलान्द म्हणाला. तो वेदनेने किंचित
थरथरला, जेव्हां हैलाने ब-याच जोराने त्याचा
गुडघा दाबला, “तुम्हीं बघितलं ना,
की
टीम लहानशी आहे, संमिश्र प्रकाराची,
आणि
साधी-सरंळ आहे.” तो गप्प झाला आणि आपल्यासमोर पडलेल्या ग्लोबला फिरवूं लागला,
जो
इतका सुरेख होता, की त्यांत दिसंत असलेल्या निळ्या
समुद्रांत लाटा सुद्धां उसळताना दिसंत होत्या आणि ग्लोबच्या ध्रुवाची टोपी अगदी
खरोखरची, बर्फाची वाटंत होती.
येवढ्यांत बुद्धिबळाच्या
पटावर धुमाकूळ सुरूं झाला. पूर्णपणे घाबरलेला, त्रस्त
झालेला पांढरा डगला घातलेला राजा आपल्या खाण्यांत धाव-पळ करंत होता,
हताश
होऊन हात वर करंत उड्या मारंत होता. तीन पांढरे प्यादे घाबरून त्या बिशपकडे बघंत
होते, जो तलवार फिरवंत तिकडे खूण करंत
होता, जिथे शेजारच्या काळ्या आणि पांढ-या
खाण्यांत वोलान्दचे काळे स्वार दिसंत होते, जे
दोन चपळ, खाण्यांना खुरांनी खोदंत असलेल्या
घोड्यांवर स्वार होते.
मार्गारीटाला खूप मनोरंजक
वाटंत होतं. हे बघून तिला धक्काच बसला, की ह्या
सगळ्या गोट्या जीवन्त होत्या.
बोक्याने डोळ्यांवरून
दुर्बिण काढली आणि हळूंच आपल्या राजाच्या पाठीवर एक धप्पा दिला. त्याने शरमेने
आपले तोंड हातांमधे लपवलं.
“परिस्थिती वाईट आहे,
लाडक्या
बेगेमोत,” करोव्येवने हळूंच,
पण विषारी आवाजांत म्हटलं.
“परिस्थिती वाईट आहे,
पण
एकदम निराशाजनक नाहीये,” बेगेमोतने
उत्तर दिलं, “आणि, मला
पूर्ण विश्वास आहे, की शेवटी मीच जिंकणारेय. बस,
परिस्थितीचं
नीट आकलन केलं पाहिजे.”
त्याने अत्यंत गंमतशीरपणे
परिस्थितीच आकलन करायला सुरुवात केली. विचित्र-विचित्र प्रकाराने तोंड वेंगाडंत तो
राजाला डोळा मारंत होता.
“काहीही उपयोग होणार नाही,”
करोव्येवने
शेरा मारला.
“आँय!” बेगेमोत ओरडला,
“मिट्ठू उडून गेलेंत, जसं मी
आधीच म्हटलं होतं!”
खरोखरंच,
दूर,
कुठेतरी
दूर, हज्जारों पंखांची फडफड ऐकूं आली. करोव्येव आणि
अजाजेलो बाहेर पळाले.
“आणि, तू, आपल्या नृत्योत्सवाच्या
नख-यांसह चुलींत जा!” वोलान्द आपल्या ग्लोबवरून नजर न काढतां म्हणाला.
जसेच करोव्येव आणि बेगेमोत
दृष्टीआड झाले,
बेगेमोत
आपल्या राजाला आणखीनंच जोरांत डोळा मारूं लागला. पांढरा राज अखेर समजला की
त्याच्याकडून काय अपेक्षा करतायेत. त्याने आपला डगला काढून आपल्या खाण्यावर फेकून
दिला आणि पट सोडून पळून गेला. बिशपने राजाचा फेकलेला डगला घालून घेतला आणि
राजाच्या ठिकाणी उभा राहिला. करोव्येव आणि अजाजेलो परंत आले.
“खोटं, नेहमीप्रमाणे,” अजाजेलो बेगेमोतला
स्पर्श करंत फिर्यादीच्या सुरांत म्हणाला.
“मला ऐकूं आलं होतं,” बोक्याने उत्तर
दिलं.
“तर, हे किती वेळ चालणारेय?” वोलान्दने विचारलं, “शह राजाला!”
“मला कदाचित बरोबर ऐकूं नाही
आलं,
मालक,” बोक्याने उत्तर दिलं, “राजाला शह मिळालेली
नाहीये,
आणि मिळूंसुद्धां
नाही शकंत.”
“मी पुन्हां सांगतोय, राजाला शह आहे!”
“मालक,” खोट्या-खोट्या
उद्वेगाने बोक्याने म्हटलं, “तुम्हीं कदाचित खूप थकले आहांत. राजाला शह नाहीये.”
“राजा G-2 नंबरच्या घरांत
आहे,”
पटाकडे
न बघतां वोलान्दने म्हटलं.
“मालिक, मला भीति वाटतेय,” बोका आक्रोश करंत
म्हणाला,
“ह्या
घरांत राजा नाहीये.”
“हा काय प्रकार आहे?” वोलान्दने
अविश्वासाने विचारलं आणि पटाकडे बघूं लागला, जिथे राजाच्या जागेवर उभ्या
असलेल्या बिशपने हातांत तोंड लपवलं होतं.
“ओह, तू, हलकट,” वोलान्दने विचारमग्न
होत म्हटलं.
“मालक, मी पुन्हां तर्काचा
आधार घेतोय,”
बोका
छातीवर हात ठेवून म्हणाला, “जर खेळणारा म्हणंत असेल, की राजाला शह मिळालेली आहे
आणि ह्या दरम्यान राजांच पटावर नसेल, तर त्याला शह नाही म्हणतां येणार!”
“तू हार स्वीकारतोयंस, किंवा नाही?” वोलान्द भयंकर
आवाजांत ओरडला.
“कृपा करून विचार करूं द्या,” बोक्याने शांतपणे
उत्तर दिलं,
आणि
टेबलवर कोपरं टेकवले, हातांनी कान बंद केले आणि विचार करूं लागला. तो बराच वेळ विचार
करंत होता आणि शेवटी त्याने म्हटलं, “हार स्वीकारतोय.”
“ह्या आडमुठ्या कच-याला
मारून टाका,”
अजाजेलो
पुटपुटला.
“हो, हार स्वीकारतोय,” बोका म्हणाला, “पण हार फक्त अशासाठी
स्वीकारतोय,
कारण
की कुढणा-यांचे बोचरे शब्द ऐकंत खेळूं नाही शकंत!” तो उठला, आणि बुद्धिबळाच्या
गोट्या आपणहून पेटीत चालल्या गेल्या.
“हैला, वेळ झालीय,” वोलान्दने म्हटलं
आणी हैला खोलींतून गायब झाली.
“पाय दुखतोय, आणि हा नृत्योत्सव
येऊन ठेपलाय.” वोलान्द पुढे म्हणाला.
“मला परवानगी द्या,” मार्गारीटाने हळूंच
विनंती केली.
वोलान्दने एकटक तिच्याकडे
बघितलं आणि आपला गुडघा तिच्यापुढे केला. लाव्यासारखा गरम लेप हात भाजंत होता, पण मार्गारीटा चेह-यावर
आठी न आणतां हळू-हळू त्याला गुडघ्यावर चोळू लागली.
“माझे मित्र म्हणतांत की हे
सांध्यांचं दुखणं (रुमेटिज़्म) आहे,” मार्गारीटावरून नजर न काढतां वोलान्द म्हणाला, “पण मला शंका आहे की
माझ्या गुडघ्याचं हे दुखणं त्या सुन्दर मायाविनीची आठवण आहे, जिच्या प्रेमात मी
सन् 1571मधे माउन्ट ब्रोकेन्सवर5 सैतानी-विभागांत असताना पडलो होतो.”
“ओह, हे शक्य आहे कां?” मार्गारीटाने
विचारलं.
“मूर्खपणा! तीनशे वर्षानंतर
ते आपणहूनंच जाईल. मला कितीतरी औषधं सुचवलीत, पण मी आपल्या जुन्या
काळातल्या आजीबाईच्या बटव्याचा उपयोग करतो. माझी आजी काही अत्यंत करामाती
जड्या-बुट्या देऊन गेलीये! बरं, सांगा, तुम्हांला काही त्रास तर नाहीये? कदाचित असं एखादं
दुःख,
जे
तुमच्या हृदयाला टोचतंय? कदाचित एखादी हताशा?”
“नाही, महोदय, असं काहीच नाहीये,” हुशार मार्गारीटाने
उत्तर दिलं,
“आणि
आता,
जेव्हां
मी तुमच्या जवळ आहे, मला खूपंच चांगलं वाटतंय.”
“रक्त...फार मोठी गोष्ट
आहे...” माहीत नाही, कशाने आनंदित होऊन वोलान्द बोलंत होता. तो पुढे म्हणाला, “मी बघतोय, की माझा हा ग्लोब
तुम्हांला बरांच आवडलाय.”
“ओह, हो, मी अशी वस्तू कधीच बघितलेली
नाहीये.”
“चांगली वस्तू आहे. मला, खरं विचाराल तर, रेडिओच्या बातम्या
आवडंत नाहीत. ह्या बातम्या मुलींच वाचतात, आणी त्या जागेची नावं बरोबर
नाही वाचंत. शिवाय, प्रत्येक तीन मुलींमधे एक मुलगी बोबडं बोलते, जणु काही मुद्दामच
अश्या मुलींना निवडण्यांत येतं. माझा ग्लोब कितीतरी पटींनी सोइस्कर आहे, विशेषकरून अश्यासाठी, की मला सगळ्या
घटनांची अगदी बरोब्बर माहिती हवीय. उदाहरणार्थ, हे बघा, भूमंडळाचा हा भाग, ज्याच्या
किना-यापाशी समुद्र आहे? बघा, तो आगीच्या ज्वाळांनी वेढलाय. तिथे युद्ध सुरूं
झालंय. पण थोडं जवळून बघितलं तर आणखी तपशीलसुद्धां बघूं शकाल.”
मार्गारीटा ग्लोबकडे झुकली आणि
तिने बघितलं की पृथ्वीचा तो तुकडा मोठा होत गेला, त्यावर अनेक रंग दिसू लागले
आणि तो उठावदर्शी,
अद्भुत नकाशांत परिवर्तित झाला. नंतर तिने नदीची पातळशी धारपण पाहिली आणि
तिच्याजवळ तिला दिसली एक वस्ती. ते घर, जे एखाद्या छोट्या दाण्यासारखं होतं, मोठं होत गेलं आणि
आगपेटीयेवढं मोठ झालं. अचानक त्या घराची छत आवाज न करतां काळ्या धुराबरोबर वर
उडाली आणि भिंती पडून गेल्या, त्या दोन मजली इमारतीचं काहीसुद्धां शिल्लक नाही उरलं, फक्त त्या
छोट्याश्या ढेराला सोडून, ज्यांतून काळा धूर निघंत होता. आणखी जवळून बघितल्यावर
मार्गारीटाने एका लहानश्या बाईची आकृति पाहिली, जी जमिनीवर लोळली होती, तिच्या जवळ
रक्ताच्या थारोळ्यांत एक लहानसं मूल हात पसरून पडलं होतं.
“बस, येवढंच,” स्मित करंत
वोलान्दने म्हटलं, “तो पाप नाही करूं शकला. अबादोनाच्या6 कामांत कोणतीच
चूक नसते.”
“मला त्याबाजूला असायला नाही
आवडणार,
ज्याच्या
विरुद्ध अबादोना आहे,” मार्गारीटा म्हणाली, “तो कुणाच्या बाजूला आहे?”
“जेवढं जास्त मी तुमच्याशी
बोलतोय,”
प्रेमाने
वोलान्द म्हणाला, “तेवढांच मला विश्वास होतोय, की तुम्हीं एक हुशार महिला
आहांत. मी तुमच्या प्रश्नाचं समाधान करेन. तो क्वचितंच निष्पक्ष वाटतो, आणि दोन्हीं पीडित
बाजूंबद्दल त्याला सहानुभूति आहे. म्हणून दोन्हीं बाजूंचे परिणाम एकसारखेच असतांत.
अबादोना!” वोलान्दने हळूंच म्हटलं, आनि भिंतीतून काळा चष्मा लावलेला एक बारीक माणूस
बाहेर आला. ह्या चष्म्याचा मार्गारीटावर इतका दाट परिणाम झाला की ती एकदम किंचाळली
आणि तिने वोलान्दच्या पायांत आपला चेहरा लपवला.
“आह, पुरे, पुरे,” वोलान्द ओरडला, “आजकालचे लोक किती
घाबरंट आहेत,”
त्याने
हळूच मार्गारीटाच्या पाठीवर थोपटलं, ज्याने तिच्या शरीरांत झणझण झाली, “तुम्हीं बघितलंय ना, की त्याने चष्मा
लावलाय. शिवाय,
आज
पर्यंत असं कधीच झालं नाही, आणि होणारही नाही, की अबादोना वेळेच्या आधी
कुणासमोर प्रकंट झालाय. आणि, मग, मी तर आहेच ना. तुम्हीं माझ्या पाहुण्या आहांत! मी तर
फक्त तुम्हांला दाखवंत होतो.”
अबादोना चुपचाप उभा होता.
“असं शक्य आहे का, की तो एका क्षणासाठी
आपला चष्मा काढेल?” मार्गारीटाने वोलान्दला बिलगंत विचारलं, पण आता ती उत्सुकतेने थरथरंत
होती.
“हे शक्य नाही,” वोलान्दने गंभीरतेने
म्हटलं आणि त्याने अबादोनाला हाताने खूण केली. तो लुप्त झाला. “तुला काय म्हणायचंय
अजाजेलो?”
“महाशय, मला सांगण्याची
परवानगी द्यावी,
- इथे
दोन बाहेरची माणसं आलीयेत : एक सुन्दरी, जी खिदळंत विनंती करतेय की तिला तिच्या
मालकिणीजवळ असू द्यावं, आणि तिच्याबरोबर आहे, क्षमा करा, तिचं डुक्कर.”
“ह्या सुन्दर बायासुद्धां
विचित्रपणांच करतांत,” वोलान्दने शेरा मारला.
“ती नताशा आहे, नताशा,” मार्गारीटा
उद्गारली.
“ठीकाय, तिला आपल्या
मालकिणीजवळ असू दे, आणि डुकराला आचा-यांकडे घेऊन जा!”
“कापून टाकतील?” मार्गारीटाने घाबरून
विचारलं. “दया करा, महोदय, तो निकोलाय इवानोविच आहे, जो आमच्या खालच्या
मजल्यावरचा शेजारी आहे. इथे काही तरी गफ़लत झालीये, त्याच्यावर क्रीम चोपडण्यांत
आलं होतं...”
“शांत राहा,” वोलान्द म्हणाला, “कोण कापतंय त्याला? त्याला तिथेच
आचा-यांबरोबर बसूं द्या, आणखी काही नाही! तुम्हांला पण कळतंच असेल की मी
त्याला नृत्योत्सवांत तर नाही बोलावूं शकंत!”
“ठीक आहे...” अजाजेलो
म्हणाला आणि त्याने पुढे सांगितलं, “अर्धरात्र होत आलीये, मालक.”
“ओह, ठीकाय,” वोलान्द
मार्गारीटाकडे वळला, “तर, मी तुम्हांला विनंती करतोय! आधीच तुमचे आभार मानतो! गोंधळून जाऊं
नका आणि कशालांच भिऊं नका. पाण्याशिवाय दुसरं काहीही पिऊं नका, नाहीतर तुम्हीं
अडखळू लागाल आणि तुम्हांला त्रास होईल. तर, जाऊं या!”
मार्गारीटा गालिच्यावरून
उठली आणि तेव्हांच दारांत प्रकट झाला करोव्येव.
********
तेवीस
सैतानाचा
शानदार नृत्योत्सव
अर्धरात्र होत आली होती, म्हणून घाई
करणं भाग होतं. मार्गारीटाला अंधुकपणे काही तरी दिसलं. तिला मेणबत्त्यांच्या
प्रकाशाची आणि हीरे-जवाहरातांच्या टबची अंधुक आठवण राहिली. जेव्हां मार्गारीटा
टबमधे उतरली, तेव्हां हैला आणि तिच्या मदतीस
असलेल्या नताशाने एका गरम, दाट आणि
लाल द्रवाने तिला अंघोळ घातली. मार्गारीटाने ओठांवर खारटपणा अनुभवला आणि तिला कळलं
की तिला रक्ताने अंघोळ घालताहेत. ह्या रक्तिम स्नानानंतर जे द्रव तिच्यावर ओतण्यांत
आलं, ते होतं – दाट, पारदर्शी,
गुलाबी.
ह्या गुलाबाच्या तेलाने मार्गारीटाचं डोकं गरगरू लागलं. मग तिला एका क्रिस्टलच्या
कोचावर झोपवून तिचं शरीर कोणच्यातरी मोठ्या-मोठ्या, हिरव्या-हिरव्या
पानांनी तोपर्यंत घासलं गेलं, जोपर्यंत
ते चमकायला नाही लागलं. आता बोका पण आत शिरला आणि मदत करूं लागला. तो
मार्गारीटाच्या पायांजवळ बसला आणि तिचे पंजे अश्याप्रकारे चोळू लागला,,
जणू
रस्त्यावर बसून जोडे स्वच्छ करतोय. मार्गारीटाला लक्षांत नाहीये,
की
तिच्या पायांत गुलाबाच्या पाकळ्यांचे जोडे कुणी घातले आणि ह्या जोड्यांवर आपणहूनंच
सोनेरी लेस कशी लागली. एका शक्तीने मार्गारीटाला खेचंत आणूक आरश्यासमोर उभं केलं.
तिच्या केसांत ही-यांचा शाहीमुकुट चमकला. माहीत नाही कुठून करोव्येव पण आला आणि
त्याने मार्गारीटाच्या गळ्यांत एक अण्डाकार फ्रेममधे जडलेली,
वजनदार
चेनला लटकलेली, काळ्या, कुरळ्या
केसाच्या कुत्र्याची आकृति घातली. ह्या आभूषणाने महाराणीवर बरंच ओझं टाकलं. चेन
तिच्या गळ्याला बोचू लागली आणि कुत्र्याच्या आकृतिमुळे तिला पुढे वाकावं लागलं. पण
ह्या चेनमुळे जो त्रास तिला होत होता, त्याचा
पुरस्कार पण मार्गारीटाला लगेच प्राप्त झाला. हा पुरस्कार म्हणजे – तो सम्मान होता,
जो
आता करोव्येव आणि बेगेमोत तिला देत होते.
“काही नाही,
काही
नाही, काही नाही!” करोव्येव स्नानगृहाच्या
दाराजवळ पुटपुटला, “काही उपाय नाहीये,
हे
ज़रूरी आहे, खूपंच ज़रूरी आहे. महाराणी,
तुम्हांला
एक शेवटचा सल्ला द्यायची परवानगी द्या. पाहुण्यांमधे वेगवेगळे प्रकार असतील,
ओह,
खूपंच
वेगवेगळे, पण कोणाहीबद्दल,
महाराणी
मार्गो, पूर्वाग्रह नका ठेवूं! जर तुम्हांला
कोणी आवडला नाही...तरीही, मला कळतंय,
की
तुम्ही चेह-यावर तसं दाखवणार नाही...नाही, नाही,
ह्याबद्दल
विचार सुद्धां करायला नको! त्याच्या लगेच, त्याच
क्षणी, लक्षांत येईल. त्याच्यावर ममता
दाखवावी लागेल, ममता दाखवावी लागेल,
महाराणी.
नृत्योत्सवाच्या होस्टेसला ह्याच्यासाठी शंभर पटीने पुरस्कृत करण्यांत येईल! आणि
हो – कुणालाही सोडू नका. कमीत कमी एक स्मित, जर
बोलायला वेळ नसेल तर, कमीत कमी हळूच डोक्याने खूण,
जे
काही शक्य असेल, पण कुणाचीही उपेक्षा करूं नका,
नाहीतर
ते म्लान होतील...”
आता मार्गारीटा करोव्येव आणि
बेगेमोतबरोबर स्नानगृहातून सम्पूर्ण अंधारांत आली.
“मी, मी,” बोका कुजबुजला, “मी खूण करेन!”
“कर!” करोव्येवने अंधारांतून
उत्तर दिलं.
“नृत्योत्सव!” बोक्याची
कर्कश किंचाळी ऐकूं आली, आणि मार्गारीटाने लगेच किंचाळून काही क्षणांसाठी आपले
डोळे बंद करून घेतले. नृत्योत्सव जणू प्रकाश पुंज घेऊन तिच्यावर आदळला, आणि बरोबर घेऊन आला
हल्ला आणि सुगन्ध. करोव्येवचा हात धरून चालणा-या मार्गारीटाने स्वतःला एका
उष्णकटिबन्धीय जंगलांत बघितलं. लाल मानेचे, हिरव्या शेपट्या असलेले पोपट
वृक्षवल्लींना चिटकंत होते, त्यांच्यावर उड्या मारंत होते आणि ओरडून-ओरडून म्हणंत
होते : “मी प्रसन्न आहे!” पण जंगल लवकरंच संपलं त्याच्या ओलसर, कोंदटपणाच्या जागेवर
आला नृत्योत्सवाचा शीतल हॉल, ज्यांत पिवळ्या, चमचमणा-या स्तंभांच्या रांगा
होत्या. हा हॉलसुद्धां जंगलासारखाच रिकामा होता, फक्त स्तंभांच्या जवळ
डोक्यावर चांदीच्या पट्ट्या बांधलेले, निर्वस्त्र नीग्रो पुतळ्यांसारखे उभे होते.
मार्गारीटाच्या आपल्या ताफ्यासह, ज्यांत न जाणे कुठून अजाजेलो पण मिसळला होता, प्रवेश करतांच
उत्तेजनेने त्यांचे चेहरे मातकट भुरे झाले. आता करोव्येवने मार्गारीटाचा हात सोडला
आणि पुटपुटला : “सरळ ट्यूलिप्सकडे!”
पांढ-या ट्यूलिप्सची एक लहान
भिंत मार्गारीटाच्या समोर प्रकट झाली, तिच्या मागे छोट्या-छोट्या शेड्समधे अनेक दिवे
आणि त्यांच्या मागे फ्रॉक-कोट्स घातलेल्या पाहुण्यांची पांढरी छाती आणि काळे
खांदे. तेव्हां मार्गारीटा समजली की नृत्योत्सवांत आवाज कुठून येत होते. तिच्यावर
वर्षाव झाला तुतारीच्या स्वराचा, आणि त्याहून वेगळा प्रकट झालेला वॉयलिनचा स्वर तिच्या
शरीरावर असा तरंग़ू लागला, जणु रक्तवाहिन्यांमधे वाहणारं रक्त. जवळ-जवळ दीडशे
लोकांचा ऑर्केस्ट्रा ‘पोलोनोइस’ वाजवंत होता.
फ्रॉककोट घालून
ऑर्केस्ट्राच्या समोर उभा असलेला माणूस मार्गारीटाला बघतांच निस्तेज झाला, त्याने स्मित केलं
आणि हाताच्या एका झटक्याने सम्पूर्ण ऑर्केस्ट्राला उभं केलं. क्षणभरासाठीही संगीत
न थांबवतां ऑर्केस्ट्राने उभ्या-उभ्या स्वरलहरींनी मार्गारीटाचं अभिवादन केलं. तो
माणूस वळला आणि त्याने खाली वाकून, हात पसरून अभिवादन केलं, आणि मार्गारीटानेपण स्मित
हास्य करंत त्याच्याकडे बघंत हात हलवला.
“नाही, येवढं पुरेसं नाहीये, पुरेसं नाहीये,” करोव्येव कुजबुजला, “तो रात्रभर झोपणारा
नाहीये. ओरडून त्याला म्हणा : “स्वागत आहे, वाल्ट्ज़ सम्राट!”1
मार्गारीटाने ओरडून तसंच
म्हटलं आणि तिला आश्चर्य वाटलं की घंट्यांची किणकिण असलेला तिचा आवाज, सम्पूर्ण
ऑर्केस्ट्रावर तरंगला. तो माणूस आनंदाने थरथरला आणि त्याने डावा हात छातीवर ठेवला, उजव्या हाताने
पांढरी छडी ऑर्केस्ट्रासमोर फिरवंत राहिला.
“हे पण कमीच आहे, पुरेसं नाहीये,” करोव्येव पुन्हां
कुजबुजला,
“डावीकडे
बघा,
पहिल्या
ओळींतल्या वॉयलिन वादकांकडे, आणि अश्याप्रकारे डोकं हलवा, की प्रत्येक वादकाला असं
वाटेल,
की
तुम्हीं त्याला ओळखलंय. इथे फक्त जगांतील ख्यातनाम व्यक्तीच आहेत. आधी ह्याला, जो पहिल्या बोर्डवर
आहे – तो व्यूताम2 आहे. हो, … खूप छान!...आता पुढे!”
“हा संचालक कोण आहे?” मार्गारीटाने उडताना
विचारलं.
“योहान स्ट्रॉस,” बोका ओरडला, “आणि जर ह्या आधी, दुस-या कोणत्याही नृत्योत्सवांत
असा ऑर्केस्ट्रा वाजला असेल, तर मला कटिबन्धीय जंगलांत झाडाला उल्टा टांगून द्या!
मीच त्याला आमंत्रित केलं होतं! आणि लक्ष द्या, एकसुद्धां आजारी नाही पडला, एकानेही ‘नाही’ म्हटलं नाही.”
पुढच्या हॉलमधे स्तंभांच्या
रांगा नव्हत्या. त्याऐवजी एकीकडे लाल, गुलाबी, दुधासारख्या शुभ्र गुलाबांच्या
भिंती,
आणि
दुसरीकडे - जापानी टेरी-कॅमेलायसची भिंत. ह्या भिंतींच्या मधल्या जागेंत
फवा-यांमधून फसफस करंत तीन तलावांमधे शैम्पेनचे बुडबुडे उडंत होते; ज्यांत एक होती –
पारदर्शी जांभळी, दुसरी – माणिक (लाल), आणि तिसरी – बिलौरी. त्यांच्या जवळून डोक्यावर
लाल पट्टी बांधलेले नीग्रो जात-येत होते, जे चांदीच्या मग्सने ह्या तलावांमधून शैम्पेन
काढून-काढून चपट्या प्याल्यांमधे भरंत होते. गुलाबाच्या भिंतीत एक मोकळी जागा होती, जिथून लाल, स्वॅलोटेल कोट
घातलेला एक माणूस दिसंत होता. त्याच्या समोर अविरत हल्ला होत होता – जॉज़ संगीताचा.
ह्या संचालकाने जसंच मार्गारीटाला बघितलं, तो तिच्यासमोर इतका वाकला, की त्याचे हात
जमिनीला स्पर्श करूं लागले. मग तो सरळ उभा राहिला आणि कर्कश आवाजांत ओरडला, “अल्लीलुइया!”
त्याने आपल्या गुडघ्यावर हात
मारला – एक,
मग
हाताने क्रॉस करंत दुस-यावर – दोन! सगळ्यांत शेवटच्या संगीतज्ञाची प्लेट घेतली आणि
एका स्तंभावर मारली.
तिथून हवेंत तरंगत
मार्गारीटाने बघितलं की हा उत्साही जॉज़ निर्देशक, पोलोनोईसच्या आवाजाशी संघर्ष
करंत,
जो
मार्गारीटाच्या पाठीकडून येत होता, संगीतज्ञांच्या डोक्यावर आपली झांज मारतोय आणि ते
हास्यास्पद भीतीने खाली बसताहेत.
शेवटी ते त्या चौकापर्यंत
आले,
जिथे
मार्गारीटाच्या अंदाजाप्रमाणे ती अंधारांत लैम्प घेऊन येणा-या करोव्येवला भेटली
होती. आता ह्या चौकांत प्रकाशामुळे डोळे दिपंत होते, जो द्राक्षाच्या आकाराच्या
झुंबरांमधून येत होता.
मार्गारीटाला तिथेंच
थांबवण्यांत आलं आणि तिच्या डाव्या हाताच्या खाली एक लहानसा नीलमणीचा स्तंभ प्रकट
झाला.
“जर फारंच त्रास व्हायला
लागला,
तर
ह्याच्यावर हात ठेवूं शकता,” करोव्येव कुजबुजला.
कोण्या काळ्या माणसाने
मार्गारीटाच्या पायांजवळ एक उशी सरकवली, जिच्यावर सोन्याच्या तारांनी एका झब-या
कुत्र्याचं चित्र काढलं होतं. तिच्यावर तिने कुण्याच्यातरी हातांच्या साहाय्याने गुडघा
वाकवून आपला उजवा पाय ठेवला.
मार्गारीटाने इकडे-तिकडे
बघायचा प्रयत्न केला. तिच्या जवळ करोव्येव आणि अजाजेलो उत्सवाच्या मुद्रेत उभे
होते,
ज्यांना
बघून मार्गारीटाला अबादोनाची अंधुकशी आठवण आली. पाठीत गार लहर धावली, तर मार्गारीटाने
वळून बघितलं,
तिच्यामागे
संगमरमरी भिंतीवरून दारूचा झरा वाहंत येऊन बर्फाच्या तलावांत पडतोय. डाव्या
पायाजवळ तिला किंचित ऊब जाणवली, हा बेगेमोत होता.
मार्गारीटा उंचीवर होती, तिच्या पायांच्या
खालून एक भव्य शिडी खाली जात होती. शिडी गालिच्याने झाकलेली होती. खाली, खूप दूर, जणू मार्गारीटा
दुर्बिणीच्या उलट्या टोकातून बघंत होती, एक खूप मोठा हॉल होता. हॉलमधे एक भव्य
फायरप्लेस (शेकोटी) होती, जिच्या गार, अंधा-या जबड्यांत आरामांत पाच टनांचा ट्रक
सामावूं शकला असता. डोळ्यांत खुपणा-या प्रकाशाने आलोकित हा हॉल आणि शिडी रिकामे
होते. आता ब-याच दुरून तुतारीचा आवाज मार्गारीटापर्यंत पोहोचंत होता. अश्या
प्रकारे स्तब्ध,
ते
सगळे,
एक
मिनिट उभे राहिले.
“पाहुणे कुठे आहेत?” मार्गारीटाने
करोव्येवला विचारलं.
“येतील, महाराणी, येतील, इतक्यांतच येतील. त्यांची
जरासुद्धा कमतरता नाही भासणार. आणि इथे त्यांचं स्वागत करण्यापेक्षां मला जंगलांत
लाकडं कापण जास्त आवडलं असतं.”
“लाकड तोडण्याबद्दल काय
बोलतोयंस,”
बडबड्या
बोक्या म्हणाला,
“मी तर
ट्रामगाडीमधे कण्डक्टरची नौकरीसुद्धा केली असती, पण ह्या कामापेक्षां जास्त
वाईट जगांत दुसरं कोणतंही काम नाहीये!”
“सगळं काही आधीच तयार असलं
पाहिजे,
महाराणी,” करोव्येवने
बिघडलेल्या दुर्बिणींत एका डोळ्याने बघंत समजावलं.
“ह्यापेक्षा वाईट आणखी काही
नसतं,
की
पहिलाच पाहुणा विचार करूं लागेल, की त्याला काय करायला पाहिजे, आणी त्याची वैध पत्नी त्याला
टोमणा मारेल,
की ते
सगळ्यांत आधी कां आले. असल्या नृत्योत्सवांना घाणेरड्या नालीतंच फेकून द्यायला पाहिजे, महाराणी!”
“अगदी नालीत,” बोक्याने दुजोरा
दिला.
“अर्ध-रात्र व्हायला दहा
सेकंदापेक्षांसुद्धा कमी वेळ आहे,” करोव्येवने म्हटलं, “बस, इतक्यातंच सुरू होईल.”
मार्गारीटाला हे दहा सेकंद
खूप मोट्ठे वाटले. ते, कदाचित, संपूनपण गेले आणि काहीही झालं नाही. पण तेवढ्यातंच
खाली भव्य फायरप्लेसमधून काहीतरी आवाज आला. त्यांतून एक वध-स्तम्भ उसळून बाहेर
पडला,
ज्याच्यावर
एक अर्धवट सडलेलं कंकाल जोरजोराने झुलंत होतं. ते कंकाल दोरीतून सुटून खाली पडलं, जमिनीवर आदळलं आणी
त्यांतून फ्रॉक-कोट घातलेला, काळ्या केसांचा, चमचमीत जोडे घातलेला सुरेख
तरुण उडी मारून बाहेर निघाला. फायरप्लेसमधून एक अर्धवट सडकं ताबूत बाहेर आलं.
त्याचं झाकण उघडलं आणि त्यातून आणखी एक कंकाल बाहेर निघालं. सुरेख तरुणाने
शूरपणाने त्याच्याकडे उडी मारली आणि आपला
हात वाकवून पुढे केला. दुसरं कंकाल एका निर्वस्त्र चपळ महिलेत परिवर्तित झालं, तिने काळे जोडे
घातले होते. तिच्या डोक्यावर काळे पंख खुपसलेले होते. मग ते दोघं, महिला आणि पुरुष, वर शिडीकडे धावले.
“सगळ्यांत आधी!” करोव्येव
उद्गारला,
“श्रीमान
जैक3 आपल्या अर्धांगिनीबरोबर! महाराणी, तुमच्यासमोर येताहेत, जगांतील सर्वाधिक
मजेदार व्यक्ती. एक वस्ताद बनावट नोटा छापणारे; सरकारशी विश्वासघात करणारे, पण एक कुशल
किमयागार. ह्यांना प्रसिद्धी मिळाली ह्यासाठी,” करोव्येव मार्गारीटाच्या
कानांत कुजबुजला, “की ह्यांनी महाराजांच्या प्रेमिकेला विष दिलं होतं. असं
सगळ्यांबरोबर नाही होत! बघा, किती सुरेख आहेत!”
विवर्ण झालेल्या
मार्गारीटाने,
तोंड
उघडून,
खाली
बघितलं आणि तिला दिसलं की तो वधस्तम्भ आणि ताबूत हॉलच्या बाजूच्या छोट्याश्या
पैसेजमधे लुप्त झाले.
“मी अत्यंत प्रसन्न आहे!”
बोका वर चढंत असलेल्या श्रीमान जैकच्या चेह-याच्या एकदम समोर तोंड करून गरजला.
तेवढ्यांत फायरप्लेसमधून
डोकं नसलेलं छाटलेल्या हाताचं एक कंकाल निघालं, जमिनीवर आदळलं आणि फ्रॉककोट
घातलेल्या पुरुषांत परिवर्तित झालं.
येवढ्यांत श्रीमान जैकची
अर्धांगिनी मार्गारीटाच्या समोर आली होती आणि एक गुडघा टेकून मार्गारीटाच्या
गुडघ्याचं चुम्बन घेत होती.
“महाराणी...” श्रीमान जैकची
अर्धांगिनी कुजबुजली.
“महाराणी अत्यंत प्रसन्न
आहेत!” करोव्येव ओरडला.
“महाराणी...” सुन्दर तरुण
श्रीमान जैक हळुवारपणे म्हणाला.
“आम्ही सगळे भाव विभोर आहोंत,” बोका किंचाळला.
येवढ्यांत अजाजेलोचे ते तरुण
सहकारी निर्जीव,
पण
स्वागतपूर्ण स्मित करंत श्रीमान जैक आणि त्याच्या अर्धांगिनीभोवती गराडा घालून
त्यांना नीग्रोंने हातांत धरलेल्या शैम्पेनच्या प्याल्यांजवळ घेऊन गेले होते.
शिडीवरून एकुलता एक फ्रॉककोटवाला धावंत येत होता.
“ग्राफ़ रॉबर्ट4,” करोव्येवने कुजबुजंत
मार्गारीटाला सांगितलं, “पहिल्यासारखाच मजेदार आहे. लक्ष द्या, महाराणी, किती हास्यास्पद
गोष्ट आहे,
अगदीच
उल्टी : हा सम्राज्ञीचा प्रियकर होता आणि ह्याने आपल्या बायकोला विष देऊन
टाकलं.”
“आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत, ग्राफ,” बेगेमोत ओरडून
म्हणाला.
फायरप्लेसमधून धडपडंत, तुटंत-फुटंत
एकानंतर एक तीन ताबूत निघाले, त्यांच्यानंतर निघाला काळा कोट घातलेला एक माणूस, ज्याला काळ्या
जबड्यातून त्याच्या मागेमागे येणा-याने पाठीवर सुरा मारला. खालून एक दबकी किंचाळी
आली. फायरप्लेसमधून जवळ-जवळ पूर्णपणे क्षत-विक्षत प्रेत निघालं. मार्गारीटाने डोळे
मिटून घेतले आणि लगेच एका हाताने तिच्या नाकाजवळ मिठाची लहानशी कुप्पी सरकावली.
मार्गारीटाला वाटलं, की तो नताशाचा हात होता. शिडी हळू-हळू भरूं लागली होती. आता
जवळ-जवळ प्रत्येक पायरीवर, दुरून एक सारखे दिसणारे, फ्रॉककोट घातलेले पुरुष आणि
त्यांच्याबरोबर निर्वस्त्र महिला होत्या, ज्या फक्त आपल्या केसांत खोचलेल्या पंखांमुळे
आणि जोड्यांच्या रंगांमुळेच वेगळ्या भासंत होत्या.
मार्गारीटाच्या जवळ आली, लंगडंत असलेली, डाव्या पायांत एक
विचित्र लाकडी जोडा घातलेली, ‘नन’ सारख्या झुकलेल्या डोळ्यांची, कृश, नम्र आणि माहीत नाही कां
गळ्यांत हिरवी पट्टी बांधलेली एक महिला.
“कित्ती हिरवी आहे?” मार्गारीटाने
यंत्रवत् विचारलं.
“सगळ्यांत मोहक आणि
प्रतिष्ठित महिला,” करोव्येव कुजबुजला, “आपल्या समोर प्रस्तुत करतो : मैडम तोफ़ाना5, जी नैपल्सच्या
मनमोहक तरुणींमधे आणि पालेर्मोच्या महिलांमधे अत्यंत लोकप्रिय होती, विशेषकरून त्या
महिलांमधे,
ज्या
आपल्या नव-यांना कंटाळल्या होत्या. महाराणी, असं होऊं शकतं कां, की कोणाला आपल्या नव-याचा
वीट येतो?”
“हो,” मार्गारीटाने खोल आवाजांत
उत्तर दिलं,
त्याबरोबरंच
ती दोन फ्रॉककोटवाल्यांचं स्वागतसुद्धा करंत होती, जे एकामागून एक तिच्या
हाताचं आणि गुडघ्याचं चुम्बन घेत होते.
“तर ही,” करोव्येव
मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला आणि त्याबरोबरंच ओरडला, “ ड्यूक, शैम्पेनचा एक ग्लास!
मी भाव-विभोर आहे! तर, ही मैडम तोफ़ाना ह्या दुर्दैवी महिलांशी जवळीक साधून त्यांना
लहान-लहान कुप्यांमधे कोणचंतरी द्रव विकायची. बायको हे द्रव नव-याच्या सूपमधे
ओतायची. तो ते सूप खायचा. प्रेम दाखवण्याबद्दल बायकोचे आभार मानायचा आणि त्याला
खूप ताजं आणि छान वाटायचं. ही गोष्ट वेगळीये की काही तासानंतर त्याला खूप तहान लागायची.
मग तो बिछान्यावर पडायचा आणि एक दिवसानंतर ती नैपल्सची सुंदरी, जिने आपल्या नव-याला
सूप पाजलं होतं,
मुक्त व्हायची, जणु वसंत ऋतूची
हवा.”
“आणि तिच्या पायांत हे काय
आहे?”
मार्गारीटाने
विचारलं. ती त्या पाहुण्यांसमोरसुद्धां हात पुढे करंत राहिली, जे मैडम तोफ़ानाला
मागे सोडंत येत होते, “आणि तिच्या मानेवर ही हिरवंळ कशाला आहे? मान तुटलीये कां?”
“मी अत्यंत प्रसन्न आहे, सामन्त!” करोव्येव
ओरडला आणि तेव्हांच त्याने मार्गारीटालापण उत्तर दिलं, “सुरेख मान आहे, पण जेलमधे
तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली. तिच्या पायावर, महाराणी स्पैनिश बूट6
आहे,
आणि ही
पट्टी अश्यासाठी, की जेव्हां जेलवाल्यांना कळलं की जवळ-जवळ पाचशे नव-यांनी नैपल्स
आणि पालेर्मो नेहमीसाठी सोडलंय, तेव्हां त्यांने चिडून मैडम तोफानाचा गळांच दाबला.”
“मी कित्ती भाग्यवान आहे, सावळी महाराणी, की मला हे सौभाग्य
लाभलं.” तोफाना ने ननसारख्या स्टाइलमधे गुडघ्यावर वाकायचा प्रयत्न करंत म्हटलं.
स्पैनिश बूट तिच्या ह्या कामांत अडथळा आणंत होता. करोव्येव आणि बेगेमोतने तिला
उठायला मदत केली.
“मी अति प्रसन्न आहे,” मार्गारीटाने
इतरांकडे हात पुढे करंत तिला म्हटलं.
आता तर शिडीवर खालून
येणा-यांची रांगचं लागली. मार्गारीटा हात वर करंत होती आणि खाली करंत होती, आणि दात दाखवंत
स्मित करंत पाहुण्यांच स्वागत करंत होती. जिन्यांमधल्या सपाट जागेवर हवेत सारखी
भुणभुण भरून गेली होती; मार्गारीटा ज्या नृत्य हॉल्सला सोडून आली होती, तिथून समुद्राच्या
लाटांसारख संगीत ऐकूं येत होतं.
“आणि ही...कंटाळवाणी
बाई,”
आता
करोव्येव कुजबुजायच्या ऐवजी मोठ्याने म्हणाला, कारण की त्याला माहीत होतं, की ह्या हल्ल्यांत
त्याचा आवाज लोकांना ऐकू येणार नाही, “हिला नृत्योत्सवांच वेड आहे, पण नेहमी आपल्या
रुमालाबद्दल फिर्याद करण्याचाच विचार करत असते.”
मार्गारीटाने नजरेने त्या
बाईला शोधलं,
जिच्याकडे
करोव्येवने खूण केली होती. ही एक वीस वर्षाची अद्वितीय सुन्दरी होती. तिच्या
डोळ्यांत खूपंच बेचैनी आणि लोचंटपणा दिसंत होता.
“कसला रुमाल?” मार्गारीटाने
विचारलं.
“तिच्यासाठी एक सेविका
नेमलीये,”
करोव्येवने
स्पष्ट केलं,
“आणि
ती मागच्या तीस वर्षांपासून हिच्या लहानश्या टेबलवर रात्री छोटासा रुमाल ठेवून
देते. जशींच ही सकाळी उठते, हिला तो रुमाल दिसतो. हिने त्याला चुलींत टाकलं, नदींत फेकलं, पण त्याने काहीही
झालं नाही.”
“कसला रुमाल?” हात वर करंत आणि
खाली आणंत मार्गारीटान कुजबुजली.
“निळ्या किनारीचा रुमाल.
गोष्ट अशी आहे,
की
जेव्हां ही रेस्टॉरेन्टमधे काम करायची, तेव्हां मालकाने हिला खाली तळघरांत बोलावलं, आणि नऊ महिन्यांनी
हिने एका बाळाला जन्म देला. त्याला जंगलांत घेऊन गेली आणि त्याच्या तोंडांत रुमाल
खुपसला. मग बाळाला जमिनींत पुरून टाकलं. न्यायालयांत तिने सांगितलं, की तिच्याजवळ बाळाचं
पोट भरण्यासाठी काहीच नव्हतं.”
“आणि ह्या रेस्टॉरेन्टचा
मालक कुठे आहे?”
मार्गारीटाने
विचारलं.
“महाराणी,” अचानक खालून बोका
ओरडला,
“मला तुम्हांला
एक विचारायची परवानगी द्या : इथे मालकाचं काय काम आहे? त्याने तर जंगलांत बाळाचा
गळा नाही दाबला.”
मार्गारीटाने स्मित हास्य
करंत आणि उजवा हात हालवंत, डाव्या हाताचे तीक्ष्ण नखं बेगेमोतच्या कानांत घुसवले
आणि कुजबुजंत म्हणाली, “तू, डुक्कर कुठला, पुन्हां जर का दुस-यांच्या बोलण्यांत टपकला, तर...”
बेगेमोतने नृत्योत्सवासाठी
बेसु-या अश्या आवाजांत चीं-चीं केलं आणि चिडक्या आवाजांत म्हणाला:
“महाराणी…कान सुजून जाईल...मी
सुजलेल्या कानाने नृत्योत्सवाची मजा कां घालवूं?- मी तर न्यायसंगतंच बोललो
होतो...न्यायाच्या दृष्टीने...गप्प बसेन, गप्प बसेन...समजा की मी बोका नसून मासा आहे, पण माझा कान तर
सोडा.”
मार्गारीटाने कान सोडून दिला
आणि तिच्यासमोर याचनेचा भाव असलेले उदास डोळे आले.
“मी भाग्यशाली आहे, होस्टेस महाराणी, की तुम्हीं मला
पौर्णिमेच्या ह्या शानदार नृत्योत्सवांत आमंत्रित केलं.”
“आणि मलासुद्धां,” मार्गारीटाने उत्तर
दिलं,
“तुम्हांला
भेटून आनंद झालांय. खूप आनंद झालांय. तुम्हांला शैम्पेन घ्यायला आवडेल कां?”
“तुम्हीं काय करतांय, महाराणी?!” करोव्येव आवाज न
करता वेड्यासारखा, मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला, “ट्रैफिक थांबून जाईल.”
“मला आवडेल,” त्या बाईने
याचनेसारख्या स्वरांत म्हटलं, आणि एकदम यंत्रवत् म्हणू लागली : - फ्रीडा, फ्रीडा, फ्रीडा7!
माझ नाव फ्रीडा आहे, महाराणी!”
“तर आज तू शुद्ध हरपेपर्यंत
पी,
फ्रीडा, आणि कोणत्याच
गोष्टीची काळजी करू नको,” मार्गारीटाने म्हटलं.
फ्रीडाने आपले दोन्हीं हात
मार्गारीटाच्या पुढे केले, पण करोव्येव आणि बेगेमोतने अगदी अलगदपणे तिचे हात
आपल्या हातांत घेतले, आणि ती गर्दीत हरवली.
आता खालून जणु माणसांची
भिंतंच वर येत होती, जणु ते त्या चौकावर हल्ला करण्यासाठी सरसावंत होते, जिथे मार्गारीटा उभी
होती. बायकांचे नग्न शरीरं फ्रॉककोट घातलेल्या माणसांच्या मधून-मधून वर चढंत होते.
मार्गारीटाकडे तरंगत येत होते सावळे, गोरे, कॉफीच्या रंगाचे आणि एकदम
काळे शरीर. लाल,
काळ्या, बदामी, सोनेरी, अळशीसारख्या केसांत
चमकंत होते,
तरंगत
होते – अनेक बहुमूल्य खड्यांमधून निघणारे रंगीबिरंगी प्रकाश-किरण. त्यांच्या
छातीवर हीरे-जवाहिरांत असे दमकंत होते, जणु कुणी माणसांच्या ह्या पुढे वाढंत असणा-या
जमावावर प्रकाशाचे थेंब शिंपडलेयंत. आता मार्गारीटाला दर सेकंदाला आपल्या
गुडघ्यावर कुणाच्यातरी ओठांचा स्पर्श जाणवंत होता, दर सेकंदाला ती आपला हात
चुम्बनासाठी पुढे करंत होती. तिच्या चेह-याने जणु प्रसन्न-स्वागताचा मुखवटांच
घातला होता.
“मी फार प्रसन्न आहे,” करोव्येव एका सुरांत
गात होता,
“आम्हीं
प्रसन्न आहोत...महाराणी प्रसन्न आहेत...”
“महाराणी प्रसन्न आहेत,” अनुनासिक स्वरांत पाठीमागून
अजाजेलो भुणभुणायचा.
“मी प्रसन्न आहे!” बोका
ओरडायचा.
“मार्क्वेज़8,” करोव्येव बडबडला, “हिने आपल्या
वडिलांना,
दोन
भावांना आणि दोन बहिणींना संपत्तिसाठी विष दिलं होतं...महाराणी प्रसन्न आहेत. मैडम
मीन्किन9 आह, कित्ती छान आहे! थोडी नर्वस ज़रूर आहे. मोलकरणीच्या
चेह-याला केस कुरळे करण्याच्या क्लिपने कां भाजायचं होतं! अश्या परिस्थितीत सुराच
खुपसतांत! महाराणी प्रसन्न आहेत! महाराणी, एक सेकंद, लक्ष द्या : सम्राट
रुदोल्फ़10, सम्मोहक आणि कीमियाकार. आणखी एक अलकीमी – सुळावर चढवलं होतं. ओह, हीच ती! ओह, हिचं कित्ती सुरेख
वेश्यालय होतं स्त्रासबुर्गमधे! आम्ही प्रसन्न आहोत! मॉस्कोची ड्रेसमेकर11!
तिच्या अलौकिक कल्पनाशक्तिसाठी आम्हांला ती खूप आवडते. ती एक हॉटेल चालवायची आणि
तिने एक धोकादायक, हास्यास्पद काम केलं होतं : भिंतीत दोन भोकं केले होते...”
“बायकांना कळलं नाही?” मार्गारीटाने
विचारलं.
प्रत्येकीला माहीत होतं, महाराणी,” करोव्येव म्हणाला, “मी प्रसन्न आहे! हा
वीस वर्षाचा तरुण लहानपणापासूनंच आपल्या कल्पनाशक्तीसाठी प्रसिद्ध होता. हा विचारक
आणि आश्चर्यजनक माणूस होता. एक मुलगी त्याच्यावर प्रेम करंत होती, पण ह्याने तिला
वेश्यालयांत विकून टाकलं.”
खालून जणु एका नदीचा
प्रवाहंच येत होता, जिचा शेवटंच दिसंत नव्हता. हिचं उद्गमस्थळ, ते अवाढव्य
फायरप्लेस तिच्यांत निरंतर भरणाच टाकंत होतं. अश्या प्रकारे एक तास गेला आणि दुसरा
चालू होता. आता मार्गारीटाला जाणवलं की तिची चेन पहिल्यापेक्षा जास्त जड झालीये.
हातालापण काहीतरी विचित्रसं जाणवंत होतं. आता दर वेळेला हात उचलायच्या आधी तिच्या
चेह-यावर वळ पडूं लागले. करोव्येवच्या मनोरंजक गोष्टी आता तिचं लक्ष वेधंत
नव्हत्या. तिरप्या डोळ्यांचे मंगोल चेहरे, काळे चेहरे, गोरे चेहरे निरर्थक
झाले;
कधी-कधी
ते एकमेकांत मिसळून जायचे आणि त्यांच्या मधली हवा थरथरंत वाहू लागायची.
मार्गारीटाचा उजवा हात अचानक दुखूं लागला, त्यांत जणु कोणी सुई गडवंत
होतं;
आणि
दात मिटून तिने आपल्या जवळ ठेवलेल्या स्तंभावर कोपर टेकवलं. एक विचित्र आवाज...जणु
पक्ष्यांचे पंख फडफडताहेत, आता मागच्या हॉलमधून येत होता. पूर्णपणे कळलं की
तिथे पाहुणे नृत्य करताहेत आणि मार्गारीटाला वाटलं, की ह्या विशाल हॉलच्या मजबूत
संगमरमरी भिंती,
मोजाइकची
आणि क्रिस्टलची फरशीपण एका लयींत धडधड करताहेत.
मार्गारीटाला ना तर गेयस
सीज़र कलिगुलांत12 काही उत्सुकता शिल्लक होती, आणि मेसालिनां13 सुद्धां
तिचं लक्ष वेधंत नव्हती. आता ती कोणत्याही राजा, किंवा ड्यूक, किंवा सरदार, किंवा आत्मघाती, किंवा विष देणा-यांत
रस घेत नव्हती. त्यांची सगळ्यांची नावं तिच्या डोकांत गड्ड-मड्ड झाली, चेहरे एकमेकांत
मिसळले. तिच्या डोक्यांत फक्त एकंच दुःखी चेहरा शिल्लक उरला, अगदी ज्वाळांसारख्या
दाढीने सजलेला माल्यूता स्कुरातोवचा14 चेहरा. मार्गारीटाचे पाय थरथरंत
होते. प्रत्येक क्षणाला तिला भीति वाटंत होती की डोळ्यांतून अश्रू वाहूं लागतील.
सगळ्यांत जास्त दुखंत होता तिचा उजवा गुडघा, ज्याचं अतिथी चुम्बन घेत
होते. नताशाच्या हाताने किती तरी वेळा ह्या गुडघ्याला कोणत्यातरी सुगंधित द्रवाचा
हळुवार लेप लावला होता तरीही तो सुजला होता, त्याची त्वचा निळी पडली
होती. तिसरा तास संपता-संपता मार्गारीटाने अगदीच असहाय, कोमेजल्या नजरेने खाली
बघितलं आणि आनंदाने थरथरली: पाहुण्यांची रांग पुष्कळंच लहान झाली होती.
“नृत्य-समारोहांचे नियम
सगळीकडे एकसारखेच असतात, महाराणी,” करोव्येव कुजबुजला, “आता ही लाट खाली पडायला
लागलीये. मला विश्वास आहे, की शेवटचे काही क्षणसुद्धां आपण सहन करूं. हे
ब्रोकेनचे काही भटके लोक आहेत. ते नेहमी शेवटीच येतांत. हो, हे तेच आहेत. दोन
दारुडे वेताळ...बस? ओह, नाही, आणखी एक आहे; नाही, दोघं15 आहेत!”
दोन शेवटचे पाहुणे पाय-या
चढंत होते.
“हो, हा तर कुणी नवा आहे.”
करोव्येवने लेन्समधे बघंत म्हटलं, “ओह, हो, हो, एकदा अजाज़ेलो त्याला भेटला होता आणि कोन्याक
पिता-पिता त्याने सल्ला दिला होता, की एका विशिष्ठ माणसाचा, ज्याच्या रहस्योद्घाटनाची
त्याला भीती होती, काटा कसा काढला पाहिजे. त्याने आपल्या मित्राला, जो नेहमी त्याच्यावर
अवलम्बून राहायचा, खोलीच्या भिंतींवर विषाचा शिडकाव करण्याचा हुकूम दिला...”
“त्याचं नाव काय आहे?” मार्गारीटाने
विचारलं.
“ओह, खरं म्हणजे अजून ते मलाही
माहीत नाही,”
करोव्येवने
उत्तर दिलं,
“अजाज़ेलोला
विचारावं लागेल.”
“आणि त्याच्याबरोबर कोण आहे?”
“तोच, त्याचा आज्ञाकारी
सेवक. मी प्रसन्न आहे!” करोव्येव शेवटच्या दोघांचं स्वागत करंत ओरडला.
शिडी रिकामी झाली. सावधगिरी
बाळगंत त्यांनी आणखी दोन मिनिट वाट पाहिली, पण फायरप्लेसमधून आणखी कोणी
बाहेर नाही आलं.
एका सेकंदानंतर मार्गारीटा
माहीत नाही कशी,
त्याच
खोलींत पोहोचली जिथे स्नानगृह होतं आणि तिथे हातापाय प्रचण्ड दुखंत असल्यामुळे ती
रडंत-रडंत फरशीवर लोळून गेली. पण हैला आणि नताशाने तिला धीर देत पुन्हां रक्ताने
स्नान घातलं,
पुन्हां
तिच्या शरीराला चोळलं आणि मार्गारीटाच्या जीवांत जीव आला.
“आणखीन एकदा, महाराणी मार्गो,” जवळंच प्रकट झालेला
करोव्येव म्हणाला, “सगळ्या हॉल्समधे जावं लागेल, ज्याने सम्माननीय
पाहुण्यांना दुर्लक्षित केल्यासारखं वाटू नये.”
आणि मार्गारीटा पुन्हां
स्नानगृहातून उडाली. ट्यूलिप्सच्या भिंतीजवळच्या मंचावर, जिथे संगीत-सम्राटाचं
वाल्ट्ज़ वाजंत होतं, आता वानर-जॉज़ सुरूं होतं. विशालकाय, केसाळ कल्ले असलेला गुरिल्ला, हातांत तुतारी घेऊन
मोठ्या कष्टाने नृत्य करंत ऑर्केस्ट्राचं संचालन करंत होता. ओरांग उटांग एका ओळींत
बसले होते आणि चकचकीत तुता-या वाजवंत होते. त्यांच्या खांद्यांवर हातांत
हार्मोनियम घेऊन प्रसन्न चिम्पांजी बसले होते. दोन, सिंहासारखी दाढी असलेले
वनमानुषासारखे माकड पियानो वाजवंत होते, पण लंगूरांच्या, विशालकाय मैण्ड्रिल्सच्या आणि
लहानग्या मार्मोसेट्सच्या हातांत असलेल्या सेक्सोफोन, वायलिन आणि ड्रम्सच्या
हल्ल्यांत त्यांचा आवाज ऐकूं येत नव्हता. काचेच्या फरशीवर असंख्य जोड्या आपल्या
चपळ आणि सुरेख नृत्याने आश्चर्यचकित करंत होत्या. त्या एकाच दिशेंत वळायच्या, एखाद्या
भिंतीसारख्या चालायच्या, जणु आपल्या रस्त्यांतून सगळं काही बाजूला करतील.
नृत्य करणा-या जोडप्यांच्या डोक्यांवर सजीव मखमली फुलपाखरू उडंत होते, छतामधून फुलांचा
पाऊस पडंत होता. जेव्हां वीज बंद व्हायची, तेव्हां स्तंभांच्या टोकांवर
असंख्य काजवे चमकू लागायचे आणि हवेंत दलदली-दिवे तरंगू लागायचे.
मग मार्गारीटा एक विशाल तलाव
असलेल्या हॉलमधे आली, ज्याच्या चारीकडे स्तंभांची रांग होती. विशालकाय काळा नेपच्यून
आपल्या जबड्यातून गुलाबपाणी फेकंत होता. तलावातून मदमस्त करणारा शैम्पेनचा सुगंध
येत होता. इथे एक वेगळीच प्रसन्नता दिसंत होती. बायका खिदळंत आपले जोडे फेकून
द्यायच्या आणि पर्स आपल्या मित्राकडे किंवा नीग्रोच्या हातांत ठेवायच्या, जे टॉवेल्स घेऊन
पळंत येत होते,
आणि
किंचाळी मारंत पक्ष्यासारख्या पाण्यांत उडी मारायच्या. फेसाळ लाटा वर यायच्या. ह्या
मोट्ठ्या तलावाचा क्रिस्टलचा तळसुद्धा खाली असलेल्या प्रकाशाने आलोकित होत होता, आणि त्यांत पोहंत
असलेले चांदी सारखे शरीरं दिसंत होते. तलावांतून बायका पूर्णपणे मदमस्त होऊन बाहेर
पडायच्या. त्यांचं खिदळणं स्तंभांमधून घुमंत होतं, जसं सार्वजनिक स्नानगृहांत
असतं.
ह्या सगळ्या गोंधळांत फक्त
एक पूर्णपणे झिंगलेला चेहरा लक्षांत राहिला – भावहीन डोळ्यांचा, पण ह्या
भावहीनतेतूनसुद्धां जणु विनंती करंत असलेला; आणि फक्त एकंच शब्द लक्षांत
राहिला – ‘फ्रीडा’! दारुच्या वासाने
मार्गारीटाचं डोकं भणभणू लागलं. तिला तिथून निघून जावसं वाटलं, पण तेवढ्यांतच
बोक्याच्या एका करामातीने तिला थांबवून ठेवलं. बेगेमोतने नेपच्यूनच्या जबड्याजवळ
जाऊन काही तरी केलं, ज्याने फुसफुसकरंत हल्ला करंत असलेली, बेफ़ाम करणारी शैम्पेनची धार
बंद झाली. नेपच्यून आता एका खेळकर, फेसाळ द्रवाच्या ऐवजी एक गडद पिवळी धार फेकू लागला.
बायका किंचाळल्या, ‘कोन्याक!’ आणि त्या उड्या
मारून तलावापासून दूर जाऊन स्तंभांच्या मागे चालल्या गेल्या. काही क्षणांतच तलाव
पूर्ण भरून गेला आणि बोका हवेंत तीन कोल्यांट्या मारून, शिगोशीग भरलेल्या कोन्याकमधे पडला. तो बाहेर निघाला –
फुरफुर करंत – टायची गाठ सुटलेली होती, मिशांचा सोनेरी रंग गायब झाला होता, त्याची
दुर्बिणसुद्धां हरवली होती. बेगेमोतसारखंच करण्याचा प्रयत्न केला फक्त एकाने, त्याच ड्रेसमेकरने
आणि तिच्या एक अनोळखी मुलेट्टो (संकरित रक्ताच्या – अनु.) तरुण मित्राने.
हे दोघं कोन्याकच्या दिशेने धावले, पण तेवढ्यांत करोव्येवने मार्गारीटाचा हात धरला आणि
ते आंघोळ करणा-यांना सोडून निघून गेले.
मार्गारीटाला वाटलं, जणु ती कुठेतरी उडंत
चाललीये,
जिथे
विशाल दगडांच्या तलावांत शिंपल्यांचे पहाड होते. मग ती त्या काचेच्या फरशीवरून
उडाली,
जिच्याखाली
जणु नरकातल्या ज्वाळांसारख्या भट्ट्या पेटल्या होत्या, ज्यांच्या मधून फिरंत होते
सैतानासारखे पांढरे आचारी. मग आणखी कुठे, कुठे, हे समजण्याची शक्ति आता ती
गमावून बसली होती; जिथे काळ्या, अंधा-या गोदामांमधे कसलेतरी दिवे जळंत होते, जिथे मुली धगधगत्या
शेगड्यांवरून गरमागरम माँस प्लेट्स मधे ठेवून देत होत्या; जिथे तिच्या स्वास्थ्यासाठी
मोठाले पेग्स प्यायलेजात होते. मग तिने बघितले पांढरे अस्वल, जे स्टेजवर
हार्मोनियम वाजवंत कमारीन्स्की16 डान्स करंत होते. मग बघितलं जादुगार
सलमान्द्राला17,जो आगीतसुद्धां जळूं शकंत नव्हता; आणि तिची शक्ती
पुन्हां क्षीण होऊं लागली.
“बस, शेवटची फेरी,” करोव्येव दिलगिरीने
कुजबुजला,
“आणि
मग आपली सुट्टी.”
करोव्येवसोबंत ती पुन्हां
नृत्याच्या हॉलमधे आली, जिथे पाहुणे आता नृत्य नव्हते करंत, ते स्तम्भांच्या
अधे-मधे उभे होते. हॉलचा मध्य भाग रिकामा सोडलेला होता. मार्गारीटाला आठवंत नाही, की तिला ह्या
रिकाम्या भागांत प्रकट झालेल्या मंचावर चढण्यास कुणी मदत केली. जेव्हां ती वर चढली, तेव्हां दूर कुठे
तरी अर्ध-रात्रीचे घण्टे वाजले, जी तिच्या मते केव्हांच संपायला हवी होती. शेवटच्या
घंट्याला पाहुण्यांच्या गर्दीत शांतता पसरली. तेव्हां मार्गारीटाने पुन्हां
वोलान्दला बघितलं. तो अबादोना, अजाज़ेलो आणि अबादोना सारख्या दिसणा-या काही काळ्या
तरुणांबरोबर येत होता. आता मार्गारीटाने पाहिलं की तिच्यासाठी बनवलेल्या स्टेजच्या
समोरंच आणखी एक स्टेज होता – वोलान्दसाठी. पण तो त्याच्यावर नाही चढला.
मार्गारीटाला ह्या गोष्टीचसुद्धां आश्चर्य वाटलं, की वोलान्द नृत्योत्सवाच्या
ह्या अंतिम महान चरणांत तसाच आला होता, जसा तो आपल्या शयनकक्षांत होता. त्याच्या
खांद्यांवर तोच घाणेरडा, डाग पडलेला गाउन18 लोंबकळंत होता, पायांत तेच
चुरगळलेले जोडे होते. वोलान्दच्या हातांत होती उघडी तलवार, पण ह्या तलवारीचा उपयोग तो
चालतांना आधार देणा-या काठीसारखा करंत होता. लंगडंत येताना वोलान्द त्याच्यासाठी
बनवलेल्या स्टेजच्या जवळ थांबला आणि लगेच अजाज़ेलो त्याच्यासमोर हातांत एक प्लेट
घेऊन आला. ह्या प्लेटमधे एका माणसाचं कापलेलं डोकं होतं, ज्याचे समोरचे दात तुटले
होते. हॉलमधे नीरव शांतता होती, जिला फक्त एकदा एका अजबश्या घण्टीच्या आवाजाने भंग
केलं,
जी
प्रवेशद्वारावर लागलेली असते.
“मिखाइल अलेक्सान्द्रोविच,” वोलान्द हळूच त्या डोक्याकडे
वळला,
आणि
तेव्हां मेलेल्या माणसाच्या पापण्या उघडल्या. थरथर कापंत मार्गारीटाने बघितले
निर्जीव चेह-यावर जिवन्त, विचारांत गढलेले, पीडा झेलणारे डोळे. “सगळं अगदी तस्संच
झालं,
खरंय
ना?”
वोलान्द
डोक्याच्या डोळ्यांमधे डोकावंत पुढे म्हणाला, “डोकं कापलं एका महिलेने, मीटिंग झालींच नाही, आणि मी तुमच्या
फ्लैटमधे राहतोय. हे प्रमाण आहे आणि प्रमाण- जगातील सर्वांत हट्टी गोष्ट आहे. पण
आपल्याला आतां पुढच्या गोष्टीबद्दल कुतूहल आहे, त्या दुर्घटनेंत नाही, जी घडून गेलेली आहे.
तुम्हीं नेहमी जोरजोरांत ह्या सिद्धांताचं प्रतिपादन करंता आला आहांत, की डोकं कापल्यानंतर
जीवन संपुष्टांत येतं, ते राख बनून अस्तित्वहीन होऊन जातं. मला आपल्या सगळ्या
पाहुण्यांच्या उपस्थितीत तुम्हांला हे सांगताना आनंद होतोय, माझे पाहुणे कोण्या
दुस-याच सिद्धंताचे प्रमाण असले तरी, की तुमचा सिद्धांत भक्कम आणि बुद्धिमत्तापूर्ण
आहे. पण,
जसं
सर्वविदित आहे,
सगळ्या
सिद्धांतांच एक दुस-यामुळेच अस्तित्व आहे. ह्यांच्यापैकी एक आहे, की प्रत्येकाला
त्याच्या विश्वासानुसारंच19 फळ मिळतं. हो, असंच होईल! तुम्हीं
अस्तित्वहीन व्हाल, आणि मला त्या प्याल्यांतून - ज्यांत तुम्हीं परिवर्तित
होणार आहे – अस्तित्वासाठी पिताना आनन्द होईल.”
वोलान्दने तलवार उचलली. तेवढ्यांत
डोक्याच्या पापण्या विझून काळ्या झाल्या आणि वाळून गेल्या, मग तुकडे-तुकडे होऊन
विखुरल्या;
डोळे
गायब झाले आणि मार्गारीटाला लवकरंच दिसली पिवळंट, पाचूचे डोळे आणि मोत्याचे
दात असलेली,
सोन्याच्या
आधारावर ठेवलेली कवटी. कवटीच झाकण झटक्याने उघडलं.
“अगदी ह्याच क्षणी, मालक,” करोव्येवने वोलान्दची
प्रश्नार्थक दृष्टी बघून म्हटलं, “तो तुमच्या समोर येईल. ह्या कबरीसारख्या शांततेत मी
त्याच्या चकचकीत जोड्यांची करकर आणि त्या प्याल्याची किणकिण, जो त्याने शेवटचा
टेबलवर ठेवला होता, आपल्या जीवनाची शेवटची शैम्पेन पिऊन. हा घ्या, तो आलाय.”
हॉलमधे वोलान्दकडे एक नवा, एकटा पाहुणा येताना
दिसला. वरून तो इतर पुरुष पाहुण्यांहून वेगळा नव्हता, फक्त एक गोष्ट सोडली तर :
पाहुणा घाबरल्यामुळे अडखळंत होता, जे दुरूनही दिसंत होतं. त्याचे गाल लाल झाले होते, डोळे भीतियुक्त
चंचलतेने पळंत होते. पाहुणा स्तम्भित झाला होता, आणि ते स्वाभाविकंच होतं ; त्याला इथली प्रत्येक
गोष्ट आश्चर्यचकित करंत होती, विशेषकरून वोलान्दची वेशभूषा.
पण पाहुण्याचं स्वागंत
अत्यंत प्रेमाने केलं गेलं.
“ओह, प्रिय सामन्त मायकेल,” स्वागतपूर्ण हास्य
करंत वोलान्द पाहुण्याकडे वळला, ज्याचे डोळे आतापर्यंत कपाळावर चढले होते, “तुमचा परिचय देताना
मला आनन्द होतोय,” वोलान्दने आता पाहुण्यांकडे वळून म्हटलं, “आदरणीय सामन्त मायकेल, जे मनोरंजन समितींत
परदेशी पर्यटकांना राजधानीच्या दर्शनीय स्थळांची ओळख करून देतात.”
आता मार्गारीटा घाबरली, कारण की तिने ह्या
मायकेलला ओळखलं होतं. तिने त्याला मॉस्कोच्या थियेटर्स आणि हॉटेल्समधे अनेकदा
बघितलेलं होतं. ‘कदाचित...’, मार्गारीटाने विचार
केला,
‘हा
सुद्धां मरून गेलाय?’ पण तेवढ्यांतच सगळ स्पष्ट झालं. “प्रिय सामन्त,” वोलान्दने
प्रसन्नतेने स्मित करंत आपलं बोलणं चालू ठेवलं, “इतके मुग्ध झाले, की मॉस्कोत माझ्या
आगमानाबद्दल कळल्यावर त्यांनी लगेच मला फोन केला आणि आपली सेवा प्रदान करण्याचा, म्हणजेच मॉस्कोच्या
दर्शनीय स्थळाना भेट देण्याबद्दल, प्रस्ताव ठेवला. बरोबरंच आहे, मला त्यांना इथे आमंत्रित
करण्यांत आनंदच झालाय.”
“तर, सामंत महाशय,” एकदम जवळीक दाखवंत
वोलान्दने आपला आवाज खाली केला आणि म्हणाला, “तुमच्या असीम उत्सुकतेबद्दल
अफवा पसरताहेत.
असं
ऐकलंय की तुमची उत्सुकता आणि बडबड्या स्वभाव लोकांचं लक्ष वेधताहेत. शिवाय काही
दुष्ट लोक हेसुद्धां म्हणू लागले आहेत, की तुम्हीं एजेण्ट आणि हेर आहांत. शिवाय हा
अंदाज़पण लावण्यांत येतोय की ह्या सगळ्या गोष्टींमुळे महिन्याभरांत तुमचा दुर्दैवी
अंत होणार आहे. तर, तुम्हांला ह्या कंटाळवाण्या प्रतीक्षेपासून वाचवण्यासाठी आम्हीं
विचार केला,
की
तुमची मदत करावी. तुम्हीं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलून काही ऐकण्याची-बघण्याची
इच्छा प्रकट केली होती, त्याच गोष्टीचा फायदा आम्हीं घेतलाय.”
सामंतचा चेहरा
अबादोनापेक्षाही पिवळा पडला. मग एक आश्चर्याची गोष्ट झाली. अबादोनाने
सामंताच्यासमोर उभे राहून एका क्षणासाठी आपला चश्मा काढला. ह्याच वेळी अजाज़ेलोच्या
हातांत काहीतरी चमकलं, टाळी वाजल्यासारखा आवाज झाला आणि सामंत खाली जमिनीवर पडू लागला.
त्याच्या छातीतून लाल रक्ताचा फवारा निघून त्याच्या स्टार्च लावलेल्या शर्टाला आणि
जैकेटला भिजवूं लागला. करोव्येवने ह्या उसळत्या धारेखाली कवटीचा प्याला ठेवला आणि
भरल्यावर वोलान्दला दिला. आतापर्यंत सामन्तचं निर्जीव शरीर फरशीवर पडून गेलं होतं.
“तुमच्या स्वास्थ्यासाठी, मित्रांनो,” वोलान्दने हळूच
म्हटलं आणि प्याला उचलून ओठांकडे नेला.
तेवढ्यांत एक अद्भुत
परिवर्तन झालं. डाग़ असलेला गाउन आणि चुरगळलेले जोडे गायब झाले. वोलान्द एका काळ्या
पोषाकांत दिसला,
कम्बरेंत
स्टीलची तलवार लटकवून. तो लगेच मार्गारीटाच्या जवळ आला आणि तिच्याजवळ प्याला आणंत
अधिकारपूर्ण स्वरांत म्हणाला, “पी!”
मार्गारीटाचं डोकं गरगरलं, ती अडखळू लागली, पण आतांपर्यंत
प्याला तिच्या ओठांजवळ पोहोचला होता, आणि काही आवाज, कोणाचे – ती ओळखू नाही शकली, तिच्या दोन्हीं
कानांत सांगंत होते : “घाबरूं नका, महाराणी...घाबरू नका, महाराणी, रक्त केव्हांच
जमिनीत गेलंय.
आणि, तिथे, जिथे ते सांडलं होतं, द्राक्षाचे वेल
उगवले आहेत.”
मार्गारीटाने डोळे न उघडतां
एक घोट घेतला आणि तिच्या नसांमधे एक गोड लाट तरंगली, कानांत घण्ट्या वाजू
लागल्या. तिला वाटलं, की कानांना बधिर करणारे कोंबडे ओरडताहेत. दूर कुठेतरी
मार्च-पास्टचं संगीत वाजतंय. पाहुण्यांचे झुण्ड आपला आकार हरवूं लागले : फ्रॉककोट
घातलेले पुरुष आणि बायका कंकालांमधे परिवर्तित होऊन विखुरले. मार्गारीटाच्या
डोळ्यांसमोर त्या हॉलवर कीड पसरू लागली, कबरीसारखा कुजकंट वास पसरला. स्तम्भ विखुरले, दिवे विझले, सगळंच गुंडाळलं गेलं; फवारे, ट्यूलिप्स, इतर फुलं – काहीही
शिल्लक उरलं नाही. फक्त तेवढंच शिल्लक होतं, जितकं आधी होतं –
जवाहि-याच्या बायकोचा साधा-सा ड्राइंगरूम, आणि त्याच्या अर्धवट उघड्या
दारांतून डोकावंत असलेला प्रकाशाचा एक पट्टा. ह्याच अर्धवट उघड्या दारांत प्रविष्ट
झाली मार्गारीटा.
**********
चोवीस
मास्टर परत येतो
वोलान्दच्या
शयनगृहांत सगळं अगदी तसंच होतं, जसं नृत्य–समारोहाच्या आधी होतं. फक्त एक गाउन घातलेला वोलान्द पलंगावर बसला
होता, फक्त
आता हैला त्याच्या पायाला लेप लावंत नव्हती, ती टेबलावर, जिथे
आधी बुद्धिबळाचा खेळ चालला होता, जेवंत होती. करोव्येव आणि अजाज़ेलो फ्रॉककोट उतरवून टेबलाजवळ बसले होते आणि
त्यांच्या जवळ बोका विराजमान होता, ज्याला अजूनही आपली बो-टाय काढायची नव्हती, जी आतापर्यंत घाणेरडं पोतेरं झालेली होती. मार्गारीटा अडखळंत टेबलाजवळ गेली
आणि त्याचा आधार घेऊन उभी राहिली. तेव्हां वोलान्दने तिला खुणेने आपल्या जवळ
बोलावलं, जसं
तेव्हां केलं होतं, आणि आपल्याजवळ बसायला सांगितलं.
“तर, तुम्हांला खूप त्रास दिला?” वोलान्दने विचारलं.
“ओह, नाही, महाशय,” मार्गारीटाने खूपंच हळू
आवाजांत उत्तर दिलं.
“शानदार
ड्रिन्क,” बोक्याने म्हटलं आणि एक पारदर्शक द्रव प्याल्यांत टाकून मार्गारीटाला दिलं.
“ही
वोद्का आहे कां?” थकलेल्या आवाजांत मार्गारीटाने विचारलं.
बोक्याला
अपमान वाटला आणि तो खुर्चीवर उसळला.
“माफ़
करा, महाराणी,” तो भसाड्या आवाजांत
म्हणाला, “मी भद्र महिलेला वोद्का देण्याची हिंमत तरी करूं शकतो कां? हे नुसतं स्प्रिट आहे.”
मार्गारीटाने
स्मित करंत प्याला दूर करण्याचा प्रयत्न केला.
“निःसंकोच
पिऊन टाका,” वोलान्दने म्हटलं.
मार्गारीटाने
लगेच प्याला हातांत घेतला.
“हैला, बस,” वोलान्दने आज्ञा दिली आणि
मार्गारीटाला समजावूं लागला, “पौर्णिमेची रात्र – उत्सवाची रात्र असते. ह्या रात्री मी आपल्या घनिष्ठ मित्र
आणि सेवकांबरोबर डिनर घेतो. तर, आता कसं वाटतंय तुम्हांला? हा थकवणारा नृत्योत्सव कसा वाटला?”
“अद्भुत!”
बोका किरकिरला, “सगळे मुग्ध आहेत, प्रसन्न आहेत, आभारी आहेत! कित्ती नीटनेटकेपणा, बुद्धिमत्ता, योग्यता आणि मोहकता!”
वोलान्दने
चुपचाप प्याला उचलला आणि मार्गारीटाच्या प्याल्याला लावला. मार्गारीटा चुपचाप पिऊन
गेली, हा
विचार करंत. की ती लगेच त्या स्प्रिटमुळे मरून जाईल. पण काहीही वाईट नाही घडलं.
तिच्या पोटांत जीवनाची ऊब सळसळली, डोक्याला हल्कासा झटका बसला आणि तिची शक्ती परंत आली, जणु ती एका दीर्घ, स्फूर्ति देणा-या झोपेतून
उठली असावी, आणि
तिला प्रचण्ड भूक देखील लागली. हे आठवल्यावर, की तिने काल सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, भूक आणखीनंच खवळली. तिने ताबडतोब मास्यावर हात मारला.
बेगेमोतने
अनन्नासचा तुकडा कापला, त्याच्यावर तिखट-मीठ लावून खाऊन टाकला, मग त्याने दुसरा प्याला अशाप्रकारे भरला, की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
दुसरा
प्याला प्यायलावर मार्गारीटाला वाटलं की झुंबरांमधे लागलेल्या मेणबत्त्या जास्त
तीव्र प्रकाश देताहेत. शेकोटीच्या ज्वाळापण प्रखर झाल्याहेत. पण तिला प्यायल्यासारखं
नव्हतं वाटत. आपल्या पांढ-या शुभ्र दातांनी मांसाचा तुकडा कापंत मार्गारीटा
त्यांतून टपकंत असलेला रससुद्धां चोखंत होती, त्याबरोबरंच ती हे पण बघंत होती की बेगेमोत कसा मास्यावर चटणी लावतोय.
“तू
त्याच्यावर द्राक्षसुद्धां ठेव,” हैलाने बोक्याच्या कंबरेत बोटं गडवंत हळूंच म्हटलं.
“कृपा
करून मला शिकवूं नका,” बेगेमोतने उत्तर दिलं, “डाइनिंग टेबलाशी बसलो आहे, त्रास नका देऊं, बसूं द्या!”
“ओह, कित्ती छान वाटतं असं
जेवणं, शेकोटीजवळ
बसून आपल्या लोकांबरोबर,” करोव्येव चिरचिरला.
“नाही, फ़ागोत,” बोक्याने प्रतिवाद केला, “नृत्योत्सवाची आपलीच
भव्यता आणि शान असते.”
“काही
शान-बीन नाहीये, आणि
भव्यतापण नाही, आणि
त्या मूर्ख अस्वल, आणि
वाघांच्या कल्लोळाने माझ्या डोक्यांत, बस माइग्रेनंच व्हायचं शिल्लक होतं,” वोलान्द म्हणाला.
“मी
ऐकतोय, महाशय,” बोका म्हणाला, “जर तुम्हांला असं वाटंत
असेल, की
भव्यतेसारखी काहीच गोष्ट नव्हती, तर मी लगेच तुमच्या ‘हो ला हो’
म्हणेन.”
“बघ, तू!” वोलान्द ने
प्रत्युत्तरांत म्हटलं.
“मी
तर गम्मत करंत होतो,” बोका सलोख्याने म्हणाला, “आणि वाघांचं म्हणाल तर, मी त्यांना तळण्यासाठी पाठवून देईन.”
“वाघांना
खात नसतात,” हैला म्हणाली.
“तुम्हीं
असं म्हणता? तर
मग, कृपा
करून ऐका,” बोका म्हणाला आणि प्रसन्नतेने कपाळावर आठ्या आणंत सांगू लागला, की एकदा तो कसा बरोब्बर
एकोणवीस1 दिवस वाळवंटात अडकला होता आणि ह्या काळांत त्याने फक्त त्याच
वाघाचं मांस खाल्लं, ज्याला त्याने स्वतःच मारलं होतं. सगळे ही माहिती लक्ष देऊन ऐकंत होते, पण जेव्हां बेगेमोतने आपली
गोष्ट संपवली, तेव्हां
सगळे एका सुरांत उद्गारले, “बकवास! बकवास!”
“आणि
सर्वांत मजेदार गोष्ट ही आहे,” वोलान्द ने म्हटलं, “की ही बकवास सुरुवातीपासून शेवटपर्यन्त फक्त खोटी आणि खोटीच आहे.”
“ओह, इतकं खोटं आहे?” बोका खिदळला. सगळ्यांना
वाटलं, की
आता तो विरोध करेल, पण त्याने फक्त येवढंच म्हटलं, “इतिहासंच निर्णय करेल.”
“आणि, सांगा तर खरं,” मार्गोने वोद्काच्या नंतर
उत्साहाचा अनुभव करंत अजाज़ेलोला विचारलं, “तुम्हीं त्या भूतपूर्व सामन्ताला काय गोळी मारली होती?”
“स्पष्टंच
आहे,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “त्याला कसं नसतं मारलं? त्याला तर गोळी मारायलाच हवी होती.”
“मी
इतकी घाबरून गेले होते!” मार्गारीटा उद्गारली, “हे सगळं इतकं आकस्मिक झालं!”
“ह्यांत
आकस्मिक होण्यासारखं काहीच नाहीये,” अजाज़ेलोने प्रतिवाद केला.
करोव्येव
रडक्या आवाजांत म्हणाला, “कोणी घाबरणार कसं नाही! माझ्यापण नसा ताणल्या गेल्या होत्या. बुख! धम्!
सामन्त कुशीवर!”
“मीसुद्धां
बस उन्मादाच्या अवस्थेलाच पोहोचलो होतो,”
बोक्याने कैवियरचा चमचा चाटंत जोडलं.
“मला
ही गोष्ट नाही कळली,” मार्गारीटा म्हणाली, आणि तिच्या डोळ्यांत क्रिस्टलमधून निघंत असलेले सोनेरी तारे चमकू लागले, “की काय बाहेर कुठेही
संगीताचा किंवा ह्या नृत्योत्सवांत होत असलेल्या कल्लोळाचा जरासुद्धा आवाज नाही
ऐकू आला?”
“बिल्कुलच
ऐकूं नाही आला, महाराणी,” करोव्येवने समजावून
सांगितलं, “हे अशांच पद्धतीने करायचं असतं, की काहीही ऐकूं येता कामा नये. ही फार विचारपूर्वक करायची बाब आहे.”
“हो, ठीकाय, ठीकाय...नाही तर पाय-यांवर
बसलेला तो माणूस...जेव्हां मी आणि अजाज़ेलो चालंत होतो...आणि तो दुसरा, प्रवेशद्वाराजवळचा...मला
वाटतं की तुमच्या फ्लैटवर नजर ठेवली जात आहे.”
“बरोबर
आहे, अगदी
बरोबर आहे!” करोव्येव ओरडला, “बरोबर आहे, प्रिय
मार्गारीटा निकोलायेव्ना! तुम्हीं माझ्या संशयाची पुष्टीच करताय. हो, तो फ्लैटवर नजर ठेवंत
होता. मी तर त्याला कुणी दारूडा किंवा विसरभोळा विद्वान किंवा प्रेमवीर समजणार
होतो, पण
नाही, नाही!
काहीतरी माझ्या काळजांत टोचंत होतं. आह, तो फ्लैटवर नजर ठेवून होता! आणि तो दुसरा, प्रवेशद्वाराजवळचासुद्धां! आणि शिडीच्या वळणावर जो उभा होता, तो सुद्धां!”
“आणि
जर तुम्हांला पकडायला आले तर?” मार्गारीटाने विचारलं.
“जरूर
येतील, मोहक
महाराणी, जरूर
येतील!” करोव्येवने उत्तर दिलं, “माझं मन सांगतंय की येतील; इतक्यांत नाही, पण योग्य वेळेवर जरूर टपकतील. पण मला वाटतं की काहीही मजेदार होणार नाही.”
“ओह, मी कित्ती घाबरले होते, जेव्हां तो सामन्त खाली
पडला,” मार्गारीटाने म्हटलं, जिला अजून पर्यंत त्या हत्येची भीती वाटंत होती. तिने जीवनांत पहिल्यांदाच
कुणाची हत्या होताना बघितली होती, “कदाचित, तुम्हीं
खूप छान गोळी चालवता?”
“असंच
समजा,” अजाजेलोने उत्तर दिलं.
“किती
पावलांवरून?” मार्गारीटाने अजाज़ेलोला अस्पष्टसा प्रश्न विचारला.
“ते
अवलंबून असतं, की
कसं,” अजाजेलोने तर्कसंगत उत्तर दिलं, “समालोचक लातून्स्कीच्या आरश्यावर हातोडा घेऊन धावणं वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच्याचं हृदयावर
गोळी चालवणं - एकदम वेगळी.”
“हृदयांत,” मार्गारीटा उद्गारली.
माहीत नाही कां, तिने
आपल्या हृदयावर हात ठेवला, “हृदयांत!” तिने हळूंच पुन्हां म्हटलं.
“हा
समालोचक लातून्स्की कोण आहे?” वोलान्दने मार्गारीटाकडे डोळे बारीक करून बघंत विचारलं.
अजाज़ेलो, करोव्येव आणि बेगेमोतने
लाजून डोळे खाली केले. मार्गारीटाने लाल पडंत उत्तर दिलं, “आहे असा एक समालोचक. आज
संध्याकाळी मी त्याच्या फ्लैटमधे तोडफोड केली होती.”
“काय
म्हणतां! पण कां?”
“त्याने, महाशय, एका मास्टरला मारून
टाकलंय.”
“पण
तुम्हांला स्वत:ला त्रास घ्यायची काय गरज होती?”
वोलान्दने विचारलं.
“मला
परवानगी द्या, महोदय,” बोका उडी मारंत आनंदाने
ओरडला.
“तू
बस रे,” अजाज़ेलो उभा राहात गुरगुरला, “मी स्वतःच इतक्यात जाऊन येतो...”
“नाही!”
मार्गारीटा म्हणाली, “नाही, मी
विनंती करते, महाशय, की ह्याची गरंज नाहीये.”
“ठीक
आहे, तुम्हांला
वाटेल तसं, वाटेल
तसं,” वोलान्दने म्हटलं आणि अजाजेलो परंत आपल्या जागेवर बसून गेला.
“तर, आपण कुठे होतो, बहुमूल्य महाराणी मार्गो?” करोव्येवने विचारलं, “ओह, हो – हृदय.
हृदयांतच लागेल.” करोव्येवने आपल्या लांब बोटाने अजाजेलोकडे खूण करंत म्हटलं, “इच्छेनुसार, हृदयाच्या कोणत्याही
भागांत, वर
किंवा खाली, कुठेही.”
मार्गारीटाला
लगेच समजलं नाही, पण
समजतांच ती आश्चर्याने ओरडली, “पण ते सगळे तर बंद असतांत नं!”
“प्रिय
महाराणी,” करोव्येव गरजंत म्हणाला, “हाच तर कमाल आहे की ते सगळे बंद आहेत! हीच तर विशेष गोष्ट आहे! उघड्या
वस्तूवर तर कोणीही नेम धरू शकतो!”
करोव्येवने
टेबलाच्या खणांतून इस्पीकची सत्ती काढली, तिला मार्गारीटाच्या समोर आणून बोटाने कोणत्याही एक पॉइंट निवडायला
सांगितलं. मार्गारीटाने उजवीकडच्या वरच्या चिन्हावर बोट ठेवलं. हैलाने तो पत्ता
उशीच्या खाली लपवला आणि ओरडून सांगितलं, “तयार आहे!”
अजाज़ेलोने, जो उशीपासून तोंड फिरवून
बसला होता, आपल्या
फ्रॉककोटच्या पैन्टच्या खिश्यातून काळी स्वचालित पिस्तौल काढली, तिची नळी खांद्यावर ठेवली
आणि न वळतां गोळी मारली, ज्यामुळे मार्गारीटाच्या हृदयांत भयमिश्रित प्रसन्नतेची लाट धावली. गोळी
लागलेल्या उशीच्या खालून सत्ती बाहेर काढली गेली. मार्गारीटाने सांगितलेल्या
खुणेच्या आरपार गोळी निघून गेली होती.
“जेव्हां
तुमच्या हातांत रिवॉल्वर असेल, तेव्हां मी कधीच तुम्हांला भेटणार नाही,”
अजाज़ेलोकडे तिरप्या नजरेने बघंट मार्गारीटा नखरेलपणाने
म्हणाली. तिला ते सगळे लोक आवडायचे, जे काही खूप चांगलं, अजबसं करून टाकायचे.
“बहुमूल्य
महाराणी,” करोव्येव चिरचिरला, “मी तर कोणालांच त्याला भेटण्याचा सल्ला नाही देणार, मग त्याच्या हातांत
पिस्तौल असो किंवा नसो! हे भूतपूर्व कॉयर मास्टर आणी अग्रगायकाचं वचन आहे, की त्याला भेटणा-याचं
कोणीही अभिनंदन करणार नाही.”
ह्या
गोळी चालवण्याच्या प्रसंगाच्या वेळेस बोका तोंड फुगवून बसला होता. आता त्याने
घोषणा केली, “मी ह्या सत्तीचं रेकॉर्ड तोडणार!” प्रत्युत्तरांत अजाज़ेलोने ओरडून काहीतरी
म्हटलं. पण बोका हट्टी होता आणि त्याने एक नाही, तर दोन-दोन पिस्तुलांची मागणी केली. अजाज़ेलोने पैन्टच्या मागच्या खिशांतून
दुसरं रिवॉल्वर काढलं आणि त्याला पहिल्या पिस्तौलबरोबर, काहीशा तिरस्काराने तोंड बनवंत शेखीखोर बोक्यापुढे सरकावलं. आता सत्तीवर दोन
पॉइन्ट्स ठरवले गेले. बोक्याने उशीकडून तोंड फिरवलं आणि बरांच वेळ तयारी करंत
राहिला. मार्गारीटा कानांमधे बोट घालून त्या घुबडाकडे बघंत बसली, जो फायरप्लेसच्या वरच्या
फळीवर बसून डुलक्या घेत होता. बोक्याने दोन्हीं रिवॉल्वर्सने गोळ्या चालवल्या, ज्याच्यानंतर हैला लगेच
ओरडली. मेलेलं घुबड फायरप्लेसवरून खाली पडलं होतं आणि चूर-चूर झालेलं घड्याळ
थांबून गेलं होतं. हैलाने, जिचा एक हात रक्तबंबाळ झाला होता ओरडंत बोक्याचं कातडं पकडलं, आणि तो, प्रत्युत्तरांत तिचे केस
ओढू लागला. ते दोघं एका चेंडूसारखे फरशीवर लोळूं लागले. टेबलवरून एक प्याला पडून
फुटला.
“ह्या
वेड्या चेटकिणीला माझ्यापासून दूर करा!” बोका चिरचिरंत होता, आणि हैलाच्या हातांतून
सुटण्याचा प्रयत्न करंत होता, जी त्याच्यावर चढून गेली होती. भांडणा-यांना वेगळं करण्यांत आलं. करोव्येवने
हैलाच्या ज़ख्मी बोटावर फूक मारली आणि ती लगेच बरी झाली.
“माझ्या
जवळपास लोकं बोलंत असतील तर मला नेम नाही धरतां येत!” बोका ओरडला आणि आपलं चामडं
ठीक करूं लागला, ज्याचा
पाठीकडचा फरचा एक मोट्ठा झुपका सरकून गेला होता.
“मी
पैज लावतो,” वोलान्दने स्मित करंत मार्गारीटाला म्हटलं, “की त्याने हे असं मुद्दामहूनच केलंय. त्याचा नेम चांगलाच आहे.”
हैलाने
बोक्याशी दोस्ती करून घेतली, आणि हे प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी एकमेकाचं चुम्बन घेतलं. उशीच्या खालून
पत्ता काढून बघितला गेला. अजाजेलोने मारलेल्या चिन्हाव्यतिरिक्त आणखी कुठेच
कोणतंही चिन्ह नव्हतं.
“असं
शक्यच नाहीये,” बोक्याने ठामपणे म्हटलं आणि झुम्बराच्या प्रकाशांत लक्ष देऊन पत्ता बघितला.
हसंत-खेळंत जेवण चाललं होतं. झुम्बरांच्या मेणबत्त्या वितळंत चालल्या होत्या.
शेकोटीचा कोरडा सुगंध खोलींत पसरंत होता. पोटभर जेवल्यावर मार्गारीटाला एक सुखद
अनुभूति होत होती. ती बघंत राहिली, की कसे अजाज़ेलोच्या सिगारातूंन धुराचे वलय निघताहेत, ज्यांना बोका तलवारीच्या
नोकेने पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे कळंत असूनही, की बराच उशीर झाला आहे, तिला कुठेही जावसं वाटंत नव्हतं. कदाचित सकाळचे सहा वाजले असावेत.
ह्या
शांततेचा फायदा घेत मार्गारीटाने नम्रपणे वोलान्दला म्हटलं, “आता मला परवानगी द्या, माझी वेळ झालीये...उशीर
झालांय.”
“तुम्हांला
कसली घाई आहे?” वोलान्दने प्रेमाने, पण किंचित रुक्षतेने विचारलं. बाकी सगळे चुपचापंच राहिले, असं दाखवंत, की ते सिगारच्या वलयांच्या
खेळांत मग्न आहेत.
“हो, वेळ झालीय,” हे सगळं बघून मार्गारीटाने
किंचित ओशाळून म्हटलं आणि ती वळली, जणु आपला गाउन किंवा रेनकोट शोधतेय. स्वतःच्या नग्नतेचा तिला अचानक संकोच
वाटला. ती टेबलावरून उठली. वोलान्दने चुपचाप आपला घाणेरडा, डाग असलेला हाउसकोट उचलला
आणि करोव्येवने तो मार्गारीटाच्या खांद्यावर घातला.
“आभारी
आहे, महाशय,” मार्गारीटाने हळूच म्हटलं
आणि प्रश्नार्थक नजरेने वोलान्दकडे बघूं लागली. उत्तरादाखल त्याने अत्यंत
शालीनतेने आणि उदासीनतेने स्मित केलं. मार्गारीटाच्या हृदयाला जणु दुःखाच्या
काळ्या ढगांने झाकून टाकलं. तिला वाटलं की तिला फसवलं गेलंय. नृत्योत्सावासाठी
अर्पित केलेल्या तिच्या सेवेचं ना तर तिला कोणतं पारितोषक मिळणार होतं, ना ही कोणी तिला इथे
थांबवणार होतं. त्याच बरोबर तिला हे पण माहीत होतं, की ती इथून कुठेच जाऊं शकंत नव्हती. एक विचार तिच्या मनाला शिवून गेला, की कुठे पुन्हां आपल्या
आलीशान घरांतच न जावं लागो. आणि, ती उदास झाली. आपणहूनंच निर्ल्लज्जासारखं त्याबद्दल विचारावं कां, ज्याचा सल्ला अजाज़ेलोने
अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे दिला होता? नाही, कोणत्याही
परिस्थितीत नाही – तिने स्वतःला बजावलं.
“तुम्हांला
शुभेच्छा, महाशय,” तिने म्हटले, आणि मनांतल्या मनांत विचार
करूं लागली, ‘बस, इथून
निघून तर जाऊ, मग
नदीत जीव देऊन टाकेन.”
“बसा
तर खरं,” अचानक वोलान्दने आज्ञा दिली. मार्गारीटाच्या चेह-याचा रंग बदलला, आणि ती बसली.
“कदाचित, जातां-जातां मला काही
सांगायचंय?” वोलान्दने विचारलं.
“नाही, काहीच नाही, महाशय,” मार्गारीटाने
स्वाभिमानपूर्वक म्हटलं, “बस, हेच, की जर तुम्हांला अजूनही
माझी गरंज असेल तर मी आनंदाने तुमच्या आज्ञेचं पालन करेन. नृत्योत्सवांत मी जराही
नाही थकले आणि मला खूप मजा आली. म्हणजे की, जर तो आणखीही चालला असता, तरी मी हज्जारों सुळावर टांगलेल्या आणि मारेक-यांसमोर चुम्बन घेण्यासाठी आनन्दाने
आपला गुडघा पुढे केला असतां,” मार्गारीटाने वोलान्दकडे जणु पडद्यांतून पाहिलं, तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
“बरोब्बर
आहे! तुम्हीं एकदम बरोब्बर बोलताय!” वोलान्द भयंकर आवाजांत ओरडला, “असंच असायला पाहिजे!”
“असंच
असायला पाहिजे!” त्याचे सहयोगी जणु प्रतिध्वनीसारखे उद्गारले.
“आम्हीं
तुमची पारख करंत होतो,” वोलान्द म्हणंत राहिला, “कधीही, काहीही
मागू नका, काहीही
नाही, विशेषकरून
त्यांच्याकडून, जे
तुमच्याहून शक्तिशाली आहेत. ते स्वतःच प्रस्ताव मांडतील आणि आपणहूनंच सगळं देतील!
बसून जा, स्वाभिमानी
महिला!” वोलान्दने मार्गारीटाच्या खांद्यांवरून भारी-भरकम हाउसकोट खेचून टाकला. ती
पुन्हां त्याच्याजवळ पलंगावर बसलेली आढळली, “तर, मार्गो,” वोलान्दने आपला आवाज सौम्य
करंत म्हटलं, “आज तुम्हीं माझ्यासाठी होस्टेसम्हणून काम केलं, त्याच्यासाठी तुम्हांला काय पाहिजे? नग्नावस्थेंत नृत्योत्सवाचं संचालन करण्यासाठी तुम्हांला काय पाहिजे? आपल्या गुडघ्याची काय
किंमत लावतांय? माझ्या
पाहुण्यांमुळे, ज्यांना
तुम्हीं आत्ताच सुळावर टांगलेले आणि मारेकरी म्हटलं, तुमचा काय तोटा झालांय? सांगा! आता अगदी निःसंकोचपणे सांगा, कारण की प्रस्ताव मी मांडलाय.”
मार्गारीटाचं
हृदय जोराने धडधडलं, एक दीर्घ श्वास घेऊन ती काही विचार करूं लागली.
“बोला, बेधडक सांगा!” वोलान्दने
तिला प्रोत्साहित केलं, “स्वतःच्या विचारशक्तीवर, कल्पनाशक्तीवर जोर द्या, तिला उत्तेजना द्या! फक्त त्या लुच्च्या, इतिहासांत जमा सामन्ताच्या हत्येच्या वेळेस हजर राहिल्याबद्दलंच कोणालाही
बक्षीस मिळालं पाहिजे, आणि जर ती व्यक्ति एखादी महिला असेल, तर उत्तमच. तर?”
मार्गारीटाचा
वरचा श्वास वर आणि खालचा खाली राहिला. ती ठरवलेल्या उत्तम शब्दांत आपले मनोगत
मांडणारंच होती की अचानक तिचा चेहरा विवर्ण झाला, तिचं तोंड उघडंच राहिलं, डोळे बाहेर आले. “फ्रीडा! फ्रीडा! फ्रीडा!” – कोणाचातरी विनंती करंत असलेला
आवाज कानांत घुमूं लागला. “माझं नाव फ्रीडा आहे!” आणि मार्गारीटा अडखळंत बोलली, “हो, काय मी एका गोष्टीसाठी
विनंती करू शकते?”
“मागा, मागा, माझ्या लाडक्या,” वोलान्दने उत्तर दिलं, जणु तो काही समजंत
असल्यासारखा हसला. “एका गोष्टीची मागणी करा!”
आह, कित्ती सफ़ाई आणि
स्पष्टतेने वोलान्दने ज़ोर देऊन मार्गारीटाच्याच शब्दाची पुनरावृत्ति केली होती, “एक गोष्ट!”
मार्गारीटाने
पुन्हां श्वास घेतला आणि म्हणाली, “माझी इच्छा आहे, की फ्रीडाला तो रुमाल देणं थांबवण्यांत यावं, ज्याने तिने आपल्या मुलाचा दम घोटला होता.”
बोक्याने
आकाशाकडे बघितलं आणि जोराने श्वास घेतला, पण काही बोलला नाही. कदाचित त्याला नृत्योत्सवांत पिरगळलेल्या कानाची आठवण
आली असावी.
“ही
गोष्ट लक्षांत घेतां, की त्या मूर्ख मुलीकडून काही लाच मिळणार नाहीये – तसं, हे तुमच्या
सम्राज्ञीपदाच्या गरिमेविरुद्ध आहे, म्हणा – मला कळंत नाहीये, की काय करावं. फक्त एकंच गोष्ट करता येण्यासारखी आहे – माझ्या शयनगृहाच्या
सगळ्या भेगा बोळ्यांनी बंद करव्यांत.”
“तुम्हीं
कशाबद्दल बोलताय, महाशय?” मार्गारीटाने हे असंबद्ध
शब्द ऐकून आश्चर्याने विचारलं.
“मी
तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, मालक,” बोका मधेच टपकला, “अगदी बोळ्यांनीच,” आणि त्याने उत्तेजनेने टेबलवर पंजा मारला.
“मी
सहृदयतेबद्दल बोलतोय,” वोलान्दने आपला लाल-लाल डोळा मार्गारीटावरून न हलवता, आपले शब्द समजावले, “कधी-कधी एकदम
अप्रत्याशितपणे आणि घाबरंत-घाबरंत ती बारीकश्या भेगेंतून घुसून येते, म्हणूनंच मी बोळ्यांबद्दल
बोलंत होतो.”
“मी
पण त्याबद्दलंच बोलंत होतो,” बोक्याने मार्गारीटापासून दूर होत आपल्या गुलाबी क्रीम लावलेल्या तीक्ष्ण
कानांना पंज्यांने झाकंत शेरा मारला.
“पळ
इथून,” वोलान्द त्याला म्हणाला.
“मी
अजून कॉफी नाही प्यायलोय,” बोक्याने उत्तर दिलं, “मग मी कसा जाणार, मालक, उत्सवाच्या
रात्री पाहुण्यांना दोन प्रकारांमधे वाटणं योग्य आहे का? पहिले प्रथम श्रेणीचे, आणि दुसरे, जसं त्या निराश, माथेफिरू
रेस्टॉरेन्टवाल्याने सांगितलं होतं – दुस-या श्रेणीचं ताजेपण?”
“गप्प
बस,” वोलान्दने त्याला हुकुम दिला आणि मार्गारीटाकडे वळून म्हणाला, “तुम्हीं, असं वाटतं, की खूप दयाळु आहांत? उच्च सिद्धांत असलेल्या?”
“नाही,” मार्गारीटाने ठासून म्हटलं, “मला माहितीये, की तुम्हांला सगळं स्पष्टंच
सांगितलं पाहिजे, आणि
मी तुम्हांला अगदी खरं-खरं सांगतेय : मी एक उथळ विचारांची, भटकलेली बाई आहे. मी
फ्रीडाबद्दल तुम्हांला ह्यासाठी विनंती केली होती, कारण की निष्काळजीपणाने मी तिला दाट अपेक्षा देऊन बसलेय. ती वाट पाहतेय, महाशय; तिला माझ्या सामर्थ्यांत
विश्वास आहे. जर तिला धोका दिला तर मी फार भयानक परिस्थितीत अडकेन. मला आयुष्यभर
शांतता नाही लाभणार. काहीच उपाय नाहीये, जे व्हायचं होतं, ते होऊन गेलं.”
“आह,” वोलान्द म्हणाला, “आता मला समजतंय.”
“तर, तुम्ही हे कराल?” मार्गारीटाने हळूच
विचारलं.
“बिल्कुल
नाही,” वोलान्दने उत्तर दिलं, “गोष्ट अशी आहे, महाराणी, की
इथे एक छोटीशी गडबड झालीये. प्रत्येक भूताला किंवा चेटकिणीला स्वतःच आपलं-आपलं काम
करावं लागतं. ही गोष्ट वेगळी आहे, की आमचं सामर्थ्य खूपंच जास्त आहे; काही जागरूक लोक जेवढं समजतात, त्याहूनही कित्येक पटींनी जास्त...”
“हो, खूप, खूप जास्त,” बोका स्वतःला थांबवू नाही
शकला. त्याला, स्पष्टंच
होतं, की
ह्या सामर्थ्यावर गर्व होता.
“चूप,” तुला सैतान घेऊन जावो!”
वोलान्दने त्याला म्हटलं आणि मार्गारीटाकडे बघंत पुढे म्हणाला, “ पण ते केल्याने काय फायदा, जे कुणा दुस-या शक्तीला
करायचं असतं? तर, मी हे करणार नाहीं, आणि तुम्हीं स्वतःच हे
कराल.”
“आणि, माझ्याच्याने ते होईल कां?”
अजाज़ेलोने
व्यंगपूर्वक आपला तिरपा डोळा मार्गारीटावर रोखला आणि, चुपचाप आपलं लाल डोकं झटकून हसला.
“हो, करा नं, काय कटकट आहे!” वोलान्द
बडबडला आणि, ग्लोबला
फिरवून त्यांत काहीतरी बघूं लागला. स्पष्ट होतं, की तो मार्गारीटाशी बोलतांना काही आणखीसुद्धां करंत होता.
“तर, फ्रीडा,” करोव्येव कानांत कुजबुजला.
“फ्रीडा!”
कर्कश आवाजांत मार्गारीटा ओरडली.
फट्कन
दार उघडलं आणि अव्यवस्थित, नग्न फ्रीडा सुजलेल्या डोळ्यांनी धावंत खोलीत आली, तिचा कैफ़ पूर्णपणे उतरलेला
होता, तिने
येतांच मार्गारीटाकडे हात केले. मार्गारीटा राजसी थाटांत म्हणाली, “तुला क्षमा प्रदान
करण्यांत येत आहे. आता तुला तो रुमाल देण्यांत येणार नाही.”
फ्रीडाचा
हुंदका ऐकू आला, ती
ज़मिनीवर पडून क्रॉसच्या मुद्रेंत मार्गारीटासमोर पसरली, वोलान्दने आपला हात झटकला, आणि फ्रीडा गायब झाली.
“धन्यवाद, मला निरोप द्या,” मार्गारीटाने म्हटलं आणि
ती उठू लागली.
“तर, बेगेमोत,” वोलान्द ने बोलायला
सुरुवात केली, “उत्सवाच्या रात्री एका अव्यावहारिक माणसाच्या वागण्यावर लक्ष नाही देणार,” तो मार्गारीटाकडे वळला, “तर, हे धरलं नाही जाणार, कारण की मी काहीच केलेलं
नाहीये. तुम्हांला स्वतःसाठी काय हवंय?”
शांतता
पसरली, जिला
मार्गारीटाच्या कानांत कुजबुजंत करोव्येवने भंग केलं, “बहुमूल्य सम्राज्ञी, ह्यावेळेस मी असा सल्ला देईन की तुम्हीं अक्कल वापरा! कुठे सौभाग्य हातांतून
निसटून न जावो!”
“माझी
इच्छा आहे की आत्ता, ह्याच क्षणी माझा प्रियतम मास्टर मला परंत देण्यांत यावा,” मार्गारीटाने म्हटलं आणि
तिच्या चेह-याच्या रेषा थरथरू लागल्या.
तेवढ्यात
खोलीत प्रचण्ड वा-याचा झोत घुसला, ज्याने मेणबत्त्यांची ज्योत आडवी झाली, खिडकीचा जाड पडदा उघडून गेला, खिडकी फट्कन उघडली आणि दूर उंचावर पूर्ण; सकाळचा नसून, अर्धरात्रीचा चंद्र दिसला. खिडकीच्या चौकटीतून फरशीवर रात्रीच्या प्रकाशाचा
हिरवंट रुमाल आत शिरला, त्या प्रकाशांत प्रकट झाला इवानूश्काचा रात्रीचा पाहुणा, जो स्वतःला मास्टर
म्हणायचा. तो हॉस्पिटलच्या रुग़्णांच्या वेशभूषेंत होता – गाउन, जोडे आणि काळी टोपी, जी तो स्वतःपासून कधीच दूर
करंत नसे. दाढी वाढलेला त्याचा चेहरा विकृत हावभावांनी थरथरंत होता. त्याने
वेड्यासारखं घाबरंत मेणबत्त्यांच्या प्रकाशाकडे पाहिलं. चंद्राचा प्रकाश त्याच्या
अवती-भवती जणु उफ़ाळून येत होता.
मार्गारीटाने
लगेच त्याला ओळखलं, ती कण्हली आणि हात नाचवंत धावंतंच त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या कपाळाचं
चुम्बन घेतलं, ओठांचं
चुम्बन घेतलं, त्याच्या
खडबडीत गालावर आपला गाल घासला, आणि इतका वेळ थोपवून धरलेले अश्रू अगणित धारांनी तिच्या चेह-याला भिजवू
लागले. ती फक्त एकंच शब्द घोकंत होती : “तू...तू...तू!”
मास्टर
तिला दूर ढकलंत म्हणाला, “रडू नकोस, मार्गो, मला दुःखी नको करू, मी खूप आजारी आहे.” त्याने
खिडकीची चौखट हातांनी पकडली, जणु त्याला लगेच उडी मारून पळून जायचंय. बसलेल्या लोकांना बघून त्याने दात
खाल्ले आणि ओरडला, “मला भीती वाटतेय, मार्गो! मला पुन्हां भ्रम झालांय!”
हुंदक्यांनी
मार्गारीटाचा श्वास कोंडू लागला, ती एक-एक शब्दावर जोर देत म्हणाली, “नाही, नाही, नाही, कोणत्याच गोष्टीला घाबरू
नको! मी तुझ्याबरोबर आहे न!”
करोव्येवने
हळूच, चुपचाप
मास्टरकडे खुर्ची सरकवली आणी तो खुर्चीत बसून गेला, आणि मार्गारीटा गुडघे टेकून रुग्णाला बिलगली आणि शांत झाली. आपल्या ह्या
उत्तेजनेंत तिला कळलंही नाही, की केव्हां तिच्या नग्न शरीराला काळ्या रेशमी गाउनने झाकलं. रुग्णाने मान
खाली केली आणि आजारी, निराश डोळ्यांने जमिनीकडे बघूं लागला.
“हो,” थोड्या शांततेनंतर वोलान्द
म्हणाला, “ह्याला खूपंच त्रास दिलाय.” त्याने करोव्येवला आज्ञा दिली, “माझ्या शिलेदारा, ह्या माणसाला प्यायला
काहीतरी दे.”
मार्गारीटाने
थरथरत्या आवाजांत मास्टरची विनवणी केली, “पिऊन टाक, पिऊन
टाक! तू घाबरतोयंस कां? नाही,नाही, माझ्यावर विश्वास ठेव, हे तुझी मदत करतील.”
रुग्णाने
प्याला घेतला आणि त्यांत असलेलं पेय पिऊन टाकलं, पण त्याचा हात थरथरंत होता आणि रिकामा प्याला त्याच्या पायाजवळ पडून फुटला.
“शुभ
शकुन आहे! शुभ शकुन आहे!” करोव्येव मार्गारीटाच्या कानांत कुजबुजला, “बघा, त्याची शुद्ध परंत येत
आहे!”
खरंच, रुग्णाच्या नजरेंत आता
तेवढा रानटीपणा नव्हता.
“मार्गो, ही तूंच आहेस कां?” चंद्राच्या पाहुण्याने
विचारलं.
“शंकाच
नाही, ही
मीच आहे,” मार्गारीटाने उत्तर दिलं.
“आणखी!”
वोलान्दने आज्ञा दिली.
दुसरा
प्याला संपवल्यावर मास्टरच्या डोळ्यातील चमक आणि त्याची हुशारी परंत आली.
“आता
ही गोष्ट काही औरंच आहे,” वोलान्दने डोळे बारीक करंत म्हटलं, “चला, आता
बोलूं या. तुम्हीं कोण आहांत?”
“आता
मी कोणीच नाहीये,” मास्टरने उत्तर दिलं आणि एक गूढ हास्य त्याच्या चेह-यावर पसरलं.
“आता
तुम्हीं कुठून आलांत?”
“वेड्यांच्या
दवाखान्यांतून. मी...मानसिक रुग्ण आहे,” आगंतुकाने उत्तर दिलं.
मार्गारीटाला
हे शब्द सहन नाही झाले आणि ती पुन्हां रडूं लागली. मग डोळे पुसून ती ओरडली, “कित्ती भयानक शब्द आहेत!
भयानक! हा मास्टर आहे, महाशय, मी
तुम्हांला सांगतेय. त्याला बरं करा, त्याची ह्यासाठी पात्रता आहे.”
“तुम्हांला माहितीये का, की तुम्हीं कोणाशी बोलताय?” वोलान्दने आगंतुकाला
विचारलं, “कोणाकडे आले आहांत?”
“माहीत
आहे,” मास्टरने उत्तर दिलं, “वेड्यांच्या दवाखान्यांत माझा शेजारी होता तो मुलगा, इवान बिज़्दोम्नी. त्याने
मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं.”
“काय म्हणतां, काय म्हणतां!” वोलान्द
म्हणाला, “मला पत्रियार्शी तलावावर ह्या तरुणाला भेटायचं सौभाग्य प्राप्त झालं होतं, त्याने तर माझी बुद्धीच
कुंठित केली, असं
म्हणून, की
मी नाहींच आहे! पण तुम्हांला तर विश्वास आहे ना, की हा खरंच मीच आहे?”
“
विश्वास करावांच लागेल,” आगंतुक म्हणाला, “पण जास्त चांगलं हेंच राहील, की तुम्हांला दिवास्वप्नाचा, भ्रमाचा चमत्कार म्हणून स्वीकार
करावं. माफ करा,” किंचित थांबून मास्टर म्हणाला.
“तर
काय, जर
हे चांगलं आहे, तर
असंच करा,” वोलान्दने सहृदयतेने उत्तर दिलं.
“नाही, नाही,” मार्गारीटा घाबरून म्हणाली
आणि तिने मास्टरचा खांदा पकडून त्याला हलवलं, “शुद्धीवर ये! तुझ्यासमोर खरोखरंच तोच आहे!”
बोका
इथेपण मधेच अडमडला, “आणि, मी
तर खरोखरंच भ्रमासारखा आहे. चांदण्या रात्रींत माझ्या आकारा-प्रकाराकडे लक्ष द्या,” बोका चंद्राच्या प्रकाशांत
सरकला आणि तो काही बोलणारंच होता, की त्याला गप्प राहण्यास सांगण्यांत आलं आणि तेव्हां तो येवढं म्हणून, की “बरं, बरं, गप्प राहीन! मी मौन भ्रम
होऊन जाईन!” चुप झाला.
“बरं, हे तर सांगा की मार्गारीटा
तुम्हांला मास्टर कां म्हणते?” वोलान्दने विचारलं.
तो
हसला आणि म्हणाला, “ही दुर्बलता क्षमा करण्याजोगी आहे. हिचे त्या कादम्बरीबद्दल फार उच्च विचार
आहेत, जी
मी लिहिली होती.”
“कशाबद्दल
आहे कादम्बरी?”
“पोंती
पिलातबद्दल.”
तेवढ्यांत
मेणबत्त्यांची ज्योत पुन्हां उसळून, फडफडून, प्रखर
झाली, टेबलावर
ठेवलेली भांडी हलूं लागली, वोलान्द गडगडंत हसला, पण त्याने ह्या गडगडाटाने कुणाला ना तर घाबरवलं, ना आश्चर्यचकित केलं. बेगेमोतने माहीत नाही कां, टाळ्या वाजवल्या.
“कशाबद्दल, कशाबद्दल? कोणाबद्दल?” वोलान्दने हसणं थांबवंत
विचारलं, “आता घ्या? ही
खरोखरंच आश्चर्यांत टाकणारी गोष्ट आहे! तुम्हांला दुसरा कोणचा विषय नाही मिळाला? आणा, बघू,” वोलान्दने आपल्या हात समोर
केला.
“क्षमा
करा, मला
असं करतां येणार नाही,” मास्टरने उत्तर दिलं, “कारण की मी तिला शेकोटीत जाळून टाकलंय.”
“माफ़
करा, माझ्या
ह्या गोष्टीवर विश्वास नाही,” वोलान्द म्हणाला, “असं शक्यंच नाहीये. हस्तलिखितं कधीच जळंत नसतात 2.” तो
बेगेमोतकडे वळला आणि म्हणाला, “अरे, बेगेमोत, कादम्बरी इकडे दे.”
बोका
पट्टकन खुर्चीवरून उसळला, आणि सगळ्यांनी बघितलं, की तो पाण्डुलिपींच्या एका मोठ्ठ्या ढीगावर बसला आहे. सगळ्यांत वरचं
हस्तलिखित त्याने वाकून अभिवादन करंत वोलान्दकडे दिलं. मार्गारीटा थरथरली आणि
किंचाळली, घाबरल्यामुळे
तिच्या डोळ्यांत पुन्हां अश्रूंनी गर्दी केली.
“हेच
आहे, हस्तलिखित!
हेच आहे!”
ती
वोलान्दसमोर वाकली आणि प्रसन्नतेने म्हणाली, “सर्वशक्तिमान! सर्व शक्तिमान!”
वोलान्दने
ते हस्तलिखित हातांत घेतलं, आलटून-पालटून पाहिलं आणि त्याला ठेवून दिलं आणि चुपचाप, न हसता मास्टरकडे बघू
लागला. पण तो न जाणे कां दुःखांत आणि बेचैनीत खुर्चीवरून उठला, आणि दूर चंद्राकडे बघंत, हात नाचवंत थरथरंत बडबडू
लागला.
“रात्री, चंद्राच्या
प्रकाशांतसुद्धां मला चैन नाहीये. मला कां इतकं छळलंय? अरे देवा, देवा...”
मार्गारीटा
रुग्णाच्या गाउनला धरून त्याला बिलगली. ती सुद्धां दुःखांत बुडून अश्रुपूर्ण
आवाजांत म्हणाली, “अरे देवा, तुझ्यावर
औषधाचा असर कां नाही होत आहे?”
“काही
हरकत नाही, काही
हरकत नाही, काही
हरकत नाही,” करोव्येव मास्टरच्या जवळ जांत कुजबुजला, “काही हरकंत नाही...आणखी एक प्याला, आणि मीसुद्धां तुमच्याबरोबर घेईन.”
आणि
प्याला लपाछिपी खेळंत चंद्राच्या प्रकाशांत चमकला आणि ह्या प्याल्याने आपलं काम
केलं. मास्टरला परंत त्याच्या जागेवर बसवलं, रुग्णाचा चेहरा शांत झाला.
“हुँ, आता सगळं समजलंय,” वोलान्दने म्हटलं आणि
आपल्या मधल्या बोटाने हस्तलिखितावर टकटक करूं लागला.
“एकदम
स्पष्ट आहे,” बोक्याने पुष्टी केली, तो आपलं मौन भ्रम बनून राहण्याचं
वचन विसरला होता.
“आता
ह्या कारस्थानाची मुख्य कडी मी स्पष्ट बघूं शकतो. तुझं काय म्हणणं आहे, अजाज़ेलो?” तो चुपचाप असलेल्या
अजाज़ेलोकडे वळला.
“मी
म्हणतोय,” तो दबक्या आवाजांत म्हणाला, “की तुला बुडवणं चांगलं राहील.”
“दया
कर, अजाज़ेलो,” बोक्याने त्याला उत्तर
दिलं, “माझ्या मालकाला असं करण्याचा सल्ला नको देऊं. . विश्वास कर की जर मी दररोज
रात्री तुझ्याकडे असेच चंद्राचे कपडे घालून आलो असतो, जसे ह्या गरीब बिचा-या मास्टरने घातलेयंत, तुला खुणा केल्या असत्या, तुला आपल्याकडे बोलावलं असतं, तर, हे
अजाज़ेलो, तुला
कसं वाटलं असतं?”
“तर, मार्गारीटा,” वोलान्दने गोष्टींच सूत्र
आपल्या हातांत घेत विचारलं, “सांगा बरं, की
तुमची काय इच्छा आहे?”
मार्गारीटाचे
डोळे मोट्ठे-मोट्ठे झाले. तिने वोलान्दला विनंती केली, “मला त्याच्याशी बोलूं द्याल कां?”
वोलान्दने
डोकं हलवून ‘हो’ म्हटलं, तर मार्गारीटाने
मास्टरच्या कानाला चिटकून कुजबुजंत काही तरी म्हटलं. स्पष्ट ऐकूं आलं की मास्टरने
म्हटलं, “नाही. खूप उशीर झालाय. मला जीवनांत ह्याच्याशिवाय आता काही नको की तू
माझ्यासमोर राहावं. पण मी तुला पुन्हां सल्ला देतो की मला सोडून दे. माझ्याबरोबर
तुझंपण नुक्सान होईल.”
“नाही, नाही सोडणार,” मार्गारीटाने उत्तर दिलं
आणि ती वोलान्दकडे वळली, “मी प्रार्थना करते की आम्हांला पुन्हां अर्बातच्या त्याच घरांत पाठवावं; टेबलावर लैम्प जळंत असावा
आणि सगळं काही अगदी तस्संच व्हावं, जसं आधी होतं.”
आता
मास्टर हसला आणि मार्गारीटाचा कुरळ्या केसांचा चेहरा आपल्या हातांमधे धरून
म्हणाला:
“आह, ह्या गरीब बाईच्या
गोष्टींकडे लक्ष नका देऊं, महाशय! त्या घरांत केव्हांपासूनंच कोणी दुसरा माणूस राहतोय, आणि असं कधी होत नसतं, की सगळं तसंच व्हावं, जसं आधी होतं.” त्याने
आपला गाल मार्गारीटाच्या डोक्यावर ठेवला आणि तिला आपल्या बाहुपाशांत घेतलं, आणि बडबडू लागला, “ बिचारी, बिचारी...”
“तुम्हीं
म्हणतां, की
नाही होऊं शकंत?” वोलान्दने म्हटलं, “हे बरोबर आहे, पण आम्ही प्रयत्न करूं...” आणि तो म्हणाला, “अजाज़ेलो!”
तेवढ्यांत
छतांतून खाली कोसळला एक घाबरलेला आणि बावरलेला नागरिक, ज्याने फक्त अंतर्वस्त्र घातले होते , पण त्याच्या हातांत, न जाणे कां एक सूटकेस होती आणि डोक्यावर होती टोपी. तो माणूस भीतीने थरथरंत
होता आणि तो धपकन् खाली बसला.
“मोगारिच?” अजाज़ेलोने त्या आकाशांतून
टपकलेल्या प्राण्याला विचारलं.
“अलोइज़ी
मोगारिच3,” त्याने थरथरंत उत्तर दिलं.
“तुम्हीं
तेच आहांत न, ज्याने
ह्या माणसाच्या कादम्बरीबद्दल लिहिलेला लातून्स्कीचा लेख वाचून ह्याची असं सांगून
फिर्याद केली की त्याने अवैध साहित्य आपल्या घरांत लपवून ठेवलंय?” अजाज़ेलोने विचारलं.
नव्या
नागरिकाचं शरीर निळं पडलं आणि त्याच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहू
लागले.
“तुम्हाला
ह्याच्या खोल्यांमधे जायचं होतं?” अजाज़ेलोने शक्य तेवढी सहृदयता दाखवंत विचारलं.
रागावलेल्या
बोक्याची गुरगुर खोलींत ऐकूं आली आणि मार्गारीटाने कर्कश आवाजांत म्हटलं, “बघून घे! चेटकिणीला बघून
घे!” आणि ती अलोइज़ी मोगारिचच्या चेह-यावर आपले नखं गडवूं लागली. एकंच कल्लोळ
माजला.
“काय
करतेयस?” मास्टर दुःख आणि वेदनेने किंचाळला, “मार्गो, स्वतःला
कलंकित नको करू!”
“मी
विरोध करतो, हे
कलंकित करणारं कृत्य नाहीये,” बोका गरजला.
करोव्येवने
मार्गारीटाला मागे ओढलं.
“मी
बाथरूम बनवलं,” दात किटकिटंत रक्तबंबाळ मोगारिच म्हणाला आणि भीतीने काही दुसरंच बोलूं लागला, “एक वेळा रंग... सल्फ्युरिक
एसिड...”
“चला, बरंच आहे की बाथरूम बनवलं,” अजाज़ेलोने त्याचं समर्थन
करंत म्हटलं, “त्याला अंघोळ करायलाच पाहिजे!” आणि ओरडला,
“चालता हो!”
तेव्हां
मोगारिच उलटा लटकूं लागला आणि एका झटक्यांत वोलान्दच्या शयन गृहाच्या उघड्या
खिडकीतून बाहेर फेकला गेला.
मास्टरचे
डोळे उघडेच राहिले, तो कुजबुजला, “पण हे त्या कारीगरीपेक्षां जास्त नीटनेटकं आहे, ज्याच्याबद्दल इवानने सांगितलं होतं!” पूर्णपणे स्तंभित झालेला तो डोळे गरगर
फिरवंत होता आणि शेवटी त्याने बोक्याला म्हटलं, “माफ करा...हे तू...हे तुम्हीं...” तो थबकला, हे ठरवूं नाही शकला, की बोक्याला ‘तू’ म्हणायला
पाहिजे, किंवा
‘तुम्हीं’, “तुम्हीं तेच बोके आहांत का, जे ट्रामगाडीत बसले होते?”
“मीच
आहे,” खूश होऊन बोक्याने पुष्टी केली आणि पुढे म्हणाला, “मला हे ऐकून खूप आनन्द झाला की तुम्हीं बोक्याशीपण इतक्या सौजन्याने वागता.
बोक्यांना न जाणे कां नेहमी ‘तू’ म्हणूनंच
संबोधित करतात, तसं
एकाही बोक्याने कोणाचबरोबर ‘ब्रुदरशॅफ्ट’4ची प्रतिज्ञा नाही घेतलीये.”
“मला
न जाणे कां, असं
वाटतंय की तुम्हीं एकदम बोके नाही आहांत,”
मास्टरने दुविधेने उत्तर दिलं आणि त्याने घाबरंत-घाबरंत
वोलान्दला म्हटलं, “मला कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटलचे लोक पकडून घेऊन जातील.”
“असे
कसे गेऊन जातील!” करोव्येवने त्याला धीर देत म्हटलं, आणि त्याच्या हातांत काही कागद आणि काही पुस्तकं दिसले, “हे तुमच्या आजाराचे
केस-पेपर्स आहे?”
“हो.”
करोव्येवने
आजाराचे केस-पेपर्स शेकोटीत झोकून टाकले.
“कागद-पत्र
नाही, तर
माणूसही नाही,” संतुष्ट होऊन करोव्येव म्हणाला, “आणि हे तुमच्या घरमालकाशी संबंधित कागद पत्र आहे?”
“हो...आँ...”
“ह्यांत
कोणाचं नाव लिहिलंय? अलोइज़ी मोगारिच?” करोव्येवने त्या पुस्तिकेच्या पानावर फूक मारली, “फू!...तो नाहीये, नीट बघा – तो नव्हतांच. जर घरमालकाला आश्चर्य वाटलं, तर त्याला सांगा, की त्याला अलोइज़ीबद्दल
स्वप्न पडलं होतं. मोगारिच? कोण मोगारिच? कोणीच मोगारीच कधी नव्हतांच.” लगेच ती पुस्तिका धूर बनून करोव्येवच्या
हातांतून उडून गेली, “आणि आता ती पुस्तिका आहे घरमालकाच्या टेबलाच्या खणांत.”
“तुम्हीं
बरोबर म्हणतांय,” मास्टरने करोव्येवच्या हाताच्या कौशल्याने अचंभित होत म्हटलं, “की जर कागदपत्र नाहीत, तर माणूसपण नाहीये. म्हणूनंच
तर मीसुद्धां नाहीये, माझ्याकडे कोणतंच परिचय पत्र वगैरे नाहीये.”
“माफ
करा,” करोव्येव ओरडला, “हे खरोखरंच सम्मोहन आहे, हे राहिले तुमचे पेपर्स,” आणि करोव्येवने मास्टरला परिचय पत्र दिलं. मग त्याने इकडे तिकडे बघितलं आणि
खूप प्रेमाने कुजबुजंत मार्गारीटाला म्हटलं, “आणि हा घ्या तुमचा खजिना, मार्गारीटा निकोलायेव्ना,” आणि त्याने मार्गारीटाला कोप-यांवर काळपट झालेलं हस्तलिखित, वाळलेला गुलाब, फोटो, आणि विशेष काळजीने बैंकेचं
पासबुक दिलं, “दहा हजार, जे
तुम्हीं जमा केले होते, मार्गारीटा निकोलायेव्ना! आम्हांला परक्या वस्तू नकोत.”
“माझे
पंजेच झडून जातील, जर
मी परक्या वस्तूला हात लावला तर,” बोका सूटकेसवर नाचंत नखरे करंत म्हणाला. तो सूटकेसवर नाचंत होता, जेणे करून त्या दुर्दैवी
कादम्बरीच्या हस्तलिखिताच्या सगळ्या प्रति सूटकेसमधे नीट सामावतील.
“आणि
तुमचं परिचय पत्रसुद्धां – हे घ्या,” करोव्येवने मर्गारीटाला कागदपत्र देत म्हटलं. आणि मग वोलान्दकडे वळून आदराने
म्हणाला, “सगळं झालं, मालक!”
“नाही, सगळं नाही झालं,” वोलान्दने आपल्या
ग्लोबवरून नजर काढंत म्हटलं, “माझ्या प्रिय महाराणी, तुमच्या मंडळींना कुठे पाठवायला सांगाल? मला तर त्यांची गरज नाहीये.”
आता
उघड्या दारातून धावंत नताशा आत आली, तशीच वस्त्रहीन, हात नाचवंत; ओरडून
मार्गारीटाला म्हणाली, “खूश राहा, मार्गारीटा
निकोलायेव्ना!” तिने डोकं वाकवून मास्टरचं अभिवादन केलं आणि पुन्हां मार्गारीटाकडे
वळून म्हणाली, “मला तर माहीत होतं, की तुम्हीं कुठे जायच्या!”
“मोलकरणींना
सगळं माहीत असतं,” बोक्याने शेरा मारला आणि अर्थपूर्ण ढंगाने पंजा हालवंत म्हणाला, “असा विचार करणं चुकीचं आहे, की त्या आंधळ्या असतात.”
“तुझी
काय इच्छा आहे, नताशा?” मार्गारीटाने विचारलं, “त्या आलिशान घरांत परंत
चालली जा.”
“माझ्या लाडके, मार्गारीटा
निकोलायेव्ना,” नताशाने विनंती करंत म्हटलं आणि ती गुडघ्यांवर उभी राहिली, “ह्यांना सांगा,” तिने वोलान्दकडे तिरप्या
नजरेने बघितलं, “की मला चेटकीणंच राहू द्यावे. मला पुन्हां ते आलिशान भवन नको. मी ना तर
इंजीनियरशी, ना
मैकेनिकशी लग्न करणारेय! काल नृत्योत्सवांत श्रीमान जैकने माझ्यासमोर लग्नाचा
प्रस्ताव मांडला,” नताशाने आपली मूठ उघडून सोन्याचे काही सिक्के दाखवले.
मार्गारीटाने
प्रश्नार्थक नजरेने वोलान्दकडे पाहिलं. त्याने डोकं हालवलं. तेव्हां नताशा
मार्गारीटाच्या खांद्यावर वाकली आणि जो-याने तिचं चुम्बन घेऊन आनंदाने ओरडंत
खिडकीतून बाहेर उडून गेली.
नताशाच्या
जागेवर आता निकोलाय इवानोविच दिसला. तो आपल्या मानव रूपांत परतला होता, पण अत्यंत दुःखी आणि निराश
वाटंत होता.
“ह्यांना
तर मी खूप आनंदाने येथून जाऊं देईन,” वोलान्दने तिरस्काराने निकोलाय इवानोविचकडे बघंत म्हटलं, “खूपंच आनन्दाने, कारण की ह्यांची इथे काही
गरज नाहीये.”
“मी
विनंती करतो, की
कृपा करून मला एक सर्टिफिकेट द्यावे,” रागांत इकडे तिकडे बघंत आणि दृढतेने निकोलाय इवानोविच म्हणाला, “हे स्पष्ट करंत, की कालचा दिवस कुठे
घालवला.”
“कशासाठी?” बोक्याने गंभीरतेने
विचारलं.
“पोलिसांना
आणि बायकोला दाखवण्यासाठी,” निकोलाय इवानोविचने दृढतापूर्वक म्हटलं.
“साधारणपणे, आम्ही सर्टिफिकेट्स देत
नाही,” बोका आठ्या घालंत म्हणाला, “पण तुमच्यासाठी देऊन देऊं.”
आणि
निकोलाय इवानोविचला काही कळण्यापूर्वी, निर्वस्त्र हैला टाइपराइटरवर बसून गेली, आणि बोका तिला डिक्टेशन देऊं लागला, “प्रमाणित करण्यांत येतं, की ह्या प्रमाणपत्राचे धारक निकोलाय इवानोविचने उक्त रात्र सैतानाच्या
नृत्योत्सवांत घालवली, जिथे त्याला एका वाहनाच्या रूपांत नेण्यांत आलं होतं...हैला, कोष्ठक लाव! कोष्ठकांत
लिही ‘डुक्कर’. हस्ताक्षर – बेगेमोत.”
“आणि
तारीख?” निकोलाय इवानोविच कुरबुरला.
“तारीख
नाही टाकणार, तारीख
टाकल्याने प्रमाण पत्र बेकार होऊन जाईल,”
बोका म्हणाला. त्याने कागद हालवला, कुठून तरी सील आणली, तिच्यावर पद्धतशीरपणे फूक
मारली, तिला
कागदावर मारलं आणि कागद निकोलाय इवानोविचकडे सरकावला. ह्याच्यानंतर निकोलाय
इवानोविच काहीही खूण न सोडतां गायब झाला. त्याच्या जागेवर प्रकट झाला एक नवीन, अप्रत्याशित व्यक्ति.
“आता
हे आणखी कोण आलं?” वोलान्दने हाताने मेणबत्तीच्या प्रकाशाने स्वतःला वाचवंत झटक्याने विचारलं.
वारेनूखाने
डोकं हालवलं, दीर्घ
श्वास घेऊन म्हणाला, “मला परंत पाठवून द्या. मी पिशाच नाही होऊं शकलो. त्या वेळेस मी हैलाबरोबर
रीम्स्कीला मृत्युच्या मुखांत जवळ-जवळ लोटलंच होतं! पण मी रक्त पिपासू नाहीये. मला
सोडून द्या.”
“ही
काय बडबड आहे?” वोलान्दने कपाळावर आठ्या टाकंत विचारलं, “ही रीम्स्की कोण आहे? काय गडबड आहे?”
“तुम्हीं
काळजी नका करू, मालक,” आजाज़ेलोने म्हटलं आणि
वारेनूखाकडे वळला, “टेलिफोनवर गुण्डागर्दी करूं नकोस. टेलिफोनवर खोटं नको बोलूस, कळलं? पुन्हां
कधी तर असं करणार नाहीस?”
वारेनूखाला
आनंदाने वेड लागलं. त्याचा चेहरा चमकू लागला. तो मनांत येईल ते बडबडू लागला, “खरंच...मी, म्हणजे मला म्हणायचंय, महा...आत्ता लंच नंतर...”
वारेनूखाने हृदयावर हात ठेवून याचनेच्या भावाने अजाज़ेलोकडे पाहिलं.
“ठीक
आह,.
घरी जा!” त्याने उत्तर दिलं आणि वारेनूखा हवेंत विरघळला.”
आता
मला ह्यांच्यासोबत एकटं सोडा,” वोलान्दने मास्टर आणि मार्गारीटाकडे खूण करंत आज्ञा दिली.
वोलान्दच्या
आज्ञेचं लगेच पालन झालं. काही वेळ शांत राहिल्यावर वोलान्द मास्टरकडे वळला.
“तर, अर्बातच्या तळघरांतल्या
खोलींत? आणि
लिहिणार कोण? आणि
स्वप्नं? प्रेरणा?”
आता
माझ्याकडे कोणतही स्वप्न नाहीये, प्रेरणापण नाहीये,” मास्टरने उत्तर दिलं, “मला आता कशातंच रस नाहीये, फक्त हिला सोडून,” त्याने पुन्हां मार्गारीटाच्या डोक्यावर हात ठेवला, “त्यांनी मला पूर्णपणे
तोडून टाकलंय, मी
कंटाळलोय आणि मला परंत तळघरांत जायचंय.”
“आणि
तुमची कादम्बरी, पिलात?”
“मला
घृणा झालीये त्या कादम्बरीची,” मास्टरने उत्तर दिलं, “तिच्यामुळे मला खूप दुःख झेलावं लागलंय.”
“मी
तुझ्यासमोर हात जोडते,” मार्गारीटा दुःखी होऊन म्हणाली, “असं नको म्हणू. तू मला कां सतावतोय? तुला चांगलंच माहीत आहे, की तुझ्या ह्या कामांत मी आपलं सम्पूर्ण जीवन समर्पित केलंय.” मार्गारीटाने
आता वोलान्दकडे वळून म्हटलं, “तुम्हीं त्याचं म्हणणं नका ऐकूं, महाशय! हा फार दुःखी आहे.”
“पण
काहीतरी तर लिहावंच लागेल नं?” वोलान्दने म्हटलं, “जर तुम्हीं न्यायाधीशाबद्दल लिहिलेलं आहे, तर कमींत कमी ह्या अलोइज़ीबद्दलंच लिहा...”
मास्टर
हसला.
“ते
तर लाप्शोन्निकोवा छापणार नाही आणि तो मजेदार पण नाहीये.”
“पण
तुम्हीं जगणार कसे? भीक मागावी लागू शकते.”
“आनन्दाने, आनन्दाने,” मास्टरने म्हटलं आणि
मार्गारीटाला खेचून आपल्या बाहुपाशांत घेतलं,
“ही समजून जाईल आणि माझ्यापासून दूर चालली जाईल...”
“मला
असं नाही वाटंत,” वोलान्द तोंडातल्या तोंडांत पुटपुटला आणि पुढे म्हणाला, “पोंती पिलातचा इतिहास
लिहिणारा माणूस तळघरांत जाईल, फक्त लैम्पजवळ बसण्यासाठी आणि उपाशी मरण्यासाठी?”
मास्टरपासून
दूर होत मार्गारीटा रागाने म्हणाली, “मी जे शक्य होतं, ते सगळं केलं. आणि मी त्याच्या कानांत सगळ्यांत आकर्षक वस्तूबद्दलसुद्धां
सांगितलं, पण
ह्याने नाही म्हटलं.”
“जे
तुम्हीं त्याच्या कानांत कुजबुजलांत, ते मला माहितीये,” वोलान्दने प्रतिवाद करंत म्हटलं, “पण ते तुमच्यापेक्षां जास्त आकर्षक नाहीये. मी तुम्हांला सांगतोय,” हसून तो मास्टरला
म्हणाला, “ की तुमची कादम्बरी तुमच्यासाठी अनेक आश्चर्य आणेल.”
“ही
तर दुःखाची गोष्ट आहे,” मास्टरने उत्तर दिलं.
“नाही, नाही ही दुःखाची गोष्ट
नाहीये,” वोलान्द म्हणाला, “आता कोणतीच दुःख़द घटना होणार नाही. तर...मार्गारीटा निकोलायेव्ना, सगळं करून झालंय. तुम्हांला
माझ्याबद्दल काही तक्रार आहे?”
“काय
म्हणतांय, महाशय!”
“तर, हे घ्या, माझी आठवण म्हणून...”
वोलान्दने म्हटलं आणि उशीखालून एक लहानशी हीरे जडलेली सोन्याची नाल काढली.
“नाही, नाही, नाही, हे कशाला!”
“माझ्याशी
हुज्जत घालणार आहांत कां?” स्मित करंत वोलान्दने विचारलं.
मार्गारीटाने
ही भेट रुमालांत गाठ बांधून ठेवली, कारण की तिच्या कोटाला खिसाच नव्हता. मग तिला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं.
तिने खिडकीच्या बाहेर चंद्राकडे पाहिलं आणि म्हटलं, “एक गोष्ट मला कळंत नाहीये...रात्र अर्धीची अर्धीच आहे. कदाचित ब-याच आधी
सकाळ व्हायला हवी होती?”
“सणाच्या
रात्रीला काही वेळ ताणून ठेवणं चांगलं वाटतं!” वोलान्दने उत्तर दिलं, “तर, आता मी तुम्हांला शुभकामना
देतो!”
मार्गारीटाने
दोन्ही हात प्रार्थनेच्या मुद्रेत वोलान्दकडे केले, पण त्याच्याजवळ जायचं साहस करूं शकली नाही आणि हळूंच म्हणाली, “गुडबाय! गुडबाय!”
“पुन्हां
भेटूं,” वोलान्दने उत्तर दिलं.
आणि
काळा कोट घातलेली मार्गारीटा आणि दवाखान्याच्या कपड्यांत मास्टर जवाहि-याच्या
बायकोच्या फ्लैटच्या प्रवेश कक्षांतून निघाले, जिथे मेणबत्ती जळंत होती, आणि जिथे वोलान्दची मंडळी त्यांची वाट बघंत होती. जेव्हां प्रवेश कक्षांतून
बाहेर निघूं लागले, तर हैलाने सूटकेस उचलली, जिच्यांत कादम्बरी होती आणि मार्गारीटाची लहानशी दौलंत होती. बोका हैलाची
मदत करंत होता. फ्लैटच्या दारावर करोव्येवने वाकून अभिवादन केलं आणि तो गायब झाला. बाकीचे लोक जिन्यापर्यंत
सोडायला आले. जिना रिकामा होता. जेव्हां ते तिस-या मजल्याचं वळंण पार करंत होते, तेव्हां हल्कासा खट्चा
आवाज करंत काहीतरी पडलं. पण तिकडे कुणीच लक्ष दिलं नाही. सहाव्या नंबरच्या प्रवेशद्वाराजवळ
येऊन अजाज़ेलोने फूक मारली. ते बाहेर अंगणांत आले, जिथे चंद्राचा प्रकाश नव्हता येत, त्यांना पोर्चमधे एक माणूस दिसला. तो जोडे आणि टोपी घालून आरामाने झोपला
होता. जवळंच एक मोट्ठी काळी कार उभी होती, जिचे दिवे विझलेले होते. समोरच्या आरशांत एका कावळ्याची आकृति दिसंत होती.
ते
कारमधे बसणारंच होते, तेवढ्यांत मार्गारीटाने घाबरून हळूच म्हटलं, “अरे देवा, नाल
हरवली!”
“गाडींत
बसा,” अजाज़ेलोने म्हटलं, “आणि माझी वाट बघा. मी लगेच परंत येतो. बघतो की काय गडबड आहे.” आणि तो
प्रवेशद्वारांतून आत गेला.
झालं
असं होतं, की
मास्टर आणि मार्गारीटाच्या आपल्या मित्रांबरोबर निघण्याच्या थोडं आधी फ्लैट नं. 48मधून, जो जवाहि-याच्या बायकोच्या
फ्लैटच्या अगदी खाली होता, एक वाळकी, चिप्पड
बाई हातांत एक भांडं आणि पर्स घेऊन बाहेर जिन्यावर आली. ही तीच अन्नूश्का होती, जिने बुधवारी, बेर्लिओज़च्या दुर्दैवाने
सूर्यमुखीचं तेल फिरत्या फाटकाजवळ सांडलं होतं.
कोणालांच
माहीत नव्हतं, आणि
कदाचित कधीच माहीत होणार नाही, की मॉस्कोत ही बाई काय करंत होती, आणि कशी जगंत होती. तिच्याबद्दल फक्त येवढंच ठाऊक होतं, की ती दररोज भांडं घेऊन, किंवा पर्स घेऊन. किंवा
दोन्ही घेऊन तेलाच्या दुकानांत, किंवा बाजारांत, किंवा त्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ, जिच्यांत ती राहायची, किंवा जिन्यावर दिसायची; पण बहुतकरून ती दिसायची फ्लैट नं. 48च्या किचनमधे, जिथे ती राहात होती. शिवाय
हे पण सगळ्यांना माहीत होतं, की ती जिथेपण असायची, किंवा प्रकट व्हायची – तिथे लगेच काहीतरी गडबड व्हायची, आणि हे पण, की लोकांनी तिचं नाव ‘प्लेग’ ठेवलं होतं.
‘प्लेग’ – अन्नूश्का माहीत नाही कां
सकाळी खूप लवकर उठायची, आणि आज, न
जाणे कां, जणु
कोण्या अज्ञात शक्तीने तिला झुंजुमुंजू होण्यापूर्वीच बारा वाजून गेल्यावर थोड्यांच
वेळांत उठवलं होतं. दारांत किल्ली फिरली, अन्नूश्काचं आधी नाक आणि नंतर सम्पूर्ण शरीर बाहेर निघालं आणि आपल्यामागे
दार खेचून बाहेर निघणारंच होती, की वरच्या मजल्याचं दार वाजलं. कोणीतरी गडगडंत खाली आलं आणि अन्नूश्काला टक्कर
मारंत तिला इतक्या जोराने धक्का मारला, की तिचं डोकं भिंतीवर आपटलं.
“हे
नुसत्या चड्डींत सैतान तुला कुठे नेतोय?”
आपलं डोकं धरून अन्नूश्का गरजली. चड्डी घातलेला माणूस
हातांत सूटकेस पकडून आणि डोक्यावर टोपी घालून, मिटलेल्या डोळ्यांनी रानटी, झोपाळू आवाजांत म्हणाला:
“बॉयलर!
सल्फ्यूरिक एसिड! फक्त रंग रंगोटीतंच किती खर्च झाला!” आणि रडंत-रडंत भुणभुणला, “निघून जा!” आता तो पुन्हां
जो-याने फेकला गेला, पण पुढे नाही, पाय-यांवर खालीसुद्धां नाहीं, पण – वर, तिकडे, जिथे
अर्थशास्त्री-संयोजकाच्या पायाने फुटलेला खिडकीचा काच होता, आणि ह्या खिडकीतून उल्टा
लटकंत तो तीरासारखा बाहेर फेकला गेला. अन्नूश्का आपल्या डोक्याला बसलेल्या
माराबद्दल विसरून गेली. ती पोटावर लोळली आणि खिडकीच्या बाहेर डोकं काढून अंगणांत
बघू लागली, तिला
वाटलं होतं, की
उजेडांत तिला रस्त्यावर सूटकेसवाल्या माणसाचं क्षत-विक्षत शरीर बघायला मिळेल. पण
अंगणांत आणि रस्त्यावर काहींच नव्हतं.
बस, येवढ्यावरंच समाधान करावं
लागलं, की
तो विचित्र, झोपेंत
असलेला प्राणी पक्ष्यासारखा, काहीही मागमूस न ठेवतां घरांतून उडून गेला. अन्नूश्काने क्रॉसचं चिन्ह बनवंत
विचार केला, “हो, खरोखरंच
कमालीचा आहे फ्लैट नंबर पन्नास! लोकं उगाचंच नाही म्हणंत! अजब आहे हा फ्लैट! फ्लैट
आहे की भुताटकी!”
तिने
येवढांच विचार केला होता, तेवढ्यांत वरच्या मजल्यावरचं दार पुन्हां उघडलं आणि दुस-यांदा कोणीतरी धावंत
खाली आलं. अन्नूश्का भिंतीला चिटकली. तिने बघितलं, की कोणी तरी सम्माननीय, दाढीवाला, पण
थोडा-थोडा डुकरासारखा चेहरा असलेला माणूस अन्नूश्काच्या बाजूने तीरासारखा गेला, आणि पहिल्या माणसासारखांच
तो पण खिडकीच्या मार्गाने बाहेर फेकला गेला. तसांच जमिनीवर क्षत-विक्षत न होता.
अन्नूश्का विसरूनंच गेली, की ती कशासाठी बाहेर निघाली होती, आणि ती तशीच क्रॉसचं चिन्ह बनवंत पाय-यांवर उभी राहून “ओह...ओह” करंत
स्वतःशीच गोष्टी करूं लागली.
तिस-यांदा
निघाला, बिना
दाढीचा, गोल, चिकण्या चेह-याचा, कोट घातलेला माणूस; तो पळंत पळंत आला आणि अगदी
तस्साच खिडकीतून बाहेर गेला.
अन्नूश्काबद्दल
हे सांगावं लागेल, की
ती फार जिज्ञासू होती. हे बघण्यासाठी, की आता काय-काय नवीन चमत्कार होणार आहेत, तिने थोडा वेळ तिथेच थांबण्याचा निश्चय केला. वरचा दरवाजा पुन्हां उघडला आणि
ह्यावेळेस एक पूर्ण झुण्डच पाय-या उतरूं लागला, धावंत नाही, पण
साधारण माणसांसारखा. अन्नूश्का धावंतच खिडकीपासून दूर झाली, ती खाली आपल्या
फ्लैटपर्यंत उतरली, फट्कन दार उघडून त्याच्या मागे लपली, आणि दाराच्या फटीला उत्सुकतेने भरलेला तिचा डोळा चिकटला.
कोणी
एक आजा-यासारखा, किंवा
आजारी नसलेला पण अजब, पांढरा-फट्क, वाढलेली दाढी असलेला, काळी टोपी आणि गाउनसारखं काहीतरी घातलेला डगमगत्या पावलांनी खाली उतरंत
होता. अर्धवट अंधारांत अन्नूश्काने बघितलं, की त्याला सांभाळंत नेत होती एक महिला, जिने काळसर गाउन घातला होता, कदाचित त्या महिलेचे पाय अनवाणी होते, किंवा तिने एखादे पारदर्शी, परदेशी, फाटके
जोडे घातले होते. छिः छिः! जोड्यांचं काय! पण बाई तर नग्न आहे! हो, त्या गाउनने तिने आपल्या
शरीराला नुसतंच झाकलेलं होतं! ‘फ्लैट आहे की भुताटकी!’ अन्नूश्काचं ह्रदय प्रसन्न होतं, की उद्या शेजा-यांना सांगण्यासाठी तिच्याजवळ बरांच माल-मसाला आहे.
ह्या
विचित्र पोषाकवाल्या महिलेच्या मागे होती एक सम्पूर्ण निर्वस्त्र महिला, तिने हातांत सूटकेस धरली
होती, त्या
सूटकेसच्या बरोबर-बरोबर चालला होता एक विशालकाय बोका. अनूश्का डोळे चोळून बघंत
होती, तिच्या
तोंडातून किंकाळी निघतां-निघतां राहिली.
ह्या
झुण्डाच्या शेवटी होता कमी उंचीच परदेशी, तो किंचित लंगडून चालंत होता, त्याचा एक डोळा तिरपा होता, त्याने पांढरं जैकेट घातलं होतं, टाय लावला होता, पण त्याने कोट नव्हता घातला. ही सगळी मंडळी अन्नूश्काच्या जवळून जाऊं लागली.
तेवढ्यांत खट्कन काहीतरी जमिनीवर पडलं. हा अंदाज़ लावून की पायांचे आवाज दूर जात
आहेत, अन्नूश्का
सापासारखी रांगून बाहेर आली. भांडं भिंतीजवळ ठेऊन ती पोटावर लोळून फरशीवर हाताने
शोधूं लागली. तिच्या हाताला लागला एक रुमाल, ज्यांत कोणचीतरी वजनदार वस्तू बांधलेली होती. रुमालांत बांधलेया वस्तूला
बघितल्यावर अन्नूश्काचे डोळे विस्फारून माथ्यावर चढले! अन्नूश्काने ती वस्तू
डोळ्यांच्या जवळ आणली; आता तिचे डोळे लांडग्यासारखे चमकू लागले. तिच्या डोक्यांत एक वादळ साँय-साँय
करू लागलं, ‘मला काही माहीत नाही! मी काहींच बघितलं नाही!...भाच्याकडे? किंवा ह्याचे तुकडे-तुकडे
करावेत...हिरेतर उखडून काढता येतील...आणि एक-एक करून...एक पेत्रोव्कांत, दुसरा स्मोलेन्स्कला...आणि
– मी काही नाही बघितलं, मला काहीही माहीत नाही!’
अन्नूश्काने
ती वस्तू आपल्या शर्टाच्या आंत छातीजवळ लपवली. भांडं उचलून रांगंत ती आपल्या
फ्लैटमधे घुसणारंच होती, की तिच्यासमोर प्रकट झाला, सैतानच जाणे, तो कुठून आला होता, तोच पांढरं जैकेट, कोट न घातलेला आणि हळूंच कुजबुजंत म्हणाला, “रुमाल आणि नाल काढ.”
“कसला
रुमाल, कसली
नाल?” अन्नूश्काने कृत्रिमतेने विचारलं. “माला काही रुमाल-बिमाल माहीत नाही, नागरिक, तू प्यायला आहेस कां?”
पांढ-या
जैकेटवाल्याने आपल्या बसच्या ब्रेक्ससारख्या मजबूत आणि तश्यांच थंडगार बोटांनी
काहीही न म्हणतां अन्नूश्काचा गळा अशाप्रकारे दाबला, की तिच्या छातींत हवा जायची एकदम थांबली. अन्नूश्काच्या हातांतून भांडं खाली
पडलं. थोडा वेळ अन्नूश्काला हवा न देता जखडून, पांढ-या जैकेटवाल्या परदेशी माणसाने तिच्या मानेवरून बोटं काढली. मोकळ्या
हवेंत श्वास घेऊन अन्नूश्काने स्मित केलं.
“ओह, नाल,” ती म्हणाली, “ही घ्या! तर ही तुमची नाल
आहे? मी
बघितलं की रुमालांत काहीतरी बांधलेलं आहे...मी मुद्दामंच उचललं, म्हणजे दुसरा कोणी न उचलून
घेवो, आणि
मग, शोधंत
बसा!”
रुमाल
आणि नाल घेऊन परदेशी माणूस तिचं वाकून-वाकून अभिवादन करूं लागला. तिचा हात आपल्या
हातांत घेऊन तो परदेशी उच्चारांत तिला घडी-घडी धन्यवाद देऊं लागला.
“मी
तुमचा फार आभारी आहे! कोणाची तरी आठवण असल्यामुळे मला ही नाल अत्यंत प्रिय आहे.
हिला सांभाळून ठेवण्याबद्दल मला तुम्हांला दोनशे रुबल्स देण्याची परवानगी द्या.”
आणि त्याने लगेच आपल्या खिश्यांतून पैसे काढून अन्नूश्काच्या हातांत ठेवले.
ती
बेसुध होऊन हसू लागली आणि ओरडून म्हणाली, “ओह, मी
ह्रदयपूर्वक तुमची आभारी आहे! धन्यवाद! धन्यवाद!”
तो
बिनधास्त परदेशी एकांच उडींत पूर्ण जिना उतरून गेला, पण दिसेनासा होण्यापूर्वी तो खालून स्पष्टपणे ओरडला, “तू म्हातारडी चेटकीण, जर पुन्हां दुस-याच्या
वस्तूला हात जरी लावशील, तर तिला पोलिसांत नेऊन दे, स्वतःच्या छातीशी लपवून नको ठेवूं!”
ह्या
सगळ्या कल्लोळाने आणि गडबडीने सुन्न होऊन अन्नूश्का काही वेळ यंत्रवत्त ओरडतंच
राहिली, ‘धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!” पण तो परदेशी केव्हांच गायब झाला होता.
अंगणांत
आता कार तैयार होती. मार्गारीटाला वोलान्दची भेट परंत देऊन अजाज़ेलो त्यांना निरोप
देऊं लागला. त्याने विचारलं, की तिला बसायला त्रास तर नाही होत आहे. हैलाने मार्गारीटाचं प्रदीर्घ चुम्बन
घेतलं. बोका तिच्या हाताजवळ लोळून गेला. निरोप देणा-यांने हात हलवंत एका कोप-यांत
निश्चल पडलेल्या मास्टरला निरोप दिला, ड्राइवर कावळ्याकडे बघून हात हलवला आणि लगेच हवेंत विरघळून गेले. त्यांनी
पाय-यांवरून जाण्याची तसदी नाही घेतली. कावळ्याने लाइट्स लावले आणि मेल्यासारख्या
पडलेल्या माणसाच्या बाजूने प्रवेशद्वारांतून कार बाहेर काढली. आणि मोट्ठ्या काळ्या
कारचे दिवे गजबजलेल्या आणि हल्लागुल्ला असलेल्या सादोवायाच्या दिव्यांत मिसळून गेले.
एका
तासानंतर अर्बातच्या एका गल्लीतल्या तळघरांत असलेल्या त्या छोट्याश्या घराच्या
समोरच्या खोलींत सगळं काही अगदी तस्संच होतं, जसं मागच्या वर्षीच्या हिवाळ्यांतल्या त्या भयानक रात्रीच्या आधी असायचं.
मखलमी टेबलक्लॉथने झाकलेल्या टेबलवर शेड असलेला लैम्प जळंत होता, जवळंच फ्लॉवरपॉट लिलीच्या
फुलांनी सजलेला होता, मार्गारीटा चुपचाप बसून आनंदाने आणि सहन केलेल्या दुःखामुळे रडंत होती.
ज्वाळांमधे काळं झालेलं हस्तलिखित तिच्यासमोर पडलं होतं, जवळंच सम्पूर्ण, शाबूत हस्तलिखितांचा एक
उंच ढीग पण होता. जवळच्या सोफ्यावर हॉस्पिटलच्या गाउनमधेच मास्टर गाढ निद्रेत
होता. त्याचा श्वास निःशब्द होता.
मनसोक्त
रडून झाल्यावर मार्गारीटाने शाबूत हस्तलिखित उचललं. तिने तो भाग शोधला, जो क्रेमलिन वॉलजवळ अजाज़ेलोशी भेट व्हायच्या आधी ती वाचंत होती.
मार्गारीटाला झोप नव्हती येत. तिने हस्तलिखित इतक्या प्रेमाने कुरवाळलं, जणु आपल्या मांजरीला
कुरवाळतेय. त्याला हातांत घेऊन आलटून-पालटून बघू लागली, कधी ती पहिलं पान बघायची, तर कधी शेवटचं. अचानक एका भयानक विचाराने तिला आवळलं, की हे सगळं नुसतं जादू आहे, की आत्ता हस्तलिखितं गायब
होऊन जातील, की
डोळे उघडल्यावर ती स्वतःच्या शयनकक्षांत असेल आणि तिला शेकोटी पेटवण्यासाठी उठावं
लागेल. पण ही तिच्या कष्टांची, दीर्घ यातनामय दुःखांची प्रतिध्वनीमात्र होती. काहीही गायब नाही झालं, महाशक्तिमान वोलान्द खरोखरंच
सर्वशक्तिमान होता, आणि मार्गारीटा कित्ती तरी वेळ, कदाचित सकाळ होईपर्यंत हस्तलिखिताची पानं गोंजारंत राहिली, तन्मयतेने बघंत राहिली, मुके घेत राहिली, आणि घडी-घडी वाचंत राहिली:
“भूमध्य सागरांतून आलेल्या
अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं...हो, अंधार...”
*************
पंचवीस
न्यायाधीशाने
करियाथच्या जूडासची रक्षा करण्याचा कसा प्रयत्न केला
भूमध्य सागरांतून आलेल्या
अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला
भयानक अन्तोनियो बुरुजाशी जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले, आकाशातून
एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित पंखवाल्या देवतांच्या मूर्ती,
तोपांसाठी
बनवलेल्या भोकांसहित हसमनचा प्रासाद, बाजार,
काफिले,
सराय,
गल्ल्या
आणि तलावांना झाकून टाकलं. महान शहर येर्शलाइम हरवलं, जणू
त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं. सगळं गिळून टाकलं अंधाराने, जो
येर्शलाइम आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या जीवित प्राण्यांना भयभीत करंत
होता. वसन्त ऋतुच्या ह्या निस्सान महिन्याच्या चौदा तारखेच्या शेवटच्या प्रहरांत
सागराकडून एक विचित्र ढग आलं आणि सगळंच जलमग्न करून गेलं.
त्याने आपल्या निर्मम प्रहाराने
बाल्ड-माउन्टेनला पस्त केलं होतं, जिथे वधिक
सुळावर लटकवलेल्या कैद्यांच्या शरीरांत शीघ्रतेने भाल्याचं टोक खुपसंत होते;
तो
येर्शलाइमच्या मंदिरावर आदळला होता; वाफाळलेल्या
लाटांच्या रूपांत वाहून खालच्या शहराला जलमग्न करून गेला होता. तो खिडक्यांच्या आत
घुसंत होता, वाकड्या-तिकड्या पायवाटांवरून
लोकांना घरांत ढकलंत होता. ओल देण्यांत कृपणता दाखवंत तो फक्त प्रकाशंच देत होता.
जसांच हा काळा वाफा सोडंत असलेला राक्षस अग्निवर्षा करायचा,
त्या
घनघोर अंधारांत मंदिराचं शिखर चमकून जायचं. पण क्षणभरातंच पुन्हा विझून जायचं,
आणि
मन्दिर अंतहीन अंधारांत लुप्त व्हायचं. पुन्हां पुन्हां त्याच्यातून बाहेर यायचं
आणि पुन्हां-पुन्हां त्या अंधारांत बुडून जायचं. दरवेळेसचं हे बुडणं एक विनाशकारी
कडकडाट आणायचं.
काही अन्य प्रकाश शलाका
मंदिराच्या समोरच्या पश्चिमी टेकडीवर असलेल्या हिरोद महानच्या प्रासादाला त्या
अंनंत अंधारातून साद घालायच्या, आणि
त्याच्या भयानक, नेत्रहीन, स्वर्णिम
प्रतिमा, आकाशाकडे हात पसरून उडू लागायच्या.
पण आकाश-ज्योति लगेच लुप्त व्हायची, आणि
सौदामिनी आपल्या चाबकाने त्या प्रतिमांना परत अंधारांत ढकलून द्यायची.
अचानक,
मुसळाधार
पावसाची झडी लागली, आणि तेव्हां हे वादळ चक्रीवादळांत
परिवर्तित झालं. त्या ठिकाणी, जिथे
दुपारी, उद्यानांत संगमरमरी बेंचच्या जवळ
न्यायाधीश आणि धर्म-गुरूने वार्तालाप केला होता, तोपे
सुटलेल्या गोळ्यासारखा भीषण आवाज करंत सरूची फांदी पडली. पाण्यानी ओथंबलेली धूळ
आणि गारांबरोबर स्तंभांच्या खाली असलेल्या बाल्कनींत तुटलेले गुलाब,
मैग्नोलियाची
पानं, छोट्या-छोट्या फांद्या आणि रेतीचे
कण उडून येऊ लागले. चक्रीवादळ बागेला उध्वस्त करंत होतं.
ह्यावेळेस स्तंभांच्या खाली
फक्त एक माणूस होता, आणि तो होता न्यायाधीश.
आता तो खुर्चीवर बसलेला नसून
एका लहान, कमी उंचीच्या टेबलाजवळ पडलेल्या
कोचावर पहुडला होता. टेबलवर खाण्या पिण्याची सामग्री ठेवलली होती,
सुरयांमधे
दारू होती. दुसरा, रिकामा कोच, टेबलाच्या
दुस-या बाजूला ठेवला होता. न्यायाधीशाच्या पायांजवळ रक्तवर्णी द्रव सांडलेलं होतं
आणि फुटक्या सुरईचे तुकडे पडले होते. तो सेवक, ज्याने
वादळाच्या आधी टेबल सजवून त्यावर पेय इत्यादि ठेवलं होतं, माहीत
नाही कां, न्यायाधीशाच्या नजरेनं घाबरून गेला;
तो
विचार करूं लागला की कुठेतरी काहीतरी कमी राहिलंय आणि न्यायाधीशाने त्याच्यावर
रागावून सुरई फरशीवर फेकून फोडून टाकली आणि म्हणाला, “मला
देताना, चेह-याकडे कां नाही बघंत?
तू
काही चोरलं आहेस कां?”
अफ्रीकी सेवकाचा काळा चेहरा
भुरकट झाला. त्याच्या डोळ्यांत मृत्युसारखी भीती दिसू लागली,
तो
थरथरू लागला आणि त्याच्या हातांतून दुसरी सुरईपण पडतां-पडतां वाचली,
पण
न्यायाधीशाचा राग जसा पट्कन आला होता, तसांच तो
निघूनही गेला. अफ्रीकी सेवक वाकून सुरईचे तुकडे उचलणारंच होता,
की
न्यायाधीशाने खुणेने त्याला जायला सांगितलं आणि सेवक पळून गेला. म्हणून द्रव तिथेच
पडून राहिलं.
आता, चक्रीवादळ
आल्यावर अफ्रीकी सेवक एका कोनाड्याजवळ, ज्यांत एका
नतमस्तक नग्न स्त्रीची श्वेत पाषाणाची प्रतिमा होती, लपून
उभा होता, म्हणजे कारण नसताना न्यायाधीशासमोर
पडणार नाही आणि बोलावल्याबरोबर लगेच त्याच्या सेवेंत उपस्थित राहूं शकेल.
ह्या वादळी संध्याकाळी
कोचावर अर्धवट लोळलेला न्यायाधीश स्वतःच प्याल्यांत दारू ओतून मोठे-मोठे घोट घेत
होता, मधून-मधून तो पावाचे तुकडे तोंडांत
टाकायचा, मासा खायचा, लिंबू
चोखायचा आणि पुन्हा दारू प्यायला लागायचा.
जर गरजत्या पाण्याचा हल्ला
नसता, प्रासादाच्या छताला धमकावणारा
विजेचा कडकडाट नसता, बाल्कनीच्या पाय-यांवर पडणा-या
गारांची खडखड नसती, तर ऐकूं आलं असतं की न्यायाधीश
स्वतःशीच बडबड करतोय. आणि जर आकाशातील क्षणिक चमक स्थाई प्रकाशांत परिवर्तित झाली
असती, तर हे पण दिसलं असतं की दारू आणि
अनिद्रेमुळे सुजलेल्या न्यायाधीशाच्या चेह-यावर आतुरता आहे आणि तो डबक्यात
पडलेल्या दोन पांढ-या गुलाबांकडे बघंत नसून आपला चेहरा सतत उद्यानाकडे फिरवतोय,
तो
कुणाची तरी वाट बघतोय, खूप आतुरतेने वाट बघतोय.
काही वेळाने न्यायाधीशाच्या
डोळ्यांसमोर पावसाची सर किंचित मंद झाली. हे चक्रीवादळ कितीही भीषण असलं,
तरी त्याचा जोर कमी झालांच. आता गारा नव्हत्या पडंत. विजांची चमक आणि कडकडाट आता
थांबून-थांबून येत होते. येर्शलाइमवर आता चांदीची किनार असलेली दाट जांभळी चादर
ताणलेली नसून, साधारण भु-या-काळ्या रंगाचं ढग
तरंगत होतं. वादळ मृत-सागराकडे निघून गेलं होतं.
आता पावसाचा आवाज आणि
वाहत्या पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकूं येत होता, जे
त्या पाय-यांवर वाहत होतं, जिथून
न्यायाधीश सकाळी मृत्युदण्डाची घोषणा करण्यासाठी चौकावर गेला होता. शेवटी मौन
झालेल्या कारंज्याचा आवाज पण ऐकूं आला. उजेड झाला. पूर्वेकडे पळणा-या भुया
चादरींत आता निळ्या-निळ्या खिडक्या दिसंत होत्या.
मंद पडलेल्या पावसाच्या
हल्ल्याला छेदंत, दुरून न्यायाधीशापर्यंत तुता-यांचा
आणि शैकडो घोड्यांच्या धावण्याचा आवाज पोहोचला. न्यायाधीशाच्या शरीरांत किंचित
हालचाल झाली. त्याचा चेहरा उजळला. सैन्य तुकडी बाल्ड-माउन्टेनवरून परंत येत होती.
आवाजावरून कळंत होतं, की त्याच चौकातून जाते आहे,
जिथून
मृत्युदण्डाची घोषणा झाली होती.
शेवटी न्यायाधीशाला
पाय-यांवरून वरच्या बाल्कनीकडे येणा-या त्या पावलांची चाहूल ऐकूं आली,
जिची
तो प्रतीक्षा करंत होता. न्यायाधीशाने मान वळवली, आणि
त्याचे डोळे प्रसन्नतेने चमकले.
दोन संगमरमरी सिंहांच्या
आकृत्यांच्यामधे आधी प्रकट झालं टोप घातलेल शिर, मग
एक सम्पूर्ण ओलाचिंब झालेला माणूस, ज्याची
बरसातीसुद्धां त्याच्या शरीराला चिटकली होती. हा तोच माणूस होता,
ज्याने
प्रासादाच्या अंधा-या खोलींत मृत्युदण्डाच्या घोषणेपूर्वी न्यायाधीशाशी वार्तालाप
केला होता, आणि जो मृत्युदण्डाच्या वेळेस
तिपाईवर बसून एका फांदीशी खेळंत होता.
पाण्याच्या डबक्यांकडे लक्ष
न देता टोप घातलेला माणूस उद्यानाचा चौक पार करून बाल्कनीच्या संगमरमरी फरशीवर आला
आणि हात उंच करून, गोड आवाजांत त्याने लैटिनमधे म्हटलं:
“न्यायाधीशाच्या स्वास्थ्य
आणि प्रसन्नतेची कामना!”
“अरे देवा!” पिलात
आश्चर्याने म्हणाला, “तुझ्या शरीरावर तर एकही वाळलेला तार
नाहीये! काय वादळ होत! हो ना? कृपा करून
पट्कन माझ्याजवळ ये. कपडे बदलून मला सविस्तर सगळं सांग.”
आगंतुकाने टोप काढला.
पूर्णपणे ओल्या डोक्याचे आणि कपाळावर चिटकलेले केस मोकळे करतांना त्याच्या चिकण्या
चेह-यावर सभ्य स्मित झळकलं. तो कपडे बदलायला हे सांगून नाही म्हणू लागला,
की
पाऊस त्याचं काहींच करूं शकंत नाही.
“मला काहीही ऐकायचं नाहीये,”
पिलातने
म्हटलं आणि टाळी वाजवून लपलेल्या सेवकाला बोलावलं. त्याला आगंतुकाची सेवा करण्यास
आणि मग लगेच खायला काहीतरी गरम देण्यास सांगितलं. केस कोरडे करायला,
कपडे
बदलायला आणि दुसरे, कोरडे जोडे घालून स्वतःला व्यवस्थित
करायला न्यायाधीशाच्या पाहुण्याने खूपंच कमी वेळ घेतला आणि केसांचा भांग पाडून,
कोरड्या
चपला घालून आणि कोरड्या लाल मिलिट्री कोटांत तो लवकरंच बाल्कनीत आला.
आतापर्यंत सूर्य येर्शलाइमला
परतला होता आणि भूमध्य सागरांत बुडण्याआधी न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या
ह्या शहरावर आपल्या अंतिम किरणा पसरंत बाल्कनीच्या पाय-यांवर सोनं लुटवंत होता. कारंजे
पुनर्जीवित झाले होते आणि आपल्या सम्पूर्ण ताकदीनिशी गाऊ लागले होते. कबुत्तर गुटर
गूँ करत रेतीवर फुदकंत होते; ओल्या
रेतीवर चोच मारंत काही तरी धुंडत होते. लाल द्रवाचं छोटंस डबकं कोरडं केलेलं होतं,
फुटक्या
सुरईचे तुकडे नेलेले होते आणि टेबलवर गर्मागरम माँस ठेवलेलं होतं,
ज्यांतून
वाफ़ निघंत होती.
“हुकुम करा,
न्यायाधीश,
मी
तयार आहे,” आगंतुकाने टेबलाजवळ येत म्हटलं.
“पण, जो
पर्यंत तुम्हीं बसंत नाही आणि दारू पीत नाही, मी
तुम्हांला काहीही सांगणार नाहीये,” मोठ्या
प्रेमाने न्यायाधीशाने उत्तर दिलं आणि त्याला दुस-या कोचावर बसण्याची खूण केली.
आगंतुक कोचावर पसरला,
सेवकाने
त्याच्या प्याल्यांत लाल-घट्ट दारू भरली. दुस-या सेवकाने सावधगिरीने पिलातच्या
खांद्यावर झुकून न्यायाधीशाचा प्याला भरला. नंतर त्याने खुणेने दोन्हीं सेवकांना
तिथून जायला सांगितलं. जोपर्यंत आगंतुक खात-पीत होता, पिलात
डोळे बारीक करून दारूचे घोट घेत आपल्या पाहुण्याकडे बघंत होता. पिलातच्या समोर
उपस्थित व्यक्ति मध्यम वयाचा होता, त्याचा
चेहरा गोड, आकर्षक, चिकणा
होता, नाक जाड होतं. केसांचा रंग अजबंच
होता. आता वाळंत असताना ते भुरे दिसंत होते. आगंतुकाच्या नागरिकतेबद्दल
सांगणंसुद्धां कठीण होतं. त्याच्या चेह-याची विशेषता होती – त्यावर असलेला
सहृदयतेचा भाव, ज्याच्याशी विसंगंत होते डोळे,
किंवा
असं म्हणतां येईल की त्याच्याशी वार्तालाप करणा-या व्यक्तीकडे बघण्याची त्याची
पद्धंत. आपल्या छोट्या-छोट्या डोळ्यांना तो साधारणपणे विचित्र,
अर्धवट
उघडलेल्या, किंचित सुजलेल्या पापण्यांखाली
लपवून ठेवायचा. तेव्हां ह्या डोळ्यांमधे निष्पाप खोडकर भाव तरळायचा. कदाचित
पिलातचा पाहुणा विनोदप्रिय होता. पण कधी-कधी ह्या हास्याच्या चमकत्या लकेरीला तो
बाहेर ढकलून द्यायचा आणि आपल्या पापण्या पूर्ण उघडून त्याच्याशी वार्तालाप करणा-यावर
अचानक आणि एकटक बघायचा, जणु
त्याच्या नाकावर असलेला एखादा लपलेला डाग शोधतोय. हे फक्त एकंच क्षणासाठी व्हायचा,
दुस-यांच
क्षणी पापण्या पुन्हां झुकायच्या, अर्धवट बंद
व्हायच्या आणि त्यांत पुन्हां तरळून जायची सहृदयता आणि खोडकर बुद्धिमत्ता.
पाहुण्याने दुसरा प्यालापण
नाकारला नाही. मजा घेत-घेत काही मासे खाल्ले, उकडलेल्या
भाज्यांचा स्वाद घेतला आणि मांसाचा एक तुकडापण खाल्ला.
तृप्त झाल्यावर त्याने
दारूची तारीफ केली:
“अति उत्तम वस्तू आहे,
न्यायाधीश,
पण
ही ‘फालेर्नो’1तर
नाहीं?”
“ त्सेकूबा’2
– तीस वर्ष जुनी,” खूप
प्रेमाने न्यायाधीशाने सांगितलं.
पाहुण्याने छातीवर हात ठेवंत
आणखी काहीही खाण्यास नकार दिला आणि म्हटलं की त्याने पोटभर खाल्लंय. तेव्हां
पिलातने आपला प्याला भरला. पाहुण्यानेपण तसंच केलं. दोघांनी आपल्या-आपल्या
प्याल्यांतून थोडी थोडी दारू माँसाच्या पदार्थात टाकली.
न्यायाधीशाने प्याला उंचावंत
म्हटलं:
“आपल्या साठी, तुझ्यासाठी, रोमचा पिता, सर्वाधिक प्रिय आणि
सर्वोत्तम व्यक्ति, सीज़र साठी!”
आणि ह्याच्यानंतर प्याला
रिकामा केला. अफ्रीकी सेवकांनी फळं आणि सुरया सोडून बाकी सगळी सामग्री टेबलावरून
काढून घेतली. स्तंभांच्या बाल्कनीत आपल्या पाहुण्यासोबत तो एकटाच उरला.
“तर,” पिलातने हळूंच म्हटलं, “शहरांतल्या
वातावरणाबद्दल काय म्हणतोय?”
त्याने नकळतंच आपली दृष्टी
तिकडे फिरवली,
जिथे
उद्यानाच्या मागे, उंच स्तंभांच्या इमारती आणि समतल छप्परं सूर्याच्या अंतिम
किरणांमधे जळंत होते.
“मला वाटतं, न्यायाधीश,” पाहुण्याने उत्तर
दिलं,
“की
येर्शलाइमचं वातावरण आता संतोषजनक आहे.”
“तर, असं समजायचं कां, की आता कोणत्याही
प्रकारच्या गडबडीची आशंका नाहीये?”
“समजूं शकता,” न्यायाधीशाकडे
प्रेमाने बघंत पाहुण्याने उत्तर दिलं, “फक्त एकाच्याच जोरावर – सीज़र महानच्या
शक्तीच्या जोरावर.”
“हो, ईश्वर त्यांना दीर्घायू करो,” पिलातने पट्कन पुढे
म्हटलं,
“आणि
समग्र शांति प्रदान करो.” थोडा वेळ चुप राहिल्यावर तो पुढे म्हणाला, “तुम्हांला असं
वाटतंय का की सेनांना काढून घ्यावं?”
“मला वाटतं, की विद्युत गतीने
प्रहार करणारी तुकडी काढूं शकता,” पाहुण्याने उत्तर देऊन पुढे म्हटलं, “निघायचा आधी जर तिने
एकदा शहरांत परेड केली तर चांगलं राहील.”
“खूप चांगला विचार आहे,” न्यायाधीशाने सहमति
दर्शवंत म्हटलं,
“परवा
मी तिला सोडून देईन आणि स्वतः सुद्धां चालला जाईन, आणि – मी बाराही देवांची3 आणि पालक देवतांची4
शप्पथ घेऊन सांगतो की हे आजंच करता येण्यासाठी मी बरंच काही दिलं असतं.”
“न्यायाधीशाला येर्शलाइम
आवडंत नाही का?”
पाहुण्याने
सहृदयतेने विचारलं.
“मेहेरबान,” स्मितकरंत न्यायाधीश
म्हणाला,
“सम्पूर्ण
पृथ्वीवर ह्याच्यापेक्षा बेकार शहर दुसरं कोणतंच नाहीये. हवामानाबद्दल तर मी
बोलतंच नाहीये! प्रत्येक वेळेस, जेव्हां मी इथे येतो, मी आजारीच पडतो. ही तर
अर्धीच व्यथा आहे. पण त्यांचे हे उत्सव – जादुगार, सम्मोहक, मांत्रिक, तांत्रिक, मूर्तीपूजक...पागल
आहेत,
पागल!
त्या एका रक्षणकर्ता(मशीहा)5लांच घ्या, ज्याची ते ह्यावर्षी वाट
बघंत होते! प्रत्येक क्षणाला असं वाटंत की एखादा अप्रिय रक्तपात बघावा लागतो की
काय. नेहमी सेनांना फिरवंत राहा, लोकांचे रडगाणे आणि तक्रारी वाचंत राहा, ज्यांतील अर्ध्यातर
तुमच्या स्वतःच्याच विरुद्ध असतात! मान्य करा, हे सगळं खूप कंटाळवाण आहे.
ओह,
जर मी
सम्राटाच्या सेवेत नसतो तर...”
“हो, येथील उत्सवांचा काळ कठीण
असतो,”
पाहुण्याने
सहमति दाखवली.
“मी अगदी हृदयापासून कामना
करतो की ते लवकरंच संपावे,” पिलातने उत्साहाने म्हटले, “मला सीज़ेरियाला तरी जाता
येईल. विश्वास करा, हिरोदचा ही भुतडी रचना...” न्यायाधीशाने हात हलवंत स्तंभांकडे खूण
केली,
ज्याने
हे स्पष्ट झालं,
की तो
महालाबद्दल सांगतोय, “मला पूर्णपणे पागल करून टाकते. मी इथे रात्री नाही घालवूं शकंत.
सम्पूर्ण जगांत ह्याच्याहून विचित्र स्थापत्यकलेचा नमूना आणखी कुठे नाही सापडणार.
जाऊं द्या,
चला, कामाबद्दल बोलूं या.
सगळ्यांत आधी,
हा
दुष्ट बार-रब्बान – तुम्हांला त्याची काळजी नाही वाटंत?”
पाहुण्याने आपली नजर
न्यायाधीशाच्या गालावर टाकली, पण तो कपाळ्यावर आठ्या टाकून कंटाळवाण्या नजरेने दूर
कुठेतरी बघंत होता, शहराच्या त्या भागाकडे, जो त्याच्या पायांखाली होता आणि संध्याकाळच्या
संधिप्रकाशांत हळू-हळू विझंत होता. पाहुण्याची नजरपण विझली, त्याच्या पापण्या
झुकल्या.
“असं म्हणता येईल, की बार आता धोकादायक
नाही राहिला,
केकरासारखा
झालांय,”
पाहुण्याने
सांगायला सुरुवात केली तर त्याच्या गोल चेह-यावर आठ्या पडल्या, “त्याच्यासाठी आता विद्रोह करणं इतकं सोपं नाहीये.”
“खूप प्रसिद्ध आहे कां?” पिलातने हसंत
विचारलं.
“न्यायाधीश, नेहमी सारखंच, हा प्रश्न खूप
बारीकीने समजतांयत!”
“पण, तरीही, आपल्याला...”
न्यायाधीशाने चिंतित स्वरांत आपलं पातळ, लांब, काळ्या रत्नाची अंगठी
घातलेलं बोट वर करंत म्हटलं.
“ओह, न्यायाधीश, विश्वास ठेवा, जोपर्यंत मी
जूडियांत आहे,
बार
मला कळल्याशिवाय एक पाऊलसुद्धां उचलूं शकंत नाही, माझे गुप्तचर त्याच्या मागे
आहेत.”
“आता मला चैन पडला – तसंही
जेव्हां तुम्ही इथे असता, तेव्हां मी नेहमीच निश्चिंत असतो.”
“आपण खूप दयाळु आहांत, न्यायाधीश!”
“आणि आता, कृपा करून मला
मृत्युदण्डाबद्दल सांगा,” न्यायाधीशाने म्हटलं.
“तुम्हांला कोणची विशिष्ट
माहिती हवीय?”
“गर्दींत कुठे अप्रसन्नतेचे, रागाचे लक्षणं तर
नाही दिसले?
खास
गोष्ट हीच आहे.”
“बिल्कुल नाही.” पाहुण्याने
उत्तर दिलं.
“छान. तुम्हीं स्वतः खात्री
करून घेतली कां,
की
मृत्यु झाला आहे?”
:ह्या बाबतीत
न्यायाधीशाने निश्चिंत राहावे.”
“आणखी सांगा...सुळावर
चढवण्याच्या आधी त्यांना पाणी पाजलं होतं?”6
पाहुण्याने डोळे बंद करंत
म्हटलं,
“हो, पण त्याने पिण्यास
नकार दिला.”
“म्हणजे कोणी?” पिलातने विचारलं.
“क्षमा करा, महाबली!” पाहुणा
उद्गारला,
“मी
त्याचं नाव नाही घेतलं कां? हा-नोस्त्री!”
“मूर्ख!” पिलातने न जाणे कां, तोंड वेंगाडंत म्हटलं.
त्याचा डावा डोळा फडकला, “सूर्याच्या आगेंत होरपळून मरणं! कायद्याप्रमाणे
तुम्हांला जे देण्यांत येते, त्याला नाही कां म्हणायचं? त्याने कश्या प्रकारे नकार
दिला?”
“त्याने म्हटलं,” पाहुण्याने पुन्हां
डोळे बंद करंत म्हटलं, “की तो धन्यवाद देतो आणि ह्या गोष्टीसाठी दोष नाहीं देत, की त्याचं जीवन
हिरावून घेतलं जात आहे.”
“कोणाला?” पिलातने खोल आवाजांत
विचारलं.
“महाबली, ते त्याने नाही
सांगितलं.”
“त्याने सैनिकांच्या
उपस्थितींत काही उपदेश देण्याचा प्रयत्न केला कां?”
“नाही, महाबली, ह्यावेळेस तो बोलंत
नव्हता. फक्त एकंच गोष्ट जी त्याने सांगितली, ती ही, की मनुष्याच्या
पापांमधे भीरुतेला तो सगळ्यांत भयानक पाप मानतो.”7
“असं कां म्हटलं?” पाहुण्याने अचानक
चिरका आवाज ऐकला.
“हे समजणं कठीण होतं. तसंही, नेहमीसारखा, तो खूप विचित्रपणे
वागंत होता.”
“विचित्रपणे कां?”
“पूर्ण वेळ तो कोणाच्या ना
कोण्याच्या डोळ्यांत बघून हसंत होता, हरवल्यासारखं हसू...”
“आणखी काही नाही?” भसाड्या आवाजाने
विचारलं.
“आणखी काही नाही.”
प्याल्यांत दारू ओततांना
न्यायाधीशाच्या हात प्याल्याला लागला. पूर्ण पिऊन झाल्यावर त्याने म्हटलं, “आता ऐक मुख्य गोष्ट:
जरी,
कमीत
कमी आत्तां,
आपण
त्याचे अनुयायी,
शिष्य
शोधूं नाही शकंत, पण हे सांगणसुद्धां बरोबर नाही, की ते नाहींत!”
पाहुणा मान खाली करून
लक्षपूर्वक ऐकंत होता.
“कोण्या अनपेक्षित आश्चर्यांना
टाळण्यासाठी,”
न्यायाधीश
पुढे म्हणाला,
“मी
तुम्हांला विनंती करतो, की काहीही हल्ला न करतां पृथ्वीवरून त्या तिन्हीं
मृतकांचे शरीर गुप्तपणे काढून त्यांना गुपचाप आणि होहल्ला न करतां दफ़न करावं, म्हणजे त्यांच्या
बद्दल काही कुजबूजही होणार नाही.”
“जशी आज्ञा, महाबली,” पाहुण्याने म्हटलं
आणि तो उठंत म्हणाला, “ह्या कामाशी निगडीत जवाबदारी आणि जटिलता बघतां, मला लगेच जाण्याची
परवानगी द्यावी.”
“नाही, आणखी थोडा वेळ थांबा,” पिलातने खुणेने
आपल्या पाहुण्याला थांबवंत म्हटलं, “आणखी दोन प्रश्न आहेत. पहिला – गुप्तचर प्रमुखाच्या
रूपांत ह्या कठीण कामांत तुमच्या सेवेची आणि सहयोगाची प्रशंसा करताना, जे तुम्हीं
जूडियाच्या न्यायाधीशाला अर्पण केलेंत, मला रोमला तुमची सिफारिश करण्यांत प्रसन्नता
होईल.”
ह्यावर पाहुण्याचा चेहरा लाल
झाला. तो उठून न्यायाधीशाचं अभिवादन करंत म्हणाला:
“मी तर फक्त सम्राटाच्या
प्रति आपल्या कर्तव्याचं पालन करतोय!”
“ पण मी तुम्हांला विनंती
करणार होतो,”
महाबलीने
पुढे म्हटलं,
“की जर
तुम्हांला पदोन्नति देऊन दुस-या ठिकाणी पाठवण्यांत आलं, तर नाही म्हणून सांगा आणि
इथेच राहा. मला तुमच्यापासून दूर नाही व्हायचंय. तुम्हांला, नक्कीच, वेगळ्या प्रकाराने
पुरस्कृत करण्यांत येईल.”
“मला तुमच्या आधीन सेवा
करायला खूप प्रसन्नता होईल, महाबली.”
“मला आनंद झाला, तर, आता, दुसरा प्रश्न.
ह्याचा संबंध त्याच्याशी आहे, काय नाव...हो, किरियाथच्या जूडासशी.
आता पाहुण्याने आपल्या
विशिष्ट नजरेने न्यायाधीशाकडे पाहिलं, आणि, जसं स्वाभाविक होतं, लगेच नजर झुकवली.
“म्हणतांत की,” आवाज खाली करंत
न्यायाधीश म्हणाला, “त्याने ह्या माथेफिरू दार्शनिकाला आपल्या घरी ठेवण्यासाठी पैसे
घेतले होते?”
“पैसे मिळतील,” गुप्तचर प्रमुखाने हलक्या
आवाजांत उत्तर दिलं.
“काय फार मोठी रकम आहे?”
“हे कुणालांच माहीत नाही, महाबली.”
“तुम्हांलापण नाही?” महाबलीने आश्चर्याने
विचारलं.
“हो, मलापण नाही,” पाहुण्याने
शांतिपूर्वक उत्तर दिलं, “पण मला येवढं माहीत आहे, की त्याला हे पैसे आज
मिळणारेत. आज त्याला कायफाच्या महालांत बोलवणारेत.”
“ओह, किरियाथचा हावरंट म्हातारा,” हसंत महाबलीने
म्हटलं,
“तो
म्हातारा आहे नं?”
“न्यायाधीश कधीच चूक करंत
नाहींत,
पण
ह्यावेळेस तुमचा अंदाज बरोबर नाहीये,” पाहुण्याने प्रेमाने उत्तर दिलं, “किरियाथचा तो माणूस
तरूण आहे.”
“असं नका म्हणू! तुम्हीं
त्याचं विवरण मला देऊं शकतां? तो माथेफिरू आहे?”
“ओफ, नाही, न्यायाधीश!”
“बरं, आणखी काही?”
“खूप सुंदर आहे.”
“आणखी? कदाचित त्याला काही
शौक असेल?”
“येवढ्या मोठ्या शहरांत
सगळ्यांना चांगल्या प्रकारे ओळखणं खूप कठीण आहे, न्यायाधीश...”
“ओह नाही, नाही, अफ्रानीयस! स्वतःच्या
योग्यतेला इतकं कमी नका समजू!”
“त्याची एक आवड आहे, न्यायाधीश,” पाहुण्याने थोडं
थांबून म्हटलं,
“पैशांचा
लोभ.”
“आणि तो करतो काय?”
अफ्रानियसने नजर वर केली, थोडा विचार करून
म्हणाला,
“तो
आपल्या एका नातेवाइकाच्या दुकानांत काम करतो, जिथे व्याजावर पैसे देतांत.”
“ओह, बरं, बरं, बरं, बरं!” आता न्यायाधीश चुप
झाला,
त्याने
नजरेने बघून घेतलं, की बाल्कनींत कोणी नाहीये, मग हळूंच म्हणाला, “आता ऐका, विशेष मुद्दा...मला
आज अशी माहिती मिळालीये, की आज रात्री त्याला मारून टाकणारेत.”
आता पाहुण्याने आपली विशिष्ट
नजर न्यायाधीशावर टाकली, फक्त टाकलींच नाही, पण काही वेळ त्याला तसंच
बघंत राहिला आणि मग म्हणाला, “तुम्हीं, न्यायाधीश, माझी भरघोस प्रशंसा करून टाकली.
मला वाटंत की मी त्या लायकीचा नाहीये, माझ्याकडे अशी काही माहिती नाहीये.”
“तुम्हांला तर सर्वोच्च
पुरस्कार मिळायला पाहिजे,” न्यायाधीशाने उत्तर दिलं, “पण अशी माहिती अवश्य
मिळालीये.”
“मी विचारण्याचं साहस करूं
शकतो का,
की ही
माहिती तुम्हांला कुणाकडून मिळाली?”
“आत्ता आज हे संगायला विवश
नका करू,
विशेषकरून
तेव्हां,
जेव्हां
ती अकस्मात् मिळालीय आणि तिची अजून पुष्टी नाही झालीये. पण मला सगळ्यांच शक्यतांवर
नजर ठेवायचीय. हेच माझं कर्तव्य आहे आणि मी भविष्यांत होणा-या घटनांबद्दलच्या
पूर्वाभासाला नाकारूं शकंत नाही, कारण की त्याने मला आजपर्यंत कधीच धोका दिलेला
नाहीये. माहिती ही मिळालीय, की हा-नोस्त्रीच्या गुप्त मित्रांपैकी एक, ह्या सूदखोराच्या
कृतघ्नतेने कुपित होऊन, त्याला आज रात्री मारून टाकण्याची आपल्या
मित्रांबरोबर योजना बनवतोय, आणि तो बेईमानीबद्दल मिळालेल्या पुरस्काराची धनराशी
धर्मगुरूसमोर हे लिहून फेकणार आहे: ‘पापाचा पैसा परंत
करतोय!’
”
ह्याच्यानंतर गुप्तचर सेवेच्या
प्रमुखाने महाबलीवर एकदासुद्धां आपली विशेश नजर नाही टाकली आणि डोळे बारीक करून
त्याचं बोलणं ऐकंत राहिला. पिलात बोलंत होता:
“कल्पना करा, काय धर्मगुरूला
उत्सवाच्या रात्री असली भेट स्वीकार करताना प्रसन्नता वाटेल?”
पाहुण्याने स्मित करंत उत्तर
दिलं,
“फक्त
अप्रसन्नतांच नाही वाटणार, पण माझ्या विचाराने तर त्यामुळे मोठा विवाद उत्पन्न
होईल.”
“मलाही असंच वाटंत, म्हणूनच मी तुम्हाला
विनंती करतो की ह्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे किरियाथच्या जूडासच्या सुरक्षेचा
प्रबंध करा.”
“महाबलीच्या आज्ञेचे पालन होईल,” अफ्रानियस म्हणाला, “पण मी महाबलीला
सांत्वना देऊं इच्छितो, की ह्या दुष्टांच षडयंत्र सफल होणं कठीण आहे!” असं
म्हणता-म्हणता पाहुणा मागे वळला आणि बोलंत राहिला, “जरा विचार करा, एका माणसाचा पाठलाग
करणं,
त्याला
मारून टाकणं,
हे
माहीत करणं की त्याला किती पैसे मिळालेत, हे पैसे कायफाकडे परंत पाठवण्याचं दुःसाहस
करणं,
आणि हे
सगळं एका रात्रीत? आज?”
“हो, विशेष मुद्दा हाच आहे की
त्याला आजचं रात्री मारून टाकतील,” हट्टीपणाने पिलातने पुनरावृत्ति केली, “मला पूर्वाभास
झालांय,
मी
तुम्हांला सांगतोय, की कधीच असं नाही झालं, की त्याने मला धोका दिला असेल.” आता
न्यायाधीशाच्या चेह-यावर किंचित थरथर झाली, आणि त्याने लगेच आपले हात
चोळले.
“ऐकतोय,” पाहुणा नम्रतेने
म्हणाला,
तो
उठून सरळ उभा राहिला आणि अचानक गंभीरतेने विचारूं लागला, “तर, मारून टाकतील, महाबली?”
“हो,” पिलातने उत्तर दिलं, “आणि मला फक्त
तुमच्या आश्चर्यजनक कार्यदक्षतेवर विश्वास आहे.”पाहुण्याने कोटाच्या खाली आपला
भारी पट्टा व्यवस्थित केला आणि म्हणाला, “मी सम्मानित झालोय, तुमच्या स्वास्थ्य आणि
प्रसन्नतेची कामना करतो.”
“ओह, हो,” पिलात हळूंच उद्गारला, “मी तर अगदीच विसरलो!
मला तुम्हांला काहीतरी परंत करायचंय!...”
पाहुणा बुचकळ्यांत पडला.
“नाही, न्यायाधीश तुम्हांला
माझं काहीही देणं नाहीये.”
“असं कसं देणं नाहीये!
जेव्हां मी येर्शलाइमला आलो होतो, आठवा, भिका-यांची भीड...मी त्यांना काही पैसे देणार होतो, पण माझ्याकडे नव्हते, तेव्हां मी
तुमच्याकडून घेतले होते.”
“ओह, न्यायाधीश, तुम्हीं कुठली
क्षुल्लक गोष्ट घेऊन बसलांत!”
“क्षुल्लक गोष्टींचीसुद्धां
आठवण ठेवावीच लागते.”
पिलात वळला, त्याने आपल्या मागे
असलेल्या खुर्चीवर पडलेला आपला कोट उचलला, त्यातून चामड्याची बैग काढली
आणि पाहुण्याकडे दिली. तो वाकला, आणि बैग घेऊन आपल्या कोटाच्या आत लपवली.
“मला दफन-विधीच्या विवरणाची
प्रतीक्षा राहील, तसंच किरियाथच्या जूडासच्या बाबतीतसुद्धां मला आजंच रात्री सांग.
ऐकतोयंस अफ्रानियस, आजंच. पहारेदाराला मला उठवण्याची आज्ञा दिली जाईल...तुम्हीं
आल्याबरोबर. मी तुमची प्रतीक्षा करीन.”
“मी सम्मानित झालो!” गुप्तचर
सेवेच्या प्रमुखाने म्हटलं आणि तो वळून बाल्कनीतून चालला गेला. ओल्या रेतीवर
त्याच्या जोड्यांची करकर ऐकूं आली; मग त्याचे पाय, धड आणि शेवटी टोपसुद्धां
लुप्त झाले. आता कुठे न्यायाधीशाने बघितलं, की सूर्य कधीच अस्त झालाय
आणि अंधार पडतोय.
*********
सव्वीस
अंतिम संस्कार
कदाचित
ह्या संधिप्रकाशामुळेंच न्यायाधीशाचं बाह्य रूप परिवर्तित झालं. तो जणु
बघतां-बघतांच म्हातारा झाला, त्याची कंबर वाकून गेली. ह्याबरोबरंच तो चिडखोर आणि उद्विग्न झाला. एकदा
त्याने दृष्टी इकडे –तिकडे टाकली आणि न जाणे कां त्या रिकाम्या खुर्चीवर, जिथे त्याचा कोट पडला होता, नजर टाकून शहारला. सणाची
रात्र जवळ येत होती, संध्याछायांचा आपलाच खेळ चालू होता, आणि कदाचित थकलेल्या न्यायाधीशाला आभास झाला, जणु कोणीतरी त्या खुर्चीवर बसलंय. भीत-भीत कोट झटकून न्यायाधीशाने त्याला
पुन्हां तिथेच टाकून दिलं आणि बाल्कनीत धावू लागला; कधी तो हात चोळायचा, कधी टेबलाजवळ जाऊन प्याला हातांत घ्यायचा, कधी थांबून जायचा आणि विनाकारणंच फरशीच्या संगमरमराकडे बघायचा, जणु तिच्यांत लिहिलेलं
काहीतरी वाचायचा प्रयत्न करतोय.
आज
दिवसभरांत दुस-यांदा त्याला निराशेचा दौरा पडला होता. आपलं कानशील चोळंत, ज्यांत सकाळच्या यमयातनेची
बोथंटशी, दुखरी
आठवण होती, न्यायाधीश
हे समजण्याचा प्रयत्न करंत होता, की ह्या निराशेचं कारण काय आहे. त्याला लवकरंच कारणही समजलं, पण तरीही तो स्वतःला धोका
देत राहिला. त्याला कळलं की आजच्या दिवसांत तो एक अशी वस्तू गमावून बसलाय, जी परंत मिळवणं शक्य
नाहीये आणि आता हीच चूक काही किरकोळ, निकृष्ट, विलम्बित
कार्यकलापांनी काही प्रमाणांत सुधारण्याचा प्रयत्न करंत होता. न्यायाधीश स्वतःला
हे समजावंत भ्रमांत ठेवंत होता, की संध्याकाळचे त्याचे हे कार्यकलाप तेवढेच महत्वपूर्ण आहे, जेवढी महत्वपूर्ण सकाळच्या
मृत्युदण्डाची घोषणा होती. पण त्याला हे जमंत नव्हतं.
एका
वळणावर येऊन तो झटक्याने थांबला आणि शिट्टी वाजवूं लागला. ह्या शिट्टीच्या
प्रत्युत्तरांत कुत्र्याच्या भुंकण्याचा हल्का-सा आवाज आला आणि उद्यानांतून
बाल्कनीत एक विशालकाय, तीक्ष्ण कानांचा आणि भु-या
केसांचा कुत्रा उडी मारून आला. त्याच्या गळ्यांत सोनेरी साखळी होती.
“बांगा, बांगा,” न्यायाधीश अशक्त आवाजांत
ओरडला.
कुत्रा
मागच्या पंजांवर उभा राहिला आणि समोरचे पंजे त्याने आपल्या मालकाच्या खांद्यांवर
ठेवले, ज्याने
तो पडतां-पडतां वाचला, आणि त्याचा गाल चाटू लागला. न्यायाधीश खुर्चीवर बसला. बांगा जीभ काढून, जोर-जोराने धापा टाकंत
आपल्या मालकाच्या पायांजवळ लोळला. कुत्र्याच्या डोळ्यांतील चमक हे प्रदर्शित करंत
होती, की
वादळ, जगांत
फक्त ज्यानेच तो निडर कुत्रा भीत होता, आतां संपलंय; आणि हे सुद्धां की तो पुन्हां येथे आहे, त्या माणसाच्या सान्निध्यांत आहे, ज्याच्यावर त्याचे अगाध प्रेम आहे. तो न केवळ ह्या माणसावर प्रेम करायचा, अपितु त्याचा सम्मान देखील
करायचा, त्याला
जगांतील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ति, सर्वांचा शासक समजायचा, ज्यामुळे तो स्वतःलासुद्धां विशिष्ठ महत्व द्यायचा. पण मालकाच्या पायांजवळ पडल्या-पडल्या, त्याच्याकडे न
बघतांसुद्धां कुत्र्याला लगेच कळलं, की आज त्याचा मालिक दुःखी आहे. म्हणून तो उठून उभा राहिला आणि वळून
न्यायाधीशाच्या अंगरख्याच्या खालच्या किनारीला रेती लावंत, आपले समोरचे पंजे आणि डोकं
त्याच्या गुडघ्यांवर ठेवून दिलं. बांगाचे हावभाव स्पष्टपणे दाखवंत होते, की तो आपल्या मालकाला
सांत्वना आणि विश्वास द्यायचा प्रयत्न करतोय, की विपत्तींत तो त्याच्या बरोबर आहे. हे त्याने मालकाकडे तिरप्या नजरेने
बघंत दाखवण्याचा प्रयत्न केला, कान उंचावून मालकाला चिटकूनसुद्द्यां तो हेंच दाखवंत होता. अशा प्रकारे ते
दोघं, मालक
आणि कुत्रा, जे
एक दुस-यावर प्रेम करायचे, सणाच्या रात्रीचं बाल्कनींत स्वागत करंत होते.
ह्या
वेळेस न्यायाधीशाचा पाहुणा खूप व्यस्त होता. बाल्कनीसमोरच्या उद्यानाच्या वरच्या
मजल्यावरून उतरून तो आणखी एका छतावर आला, डावीकडे वळून महालाच्या आत असलेल्या बराकीकडे वळला. ह्याच बराकीत त्या दोन सैन्य
तुकड्या होत्या, ज्या
न्यायाधीशाबरोबर सणासाठी येर्शलाइमला आल्या होत्या; आणि न्यायाधीशाची ती गुप्त तुकडीदेखील होती, जिचा प्रमुख हा पाहुणा होता. पाहुण्याने बराकीत दहा मिनिटांपेक्षाही कमी वेळ
घालवला. ह्या दहा मिनिटा नंतर महालाच्या बराकीतून तीन गाड्या निघाल्या, ज्यांच्यावर खंदक खणायचे
अवजार आणि पाण्याच्या मशका ठेवल्या होत्या. ह्या गाड्यांबरोबर भु-या रंगाचे ओवरकोट
घातलेले पंधरा व्यक्ती घोड्यांवर चालले होते. त्यांच्या निगराणींत ह्या गाड्या
महालाच्या मागच्या द्वारातून निघाल्या आणि पश्चिमेकडे जाऊं लागल्या. शहराच्या वेढा
घालणा-या भिंतीत असलेल्या दारातून निघून पायवाटेने आधी काही वेळ बेथलेहेम जाणा-या
रस्त्यावर चालल्या आणि मग उत्तरेकडे वळल्या. मग खेव्रोन्स्की चौरस्त्यापर्यंत येऊन
याफाला जाणा-या रस्त्यावर वळल्या, ज्याच्यावर दिवसां अभियुक्तांबरोबर मिरवणूक जात होती. आतापर्यंत अंधार
झालेला होता आणि आकाशांत चंद्र निघाला होता.
निगराणी
दलाबरोबर गाड्या निघाल्यानंतर थोड्याच वेळाने घोड्यावर स्वार होऊन न्यायाधीशाचा
पाहुणासुद्धां महालाच्या सीमेतून निघाला. आता त्याने जुना, काळा चोगा घातला होता.
शहराच्या बाहेर न जातां पाहुणा शहराच्या आंत गेला. थोड्या वेळाने त्याला
अन्तोनियाच्या किल्ल्याजवळ बघण्यांत आलं, जो उत्तरेकडे, मंदिराच्या खूप जवळ होता. ह्या किल्ल्यांतसुद्धां पाहुणा खूपंच कमी वेळ थांबला.
नंतर त्याचे पदचिह्न शहराच्या खालच्या भागांतल्या वाकड्या-तिकड्या, भूल-भुलैया गल्ल्यांमधे
दिसले. इथ पर्यंत पाहुणा खेचरावर बसून आला होता.
शहराला
चांगलंच ओळखंत असलेल्या पाहुण्याने ती गल्ली शोधून काढली, जिची त्याला गरज होती.
त्या गल्लीचं नाव ‘ग्रीक-गल्ली’ होतं, कारण
की इथे काही ग्रीक लोकांची दुकानं होती, ज्यांच्यांत एक दुकान ते सुद्धां होतं, जिथे गलीचे विकले जायचे. ह्या दुकानासमोर त्याने आपल्या खेचराला थांबवलं, उतरून त्याला समोरच्या
दाराच्या एका गोल कडीशी बांधलं. दुकान बंद झालं होतं. पाहुणा दुकानाच्या प्रवेश
द्वाराच्या बाजूला असलेल्या दारांतून एका छोट्याश्या अंगणांत आला, ज्यांत तिन्हीं बाजूला शेड्स
होते. अंगणाच्या कोप-यांत वळून, पाहुणा एका घराच्या दगडाच्या गच्चीवर आला, जिच्यावर सदाबहारची वेल होती. त्याने इकडे-तिकडे बघितलं, घरांत आणि शेड्समधे अंधार
होता. अजून पर्यंत दिवे नव्हते लावले. पाहुण्याने हळूच आवाज दिला, “नीज़ा!”
ह्या
आवाजासरशी दार करकरलं आणि संध्याकाळच्या धूमिल प्रकाशांत एक पडदा न केलेली तरुणी
गच्चीवर आली. तिने गच्चीच्या कठड्यावरून वाकून उत्सुकतावश बघितलं, की कोण आलंय. आगंतुकाला
ओळखून तिने त्याच्या स्वागतार्थ स्मित केलं. डोकं झुकवून आणि हात हलवून तिने
त्याचं अभिवादन केलं.
“तू
एकटीच आहेस?” अफ्रानियसने हळूच ग्रीकमधे विचारलं.
“एकटीच
आहे,” गच्चीवर उभी असलेली तरुणी कुजबुजली, “नवरा सकाळी सीजेरियाला निघून गेला.” तरुणीने दाराकडे बघंत, कुजबुजतंच पुढे सांग़ितलं, “पण मोलकरीण आहे घरांत ...”
तिने खूण केली, ज्याचा
अर्थ होता – ‘आंत
ये’.
इकडे-तिकडे
बघून अफ्रानियस दगडाच्या पाय-या चढूं लागला. मग तो त्या तरुणीबरोबर घरांत लपला.
ह्या
तरुणीजवळ अफ्रानियस थोडांच वेळ थांबला – पाच मिनिटाहूनही कमी. त्यानंतर त्याने
गच्चीवरून उतरून टोपी डोळ्यांवर आणखी खाली सरकवली आणि रस्त्यावर आला. ह्या
वेळेपर्यंत घरांमधे दिवे लागले होते. सणासाठी आलेली गर्दी अजूनही होती आणि
येणा-या-जाणा-या लोकांच्यामधे आणि घोड्यांवर सवार लोकांच्या घाईगर्दीत अफ्रानियस
आपल्या खेचरावर बसून कुठेतरी गायब झाला. पुढे तो कुठे गेला, ह्याचा कोणालांच पत्ता
नाही.
ती
तरुणी जिला अफ्रानियसने ‘नीज़ा’ म्हणून
संबोधित केलं होतं, एकटी राहिल्यावर लवकर-लवकर कपडे बदलू लागली. असं वाटंत होतं, की ती खूप घाईंत आहे. त्या
अंधा-या खोलींत आपल्या आवश्यक वस्तू शोधायला बरांच त्रास होत होता, पण तरीही तिने दिवा नाही
लावला, आणि
मोलकरणीलापण नाही बोलावलं. तयार होऊन, डोक्यावर काळा बुरखा घातल्यावर घरांतून तिचा आवाज आला:
“जर
माझ्याबद्दल कोणी विचारलं तर सांग की मी एनान्ताकडे गेलेय.”
अंधारांत
म्हाता-या मोलकरणीच्या बडबडण्याचा आवाज ऐकूं आला:
“एनान्ताकडे? ओह, काय नमूना आहे ती एनान्ता!
तुमच्या नव-याने तुम्हांला तिथे जायला नाही सांगितलंय नं? दलाल आहे तुझी एनान्ता! सांगेनंच
मी तुझ्या नव-याला...”
“चुप, चुप, चुप!” नीज़ा म्हणाली, आणि सावलीसारखी बाहेर
निसटली. तिच्या चपलांची खट्-खट् अंगणांत लावलेल्या दगडांवर होत राहिली. मोलकरणीने
बडबडंत गच्चीचं दार बंद केलं. नीज़ाने आपलं घर सोडलं.
ह्याच
वेळेस वाकडी-तिकडी होत तलावाकडे जाणा-या आणखी एका गल्लीतल्या घाणेरड्या घराच्या
दारांतून एक तरुण निघाला. घराचं मागचं दार ह्या गल्लींत उघडंत होतं आणि खिडक्या
होत्या अंगणांत. तरुणाची दाढी व्यवस्थित कापलेली होती. खांद्यांपर्यंत येत असलेली
पांढरी टोपी, नवा
निळा, कौड्या
टाचलेला चोगा आणि नवीन करकरणारे जोडे घातले होते त्याने. पोपटासारखं नाक असलेला हा
तरुण सणासाठी तयार झाला होता. तो सणासाठी घाई-घाईने घरी जाणा-यांना मागे टाकंत
लवकर-लवकर बिनधास्त चालला होता. तो एका मागून एक खिडक्यांमधे होत चाललेला उजेड
बघंत चालला होता. तरुण बाजारातून मंदिराच्या टेकडीखाली असलेल्या धर्मगुरू
कायफाच्या महालाकडे जाणा-या रस्त्यावर चालला होता.
थोड्याच
वेळानंतर तो कायफाच्या महालाच्या अंगणांत प्रवेश करताना दिसला. आणखी काही वेळाने
तो ह्या अंगणाच्या बाहेर येताना दिसला.
त्या
महालांतून बाहेर आल्यावर, जिथे झाडफानूस, आकाशकंदील जळंत होते, आणि सणाची गडबड चालली होती, हा तरुण आणखीनंच बिनधास्त, निडर आणि आनंदांत परंत खालच्या शहराकडे चालला होता. त्या कोप-यावर, जिथे हा रस्ता बाजाराच्या
चौकाला मिळंत होता, बुरखा घातलेल्या, ठुमकंत चालणा-या एका महिलेने ह्या गर्दींत त्याला मागे टाकलं. ह्या सुंरेख
तरुणाच्या जवळून जाताना तिने क्षणभरासाठी आपल्या बुरक्याची नकाब वर उचलून त्याला डोळ्यांने
खूण केली, पण
आपली चाल हळूं नाही केली, उलट ती आणखीनंच लवकर-लवकर चालू लागली, जणु तिला त्याच्यापासून पळून लपायचं होतं, ज्याला तिने मागे सोडलं होतं.
तरुणाने
ह्या महिलेला फक्त बघितलंच नाही, पण त्याने तिला ओळखलंसुद्धा, आणि ओळखल्यावर तो थरथरंत थांबला आणि बावरल्यासारखा तिला जाताना बघंत राहिला.
पण तेवढ्यांत स्वतःला सांभाळंत तिला पकडायला धावला. हातांत सुरई घेऊन जाणा-या एका
माणसाला धक्का मारला, पण पट्कन तो त्या महिलेच्या जवळ पोहोचला आणि धापा टाकंत, उत्तेजित आवाजांत त्याने
तिला आवाज दिला, “नीज़ा!”
महिला
वळली, तिने
कपाळावर आठ्या टाकंत त्याला बघितलं, पण तिच्या चेह-यावर होता एक थंड, हताश भाव. तिने ग्रीकमधे कोरड्या स्वरांत उत्तर दिलं, “आह, हा तू आहेस, जूडास! मी तुला पहिल्या
नजरेंत ओळखलंच नाही. पण ही चांगली गोष्ट आहे, आम्हीं असं मानतो, की जर तुम्हीं एखाद्याला ओळखूं नाही शकला, तर समजावं की तो श्रीमन्त होणारेय...”
जूडासचं
हृदय इतक्या जोराने धडधड करूं लागलं, जणु काळ्या कापडांत बांधलेला कोणी पक्षी फडफडतोय. ह्या भीतीने की येणा-याजाणा-यांना
ऐकूं न जावो, त्याने
हळू-हळू कुजबुजंत म्हटलं, “तू चालली कुठेयंस, नीज़ा?”
“तुला
त्याच्याशी काय?” नीज़ाने आपला वेग मंदावंत आणि जूडासकडे तुच्छतेने बघंत उत्तर दिलं.
आतां
जूडासच्या आवाजांत लहान मुलासारखा हट्टीपणा आला, तो गोंधळून कुजबुजला, “कां नाही?...आपण तर ठरवलं होतं. मी तर तुझाकडे येणार होतो. तू म्हटलं होतं की संध्याकाळी
घरीच राहशील...”
“आह, नाही, नाही,” नीज़ाने उत्तर दिलं आणि
हट्टी मुलाप्रमाणे आपला खालचा ओठ पुढे काढला, ज्याने जूडासला असं वाटलं, की जणु तिचा सर्वांत सुंदर चेहरा आणखीनंच सुंदर दिसूं लागलाय, “मी कंटाळले होते. तुझा तर
सण आहे, पण
मी काय करूं? बसल्या-बसल्या
ऐकंत राहूं कां की तू कसा गच्चीवर उसासे भरतो आहेस? आणि वरून घाबरंतसुद्धां राहू, की मोलकरीण माझ्या नव-याला ह्याबद्दल सांगून टाकेल? नाही, नाही, आणि मी ठरवलं की शहराच्या
बाहेर जाऊन बुलबुलची किलबिल ऐकंत बसेन.”
“असं
कसं, शहराच्या
बाहेर?” जूडासने गोंधळून विचारलं, “एकटी?”
“नक्कीच, एकटी,” नीज़ाने उत्तर दिलं.
“मला
तुझ्याबरोबर येऊं दे,” जूडासने दीर्घ श्वास घेत विनंती केली. त्याचे विचार कुंद झाले, तो जगातल्या प्रत्येक
गोष्टीबद्दल विसरून गेला आणि याचनापूर्ण नजरेनी नीज़ाच्या निळ्या, पण आतां काळ्या दिसंत
असलेल्या डोळ्यांत बघत राहिला.
नीज़ाने
काहीही न म्हणता आपला वेग वाढवला.
“तू
काही बोलंत का नाहीस, नीज़ा?” जूडासने तिच्या पावलांशी पावलं मिळवंत तक्रारीच्या सुरांत विचारलं.
“आणि
तुझ्याबरोबर मला कंटाळा नाही येणार कां?”
नीज़ाने एकदम विचारलं आणि ती थांबली. आता जूडास
पूर्णपणे गोंधळला.
“चल, ठीक आहे...” नीज़ाने किंचित
नरमाईने म्हटलं, ‘चल.”
“कुठे, जाणार कुठे?”
“धीर
धर...ह्या घराच्या अंगणांत जाऊन ठरवूया, नाहीतर , मला
भीती वाटते, की
जर कुण्या ओळखीच्या माणसानी बघितलं तर सांगत फिरतील की मी माझ्या प्रियकराबरोबर
रस्त्यावर होते.”
तेव्हां
बाजारांत ना तर नीज़ा उरली, ना जूडास. ते कोणच्यातरी घराच्या अंगणांत उभे राहून कुजबुजूं लागले.
“तेल्यांच्या
वस्तीत चल,” नीज़ाने चेह-यावर नकाब टाकंत आणि कुण्या माणसापासून लपण्यासाठी गर्रकन फिरंत
म्हटलं, जो
बादली घेऊन तिथे आला होता, “केद्रोनच्या मागे, गेथ्समेनमधे. कळलं?”
“हो, हो, हो.”
“मी
पुढे निघते,” नीज़ा पुढे म्हणाली, “पण तू माझ्या मागे-मागे नको येऊं, माझ्यापासून दूर राहा. मी
पुढे जाईन...जेव्हां ओढा पार करशील…तुला माहीत आहे कां, की गुफ़ा कुठे आहे?”
“माहितीये, माहितीये...”
“ऑलिव तेलाच्या घाण्याच्या बाजूने वर जाऊन गुफेकडे वळून जा. मी तिथेच असेन.
पण आता माझ्या मागे नको येऊ, थोडा धीर धर, इथे थोडा वेळ थांब.” इतकं बोलून नीज़ा त्या गल्लीतून अशी निघून गेली, जणु ती जूडासशी बोललीच नव्हती.
जूडास काही वेळ एकटांच उभा राहिला, आपल्या धावणा-या विचारांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू लागला. ह्या
विचारांमधे एक विचार हा पण होता, की सणाच्या पंगतीच्या वेळेस आपल्या अनुपस्थितीचं तो नातेवाइकांना काय कारण
सांगेल. जूडास उभ्या-उभ्या एखादी थाप मारण्याबद्दल विचार करूं लागला. पण, जसं नेहमीच होत असतं, मनातल्या घालमेलीमुळे तो
काहीच विचार करूं शकला नाही आणि त्याचे पाय आपणहून त्याला गल्लीतून दूर घेऊन गेले.
आता त्याने आपला रस्ता बदलला. तो खालच्या शहरांत जाण्याऐवजी परंत कायफाच्या
महालाकडे जाऊ लागला. जूडासला आता आजूबाजूच्या वस्तू बघण्यास त्रास होत होता. उत्सव
शहराच्या आत प्रविष्ट झाला होता. जूडासच्या चारीकडे प्रत्येक घरांत आता फक्त दिवेच
उजळले नव्हते, तर
प्रार्थनासुद्धां ऐकूं येत होती.
उशीरा घरी जाणारे आपल्या-आपल्या गाढवांना चाबूक मारंत, ओरडंत पुढे ढकलंत होते. जूडासचे
पाय त्याला घेऊन चालले होते, त्याला कळलंच नाही, की कसे त्याच्या समोरून काई लागलेले, भयानक अंतोनिओ-टॉवर्स तरंगत निघून गेले. त्याने किल्ल्यांत तुतारीचा आवाज
नाही ऐकला. रोमच्या मशाली घेऊन चाललेल्या अश्वारोही तुकडीकडे त्याचं लक्ष नाही
गेलं, जिच्या
उत्तेजक प्रकाशांत रस्ता जणु न्हाऊन निघाला होता. टॉवरच्या जवळून जाताना जूडासने वळून
पाहिलं की मंदिराच्या भीतिदायक उंचीवर दोन पंचकोणी दीप जळंत आहेत. पण जूडासला ते
सुद्धा अस्पष्टंच दिसले. त्याला असं वाटलं, जणु येर्शलाइमच्या वरती दहा अतिविशाल दीप जळतांत आहेत, जे येर्शलाइमच्या वर चमकंत
असलेल्या सर्वांत वरच्या दिव्याशी – चंद्राशी स्पर्धा करंत होते. आता जूडासला
कोणाशीच काही देणं-घेणं नव्हतं. तो गेथ्समेनकडे चालला होता. तो लवकरांत लवकर
शहराला मागे सोडायचा प्रयत्न करंत होता. कधी-कधी त्याला असा भास व्हायचा, जणु त्याच्या पुढे
चालणा-यांच्या पाठींच्या आणि चेह-यांच्यामधे ठुमकंत असलेली आकृति चालली आहे, जी त्याला स्वतःकडे आकर्षित
करतेय. पण हा फक्त भ्रम होता. जूडासला कळंत होतं, की नीज़ाने त्याला मुद्दाम मागे सोडलंय. जूडास सूदखोरांच्या दुकानांच्या
समोरून पळत होता. शेवटी तो गेथ्समेनपर्यंत पोहोचूनंच गेला. अत्यंत अधीर
असूनसुद्धां प्रवेशद्वारावर त्याला वाट बघावीच लागली. शहरांत उंटांचा काफिला
प्रवेश करंत होता, ज्याच्या
मागे होते सीरियन मिलिट्रीचे गस्ती-दल, ज्याला जूडासने मनांतल्या मनांत शिव्या दिल्या.
पण शेवटी सगळं संपतंच. अशांत आणि अधीर जूडास आता शहराच्या भिंतीबाहेर होता.
डावीकडे त्याला एक छोटीशी दफनभूमी दिसली, त्याच्या जवळ काही भक्तजनांचे पट्ट्या-पट्ट्यांचे तंबू होते. चंद्राच्या
प्रकाशांत न्हायलेला, धुळीने माखलेला रस्ता पार करून जूडास केद्रोन झरा पार करण्यासाठी पुढे
गेला. जूडासच्या पायांखाली कलकल करणारे पाणी हळू-हळू वाहंत होते. एका दगडावरून
दुस-या दगडावर उड्या मारंत तो शेवटी समोरच्या गेथ्समेनच्या किना-यावर आला. त्याला
हे बघून आनंद झाला, की रस्ता अगदी निर्मनुष्य आहे. दूर तेल्यांच्या वस्तीचं अर्धवट द्वार दिसंत
होतं.
शहराच्या दमंट वातावरणानंतर वसंती रात्रीचा सुगंध जूडासला जणु पागल करंत
होता. बगीच्यातून बाभूळ आणि मेंदीचा सुगंध येत होता.
प्रवेशद्वारावर कोणीही पहारेकरी नव्हता, तिथे कुणी नव्हतंच; काही क्षणांनी ऑलिव वृक्षांच्या दाट, रहस्यमय सावल्यांखाली जूडास धावू लागला. रस्ता टेकडीकडे जात होता. लवकर-लवकर
श्वास घेत जूडास अंधारातून उजेडांत चंद्राच्या प्रकाशाने विणलेल्या गालीच्यांवर
चालंत वर चढूं लागला, जे त्याने नीज़ाच्या ईर्ष्यालू नव-याच्या दुकानांत पाहिलेल्या गालीच्यांची
आठवण करून देत होते. काही वेळाने जूडासच्या डावीकडे मैदानांत तेल्यांचा घाणा
दिसला. तिथे होतं एक अजस्त्र चाक. काही पोती सुद्धां ठेवलेली होती.
सूर्यास्तापर्यंत सगळे कामं संपलेले होते. बगिच्यांत एकही प्राणी नव्हता आणि
जूडासच्या डोक्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकूं येत होता.
जूडासचं गंतव्य जवळंच होतं. त्याला माहीत होतं की डावीकडे अंधारांत त्याला
गुफेंत वाहणा-या पाण्याचा कलकलाट ऐकूं येईल. तसंच झालं, त्याने तो आवाज़ ऐकला. गारवा वाटंत होता.
तेव्हां त्याने आपला वेग मंदावंत आवाज दिला, “नीज़ा!”
पण नीज़ाच्याऐवजी ऑलिव वृक्षाच्या जाड खोडापासून एका शक्तिशाली माणसाच्या
आकृतिने झेप घेतली. तिच्या हातांत काहीतरी चमकलं आणि लगेच विझून गेलं.
जूडा अडखळंत मागच्या बाजूला पडूं लागला आणि क्षीण आवाजांत उद्गारला, “आह!”
दुस-या माणसाने त्याला रोखलं.
पहिल्या माणसाने, जो समोर होता, जूडासला विचारलं, “आत्ता किती मिळालेंत? जीव वाचवायचा असेल, तर सांग!”
जूडासला आशा वाटली आणि तो घाबरून ओरडला, “तीस टेट्राडाख्म!1 तीस टेट्राडाख्म! जे काही मिळालंय, सगळं इथेच आहे. ह्या घ्या
मुद्रा! घेऊन घ्या, पण माझा जीव नका घेऊं.”
समोरच्या माणसाने झटक्याने जूडासच्या हातांतून पिशवी हिसकली. त्याच क्षणी
जूडासच्या पाठीमागे विद्युत गतीने चाकू चमकला ज्याने त्या प्रियकराच्या बरगड्यांवर
हल्ला केला. जूडास अडखळंत पुढच्या बाजूला पडू लागला, आणि त्याने वाकडे-तिकडे बोटं असलेले आपले हात वर उचलले. समोर असलेल्या
व्यक्तीच्या चाकूने जूडासला थोपवलं आणि त्याची मूठ जूडासच्या हृदयांत घुसली.
“नी...जा...,” आपल्या मोठ्या, स्पष्ट, तरुण
आवाजाच्या ऐवजी जूडासच्या तोंडून एका खालच्या, भ्यायलेल्या, दूषण देणा-या आवाजांत फक्त येवढंच निघालं आणि तो पुढे काहीच बोलूं शकला
नाही. त्याचं शरीर जमिनीवर इतक्या जो-याने पडलं, की ती झणझणून गेली.
आता रस्त्यावर एक तिसरी आकृति दिसली. ह्या तिस-याने अंगरखा आणि टोप घातला
होता.
“उशीर नका करू,” तिस-याने आज्ञा दिली. हत्या-यांनी लगेच पिशवीला तो कागद बांधला, जो तिस-या माणसाने त्यांना
दिला होता. हे सगळं चामड्याच्या एका तुकड्यांत ठेवून त्यावर दोरी बांधून टाकली, दुस-याने हे पाकिट आपल्या शर्टांत ठेवलं.
ह्यानंतर दोन्ही हत्यारे रस्त्यातून दूर झाले आणि निघून गेले. ऑलिव
वृक्षांच्यामधे अंधार त्यांना खाऊन टाकलं. तिसरा मात्र मृतकाच्या जवळ उक्कड बसून
त्याच्या चेह-याकडे बघू लागला. अंधारांत
तो चेहरा चुन्यासारखा पांढरा दिसंत होता आणि खूप सुंदर दिसंत होता. काही क्षणांनी
रस्त्यावर कोणीच जीवन्त प्राणी नाही उरला. निर्जीव शरीर हात पसरून पडलं होतं. उजवा
पाय चंद्राच्या प्रकाशांत होता, ज्याच्यामुळे
त्याच्या पादत्राणाचा बंद स्पष्ट दिसंत होता.
गेथ्समेन
उद्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून गेलं.
जूडासला
मारणारे दोन्हीं हत्यारे कुठे लुप्त झाले, कोणालांच
नाही माहीत. पण तिस-या, टोपवाल्याच्या
मार्गाबद्दल आम्हांला माहीत आहे. रस्ता सोडून तो ऑलिव वृक्षांच्या दाटींतून
दक्षिणेकडे गेला. प्रमुख द्वाराच्या आधीच,
बागेच्या दक्षिणी कोप-यांतून, जिथे भिंतीचे
दगड निघून पडलेले होते, त्याने भिंत
ओलांडली; लवकरंच तो केद्रोनच्या किना-यावर पोहोचला. मग़ पाण्यांत उतरून काही
वेळ चालला, जोपर्यंत त्याला दोन घोडे घेतलेला एक माणूस नाही दिसला. घोडेसुद्धां
प्रवाहांतच उभे होते. पाणी त्यांच्या खुरांवरून वाहंत होतं. साईस एक घोड्यावर बसला
आणि टोपवाला उडी मारून दुस-यावर बसून गेला आणि ते हळू-हळू प्रवाहातंच चालंत
राहिले. घोड्यांच्या टापांच्या खाली गोट्यांच्या करकरण्याचा आवाज येत होता. मग
घोडेस्वार पाण्याच्या बाहेर आले आणि शहराच्या भिंतीलगंत चालंत राहिले. इथे साईस
घोड्याला टाच मारून दिसेनासा झाला. टोप घातलेला माणूस घोडा थांबवून खाली उतरला आणि
त्या निर्जन रस्त्यावर त्याने आपला अंगरखा काढला आणि त्याला उलटलं; अंगरख्याच्या
आतून त्याने एक चपटं, बिनपंखांचं शिरस्त्राण काढलं आणि घालून
घेतलं. आता घोड्यावर उडी मारून सवार झाला फौजी वेष घातलेला, कमरेला
तलवार लटकावलेला एक सैनिक. त्याने लगाम
खेचली आणि फौजी तुकडीचा तुफ़ान घोडा स्वाराला हिसके देत तीरा सारखा पळाला. आता
थोडांच रस्ता उरला होता – अश्वारोही येर्शलाइमच्या दक्षिणी द्वाराकडे जात
होता.
प्रवेश
द्वाराच्या कमानीवर मशालींचा अधीर प्रकाश नाचंत होता. विद्युत गतीच्या दुस-या
तुकडीचे सुरक्षा सैनिक दगडाच्या बेंचांवर बसून चौपड खेळंत होते. तीरासारख्या
येणा-या सैनिकाला बघतांच ते आपआपल्या जागेवर उडालेच, सैनिकानी
त्यांच्याकडे बघंत हात हलवला आणि शहरांत घुसला.
शहर
सणाच्या दिव्यांनी जगमगंत होत. सगळ्या खिडक्यांमधे प्रकाश खेळंत होता. चारीकडे
प्रार्थनेचे स्वर घुमंत होते. बाहेरच्या बाजूला उघडणा-या खिडक्यांमधे बघंत अश्वारोही
कधी-कधी लोकांना खाद्य पदार्थांनी सजवलेल्या जेवणाच्या टेबलाजवळ बघूं शकंत होता.
खाण्यामधे होतं बकरीच मांस, दारूचे प्याले
आणि कडु पाला असलेले आणखी काही पदार्थ. शिट्टीवर एक शांत गाणं वाजवंत अश्वारोही
खालच्या शहराच्या निर्मनुष्य रस्त्यांवर हळू-हळू जात अंतोनियोच्या बुरुजाकडे आला, कधी तो
मंदिराच्या वर असलेल्या त्या पंचकोणी दीपांकडे बघायचा, जसे
जगांत आणखी कुठेही नव्हते; किंवा कधी
चंद्राकडे बघायचा, जो ह्या पंचकोणी दीपांच्या वरती लटकंत
होता.
सणाच्या
रात्रीच्या आयोजनांमधे हिरोदच्या प्रासादाने बिल्कुल भाग नाही घेतला. दक्षिणेकडे
उघडणा-या खालच्या खोल्यांमधे, जिथे रोमन
सेनेचे अधिकारी आणि अश्वारोही तुकड्यांचे अधिकारी राहात होते, दिवे
जळंत होते. तिथे थोडी फार हालचाल आणि जीवनाचे चिन्ह दिसंत होते, समोरच्या
भागांत अनिच्छेने राहणारा प्रासादाचा निवासी न्यायाधीश होता. हा सम्पूर्ण भाग
आपल्या स्तंभांसहित आणि सोनेरी प्रतिमांसकट जणु चंद्राच्या प्रकाशाने आंधळा झाला
होता. महालाच्या आत स्तब्धता आणि अंधाराचं साम्राज्य होतं.
आणि जसं
न्यायाधीशाने अफ्रानियसला सांगितलं होतं, त्याला आत
जावंसं वाटंत नव्हतं. त्याने तिथेच, बाल्कनींत
बिस्तरा टाकायची आज्ञा दिली, तिथेच, जिथे
त्याने जेवंण केलं होतं आणि सकाळी खटल्याची तपासणी केली होती. न्यायाधीश बिस्त-यावर
लोळला होता, पण झोप काही येत नव्हती. उघडा चंद्र वर, स्वच्छ
आकाशांत लटकंत होता आणि कित्येक तास त्याच्यावरून नजर दूर नाही करूं शकला.
शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास निद्रादेवीने महाबलीवर कृपा दृष्टी टाकलीच.
थरथरंत एक मोट्ठी जांभई देऊन न्यायाधीशाने आपला अंगरखा काढून फेकला, कंबरेत बांधलेला पट्टा
सोडून टाकला, ज्यांत
खोळीत ठेवलेला स्टीलचा चाकू लटकंत होता, त्याला बिस्त-याजवळच्या खुर्चीवर ठेवून दिला, चप्पल काढ्ली आणि लोळला. बांगा लगेच त्याच्या बिस्त-यावर चढून त्याच्या
बाजूला,
डोक्याजवंळ डोकं ठेवून लोळला; न्यायाधीशाने कुत्र्याच्या मानेंवर हात ठेवून आपले डोळे बंद केले. तेव्हांच
कुत्रापण झोपला.
बिस्तर अर्ध्या अंधारांत होता, स्तंभामुळे चंद्राचा प्रकाश त्याच्यावर नव्हता पडंत, पण पाय-यांपासून थेट
बिस्त-यापर्यंत चंद्राच्या प्रकाशाचा पट्टा येत होता. न्यायाधीशाने वास्तविक
जीवनाच्या घडामोडींशी संबंध तोडल्याबरोबर तो लगेच त्या चमचमत्या रस्त्यावरून सरंळ
चंद्राकडे जाऊ लागला. स्वप्नांत तो आनंदाने हसंत होता, कारण की ह्या निळ्या-निळ्या, पारदर्शी रस्त्यावर सगळंच इतकं अद्भुत आणि सुंदर होतं. तो बांगाबरोबर चालंत
होता, आणि
त्याच्याबरोबर होता तो भटक्या दार्शनिक. ते कोणच्यातरी क्लिष्ट आणि महत्वपूर्ण
विषयावर चर्चा करंत होते, पण कोणीही दुस-याला पराजित करंत नव्हता. त्यांचं कोणत्यांच गोष्टींत एकमत होत नव्हतं आणि म्हणूनंच त्यांचा
वादविवाद खूप मजेदार झाला होता आणि संपतंच नव्हता. स्पष्ट होतं, की आजचा मृत्युदण्ड अगदीच
अकल्पनीय होता – हाच दार्शनिक, जो एका वेडपट विचाराचं समर्थन करंत होता, की सगळेचं लोक दयाळू असतांत , त्याच्या बरोबर चालंत होता, ज्याचा अर्थ हा झाला, की तो जिवन्त होता. हा विचारंच किती भयानक आहे, की अश्या व्यक्तीला मृत्युदण्ड दिला जाऊं शकतो. मृत्युदण्ड दिलाच नाही!
बिल्कुल नाही दिला! चंद्राच्या पाय-यांवरून जाण्याची हीच सुखद जाणीव आहे.
रिकामा वेळ इतका होता, जितका आवश्यक होता, आणि वादळ फक्त संध्याकाळीच येईल, आणि कायरता सर्वांत भयंकर पापांपैकी एक आहे. हेच सांगितलं होतं येशुआ
हा-नोस्त्रीने. नाही दार्शनिक, मी तुझ्याशी सहमत नाहीये : हे सर्वाधिक भयंकर पाप आहे.
उदाहरणार्थ, जेव्हां
‘वैली
ऑफ वर्जिन्स’ मधे
मदमस्त जर्मन विशालकाय क्रिसोबोयचे जवळ-जवळ तुकडे-तुकडे करणार होते, तेव्हां जूडियाच्या
वर्तमान न्यायाधीशाने आणि अश्वारोही दळाच्या भूतपूर्व प्रमुखाने कायरतेचं प्रदर्शन
नव्हतं केलं. पण, माझ्यावर
दया कर, दार्शनिक!
तुला काय आपल्या अकलेने समजतं नाहीये का, की सम्राटच्या विरुद्ध अपराध करणा-या व्यक्तीमुळे जूडियाच्या न्यायाधीशाने
आपली नौकरी गमावली असती?”
“हो-हो,” झोपेतंच विव्हळंत आणि रडंत पिलात म्हणाला.
स्पष्ट आहे, की
गमावली असती. दिवसा कदाचित त्याने असं नसतं केलं, पण आता, रात्री, सर्व काही सोडून देऊन, तो नौकरी गमावण्यासाठी
उतावीळ झाला होता, ह्या
सम्पूर्ण निरपराध माणसाला, ह्या माथेफिरू दार्शनिकाला आणि चिकित्सकाला मृत्युपासून वाचवण्यासाठी तो
काहीही करायला तयार होता.
“आता आपण नेहमी बरोबर राहू,”2 स्वप्नांत फाटके कपडे घातलेल्या त्या भटक्या दार्शनिकाने म्हटलं. माहीत नही
कसा तो सोनेरी भाला घेतलेल्या अश्वारोह्याच्या रस्त्यांत उभा होता. “जर एक आहे, तर ह्याचा अर्थ असा, की दुसरासुद्धां तिथेच आहे!
माझी आठवण केल्याबरोबर लगेच तुझीसुद्धां आठवण काढतील! मला एका अनाथाच्या रूपांत, अज्ञात जन्मदात्यांच्या
मुलाच्या रूपांत, आणि
तुला – भविष्यवेत्ता राजा आणि गिरणीवाल्याची पुत्री, सुंदरी पिलाच्या3 पुत्राच्या रूपांत.”
“हो, तू विसरूं नकोस, आठवण ठेव माझी, भविष्यवेत्ताच्या मुलाची,” स्वप्नांत पिलातने विनंती
केली आणि स्वप्नांत आपल्या बरोबर-बरोबर चालणा-या एन-सरीदच्या4 भिका-याने
मान हलवून दिलेल्या स्वीकृतिनंतर जूडियाचा निर्दयी न्यायाधीश आनंदाने रडू लागला
आणि स्वप्नांत हसंत राहिला.
हे
सगळं खूप छन वाटंत होतं, पण म्हणूनंच महाबलीची झोप मोडणं खूप भयानक होतं. बांगा चंद्राकडे बघून ओरडला
आणि न्यायाधीशाच्या डोळ्यांसमोरचा चिक्कण, तेलाने माखल्यासारखा निळा रस्ता गायब झाला. त्याने डोळे उघडले आणि पहिलीच
गोष्ट, जी
त्याला आठवली, ती
ही की दार्शनिकाला सुळावर चढवलं गेलंय. उठल्याबरोबर न्यायाधीशाने सवयीप्रमाणे
बांगाच्या मानेवर हात फिरवला, मग आजारी डोळ्यांने चंद्राला शोधूं लागला, तर त्याला दिसलं, की तो एका कोप-याकडे सरकलांय आणि पांढरा पडला आहे. त्याच्या प्रकाशाला
छेदणारा एक अप्रिय, अधीर उजेड न्यायाधीशाच्या डोळ्यांच्या अगदी समोर बाल्कनीत खेळंत होता. ही
मशाल होती, जी
क्रिसोबोयच्या हातांत फडफडंत धूर ओकंत होती. तिला धरणारा भीति आणि घृणेने त्या
भयानक प्राण्याच्या जवळ येत होता, जो त्याच्यावर झेप घेणारंच होता.
”थांब, बांगा,” आजारी न्यायाधीशाने म्हटलं
आणि तो खोकूं लागला. आपल्या हाताला मशालीसमोर धरून तो पुढे म्हणाला, “रात्रीसुद्धां, चंद्राच्या
प्रकाशांतसुद्धां मला निवांतपणा नाहीये. अरे देवा! तुझं कर्तव्यसुद्धां खूप अप्रिय
आहे, मार्क!
शिपायांचं तर तू अंग-भंग करतो...”
मार्कने
आश्चर्याने न्यायाधीशाकडे बघितलं, तसा तो सावरला. झोपेंत म्हटलेल्या फुकटच्या शब्दांवर सारवा-सारवी करण्यासाठी
न्यायाधीश म्हणाला, “वाईट नको वाटून घेऊं, सेन्चुरियन, मी
पुन्हां म्हणतोय, की
माझी परिस्थिति तुझ्याहूनही वाईट आहे. काय पाहिजे?”
“गुप्तचर-सेवा प्रमुख तुम्हांला भेटायला आलाय,”
मार्कने थंडपणे उत्तर दिलं.
“बोलवा, बोलवा,” खोकून गळा मोकळा करून न्यायाधीशाने
आज्ञा दिली आणि पाय घुमवंत आपल्या चपला शोधूं लागला. उजेड स्तंभांवर खेळंत होता.
सेन्चुरियनच्या पावलांची खटखट फरशीवर ऐकूं येत होती. सेन्चुरियन उद्यानांत निघून
गेला.
“चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां मला शांतता नाही,”
दात खाऊन न्यायाधीश स्वतःशीच बडबडला.
बाल्कनीत सेन्चुरियनच्या ऐवजी टोपवाला माणूस प्रकट झाला.
“बांगा, जवळ
नको जाऊ,” न्यायाधीश हळूंच म्हणाला आणि कुत्र्याचं डोकं दाबून त्याला बसवून दिलं.
बोलायच्या आधी आपल्या सवयीप्रमाणे अफ्रानियसने चारीकडे नजर टाकून बघितलं, त्याने सावलींत जाऊन
खात्री करून घेतली, की बांगाला सोडून बाल्कनींत आणखी कोणी नाहीये, मग हळूंच म्हणाला, “विनंती करतो की माझ्यावर खटला चालवण्यांत यावा, न्यायाधीश! तुम्हीं बरोबर सांगितलं होतं. मी किरियाथच्या जूडासची रक्षा नाही
करू शकलो, त्याला
मारण्यांत आलंय. मी विनंती करतो, की माझ्यावर खटला चालवा आणि मला सेवामुक्त करा.”
अफ्रानियसला वाटंत होतं की त्याच्याकडे चार डोळे एकटक बघताहेत, दोन कुत्र्याचे आणि दोन
लांडग्याचे.
अफ्रानियसने कोटाच्या आतून दुहेरी सीलबंद केलेली रक्ताने माखलेली पिशवी
काढली.
“ही पैश्यांची पिशवी हत्यारे धर्मगुरूच्या घरावर फेकून चालले गेले. ह्या
पिशवीवर लागलेलं रक्त किरियाथच्या जूडासचं आहे.”
“किती पैसे आहेत, मला उत्सुकता वाटतेय?” पिलातने पिशवीकडे वाकंत विचारलं.
“तीस टेट्राडाख्म.”
न्यायाधीश हसला आणि म्हणाला, “खूपंच कमी आहेत.”
अफ्रानियस चुप राहिला.
“मृतक कुठे आहे?”
“ते मला नाही माहीत,” शांत, सम्मानजनक
भावाने त्या माणसाने उत्तर दिलं, जो कधीच आपला टोप काढंत नव्हता, “सकाळी त्याचा शोध घेऊं.”
न्यायाधीश थरथरला, त्याने चपलेचा बंद तसांच सोडला, जो बांधतांच येत नव्हता.
“पण तुम्हांला नक्की माहीत आहे का, की त्याला मारून टाकलंय?”
ह्या प्रश्नाचं न्यायाधीशाला कोरडेपणाने उत्तर मिळालं:
“न्यायाधीश, मी पंधरा वर्षांपासून
जूडियांत काम करतोय. मी आपली नौकरी वालेरियस ग्रेटसच्या5 काळापासून सुरू
केली होती. मला हे बघण्यासाठी, की माणसाची हत्या झालीयं, मृत शरीर पाहण्याची गरज नाहीये आणि मी तुम्हाला सूचित करतोय, की तो, ज्याला किरियाथ शहराच्या
जूडासच्या नावाने ओळखायचे, त्याला काही तासांपूर्वी मारलंय.”
“माफ़ कर, अफ्रानियस,” पिलातने उत्तर दिलं, “मी अजून व्यवस्थित जागा
झालेलो नाहीये, म्हणूनंच
मी हे सगळं म्हटलं. मी नीट झोपू नाही शकंत,”
न्यायाधीश हसला, “आणि नेहमी स्वप्नांत चंद्राचा प्रकाश पाहतो. कल्पना करा, हे किती हास्यास्पद आहे.
असं वाटतं, जणु
काही मी ह्या प्रकाशांत हिंडतोय. तर, ह्या घटनेबद्दल मला तुमचं मत ऐकायचं आहे. तुम्हीं त्याला कुठे शोधणारेय? बसा, गुप्तचर-सेवा प्रमुख.”
“मी त्याला गेथ्समेन उद्यानांत
असलेल्या तेल्यांच्या घाण्याजवळ शोधणारेय.”
“बरं, बरं, पण नेमकं तिथेच कां?”
“महाबली, माझ्या कल्पनेप्रमाणे, जूडासची हत्या
येर्शलाइममधे नाही झालीये, आणि त्याच्यापासून फार दूरपण नाही झाली. त्याला येर्शलाइमच्या जवळंच
मारण्यांत आलंय.”
“मी तुम्हांला आपल्या कामांत अत्यंत निष्णात मानतो. माहीत नाही की रोममधे
काय परिस्थिति आहे, पण उपनिवेशांमधे तर तुमच्यासारखा कोणीच नाहीये. मला समजावून सांगा, कां?”
अफ्रानियसने हळू आवाजांत म्हटलं, “मी ह्या गोष्टीचा विचारसुद्धां नाही करूं शकंत, की जूडास, शहराच्या
आंत, घाई-गर्दीत
कोण्या संदेहास्पद लोकांच्या हातांत सापडेल. रस्त्यावर लपून मारणं शक्य नाहीये.
ह्याचा अर्थ हा झाला, की त्याला फूस लावून एखाद्या तळघरांत नेण्यांत आलं. पण माझ्या सैनिकांनी
त्याला खालच्या शहरांत शोधलं आणि शोधूनंच घेतलं असतं. पण तो शहरांत नाहीये, ह्या गोष्टीची मी हमी
देतो. जर त्याला शहरापासून दूर मारलं असतं, तर पैशांची ही पिशवी इतक्या लवकर धर्मगुरूच्या घरांत फेकणं शक्य नव्हतं.
त्याला शहराच्या जवळंच मारलंय. त्याला शहराच्या बाहेर नेण्यांत ते यशस्वी झाले.”
“मला कळंत नाहीये, की हे कश्या प्रकारे झालं असेल.”
“हो, न्यायाधीश, सम्पूर्ण घटनेंत हाच
सर्वांत कठीण प्रश्न आहे आणि मला माहीत नाही, की मला तो सोडवतां येईल किंवा नाही.”
“खरंच, कोडंच
आहे! सणाच्या रात्री, देवावर विश्वास ठेवणारा एक माणूस प्रार्थना आणि भोज सोडून न जाने कां
शहराच्या बाहेर जातो, आणि तिथे मारला जातो. त्याला कोण, कसं फूस लावू शकलं? हे एखाद्या बाईचं काम तर नाहीये?” न्यायाधीशाने अचानक उत्साहित होऊन विचारलं.
अफ्रानियसने शांतपणे जोर देत म्हटलं, “कोणत्याही परिस्थितीत नाही, न्यायाधीश. ही शक्यता तर जराही नाहीये. जरा तर्कसंगत प्रकाराने बघा. जूडासला
मारण्यांत कोणाला रस होता? कुणी आवारा स्वप्नदर्शीच असूं शकतो, एखादा असा समूह, ज्यांत बाई नव्हतीच. लग्न करण्यासाठी, न्यायाधीश, पैसे
पाहिजेत; मानवाला
जन्म देण्यासाठी त्यांची गरंज आहे; पण एका बाईच्या मदतीने कुण्या माणसाची हत्या करण्यासाठीतर खूप पैशांची गरज असते, आणि कुण्या भटक्याकडे
येवढे पैसे नाहीत. ह्या कामांत बाई नव्हतीच, मी तर असंपण म्हणेल की ह्या दिशेने विचार केला तर मी आपला मार्गंच हरवून
बसेन.”
“मला वाटतंय की तुम्हीं अगदी बरोबर म्हणताय, अफ्रानियस,” पिलातने म्हटलं, “मी तर फक्त मनांतील विचार मांडला होता.”
“पण, दुर्दैवाने
तो बरोबर नाहीये, न्यायाधीश.”
“तर मग, मग
काय...?”
न्यायाधीशाने उत्सुकतेने अफ्रानियसच्या चेह-याकडे बघंत विचारलं.
“मला वाटतंय की ह्यामागे पैसा – हेच कारण आहे.”
“खूप चांगला विचार आहे! पण शहराच्या बाहेर, रात्री, त्याला
कोणी पैश्यांसाठी बोलावलं असेल?”
“ओह, नाही, न्यायाधीश, असं नाहीये. माझा फक्त
एकंच निष्कर्ष आहे आणि जर तो चुकीचा असला, तर दुसरा कोणचा निष्कर्ष मी काढूं शकणार नाही,”
न्यायाधीशाच्या जवळ वाकून अफ्रानियस पुटपुटला, “जूडास आपल्या पैश्यांना
एखाद्या निर्मनुष्य जागेवर लपवणार होता, जी फक्त त्यालाच माहीत होती.”
“अत्यंत बारकाईने समजावतांय. कदाचित असंच झालं असेल. आता कळतंय : त्याला
लोकांनी नाही, तर
आपल्याच्या विचारांनी फसवलं. हो, कदाचित असंच आहे.”
“हो, जूडास
कोणाचाच विश्वास करंत नव्हता. तो लोकांपासून पैसे लपवंत होता.”
“तुम्हीं म्हणंत होतां, की गेथ्समेनमधे शोधणार, पण तुम्हीं त्याला तिथेंच कां शोधणारेय – मी स्वीकार करतो, की ही गोष्ट मला समजली
नाहीये.”
“ओह, न्यायाधीश! अगदी सोपं आहे. पैसे कुणी
रस्त्यांवर आणि रिकाम्या जागेवर तर नाही लपवणार. जूडास ना तर हेब्रोनच्या रस्त्यावर
होता, ना
बेथनीच्या. तो वृक्षांनी आच्छादित असलेल्या एखाद्या सुरक्षित जागेवरंच असेल. हे
अगदी सोपं आहे. आणि येर्शलाइमच्या जवळ, गेथ्समेनच्या व्यतिरिक्त अशी दुसरी जागांच नाहीये. दूर तो जाऊंच शकंत
नव्हता.”
“तुम्हीं माझं पूर्ण समाधान केलंय. तर, आता
काय करायचंय?”
“मी लवकरंच त्या मारेक-यांचा शोध सुरू करेन, जे जूडासला आमिष दाखवून शहराच्या बाहेर घेऊन गेले, आणि त्याच बरोबर मी
स्वतःला न्यायदेवतेच्या स्वाधीन करतोय.”
“कां?”
“जेव्हां तो कायफाच्या महालांतून परंत येत होता, तेव्हां माझ्या सैनिकांनी बाजारांत त्याचा माग हरवला. हे कसं झालं, ते मला कळंत नाहीये.
माझ्या सम्पूर्ण आयुष्यांत असं कधीच झालेल नाही. आपल्या संभाषणानंतर मी त्याला
लगेच माझ्या निगराणींत घेतलं होतं. पण बाजारांतून तो कुठेतरी निसटला, आणि त्याचं नामोनिशानंच
हरवलं.”
“ओह, असं
आहे! मी तुम्हांला सांगतोय, की तुमच्यावर खटला चालवण्याची मला काहीच आवश्यकता वाटंत नाही. तुम्हीं ते
सगळं केलं, जे
शक्य होतं,” न्यायाधीशाने स्मितहास्य करंत म्हटलं, “आणि जगांत कोणीही ह्याच्यापेक्षा जास्त आणखी काही करूंच शकंत नव्हता!
शोधणा-या पथकालाच शिक्षा द्या, जे जूडासच्या मागावर होतं. पण मी सांगेन की ही शिक्षा कठोर नसली पाहिजे. आपण
ह्या बदमाशाला वाचवण्यासाठी जे शक्य होतं, ते सगळं केलंय! हो, विचारायचं राहून गेलंय...” न्यायाधीशाने कपाळ पुसंत म्हटलं, “त्यांनी कायफाचा पैसा कसा
परंत फेकला?”
“असं बघा, न्यायाधीश....
हे इतकं कठीण नाहीये. प्रतिशोध घेणारे कायफाच्या महालाच्या मागच्या बाजूला गेले, जिथे गल्ली मागच्या
अंगणापेक्षा उंचावरती आहे. तिथेच त्यांनी भिंतीवरून पिशवी आंत फेकून दिली.”
“चिट्ठीसोबत?”
“हो, अगदी तस्संच, जसं तुम्हीं सांगितलं होतं, न्यायाधीश. हो, बघा,” अफ्रानियसने पिशवीवर
लागलेली सील तोडून तिच्या आतील वस्तू न्यायाधीशाला दाखवल्या.
“हे तुम्हीं काय करताय, अफ्रानियस, शुद्धीवर
ये, सील
तर कदाचित मंदिराची आहे!”
“न्यायाधीशाला ह्याबद्दल काळजी करण्याची गरज नाहीये,” अफ्रानियसने पिशवी बंद
करंत म्हटलं.
“तुमच्याकडे काय सगळ्या प्रकारचा सील आहेत?”
पिलातने हसंत विचारलं.
“दुसरा काही उपायंच नाहीये, न्यायाधीश,” अफ्रानियसने न हसतां, अगदी गंभीरतेने उत्तर दिलं.
“मी कल्पना करूं शकतो की कायफाच्या इथे काय तमाशा झाला असेल.”
“हो, न्यायाधीश, खूपंच हंगामा झाला.
त्यांनी लगेच मला बोलावणं पाठवलं.”
अंधारांतसुद्धां स्पष्ट दिसंत होतं, की पिलातचे डोळे चमकताहेत.
“हे खूपंच मनोरंजक आहे, मनोरंजक...”
“मला खेद आहे, की मी तुमचा विरोध करतोय, न्यायाधीश, हे
जरा पण मनोरंजक नव्हतं. सर्वांत जास्त कंटाळवाणं आणि थकवणारं काम होतं. माझ्या
ह्या प्रश्नाच्या उत्तरांत, की कायफाच्या महालांतून कोणाला पैसे तर नव्हते दिले, त्यांनी दृढतेने सांगितलं, की असं नाही झालं.”
“ओह, तर
असं आहे? जर
म्हणतांतेय की नाही दिला, तर कदाचित नसेलही दिला. त्या परिस्थितीत तर मारेक-यांचा शोध लावनं आणखीनंच
कठीण होईल.”
“अगदी बरोबर म्हणताय, न्यायाधीश.”
“हो, अफ्रानियस, अचानक माझ्या मनांत विचार
आला, की
त्याने कुठे आत्महत्या तर नसेल केली?”6
“ओह, नाही, न्यायाधीश!” विस्मयाने
खुर्चीच्या पाठीशी टेकंत अफ्रानियसने उत्तर दिलं, “माफ़ करा, पण
हे बिल्कुल असंभव आहे!”
“आह, ह्या
शहरांत सगळं संभव आहे! मी चर्चा करायला तयार आहे, की काही वेळातंच ही अफवा सम्पूर्ण शहरांत पसरेल.”
आता अफ्रानियसने आपल्या विशिष्ठ नजरेने न्यायाधीशाकडे पाहिलं आणि थोडा विचार
करून म्हणाला, “हे तर शक्य आहे, न्यायाधीश.”
असं दिसंत होतं, की जरी सगळं स्पष्ट झालेलं होतं, तरीही न्यायाधीश किरियाथच्या ह्या माणसाच्या हत्येच्या प्रश्नापासून दूर जात
नव्हता, आणि
त्याने काही विचार करण्याच्या आविर्भावांत म्हटलं,
“मला बघायचं होतं, की त्याला कसं मारलं.”
“त्याला मोठ्या कौशल्याने मारलं, न्यायाधीश,” अफ्रानियसने उत्तर दिलं आणि तो उपहासाने न्यायाधीशाकडे बघू लागला.
“तुम्हांला कसं कळलं?”
“ह्या पिशवीकडे लक्ष द्या, न्यायाधीश,” अफ्रानियसने उत्तर दिलं, “मी ठामपणे सांगू शकतो, की जूडासचं रक्त फवा-यासारखं उसळलं, लाटेप्रमाणे वाहिलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी हत्या होताना बघितल्यायेत.”
“तर, नक्कीच, तो उठणार नाही?”
“नाही, न्यायाधीश, तो उठेल,” अफ्रानियसने स्मित हास्य
करंत दार्शनिकाच्या आविर्भावांत म्हटलं, “जेव्हां त्याच्या वरती मसिहाचा बिगुल वाजेल, ज्याची इथे सगळे वाट बघतायेत, पण त्याच्या आधी तो नाही उठणार!”
“बस, अफ्रानियस!
आता ही गोष्ट मी समजलोय. आता दफ़न-विधिकडे वळूं या.”
“मृतकांना व्यवस्थितपणे दफन केलंय, न्यायाधीश.”
“ओह, अफ्रानियस, तुमच्यावर खटला चालवणं
म्हणजे एक अपराधंच होईल. तुम्हांला सर्वोच्च पुरस्कार मिळायला पाहिजे. कशी पार
पडली दफ़न-विधि?”
अफ्रानियसने सांगायला सुरुवात केली की जेव्हां तो जूडासच्या प्रसंगांत
गुंतला होता, तेव्हां
गुप्तचर सैनिकांची एक तुकडी त्याच्या सहायकाच्या नेतृत्वाखाली बाल्ड-माउन्टेनवर
पोहोचली. संध्याकाळ झालेली होती. माउन्टेनवर एक मृत शरीर नव्हतं.
पिलात थरथरला आणि भसाड्या आवाजांत म्हणाला, “आह, मी
ह्याबद्दल कसा विचार नाही केला!”
“काळजीची गोष्ट नाहीये, न्यायाधीश,” अफ्रानियसने म्हटलं आणि सांगितलं, “दिसमास आणि गेस्तासचे मृत शरीर, ज्यांचे डोळे पंक्ष्यांनी खाऊन टाकले होते, उचलले आणि लगेच तिस-या मृत शरीराचा शोध सुरू झाला. त्याला लगेच शोधलं. एक
माणूस...”
“लेवी मैथ्यू...” पिलातने प्रश्नार्थक नाही, परंतु खात्री करण्याच्या अंदाजांत म्हटलं.
“हो, न्यायाधीश...”
लेवी मैथ्यू बाल्ड-माउन्टेनच्या उत्तरी उतारावर असलेल्या एका गुहेंत लपून
अंधार पडायची वाट बघंत होता. येशुआ हा-नोस्त्रीचं नग्न शरीर त्याच्या जवंळ होतं.
जेव्हां मशाली घेतलेले सैनिक गुहेंत पोहोचले, तेव्हां लेवी घाबरला आणि उत्तेजित
झाला. तो ओरडून म्हणाला, की त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये, आणि नियमानुसार,
प्रत्येक माणसाला, जर त्याला वाटलं तर, अभियुक्त मृतकाला दफन करण्याचा अधिकार आहे.
लेवी मैथ्यू म्हणाला की तो ह्या शरीराला स्वतःपासून दूर नाही करणार. तो खूप
उद्विग्न होता, असंबद्ध बडबड करंत होता, ओरडंत होता, कधी विनंती करायचा, कधी धमकी
द्यायचा, कधी शिव्या...
“त्याला पकडावं लागलं कां?” पिलातने निराशेने विचारलं.
“नाही, न्यायाधीश, नाही,” अफ्रानियसने शांतपणे उत्तर
दिलं. “त्या हट्टी माथेफिरूला आम्हीं हे समजावून शांत केलें, की हे शरीर दफ़न केलं जाईल.
लेवी ही गोष्ट समजून गेला, शांत झाला, पण
त्याने हे म्हटलं, की
तो कुठेही जाणार नाही आणि दफनविधीत भाग घेईल. तो म्हणाला, की त्याला मारून टाकलं, तरी तो इथून कुठेही जाणार
नाहीये. त्याने आपल्या खिशांतून ब्रेड कापायचा चाकू सुद्धां काढून समोर केला.”
“त्याला पळवून लावलं?” दबक्या आवाजांत पिलातने विचारलं.
“नाही, न्यायाधीश, नाही. माझ्या सहायकाने
त्याला दफ़न विधीत सहभागी व्हायची परवानगी दिली...”
“तुमच्या कोणत्या सहायकाने ह्याचं संचालन केलं?”
पिलातने विचारलं.
“तोल्माय,” अफ्रानियसने उत्तर दिलं आणि थोड्या काळजीने विचारलं, “त्याने काही चूक तर नाही
नं केली?”
“बोलंत राहा,” पिलात म्हणाला, “काही चूक नाही झाली. मी कधी-कधी भटकून जातो, अफ्रानियस, माझी
गाठ कदाचित अश्या व्यक्तीशी पडलीये, जो कधी चूक करतंच नाही, आणि तो व्यक्ति – तुम्हीं आहांत!”
“लेवी मैथ्यूला मृतकांच्या गाडीबरोबर नेण्यांत आलं आणि सुमारे दोन तासांनी
येर्शलाइमच्या उत्तरेकडे एका वाळवण्टी घाटीत पोहोचले. तिथे ह्या तुकडीने एक खोल
खड्डा खोदला आणि त्यांत तिघा मृतकांना दफन केलं.”
“कफन न घालता?”
“नाही, न्यायाधीश, गुप्तचर तुकडी ह्या
कामासाठी कापड घेऊन गेली होती. मृतकांच्या बोटांमधे आंगठ्या सुद्धां घातल्यात.
येशुआला एका गाठीची, दिसमासला दोन आणि गेस्तासला तीन गाठींची. खड्डा बंद केला, त्याच्यावर दगड ठेवले.
त्यावर बनवलेल्या खुणा तोल्मायला लक्षांत आहेत.”
“आह, जर
मी ह्या गोष्टीबद्दल विचार केला असतां!” पिलातने कपाळावर आठ्या घालंत म्हटलं, “मला कमीत कमी ह्या लेवी
मैथ्यूला भेटायला हवं होतं...”
“तो इथेच आहे, न्यायाधीश!”
पिलातचे डोळे विस्मयाने पसरले. त्याने थोडा वेळ अफ्रानियसकडे पाहिलं आणि
म्हणाला, “ह्या घटनेशी संबंधित तू जे काही केलंय, त्याबद्दल खूप-खूप आभारी आहे. कृपा करून तोल्मायला उद्या माझ्याकडे पाढवून
द्या, त्याला
आधींच सांगून ठेवा, की मी त्याच्या कामगिरीने खूष झालोय, आणि तुम्हांला, अफ्रानियस...” न्यायाधीशाने टेबलावर पडलेल्या पट्ट्याच्या खिशांतून ही-याची
अंगठी काढली आणि गुप्तचर सेवेच्या प्रमुखाला देत म्हटलं, “आठवणी प्रीत्यर्थ
माझ्याकडून ही भेट!”
अफ्रानियसने झुकून अभिवादन केलं आणि विनयपूर्वक म्हटलं, “मी अत्यंत सम्मानित झालो, न्यायाधीश.”
“ज्या तुकडीने दफन-विधि पूर्ण केली, तिला कृपा करून पुरस्कार द्या. ज्या शोधी-तुकडीने जूडासच्या बाबतीत हलगर्जी
केली, तिला
सिक्षा द्या आणि लेवी मैथ्यूला लगेच माझ्याकडे पाठवा. मला येशुआच्या बाबतीत त्याला
बरंच काही विचारायचंय.”
“जशी आज्ञा, न्यायाधीश,” अफ्रानियसने म्हटलं आणि तो
अभिवादन करंत मागे सरकू लागला, आणि न्यायाधीशाने टाळ्या वाजवून जोराने म्हटलं, “माझ्याकडे ये! स्तंभांत दिवा लाव!”
अफ्रानियस उद्यानांत निघून गेला होता, आणि पिलातच्या पाठीमागे सेवकाच्या हातांत दिवे टिमटिमंत होते.
न्यायाधीशासमोर टेबलावर दोन दिवे दिसू लागले आणि तेव्हांच चंद्राची रात्र
उद्यानांत उतरून गेली, जणु अफ्रानियस तिला आपल्यासोबत घेऊन गेला होता. अफ्रानियसच्या जागेवर महाकाय
सेन्चुरियनबरोबर एक अपरिचित व्यक्ती आला – छोटा-सा आणि अशक्त. न्यायाधीशाची नजर ओळखून, सेनाध्यक्ष लगेच उद्यानांत गेला आणि लुप्त झाला.
न्यायाधीश ह्या आगंतुकाकडे किंचित भयभीत, पण हाव-या नजरेने बघंत होता. अश्या नजरेने त्याच्याकडे बघतांत, ज्याच्याबद्दल खूप काही
ऐकलेलं असतं आणि जणु आपण स्वतः सुद्धां त्याच्याबद्दल विचार करंत असतो आणि तो
शेवटी तो प्रकटंच होतो.
सुमारे चाळीस वर्षांचा आगंतुक काळा, फाटक्या कपड्यांत होता, अंगावर कोरडं चिखलं लागलं होतं. तो लांडग्यासारखा, डोळ्यांच्या कोप-यांतून
बघंत होता. थोडक्यांत तो अगदीच अप्रिय वाटंत होता. त्याला बघून असं म्हणता आल असतं, की तो शहरांतला एखादा
भिकारी आहे, जसे
मंदिराच्या गच्चीवर किंवा खालच्या घाणेरड्या शहराच्या गर्दीत दिसतांत.
बरांच वेळ शांतता राहिली, पिलातकडे आणलेल्या त्या माणसाच्या विचित्र व्यवहारानेंच ह्या शांततेला भंग
केलं. त्याच्या चेह-याचा रंग बदलून गेला, तो ठेचकाळला. जर आपल्या घाणेरड्या हाताने त्याने टेबलाचा कोपरा नसतां धरला, तर तो पडलांच असतां.
“काय झालंय?” पिलातने त्याला विचारलं.
“काही नाही,” लेवी मैथ्यूने उत्तर दिलं आणि असं तोंड केलं, जणु काहीतरी गिळतोय. त्याची अशक्त, उघडी, घाणेरडी
मान किंचित फुगून पुन्हां सामान्य झाली.
“तुला झालं काय आहे, उत्तर दे,” पिलातने पुन्हां विचारलं.
“मी थकलोय,” लेवीने उत्तर दिलं आणि निराशेने फरशीकडे बघू लागला.
“बस,” पिलातने त्याला विनंतीच्या नजरेने बघून खुर्चीकडे बोट दाखवलं.
लेवीने अविश्वासाने पिलातकडे बघितलं, तो खुर्चीकडे जाऊं लागला. घाबरंत-घाबरंत त्याने खुर्चीच्या सोनेरी हातांना
हात लावला आणि मग खुर्चीच्या ऐवजी जवळंच फरशीवर बसून गेला.
“सांग, तू
खुर्चीवर कां नाही बसला?” पिलातने विचारलं.
“मी घाणेरडा आहे, माझ्या बसण्याने खुर्ची घाण होईल,”
लेवीने फरशीकडे बघंत उत्तर दिलं.
“आता तुला काहीतरी खायला देतील.”
“मला काहीच खायचं नाहीये,” लेवीने उत्तर दिलं.
“खोटं कां बोलतोय?” पिलातने शांतपणे विचारलं, “तू दिवसभर, कदाचित
जास्तंच, काहीही
खाल्लेलं नाहीये. ठीक आहे, नको खाऊ. तुला ह्याच्यासाठी बोलावलंय की मला तुझा चाकू बघायचांय.”
“जेव्हां मला इथे आणंत होते, तेव्हां शिपायांने हिसकावून घेतला.” लेवीने उत्तर देऊन निराशेने म्हटलं, “तुम्हीं मला तो परत देऊन
द्या. मला त्याच्या मालकाला परंत करायचांय. मी तो चोरला होता.”
“कशासाठी?”
“दोर कापायला,” लेवीने उत्तर दिलं.
“मार्क!” न्यायाधीश ओरडला आणि सेनाध्यक्ष स्तंभांच्याजवळ प्रकट झाला, “ह्याचा चाकू मला दे.”
सेनाध्यक्षाने कंबरेंत अडकवलेल्या दोन म्यानींपैकी एकीतून घाणेरडा, ब्रेड कापायचा सुरा काढला
आणि न्यायाधीशाला दिला, आणि स्वतः निघून गेला.
“चाकू घेतला कुठून होता?”
“हेब्रोन गेट जवळ असलेल्या
बेकरीतून, जसंच
शहरांत घुसतां...डावीकडे...”
पिलातने त्या चाकूच्या चौड्या पात्याकडे पाहिलं. बोटाने त्याची धार तपासली, माहीत नाही कां, आणि म्हणाला, “चाकूची काळजी नको करूं, तो दुकानांत परंत दिला
जाईल. आता मला दुसरी गोष्ट सांग : मला तू तो बस्ता दाखव जो तू बरोबर घेऊन फिरतोस, आणि ज्याचावर येशुआचे शब्द
लिहिले आहेत!”
लेवीने तिरस्काराने पिलातकडे बघितलं आणि इतक्या कटुतेने हसला की त्याचा
चेहरा वाकडा-तिकडा झाला.
“सगळं हिसकावून घेशील? त्याची शेवटची आठवण सुद्धां, जी माझ्याकडे आहे?” त्याने विचारलं.
“मी तुला हे नाही म्हटलंय की ‘दे!’, पिलातने उत्तर दिलं, “मी म्हटलं, ‘दाखव!’”
लेवीने आपल्या झोळ्यांत हात घातला आणि ताडपत्रीचा एक तुकडा काढला. पिलातने
तो घेतला, उघडला, प्रकाशासमोर धरला आणि डोळे
बारीक करून शाईने लिहिलेल्या आडव्या-तिरप्या चिन्हांना समजण्याचा प्रयत्न करू
लागला. ह्या वाकड्या-तिकड्या रेघोट्यांना समजणं कठीण होतं, आणि पिलात डोळे बारीक करून
ताडपत्रावर वाकून रेघांवर बोट फिरवूं लागला. शेवटी त्याला समजलं की ताडपत्र काही
विचारांची, म्हणींची, काही तारखांची, काही निष्कर्षांची, कवितांची असम्बद्ध
श्रूंखला आहे. त्यातील काही पिलातला वाचतां आलं : ‘मृत्यु नाही...काल आम्हीं मधुर वसंती बकुरोती7 खाल्ले...’ तणावामुळे चेहरा विकृत
करंत पिलातने डोळे बारीक करंत वाचलं : ‘आम्ही जीवनाची स्वच्छ नदी पाहू8...मानवता पारदर्शी काचाने
सूर्याकडे बघेल...’
इथे पिलात थरथरला. ताडपत्रावर लिहिलेल्या शेवटच्या ओळींत त्याने वाचलं : ‘…महान पाप...कायरता.’
पिलातने ताडपत्र गुंडाळलं आणी झटक्यांत लेवीकडे दिलं.
“घे,” त्याने म्हटलं आणि थोडावेळ चूप राहून पुढे म्हणाला, “मी बघतोय की तू शिकलेला
वाटतोय. तुला फाटक्या कपड्यांत, बिना घरा-दाराचं राहण्याची काही गरंज नाहीये. सीज़ेरियामधे माझं एक मोट्ठं
वाचनालय आहे, मी
खूप धनवान आहे, आणि
मला तुझ्या योग्यतेचा वापर करायचांय. तू जुने लेख वाचशील, समजावशील आणि त्यांना
सांभाळून ठेवशील. खाण्या-पिण्याची कमतरता राहणार नाही.”
लेवी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “नाही, मला
नाही जायचं.”
“कां?” न्यायाधीशाने विचारलं. त्याचा चेहरा काळवंडला, “तू माझा तिरस्कार करतोस? मला घाबरतोस?”
लेवीच्या चेह-यावर तेंच कटु हास्य पसरलं. तो म्हणाला:
“नाही, कारण
की तू मला घाबरंत राहशील. त्याला मारून टाकल्यानंतर माझ्याकडे बघणं तुझ्यासाठी
सोपं नाहीये.”
“चुप राहा,” पिलात म्हणाला, “पैसे घे.”
लेवीने डोकं हालवंत नाही म्हटलं.
न्यायाधीश पुन्हां म्हणाला, “मला माहितीये, की तू स्वतःला येशुआचा शिष्य समजतोस. पण मी तुला सांगतोय की त्याच्या
शिकवणीतूंन तुला काहीही समजलेलं नाहीये. जर असं असतं, तर तू माझ्याकडून नक्कीच काही न काही घेतलं असतं. जरा आठवं, मरायच्याआधी तो काय
म्हणाला होता – की तो कुणालासुद्धां दोष देत नाहीये,”
पिलातने अर्थपूर्ण ढंगाने बोट वर केलं, त्याचा चेहरा थरथरू लागला, “आणि त्याने स्वतः सुद्धां
काही न काही नक्कीच घेतलं असतं. तू फार कठोर आहेस, पण तो कठोर नव्हता. तू जाशील कुठे?”
लेवी अचानक टेबलाजवळ आला. त्यावर दोन्हीं हात ठेवून उभा राहिला आणि जळजळत्या
नेत्रांनी पिलातकडे बघंत कुजबुजला, “न्यायाधीश, तू
जाणून घे की मी येर्शलाइममधे एका माणसाची हत्या करणार आहे. मी तुला हे अश्यासाठी
सांगतोय, की
तुला कळलं पाहिजे, की
रक्ताच्या नद्या अजूनही वाहतील.”
“मलापण माहितीये, की वाहतील,” पिलातने म्हटलं, “तू मला जरासुद्धा विस्मित नाही केलं. नक्कीच तू मला मारणार आहेस?”
“तुला मारणं मला शक्य नाहीये,” लेवीने उत्तर दिलं. दात खांत, हसंत तो पुढे म्हणाला, “मी इतका मूर्ख नाहीये, की असली गोष्टसुद्धां मनांत आणेन, पण मी किरियाथच्या जूडासचे तुकडे-तुकडे करून टाकीन, माझं शेष जीवन ह्याच
कामासाठी समर्पित करेन.”
न्यायाधीशाच्या डोळ्यांत समाधान दिसलं, आणि त्याने खुणेने लेवी मैथ्यूला आपल्या आणखी जवळ बोलावंत म्हटलं, “हे तुला नाही करता येणार, तू ह्याबद्दल काळजीसुद्धां
करू नकोस. जूडासला आजच रात्री मारून टाकण्यांत आलंय.”
लेवी उसळला. रानटीपणाने बघंत तो ओरडला, “कुणी केलंय हे?”
“ईर्ष्या नको करूं,” दात दाखवंत पिलातने उत्तर दिलं आणि त्याने आपले हात चोळले, “मला भीति आहे, की तुझ्याशिवाय त्याचे
आणखीही प्रशंसक होते.”
“हे कुणी केलंय?” लेवीने कुजबुजंत पुन्हां आपला प्रश्न विचारला.
पिलातने त्याला उत्तर दिलं:
“हे मी केलंय.”
लेवीचं तोंड उघडंच राहिलं. त्याने रानटीपणाने न्यायाधीशाकडे पाहिलं. पिलात
म्हणाला:
“हे, जे
काही मी केलय, खूपंच
कमी आहे, पण
केलंय हे मीच...” आणि पुढे म्हणाला, “तर, आता
काही घेशील किंवा नाही?”
लेवीने काही विचार करून सौम्यपणे म्हटलं, “मला काही कोरे ताडपत्र दे,”
एक घण्टा झाला. लेवी महालांत नव्हता. आता उषःकालीन स्तब्धतेला फक्त
पहारेक-याच्या पावलांचा आवाजंच भंग करंत होता. चंद्र शीघ्रतेने फिक्कट पडंत होता, आकाशाच्या दुस-या कोप-यावर
उषःकालीन तारा चमकंत होता. दिवे कधीचं विझले होते. बिछान्यावर पडलेला न्यायाधीश एक
हात गालाखाली ठेवून गाढ झोपला होता, शांतपणे श्वासोच्छ्वास करंत होता. त्याच्याजवळ झोपला होता बांगा.
अश्या प्रकारे निस्सान महिन्याच्या पंधराव्या तिथीच्या पहाटेचं स्वागत केलं
जूडियाच्या न्यायाधीश पोंती पिलातने.
********
सत्तावीस
फ्लैट नम्बर 50चा अंत
जेव्हां मार्गारीटा “... अश्या प्रकारे निस्सान महिन्याच्या पंधराव्या
तिथीच्या पहाटेचं स्वागत केलं जूडियाच्या न्यायाधीश पोंती पिलातने,” ह्या शेवटचा शब्दांपर्यंत
पोहोचली, तेव्हां
सकाळ झालेली होती.
विलो आणि लिंडेनच्या फांद्यांतून चिमण्यांचा प्रसन्न किलबिलांट ऐकू येत
होता.
मार्गारीटाने खुर्चीतून उठून आळस दिला आणि तेव्हांच तिला कळलं, की ती किती थकलीये आणि
तिला कित्ती झोप येतेय. मजेदार गोष्ट ही होती, की मार्गारीटाची आत्मा अगदी ठीक ठाक होती, तिचे विचार इकडे-तिकडे भरकटंत नव्हते, तिला जरासुद्धां आश्चर्य नव्हतं होत, की रात्र तिने अत्यंत विचित्रपणे घालवली होती. सैतानाच्या नृत्योत्सवांत
स्वतःच्या उपस्थितीच्या आठवणी तिला त्रास नव्हत्या देत. तिला ह्या गोष्टीचंपण
आश्चर्य नव्हतं वाटंत, की किती आश्चर्यजनक पद्धतीने तिचा मास्टर तिला परंत मिळाला होता, की राखेतून कादम्बरी
पुनर्जीवित झाली होती, की त्या तळघरांत सगळं आपल्या पूर्वस्थितींत होतं, जिथून त्या चुगलखोर खब-या अलोइजी मोगारिचला काढून टाकलं होतं. थोडक्यांत
म्हणजे, वोलान्दशी
झालेल्या भेटीचा तिच्यावर कोणताही मानसिक परिणाम नव्हता झाला. सगळं तसंच होतं, जसं व्हायला पाहिजे होतं.
ती बाजूच्या खोलींत गेली, खात्री करून घेतली, की मास्टर शांत आणि गाढ झोपेंत आहे, अनावश्यक टेबल लैम्प विझवून टाकला आणि स्वतःपण समोरच्या भिंतीलगतच्या
दिवानावर झोपली, ज्याच्यावर
जुनी, फाटकी
चादर पडली होती. तळघराच्या दोन्हीं खोल्या शांत होत्या, कॉन्ट्रेक्टरचं छोटंस घर शांत होतं. त्या बंद गल्लींतसुद्धां सगळं शांत
होतं.
पण ह्यावेळेस, म्हणजे शनिवारी सकाळी, मॉस्कोच्या एका ऑफिसचा सम्पूर्ण मजला जागा होता. मोट्ठ्या, सिमेन्टच्या चौकांत
उघडणा-या त्याच्या खिडक्या, ज्यांना ह्यावेळेस मोट्ठ्या-मोट्ठ्या विशेष गाड्या मंद घरघरांट करंत ब्रशने
स्वच्छ करंत होत्या, खूप चमकंत होत्या आणि सूर्याच्या प्रकाशाला भेदंत होत्या.
सम्पूर्ण मजला वोलान्दच्या ‘केस’च्या
तपासांत व्यस्त होता. ऑफिसच्या डजनभर खोल्यांमधे रात्रभर लाइट जळंत होती.
खरं म्हणजे हा मामला आदल्या दिवशीच, म्हणजे शुक्रवारीच प्रकाशांत आला होता, जेव्हां व्यवस्थापकांची
सम्पूर्ण टोळी गायब झाल्यावर आणि काळ्या जादूच्या त्या प्रसिद्ध ‘शो’नंतर झालेल्या
लाजिरवाण्या, अपमानकारक
घटनांमुळे वेराइटी थियेटरला बंद करावं लागलं होतं. पण विशेष गोष्ट ही होती की
तेव्हांपासूनंच लागोपाठ होणा-या विचित्र घटनांची सूचना ह्या निद्राहीन मजल्यावर
येतंच होती.
आता विशेषज्ञ मॉस्कोच्या विभिन्न भागांत घडंत असणा-या ह्या विचित्र ‘केस’च्या सैतानी, सम्मोहनकारी, चोरी-लबाडी, पेचांत टाकणा-या पैलूंना एका सूत्रांत गुंफायचा प्रयत्न
करंत होते.
सगळ्यांत आधी ज्या माणसाला ह्या निद्राहीन, विजेच्या प्रकाशांत जगमगणा-या मजल्यावर बोलावण्यांत आलं, तो होता ध्वनि-संयोजक
समितीचा प्रमुख अर्कादी अपोलोनोविच सिम्प्लेयारोव.
शुक्रवारी लंचनंतर त्याच्या कामेन्नी पुलाजवळच्या फ्लैटमधे घंटी वाजली आणि
एका पुरुषी आवाजाने अर्कादी अपोलोनोविचला टेलिफोनवर बोलावलं. टेलिफोन उचलंत
त्याच्या पत्नीने निराशेने सांगितलं, की अर्कादी अपोलोनोविचची तब्येत बरी नाहीये, म्हणून ते झोपलेयंत आणि टेलिफोनजवळ नाही येऊं शकंत. पण अर्कादी अपोलोनोविचला
टेलिफोनजवळ यावंच लागलं. हे विचारल्यावर की अर्कादी अपोलोनोविचला कोण बोलावतंय, त्या आवाजाने थोडक्यांत
सांगितलं, की
तो कुठून बोलतोय.
“लगेच...आत्तांच...आत्ता...लगेच...” साधारणपणे धृष्ठ असलेली प्रमुखाची पत्नी
तीरासारखी शयनगृहांत जाऊन अर्कादी अपोलोनोविचला सोफ्यांतून उठवूं लागली, जिथे तो झोपला होता आणि
कालच्या ‘शो’शी संबंधित नारकीय
अनुभवांच्या आठवणीने थरथरंत होता. रात्री झालेला लफडा, ज्यांत सरातोवच्या त्याच्या भाचीला फ्लैटवरून काढून टाकलं होतं, त्याला विसरतां येत
नव्हता.
खरोखरंच, एका
सेकन्दात तर नाही, आणि
एका मिनिटानंतर सुद्धां नाहीं, पण पाव मिनिटांतंच अर्कादी अपोलोनोविच डाव्या पायांत एक जोडा अडकवून, फक्त अंतर्वस्त्रांतच
टेलिफोनजवळ येऊन म्हणाला, “हो, हा
मीच आहे, ऐकतोय, ऐकतोय.”
त्याची बायको, आता, ह्यावेळेस
त्या सगळ्या नीच आणि व्यभिचारी वर्तनाला विसरून, ज्याचा दोषी अर्कादी अपोलोनोविच होता, भयभीत चेह-याने दारातून बाहेर डोकावून कॉरीडोरमधे बघून घेत होती, आणि हवेंत जोडे दाखवंत
कुजबुजंत होती:
“जोडे घाल, जोडे...पायांना
थंडी लागेल,” ज्यावर अर्कादी अपोलोनोविच बिनजोड्याचा पाय हलवून बायकोला झिडकारंत होता आणि
तिच्याकडे क्रूरतेने पाहात टेलिफोनवर बडबडंत होता:
“हो, हो, हो, असं कसं, मला कळतंय...आत्ता निघतो.”
पूर्ण संध्याकाळ अर्कादी अपोलोनोविचने त्या मजल्यावरंच होता, जिथे तपास चालू होता.
त्रासदायक वार्तालाप खूप वेळ चालू होता...अत्यंत अप्रिय होता हा वार्तालाप. सगळंच
खरं-खरं सांगावं लागलं होतं, फक्त त्या घृणित कार्यक्रमाबद्दल आणि बॉक्समधे झालेल्या भांडणाबद्दलंच नाही, तर गोष्टी-गोष्टींमधे ते
पण सांगावं लागलं, जे
जरूरी होतं; एलोखोव्स्काया
मार्गावर राहणा-या मिलित्सा अन्द्रेयेव्ना पाकोबात्काबद्दल, सरातोवच्या भाचीबद्दल, आणखीही बरंच काही, जे सांगताना अर्कादी
अपोलोनोविचला अवर्णनीय दुःख होत होतं.
अर्कादी अपोलोनोविचने, जो एक बुद्धिमान आणि सुसंस्कृत व्यक्ती होता, जो त्या धक्कादयक ‘शो’चा
प्रत्यक्षदर्शी होता, जो प्रत्येक गोष्ट नीट पारखू शकंत होता, ह्या ‘शो’चं सजीव चित्रण प्रस्तुत
केलं; त्या
रहस्यमय जादुगाराचं आणि त्याच्या दोन्हीं सहायकांचंसुद्धां; त्याला चांगलंच आठवंत होतं, की त्या जादुगाराचं नाव
वोलान्द होतं. त्याच्या साक्षींनी तपासाच्या कामाला पुढे वाढवण्यांत बरीच मदत
केली. अर्कादी अपोलोनोविचने सांगितलेल्या तथ्यांची इतर लोकांनी सांगितलेल्या गोष्टींशी
तुलना केल्यावर - विशेषकरून अश्या
महिलांच्या उत्तरांशी, ज्या ‘शो’च्या नंतर खूप त्रस्त
झाल्या होत्या (ती, जी जांभळ्या अंतवस्त्रांमधे होती, जिने रीम्स्कीला आश्चर्यचकित केलं होतं, आणि, आणखीही
अनेक महिला), पत्रवाहक
कार्पोवच्या कथनाशी ज्याला सादोवायाच्या फ्लैट नं.
50मधे पाठवण्यांत आलं होतं – हे निश्चित झालं, की कोणत्या ठिकाणी ह्या
सगळ्या चमत्कारांसाठी जवाबदार असलेल्या व्यक्तीला शोधतां येईल.
फ्लैट नं. 50मधे पण जाऊन आले, एकदांच नाही, तर अनेकदा आणि न केवळ त्याची व्यवस्थित तपासणी केली, तर भिंतीनासुद्धां
ठोकून-ठोकून बघितलं, शेकोटीतून वर जात असलेले धुराचे पाइप्स तपासले, गुप्त जागा शोधल्या, पण ह्या सगळ्याचा काहीही परिणाम नाही निघाला आणि एकदासुद्धां त्या फ्लैटमधे
कोणीही सापडलं नाही, तसं सतत असं वाटंत होतं, की फ्लैटमधे नक्कीच कोणीतरी आहे; ह्याविरुद्ध, ते सगळे लोक, जे मॉस्कोत येणा-या परदेशी लोकांबद्दल माहिती ठेवायचे, सांगंत होते की वोलान्द
नावाचा कोणतांच काळ्या जादूचा जादुगार मॉस्कोत नाहीये आणि असूंपण शकंत नाही.
खरंच, त्याने
मॉस्कोत आल्यावर कुठेच आपलं नाव नोंदवलं नव्हतं, कोणालाही आपलं पासपोर्ट किंवा अन्य काही डोक्यूमेन्ट दाखवलं नव्हतं; काही कॉन्ट्रॅक्ट, काही एग्रीमेन्ट...काहीही
नाही आणि कोणीच त्याच्याबद्दल काहीच ऐकलेलं नव्हतं! थियेटर्सच्या
प्रोग्राम्स-कमिटीचा प्रमुख कितायत्सेव शप्पथ घेऊन, हात जोडून सांगंत होता, की गायब झालेल्या स्त्योपा लिखादेयेवने वोलान्दच्या कार्यक्रमाशी संबंधित
कोणतांच प्रस्ताव मंजूरीसाठी त्याच्याकडे पाठवलेला नव्हता., आणि त्याने वोलान्दच्या
आगमनाबद्दल कितायत्सेवला फोनसुद्धां केला नव्हता. म्हणूनंच कितायत्सेवला काहींच
कळंत नाहीये आणि काही माहीतपण नाहीये, की स्त्योपा वेराइटी थियेटरमधे अश्या कार्यक्रमाचं आयोजन कसा काय करूं शकला.
जेव्हां त्याला हे सांगितलं, की अर्कादी अपोलोनोविचने स्वतःच्या डोळ्यांनी हा कार्यक्रम बघितला आहे, तर कितायत्सेव हात नाचवंत
आकाशाकडे बघूं लागला. कितायत्सेवच्या स्वच्छ, पारदर्शी डोळ्यांकडे बघतांच कळंत होतं, की तो निर्दोष आहे.
तोच प्रोखोर पेत्रोविच, मुख्य दर्शक कमिटीचा प्रमुख...
बोलतां-बोलतां हे पण सांगून टाकतो, की जसेंच पोलिस त्याच्या खोलीत घुसले, तो आपल्या सूटमधे परत आला, ज्याने हैराण, त्रस्त आन्ना रिचार्दोव्नाला अत्यंत आनंद झाला आणि उगाचंच उत्तेजित होत
असलेल्या पोलिसवाल्यांना झाला – चरम अविश्वास. आणखीही : आपल्या जागेवर परंत
आल्यावर प्रोखोर पेत्रोविचने त्या सर्व निर्णयांची पुष्टी केली, जे त्याच्या अल्पकालीन
गैरहजेरीत त्याच्या सूटने घेतले होते.
...तर, तोच
प्रोखोर पेत्रोविच म्हणंत होता, की त्याला कोणत्याचं वोलान्दबद्दल काहीही माहीत नाहीये. आणि हे घ्या, तुमची इच्छा असो, वा नसो, एक फारंच विचित्र गोष्ट
समोर आली : हज्जारो दर्शकांनी, वेराइटीच्या कर्मचा-यांनी, आणि उच्च शिक्षा प्राप्त सिम्प्लेयारोव अर्कादी अपोलोनोविचनेपण ह्या
जादुगाराला आणि त्याच्या सहायकांना बघितलं होतं, पण त्याला शोधणं अशक्य झालं होतं. तर मग, मी तुम्हांला विचारूं शकतो का, की तो काय आपल्या घृणित प्रदर्शनानंतर लगेच जमिनींत गडप झाला कां, किंवा जसं काही लोकांच मत
आहे, तो
मॉस्कोला आलेलाच नव्हता? पण, जर
पहिल्या गोष्टीवर विश्वास करावा, तर हेसुद्धां स्पष्ट आहे, की तो जमिनींत गडप होताना आपल्याबरोबर वेराइटीच्या सम्पूर्ण प्रशासनिक टीमला
घेऊन गेला; आणि
जर दुसरी गोष्ट खरी असेल, तर काय हे सिद्ध नाही होत, की ह्या बदनाम थियटरचे प्रशासक काही खतरनाक कारनामा करून (फक्त खोलीतली
फुटलेली खिडकी आणि तुज़्बुबेनच्या विचित्र व्यवहाराकडेच लक्ष द्या) मॉस्कोतून
काहीही माग न सोडतां गायब झाले?
जो ह्या तपासाचं नेतृत्व करंत होता, त्याची तारीफ़ करावीच लागेल. गायब झालेल्या रीम्स्कीला विस्मयकारी शीघ्रतेने
शोधून काढण्यांत आलं. फक्त सिनेमा हॉलच्या जवळच्या टैक्सी स्टैण्डच्या जवळ तुज़्बुबेनच्या
व्यवहाराचा वेळेच्या काही आकड्यांशी मेळ बसवावा लागला, जसं की ‘शो’ किती वाजतां संपला आणि
रीम्स्की केव्हां गायब झाला असेल, म्हणजे लगेच लेनिनग्रादला तार पाठवतां येईल. एका तासाने उत्तर आलं
(शुक्रवारी संध्याकाळी), की रीम्स्की ‘एस्तोरिया1’ हॉटेलच्या चारशे बारा नंबरच्या खोलीत सापडला; चौथ्या मजल्यावरच्या त्या खोलीच्या बाजूला, जिथे मॉस्कोच्या एका थियेटरच्या प्रमुख कार्यक्रम-संयोजक थांबला होता, जो सध्या लेनिनग्रादच्या
दौ-यावर आहे; त्याच
खोलींत, जिथे, सगळ्यांना माहीतंच आहे, की भुरकट निळ्या रंगाचं
सोनेरी चमकदार फर्नीचर आहे आणि सुंदर स्नानगृह आहे.
कपड्यांच्या अलमारीत लपून बसलेल्या रीम्स्कीला ‘एस्तोरिया’च्या
चारशे बारा नंबरच्या खोलींतून बाहेर आणलं, त्याला लगेच अटक करून लेनिनग्रादमधेच विचारपूस करण्यांत आली. त्यानंतर
मॉस्कोला टेलिग्राम पाठविण्यांत आला, की फिन-डाइरेक्टर कोणत्याही प्रश्नांच उत्तर देण्यास असमर्थ आहे, आणि तो फक्त येवढंच
म्हणतोय, की
त्याला बन्द बुलेटप्रूफ खोलींत सशस्त्र पोलिसांच्या कडक पहा-यांत ठेवावं.
मॉस्कोहून टेलिग्रामनेच आज्ञा देण्यांत आली, की रीम्स्कीला कडक पहा-यांत मॉस्कोला आणण्यांत यावं, त्याप्रमाणे शुक्रवारीच
संध्याकाळी कडक पहा-यांत रीम्स्की मॉस्कोसाठी रवाना झाला.
शुक्रवारीच संध्याकाळी लिखादेयेवचापण पत्ता लागला. सगळ्या शहरांमधे
लिखादेयेवचं वर्णन करणारे टेलिग्राम्स पाठवण्यांत आले, आणि याल्टाहून उत्तर आलं होतं की लिखादेयेव याल्टांत होता, पण विमानाने मॉस्कोसाठी
रवाना झाला आहे.
एकंच माणूस ज्याचा अजूनपर्यंत पत्ता नव्हता लागला, तो होता वारेनूखा.
सम्पूर्ण मॉस्कोला परिचित असलेला तो थियेटरचा एडमिनिस्ट्रेटर जणू पाण्यांत बुडून
गेला होता.
त्याबरोबरंच वेराइटीच्या बाहेर, मॉस्कोच्या अन्य ठिकाणी घडलेल्या घटनांचासुद्धां तपास करायचा होता.
‘सुंदर सागर’ गाण्यामागच्या असाधारण
घटनेचे काय रहस्य होते, जे दर्शक कमिटीचे सगळे कर्मचारी गात होते, हे पण स्पष्ट करायचं होतं (हे सांगून टाकतो, की प्रोफेसर स्त्राविन्स्कीने काही इन्जेक्शन देऊन दोन तासांत त्यांना बरं
केलं होतं), त्या
माणसांचा पत्ता लावण आवश्यक होतं जे पैशाच्या नावावर दुस-या माणसांना किंवा
संस्थांना सैतानंच जाणे काय देत होते, आणि त्यांचापण ज्यांना ह्याच्यामुळे त्रास झाला होता.
ह्या सगळ्या घटनांमधे सगळ्यांत अप्रिय, लफ़डेवालं आणि न सोडवतायेणारं कोड म्हणजे ग्रिबोयेदोव हॉलमधे कॉफिनमधे
ठेवलेल्या मृत साहित्यिक बेर्लिओज़चं डोकं चोरण्याची घटना, जी अगदी दिवसा ढवळ्या घडली
होती.
बारा माणसांची तपास-कमिटी संपूर्ण मॉस्कोत पसरलेल्या ह्या अत्यंत कठिन केसचे
विभिन्न धागे-दोरे एकत्र करण्यांत गुंतली होती.
एक तपासनीस प्रोफेसर स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलमधे पोहोचला आणि सगळ्यांत
आधी त्याने त्या लोकांची लिस्ट दाखवायला सांगितलं, ज्यांना मागच्या तीन दिवसांत हॉस्पिटलमधे आणलं होतं. अश्या प्रकारे निकानोर
इवानोविच बासोय आणि दुर्दैवी सूत्रधार, ज्याचं डोकं उपटलं होतं, दिसले. त्यांच्याकडे, माहीत नाही कां, कमी लक्ष दिलं गेलं. आता हे सिद्ध करणं सोपं होतं, की हे दोघं एकाच टोळीचे
शिकार झालेले होते, जिचं नेतृत्व रहस्यमय जादुगार करंत होता. पण इवान निकोलायेविच बिज़्दोम्नीने
तपासनीसाचं लक्ष वेधलं.
इवानूश्काच्या खोली नं 117चं दार शुक्रवारी संध्याकाळी उघडलं आणि एक गोल चेह-याचा, शांत, सौम्य स्वभावाचा तरुण, जो बिल्कुल तपासनीसासारखा
नव्हता - तसं पाहिलं तर तो एक उत्कृष्ट हेर होता - खोलींत आला. त्याने पलंगावर लोळलेल्या तरुणाकडे पाहिलं, ज्याच्या चेह-याचा रंग
अगदी फिक्कट झाला होता आणि गाल आत गेले होते. त्या तरुणाच्या डोळ्यांत दिसंत होती
आपल्या चारीकडे होत असलेल्या घटनांबद्दल पूर्ण उदासीनता, कधी हे डोळे कुठेतरी दूर, आजूबाजूच्या वातावरणाच्या
वर, बघत
होते, तर
कधी स्वतःच्याच अंतरंगात डोकावंत होते.
तपासनीसाने मोठ्या प्रेमाने स्वतःचा परिचय दिला आणि म्हणाला की तो इवान
निकोलायेविचला परवा पत्रियार्शीवर झालेल्या घटनेबद्दल विचारायला आलांय.
ओह, इवान
कित्ती खूष झाला असता, जर हा हेर त्याच्याकडे आधी आला असता, कमींत कमी गुरुवारी रात्री, जेव्हां इवान आटोकाट प्रयत्न करंत होता की कुणीतरी त्याचं म्हणणं ऐकावं. आता
त्या कन्सल्टेन्टला पकडायची इच्छाच मरून गेली होती; आता तर त्याला कोणाच्यामागे धावण्याची गरंज नव्हती, ते स्वतःच त्याच्याकडे चालून
आले होते, हे
विचारण्यासाठी की बुधवारी संध्याकाळी काय घडलं होतं.
पण, बेर्लिओज़च्या
मृत्युपासून आतापर्यंत, इवानूश्का एकदम बदलला होता. तो हेराच्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी लगेच
तयार झाला, पण
इवानच्या चेह-यातून आणि त्याच्या बोलण्याच्या ढंगातून उदासीनता डोकावंत होती. आता
कवी बेर्लिओज़च्या दुर्दैवाने हेलावला नव्हता.
तपासनीस यायच्या आधी इवान झोपेच्या गुंगीत होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर
अनेक दृश्य तरंगंत होते. जसं की, त्याने बघितलं एक विचित्र, अनाकलनीय, अस्तित्वहीन
शहर...त्यांत संगमरमरचे ढीग, सूर्याच्या प्रकाशांत चमकणारे जीर्ण-शीर्ण छप्परं; अन्तोनियोची काळी, उदास आणि निर्दय मीनार; पश्चिमेकडच्या टेकडीवर
असलेला प्रासाद, ज्याच्यावर
छतापर्यंत दाट हिरव्या वेली लटकल्या होत्या; अस्त होत असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत धगधगंत असलेल्या तांब्याच्या
प्रतिमा, ज्या
ह्या हिरवळीवर उभ्या होत्या. त्याने प्राचीन शहराच्या भिंतींखाली चालंत असलेले
कवचधारी रोमन कमाण्डरपण पाहिले.
ह्या गुंगीत इवानच्या समोर आला खुर्चीवर निश्चल बसलेला एक माणूस, तिरस्काराने ह्या परक्या, बहरलेल्या उद्यानाकडे बघंत
असलेला. इवानने निर्मनुष्य पिवळी टेकडीसुद्धां बघितली जिच्यावर रिकामे वध स्तम्भ
उभे होते.
आणि म्हणूनंच पत्रियार्शी तलावाच्या जवळ घडलेल्या घटनेंत कवी इवान
बिज़्दोम्नीला काहीही रस नव्हता.
“मला सांगा, इवान
निकोलायेविच, तुम्हीं
स्वतः त्या फिरत्या दरवाजापासून किती लांब होते, जेव्हां बेर्लिओज़ घसरून ट्रामच्या खाली पडला?”
इवानच्या ओठांवर मुश्किलीने कळणारे उदासीन स्मित तरंगले आणि तो म्हणाला:
“मी बरांच दूर होतो.”
“आणि तो चौकटीचा लम्बू दाराच्या जवळंच होता कां?”
“नाही, तो
जवळंच पडलेल्या एका बेंचवर बसला होता.”
“तुम्हांला नक्की आठवतंय कां, की तो फिरत्या दाराजवळ तेव्हांच पोचला, जेव्हां बेर्लिओज़ पडून गेला होता?”
“आठवतंय. नाही पोहोचला. तो ऐसपैस बसला होता.”
हे तपासनीसाचे शेवटचे प्रश्न होते. ह्याच्यानंतर तो उठला, इवान समोर हात करंत
त्याच्या शीघ्र स्वास्थ्य-लाभाची कामना केली आणि असाही विश्वास प्रकट केला, की लवकरंच त्याच्या कविता
वाचेल.
“नाही,” इवानने हळूच उत्तर दिल, “मी आता आणखी कविता नाही लिहिणार.”
तपासनीस सौजन्याने हसला, त्याने म्हटलं की त्याला विश्वास आहे, की कवी सध्या निराशाजनक मनःस्थितीत आहे, पण ही लवकरंच निघून जाईल.
“नाही,” इवानने प्रत्युत्तर दिलं, तो तपासनीसाकडे बघंत नसून दूर विझंत असलेल्या क्षितिजाकडे बघंत होता, “ही स्थिती कधीच सम्पणार
नाही, त्या
कविता ज्या मी लिहिल्या होत्या – वाईट होत्या, आणि आता ही गोष्ट मी समजून चुकलोय.”
तपासनीस इवानकडून अत्यंत महत्वाची माहिती गोळा करून तिथून निघून गेला. शेवटाहून
सुरुवातीपर्यंत घटनांचे टोकं पकडंत-पकडंत तो त्या उद्गमस्थळापर्यंत पोहोचला होता, जिथून ह्या घटना सुरू
झाल्या होत्या. हेराची खात्री पटली होती, की ह्या घटनांची स्र्रुवात पत्रियार्शीवर झालेल्या हत्येपासून झाली होती.
निश्चितंच,
मासोलितच्या दुर्दैवी प्रमुखाला ट्रामच्या खाली ना तर इवानूश्काने, ना चौकटीच्या लम्बूने
ढकललं होतं. त्याच्या ट्रामच्या चाकांखाली येण्यामागे ह्यांच्यापैकी एकही कारणीभूत
नव्हता. पण हेराला ही खात्रीतर होती, की बेर्लिओज़ने आपणहूनंच स्वतःला ट्रामच्या खाली फेकलं होतं (किंवा तो तिच्या
खाली पडला), कारण
की तो सम्मोहनाच्या प्रभावाखाली होता.
हो, बरेच
प्रमाण एकत्रित झाले होते, हे सुद्धां कळलं होतं, की कोणाला पकडायचं आहे आणि कुठे पकडायचंय. पण मुद्दा हा होता, की पकडणं शक्यंच होत
नव्हतं. त्या त्रिवार शापित फ्लैट नं. 50मधे, निश्चितंच, आम्हीं
पुन्हां सांगू, की
कोणीतरी होतं. कधी-कधी ह्या फ्लैटमधून टेलिफोनच्या घंट्यांचं भसाड्या किंवा
चिरचि-या आवाजांत उत्तर दिलं जायचं, कधी-कधी फ्लैटची खिडकी उघडलेली असायची; कमालीची गोष्ट ही होती, की त्यांतून पियानोचा आवाज यायचा. पण, तरीही, दर
वेळेस, तिथे
कोणी गेलं तर त्याला कोणीही दिसायचं नाही; आणि तिथे अनेकदा, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी गेले. फ्लैटमधे जाळी घेऊन गेले, सगळे काने-कोपरे तपासले.
हा फ्लैट ब-याच दिवसांपासून संदेहास्पद झालेला होता. फक्त गल्लीच्या कोप-यावरून
कम्पाउण्डपर्यंत येणा-या रस्त्यावरंच नजर ठेवली जात नसून, गुप्त दरवाज्याचीपण निगराणी
केली जात होती. येवढंच नाही, छतावर निघणा-या धुराड्यांजवळसुद्धां पहारा बसवला होता. हो, फ्लैट नं. 50 खोड्या करतंच
होता, पण
त्याचं काहीही करणं अशक्यच होऊन बसलं होतं.
अशाप्रकारे हे काम लांबतंच गेलं, शुक्रवारपासून ते शनिवारच्या मध्य रात्रीपर्यंत, जेव्हां सामन्त मायकेल आपली सायंकालीन पार्टीची पोषाक घालून, चमकदार जोडे घालून अतिथी
म्हणून फ्लैट नं. 50 मधे जात होता. ऐकूं येत होतं, की सामन्तला कश्याप्रकारे फ्लैटच्या आंत घेतलं गेलं, ह्याच्यानंतर बरोब्बर दहा
मिनिटांनी, घंटी
न वाजवता, फ्लैटची
तपासणी केली, पण
त्यांत होस्ट मालक सापडलांच नाही. आश्चर्याची गोष्ट तर ही होती, की तिथे सामन्त मायकेलचा पण पत्ता नव्हता.
तर, अश्या
प्रकारे, जसं
आम्हींच आधीच सांगितलंय, हे प्रकरण शनिवार सकाळपर्यत लांबलं. आता त्यांत आणखी काही नवीन रोचक तथ्य जोडले
गेले. मॉस्कोच्या विमानतळावर एक सहा सीट्सचं लहानसं विमान उतरलं. ते क्रीमियाहून
आलेलं होतं. इतर मुशाफिरांबरोबर त्यांतून एक विचित्र प्रवासी उतरला...हा एक तरुण
नागरिक होता, दाढी
वाढलेली, तीन
दिवसांपासून आंघोळ न झालेली, सुजलेल्या,
भयभीत डोळ्यांनी बघंत असलेला; बरोबर सामान नसलेला; वेशभूषापण विचित्रंच होती. त्या नागरिकाने एक उंच, मेंढ्याच्या चामड्याची
टोपी घातली होती, नाइटसूटवर
फक्त एक गाउनसारखं काहीतरी घातलं होतं, आणि पायांत नवीनंच विकंत घेतलेले निळे, सुरेख नाइट शूज़ होते. जसांच तो विमानाला लावलेल्या शिडीवरून खाली उतरला, त्याच्या जवळ ऑफिसर्स
पोहोचले. ह्या नागरिकाची वाटंच बघंत होते, आणि थोड्याच वेळांत हा अविस्मरणीय तरुण, स्तेपान बोग्दानोविच लिखादेयेव तपास-कमिटीच्या समोर होता. त्याने नवीनंच
माहिती दिली. आता स्पष्ट झालं, की वोलान्द कलाकारच्या रूपांत वेरायटीत घुसला, स्त्योपा लिखोदेयेवला सम्मोहित करून; आणि मग ह्याच स्त्योपाला त्याने चलाखीने मॉस्कोच्या बाहेर फेकून दिलं –
देवंच जाणे, किती
किलोमीटर्स दूर. तर, माहितीत तर भर पडली, पण ह्याने काम सोपं तर झालंच नाही, उलट, माफ
करा, आणखीनंच
गुंतागुंतीचं झालं, कारण की हे स्पष्ट कळलं होतं, की जो व्यक्ती अश्या प्रकारची गंमत करू शकतो, जिचा शिकार स्तेपान बोग्दानोविच झाला होता, त्याला पकडणं सोपं नव्हतं. लिखादेयेवला त्याच्याच विनंतीवर एका सुरक्षित बंद
खोलींत ठेवण्यांत आलं. आता तपास-कमिटीच्या समोर प्रकट झाला वारेनूखा, ज्याला आत्ताच त्याच्या
फ्लैटमधून पकडण्यांत आलं होतं, जिथे तो दोन दिवस गायब झाल्यानंतर परतला होता.
अजाज़ेलोला दिलेल्या वचनाविरुद्ध, की तो कधी खोटं नाही बोलणार, एडमिनिस्ट्रेटरने खोटं बोलण्यानेच सुरुवात केली. त्यासाठी त्याला अत्यंत
कठोर शिक्षा देणंसुद्धां बरोबर नाहीये, कारण अजाज़ेलोने त्याला फोनवर खोटं न बोलायला आणि गुण्डगिरी करायला नाही
म्ह्टलं होतं आणि ह्यावेळेस एडमिनिस्ट्रेटर फोनवर नव्हता बोलंत. डोळ्यांची उघडझाप करंत
इवान सावेल्येविचने सांगितलं, की गुरुवारी दुपारी थियेटरच्या आपल्या खोलींत एकटा बसून तो खूप दारू प्यायला, त्याच्यानंतर तो कुठेतरी
निघून गेला, पण
कुठे – ते त्याच्या लक्षांत नाही. आणखी कुठेपण जुनी दारू प्यायला, पण कुठे – लक्षांत नाही.
मग कुठेतरी पडून गेला, कोणच्यातरी कम्पाउण्डजवळ, पण कुठे – तेसुद्धां लक्षांत नाही. पण जेव्हां एडमिनिस्ट्रेटरला सांगण्यांत आलं, की तो आपल्या ह्या
मूर्खपणाने एका महत्वपूर्ण केसच्या तपासांत अडथळा आणतो आहे आणि त्यालांच ह्यासाठी
जवाबदार धरलं जाईल, तर वारेनूखा रडायला लागला आणि थरथरत्या गळ्याने शप्पथ घेऊन कुजबुजंत म्हणाला, की तो फक्त भीतीमुळे खोटं
बोलतोय, कारण
की त्याला भीती आहे, की वोलान्दची टोळी नक्कीच त्याच्याशी बदला घेईल, जिच्या हातांत तो आधीच पडलेला होता, आणि तो विनंती करतोय, की त्याला बुलेटप्रूफ सुरक्षित बंद खोलींत ठेवण्यांत यावं.
“छिःतू, सैतान!
हे आणि ह्यांच्या बुलेटप्रूफ खोल्या!” तपास कमिटीचा एक सदस्य रागांत बडबडला.
“त्या दुष्टांनी ह्यांना भयानक भीती दाखवलीय,”
त्या तपासनीसाने म्हटलं, जो इवानूश्काला भेटून आला होता.
वारेनूखाला जमेल तसं शांत केलं. त्याला वचन दिलं की इथेपण त्याची पूर्ण
सुरक्षा केली जाईल. तेव्हां कुठे पत्ता लागला की तो काही दारू-बीरू नव्हता प्यायला, तर त्याला दोन लोकांनी
मिळून मारलं होतं, ज्यांच्यापैकी
एकाचे केस लाल होते, दात बाहेर निघालेला होता आणि दुसरा जाडा...”
“आह, बोक्या
सारखा?”
“हो, हो, हो,” भीतीने अर्धमेला होत
त्याने इकडे-तिकडे बघून कुजबुजंत सांगितलं. एडमिनिस्ट्रेटरने सविस्तर सांगितलं की
त्याने फ्लैट नं. 50मधे रक्त-पिशाचाच्या रूपांत दोन दिवस कसे घालवले, आणि कसा तो फिन-डाइरेक्टर रीम्स्कीच्या मृत्यूचं कारण होता होता राहिला...
तेवढ्यांत रीम्स्कीला आत आणलं, ज्याला लेनिनग्रादहून ट्रेनने आणलं होतं. पण तो भीतीने थरथरंत असलेला, मानसिक रूपाने गडबडलेला
पांढ-या केसांचा म्हातारा, ज्याच्याकडे बघून आधीच्या रीम्स्कीला ओळखणं खूप कठीण होतं, काही केल्या खरं सांगायला
उत्सुक नव्हता, आणि
ह्याबाबतींत खूपंच हट्टी निघाला. रीम्स्कीने सांगितलं की त्याने आपल्या खोलीच्या
खिडकींत कोण्यताही हैला-बीलाला नाही पाहिलं आणि वारेनूखाला सुद्धां नाही बघितलं; त्याची फक्त तब्येत बिघडली
होती आणि ह्या स्मृति-विभ्रमामुळे तो लेनिनग्रादला चालला गेला होता. हे सांगण्याची
गरंज नाहीये, की
हे सांगितल्यावर फिन-डाइरेक्टरने विनंती केली की त्याला बुलेटप्रूफ खोलींत ठेवावं.
अन्नूश्काला तेव्हां पकडण्यांत आलं, जेव्हां ती अर्बातच्या एका डिपार्टमेन्टल स्टोरमधे कैशियरला दहा डॉलर्सची
नोट देत होती. अन्नूश्काची गोष्ट – सादोवाया बिल्डिंगच्या खिडकीतून उडून बाहेर
जाणा-या लोकांबद्दल आणि घोड्याच्या नालेबद्दल, जी अन्नूश्काच्या म्हणण्याप्रमाणे तिने अशासाठी उचलली होती की तिला पोलिसांत
जमा करतां येईल, खूप
लक्ष देऊन ऐकली.
“घोड्याची नाल, काय खरोखरंच सोन्याची होती आणि तिच्यावर हीरे जडलेले होते?” अन्नूश्काला विचारलं.
“जणु काही मला हीरे-बीरे ओळखतांच येत नाहींत!” अन्नूश्काने उत्तर दिलं.
“पण, जसं
तुम्हीं सांगितलंय, त्याने तुम्हांला दहा रूबल्सचे नोट दिले होते.”
“जणु काही मला दहा रूबल्सचे
नोट ओळखतां येत नाहीत!” अन्नूश्काने म्हटलं.
“पण ते डॉलर्समधे केव्हां बदलले?”
“मला काही माहीत नाही, कुठले डॉलर्स, कसले डॉलर्स, मी काही डॉलर्स-वॉलर्स नाही बघितले,”
अन्नूश्काने उत्तेजित होऊन म्हटलं, “आम्हीं आपल्या अधिकाराचा
उपयोग करंत होतो! आम्हांला बक्षीस दिलं गेलं, आम्ही कापड खरेदी करायला गेलो...” आणि तिने म्हटलं, की ती हाउसिंग सोसाइटीच्या
कोणत्याही कामासाठी जवाबदार नाहीये, जिने पाचव्या मजल्यावर सैतानांना पाळलंय, ज्याच्यामुळे जगणं कठीण होऊन बसलंय.
आता तपासकर्ताने पेनने खूण करंत तिला चूप राहायला सांगितलं, कारण की तिने सगळ्यांना
खूप हैराण करून सोडलं होतं. तिला हिरव्या कागदावर बिल्डिंगमधून बाहेर जाण्याचं
अनुमति-पत्र लिहून दिलं. तेव्हां सगळ्यांना आश्चर्यांत टाकंत अन्नूश्का त्या
बिल्डिंगमधून गायब झाली.
ह्याच्यानंतर ब-यांच लोकांची एक रांगंच आली, ज्यांत निकोलाय इवानोविचपण होता, जो आपल्या ईर्ष्यालू बायकोच्या मूर्खतेमुळे पकडला गेला होता, जिने सकाळी पोलिसांत
रिपोर्ट दिली होती, की तिचा नवरा गायब झालांय. निकोलाय इवानोविचच्या उत्तराने कमिटीला काहीच
आश्चर्य नाही झालं, जेव्हां त्याने सैतानाच्या नृत्योत्सवांत घालवलेल्या रात्रीबद्दल एक विचित्र
सर्टिफिकेट प्रस्तुत केलं. आपल्या गोष्टींमधे, की तो कसा हवेंत उडंत आपल्या पाठीवर मार्गारीटा निकोलायेव्नाच्या नग्न
मोलकरणीला माहीत नाही कुठे, सगळ्या सैतानांबरोबर अंघोळ करायला नदीवर घेऊन गेला, आणि ह्याच्या आधी त्याने
कसं मार्गारीटा निकोलायेव्नाला नग्नावस्थेंत खिडकींत बसलेलं पाहिलं होतं –
निकोलायेविच सत्यापासून किंचित दूर झाला होता. उदाहरणार्थ त्याला हे सांगणं आवश्यक
नाही वाटलं, की
तो फेकलेला गाउन उचलून शयनकक्षांत गेला होता आणि त्याने नताशाला ‘वीनस’ची उपमा दिली होती.
त्याच्या शब्दांतून हा निष्कर्ष निघंत होता, की नताशा खिडकीच्या बाहेर उडाली, त्याच्यावर स्वार झाली आणि त्याला मॉस्कोच्या बाहेर घेऊन गेली.
“बल प्रयोगाच्या शक्यतेला घाबरून मला तिच्या हुकुमाचं पालन करावंच लागलं,” निकोलाय इवानोविच सांगत
होता. त्याने आपली व्यथा-कथा ह्या विनंतीने पूर्ण केली, की त्याच्या बायकोला ह्याबद्दल काहीही सांगण्यांत येऊं नये.
निकोलाय इवानोविचच्या तपशीलाने हे सिद्धं करणं शक्य झालं, की मार्गारीटा
निकोलायेव्ना आणि तिची मोलकरीण काहीही मागमूस न सोडतां गायब झाल्या आहेत. त्यांना
शोधण्याचे उपाय करण्यांत आले.
अशा प्रकारे, क्षणभरही न थांबता चालंत असलेल्या ह्या तपासांतंच शनिवारची सकाळ उजाडली...
शहरांत ह्या दरम्यान अनेक अविश्वसनीय अफवा जन्म घेत राहिल्या, पसरंत राहिल्या, ज्यांत रत्तीभर सत्याला
मणभर असत्याने सजवलं होतं. असं म्हणंत होते की वेराइटीत ‘शो’ झाला होता ज्याच्या नंतर सगळेच
दोन हजार दर्शक नग्नावस्थेंत उड्या मारंत रस्त्यावर आले होते, की बनावट नोट छापणा-या
प्रेसचा सादोवायावर पत्ता लागला आहे, की एका टोळीने मनोरंजन विभागाच्या पाच अधिका-यांचं अपहरण केलंय पण पोलिसांनी
त्यांना शोधून काढलंय, आणि…आणखीही
बरंच काही, ज्याची
पुनरावृत्ती करण्यांत काही अर्थ नाही.
तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली, आणि तेव्हां, तिथे, जिथे
तपास चालू होता, टेलिफोनची
घण्टी वाजू लागली. सादोवायावरून माहिती आली, की तो शापित फ्लैट पुन्हां जीवनाचे लक्षण दाखवतोय. असं सांगण्यांत आलं, की त्याच्या खिडक्या आतून
उघडल्या गेल्या, त्यातून
पियानो वाजायचा आणि गाण्याचा आवाज आला, आणि खिडकीच्या चौकटीवर ऊन शेकंत असलेला काळा बोका दिसला.
जवळ-जवळ चार वाजता, उन्हाळ्याच्या त्या दुपारी, सरकारी युनिफॉर्ममधे एक मोट्ठी टोळी तीन गाड्यांमधून सादोवायाच्या बिल्डिंग
नं. 302-बीच्या जवळ उतरली. ही टोळी दोन छोट्या-छोट्या टोळ्यांमधे विभक्त झाली, एक टोळी गल्लीच्या
वळणावरून कम्पाउण्डमधून सहा नंबरच्या प्रवेश द्वारांत घुसली; आणि दुसरीने साधारणपणे बंद
राहणारं छोटं दार उघडलं, जे चोर दरवाज्याकडे जात होतं. ह्या दोन्हीं टोळ्या वेगळ्या-वेगळ्या
जिन्यांनी फ्लैट नं. 50 कडे आल्या.
ह्यावेळेस करोव्येव आणि अजाज़ेलो – करोव्येव उत्सवांतल्या काळ्या फ्रॉककोटमधे
नसून आपल्या नेहमीच्या पोषाकांत होता
– डाइनिंग हॉलमधे टेबलावर ब्रेकफास्ट घेत होते. वोलान्द आपल्या सवयीप्रमाणे, शयनगृहांत होता, आणि बोका कुठे होता, ते आम्हांला माहीत नाही, पण किचनमधून येत असलेल्या
भांड्यांच्या खडखडाटाने अंदाज लावता येत होता, की बेगेमोत तिथेच आहे, काही तरी खोड्या करंत, आपल्या सवयीप्रमाणे.
“पाय-यांवर हा पावलांचा कसला आवाज आहे?”
करोव्येवने ब्लैक कॉफीच्या प्याल्यांत पडलेल्या
चमच्याशी खेळंत विचारलं.
“हे आपल्याला पकडायला येताहेत,” अजाज़ेलोने उत्तर दिलं आणि कोन्याकचा एक पैग पिउन गेला.
“आ...बरं, बरं,” करोव्येवने उत्तरादाखल
म्हटलं.
आता पर्यंत पाय-या चढणारे तिस-या मजल्यावर पोहोचले होते. तिथे पाण्याचा नळ
दुरुस्त करणारे दोन प्लम्बर्स बिल्डिंग गरम करणारा पाइप दुरुस्त करंत होते.
येणा-यांने अर्थपूर्ण नजरेने प्लम्बर्सकडे पाहिलं.
“सगळे घरींच आहे,” त्यांच्यापैकी एक प्लम्बर म्हणाला, आणि हातोड्याने पाइपवर खट्खट् करंत राहिला.
तेव्हां येणा-यांपैकी एकाने आपल्या कोटाच्या खिश्यातूंन काळा रिवॉल्वर काढला
आणि दुस-याने, जो
त्याच्या जवळंच होता, काढली - ‘मास्टर
की’. फ्लैट नं. 50मधे प्रवेश करणा-यांजवळ आवश्यक असलेले हत्यार होते.
त्यांच्यापैकी दोघांच्या खिशांत होत्या सहजपणे उघडणा-या पातळ, रेशमी जाळ्या होत्या, आणि एकाकडे होता – फास
असलेला दोरखण्ड, आणखी
एकाने घेतला होता – मास्क आणि क्लोरोफॉर्मच्या छोट्या-छोट्या कुप्या.
एका सेकन्दातंच फ्लैट नं. 50चं दार उघडलं आणि आलेले सगळे लोक प्रवेश कक्षांत
घुसले. किचनच्या धडाम् करंत बंद झालेल्या दाराने हे सिद्ध केलं, की दुसरी टोळी पण अगदी
त्याच वेळेस चोर-दरवाज्याने किचनमधे घुसली आहे.
ह्यावेळेस शंभर टक्के नाही, तरी थोडी फार सफलता मिळाली. हे लोक लगेच सगळ्या खोल्यांमधे पसरले, आणि त्यांना कुठेही कोणीच
नाही सापडलं, पण
डाइनिंग हॉलमधे आत्ताच अर्धवट सोडलेल्या ब्रेकफास्टच्या खुणा दिसल्या; आणि ड्राइंगरूममधे
फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर क्रिस्टलच्या सुरईच्या शेजारी एक भव्य काळा बोका
बसलेला दिसला. त्याने आपल्या पंजांमधे स्टोव पकडलेला होता.
अगदी शांत राहून, बराच वेळ, आलेले
लोक लक्ष देऊन ह्या बोक्याकडे बघंत राहिले.
“हो...हो...खरंच कमालीची वस्तू आहे,”
आगंतुकांपैकी एक कुजबुजला.
“मी गडबड करंत नाहीये, कोणालाही हातपण लावंत नाहीये, फक्त स्टोव्ह दुरुस्त करतोय,” बोक्याने तोंड वेंगाडंत म्हटलं, “आणि हे सांगण माझ कर्तव्य आहे, की बोका फार प्राचीन आणि परम पवित्र प्राणी आहे.”
“एकदम उत्कृष्ट काम आहे,” आगंतुकांपैकी एक कुजबुजला आणि दुसरा जो-याने आणि स्पष्टपणे म्हणाला, “तर, परम पवित्र गारुडवाणी (पोटबोला
– तोंड न हलवता बोलणारा – अनु.) बोके
साहेब, कृपा
करून इकडे या.”
रेशमी जाळी उघडली, ती बोक्याकडे उसळणारंच होती, की फेकणारा, सगळ्यांना
विस्मित करंत अडखळला आणि फक्त सुरईच धरू शकला, जी छन् करंत तिथेच फुटली.
“हरले,” बोका गरजला, “हुर्रे!” आणि त्याने स्टोव्ह सरकावून पाठीमागून पिस्तौल काढली. त्याने लगेच
जवळ उभ्या असलेल्या आगंतुकावर पिस्तौल ताणली, पण बोक्याच्या पिस्तौल चालवण्यापूर्वीच त्याच्या हातांत जणु वीज चमकली आणि
पिस्तौल चालतांच बोकापण उल्टा होऊन फायरप्लेसच्या स्लैबवरून खाली पडूं लागला, त्याच्या हातांतून पिस्तौल
सुटून दूर जाऊन पडली आणि स्टोव्हपण दूर जाऊन पडला.
“सगळं संपलं,” क्षीण आवाजांत बोका म्हणाला आणि धप्पकन् रक्ताच्या थारोळ्यांत पडला, “एका सेकंदसाठी माझ्यापासून
दूर व्हा, मला
धरणीमातेचा निरोप घेऊं द्या. आह, माझ्या मित्रा, अजाज़ेलो!” बोका कण्हला, “तू कुठे आहेस?” बोक्याने निस्तेज होत चाललेल्या डोळ्यांनी ड्राइंगरूमच्या दाराकडे बघितलं, “तू माझ्या मदतीला नाही आला, ह्या असमान युद्धांत तू मला एकटं सोडून दिलंस. तू गरीब बेगेमोतला सोडून
दिलं, एका
प्याल्यासाठी सोडून दिलं – खरंच, कोन्याकच्या एका सुरेख प्याल्यासाठी! चला, जाऊं द्या, माझी
मृत्यु तुला शांति नाही लाभू देणार; तुझ्या आत्म्यावर ओझ्यासारखी राहील; मी आपली पिस्तौल तुझ्यासाठी सोडून जातोय...”
“जाली, जाळी, जाळी,” बोक्याच्या चारीकडे कुजबुज
ऐकूं येत होती. पण जाळी, सैतानंच जाणे कां, कोणच्यातरी खिशांत अडकून गेली होती आणि बाहेरंच नाही निघाली.
“एकचं वस्तू, जी एका गंभीरपणे घायाळ झालेल्या बोक्याला वाचवूं शकते,” बोका म्हणाला, “ती म्हणजे बेंज़ीनचा एक
घोट...” आणि आजूबाजूला होत असलेल्या गडबडीचा फायदा घेत तो स्टोव्हच्या गोल
झाकणाकडे सरकून तेल पिऊन गेला. तेव्हां समोरच्या डाव्या पंजाच्या खालून निघंत
असलेला रक्ताचा फवारा बंद झाला. बोक्याच्या जीवांत जीव आला, त्याने बेधडक स्टोव्ह
बगलेंत दाबला, पुन्हां
उडी मारून फायरप्लेसच्या वरच्या स्लैबवर बसून गेला. तिथून भिंतीवर लावलेला वॉलपेपर
फाडंत वर रांगून गेला आणि दोनंच सेकंदांत आगंतुकांपासून खूप वर चढून लोखण्डाच्या
कार्निसवर बसून गेला.
क्षणभरांतच त्याचे हात पडद्याला बिलगले आणि कार्निसबरोबर त्याला पण फाडंत
गेले, ज्यामुळे
खोलींत सूर्य घुसून आला, पण ना तर चलाखीने बरा झालेला बोका, ना ही स्टोव्ह खाली पडले. स्टोव्हला न सोडतां बोक्याने हवेंत हात हालवला आणि
उडी मारून झुम्बरावर बसला, जे खोलीच्या मधोमध लटकंत होतं.
“शिडी!” खालून लोक ओरडले.
“मी द्वन्द-युद्धां साठी बोलावतोय!” झुम्बरावर बसून झोके घेत खाली उभ्या
असलेल्या लोकांवर बोका गरजला, आणि त्याच्या हातांत पुन्हां पिस्तौल दिसली. स्टोव्हला त्याने झुम्बराच्या
फांद्यांमधे अडकवलं होतं. बोक्याने घड्याळाच्या पेंडुलमसारखे झोके घेत खाली उभ्या
असलेल्या लोकांवर गोळ्यांचा अंधाधुंध वर्षाव सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने फ्लैट
हादरला. झुम्बरांतून पडलेले काचेचे तुकडे फरशीवर विखुरले, फायरप्लेसच्या वरती
लावलेला आरसा ता-यांच्या आकारांत चटकला. प्लास्टरची धूळ उडूं लागली. रिकामे कारतूस
फरशीवर उडू लागले, खिडक्यांचे
काच फुटून खाली पडले, लटकंत असलेल्या स्टोव्हमधून तेल खाली पडू लागलं. आता बोक्याला जिवन्त
पकडण्याचा प्रश्नंच नव्हता, आणि आगंतुकांनी रागाने आपल्या पिस्तुलांनी नेम धरंत त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर आणि पाठीवर दनादन
गोळ्यांचा वर्षाव केला. ह्या गोळीबारीने बिल्डिंगच्या बाहेरच्या कम्पाउण्डमधे दहशत
पसरली.
पण ही गोळीबारी जास्त वेळ नाही चालू शकली आणि आपणहून कमी झाली. कारण हे होतं, की ह्याने ना तर बोका, ना ही कोणी आगंतुक जखमी
झाला. बोक्यासमेत कोणालांच काहीही इजा नाही झाली. ह्याची पुष्टी करण्यासाठी
आगंतुकांपैकी एकाने ह्या धृष्ठ जानवरावर लागोपाठ पाच गोळ्या चालवल्या आणि ह्याच्या
उत्तरांत बोक्यानेपण गोळ्यांची झडीच लावली, आणि पुन्हां तेच – कोणावरही जरासासुद्धां असर नाही झाला. बोका झुम्बरावर
झोके घेत राहिला, ज्याचा
आयाम हळू-हळू कमी होत गेला. माहीत नाही कां, पिस्तौलच्या मुठीवर फूक मारंत तो घडी-घडी आपल्या पंजावर थुंकत होता. खाली
उभ्या असलेल्या लोकांच्या चेह-यांवर न जाणे कां अविश्वासाचा भाव पसरला. ही एक
अद्भुत, अभूतपूर्व
घटना होती, जेव्हां
गोळीबारीचा कोणावरही, काहीही असर नव्हता झाला. असं वाटू शकतं की बोक्याची पिस्तौल खेळणं होती, पण आगंतुकांच्या
पिस्तुलींबद्दल असं म्हणता येत नव्हतं. पहिलीच जखम, जी बोक्याला झाली होती, तीसुद्धां एक नाटकंच होती, ह्यांत काही शंका नाही, की ती लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचा फक्त बहाना होती; अगदी तसाच, जसं बेंज़ीन पिणं.
बोक्याला पकडण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यांत आला. फास असलेला दोरखण्ड फेकला
गेला, जो
एका मेणबत्तीत अडकला, झुम्बर खाली पडलं. त्याच्या झणझणाटाने सम्पूर्ण बिल्डिंग हादरली, पण ह्याने काही फायदा झाला
नाही. तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर काचेच्या तुकड्यांचा वर्षाव झाला, आणि बोका हवेंत उडून
फायरप्लेसच्या वरती लावलेल्या आरश्याच्या सोनेरी फ्रेमच्या वरच्या भागावर जाऊन
बसला. तो कुठेच जायला तयार नव्हता आणि उलंट आरामांत बसून आणखी एक भाषण देऊं लागला
: “मला कळंत नाहीये...” तो वरून बोलला, “की माझ्याबरोबर होत असलेल्या ह्या खतरनाक व्यवहाराचं कारण काय आहे?”
तेवढ्यांत भाषणाच्या मधे टपकला एक जाड, खालच्या सुरातला आवाज, “फ्लैटमधे हे काय चाललंय? मला त्रास होतोय.”
आणखी एक अप्रिय, कर्कश आवाज म्हणाला, “नक्कीच हा बेगेमोत आहे, सैतान त्याला घेऊन जावो!”
तिसरा गडगडीत आवाज बोलला, “महाशय! शनिवारचा सूर्य अस्त होतोय. आपली जाण्याची वेळ झालीये.”
“माफ़ करा, मी
तुमच्याशी आणखी नाही बोलूं शकणार,” बोका आरशाच्या वरून म्हणाला, “आम्हांला जायचंय.” त्याने आपली पिस्तौल फेकून खिडकीचे दोन्ही काच फोडून
टाकले. मग त्याने तेल खाली सांडलं, आणि हे तेल आपणहून भडकलं. त्याच्या लपटा छतापर्यंत जाऊ लागल्या.
सगळं काही अत्यंत विचित्रपणाने जळंत होतं, अत्यंत शीघ्रतेने आणि सम्पूर्ण ताकदीनिशी, जसं कधी तेलाबरोबर होत नसतं. बघतां-बघतां वॉल पेपर जळून गेला, फाटलेला पडदा जळून गेला जो
फरशीवर पडला होता आणि तुटलेल्या खिडक्यांच्या चौकटी वितळूं लागल्या. बोका उड्या
मारंत होता, म्याँऊ-म्याँऊ
करंत होता. मग
तो आरशावरून उडी मारून खिडकीच्या चौकटीवर गेला आणि आपल्या स्टोव्हसकट तिच्यामागे
लपून गेला. बाहेरून गोळ्यांचे आवाज घुमूं लागले. समोरून, जवाहि-याच्या बायकोच्या
फ्लैटच्या ठीक समोरून, लोखण्डाच्या शिडीवर बसलेल्या माणसाने बोक्यावर गोळ्या झाडल्या, जेव्हां तो एका खिडकी वरून
दुसरी खिडकी पार करंत बिल्डिंगच्या पाण्याच्या पाइपकडे जात होता, ह्या पाइपने बोका छतावर
पोहोचला.
इथेपण त्याच्यावर पाइप्सजवळ असलेल्या निगराणी दलाने तसाच, बिनपरिणामाचा गोळीबार केला
आणि बोका शहराला न्हाऊ घालणा-या अस्त होत असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत चिंब
झाला.
आतापर्यंत फ्लैटच्या आत असलेल्या लोकांच्या पायाखालची फरशी धू-धू करंत जळूं
लागली होती, आणि
तिथे, जिथे
खोट्या जखमेने आहत होऊन बोका पडला होता, आता शीघ्रतेने आकुंचित होत असलेलं भूतपूर्व सामत मायकेलचं प्रेत दिसंत होतं, थिजलेले डोळे आणि वर
खेचलेल्या हनुवटीसकट. त्याला खेचून बाहेर काढणं आता अशक्य होतं. फरशीच्या जळत्या
स्लैब्सवर उड्या मारंत, हातांनी धुराने वेढलेले खांदे आणि छातीवर थपथप करंत, ड्राइंगरूममधे असलेले लोक
आता स्टडीरूम आणि प्रवेशकक्षाकडे धावले. ते, जे शयनकक्ष आणि डाइनिंगरूममधे होते, ते कॉरीडोरमकडे पळाले. तेसुद्धां धावले जे किचनमधे होते. सगळे प्रवेशकक्षाकडे
धावले. ड्राइंगरूम पूर्णपणे धुराने भरून गेला होता. धावतां-धावतां कोणीतरी
अग्निशामक दलाचा नंबर फिरवून दिला आणि म्हणाला:
“सादोवाया स्ट्रीट, तीनशे दोन बी!”
आणखी थांबणं शक्य नव्हतं. ज्वाळा प्रवेशकक्षापर्यंत येऊं लागल्या. श्वास घेणं कठीण झालं होतं.
जसंच त्या जादुई फ्लैटच्या खिडक्यांमधून धुराचं पहिलं वादळ निघालं, अंगणांत लोकांच्या
घाबरलेल्या किंकाळ्या ऐकूं आल्या:
“आग, आग, जळतोय!”
बिल्डिंगच्या इतर फ्लैट्समधून लोक टेलिफोन्सवर ओरडंत होते, “सादोवाया, सादोवाया, तीनशे दोन-बी!”
त्या वेळेस जेव्हां शहराच्या सगळ्या भागांत लाम्ब-लाम्ब लाल गाड्यांच्या
घाबरवणा-या घंट्या ऐकूं येऊ लागल्या, अंगणांत थांबलेल्या लोकांनी बघितलं, की धुराबरोबर पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पुरुषाची आकृति असलेल्या तीन
सावल्या तरंगंत बाहेर आल्या, त्यांच्याबरोबर एक सावली नग्न महिलेच्या आकृतीचीपण होती.
************
अट्ठावीस
करोव्येव आणि
बेगेमोतचं शेवटचं साहस
त्या सावल्या होत्या, की सादोवाया
बिल्डिंगच्या भीतीने अर्धमेल्या लोकांना फक्त भास झाला होता, हे सांगणं कठीण आहे.
जर त्या खरंच सावल्या होत्या, तर त्या कुठे गेल्या, हे कोणालाच माहीत नाही. त्या
कुठे वेगळ्या झाल्या, आम्हीं सांगू शकंत नाही, पण आम्हांला येवढं माहीत आहे, की सादोवायावर आग
लागल्यानंतर जवळ-जवळ पंधरा मिनिटांनी स्मोलेन्स्क मार्केटच्या ‘तोर्गसीन’1 नावाच्या स्टोअरच्या
काचेच्या दारासमोर एक चौकटीचा लम्बू प्रकट झाला, ज्याच्याबरोबर एक लट्ठ काळा
बोका होता.
येणा-या जाणा-यांच्या गर्दीत
सहजपणे मिसळून त्या नागरिकाने स्टोअरचा बाहेरचा दरवाजा मोठ्या शिताफीने उघडला. पण
तिथे असलेला छोटासा, लुकडा आणि अत्यंत तुसडा दरबान त्याचा रस्ता अडवंत चिडखोरपणाने
म्हणाला,
“मांजरींबरोबर
आत जायची परवानगी नाहीये.”
“माफ करा,” लम्बूने खडबड्या
आवाजांत म्हटलं आणि त्याने वाकडे-तिकडे बोटं असलेला हात अश्याप्रकारे कानावर ठेवला, जणु त्याला कमी ऐकूं
येतं,
“मांजरींबरोबर, हेच म्हटलं न
तुम्हीं?
पण
मांजर आहे कुठे?”
दरबानाचे डोळे विस्फारले, हे स्वाभाविकंच होतं
: कारण की नागरिकाच्या पायांजवळ काही मांजर-बिंजर नव्हतं, तर त्याच्या मागून फाटकी
टोपी घातलेला एक जाड्या निघून स्टोअरमधे घुसून गेला, ज्याचं थोबाडं मांजरीसारखं
होतं. जाड्याच्या हातांत एक स्टोव होता. मानव द्वेषी दरबानाला, न जाणे कां, ही जोडी आवडली नाही.
“आमच्याकडे फक्त परकीय
मुद्राचं चालते,”
तो
खुरखु-या,
अस्तव्यस्त, वाळवी
लागल्यासारख्या,
पिकलेल्या
भिवयांखालून डोळे दाखवंत म्हणाला.
“माझ्या लाडक्या,” लम्बूने तुटलेल्या चष्म्याच्या
आंतून डोळे मिचकावंत गडगडंत म्हटलं, “तुम्हांला कसं माहीत, की आमच्याकडे परकीय मुद्रा
नाहीये?
तुम्हीं
कपड्यांकडे बघून म्हणतांय का? असं कधीही करू नको, माझ्या लाडक्या दरबाना!
तुम्हीं चूक कराल, फार मोठी चूक! जरा ख़लीफा हारून-अल-रशीदची2 गोष्ट
पुन्हां वाचा,
पण
आत्ता,
ह्या वेळेस, ती गोष्ट बाजूला ठेवून, मला तुम्हांला हे
सांगायचंय,
की मी
तुमची कम्प्लेन्ट करीन आणि तुमच्याबद्दल अश्या-अश्या गोष्टी सांगेन, की तुम्हांला ह्या
चकचकीत दारांच्यामागची आपली नौकरी सोडावी लागेल.”
“माझ्याकडे, कदाचित, पूर्ण स्टोवभरून
परकीय मुद्रा असेल,” बोक्या सारखा जाड्यापण तावातावाने संभाषणांत सामील झाला.
त्यांच्या मागे आत घुसण्यासाठी लोकं धक्का-मुक्की करूं लागले होते आणि उशीर होत
असलेला पाहून हल्ला करंत होते. तिरस्कार आणि संदेहाने ह्या रानटी जोडीकडे बघंत
दरबान बाजूला झाला आणि आपले परिचित, करोव्येव आणि बेगेमोत, स्टोअरमधे घुसले.
सगळ्यांत आधी त्यांनी
चारीकडे बघितलं आणि खणखणीत आवाजांत, जी पूर्ण दुकानांत घुमली, करोव्येव म्हणाला, “खूप चांगलं स्टोअर
आहे! खूप,
खूप
छान स्टोअर!”
लोक काउन्टरवरून वळले आणि माहीत
नाही कां,
विस्मयाने
त्या बोलणा-याकडे बघू लागले, खरं म्हणजे त्याच्याजवळ स्टोअरची तारीफ करण्याचे अनेक
कारणं होते.
बंद शेल्फ्समधे रंगीबेरंगी
फुलांचे,
महागडे, कापडाचे शैकडों थान
ठेवलेले होते. त्यांच्या मागे शिफॉन, जॉर्जेट डोकावंत होते; सूटिंग मटीरियलपण होतं.
मागच्या भागांत जोड्यांचे डब्बे रचलेले होते, आणि अनेक महिला
छोट्या-छोट्या खुर्च्यांवर बसून उजव्या पायांत जुना, फाटका जोडा घालून आणि डाव्या
पायांत नवा,
चकचकीत
जोडा चढवून गालिच्यावर धम्-धम् करंत होत्या. दूर, कुठेतरी आंत, पियानोचा, गाण्याचा आवाज येत
होता.
पण ह्या सगळ्या मनमोहक
डिपार्टमेन्ट्सला पार करंत करोव्येव आणि बेगेमोत कन्फेक्शनरी आणि किराणामालाच्या
डिपार्टमेन्ट्सच्या सीमारेषेवर पोहोचले. इथे खूप मोकळी जागा होती. इथे रुमाल
बांधून,
एप्रन
घातलेल्या महिला काउन्टर्समागे नव्हत्या, जश्या त्या कपड्यांच्या डिपार्टमेन्टमधे
होत्या.
एक ठेंगणा, एकदम आयताकार माणूस, चिकणी दाढी असलेला, शिंगांचा चष्मा
लावून,
नवीन
हैट घालून,
जी
बिल्कुल चुरगळलेली नव्हती, आणि जिच्यावर घामाचे डाग नव्हते, फिकट जांभळा सूट आणि
मुलांचे लाल हातमोजे घालून, शेल्फच्या जवळ उभा होता आणि काहीतरी हुकुम देत होता.
पांढरा एप्रन आणि निळी टोपी घातलेला सेल्समैन ह्या फिक्कट जांभळ्या सूटवाल्याच्या
सेवेंत हजर होता. एका धारदार चाकूने, जो लेवी मैथ्यूने चोरलेल्या चाकूसारखा होता, तो रडक्या गुलाबी
सेल्मन (रावस) मास्याची सापासारखी झिलमिल करणारी कातडी काढत होता.
“हे डिपार्टमेन्टसुद्धां
शानदार आहे,”
करोव्येवने
गंभीरतेने म्हटलं, “आणि हा परदेशीपण सुरेख आहे,” त्याने सहृदयतेने त्या
जांभळ्या पाठीकडे बोट दाखवंत म्हटलं.
“नाही, फागोत, नाही,” बेगेमोतने विचार
करण्याच्या मुद्रेत म्हटलं, “तू, माझ्या मित्रा, चूक आहे...माझ्या मते ह्या
जांभळ्या सज्जनाच्या चेह-यावर एखाद्या गोष्टीची कमतरता आहे!”
जांभळी पाठ थरथरली, पण, कदाचित, संयोगवश, नाही तर परदेशी तर
करोव्येव आणि बेगेमोतचा रशियनमधे होणारा संवाद समजू शकंत नव्हता.
“छांगली आहे?” जांभळ्या ग्राहकाने
कठोरतेने विचारलं.
“विश्व प्रसिद्ध,” विक्रेत्याने
मास्याच्या चामडीत चाकू गडवंत म्हटलं.
“छांगली – पसन्त ; वाईट – नाही,” परदेशी गंभीरतेने
म्हणाला.
“काय म्हणता!” सेल्समैन
उत्तेजनेने खिदळला.
आता आपले परिचित परदेशी आणि
त्याच्या सेल्मनपासून थोडं दूर, कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टच्या काउन्टरजवळ सरकले.
“खूप गरम आहे आज,” करोव्येवने लाल-लाल
गालवाल्या तरुण सेल्सगर्लला म्हटलं आणि ह्यावर काहीही उत्तर न मिळाल्यावर त्याने
तिला विचारलं,
“ह्या
संत्र्याची काय किंमत आहे?”
“तीस कोपेकचे एक किलो,” सेल्सगर्लने उत्तर
दिलं.
“प्रत्येक वस्तू इतकी महाग
आहे,”
उसासा
भरंत करोव्येवने शेरा मारला, “आह, ओह, ऐख़,” त्याने थोडा वेळ विचार केला आणि आपल्या मित्राला
म्हणाला,
“बेगेमोत, खा!”
जाड्याने आपला स्टोव बगलेंत
दाबला,
सगळ्यांत
वरचं संत्रं तोंडांत टाकलं आणि खाऊन गेला, मग त्याने दुस-याकडे हात
वाढवला.
सेल्सगर्लच्या चेह-यावर
भीतीची लाट पसरली.
“तुम्हीं वेडे झालांयत कां?” ती ओरडली, तिच्या चेह-याची
लाली गायब झाली होती, “रसीद दाखवा! रसीद!” आणि तिच्या हातून कन्फेक्शनरीचा चिमटा खाली
पडला.
“लाडके, प्रिये, सुन्दरी,” करोव्येव काउन्टरवर
वाकून सेल्सगर्लला डोळा मारंत भसाड्या आवाजांत म्हणाला, “आज आमच्याकडे परकीय मुद्रा
नाहीये...पण करणार काय? पण मी वचन देतो, की पुढच्या वेळेस, सोमवारच्या आधींच
सगळं नगद चुकवून देईन. आम्हीं इथे, जवळंच राहातो, सादोवायावर, जिथे आग लागलीये.”
बेगेमोतने तिसरं संत्रं
संपवलं,
आणि
आता तो छानपणे रचलेल्या चॉकलेटबार्सच्या टॉवरमधे आपला पंजा घुसवंत होता; त्याने सगळ्यांत
खाली असलेला चॉकलेट बार बाहेर काढला, ज्याने सगळे चॉकलेटबार्स खाली पडले; त्याने आपला चॉकलेट
बार सोनेरी वेष्टनासकट गिळून टाकला.
फिश-काउन्टरचे सेल्समैन जणु
दगडाचे झाले,
त्यांच्या
हातातले चाकू तसेंच राहिले; जांभळ्या ह्या दरोडेखोरांकडे वळला, तेवढ्यांत सगळ्यांनी
बघितलं,
की
बेगेमोतने चूक सांगितलं होतं : जांभळ्याच्या तोंडावर एखाद्या वस्तूची कमतरता नसून
एक फालतूची वस्तू होती – लटकंत असलेले गाल आणि गर-गर फिरणारे डोळे.
पूर्णपणे फिक्कट झालेली
सेल्सगर्ल घाबरून जो-याने ओरडली:
“पालोसिच3! पालोसिच!”
ही किंकाळी ऐकून कपड्यांच्या
डिपार्टमेन्टमधून ग्राहक धावंत आले, पण बेगेमोत कन्फेक्शनरी डिपार्टमेन्ट पासून सरकून
आपला पंजा त्या ड्रममधे घुसवंत होता ज्याच्यावर लिहिलं होतं, “स्पेशल केर्च हैरिंग4’, त्याने मीठ
लावलेल्या दोन हैरिंग्स खेचून बाहेर काढल्या आणि गिळून गेला, शेपट्या थुंकून
दिल्या.
“पालोसिच!” ही घाबरलेली
किंकाळी कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टमधून पुन्हां ऐकू आली, आणि फिश-डिपार्टमेन्टचा
बक-यासारखी दाढी असलेला सेल्समैन गुरगुरला, “तू काय करतोयस, दुष्टा?!”
पावेल योसिफोविच लगेच
तीरासारखा घटनास्थळावर धावला. हा त्या स्टोअरचा प्रमुख होता – पांढरा, चक्क एप्रन घातलेला, जसे सर्जन लोक
घालतात,
त्याच्या
खिशांतून पेन्सिल डोकावंत होती. पावेल योसिफोविच, स्पष्टपणे, एक अनुभवी व्यक्ती
होता. बेगेमोतच्या तोंडांत तिस-या हैरिंगची शेपूट बघून त्याने लगेच परिस्थितीचा
आढावा घेतला,
सगळं
समजून घेतलं,
आणि
त्या बदमाशांवर ओरडण्याऐवजी त्याने दूर कुठेतरी बघून हाताने खूण केली आणि आज्ञा
दिली:
“शिट्टी वाजवं!”
स्मोलेन्स्कच्या कोप-यावर
काचेच्या दरवाजातूंन दरबान बाहेर धावला आणि भयंकर शिट्टी वाजवूं लागला. लोक ह्या
बदमाशांच्या चारीकडे गोळा व्हायला लागले, आणि तेव्हां करोव्येवने सूत्र आपल्या हातात
घेतले.
“नागरिक हो!” बारीक, थरथरत्या आवाजांत तो
ओरडला,
“हे
काय चाललंय?
आँ? तुम्हांला ह्याबद्दल
विचारायची परवानगी द्या! गरीब बिचारा माणूस,” करोव्येवने आपल्या आवाजांत
आणखी जास्त कम्पन उत्पन्न करंत म्हटलं आणि बेगेमोतकडे खूण केली, ज्याने लगेच आपली
मुद्रा दयनीय करून घेतली होती, “गरीब माणूस, दिवसभर स्टोव दुरुस्त करंतो; तो उपाशी
होता...त्याच्याकडे परकीय मुद्रा कुठून येणार?”
ह्यावर साधारणपणे शांत आणि
संयत राहणा-या पावेल योसिफोविचने गंभीरतेने ओरडंत म्हटलं:
“तू हे सगळं बंद कर!”
आणि त्याने पुन्हां दूर कुठेतरी खूण केली, अधीरतेने. तेव्हां
दरवाज्याच्या जवळ शिट्ट्या आणखी जोराने वाजूं लागल्या.
पण पावेल योसिफोविचच्या
व्यवहाराने क्षुब्ध न होता करोव्येव बोलंत राहिला, “कुठून? मी तुम्हांला
विचारतोय! तो भुकेने, तहानेने बेहाल आहे! त्याला गर्मी होतेय. ह्या होरपळंत असलेल्या
माणसाने स्वाद घेण्यासाठी एक संत्रं तोंडांत टाकलं. त्याची किंमत आहे फक्त तीन
कोपेक. आणि हे शिट्ट्या वाजवतायंत, जशा वसन्त ऋतूंत जंगलांत कोकिळा कू-कू करतांत; पोलिसवाल्यांना
त्रास देताहेत,
त्यांना
आपलं काम नाही करू देत आहेत. आणि तो खाऊं शकतो? आँ?” आता करोव्येवने जांभळ्या
जाड्याकडे खूण केली, ज्याने त्याच्या चेह-यावर प्रचण्ड घाबरल्याचा भाव पसरला, “तो आहे कोण? आँ? कुठून आलाय? कशाला? काय त्याच्याशिवाय
आम्हांला कंटाळवाणं वाटंत होतं? काय आम्ही त्याला बोलावलं होतं? निश्चितंच,” उपहासाने तोंड वाकडं
करंत तो सम्पूर्ण ताकदीने ओरडला, “तो, बघताय नं, शानदार जांभळ्या सूटांत, त्याचे खिसे परकीय
मुद्रेने गच्च भरलेयंत. आणि आमच्या साठी...आमच्या नागरिकासाठी! मला दुःख होतंय! दुःख! दुःख!5”
करोव्येव विलाप करूं लागला, जसं प्राचीन काळांत लग्नांत बेस्ट-मैन करायचा.
ह्या मूर्खपणाच्या, असंबद्ध, पण राजनीतिक
दृष्टीने धोकादायक भाषणामुळे पावेल योसिफोविचला शेवटी राग आलांच, तो थरथरू लागला, पण जरी हे खूप
विचित्र वाटंत होतं, तरी चारीकडे जमलेल्या लोकांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसंत होतं, की लोकांना
त्याच्याबद्दल सहानुभूती वाटूं लागलीये! आणि जेव्हां बेगेमोत आपल्या कोटाची
फाटलेली,
घाणेरडी
बाही डोळ्यांवर ठेवून दुःखाने म्हणाला, “धन्यवाद, माझ्या चांगल्या मित्रा. तू
एका पीडित माणसाच्या मदतीला तर पुढे आलांस!” तेव्हाँ आणखी एक चमत्कार झाला. एक
अत्यंत सज्जन,
शांत
म्हातारा,
ज्याने
गरीबांसारखे,
पण
स्वच्छ कपडे घातले होते, ज्याने कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टमधून तीन पेस्ट्रीज़
विकंत घेतल्या होत्या, एकदम नवीन रूपांत अवतरला. त्याच्या डोळ्यांतून जणु ज्वाळा निघू
लागल्या;
त्याचा
चेहरा लाल झाला,
त्याने
पेस्ट्रीज़चं पैकेट जमिनीवर फेकून दिलं आणि ओरडू लागला, “खरंय!” लहान मुलांसारख्या
आवाजांत येवढं म्हटल्यावर त्याने ट्रे उचलला, त्यांतून बेगेमोतने मोडून
टाकलेल्या ‘एफिल टॉवर’चे उरले-सुरले तुकडे
फेकून दिले,
ट्रे
वर उचलला,
डाव्या
हाताने परदेशी माणसाची टोपी खेचली, उजव्या हाताने ट्रे त्याच्या डोक्यावर मारला. असा
आवाज झाला,
जणु
एखाद्या ट्रकमधून लोखण्डाचे पतरे फेकताहेत. जाड्या फक् झालेल्या चेह-याने केर्च
हेरिंगच्या ड्रममधे पडला, ज्यामुळे त्यातून खारंट पाण्याचा फवारा निघाला.
तेवढ्यांत आणखी एक चमत्कार
झाला,
जांभळा
माणूस ड्रममधे पडल्यावर स्पष्ट-शुद्ध रशियनमधे ओरडला, “मारून टाकतील! पोलिस! मला
डाकू मारताहेत!” स्पष्ट होतं, की अचानक लागलेल्या ह्या मानसिक धक्क्यानंतर
आतांपर्यंत अनोळखी असलेल्या भाषेवर त्याचा अधिकार झाला होता .
मग दरबानाची शिट्टी थांबली,
घाबरलेल्या ग्राहकांच्यामधून पोलिसच्या दोन टोप्या जवळ येताना दिसल्या. पण चतुर
बेगेमोतने स्टोवच्या तेलाने कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टचं काउन्टर अश्या प्रकारे
भिजवायला सुरुवात केली, जश्या बादलीने पब्लिक बाथहाउसच्या बेंचा भिजवतांत; आणि ते आपणहून
भडकलं. ज्वाळा वर धावली आणि तिने सम्पूर्ण डिपार्टमेन्टला आवळून घेतलं. फळांच्या
टोपल्यांवर बांधलेले लाल कागदाचे रिबिन्स जळून गेले. सेल्सगर्ल्स किंचाळंत
काउन्टरच्या मागून निघून धावू लागल्या आणि त्या बाहेर निघाल्याबरोबर खिडक्यांवर
टांगलेले पडदे जळूं लागले आणि फरशीवर सांडलेलं तेल जळू लागलं. लोक एकदम ओरडून
कन्फेक्शनरी डिपार्टमेन्टपासून दूर सरकले, आता अनावश्यक वाटंत असलेल्या
पावेल योसिफोविचला चेंगरंत; आणि फिश-डिपार्टमेन्ट मधून आपल्या तीक्ष्ण चाकूंसकट
सेल्समैनची भीड मागच्या दाराकडे धावली. जांभळा नागरिक कसातरी ड्रममधून बाहेर
निघाला.
खारट
पाण्याने पूर्ण चिम्ब झालेला तो सुद्धा धडपडंत त्यांच्यामागे धावला. बाहेर
निघणा-या लोकांच्या धक्क्याने काचेचे दरवाजे खणखणंत पडंत होते आणि फुटंत होते. आणि दोघे दुष्ट –
करोव्येव आणि बेगेमोत – माहीत नाही कुठे चालले गेले, पण कुठे – हे समजणं कठीण
आहे. मग प्रत्यक्षदर्शी लोकांनी, जे अग्निकाण्डाच्या सुरुवातीपासून तोर्गसीनमधे हजर
होते,
सांगितलं
की ते दोन्हीं बदमाश छताला चिटकून-चिटकून उडंत होते आणि मग लहान मुलांच्या
फुग्ग्यांसारखे फुटून विखुरले. ह्यांत शंका आहे, की नक्की असंच झालं असेल, पण जे आम्हांला
माहीत नाहीये,
ते बस, नाही माहीत.
पण आम्हांला फक्त इतकंच
माहीत आहे की स्मोलेन्स्कवर झालेल्या घटनेच्या बरोबर एका मिनिटाने बेगेमोत आणि
करोव्येव ग्रिबोयेदोवच्या आत्याबाईंच्या घराजवळच्या त्या रस्त्याच्या फुटपाथवर
दिसले,
ज्यावर
दुतर्फा झाडं होते. करोव्येव जाळीच्या जवळ थांबला आणि म्हणाला, “ब्बा! हो, हे लेखकांचं भवन
आहे. बेगेमोत,
माहीत
आहे कां,
मी
ह्या भवनाची खूप तारीफ ऐकली आहे. ह्या घराकडे लक्ष दे, माझ्या मित्रा! हा विचार
किती चांगला वाटतो, की ह्या छताखाली येवढी योग्यता आणि बुद्धिमत्ता दडलेली आहे आणि
परिपक्व होत आहे!”
“जसे ग्रीनहाउसमधे अनन्नास!”
बेगेमोत म्हणाला आणि स्तंभांच्या ह्या भवनाला नीट बघण्यासाठी लोखण्डाच्या जाळीच्या
आधारावर चढला.
“अगदी बरोब्बर,” करोव्येव आपल्या
मित्राच्या कथनाशी सहमत होत म्हणाला, “हा विचार मनांत येतांच शहारे येतात, की आता ह्या भवनांत ‘दोन किखोते’, किंवा ‘फाउस्ट’ किंवा, सैतान मला घेऊन जावो, इथे ‘मृत आत्मा’6 सारख्या रचना
लिहिणारा भावी लेखक वाढतोय! आँ?”
“विचित्र वाटतंय, विचार करूनंच,” बेगेमोतने दुजोरा
दिला.
“हो,” करोव्येव बोलंत होता, “अजब-अजब गोष्टींची
अपेक्षा करू शकता, ह्या भवनाच्या ग्रीनहाउसमधून, जे आपल्या छताखाली हज्जारो
अश्या लोकांना आश्रय देतंय, ज्यांना मेल्पोमीन, पोलिहिम्निया, आणि थेलियाच्या7
सेवेंत आपलं पूर्ण जीवन समर्पित करायचंय. तू विचार कर, कित्ती हो-हल्ला होईल, जेव्हां
ह्यांच्यापैकी कोणी एक जनतेसमोर अशी रचना प्रस्तुत करेल – जशी ‘इन्स्पेक्टर जनरल’8 किंवा कमींत कमी – ‘येव्गेनी अनेगिन’9!”
“अगदी सोप्पं आहे,” बेगेमोत पुन्हां
म्हणाला.
“हो,” करोव्येव पुढे
म्हणाला आणि त्याने काळजीने बोट वर केलं, “पण!...पण, मी म्हणतो, आणि पुन्हां-पुन्हां
म्हणतो हे – ‘पण!’ जर ह्या
ग्रीनहाउसच्या नाजुक पिकाला कीड नाही लागली तर, तिने त्यांना मुळासकट खाऊन
नाही टाकलं तर,
जर ते सडून
गेले नाही तर! आणि असं अनन्नासांबरोबर बहुधा होतं! ओय, ओय, ओय, कसं होतं!”
बेगेमोतने जाळीत
असलेल्या भोकातून आपलं डोकं आत घुसवंत विचारलं, “पण हे सगळे लोक वराण्ड्यांत
काय करताहेत?”
“लंच करताहेत,” करोव्येवने समजावलं, “मी तुला हेसुद्धां
सांगतो,
प्रिय
मित्रा,
की इथे
एक खूप छान आणि स्वस्त रेस्टॉरेन्ट आहे. आणि मला, जसं की लांबच्या प्रवासावर
जाण्याआधी प्रत्येक यात्रेकरूला वाटतं, इथे काहीतरी खावसं वाटतंय. थंडगार दारूचा एक
पैग प्यावासा वाटतोय मला.”
“मलापण,” बेगेमोतने उत्तर
दिलं आणि दोघे बदमाश लिण्डेनच्या झाडांच्या सावलीत असलेल्या सिमेन्टच्या रस्त्यावर
चालंत सरळ,
संभावित
धोक्याची जाणीव नसलेल्या रेस्टॉरेन्टच्या प्रवेश द्वारापर्यंत आले.
एक फिक्कट, कंटाळवाणी महिला, पांढरे स्टॉकिंग्ज़
आणि शेपूट असलेली गोल पांढरी टोपी घालून, कोप-यांत असलेल्या
प्रवेशद्वाराजवळ बसली होती, जिथे हिरव्या वेलींच्यामधे एक छोटसं प्रवेश द्वार
ठेवण्यांत आलं होतं. तिच्यासमोर एका साधारण टेबलवर एक जाड रजिस्टर पडलं होतं.
त्यांत ही महिला, न जाणे कां, रेस्टॉरेन्टमधे येणा-यांची नावं लिहीत होती. ह्या
महिलेने करोव्येव आणी बेगेमोतला थांबवलं.
“तुमचं परिचय-पत्र?” तिने करोव्येवच्या चष्म्याकडे
आणि बेगेमोतच्या फाटक्या बाहीकडे आणि बगलेंत दबलेल्या स्टोवकडे आश्चर्याने बघंत
विचारलं.
“हज्जारदां माफी
मागतो,
कसलं
परिचय पत्र?”
करोव्येवने
आश्चर्याने विचारलं.
“तुम्हीं लेखक आहांत?” महिलेने उत्तरादाखल
विचारलं.
“नक्कीच!”
करोव्येवने गर्वाने म्हटलं.
“तुमचं परिचय पत्र?” महिला पुन्हां
म्हणाली.
“माझे मनमोहिनी...” करोव्येवने
अत्यंत भावुकतेने सुरुवात केली.
“मी मनमोहिनी नाहीये,” महिला त्याला मधेच
टोकंत म्हणाली.
“ओह, कित्ती दुःखाची
गोष्ट आहे,”
करोव्येव
निराशेने म्हणाला, “जर तुम्हांला मोहक असणं आवडंत नाहीये, तर चला, असंच असूं द्या, पण हे तुमच्यासाठी
चांगलं झालं असतं. तर, मैडम, दस्तोयेव्स्की लेखक आहे, हे सिद्ध करण्यासाठी काय त्याच्याच कडून
प्रमाण-पत्र मागायला हवं? तुम्हीं त्याच्या कोणत्याही कादम्बरीतून कोणतेही पाच
पृष्ठ घ्या,
आणि
कोणत्याही परिचय-पत्राशिवाय तुमची खात्री होईल, की तुम्हीं एका चांगल्या
लेखकाला वाचतांय. हो, त्याच्याकडे कदाचित कोणतंही परिचय-पत्र नव्हतंच! तुला काय वाटतं?” करोव्येव बेगेमोतकडे
वळला.
“पैज लावतो, की नव्हतं,” तो स्टोवला
रजिस्टरजवळ ठेवून एका हाताने धुराने काळ्या झालेल्या कपाळाचा घाम पुसंत
म्हणाला.
“तुम्हीं
दस्तोयेव्स्की नाहीये,” करोव्येवच्या तर्कांने पस्त होत ती महिला म्हणाली.
“घ्या, तुम्हांला कसं माहित? तुम्हांला कसं माहीत?” त्याने उत्तर दिलं.
“दस्तोयेव्स्की
मेलाय,”
महिला
म्हणाली,
पण
कदाचित तिलासुद्धां ह्या गोष्टीचा विश्वास नव्हता.
“मी विरोध करतो,” बेगेमोत तावातावाने
म्हणाला,
“दस्तोयेव्स्की
अमर आहे!”
“तुमची परिचय-पत्रं, नागरिकहो!” त्या
महिलेने पुन्हां विचारलं.
“माफ़ करा, हे तर अतीच झालंय?” करोव्येव माघार
घ्यायला तयार नव्हता आणि तो बोलंत राहिला, “लेखकाला कोणी त्याच्या परिचय
पत्राने नाही ओळखंत, तर त्याला ओळखतांत त्याच्या लेखनाने! तुम्हांला कल्पना तरी आहे
कां,
की
माझ्या डोक्यांत कसले-कसले विचार उठतायंत? किंवा ह्या डोक्यांत?” त्याने बेगेमोतच्या
डोक्याकडे खूण करंत म्हटलं, ज्याने लगेच आपली टोपी काढून टाकली, कदाचित अश्यासाठी की
त्या महिलेला त्याचं डोकं चांगल्या प्रकारे दिसावं.
“रस्ता सोडा, श्रीमान,” त्या महिलेने घाबरंत
म्हटलं.
करोव्येव आणि
बेगेमोतने एकीकडे सरकून भु-या सूटवाल्या, टाय न बांधलेल्या लेखकाला रस्ता दिला. ह्या
लेखकाने पांढरा शर्ट घातला होता, ज्याची कॉलर कोटाच्या वर उघडी पडलेली होती. त्याने
बगलेत वर्तमान पत्र दाबलं होतं. लेखकाने अभिवादन करंत महिलेकडे बघून डोकं झुकवलं
आणि समोरच्या रजिस्टरमधे चिमणीसारखं काहीतरी रेखाटून दिलं आणि वराण्ड्यांत चालला
गेला.
“ओह,” अत्यंत दुःखाने
करोव्येवने उसासा भरला, “आपल्याला नाहीं, पण त्याला मिळेल ती थण्डगार
बियर जिचं आपण गरींब भटके लोक स्वप्न बघंत होतो. आपली परिस्थिती चिंताजनक झालीये, कळंत नाहीये, की काय करावं.”
बेगेमोतने दुःख
प्रकट करंत हात हलवले आणि आपल्या गोल डोक्यावर टोपी चढवली, ज्याच्यावर अगदी मांजरीच्या
मऊ केसांसारखे दाट केस होते. त्याच क्षणी त्या महिलेच्या डोक्यावरून एक
अधिकारपूर्ण आवाज घुमला:
“येऊ द्या, सोफ्या पाव्लोव्ना10.”
रजिस्टरवाली महिला
दचकली. समोरच्या वेलींच्या हिरवळीतून एक पांढ-या जैकेट वाली छाती आणि टोकदार दाढी
असलेला समुद्री डाकूचा चेहरा अवतरला. त्याने ह्या दोन्हीं फाटके कपडे घातलेल्या
सन्देहास्पद प्राण्यांकडे अत्यंत प्रेमाने बघितलं, आणि वरून, तो त्यांना खुणेने
आमंत्रित देखील करूं लागला. आर्किबाल्द आर्किबाल्दोविचचा दबदबा पूर्ण रेस्टॉरेन्टमधे
त्याच्या आधीनस्थ कर्मचा-यांना जाणवायचा. सोफ्या पाव्लोंव्नाने करोव्येवला विचारलं, “तुमचं नाव?”
“पानायेव11,” अत्यंत सौजन्याने
त्याने उत्तर दिलं. महिलेने ते नाव लिहून घेतलं आणि प्रश्नार्थक नजरेने बेगेमोतकडे
बघितलं.
“स्काबिचेव्स्की12,” तो न जाणे कां
आपल्या स्टोवकडे बोट दाखवंत उत्तरला. सोफ्या पाव्लोव्नाने हे नाव सुद्धां लिहून
घेतलं आणि रजिस्टर आगंतुकांसमोर ठेवलं, म्हणजे त्यांना सही करता यावी. करोव्येवने ‘पानायेव’च्या पुढे लिहिलं ‘स्काबिचेव्स्की’; आणि बेगेमोतने ‘स्काबिचेव्स्की’च्यापुढे लिहिलं ‘पानायेव’. सोफ्या पाव्लोव्नाला
आश्चर्याचा मोट्ठा धक्का देत आर्किबाल्द आर्किबाल्दोविच पाहुण्यांना मोठ्या
प्रेमाने स्मित करंत वराण्ड्याच्या दुस-या टोकावर असलेल्या सर्वोत्तम टेबलाकडे
घेऊन गेला. तिथे बरीच सावली होती. टेबलाच्याजवळ सूर्याचे हसरे किरण वेलींमधून
डोकावंत होते. सोफ्या पाव्लोव्ना विस्मयाने थक्क होऊन त्या विचित्र सह्यांकडे बघंत
होती,
जे
त्या अप्रत्याशित पाहुण्यांने केले होते.
वेटर्सलापण
आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने कमी आश्चर्यचकित नाही केलं. त्याने स्वतः खुर्ची
खेचून करोव्येवला बसायला सांगितलं, मग एका वेटरला खूण केली, दुस-याच्या कानांत कुजबुजंत
काहीतरी सांगितलं, आणि दोन्हीं वेटर्स पाहुण्यांच्या खिदमतीत हजर झाले.
पाहुण्यांपैकी एकाने आपला स्टोव स्वतःच्या लाल जोड्यांच्या बाजूला फरशीवर ठेवला
होता. टेबलावरचा जुना, पिवळे डाग पडलेला टेबलक्लॉथ लगेच गायब झाला आणि हवेंत उडंत पांढरा, स्टार्च लावलेला
टेबलक्लॉथ येऊन त्याच्या जागेवर विराजमान झाला.
आर्किबाल्द
आर्किबाल्दोविच हळू-हळू करोव्येवच्या अगदी कानाजवळ कुजबुजंत होता, “आपली काय सेवा करूं
शकतो?
खास
बनवलेली बलीक13, आर्किटेक्ट्सच्या कॉन्फ्रेन्समधून चोरून आणलीये...”
“तुम्हीं...अँ...आम्हांला
काहीही खायला द्या...अँ...” करोव्येव खुर्चीवर पसरंत सहृदयतेने म्हणाला.
“समजलो.” डोळे मिटंत
आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने अर्थपूर्ण ढंगाने म्हटलं.
हे बघून की ह्या
संदिग्ध दिसणा-या पाहुण्यांशी आर्किबाल्द आर्किबाल्दोविच अत्यंत सौजन्याने वागतोय, वेटर्सने पण आपल्या
डोक्यांतून सगळे संदेह काढून टाकले आणि खूप तन्मयतेने त्यांची आवभगत करायला लागले.
त्यांच्यापैकी एकाने तर बेगेमोतच्या जवळ पेटलेली काडीसुद्धां आणली, हे बघून की त्याने
खिशांतून सिगरेटचा तुकडा काढून तोंडांत दाबलाय; दुसरा खणखण करणारी हिरवळ
घेऊन जणु उडतंच आला आणि टेबलावर हिरवीगार सुरई आणि प्याले ठेवून गेला. प्याले इतके
सुरेख होते,
ज्यांत
तम्बूच्या खाली बसून नर्ज़ान पिण्याचा मजाच काही और असतो...नाही, आम्हीं ह्याहूनही
पुढे सांगू...ज्यांत तम्बूच्याखाली अविस्मरणीय ग्रिबोयेदोवच्या वराण्ड्यांत
बरेंचदा नर्ज़ान प्यायचे.
“पहाडी बदाम आणि
तीतरचं पकवान पेश करूं शकतो,” संगीतमय सुरांत आर्किबाल्द आर्किबाल्दोविच म्हणाला.
तुटका चष्मा असलेल्या पाहुण्याला हा प्रस्ताव फार आवडला आणि आभार प्रदर्शित करंत
त्याने त्या बेकारच्या चष्म्यातून त्याच्याकडे बघितलं.
जवळच्या टेबलवर
बसलेला कथाकार पेत्राकोव सुखोयेव, जो आपल्या बायकोसोबंत पोर्क चॉप्स खात होता, आपल्या स्वाभाविक
निरीक्षण शक्तीने आर्किबाल्द आर्किबाल्द करंत असलेली आवभगत बघून खूप चकित झाला.
त्याच्या सम्माननीय पत्नीने करोव्येवची ह्या समुद्री डाकूशी होत असलेली जवळीक बघून
ईर्ष्येने चमचा वाजवला, जणु म्हणंत असावी – हा काय प्रकार आहे की आम्हांला
वाट बघायला लावतायेत, जेव्हां आइस्क्रीम द्यायची वेळ झालीये! काय, होतं काय आहे? आर्किबाल्द
आर्किबाल्दोविचने स्मित करंत पेत्राकोवाकडे एका वेटरला पाठवून दिलं, पण तो स्वतः आपल्या
पाहुण्यांपासून दूर नाही झाला. आह, आर्किबाल्द आर्किबाल्दोविच अत्यंत हुशार होता!
लेखकांपेक्षाही तीक्ष्ण नजर असलेला. आर्किबाल्द आर्किबाल्दोविचला वेराइटीच्या ‘शो’बद्दलसुद्धां माहीत
होतं,
ह्या
काळांत होत असलेल्या अनेक चमत्कारिक घटनांबद्दलसुद्धां त्याने ऐकलं होतं; पण इतरांप्रमाणे ‘चौकट वाला’ आणि ‘बोका’ ह्या दोन शब्दांना
त्याने कानांतून काढून नव्हतं टाकलं. आर्किबाल्द आर्किबाल्दोविचला लगेच अंदाज आला
की हे पाहुणे कोण आहेत. त्याला कळलं होतं, म्हणून त्याने त्यांच्याशी
वाद नाही घातला. पण सोफ्या पाव्लोव्ना चांगलीच आहे! फक्त कल्पनाच करा – ह्या
दोघांना वराण्ड्यांत जाण्यापासून थांबवणं! पण तिच्याकडून आणखी दुस-या गोष्टीची
अपेक्षाच नव्हती!
वैतागाने खूप क्रीम
असलेल्या आइस्क्रीममधे चमचा टोचंत पेत्राकोवा बघंत होती, की जवळच्या टेबलवर
जोकरांसारखे कपडे घातलेल्या दोन माणसांच्या समोर कसे फटाफट खाण्यापिण्याच्या
वस्तूंचे ढीग लागंत होते. चमकदार धुतलेल्या सैलेडच्या पानांमधून डोकावंत असलेल्या
ताज्या कैवियरची प्लेट आता तिथे ठेवण्यांत आली...एका क्षणांत विशेषकरून ठेवलेल्या
आणखी एका लहानग्या टेबलावर थेंब सोडंत असलेली चांदीची छोटीशी बादली आली.
सगळ्या व्यवस्थेने
संतुष्ट झाल्यावर, तेव्हांच, जेव्हां वेटर्सच्या हातांत एक बंद बाउल आलं, ज्यांत कोणचीतरी
वस्तू खदखदंत होती, आर्किबाल्द आर्किबाल्दोविचने पाहुण्यांचा निरोप घेतला. जायच्या
आधी त्यांच्या कानांत कुजबुजला, “माफ करा! फक्त एक मिनिटासाठी!...मी स्वतः जाऊन तीतर
बघून येतो.”
तो टेबलापासून दूर
जाऊन रेस्टॉरेन्टच्या आतल्या कॉरीडोरमधे गायब झाला. जर कोणी आर्किबाल्द
आर्किबाल्दोविचच्या पुढच्या कार्यकलापांचं निरीक्षण केलं असतं, तर त्याला ते
रहस्यमयंच भासले असते.
रेस्टॉरेन्ट प्रमुख
टेबलापासून दूर जाऊन तीरासारखा किचनमधे नाही, पण रेस्टॉरेन्टच्या स्टोअर
रूममधे गेला. त्याने आपल्या किल्लीने स्टोअर रूम उघडलं आणि त्याच्या आंत बंद झाला.
शर्टाच्या कफ़्सला डाग लागू नयेत म्हणून अत्यंत काळजीपूर्वक बर्फाने भरलेल्या
डब्ब्यांतून दोन जड-जड बलीक काढले आणि त्यांना वर्तमान पत्रांत गुंडाळलं, त्यावर दोरी बांधली
आणि एकीकडे ठेवून दिलं. मग बाजूच्या खोलींत जाऊन बघून घेतलं की त्याचा रेशमी
अस्तरचा उन्हाळ्याचा कोट आणि टोपी जागेवर आहेत किंवा नाही. तेव्हांच तो किचनमधे
पोहोचला,
जिथे
सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकी पाहुण्यांसाठी तीतर तळंत होता.
सांगावं लागेल, की आर्किबाल्द
आर्किबाल्दोविचच्या कार्यकलापामधे काहीही गूढ नव्हतं आणि फक्त एक वरवर बघणारांच
त्यांना रहस्यमय म्हणू शकतो. पूर्वी घडलेल्या घटानांची माहिती आणि ईश्वर प्रदत्त
पूर्वानुमान करण्याच्या अद्वितीय शक्तीने आर्किबाल्द आर्किबाल्दला सांगितलं होतं
की त्याच्या पाहुण्यांचं जेवण कितीही चविष्ट असलं तरी ते बस थोडा वेळंच चालणार
आहे. आणि त्याच्या ह्या शक्तीने त्याला ह्यावेळेस सुद्धां फसवलं नाही.
जेव्हां करोव्येव
आणि बेगेमोत मॉस्कोच्या अत्यंत शुद्ध थंडगार वोद्काचा दुसरा पैग घेत होते, तेव्हांच
वराण्ड्यांत घामाने थबथबलेला, घाबरलेला संवाददाता बोबा कन्दालूप्स्की घुसला, जो मॉस्कोत
सर्वज्ञानी म्हणून प्रसिद्ध होता. आल्याबरोबर तो पेत्राकोव दम्पत्तीजवळ बसून गेला.
आपली फुगलेली ब्रीफकेस टेबलवर ठेवंत बोबाने आपले ओठ लगेच पेत्राकोवच्या कानाला
चिकटवले आणि कुजबुजंत अत्यंत मजेदार गोष्टी सांगू लागला. मैडम पेत्राकोवानेपण
उत्सुकतेने आपला कान बोबाच्या चिक्कट, जाड्या-जाड्या ओठांना लावला. तो तिरप्या नजरेने
आजूबाजूल बघंत नुसतं कुजबुजतंच होता. काही शब्द, जे ऐकू आले, ते असे होते:
“शप्पत घेऊन सांगतो!
सादोवायावर... सादोवायावर...” बोबाने आवाज आणखी खाली करंत म्हटलं, “गोळ्या लागतंच
नाहीये! गोळ्या...गोळ्या...तेल...तेल...आग...गोळ्या...”
“अश्या खोटारड्यांना, जे असल्या घाणेरड्या
अफवा पसरवतांत,”
रागाने
मैडम पेत्राकोवा काहीशा मोठ्या, जड आवाजांत, जसा बोबाला नको होता, उद्गारली, “त्यांचातर खरपूस
समाचार घेतला पाहिजे! चला, काही हरकत नाही, असंच होईल, त्यांना धडा
शिकवलांच जाईल! ओह, किती धोकादायक खोटारडे आहेत!”
“कुठले खोटारडे, अंतोनीदा
पर्फीरेव्ना!” लेखकाच्या बायकोच्या अविश्वास दाखवल्याने उत्तेजित आणि आहत होऊन
बोबा ओरडला,
आणि
कुजबुजंत म्हणाला, “मी सांगतोय तुम्हांला, गोळ्यांचा काहीच फायदा होत नाहीये...आणि आता
आग...ते हवेत...हवेत...” बोबा सांगंत राहिला, किंचितही विचार न करतां, की ज्यांच्याबद्दल
तो सांगंत आहे,
ते
त्याच्या बाजूलाच बसलेले आहेत, आणि त्याची शिट्टीसारखी कुजबुज ऐकून आनंदित होत आहेत.
पण हा आनंद लवकरंच संपला.
रेस्टॉरेन्टच्या
आतल्या भागांतून तीन माणसं वराण्ड्यांत आले. त्यांच्या शरीरावर अनेक पट्टे कसलेले होते.
हातांत रिवॉल्वर्स होते. सगळ्यांत पुढच्या माणसाने गरजंत म्हटलं, “आपल्या जागेवरून हलू
नका!” आणि लगेच त्या तिघांनी करोव्येव आणि बेगेमोतच्या डोक्यावर गोळ्या चालवायला
सुरुवात केली. गोळ्या खाल्ल्यावर ते दोघं हवेंत विलीन झाले, आणि स्टोवमधून आगीची
एक तीव्र लपंट त्या शामियान्यांत उठली जिथे रेस्टॉरेन्ट होतं. जणु काळी किनार
असलेला एक विशाल उघडा जबडा शामियान्यांत प्रकट झाला आणि चारीकडे पसरू लागला.
आगीच्या ज्वाळा उंच होत-होत ग्रिबोयेदोव भवनाच्या छतापर्यंत पोहोचू लागल्या.
दुस-या मजल्यावर सम्पादकाच्या खोलींच्या खिडकींत ठेवलेल्या फाइल्स आणि कागदपत्र
जळू लागले;
त्यानंतर
लपटांनी पडद्यांना पकडलं, मग आग भीषण रूप धारण करून, किंचाळंतच आत्याबाईच्या घरांत घुसली, जणु कोणी तिला हवा
देत आहे.
काही क्षणांनी
सिमेन्टच्या रस्त्यावर, अर्धवट जेवण सोडून लेखक, वेटर्स, सोफ्या पाव्लोव्ना, बोबा, पेत्राकोवा आणि
पेत्राकोव धावंत होते. हा तोच रस्ता आहे, जो लोखंडाच्या जाळीपर्यंत जातो, आणि जिथून बुधवारी
संध्याकाळी ह्या दुर्भाग्याची प्रथम सूचना देणारा दुर्दैवी इवानूश्का आला होता, आणि ज्याला कोणीच
समजून नव्हतं घेतलं.
वेळेवारीच मागच्या
दारांतून घाई न करतां निघाला आर्किबाल्द आर्किबाल्दोविच – जळंत असलेल्या जहाजाच्या
कैप्टनप्रमाणे,
जो
सगळ्यांत शेवटी जहाज सोडतो. त्याने आपला रेशमी अस्तरचा कोट घातला होता आणि बगलेत
दोन बलीक असलेलं पैकेट दाबलं होतं.
*********
एकोणतीस
मास्टर आणि मार्गारीटाच्या
भाग्याचा निर्णय झाला
सूर्यास्ताच्या वेळेस शहरावरून खूप उंचीवर सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बनवलेल्या
एका अतिसुन्दर इमारतीच्या दगडी छतावर दोन व्यक्ती होते : वोलान्द आणि अजाज़ेलो.
खालून रस्त्यावरून बघितल्याने ते दिसंत नव्हते, कारण की चीनी मातीचे फ्लॉवरपॉट्स आणि चीनीमातीच्याच फुलांची जाळी त्यांना अनावश्यक
नजरांपासून दूर ठेवंत होते. पण ते मात्र शहराला अगदी शेवटच्या टोकापर्यंत बघू शकंत
होते.
वोलान्द एका फोल्डिंग स्टूलवर आपला काळा सैल झगा घालून बसला होता. त्याची
लाम्ब आणि चौडी तलवार छ्ताच्या एक दुस-याला छेदणा-या पट्ट्यांच्या मधे उभी होती, ज्याने सूर्य-घड्याळाचा
आकार निर्माण झाला होता. तलवारीची सावली हळू-हळू लाम्ब होत चालली होती आणि
सैतानाच्या पायांत असलेल्या काळ्या जोड्यांकडे येत होती. आपली टोकदार हनुवटी
हातावर ठेऊन, एक
पाय स्वतःच्या खाली दुमडून बसलेला वोलान्द एकटक अगणित महाल, विशाल गगनचुम्बी इमारती
आणि छोट्या-छोट्या झोपड्यांकडे, ज्या लवकरंच तोडल्या जाणार होत्या, एकटक1 बघंत होता. अजाज़ेलो आपली आधुनिक वेशभूषा – जैकेट, हैट, चकचकीत जोडे - सोडून
वोलान्दसारखाच काळ्याच रंगाच्या पोषाकांत आपल्या मालकापासून किंचित दूर निश्चल उभा
होता. तो सुद्धां मालकासारखाच शहराकडे बघंत होता.
वोलान्द म्हणाला, “किती मजेदार शहर आहे, हो ना?”
अजाजेलो किंचित हलला आणि आदरपूर्वक म्हणाला, “मालक, मला
रोम जास्त आवडतं!”
“हो, आपली
आपली आवड आहे,” वोलान्द म्हणाला. काही क्षणांनी त्याचा आवाज पुन्हां आला, “हा त्या दुतर्फा झाडं
असलेल्या रस्त्यावर कसला धूर आहे?”
“हे ग्रिबोयेदोव जळतंय,” अजाज़ेलोने उत्तर दिलं.
“मी अंदाज़ लावूं शकतो का, की ही सदाबहार जोडी करोव्येव आणि बेगेमोत तिथे गेली होती?”
“ह्यांत काही शंकाच नाही, मालक!”
पुन्हां शांतता पसरली आणि छतावर असलेल्या त्या दोघांनी बघितलं की विशाल
इमारतींच्या पश्चिमेकडे उघडणा-या खिडक्यांमधे, वरच्या मजल्यांवर तुकडे झालेला, आपल्या प्रकाशाने दिपवणारा सूर्य धगधगतोय. वोलान्दचा डोळासुद्धां तस्सांच
धगधगंत होता, तशी
त्याची पाठ अस्तंगत सूर्याकडे होती.
पण तेवढ्यांत कशाने तरी वोलान्दला मागे बघायला भाग पाडलं. आता त्याचं लक्ष
होतं गोल गुम्बदाकडे, जे छतावर त्याच्या पाठीमागे होतं. त्याच्यामागून निघाला फाटके कपडे घातलेला, धुळीने माखलेला, काळी दाढी असलेला एक उदास
माणूस. त्याने
चोगा घातला होता, पायांत
स्वतःच बनवलेल्या चपला होत्या.
“ब्बा!” आगंतुकाकडे स्मित करंत बघून वोलान्द उद्गारला, “तू इथे येशील, अशी मला जरासुद्धां आशा
नव्हती! तू काय काही फिर्याद घेऊन आलायंस, अनाहूत, पण
अपेक्षित पाहुण्या?”
“मी तुझ्याकडे आलोय, वाईटाची आत्मा आणि सावल्यांच्या शासका,”
येणा-याने तिरप्या नजरेने वोलान्दकडे अमैत्रीपूर्ण
भावनेने बघंत म्हटलं.
“जर तू माझ्याकडे आला आहेस, तर माझं अभिवादन कां नाही केलं, भूतपूर्व टैक्स-कलेक्टर?” वोलान्दने गंभीरतेने विचारलं.
“कारण की तू चिरंजीवी व्हावंस अशी माझी इच्छा नाहीये,” आगंतुकाने तीव्रतेने उत्तर
दिलं.
“पण तुला हे मान्य करावं लागेल,” वोलान्दने प्रतिवाद करंत म्हटलं आणि त्याच्या चेह-यावर कटु हास्य पसरलं, “छतावर येतांच असभ्यपणा
करूं लागलास. मी तुला सांगून ठेवतो, ही असभ्यता आहे – तुझ्या उच्चारणांत, बोलण्याच्या पद्धतीत. तू आपल्या शब्दांचं उच्चारण अशाप्रकारे करतोस, की जणू तू सावल्यांना, दुष्टपणाला मानतंच नाही.
तू ह्या प्रश्नावर विचार करशील कां : जर दुष्टपणाचं अस्तित्व नसतं, तर तुझ्या चांगुलपणाला
चांगुलपणा कोण म्हणेल? जर पृथ्वीवरून सगळ्या सावल्या लुप्त झाल्या, तर ती कशी दिसेल? सावल्या बनंत असतात वस्तूंनी, व्यक्तींनी. ही बघ माझ्या तलवारीची सावली. सावल्या झाडांच्यासुद्धा असतात आणि
इतर सजीव प्राण्यांच्यासुद्धा. तुला काय पृथ्वीवरून सगळ्या वृक्षांना आणि सजीव
पदार्थांना दूर करून पृथ्वीला नग्न करायंच आहे, फक्त नग्न प्रकाशाचा आनंद घेण्याच्या आपल्या कल्पनेसाठी? तू मूर्ख आहे!”
“मला तुझ्याशी वाद नाही घालायचा, वृद्ध दार्शनिका,” लेवी मैथ्यूने उत्तर दिलं.
“तू माझ्याशी वाद घालूपण शकंत नाही, कारण की तू मूर्ख आहेस,” वोलान्दने उत्तर देऊन विचारलं, “पट्कन सांग, मला
वैताग आणायला तू इथे कां आलायस?”
“मला त्याने पाठवलंय.”
“त्याने तुला काय संदेश देऊन पाठवलंय, दासा?”
“मी दास नाहीये,” वाईट वाटून घेऊन मैथ्यूने उत्तर दिलं, “मी त्याचा शिष्य आहे.”
“आपण नेहमीसारखेच एकमेकांशी वेगळ्या भाषांमधे बोलतो आहे. पण ह्याने त्या
गोष्टी बदलून तर नाही जात, ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे. तर...” वोलान्दने आपला मुद्दा अर्धवट सोडून
दिला.
“त्याने मास्टरची कादम्बरी वाचलीये,”
लेवी मैथ्यूने म्हटलं, “तो तुला विनंती करतोय की तू आता मास्टरला आपल्या सोबत घेऊन जा आणि
पुरस्कारास्वरूप त्याला शांती प्रदान कर. हे तुझ्यासाठी कठीण आहे का, वाईटाची आत्मा?”
“माझासाठी काहीही कठीण नाहीये, ही गोष्ट तुलापण चांगलीच माहीत आहे.” काही वेळ शांत राहून वोलान्द पुढे
म्हणाला, “तू त्याला आपल्याबरोबर प्रकाशांत का नेत नाहीस?”
“त्याची प्रकाशाची पात्रता नाहीये, त्याची शांतीची पात्रता आहे,” लेवीने दुःखाने म्हटलं.
“सांगून दे, की
काम होऊन जाईल,” वोलान्दने उत्तर देऊन पुढे म्हटलं, “तू लगेच इथून निघून जा,” त्याच्या डोळ्यांत निखारे चमकू लागले.
“तो विनंती करतोय, की जिने त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याच्यासाठी दुःख सोसलं, तिला पण तुमची शरण मिळावी,” लेवी पहिल्यांदा वोलान्दशी
याचनेच्या स्वरांत बोलला.
“तुझ्याशिवाय तर आम्हांला ही गोष्ट समजलीच नसती. आता नीघ!”
ह्यानंतर लेवी मैथ्यू गायब झाला, आणि वोलान्दने अजाज़ेलोला जवळ बोलावून आज्ञा
दिली:
“उडून त्यांच्याकडे जा, आणि सगळं व्यवस्थित करून ये.”
अजाज़ेलो छतावरून चालला गेला आणि वोलान्द एकटा राहिला. पण थोड्यांच वेळासाठी.
छतावर कोणाच्यातरी पावलांची चाहूल आणि काही प्रसन्न आवाज ऐकूं आले, आणि वोलान्दच्या समोर आले
करोव्येव आणि बेगेमोत. आता त्या जाड्याच्या हातांत स्टोव नव्हता, त्याच्या अंगावर कित्तीतरी
वस्तूंच ओझं होतं. बगलेत दाबलेलं होतं सोनेरी फ्रेममध्ये जडवलेलं एक सुरेख
लैण्डस्केप, बाहीवर
टांगला होता एका स्वयंपाक्याचा अर्धवट जळलेला एप्रन; दुस-या हातांत त्याने अक्खी सेल्मन पकडली होती – चामडी आणि शेपटीसहित.
करोव्येव आणि बेगेमोतच्या अंगातून जळका वास येत होता. बेगेमोतचा चेहरा धुराने काळा
झाला होता. त्याची टोपी अर्धवट जळून गेली होती.
“सैल्यूट, मालक,” ह्या मस्त जोडीने ओरडून
अभिवादन केलं आणि बेगेमोतने सेल्मन हालवली.
“खूप छान,” वोलान्द म्हणाला.
बेगेमोत आनंदाने आणि उत्तेजनेने म्हणाला, “मालक, कल्पना
करा, ते
मला दरोडेखोर समजले!”
“तुझ्याकडे जे सामान आहे,” वोलान्दने लैण्डस्केपकडे
बघंत म्हटलं, “त्यावरून तू दरोडेखोरंच आहे.”
“तुम्हीं विश्वास करा, मालक...” बेगेमोत भावविह्वल आवाजांत सांगू लागला.
“नाही, नाहीं
करंत,” वोलान्दने संक्षिप्त उत्तर दिलं.
“मालक, मी
शप्पथ घेऊन सांगतो, की जे शक्य होतं, ते वाचवण्यासाठी मी फार शौर्य दाखवलं. पण फक्त येवढंच वाचवूं शकलो.”
“तू खरं-खरं सांग, की ग्रिबोयेदोव कसं जळालं?”
करोव्येव आणि बेगेमोत, दोघांनी हात हालवले आणि डोळे वर करून आकाशाकडे बघूं लागले. मग बेगेमोर ओरडला, “खोटं नाही बोलंत! आम्ही
चुपचाप आणि शांततेने खात होतो...”
“आणि अचानक – त्राख, त्राख!” करोव्येवने पुष्टी केली, “गोळ्या चालू लागल्या! भीतीने वेडे होऊन मी आणि बेगेमोत बाहेर पळालो; ते आमच्या मागे येत होते; आम्हीं तिमिर्याज़ेवच्या2
दिशेने धावलो!”
बेगेमोत मधेंच टपकला, “पण कर्तव्याचा भावनेने आमच्या भीतीवर जय मिळवला आणि आम्हीं परंत आलो!”
“आह, तुम्हीं
परंत गेलेत?” वोलान्दने म्हटलं, “हूँ, तरीच!
म्हणूनंच पूर्ण इमारत भस्म झाली.”
“अगदी भस्म!” करोव्येवने दुःखाने म्हटलं, “खरंच अगदी पूर्णची पूर्ण! मालक, तुम्हीं एकदम बरोबर बोललात. फक्त धगधगते कोळसे!”
बेगेमोत सांगू लागला, “मी सम्मेलन कक्षाकडे धावलो, तोच ज्यांत स्तम्भ आहेत, हा विचार करून की एखादी बहुमूल्य वस्तू वाचवता येईल. आह, मालक! जर मला बायको असती, तर तिच्या वीसवेळा विधवा
व्हायचा धोका होता! पण, सौभाग्याने, मालक, माझं लग्नंच नाही झालंय; आणि मी तुम्हांला स्पष्टंच
सांगतो – मी सुखी आहे, की मी विवाहित नाहीये! आह, मालक! काय एका अविवाहित
आनंदाच्या ऐवजी कोणी भानगडींच बन्धन स्वीकारू शकतो!”
“पुन्हां सुरूं झाला मूर्खपणा,” वोलान्दने शेरा मारला.
“ऐकतोय आणि पुढे सांगतो,” बोक्याने उत्तर दिलं, “हो, तर
हे लैण्डस्केप. त्या हॉलमधून आणखी काही बाहेर काढणं शक्य नव्हतं, ज्वाळा माझा चेहरा भाजंत
होत्या. मी खाली स्टोअरकडे पळालो, आणि हा मासा वाचवला. किचनमधे धावलो, हा एप्रन वाचवला. मला वाटतं, मालक, की
जे शक्य होतं, ते
सर्व मी केलं, पण
तुमच्या चेह-यावरच्या व्यंगात्मक भावाचं कारण मला समजंत नाहीये.”
“आणि जेव्हां तू धावपळ करंत होता, तेव्हां करोव्येव काय करंत होता?”
“मी आग विझवणा-यांची मदत करंत होतो, मालक,” करोव्येव आपल्या फाटलेल्या पैन्टकडे खूण करंत म्हणाला.
“ओह! जर असं आहे, तर मग नवीन बिल्डिंग बनवावी लागेल.”
“ती बनेल, मालक,” करोव्येव म्हणाला, “मी खात्रीपूर्वक सांगतो.”
“ठीक आहे, तर
मग मी कामना करतो, की
ती आधीच्या बिल्डिंगपेक्षा जास्त चांगली असेल,”
वोलान्दने म्हटलं.
“असंच होईल, मालक!”
करोव्येव म्हणाला.
बोका म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरोखरचा पैगम्बर आहे.”
“बरं, आम्ही
आलोय, मालक,” करोव्येव म्हणाला, “आणि तुमच्या हुकुमाची वाट बघतोय.”
वोलान्द आपल्या स्टूलवरून उठून नक्षीदार खांब असलेल्या कठड्याकडे गेला आणि
बरांच वेळ चुपचाप आपल्या टोळीकडे पाठ करून, दूर कुठेतरी बघंत राहिला. मग तो कठड्यापासून दूर होऊन परंत आपल्या स्टूलवर
बसला आणि म्हणाला, “काही हुकुम नाहीये – तुम्हीं लोकांनी शक्य ते सगळं केलं आणि सध्यां मला
तुमच्या सेवेची गरंज नाहीये. तुम्ही लोक आराम करूं शकता. वादळ येणारेय; शेवटचं वादळ, ते सगळं काम पूर्ण करेल; आणि मग आपण निघू.”
“ठीकाय, मालक,” दोन्हीं जोकरांनी उत्तर
दिलं आणि ते छताच्या मध्यवर्ती गुम्बदाच्या मागे कुठेतरी लपले.
वादळ, ज्याच्याबद्दल
वोलान्दने म्हटलं होतं, क्षितिजावर उठूं लागल होतं. पश्चिमेकडून एक काळं ढग उठलं, ज्याने सूर्याला अर्ध
कापून टाकलं. मग त्याने त्याला पूर्णपणे झाकून घेतलं. छतावर चांगलं वाटायला लागलं.
आणखी थोड्या वेळाने अंधार होऊ लागला.
पश्चिमेकडून येणा-या ह्या अंधाराने त्या सम्पूर्ण शहराला झाकून टाकलं, पुल आणि महाल गायब झाले.
सगळं अदृश्य झालं, जणु
त्याचं कधी अस्तित्वंच नव्हत. सम्पूर्ण आकाशांत आगीची एक लकेर धावंत होती. मग
शहरावर कडकड करंत वीज पडली. दुस-यांदा विजेच्या कडकडाटानंतर मुसळधार पाऊस सुरू
झाला, त्या
अंधारांत वोलान्द अदृश्य झाला.
**********
तीस
अखेरचा निरोप
“माहितीये,” मार्गारीटा म्हणंत होती, “काल रात्री तू झोपल्यावर मी त्या अंधाराबद्दल वाचंत होते, जो भूमध्यसागरातून उठला
होता...आणि त्या प्रतिमा, आह, त्या
सोनेरी प्रतिमा...माहीत नाही कां, त्या मला चैन नाही घेऊं देत. मला वाटतंय, की आत्तासुद्धां पाउस येणार आहे. तुला वातावरणाची प्रसन्नता जाणवतेय का?”
“हे सगळं गोड आणि हवंहवंस आहे,” मास्टरने सिगरेटचा कश घेऊन हाताने धूर सारंत म्हटलं, “ह्या प्रतिमासुद्धा...देव
त्यांची रक्षा करो. पण पुढे काय होणार आहे, मला काही कळंत नाहीये!”
हा वार्तालाप सूर्यास्ताच्या वेळेस होत होता, तेव्हांच, जेव्हां
छतावर वोलान्दकडे लेवी मैथ्यू आला होता. तळघराच्या घराची खिडकी उघडी होती, आणि जर कोणी तिच्यातून
डोकावून बघितलं असतं, तर त्याला हे बघून आश्चर्य वाटलं असतं, की हे,
वार्तालाप करणारे, किती
विचित्र दिसताहेत. मार्गारीटाच्या अंगावर फक्त एक काळा लांब रेनकोट होता, आणि मास्टर आपल्या हॉस्पिटलच्याच
कपड्यांत होता. ह्याच कारण हे होतं, की मार्गारीटाजवळ घालण्यासाठी काही दुसरं नव्हतंच, कारण तिच्या सगळ्या वस्तू
त्या आलीशान महालांत होत्या, आणि, जरी
तो आलीशान महल इथून बिल्कुल दूर नव्हता, पण, निश्चितंच, तिथे जाऊन आपल्या वस्तू
घेऊन येण्याचा प्रश्नंच नव्हता. मास्टरचे पण सगळे कपडे तिथेच अलमारीत होते, जणु तो कुठे गेलेलाच
नव्हता; त्यालापण, बस, कपडे घालणं आवश्यक नाही
वाटलं. तो मार्गारीटासमोर हा विचार मांडंत होता, की बस लवकरंच कोणचातरी अद्भुत चमत्कार होणारंच आहे. हिवाळ्याच्या त्या
रात्रीनंतर त्याने पहिल्यांदा आपल्या हाताने दाढी केली होती. हॉस्पिटलमधे त्याची
दाढी मशीनीने करण्यांत येत होती.
खोली खूप विचित्र दिसंत होती. तिच्या अस्तव्यस्ततेत काहीही शोधणं बरंच कठीण
होतं. गालिच्यावर हस्तलिखितांचा ढीग पडला होता. खुर्चीवर एक चुरगरळेलं पुस्तक पडलं
होतं. गोल टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंबरोबर काही बाटल्यासुद्धां होत्या. हे
सगळं कुठून आणि कसं आलं, ह्याच्याबद्दल ना तर मास्टरला माहीत होतं, ना ही मार्गारीटाला. जेव्हां ते झोपेतून उठले, तेव्हां हे सगळं टेबलवर ठेवलेलं होतं.
शनिवारच्या संध्याकाळ पर्यंत मस्त झोप घेतल्यानंतर मास्टर आणि मार्गारीटाला
खूप उत्साही वाटंत होतं, आणि कालच्या अद्भुत घटनांची आठवण फक्त एकंच गोष्ट करून देत होती – दोघांचंही
डावं कानशील दुखंत होतं. दोघांच्याही मानसिकतेंत बरेंच बदल झाले होते, हे त्या तळघरांत होत
असलेल्या गोष्टी ऐकून कोणीही सांगू शकलं असतं. पण ऐकणारं कुणी नव्हतंच. हे अंगण
अशासाठीसुद्धां चांगलं होतं, की ते नेहमीच रिकामं असयाचं. दररोज लिण्डनची हिरवीगार झाडं आणि खिडकीच्या
बाहेरचे विलो वसंती सुगंध फेकायचे, जिला वाहंत असणारी हवा तळघरापर्यंत घेऊन यायची.
“छिः छिः!” अचानक मास्टर उद्गारला, “नुसता विचार करूनंच किती विचित्र वाटतंय,”
त्याने उरलेली सिगरेट ऐश-ट्रेमधे विझवली आणि दोन्ही हातांनी
डोकं धरून म्हणाला, “नाहे, ऐक, तू तर हुशार आहेस, आणि पागलसुद्धां नव्हती.
तुला काय ह्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे कां, की काल आपण सैतानाकडे होतो?”
‘पूर्ण खात्री आहे,” मार्गारीटाने उत्तर दिलं.
मास्टर उपहासाने म्हणाला, “नक्की, नक्कीच!
आता एकाच्या ऐवजी दोन-दोन पागल झालें! नवरापण आणि बायकोसुद्धां!” त्याने आकाशाकडे
हात उंचावून ओरडंत म्हटलं, “नाही, सैतान
जाने हे काय आहे! सैतान, सैतान, सैतान!”
उत्तर देण्याऐवजी मार्गारीटा दीवानवर लोळूं लागली, ती आपले अनवाणी पाय
जोरजोराने हालवंत हसू लागली आणि मग किंचाळली, “ओह, नाही!
पुरे! सहन नाही होत! बघ तर खरं तू कसा दिसतोयंस?”
बराच वेळ हसल्यावर जेव्हां मास्टर लाजून आपले हॉस्पिटलचे अंतर्वस्त्र
सांभाळंत होता, मार्गारीटा
गंभीरतेने म्हणाली, “तू नकळतंच खरं सांगितलंय; सैतानालाच माहीत आहे, की ते काय होतं, आणि सैतान...माझ्यावर विश्वास ठेव, सगळं ठीक करेल!” तिचे डोळे अचानक चमकू लागले, ती उड्या मारंत आपल्याच जागेवर नाचू लागली आणि ओरडू लागली, “मी कित्ती भाग्यशाली आहे, मी कित्ती भाग्यशाली
आहे...मी कित्ती भाग्यशाली आहे की त्याच्याबरोबर करार केला! ओह, सैतान, सैतान! माझ्या लाडक्या, तुला चेटकिणीसोबत राहावं
लागेल.” ह्याच्यानंतर ती मास्टरच्या छातीला बिलगली आणि आवेगाने त्याच्या ओठांचे, नाकाचे आणि गालांचे मुके
घेऊं लागली. काळ्या, विस्कटलेल्या केसांच्या लटा मास्टरवर खेळंत होत्या आणि त्याचं कपाळ आणि ओठ
ह्या चुम्बनांनी जळजळ करूं लागले.
“तू खरंच चेटकिणीसारखी झालीये.”
“मी नाहीपण म्हणंत नाहीये!” मार्गारीटाने उत्तर दिलं, “मी चेटकीण आहे, आणि त्यामुळे फार खूष
आहे.”
“बरं, ठीक
आहे,” मास्टर म्हणाला. “चेटकीण तर चेटकीणं. खूप सुन्दर आणि शानदार आहेस! मला
कदाचित हॉस्पिटलमधून चोरून आणल आहेस! हे पण खूप छान आहे! इथे आणून सोडून गेले, चला, हे पण कबूल आहे...हापण
विचार कर, की
आपल्याला पुन्हांतर नाही पकडणार, पण देवासाठी, मला येवढं सांग, की आपण जगूं कसे? हे मी ह्याच्यासाठी विचारतोय, की मला तुझी काळजी आहे, विश्वास ठेव.”
ह्याच वेळेस खिडकींत एक जोडी जोडे आणि धारी-धारीच्या पैण्टच्या खालचा भाग
दिसला. मग ही पैण्ट गुडघ्यांवर वाकली, आणि दिवसाच्या प्रकाशाला कोणाच्या तरी मागच्या जाड्या भागाने झाकलं.
“अलोइज़ी, तू
घरी आहेस कां?” एक आवाज ऐकू आला.
“बघ, झालं
सुरू,” मास्टर म्हणाला.
मार्गारीटाने खिडकीजवळ येत म्हटलं, “अलोइज़ी?...काल संध्याकाळी त्याला पकडून नेलं. कोण विचारतंय? तुमचं नाव काय आहे?”
“गुडघे आणि शरीराचा मागचा भाग गायब झाले, आणि गेट बंद व्हायचा आवाज आला, मग सगळं सामान्य झालं. मार्गारीटा दीवानवर पडून इतकं हसली, की तिच्या डोळ्यांत अश्रू आले. पण जेव्हां ती शांत झाली, तेव्हां तिच्या चेह-याचा
भाव एकदम बदलला. ती खूप गंभीरतेने बोलंत दीवानवरून उतरून गुडघ्यांवर चालंत
मास्टरच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यांत बघंत त्याचं डोकं कुरवाळू लागली.
“तुला कित्ती त्रास सोसावा लागला, कित्ती दुःख झेलावं लागल, माझ्या लाडक्या! हे फक्त मलांच माहीतीये. बघ, तुझ्या
केसांत चांदी झळकतीये आणि ओठांच्याजवळ सुरकुत्या पडल्या आहेत. माझ्या लाडक्या, माझ्या आपल्या, आता कोणत्याच गोष्टीची
काळजी नको करू. तुला खूप काही विचार करावा लागलाय आणि आता तुझ्यासाठी विचार करेन
मी! मी वचन देते, वचन
देते की सगळं ठीक होईल, जेवढी अपेक्षा आहे, त्याच्यापेक्षांही जास्त...”
“मला कोणत्याच गोष्टीची भीती नाहीये, मार्गो,” मास्टरने लगेच उत्तर दिलं आणि त्याने डोकं वर उचललं तर मार्गारीटाला वाटलं, की तो अगदी तस्साचं आहे, जसा तेव्हां होता, जेव्हां तो रचना करंत होता
त्याची - जे कधी बघितलं नव्हतं, पण ज्याच्याबद्दल, कदाचित, त्याला
माहीत होतं, की
ते झालं होतं, “मी घाबरंतपण नाही, कारण की मी सगळं सहन केलंय, त्यांनी मला खूप भीती दाखवली, आता आणखी कोणच्याही गोष्टीने घाबरवूं शकंत नाही. पण मला तुझ्यासाठी दुःख वाटतंय, मार्गो! हेच महत्वपूर्ण
आहे, म्हणूनंच
मी पुन्हां-पुन्हां जोर देतोय. स्वतःला सांभाळ! एका आजारी आणि गरीब माणसासाठी तू आपलं जीवन कां बर्बाद
करतेस? पुन्हां
आपल्या घरी चालली जा! मला तुझी कीव वाटते...म्हणूनंच असं म्हणतोय.”
“आह! तू...तू...” विस्कटलेल्या केसांचं आपलं डोकं हालवंत मार्गारीटा
कुजबुजली, “तू विश्वास नाही करंत, दुर्दैवी माणसा! तुझ्यासाठी कालची सम्पूर्ण रात्र मी नग्नावस्थेत थरथरंत
राहिले! मी आपलं स्वरूप बदलून टाकलं, कित्तीतरी महिने मी अंधा-या कोठडीत बसून एकाच गोष्टीबद्दल – येर्शलाइमवर
आलेल्या वादळाबद्दल विचार करंत राहिले, रडून-रडून माझे डोळे गेले, आणि आता...जेव्हां सुखाचे दिवस येण्यातंच आहेत, तर तू मला दूर लोटतो आहेस? मी चालली जाईन, चालली जाईन मी, पण लक्षांत ठेव, तू निष्ठुर आहेस! त्यांनी तुझी आत्मा चिरडून टाकलीये!”
मास्टरच्या हृदयांत कटु-कोमल भावनांनी गर्दी केली आणि न जाणे कां, तो मार्गारीटाच्या केसांत
आपला चेहरा लपवून रडू लागला. ती रडतां-रडतां
कुजबुजंत होती, तिची
बोटं मास्टरची कानशिलं कुरवाळंत राहिली.
“हो, चांदीचे
तार, चांदीचे, माझ्या डोळ्यांदेखत ह्या
डोक्याला बर्फ झाकतोय. आह! दुःखाच्या ओझ्याने दबलेलं माझं हे डोकं. बघ, कसे झालेयंत तुझे डोळे!
त्यांत वाळवण्ट आहे...आणि खांदे, खांद्यांवर कित्ती ओझं आहे...तोडून टाकलंय, तोडून टाकलंय त्यांनी तुला,” मार्गारीट असम्बद्ध शब्द बडबडंत राहिली, रडतां-रडतां ती थरथरू लागली.
तेव्हां मास्टरने आपले डोळे पुसले, मार्गारीटाला उभं केलं, स्वतःसुद्धां उभा राहिला आणि निश्चयपूर्वक म्हणाला, “बस! पुरे! तू मला लाजवलंय.
आता मी कधीच हिम्मत नाही सोडणार आणि हा वादपण पुन्हां सुरूं नाही करणार; तूसुद्धां शांत हो. मला
माहितीये, आपण
दोघं आपल्या मानसिक आजाराने त्रस्त आहोत! कदाचित मी माझी मानसिकता तुला
दिलीये...तर, आपण
एकत्र सगळ झेलूं...”
मार्गारीटा मास्टरच्या कानाजवळ आपले ओठ आणंत म्हणाली, “तुझ्या जीवनाची शप्पथ, तू रचलेल्या
भविष्यवेत्ताच्या मुलाची शप्पथ, सगळं ठीक होईल.”
मास्टरने हसंत म्हटलं, “बस...बस, गप्प
बस. जेव्हां लोक पूर्णपणे लुटले जातांत, जसे आपण आहोत, तेव्हां कोणच्यातरी अलौकिक शक्तीतंच आधार शोधतांत! बर, मी पण हे करायला तयार
आहे.”
“ओह…तर
तू...पहिल्या सारखा...हसतो आहेस,” मार्गारीटा म्हणाली, “तू आपल्या अवजड शब्दांबरोबर सैतानाकडे जा. लौकिक शक्ती किंवा अलौकिक शक्ती –
काय सगळ्या एकसारख्या नसतांत? मला भूक लागलीये!”
ती मास्टरचा हात धरून त्याला टेबलाजवळ घेऊन गेली.
“मला विश्वास नाहीये, की ह्या खाण्यापिण्याच्या वस्तू इतक्यांतंच जमिनींत गडप होणार नाही, किंवा उडून खिडकीच्या
बाहेर नाही चालल्या जाणार,” त्याने आता पूर्णपणे शांत होत म्हटलं.
“त्या नाही उडणार!”
तेवढ्यांत खिडकींत एक अनुनासिक आवाज ऐकू आला, “तुम्हांला शांती लाभो!”1
मास्टर थरथरला, पण आता पर्यंत चमत्कारांची सवय झालेली मार्गारीटा ओरडली, “हो, हा अजाज़ेलो आहे! आह, कित्ती छान, कित्ती प्रिय आहे ही
जाणीव!” ती मास्टरच्या कानांत कुजबुजली, “बघ, ते
आपल्याला विसरले नाहीयेत!” ती दार उघडायला पळाली.
“तू कमीत कमी स्वतःला नीट झाकून तर घे,”
मागून मास्टर ओरडला.
“जाऊ दे रे!” आता मार्गारीटा प्रवेशकक्षांत पोहोचली होती.
आता अजाज़ेलो अभिवादन करंत होता, मास्टरला नमस्कार करंत होता, त्याच्याकडे आपल्या चमकणा-या तिरप्या डोळ्याने बघंत होता, आणि मार्गारीटा आनंदाने
ओरडली, “आह, मी
कित्ती खूष आहे! जीवनांत येवढी खूष मी कधीच नव्हते! पण, माफ कर, अजाज़ेलो, माझ्या अंगावर कपडे नाहीत!”
अजाज़ेलो म्हणाला, की तिने काळजी करू नये, त्याने न केवळ बिनकपड्यांच्या, पण बिनचामडीच्या बायकासुद्धां पाहिल्या आहेत; आणि तो आनंदाने टेबलाजवळ बसला, आणि शेकोटीच्याजवळ, कोप-यांत, त्याने
काळ्या ब्रोकेडमधे गुंडाळलेलं एक पैकेट ठेवून दिलं.
मार्गारीटाने अजाज़ेलोच्या प्याल्यांत कोन्याक भरली, जी तो लगेच पिऊन गेला.
मास्टर त्याच्याकडे एकटक बघंत होता आणि मधून-मधून टेबलाच्याखाली आपल्या डाव्या
हाताला चिमटासुद्धां काढंत होता. पण ह्या चिमट्यांनी काही फायदा नाही झाला.
अजाज़ेलो हवेत विरघळून नाही गेला. ह्या लाल केस असलेल्या ठेंगण्या माणसांत काहीही
विचित्र नव्हतं, फक्त
त्याचा डोळा थोडा पांढरा होता; पण हे ज़रूरी तर नाही, की त्याच्या जादूशी सम्बंध असलाच पाहिजे. त्याचा पोषाकपण साधारणंच होता –
काही चोगा, किंवा
कोट! जर नीट विचार केला, तर असं पण असतं. कोन्याकसुद्धां तो सहजपणे पीत होता – इतर सगळ्या सभ्य
माणसांसारखा, गटगट, काही न खाता. ह्या कोन्याकनेच
मास्टरचं डोकं गरगरूं लागल आणि तो विचार करू लागला:
“नाही, मार्गारीटा
बरोबर म्हणतेय! माझ्या समोर सैतानाचा दूतंच बसला आहे. मीच तर आत्ता परवाच रात्री
इवानसमोर सिद्ध केलं होतं, की पत्रियार्शीवर तो सैतानाला भेटला होता आणि आता माहीत नाही कां, ह्या विचाराला घाबरून
सम्मोहन आणि भ्रमांबद्दल बडबडू लागलो. कुठले आलेत सम्मोहक!”
तो अजाज़ेलोकडे लक्ष देऊन बघंत होता आणि त्याला विश्वास झाला की त्याच्या
डोळ्यांत एक दृढ निश्चय आहे, काहीतरी विचार आहे, जो योग्य वेळ येईपर्यंत तो नाही सांगणार, तो फक्त भेटायला नाही आलाय, त्याला काही विशेष कामाने पाठवलंय,”
मास्टरने विचार केला.
कोन्याकचा तिसरा पैग पिऊन, जिचा त्याचावर काहीही असर नव्हता झाला, पाहुण्याने आपली गोष्ट सुरू केली, “हे तळघर खूप आरामशीर आहे, सैतान मला घेऊन जावो! मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतोय, की ह्याच्यांत राहून
करायचं काय?”
“हेच तर मीपण म्हणतोय,” मास्टरने स्मित करंत उत्तर दिलं.
“तू मला कां त्रास देतोय, अजाज़ेलो?” मार्गारीटाने विचारलं, “काहीही करून घेऊं!”
“तुम्ही काय म्हणताय?” अजाज़ेलो विस्मयाने म्हणाला, “माझ्या डोक्यांत तुम्हाला त्रास देण्याचा विचारपण नाही आला. मी तर स्वतःच
म्हणतोय – काहीही करून घेऊं. हो, मी तर विसरूनंच गेलो होतो, मालकांनी तुम्हांला सलाम पाठवलाय आणि हे सांगायला पाठवलंय, की ते तुम्हांला एक छोटासा
फेरफटका मारायचं निमंत्रण देताहेत...नक्कीच...तुमची इच्छा असल्यास. तुम्हीं काय
म्हणताय?” मार्गारीटाने टेबलाच्या खाली मास्टरला पायाने धक्का दिला.
“आनंदाने,” मास्टरने अजाज़ेलोला परखंत उत्तर दिल, आणि तो पुढे म्हणाला:
“आम्हांला आशा आहे, की मार्गारीटा निकोलायेव्नापण नाही म्हणणार नाही?”
“मी तर कधीच नाही म्हणणार नाही,” मार्गारीटाने उत्तर दिलं आणि तिचा पाय पुन्हां मास्तरच्या पायावर रांगला.
अजाज़ेलो खिदळला, “खूप छान! मला असं आवडतं! एक-दोन आणि आम्ही तय्यार आहोत! नाहीतर
तेव्हां...अलेक्सान्द्रोव्स्की पार्कमधे...आता तसं नाहीये.”
“आह, त्याची
आठवण नका देऊं, अजाज़ेलो!
तेव्हां मी मूर्ख होते. पण त्यासाठी फक्त मलांच दोष नको द्यायला – रोज-रोज तर कोणी
सैतानी शक्तीला भेटंत नाही.”
“काय म्हणता!” अजाज़ेलोने पुष्टी करंत म्हटलं, “जर रोज-रोज भेटतां आलं तर चांगलं झाल असतं!”
“मला स्वतःलापण गति आवडते,” मार्गारीटा उत्तेजनेने म्हणाली, “आवडते गति आणि नग्नता. जसं पिस्तौलने – फट्! आह, काय नेम आहे ह्याचा,” मार्गारीटा मास्टरकडे बघंत म्हणाली, “सत्ती उशीच्या खाली, आणि कोणत्याही चिन्हांवर गोळी...” मार्गारीटाला नशा चढंत होता, ज्याने तिचे डोळे जळजळ
करंत होते.
“मी पुन्हां विसरलो...” अजाज़ेलो ओरडला आणि त्याने आपल्या कपाळावर हात मारंत
म्हटलं, “एकदम विसरलो. मालकांनी तुमच्यासाठी भेट पाठवली आहे,” आता तो मास्टरकडे वळला, “वाइनची ही बाटली. कृपा
करून लक्ष द्या, ही
तीच वाइन आहे जी जूडियाचा न्यायाधीश प्यायचा. फालेर्नो वाइन.”
स्वाभाविकंच होतं की ह्या दुर्लभ वस्तूने मास्टर आणि मार्गारीटाला बरंच
आकर्षित केलं. अजाज़ेलोने काळ्या ब्रोकेडमधे गुंडाललेली ती गच्च भरलेली बाटली काढली.
दारूचा वास घेऊन तिला प्याल्यांमधे ओतण्यांत आलं, त्याच्या आरपार खिडकीतून बाहेर वादळाच्या आधी लुप्त होत असलेला उजेड पाहिला.
हे पण बघितलं की सगळंच लाल दिसंत होतं.
“वोलान्दच्या आरोग्यासाठी!”
तिघांनी आपले-आपले प्याले ओठांना लावले आणि एक-एक मोट्ठा घोट घेतला.
मास्टरच्या डोळ्यांसमोरून लगेच वादळाआधीचा प्रकाश लुप्त व्हायला लागला, त्याचा श्वास थांबू लागला, त्याला वाटलं की आता
शेवटची घटका आलीये. त्याने हेसुद्धां बघितलं की प्रेतासारख्या पिवळ्या पडलेल्या
मार्गारीटाने असहाय होऊन त्याच्याकडे हात केले, टेबलावर डोकं आपटलं आणि मग फरशीवर घसरू लागली.
“ विषारी...” मास्टर येवढंच ओरडला. त्याने टेबलावरून चाकू उचलून अजाज़ेलोवर
फेकायचा प्रयत्न केला, पण त्याचा हात निढाल होऊन टेबलक्लॉथच्या खाली घसरला, आजूबाजूच्या सगळ्या वस्तू
काळ्या पडल्या, आणि
सगळंच लुप्त झालं. तो पाठीवर पडला. पडता-पडता अलमारीला घासून त्याच्या कानशिलावरची
चामडी सोलली गेली.
जेव्हां विषाचे शिकार शांत झाले, तेव्हां अजाज़ेलोने आपलं काम सुरू केलं. सगळ्यांत आधी तो खिडकीच्या बाहेर आला
आणि काही क्षणांतच त्या आलीशान घरामधे गेला, जिथे मार्गारीटा राहायची. नेहमी व्यवस्थितपणे काम करणारा अजाज़ेलो ही खात्री
करून घेणार होता, की
सगळं व्यवस्थित झालंय किंवा नाही. आणि, सगळं अगदी व्यवस्थित झालेलं होतं. अजाज़ेलोने बघितलं की कशी एक उदास, नवरा परंत येण्याची वाट
बघंत असलेली महिला आपल्या शयनगृहातूंन निघाली, एकदम पिवळी धम्म् झाली, आणि छाती धरून असहायतेने ओरडली, “नताशा! कोणी आहे का...माझ्याकडे ये!” ती स्टडीरूममध्ये जाण्याआधीच
ड्राइंगरूमच्या फरशीवर पडली.
“सगळं ठीक आहे,” अजाज़ेलोने म्हटलं. पुढच्याच क्षणी तो बेशुद्ध पडलेल्या प्रेमिकांच्या जवळ
होता.
मार्गारीटा तोंडावर गालीच्यावर पडली होती. आपल्या पोलादी हातांनी अजाज़ेलोने
तिला वळवलं, जणु
एखाद्या बाहुलीला फिरवतोय. आणि तिच्याकडे बघूं लागला. बघतां-बघतां विष दिलेल्या
महिलेचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर बदलूं लागला. घुमडंत येणा-या वादळी
अंधारांतसुद्द्धां स्पष्ट दिसंत होतं, की थोड्या वेळासाठी चेटकीपणामुळे झालेलं डोळ्याचं तिरकसपण, क्रूरतेचे भाव आणि
नाका-डोळ्यांची उन्मादकता गायब झाले. मृत महिलेच्या चेह-यावर सौम्यतेचा भाव आला.
तिचे उघडे दात लोलुपतेच्या ऐवजी आता स्त्रीसुलभ पीडा दर्शवंत होते. तेव्हां
अजाज़ेलोने तिच्या पाढ-या दातांना वेगळं केलं आणि तिच्या तोंडांत त्याच वाइनचे काही
थेंब टाकले, ज्याने
तिला मारून टाकलं होतं. मार्गारीटाने
उसासा घेतला, अजाज़ेलोच्या मदतीशिवाय उठू लागली आणि बसून अशक्त
आवाजांत विचारूं लागली, “कां अजाज़ेलो, कशाला? तू मला काय करून
टाकलंय?”
तिने पडलेल्या
मास्टरकडे पाहिलं, थरथरली आणि कुजबुजली:
“मला ही अपेक्षा
नव्हती...हत्यारा!”
“नाही, बिल्कुल नाही,” अजाज़ेलोने उत्तर
दिलं,
“आत्ताच
तोसुद्धा उठेल. आह, तुम्हीं इतक्या बेहाल कां होता आहे?”
मार्गारीटाने लगेच
त्याचा विश्वास केला, लाल केसवाल्या सैतानाचा स्वरंच इतका आश्वासक होता, मार्गारीटाने उडी
मारली,
जीवंत
आणि शक्तीने भरपूर, आणि तिने पडलेल्या मास्टरला वाइनचे थेंब पाजण्यांत अजाज़ेलोची मदत
केली. डोळे उघडल्यावर मास्टरने निराशेने इकडे-तिकडे पाहिलं आणि तिरस्काराने तोच
शब्द उच्चारला,
“विषारी...”
“आह! चांगल्या
कामाचा पुरस्कार साधारणपणे अपमानाच्या स्वरूपातंच मिळते,” अजाज़ेलोने उत्तर दिलं, “तू आंधळा आहेस कां? पण तू लगेच बरा
होशील.”
आता मास्टर उठला.
निरोगी आणि स्वच्छ डोळ्यांनी इकडे-तिकडे बघंत विचारू लागला, “ह्या नवीन
चमत्काराचा काय अर्थ आहे?”
“ह्याचा अर्थ आहे,” अजाज़ेलोने उत्तर
दिलं,
“की
वेळ आलीये,
विजा
कडकडू लागल्याहेत, ऐकतोयंस नं? अंधार होतो आहे. घोडे चौफेर उधळंत येताहेत, लहानसा बगीचा
हादरतोय. ह्या तळघराचा निरोप घ्या, लवकर निरोप घ्या.”
“ओह, समजतोय,” मास्टरने डोळे
विस्फारंत म्हटलं, “तू आम्हांला मारून टाकलंय, आम्हीं मृत आहोत. आह, कित्ती हुशारीचं काम
केलंय! कित्ती योग्य वेळेवर केलंय! आता मी तुम्हाला समजतोय.”
अजाज़ेलोने उत्तर
दिलं,
“कृपा
करून…कृपा करून...मी
तुम्हांलाच ऐकतोय कां? तुमची प्रेयसी तुम्हांला मास्टर म्हणते, तुम्हीं विचार करा, तुम्हीं कसे मरूं
शकता?
काय
स्वतःला जीवन्त समजण्यासाठी तळघरांतच बसावं लागतं, शर्ट आणि हॉस्पिटलचे
अंतर्वस्त्र घालून? हे हास्यास्पद आहे!”
“तुम्हीं जे काही
म्हटलं,
ते
सगळं मला समजलंय,” मास्टर ओरडला, “पुढे काही नका बोलू! तुम्हीं हज्जारदा बरोबर आहांत!”
“महान वोलान्द!” मार्गारीटा पुष्टी
करंत म्हणाली,
“महान
वोलान्द! त्याने माझ्यापेक्षा कित्येक पटीने उत्तम गोष्टीचा विचार केला. पण फक्त
कादम्बरी,
कादम्बरी...”
ती ओरडून मास्टरला म्हणाली, “कादम्बरी आपल्या बरोबर घे, कुठेही उडून जात असला तरी!”
“काही गरंज नाहीये,” मास्टरने उत्तर दिलं, “मला ती तोंडपाठ आहे.”
“पण, तू एकही
शब्द...तिच्यांतला एकही शब्द विसरणार तर नाही?” मार्गारीटाने प्रियकाराला
बिलगून त्याच्या कानशिलावर वाहणारं रक्त पुसंत विचारलं.
“घाबरू नकोस! आता मी
कधीही काहीही नाही विसरणार,” तो म्हणाला.
“तर मग आग!...”
अजाज़ेलो ओरडला,
“आग
ज्याने सगळं सुरूं झालं आणि ज्याने आपण सगळं संपवूं.”
“आग!” मार्गारीटा
भयंकर आवाजांत गरजली. तळघराची खिडकी फट्कन उघडली, वा-याने पडदा एकीकडे सरकावून
दिला. आकाशांत थोडासा, छानसा कडकडाट झाला. अजाज़ेलोने शेकोटीत तीक्ष्ण नख असलेला हात
टाकून एक जळंत असलेलं लाकूड उचललं आणि टेबलक्लॉथला आग लावली. मग दीवानवर पडलेले
जुने वर्तमानपत्र जाळले. त्यानंतर हस्तलिखित आणि खिडकीचा पडदा. भविष्याच्या सुखद
घोड्याच्या सहलीच्या कल्पनेंत गुंग मास्तरने शेल्फमधून एक पुस्तक टेबलावर फेकलं
आनि त्याची पानं फाडून-फाडून जळंत असलेल्या टेबलक्लॉथवर फेकू लागला; पुस्तक त्या प्रसन्न
आगीत भडकलं.
“जळून जा, जळून जा, जुनं जीवन!”
“जळून जा, दुःखांनो आणि
पीडांनो!” मार्गारीटा ओरडली.
खोली लाल-लाल
लपटांनी भरून गेली आणि धुराबरोबरंच तिघेही दारातून बाहेर धावले, दगडाची पायरी चढून
ते अंगणांत आले. सगळ्यांत पहिली जी गोष्ट त्यांनी पाहिली, ती होती कॉन्ट्रॅक्टरची
स्वयंपाकीण,
जी
जमिनीवर बसली होती. तिच्या जवळ पडला होता कांदे-बटाट्यांचा ढीग. स्वयंपाकिणीची दशा
बघण्यालायक होती. तीन काळे घोडे घराच्या जवळ फुरफुरंत होते, आपल्या खुरांनी माती
उधळंत होते,
थरथरंत
होते. सगळ्यांत आधी मार्गारीटा उडी मारून बसली, त्यानंतर अजाज़ेलो, शेवटी मास्टर.
स्वयंपाकिणीने
विह्वळंत क्रॉसचं चिन्ह बनवण्यासाठी हात उचलला, पण घोड्यावर बसलेला अजाज़ेलो
गरजला,
“हात
कापून टाकीन!” त्याने शिट्टी वाजवली आणि घोड्यांनी लिण्डनच्या फांद्यांना तोडंत, वर झेप घेतली आणि
काळं ढग चिरंत लुप्त झाले. तेवढ्यांत तळघराच्या खिडकीतून धूर बाहेर निघाला आणि
स्वयंपाकिणीचा बारीक, अशक्त आवाज ऐकू आला,
“जळतोय!...”
घोडे मॉस्कोच्या
घरांच्या छतांच्या वर पोहोचले होते.
“मला शहराचा निरोप
घ्यायचाय,”
मास्टरने
ओरडून अजाजेलोला म्हटलं, जो सगळ्यांत पुढे होता. विजेचा कडकडाट मास्टरच्या
वाक्याचा शेवट गिळून गेला. अजाज़ेलोने डोकं हालवलं आणि आपल्या घोड्याला सरपट जाऊं
दिलं. उडणा-यांच्या स्वागतासाठी एक ढग तरंगंत आलं, पण त्याने अजूनपर्यंत पाण्याचा
शिडकावा नाही केला.
ते दुतर्फा झाडं
असलेल्या रस्त्यावर उडू लागले, बघितलं की लोकांच्या लहान-लहान आकृत्या पावसापासून
स्वतःला वाचवायला इकडे-तिकडे पळतात आहे. पावसाचे थेंब पडूं लागले होते. ते
धुराच्या ढगाच्या वरून उडंत होते – हे होते ग्रिबोयेदोवचे अवशेष. ते शहराच्या वर
उडले,
ज्याला
आता अंधाराने गिळून टाकलं होतं. त्यांच्या वरती विजा चमकंत होत्या. मग घरांच्या
छतांची जागा घेतली हिरवळीने, तेव्हां पावसाने त्यांना झोडपलं; उडंत असलेल्या त्या
तिन्हीं आकृत्या पाण्याने गच्च भरलेल्या फुग्यांसारख्या दिसू लागल्या.
मार्गारीटाला आधीच
उडायचा अनुभव होता, पण मास्टरला – नाही. त्याला हे बघून आश्चर्य झालं, की तो आपल्या
लक्ष्याकडे किती लवकर पोहोचलांय – म्हणजे त्याच्याकडे, ज्याचा निरोप त्याला घ्यायचा
होता. पावसाच्या चादरीत त्याने स्त्राविन्स्कीच्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगला ओळखलं; नदी आणि तिच्या
पलिकडच्या किना-यावर असलेल्या लिण्डन वनालासुद्धां त्याने ओळखलं, जे त्याला चांगलंच
माहीत होतं. ते हॉस्पिटलपासून थोड्या दूरवर एका झाडीत उतरले.
“मी तुमची इथेच वाट
बघेन,”
अजाज़ेलो
हाताची घडी घालून विजेच्या प्रकाशांत कधी प्रकट होत, तर कधी लुप्त होत ओरडला, “निरोप घेऊन या, पण लवकर.”
मास्टर आणि
मार्गारीटा घोड्यांवरून उतरले आणि पाण्याच्या बुडबुड्यांसारखे उडंत हॉस्पिटलच्या
बगीचाच्या वरून पुढे निघाले. एका क्षणानंतर मास्टरच्या सधलेल्या हातांनी
117नंबरच्या खोलीच्या बाल्कनींत उघडणारा जाळीचा दरवाजा उघडला, मार्गारीटा त्याच्या
मागे-मागे गेली. ते इवानूश्काच्या खोलींत घुसले. न दिसतां. विजा कडाडंत होत्या.
मास्टर पलंगाजवळ थांबला.
इवानूश्का चुपचाप
लोळला होता. तसांच जसा तेव्हां लोळला होता, जेव्हां त्याने पहिल्यांदा
आपल्या ह्या विश्रामगृहांत वादळ बघितलं होतं. पण तो तेव्हांसारखा रडंत नव्हता.
जेव्हां त्याने पाहिलं की कशी एक काळी सावली बाल्कनीतून त्याच्याकडे येते आहे, तर तो उठला आणि
आनंदाने हात पसरून म्हणाला, “ओह, हे तुम्हीं आहांत! मी तुमची कित्ती वाट बघितली. शेवटी
आलेच तुम्हीं,
माझे
शेजारी.”
ह्यावर मास्टरने
उत्तर दिलं,
“मी
इथे आहे! पण दुःखाची गोष्ट आहे, की मी आता तुझा शेजारी बनून नाही राहूं शकंत. मी
नेहमीसाठी उडून चाललोय आणि फक्त तुला भेटायला आलोय.”
“मला माहीत होतं, मला अंदाज़ होता...”
इवान हळूच म्हणाला आणि त्याने विचारलं, “तुम्हीं त्याला भेटलांत कां?”
“हो,” मास्टरने म्हटलं, “मी तुझा निरोप
घ्यायला आलोय कारण की तूच एक असा आहे, ज्याच्याशी मी मागच्या काही दिवसांत बोललो
होते.”
इवानूश्काचा चेहरा
चमकला आणि तो म्हणाला, “हे चांगलं केलं की तुम्हीं इथे उडून आले. मी दिलेल्या शब्दाचं
पालन करीन,
आता
कध्धीच कविता नाही लिहिणार. आता मला एका दुस-या वस्तूंत स्वारस्य आहे,” इवानूश्का हसला आणि
रानटी नजरेने मास्टरच्या पलीकडे बघू लागला, “माझी दुसरं काहीतरी लिहायची
इच्छा आहे. माहितीये, इथे पडल्या-पडल्या मला बरंच काही कळलं आहे.”
मास्टर हे शब्द ऐकून
चिंतित झाला आणि इवानूश्काच्या पलंगाच्या काठावर बसून म्हणाला, “हे ठीक आहे, छान आहे. तू
त्याच्याबद्दल पुढे लिहिशील!”
इवानूश्काचे डोळे
विस्फारित झाले,
“काय
तू स्वतः नाही लिहिणार?” त्याने डोकं खाली केलं आणि विचारमग्न होऊन म्हणाला, “ओह, हो...हे मी काय
विचारतोय!”
“हो,” मास्टर म्हणाला आणि
इवानूश्काला त्याचा आवाज पोकळ आणि अनोळखी वाटला, “मी आता त्याच्याबद्दल नाही
लिहिणार. मला दुसरे कामं करायचेत.”
दुरून वादळाच्या
गोंगाटाला भेदत एक शिट्टी आली.
“तू ऐकतोयंस?” मास्टरने विचारलं.
“वादळाचा गोंगाट...”
“नाही, हे मला बोलावताहेत, माझी वेळ झाली,” मास्टरने समजावलं आणि
तो पलंगावरून उठला.
“जरा थांबा! आणखी एक
गोष्ट...” इवानने विनंती केली, “ती तुम्हाला भेटली कां? ती तुमच्याशी निष्ठावान
राहिली?”
“ही बघ, ती...” मास्टरने
उत्तर देत भिंतीकडे खूण केली. पांढ-या भिंतीतून वेगळी होत मार्गारीटा पलंगाच्या
जवळ आली. तिने लोळलेल्या तरुणाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत करुणा झळकली.
“ओह, बिचारा, गरीब!” मार्गारीटा
स्वतःशीच कुजबुजली आणि पलंगाकडे वाकली.
“कित्ती सुन्दर
आहे!” इवानने हेवा न करता, पण दुःखाने आणि किंचित कोमलतेने म्हटलं, “बघा, तुमचं सगळं कसं छान
झालं. पण माझं तर तसं नाहीये,” काही वेळ विचार करून तो पुढे म्हणाला, “आणि कदाचित, शक्य आहे, की असं...”
“होऊं शकतं, होऊं शकतं,” मार्गारीटा कुजबुजली
आणि लोळलेल्या तरुणावर वाकून म्हणाली, “मी तुझ्या कपाळाचं चुम्बन घेईन आणि मग सगळं
तसंच होईल,
जसं
व्हायला पाहिजे...तू ह्या गोष्टीवर विश्वास ठेव, मी सगळं बघितलंय, मला सगळं माहीत
आहे.”
लोळलेल्या तरुणाने
आपल्या हातांनी तिच्या खांद्यांना धरलं आणि तिने त्याचं चुम्बन घेतलं.
“नमस्कार, माझ्या शिष्या,” मास्टरने हळूंच
म्हटलं आणि तो हवेंत वितळू लागला. तो गायब झाला, त्याच्याबरोबर मार्गारीटापण
लुप्त झाली. बाल्कनीची जाळी बंद झाली.
इवानूश्काला हुरहुर
लागली. तो पलंगावर उठून बसला, उत्तेजनेने इकडे-तिकडे बघूं लागला, विव्हळू लागला, स्वतःशीच बोलूं
लागला,
उठून
उभा राहिला. वादळाचा जोर वाढतंच होता. कदाचित त्यानेच इवान घाबरला होता. त्याला
ह्या गोष्टीचीपण काळजी वाटंत होती, की त्याच्या दाराच्या मागे, जिथे नेहमी शांतता असायची, त्याला घाबरलेली
चाहूल ऐकूं येत होती; दबके आवाजसुद्धां येत होते. त्याने थरथरंत आवाज दिला, “प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना!”
प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना खोलींत आली आणि काळजीने, प्रश्नार्थक नजरेने इवानूश्काकडे बघूं लागली.
“काय आहे? काय झालं?” तिने विचारलं, “वादळाची भीती वाटतेय? काही हरकत नाही, काही हरकत
नाही...आता तुमची मदत करते. मी आत्ताच डॉक्टरला बोलावते.”
“नाही, प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना,
डॉक्टरला
बोलवायची काही गरज नाहीये,” इवानूश्काने काळजीने प्रास्कोव्या
फ्योदोरोव्नाच्याऐवजी भिंतीकडे बघंत म्हटलं, “मला काही विशेष त्रास नाहीये, तुम्हीं घाबरू नका, मला सगळं समजतंय.
तुम्हीं कृपा करून सांगा...” इवानने कळकळीने म्हटलं, “तिथे, बाजूच्या, एकशे अठरा नंबरच्या खोलीत
आत्ता काय झालं?”
“एकशे अठरामधे?” प्रास्कोव्या
फ्योदोरोव्नाने प्रश्नंच विचारला आणि ती डोळे इकडे-तिकडे फिरवूं लागली, “तिथे काहीही झालेलं
नाहीये!”
पण तिचा आवाज सपशेल
खोटा वाटंत होता, इवानूश्काला हे लगेच समजलं आणि तो म्हणाला, “ए...प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना! तुम्हीं इतक्या खरं बोलणा-या आहांत...तुम्हांला वाटतंय की मी काही
गोंधळ घालेन?
नाही, प्रास्कोव्या
फ्योदोरोव्ना,
असं
काहीही नाही होणार. तुम्हीं खरं खरं सांगा. मला भिंतीच्या पलीकडून बराच काही आभास
होतोय.”
“इतक्यांत तुमचा
शेजारी मरण पावला!” प्रास्कोव्या फ्योदोरोव्ना कुजबुजली, आपल्या चांगुलपणाला आणि
खरेपणाला ती थांबवूं शकली नाही, आणि विजेच्या प्रकाशाने आलोकित, घाबरलेल्या
डोळ्यांनी इवानूश्काकडे बघूं लागली.
पण इवानूश्काला
काहीही झालं नाही. त्याने आकाशाकडे अर्थपूर्ण ढंगाने खूण केली आणि म्हणाला, “मला माहीत होतं, की हेंच होणार आहे!
मी खात्रीपूर्वक सांगतो, की आत्तांच शहरांतपण एका व्यक्तीचा मृत्य झालांय. मला
हेसुद्धा माहीत आहे, की कोणाचा...” इवानूश्काने गूढ स्मित करंत म्हटलं, “ती एक महिला आहे!”
*********
एकतीस
वरोब्योव1 टेकड्यांवर
वादळ काहीही मागमूस न सोडतां निघून गेलं आणि
सम्पूर्ण मॉस्कोला समेटणारं इंद्रधनुष्य आकाशांत प्रकट झालं, ज्याचं एक टोक
मॉस्को नदीचं जलप्राशन करंत होतं. वर टेकड्यांवर दोन उपवनांच्या मध्यभागांत तीन
सावल्या दिसल्या. वोलान्द, बेगेमोत आणि करोव्येव काळ्या घोड्यांवर बसले होते आणि
नदीच्या पलीकडे पसरलेल्या शहराकडे बघंत होते, ज्याच्यावर तुटका सूर्य
पश्चिमेकडे उघडंत असलेल्या हज्जारो खिडक्यांत आणि खेळण्यासारख्या दिवीच्यी
मॉनेस्ट्रीवर2 चमकंत होता.
हवेत सळसळ झाली आणि अजाज़ेलो, ज्याच्या कोटाच्या
काळ्या शेपटीच्या सावलींत मास्टर आणि मार्गारीटा उडंत होते, त्यांच्याबरोबर
घोड्यावरून उतरून वाट बघंत असणा-या ह्या तिघांच्या जवळ आला.
“तुम्हांला त्रास द्यावा
लागला,
मार्गारीटा
निकोलायेव्ना आणि मास्टर,” वोलान्दने शांतता भंग करंत म्हटलं, “पण तुम्हीं
माझ्याबद्दल कोणतीही चुकीची धारणा नका करून घेऊं. मला नाही वाटंत की तुम्हांला
नंतर पश्चात्ताप होईल. तर...” तो एकट्या मास्टरला म्हणाला, “शहराचा निरोप घ्या.
निघण्याची वेळ झाली आहे.”
वोलान्दने काळ्या पोलादी
हातमोजे घातलेल्या हाताने तिकडे खूण केली, जिथे नदीच्या पलीकडे काच
वितळवंत हज्जारो सूर्य चमकंत होते; जिथे ह्या सूर्यांच्या वरती दाटलं होतं धुकं, धूळ, दिवसभरांत शिणलेल्या
शहराचा घाम.
मास्टर घोड्यावरून उतरला, बाकी लोकांना सोडून
टेकडीच्या कड्याकडे धावला. त्याच्या मागे काळा कोट जमिनीवर घासंत जात होता. मास्टर
शहराकडे पाहूं लागला. पहिले काही क्षण निराशेचे भाव जागृत झाले, पण लगेच त्यांची
जागा घेतली एका गोड उत्तेजनेने, भटक्या जिप्सी उत्तेजनेने.
“नेहमीसाठी! हे समजलं
पाहिजे...” मास्टर कुजबुजला आणि त्याने आपल्या रुक्ष, तिडलेल्या ओठांवर जीभ
फिरवली. तो हृदयांत उठणा-या प्रत्येक भावनेचं आकलन करंत होता. त्याची उत्तेजना
शांत झाली;
खोल, आहत अपमानाच्या
भावनेने तिला पिटाळून लावलं. पण ही सुद्धां थोडाच वेळ थांबली; आता तिथे प्रकट झाली
एक दर्पयुक्त उदासीनता, त्यानंतर एका चिर शांतीची अनुभूति झाली.
ते सगळे चुपचाप मास्टरची वाट
बघंत होते. हा समूह बघंत होता, की लांब, काळी आकृती टेकडीच्या कड्यावर उभी राहून कसे
हाव-भाव प्रदर्शित करते आहे – कधी डोकं वर करतेय, जणु पूर्ण शहराला आपल्या
दृष्टिक्षेपांत घेतेय; कधी डोकं खाली करतेय, जणु पायांच्या खालच्या चिरडलेल्या गवताचं
अवलोकन करते आहे.
शांततेला भंग केलं
कंटाळलेल्या बेगेमोतने. म्हणाला, “मालक, मला निघायच्या आधी शिट्टी वाजवायची परवानगी द्या.”
“तू महिलेला घाबरवून टाकशील,” वोलान्दने उत्तर
दिलं,
“आणि
लक्षांत ठेव की तुझ्या आजच्या खोड्या संपलेल्या आहेत.”
“आह, नाही, नाही, महाशय,” कमरेवर हात ठेवून
खोगीरावर तिरपी बसलेली मार्गारीटा उद्गारली, तिच्या कोटाचं टोकदार शेपूट
जमिनीवर लोळंत होतं, “त्याला परवानगी द्या. शिट्टी वाजवूं द्या. मला लांबच्या प्रवासावर
जाण्याआधी उदास वाटतंय. महाशय, हे स्वाभाविक आहे का, तेव्हांसुद्धां, जेव्हां माणसाला
माहीत असतं,
की
ह्या प्रवासानंतर त्याला सुख भेटणार आहे? तो आपल्याला हसवेल, नाहीतर मला भीती वाटतेय, की मी रडू लागेन आणि
प्रवासाच्या आधीच सगळ्या केरांत जाईल.”
वोलान्दने बेगेमोतकडे बघून डोकं
हालवलं,
तो
एकदम रंगात आला,
जमिनीवर
उडी मारली;
तोंडांत
बोटं ठेवून गाल फुगवंत त्याने शिट्टी वाजवली. मार्गारीटाच्या कानांत घंट्या वाजूं
लागल्या. तिचा घोडा मागच्या पायांवर उभा राहिला, उपवनांत झांडाच्या वाळक्या
फांद्या पडंत असल्याची सरसर झाली; चिमण्या-कावळ्यांचा एक मोठा झुण्ड फडफडंत उडून गेला.
धुळीचं बवण्डर उठून नदीच्या जवळ पोहोचलं आणि काठा-काठाने जात असलेल्या ट्रामगाडींत
बसलेल्या काही मुशाफिरांच्या टोप्या उडून पाण्यांत पडल्या. मास्टर ह्या शिट्टीने
थरारला,
पण तो
वळला नाही,
तर
जास्तंच व्याकुळतेने आकाशाकडे हात उंचावून हाव-भाव प्रदर्शित करूं लागला – जणु
शहराला धमकावतोय. बेगेमोतने गर्वाने इकडे-तिकडे पाहिलं.
“शिट्टी तर वाजली, वादंच नाही,” सौजन्याने करोव्येव
म्हणाला,
“खरंच
शिट्टी वाजली,
पण खरं
सांगायचं तर अगदीच मध्यम दर्जाची शिट्टी होती!”
“मी काही कॉयर-मास्टर थोडांच
आहे,”
बेगेमोतने
काहीशा घमेण्डीत खिल्ली उडवंत म्हटलं, त्याने गाल फुगवले आणि अचानक मार्गारीटाकडे
बघून डोळा मारला.
“चला, मी आपल्या जुन्या
आठवणीने प्रयत्न करतो,” करोव्येव म्हणाला, त्याने हात पुसले आणि बोटांवर फूक मारली.
“तू बघ, बघ बरं,” आपल्या घोड्यावरून
वोलान्दचा गंभीर आवाज ऐकू आला, “कोणाला नुक्सान नको पोहोचायला.”
“मास्टर, विश्वास ठेवा,” करोव्येवने हृदयावर
हात ठेवून म्हटलं, “गम्मत, फक्त गम्मतीसाठी...” आता तो एकदम उंच-उंच होऊं लागला, जणु इलास्टिकचा
बनलाय;
उजव्या
हाताच्या बोटांनी त्याने एक अजबशी आक्रति बनवली, एखाद्या स्क्रूसारखा गोल-गोल
फिरला आणि मग उलंट दिशेला फिरंत अचानक शिट्टी वाजवली.
ह्या शिट्टीच्या आवाजाला
मार्गारीटा ऐकलं नाही, पण पाहिलं, जेव्हां ती आपल्या फुंकारणा-या घोड्यासकट दहा हात दूर
फेकली गेली. तिच्या बाजूचं ओक वृक्ष मुळासकट उपटून पडलं होतं आणि नदी पर्यंतची
जमीन भेगांनी भरून गेली होती. नदीकाठचा सगळा भाग, घाट आणि रेस्टॉरेन्टसकट, नदीत सामावला होता.
नदीचं पाणी उकळलं, उसळलं आणि त्याने जल-ट्रामगाडीला निर्दोष मुशाफिरांसकट समोरच्या
खालच्या,
हिरव्या
किना-यावर फेकून दिलं. मार्गारीटाच्या पायांजवळ करोव्येवच्या शिट्टीने मरून पडलेला
पक्षी होता. ह्या शिट्टीने मास्टरला घाबरवलं. त्याने डोकं धरलं आणि लगेच वाट
बघणा-यांच्या जवळ धावला.
“हँ, तर सगळे हिशेब चुकते केले? निरोप घेतला?” वोलान्दने घोड्यावर
बसल्या-बसल्या विचारलं.
“हो, घेतला,” मास्टरने म्हटलं आणि
शांत,
पण
निडर भावनेने सरळ वोलान्दच्या चेह-याकडे बघितलं.
तेव्हां टेकड्यांवर तुतारीसारखा
वोलान्दचा भयंकर आवाज घुमला, “चला!!” आणि घुमली बेगेमोतची तीव्र शिट्टी आणि हास्य.
घोडे लपकले, घोडेस्वार वर हवेंत
उठून वेगाने जाऊं लागले. मार्गारीटाला जाणवंत होतं, की तिचा घोडा कसा बेफाम होऊन
तिला नेतो आहे. वोलान्दच्या चोगा ह्या घोडदळाला समेटंत उडंत होता; चोगा संध्याकाळच्या
आकाशाला झाकंत जात होता. जेव्हां क्षणभरासाठी काळं पांघरुण दूर झालं, तर मार्गारीटाने
वळून मागे पाहिलं. आणि तिला दिसलं की फक्त मागे राहिलेले रंगी-बिरंगी मीनारच
त्यांच्यावर गिरक्या घेणा-या विमानांसह लुप्त नव्हते झाले, सम्पूर्ण शहरंच गायब झालेलं
होतं. ते केव्हांच जमिनींत सामावलं होतं आणि आपल्यामागे सोडून गेलं होतं फक्त दाट
धुकं.
**********
बत्तीस
क्षमा आणि चिरंतन आश्रय
अरे देवा! अरे माझ्या देवा!
संध्याकाळची पृथ्वी किती उदास भासते! तळ्यांच्या वरती असलेलं धुकं कित्ती गूढ
असतं! ह्याची जाणीव त्यालाच असूं शकते, जो ह्या धुक्यांत हरवला आहे, ज्याने मृत्युच्या
आधी असीम यातना झेलल्या आहेत, जो ह्या पृथ्वीवर उडला आहे, ज्याने आपल्या मनावर अवजंड
ओझं सहन केलेलं आहे. हे एक थकल्या-भागलेल्या माणसालांच कळू शकतं. तेव्हां तो
धुक्याचं हे जाळं काहीही दुःख़ न होता सोडून जाऊ शकतो, पृथ्वीवरच्या नद्यांपासून, तलावांपासून तोंड
फिरवूं शकतो,
निश्चिंत
मनाने स्वतःला मृत्यूच्या हातांत सोपवूं शकतो, हे माहीत असून की फक्त तीच
त्याला शांती प्रदान करू शकते.
जादुई काळे घोडेपण थकले होते
आणि आता ते आपल्या स्वारांना हळू-हळू नेत होते, आणि अपरिहार्य रात्र
त्यांच्या मागावर होती. रात्रीला आपल्या पाठीमाग़े अनुभव करून धृष्ठ बेगेमोतसुद्धां
शांत झाला,
तो
खोगीरांत आपले पंजे घट्ट रुतवून बसला होता, आपली शेपूट फुगवून तो चुपचाप
आणि गंभीरतेने उडंत होता. रात्र आपल्या काळ्या पदराने जंगलांवर आणि मैदानांवर पांघरूण घालंत चालली होती, दूर कुठेतरी खाली
टिमटिमंत असलेले उदास दिवे लावंत चालली होती; ज्यांत आता ना मार्गारीटाला
आणि ना ही मास्टरला काही रस होता आणि त्यांची काही गरंजही नव्हती – परके दिवे.
रात्र घोडेस्वारांना मागे सोडून, वरून त्यांच्यावर उदास आकाशांत इथे-तिथे ता-यांचे
पांढरे थेंब पेरंत होती.
रात्र दाट होत गेली; त्यांच्या बरोबर
उडताना ती मधून-मधून घोडेस्वारांचे कोट पकडायची आणि त्यांना खेचून सगळी माया, सगळे भ्रम दूर करायची.
जेव्हां गार वा-याचे फटके सहन करंत मार्गारीटाने आपले डोळे उघडले, तेव्हां बघितलं की
आपल्या उद्दिष्टाकडे उडंत असलेल्या सगळ्यांच रूप कसं परिवर्तित झालेलं आहे.
जेव्हां त्यांच्या स्वागतासाठी जंगलाच्या मागून लाल-लाल पूर्ण चंद्र उदित होऊ
लागला,
तेव्हां
सगळेच भ्रम गळून पडले, जादुई पोषाक घसरून दलदलीत पडले, धुक्यांत वितळून गेले.
करोव्येव-फागोतला ओळखणं
अशक्य होतं,
तोच जो
स्वतःला त्या रहस्यमय आणि कोणत्याही भाषातरांची गरज नसलेल्या कन्सल्टेन्टचा
अनुवादक म्हणवायचा, आणि जो आता वोलान्दच्या बाजूला, मास्टरच्या प्रियतमेच्या
उजवीकडे उडंत होता. करोव्येव-फागोतच्या नावानी जो व्यक्ति सर्कसच्या जोकरचा पोषाक
घालून वरोब्योव टेकड्यांवरून उडाला होता, त्याच्या जागेवर घोड्यावर सवार होता मंद किणकिण
करंत असलेली सोनेरी लगाम धरलेला काळसर-जांभळ्या रंगाचा सामन्त, त्याचा चेहरा अत्यंत
उदास होता,
तो
कदाचित कधीच स्मितसुद्धा करंत नसावा. त्याने आपली हनुवटी छातीवर टेकवली होती, तो चंद्राकडे बघंत नव्हता, आपल्या खालच्या मागे
सुटंत असलेल्या पृथ्वीत त्याला काही रस नव्हता. वोलान्दच्या बाजूने उडताना तो
आपल्याच विचारांत मग्न होता.
“तो इतका कां बदललाय?” शीळ घालंत असलेल्या
वा-यांत मार्गारीटाने हळूच वोलान्दला विचारलं.
“ह्या सामन्ताने कधी चुकीचा
विनोद केला होता,” वोलान्दने अंगा-यासारखा डोळा असलेला चेहरा मार्गारीटाकडे वळवून
म्हटलं. “अंधार-उजेडाबद्दल बोलताना त्याने केलेली शब्दकोटी बिल्कुल चांगली नव्हती.
म्हणूनंच ह्या सामन्ताला त्यानंतर दीर्घ काळासाठी आणखी जास्त विनोद करावा लागला,
त्याच्या कल्पनेपेक्षांही जास्त. पण आज ती रात्र आहे, जेव्हां कर्मांचा हिशेब
तपासला जातो. सामन्ताने आपला हिशेब पूर्णपणे चुकवलाय आणि त्याचं खातं बंद झालंय!”
रात्रीने बेगेमोतची लुसलुशीत
शेपूट गिळून टाकली, त्याच्या अंगावरून केसाळ कातडी खेचून तिचे तुकडे-तुकडे करून तळ्यांवर
फेकून दिले. तो जो बोका होता, रात्रीच्या राजकुमाराचं मनोरंजन करायचा, आता झाला होता एक
कृश तरुण,
सैतान-दूत, अत्युत्तम विनोद
करणारा,
जो
एकेकाळी जगांत राहात होता. आता तोपण मौन झाला होता आणि चुपचाप उडंत होता, आपला तरुण चेहरा
चंद्रामधून झरझर झरंत असलेल्या प्रकाशाकडे करून.
सगळ्यांत कोप-यावर उडंत होता
अजाज़ेलो,
चमकत्या
स्टीलच्या पोषाकांत. चद्राने त्याचासुद्धा चेहरा बदलून टाकला होता. त्याचा बाहेर
निघालेला घाणेरडा दात गायब झाला होता, डोळ्याचं तिरपेपणा सुद्धा मायावीच निघालं.
अजाजेलोचे दोन्हीं डोळे एकसारखेच होते, काळे आणि भावरहित, आणि चेहरा पांढराफट्ट आणि सर्द.
आता अजाज़ेलो आपल्या ख-या स्वरूपांत उडंत होता, वाळवंटाच्या सैतानाच्या
रूपांत,
सैतान-हत्या-याच्या
रूपांत.
स्वतःला तर मार्गारीटा बघू
नाही शकली,
पण तिने
नीट बघितलं की मास्टरसुद्धां बदललाय. आता चंद्राच्या प्रकाशांत त्याचे केस चमकंत
होते आणि मागे एका वेणीसारखे एकत्र झाले होते, जी वा-यांत उडंत होती.
जेव्हां मास्टरच्या पायांवरून कोट दूर व्हायचा, मार्गारीटाला त्याच्या
लांब-लांब जोड्यांमधे जळंत असलेले, विझंत असलेले तारे दिसायचे. तरुण सैतानासारखाच
मास्टरपण चंद्रावरून नजर न काढता उडंत होता, त्याच्याकडे बघून असा हसंत
होता,
जणु
पूर्व परिचित प्रियतमा असावी. एकशे अठरा नंबरच्या खोलींत लागलेल्या सवयीप्रमाणे
स्वतःशीच काहीतरी बडबडंत होता.
आणि, शेवटी, वोलान्दपण स्वतःच्या
ख-या स्वरूपांत उडंत होता. मार्गारीटाला समजलं नाही की त्याच्या घोड्याची लगाम
कश्याची बनली आहे, आणि ती विचार करंत होती की त्या चंद्राच्या साखळ्या आहेत, आणि त्याचा घोडा –
नैराश्याची प्रतिमूर्ती; घोड्याची ग्रीवा – काळ्या ढगाची, आणि घोडेस्वाराची रिकीब
– ता-यांच्या पांढ-या गुच्छ्यांची भासंत होती.
अश्या प्रकारे शांततेत बराच
वेळ उडत राहिले,
जोपर्यंत
खालचं दृश्य बदलू नाही लागलं.
उदास, निराश जंगल अंधा-या
पृथ्वीच्या गर्भांत बुडून गेले आणि आपल्यासोबत टिमटिम करणा-या नद्यांच्या
धारांनासुद्धां घेऊन गेले. खाली शिलाखण्ड दिसूं लागले, ते चमकंत होते आणि त्यांच्या
मधे मधे खोल जागा होत्या, जिथे चंद्राचा प्रकाश पोहोचंत नव्हता.
वोलान्दने एका दगडी, विषण्ण, सपाट उंचवट्यावर आपल्या
घोड्याची लगाम सैल सोडली आणि तेव्हां घोड्यांच्या खुरांच्या खाली चरमरंत असलेल्या
गोट्यांचा आणि खुंटांचा आवाज ऐकंत मण्डळी हळू-हळू जाऊ लागली. चंद्र ह्या ठिकाणी
आपला सम्पूर्ण,
हिरवंट
प्रकाश पसरंत होता आणि लवकरंच मार्गारीटाने ह्या विषण्ण जागेवर बघितली एक खुर्ची
आणि तिच्यांत बसलेल्या माणसाची श्वेत आकृति. शक्य होतं, की तो माणूस एकदम बहिरा होता, किंवा आपल्या
विचारांत हरवला होता. त्याने घोड्यांच्या वजनामुळे दगडी जमिनींत होत असलेल्या
कम्पनांना नाही ऐकलं, आणि मण्डळीसुद्धां त्याला त्रास न देता त्याच्याजवळ गेली.
चंद्र मार्गारीटाची मदत करंत
होता;
तो
विजेच्या सर्वोत्तम लैम्पपेक्षाही छान चमकंत होता. ह्या प्रकाशांत मार्गारीटाने
पाहिलं की बसलेला माणूस, ज्याचे डोळे आंधळ्यासारखे वाटंत होते, आपले हात चोळंत होता
आणि ह्याच निर्जीव नेत्रांना चंद्राकडे लावून होता. आता मार्गारीटाने हेसुद्धां
बघितलं,
की
त्या वजनदार पाषाणाच्या खुर्चीजवळ, जिच्यावर चंद्राच्या काही ठिणग्या चमकताहेत, एक काळा, भव्य, तीक्ष्ण कान असलेला
कुत्रा लोळला आहे, जो आपल्या मालकासारखाच व्याकुळतेने चंद्राकडे बघंतोय.
खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या
पायांजवळ तुटलेल्या सुरईचे तुकडे विखुरले आहेत आणि न वाळलेल्या काळपट-लाल द्रवाचं
छोटसं तळं बनलंय.
घोडेस्वारांनी आपले घोडे
थांबवले.
“तुमची कादम्बरी वाचली
गेलीये,”
वोलान्दने
मास्टरकडे वळून सांगायला सुरुवात केली, “आणि तिच्याबद्दल फक्त येवढंच सांगितलं आहे, की ती अपूर्ण आहे.
म्हणून मी तुम्हांला तुमचा नायक दाखवूं इच्छित होतो. जवळ-जवळ दोन हजार वर्षांपासून
तो इथे बसलेला आहे आणि झोपेत असतो, पण जेव्हां पौर्णिमेची रात्र येते, तर, तुम्हीं बघताय ना, की कशी अनिद्रा
त्याला सतावते. हा चंद्र न केवळ त्याला, पण त्याच्या स्वामिभक्त कुत्र्यालासुद्धां
व्याकूळ करतो. जर हे खरं असलं, की ‘कायरता – सर्वाधिक अक्षम्य अपराध आहे;, तर ह्यांत
कुत्र्याचा तर काही दोष नाहीये. हा बहादुर कुत्रा फक्त ज्या वस्तूला भ्यायला, ती म्हणजे – वादळ!
चला,
जाऊं
द्या,
जो
प्रेम करतो,
त्याला
प्रियकराच्या नशीबाचा वाटा भोगावांच लागतो.”
“तो काय म्हणतोय?” मार्गारीटाने
विचारलं आणि तिच्या शांत चेह-यावर सहानुभूती झळकली.
“तो म्हणतो आहे...”
वोलान्दचा आवाज घुमला, “बस एकंच गोष्ट, ती ही की चंद्राच्या प्रकाशांतसुद्धां त्याला चैन
नाहीये आणि त्याचं कर्तव्यंच इतकं वाईट आहे. असं तो सारखा म्हणंत असतो, जेव्हां झोपलेला
नसतो,
आणि
जेव्हां झोपतो,
तेव्हा
त्याला फक्त एकंच दृश्य दिसतं – चंद्र प्रकाशाचा रस्ता, ज्याच्यावर चालंत त्याला
जायचं आहे कैदी हा-नोस्त्रीच्या जवळ आणि त्याच्याशी बोलायचं आहे, कारण की त्याला
खात्री आहे,
की
तेव्हां,
वसन्त
ऋतूच्या निस्सान महिन्याच्या चौदा तारखेला तो त्याच्याशी नीट बोलूं शकला नव्हता.
पण,
हाय, तो ह्या रस्त्यावर
जाऊं शकंत नाही;
कोणी
त्याच्याजवळ येऊसुद्धा शकंत नाही. तर मग, काय करायचं, बस, तो स्वतःशीच बोलंत बसतो. पण
काहीतरी परिवर्तन तर व्हायलांच पाहिजे नं. म्हणून चंद्राला सांगंत
असलेल्या आपल्या गोष्टींमधे तो कधी कधी हेसुद्धां जोडून देतो, की त्याला सगळ्यांत
जास्त चीड आपल्या अमरत्वाची आहे, आणि आपल्या अभूतपूर्व प्रसिद्धीचीसुद्धां. तो ठामपणे
सांगतो,
की तो
आनन्दाने आपलं भाग्य लेवी मैथ्यूच्या भाग्याशी बदलायला तयार झाला असता.”
“कधीsss… एका चंद्रासमोर
केलेल्या चुकीच्या बदले बारा हजार चंद्र! काय हे खूप जास्त नाहीये?” मार्गारीटाने
विचारलं.
“काय फ्रीडाच्या गोष्टीची
पुनरावृत्ती होते आहे?” वोलान्दने म्हटलं, “पण मार्गारीटा, इथे तुम्हीं काळजी करू नका.
सगळं ठीक होईल,
जगाचा
निर्माण ह्याच सिद्धांतावर झाला आहे.”
“त्याला सोडून द्या,” मार्गारीटा अचानक
किंचाळली,
तशीच, जेव्हां ती चेटकीण
असताना ओरडली होती आणि ह्या किंचाळीने एक दगड गडगडून खाली अनंतांत विलीन झाला, पहाड गरजले. पण
मार्गारीटा हे नाही सांगू शकली, की हा गडगडाट दगड पड्ल्याचा होता, की सैतानाच्या
हसण्याचा,
काहीही
असो,
वोलान्द
मार्गारीटाकडे बघून हसंत होता, तो म्हणाला, “पहाडांवर किंचाळायची गरज नाहीये, त्याला ह्या
शिळांच्या पडण्याची सवय झालीये, आणि त्याने तो उत्तेजित नाही होत. तुम्हांला त्याची
सिफारश करण्याची गरंज नाहीये, मार्गारीटा, कारण की त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे
खुद्द त्याने,
ज्याचाशी
त्याला बोलायचं आहे,” आता तो मास्टरकडे वळून म्हणाला, “तर, मग, आता तुम्ही आपली कादम्बरी
फक्त एका वाक्याने पूर्ण करूं शकता!”
पुतळ्यासारख्या उभ्या, आणि बसलेल्या
न्यायाधीशाकडे बघंत असलेल्या मास्टरला कदाचित ह्याचीच प्रतीक्षा होती. तो हातांना
तोंडाजवळ ठेवून असा ओरडला, की त्याचा आवाज सुनसान, निर्जन पहाडांवर प्रतिध्वनित
होऊं लागला,
“मुक्त
आहेस! मुक्त आहेस! तो तुझी वाट बघतोय!”
पहाडांनी मास्टरच्या आवाजाला
कडकडाटांत परिवर्तित केलं आणि ह्याच कडकडाटाने त्यांना छिन्न-भिन्न करून टाकलं.
शापित प्रस्तर भिंती कोसळल्या. तिथे उरली फक्त ती – चौकोर जमीन, पाषाणाच्या
खुर्चीसकट. त्या अंधा-या अनंताच्या वर, ज्यांत ह्या भिंती लुप्त झाल्या होत्या, धू-धू करंत जळू
लागलं ते विशाल शहर आपल्या चमकत्या प्रतिमांसकट, ज्या हज्जारों पौर्णिमांच्या
अवधीत फुलंत असलेल्या उद्यानाच्या वरती स्थित होत्या. सरळ ह्याच उद्यानापर्यंत
पसरला न्यायाधीशाच्या तो चिरप्रतीक्षित चंन्द्रप्रकाशाचा रस्ता, आणि सगळ्यांत आधी
तिकडे धावला तीक्ष्ण कानांचा श्वान. रक्तवर्णी किनारीचा पांढरा अंगरखा घातलेला माणूस
आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या भसाड्या, तुटक्या-फुटक्या आवाजांत
काहीतरी ओरडला. हे समजणं कठीण होतं की तो रडतोय, की हसतोय, आणि तो काय ओरडतोय?
फक्त येवढंच दिसलं, की आपल्या स्वामिभक्त रक्षकाच्या मागे-मागे तोसुद्धां
चंद्राच्या रस्त्यावर पळाला.
“मला तिकडे जायचं आहे,
त्याच्याकडे?” मास्टरने व्याकुळतेने विचारलं आणि घोड्याची लगाम खेचली.
“नाही,” वोलान्दने उत्तर
दिलं, “जे काम पूर्ण झालेल आहे, त्याच्यामागे कां पळायचं?”
“तर, म्हणजे, तिकडे...?”
मास्टरने विचारलं आणि मागे वळून तिकडे बघितलं, जिथे खेळण्यांसारख्या मीनारी आणि
तुटक्या सूर्याच्या खिडक्या असलेलं शहर मागे राहिलं होतं, जे तो आत्तांच सोडून आला
होता.
“तिकडेपण नाही,” वोलान्दने उत्तर
दिलं,
त्याचा
आवाज गूढ होत शिळांवर वाहू लागला, “स्वप्नदर्शी, छायावादी मास्टर! त्याने, जो तू निर्मित
केलेल्या नायकाला भेटण्यासाठी उत्सुक आहे – ज्याला तू इतक्यांतच मुक्त केलं आहेस –
तुझी कादम्बरी वाचली आहे.” आता वोलान्दने मार्गारीटाकडे वळून म्हटलं, “मार्गारीटा निकोलायेव्ना!
ह्या गोष्टीवर अविश्वास करणं अशक्य आहे, की तुम्हीं मास्टरसाठी सर्वोत्तम भविष्य
शोधायचा प्रयत्न केला; पण हेसुद्धां खरं आहे की आता मी तुम्हाला जे सांगणार आहे; ज्याबद्दल येशुआने
विनंती केली होती, ते तुमच्यासाठी, तुम्हां दोघांसाठी जास्त चांगलं आहे. त्यांना एकटं
सोडून द्या,”
वोलान्दने
आपल्या खोगीरावरून मास्टरच्या खोगीराकडे वाकून दूर गेलेल्या न्यायाधीशाच्या
पदचिन्हांकडे खूण करंत म्हटलं, “त्यांना त्रास नाही देणार. कदाचित ते आपसांत
विचार-विमर्श करून एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचतील, आता वोलान्दने येर्शलाइमकडे
बघंत आपला हात हालवला आणि ते विझून गेलं.
“आणि तिकडेपण...” वोलान्दने
पृष्ठभूमीकडे इंगित करंत म्हटलं, “त्या तळघरांत कराल तरी काय?” आता खिडकीतला तुटका सूर्य
विझला. “कशाला?”
वोलान्द
दृढतेने,
पण
प्रेमाने म्हणंत होता, “ओह, त्रिवार रोमान्टिक मास्टर, तुला काय दिवसा आपल्या
प्रियतमेसोबत चेरीच्या झाडांखाली हिंडायला नाही आवडणार कां, ज्यांच्यावर आत्ता
बहर येण्यांतच आहे? आणि संध्याकाळी शूबर्टचं संगीत ऐकावसं नाही आवडणार कां? तुला मेणबत्तीच्या
प्रकाशांत हंसाच्या पंखाच्या लेखणीने लिहायला नाही आवडणार कां? तुला असं नाही वाटंत
का,
की
फाउस्टसारखा,
प्रयोगशाळेत
रेटॉर्टच्याजवळ बसून नवीन होमुनकुलसच्या निर्माणाची आशा करावी? तिकडे, तिकडे...तिकडे वाट
बघतंय तुझं घर,
म्हाता-या
सेवकासह,
मेणबत्त्या
जंळत आहेत,
आणि
त्या लवकरंच विझण्यांत आहेत, कारण लवकरंच तुझं स्वागत करेल सकाळ, ह्या रस्त्यावर, मास्टर, ह्या रस्त्यावर!
नमस्कार! माझी वेळ झालीये!”
“नमस्कार!” मास्टर आणि
मार्गारीटाने एकदम ओरडून वोलान्दला उत्तर दिलं, तेव्हां काळ्या वोलान्दने
कोणताही रस्ता न शोधता, खिंडारांत उडी घेतली, आणि त्याच्या मागे-मागे
ओरडंत,
हल्ला
करंत. त्याच्या टोळीनेपण उडी घेतली. मग काहीही शिल्लक नाही उरलं – ना पाषाण शिळा, ना सपाट छोटासा
चौरस्ता,
ना
चंद्रप्रकाशाचा रस्ता, ना येर्शलाइम, काहीही उरलं नाही. काळे घोडेपण लुप्त झाले. मास्टर
आणि मार्गारीटाने पाहिली उषःकालीन लालिमा, जिच्याबद्दल त्यांना वचन
दिलेलं होतं. ती इथेंच सुरू झाली होती, अर्धरात्र असतानांच. मास्टर आपल्या
प्रियतमेबरोबर,
सकाळच्या
पहिल्या किरणांच्या प्रकाशांत छोट्याश्या दगडी पुलावर चालू लागला. त्याने पुल पार
केला. झरा ह्या ख-या प्रेमिकांच्या मागे राहिला आणि ते वाळू असलेल्या रस्त्यावर
निघाले.
“ऐक, स्तब्धतेला,” मार्गारीटाने
मास्टरला म्हटलं आणि त्यांच्या अनवाणी पायांखाली वाळू करकरू लागली, “ऐक, आणि त्या सगळ्याचा
आनंद घे,
जे
जीवनांत तुला नाही मिळालं – शांततेचा. बघ, समोर; हे राहिलं तुझं घर –
शाश्वत,
चिरंतन
घर जे तुला पुरस्कारस्वरूप मिळालंय. मला इथूनंच वेनिशियन खिडकी आणि द्राक्षाचा
लटकंत असलेला वेल दिसतोय, ती छ्तापर्यंत उंच झालेली आहे. हे तुझं घर आहे, तुझं घर...शाश्वत.
मला माहीत आहे,
की
संध्याकाळी तुझ्याकडे ते येतील ज्यांच्यावर तू प्रेम करतोस, ज्यांच्यांत तुला रस
आहे आणि जे तुला त्रास नाही देत. ते तुझ्यासाठी साज वाजवतील, तुझ्यासाठी गातील; तू बघशील, खोलींत कसा अद्भुत
प्रकाश असेल,
जेव्हां
मेणबत्त्या जळूं लागतील. तेव्हां तू आपली डाग पडलेली, सदाबहार टोपी घालून झोपी
जाशील,
तू
ओठांवर स्मित घेऊन झोपशील. गाढ झोप तुला शक्त्ती देईल, तू खोलवर विश्लेषण करूं
शकशील. आणि मला तर तू आता पळवूंच शकणार नाही. तुझ्या झोपेची रक्षा करेन मी.”
मास्टरच्यासोबत आपल्या
शाश्वत घराकडे जाता-जाता असं बोलंत होती मार्गारीटा आणि मास्टरला अनुभव होत होता, की मार्गारीटाचे
शब्द अगदी तसेंच झंकृत होताहेत, जसा आत्ताच मागे सुटलेला झरा झंकारंत होता. मास्टरची
स्मरण शक्ती,
व्याकुळ
वेदनेच्या सुयांनी चालणी झालेली स्मरण शक्ती हळू-हळू विझूं लागली. कोणीतरी मास्टरला
मुक्त केलं,
अगदी
तस्संच,
जसं
त्याने आपल्या नायकाला आत्तांच मुक्त केलं होतं. हा नायक लुप्त झाला अनंतात, लुप्त झाला कधी न
परतण्यासाठी;
भविष्यवेत्ता
सम्राटाचा पुत्र, रविवारच्या पूर्वसंध्येंत त्याला क्षमा मिळाली, जूडियाचा पाचवा
क्रूर न्यायाधीश अश्वारोही पोन्ती पिलात.
********
तेहतीस
उपसंहार
पण शनिवारी संध्याकाळी
सूर्यास्ताच्या वेळेस वरोब्योव टेकड्यांवरून वोलान्द आणि त्याची टोळी राजधानी
सोडून गेल्यावर मॉस्कोंत आणखी काय काय झाल?
बरेंच दिवस सम्पूर्ण
राजधानीत अगदीच अविश्वसनीय अफवा पसरंत होत्या, ज्या लवकरंच प्रदेशाच्या
दूर-दूरच्या आणि जवळ जवळ निर्मनुष्य भागांपर्यंत पोहोचल्या. त्यांच्याबद्दल काही
सांगणं व्यर्थ आहे, त्यांची नुसती आठवण जरी आली तरी मळमळूं लागतं.
ह्या सत्य ओळींच्या लेखकाने
स्वतः फिओदोसियाला जात असताना ट्रेनमधे ही गोष्ट ऐकली, की कसे मॉस्कोंत सुमारे दोन
हजार व्यक्ती थियेटरमधून पूर्ण नग्नावस्थेंत बाहेर निघाले आणि त्याच अवस्थेंत
टैक्सींत बसून आपापल्या घरी गेले.
“सैतानी, अभिशप्त शक्ती...”
ही कुजबुज ऐकूं यायची दुधाच्या दुकानासमोर, ट्रामगाडींत, दुकांनांमधे, घरांमधे, सामूहिक किचन्समधे, ट्रेन्समधे, समर-कॉटेजेसमधे, रेल्वे स्टेशन्सवर, समुद्र
किना-यांवर...
स्पष्टंच आहे, की उच्च शिक्षित आणि
सुसंस्कृत लोकांनी सैतानी शक्तीशी संबंधित ह्या गप्पांमधे जराही भाग नाही घेतला, उलट ते त्यांवर हसंत
होते आणि गप्पा मारणा-यांना समजावंत होते. पण तथ्य हे तथ्यंच असतं, आणि, जसं सगळेच म्हणतात, काही कारण न सांगता
त्यांना झटकणं शक्य नसतं: कोणीतरी राजधानीत हजर होतं, ग्रिबायेदवचे अवशेषच ह्या
तथ्याची जोरदार पुष्टी करंत होते, आणि अनेक इतर घटनासुद्धां ह्याला नाकारू शकंत
नव्हत्या.
सुसंस्कृत लोक अन्वेषण
करणा-यांच्या मताचं समर्थन करंत होते : की सम्मोहित करणा-या आणि गारुडवाही लोकांची
एक प्रवीण टोळी ह्याच्यामागे होती.
तिला पकडण्यासाठी मॉस्कोमधे
आणि बाहेरसुद्धां लगेच अनेक उपाय करण्यांत आले, पण दुर्दैवाने त्यांचा
काहीही परिणाम झाला नाही. स्वतःला वोलान्द म्हणणारा आपल्या सहयोग्यांबरोबर गायब
झाला आणि नंतर कधीही तो मॉस्कोत किंवा अन्य कुठे प्रकट झाला नाही. स्पष्ट आहे, की सगळ्यांनी हा
निष्कर्ष काढला की तो परदेशांत पळून गेला, पण तिथेसुद्धां त्याने
आपल्या अस्तित्वाबद्दल काहीही संकेत नाही दिला.
ह्या ‘केस’चा तपास बराच काळ
चालला. कशीही असली तरी ‘केस’ मोठी विचित्रंच होती! चार जळालेले घरं आणि शेकडो पागल
झालेल्या लोकांशिवाय काही लोक मेलेसुद्धा होते. कमींत कमी दोघांबद्दल तर
खात्रीपूर्वक सांगता येईल : बेर्लिओज़बद्दल आणि परदेशी पर्यटकांना मॉस्कोच्या
दर्शनीय स्थळांची माहिती देणा-या विभागांत काम करणा-या भूतपूर्व सामन्त
मायकेलबद्दल. त्यांना तर मारण्यांत आलं होतं. दुस-या व्यक्तीचा जळालेला सापळा
सादोवायाच्या फ्लैट नंबर 50मधे सापडला होता, जेव्हां तिथे लागलेली आग
विझवण्यांत आली होती. हो, कित्येक व्यक्ती शिकार झाले होते, आणि हे शिकार
तपासाची मागणी कर6त होते.
पण वोलान्द राजधानी सोडून
गेल्यावरही अन्य अनेक शिकार झाले होते आणि तुम्हांला कितीही दुःख झालं तरी, सांगावंच लागेल की
हे शिकार होते – बोके.
जवळ-जवळ शंभरापेक्षा जास्त, मानवाशी एकनिष्ठ आणि
उपयोगीसुद्धां असलेले हे पाळीव प्राणी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने देशाच्या अनेक
भागांत मारण्यांत आले. 15-20 गंभीर रूपाने जखमी मांजरांना भिन्न-भिन्न शहरांच्या
पोलिस स्टेशनांत आणण्यांत आलं. उदाहरणार्थ, आर्मावीरमधे एका निर्दोष
प्राण्याचे समोरचे पंजे बांधून एक नागरिक त्याला पोलिस स्टेशनवर घेऊन आला
होता.
ह्या बोक्याला नागरिकाने
तेव्हां पकडलं होतं, जेव्हां तो चोरासारखा...(काय करणार, जर बोके तसेच दिसंत असले तर? ह्याचं कारण हे
नाहीये की ते पापी असतात, पण हे आहे की ते घाबरतात, की त्यांच्यापेक्षां जास्त
शक्तिशाली प्राणी – कुत्रा किंवा माणूस त्यांना नुकसान पोहोचवेल, त्यांचा अपमान करेल.
दोन्हीपैकी काहीही करणं अगदी सोपं आहे, पण मी तुम्हांला खात्रीने सांगतो की ह्यांत
कसलाच मोठेपणा नाहीये. हो, कसलाच नाही!) हो, तर चोरासारखा बोका माहीत
नाही कां,
मश्रूम्सवर
धडकणार होता.
बोक्यावर धडक घालून त्याला
बांधण्यासाठी गळ्यांतला टाय काढंत तो नागरिक धमकावंत बडबडंत होता, “आहा! कदाचित आता
तुम्हीं आमच्याकडे, आर्मावीरमधे आले आहांत, सम्मोहक महाराज! पण इथे तुम्हांला कोणीही
घाबरणार नाही. तुम्हीं मुके असल्याचं नाटक नका करूं. आम्हांला चांगलं माहीत आहे की
तुम्ही कोण आहांत!”
तो नागरिक बोक्याला, जो हिरव्या रंगाच्या
टायने बांधलेला होता, समोरच्या पंजांनी खेचंत पोलिस स्टेशनवर घेऊन आला; तो बोक्याला हळू-हळू
ठोकर सुद्धां मारंत होता, म्हणजे त्याला मागच्या पंजांवर चालतां यावे. नागरिक
आपल्या मागे-मागे शीळ घालंत चालणा-या मुलांना म्हणाला, “तुम्हीं हा वेडेपणा बंद करा!
ह्याने काही होणार नाही! जसे सगळे चालतांत, तसेच चला!”
काळा बोका फक्त आपल्या दुःखी
डोळ्यांना इकडे-तिकडे फिरवंत होता. बोलूं न शकल्याने तो आपला खरेपणा शाबीत करू
शकंत नव्हता. आपल्या सुटकेसाठी तो दोन लोकांचा आभारी होता - पहिले, पोलिसचा आणि मग –
आपल्या मालकिणीचा – एका सम्माननीय विधवा वृद्धेचा. जसंच बोक्याला पोलिस स्टेशनांत
आणलं,
लोकांचा
लगेच विश्वास बसला, की नागरिक दारूच्या नशेंत धुंद होता, म्हणून त्याच्या सांगण्यावर
कोणाचाही विश्वास बसला नाही. येवढ्यांत वृद्धा मालकीण शेजा-यांकडून कळल्यावर की
तिच्या बोक्याला पकडलंय, पोलिस स्टेशनकडे धावली...तिथे ती अगदी वेळेवर पोहोचली, तिने आपल्या
बोक्याची भरपूर तारीफ केली; सांगितलं की ती त्याला पाच वर्षांपासून ओळखते,
तेव्हांपासून, जेव्हां तो अगदी लहान होता; ती त्याच्याबद्दल इतक्यांच
ठामपणे सांगू शकते, जितकं स्वतःबद्दल, की त्याने चुकीचं काम कधी केलंच नाहीये; कसा त्याचा
आर्मावीरमधे जन्म झाला, तिथेंच मोठा झाला, आणि तिथेच उंदीर पकडायला
शिकला.
बोक्याला मुक्त करून
मालकिणीकडे सोपवण्यांत आलं, फक्त तेव्हांच, जेव्हां त्याने दुःख़ाचा
अनुभव घेतला,
आणि
आपल्या अनुभवाने शिकला की चूक आणि दोषारोपण म्हणजे काय असतं.
बोक्यांच्या व्यतिरिक्त काही
लोकांना छोटे-मोठे त्रास सहन करावे लागले. काहींना अटक करण्यांत आली. ज्या लोकांना
थोड्या काळासाठी पकडलं गेलं, त्यांत होते : लेनिनग्रादमधे – वोलमान आणो वोलपेर; सरातोवमधे, कीएवमधे आणि
खारकोवमधे – तीन वोलोदिन; कज़ानमधे – वोलोख आणि पेंज़ामधे, माहीत नाही कां
रसायन शास्त्राचे प्रोफेसर बेतचिंकेविच... हे खरं आहे की तो खूप विशाल शरीरयष्टीचा, सावळ्या रंगाचा, काळ्या केसाचा होता.
ह्याच्याशिवाय वेगवेगळ्या
ठिकाणांवर नऊ करोविन, चार करोव्किन आणि दोन करावायेव पकडले गेले.
एका नागरिकाला सेवास्तोपोलकडे
जाणा-या ट्रेनमधून उतरवून बेलगोरद स्टेशनवर बांधून टाकण्यांत आलं. हा नागरिक
आपल्या बरोबरच्या मुशाफिरांचं पत्त्यांच्या खेळाने मनोरंजन करंत होता.
यारोस्लाव्लमधे दुपारी
लंचच्या वेळेस एक नागरिक स्टोव घेऊन रेस्टॉरेन्टमधे घुसला, जो त्याने आत्तांच रिपेयर
करवून आणला होता. जसंच दोन्हीं दरबानांनी त्याला बघितलं, ते आपापली जागा सोडून पळूं
लागले,
आणि
त्यांच्यामागे रेस्टॉरेन्टचे सगळे ग्राहकही पळूं लागले, नौकर, कर्मचारीसुद्धां
धावले. ह्याच गडबडींत कैशियरच्या हातून न जाणे कशी सगळी कैश हरवली.
आणखीसुद्धां बरंच काही झालं, सगळंच तर लक्षांत
नाही राहूं शकंत. बरीच डोकी धावपळ करंत होती.
अन्वेषण विभागाची सुद्धां
पुन्हां-पुन्हां तारीफ करावी लागेल. अपराध्यांना पकडण्यासाठी शक्य तेवढे उपाय
करण्यांत आले;
त्याबरोबरंच
घटनांच्या मागची कारणंसुद्धां समजावण्यांत आली, ज्यांना अगदीच फाल्तू नाही
म्हणतां येणार.
अन्वेषण दलाचा प्रमुख आणि
अनुभवी मनोवैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिलं, की ह्या आपराधिक टोळीचे
सदस्य किंवा त्यांच्यापैकी कुणी एक (सगळ्यांत जास्त सन्देह करोव्येववर करण्यांत
आला) अभूतपूर्व शक्तिशाली सम्मोहक होते, जे स्वतःला त्या ठिकाणी प्रकट नाही करायचे, जिथे ते असायचे, पण काल्पनिक, परिवर्तित
परिस्थितीत प्रदर्शित करायचे. त्याशिवाय त्यांनी ह्या गोष्टीचं मोकळेपणाने समर्थन
केलं की काही वस्तू किंवा लोक तिथे दिसतात जिथे खरं म्हणजे ते नसतात; ह्याउलट त्या वस्तू
किंवा लोक त्या दृष्टिक्षेपांहून दूर दिसतांत, ज्यांत ते असतात.
ह्या सगळ्या
स्पष्टीकरणांमुळे सगळ्या गोष्टी समजल्या; आणि नागरिकांना बुचकळ्यांत टाकणारी ती
घटनासुद्धां,
जी
सगळ्या स्पष्टीकरणांच्या वर होती, म्हणजे पन्नास नंबरच्या फ्लैटमधे बोक्याला
पकडण्याच्या प्रयत्नांत त्याच्यावर केलेला गोळीबार, ज्याचा त्याच्यावर काहीही
परिणाम नव्हता झाला.
झुम्बरावर, स्पष्ट आहे, काही बोका-बीका
नव्हता,
कोणीही
गोळ्या चालवण्याचा विचारसुद्धां केला नव्हता; ते सगळे रिकाम्या जागेवरंच
गोळ्या मारंत राहिले; जेव्हां करोव्येवचा आवाज आला, की ह्या बोक्याच्या खोड्या
आहेत,
तेव्हां, कदाचित, तो आरामांत गोळ्या
झाडणा-यांच्या पाठीमागून त्यांना चिडवंत होता आणि जिथे-तिथे नाक खुपसायच्या आपल्या
सवयीनुसार त्याने तेल ओतून फ्लैटला आग लावून दिली.
स्त्योपा लिखादेयेव कोणच्याच
याल्टा-बील्टाला नाही गेला. (हे तर करोव्येवलापण शक्य नाहीये), तिथून त्याने
कोणतांच टेलिग्राम नाही पाठवला. करोव्येवच्या युक्तीने घाबरून, जो त्याला जवाहि-याच्या
पत्नीच्या फ्लैटमधे फोर्कला टोचलेलं खारंट मश्रूम खात असलेला बोका दाखवंत होता, तो बेशुद्ध झाला आणि
तोपर्यंत बेशुद्धंच होता, जोपर्यंत करोव्येवने त्याचा उपहास करंत त्याला फर-कैप
घालून मॉस्कोच्या विमानतळावर नाही पाठवून दिलं. स्त्योपाला भेटायला आलेल्या
गुप्तचर पोलिसला त्याने असं दाखवलं, जणु तो सेवास्तोपोलहून येणा-या विमानाने आलाय.
हे खरं आहे, की याल्टाचा गुप्तचर
विभाग ही पुष्टी करंत होता की त्याने अनवाणी स्त्योपाला पकडलं होतं, आणि स्त्योपाबद्दल
मॉस्कोला टेलिग्राम पाठवला होता. पण ह्या टेलिग्रामची कोणतीच प्रत कुठेच नाही सापडली.
ह्याने असा दुर्दैवी आणि स्पष्ट निष्कर्ष काढण्यांत आला, की सम्मोहन करणा-यांचा ह्या
टोळीकडे दूरपर्यंत सम्मोहित करण्याची शक्ती आहे; ते पण एक-दोन लोकांनाच नाही
तर विशाल समुदायाला सुद्धां. अश्या प्रकारे अपराधी अत्यंत दृढ मानसिकता असलेल्या
लोकांना सुद्धां पागल बनवूं शकले होते.
त्या छोट्या-छोट्या
गोष्टींबद्दल काय सांगाव – जसं एका माणसाच्या खिशांतून दुस-या माणसाच्या खिशांत
पत्त्यांची गड्डी जाणं; महिलांचे वस्त्र गायब होणं; म्याऊँ-म्याऊँ करंत असलेला
कोट आणि असंच बरंच काही. असल्या युक्त्यातर कोणीही छोटा-मोठा सम्मोहक करूं शकतो, कोणत्याही स्टेजवर, ज्यांत सूत्रधाराचं
डोकं उपटून नेणंसुद्धां असूं शकतं. बोलणारा बोका – शुद्ध बकवास आहे. लोकांच्यासमोर असा बोका
दाखवण्यासाठी गारुडवाहीच्या(पोटबोलीच्या) मूळ सिद्धांतांची माहिती असणंच पुरेसं
आहे,
आणि
ह्यांत शंकाच नाही, की करोव्येव ह्या कलेंत बरांच पुढे गेलेला होता.
मुद्दा इथे
पत्त्यांचा नाहीये, निकानोर इवानोविचच्या ब्रीफकेसमधे सापडलेल्या खोट्या पत्रांचापण
नाहीये,
ह्या
तर लहान-सहान खोड्या आहेत. खरं म्हणजे, करोव्येवनेच बेर्लिओज़ला ट्रामगाडीच्या खाली
मारण्याच्या उद्देश्याने ट्रामगाडीच्या खाली ढकललं होतं. त्यानेच गरीब बिचा-या कवि
इवान बिज़्दोम्नीला पागल करून टाकलं होतं; त्याने त्याला यातनामय स्वप्नांमधे येर्शलाइम
आणि सूर्याच्या प्रकाशांत होरपळंत असलेल्या ‘बाल्ड माउन्टेन’ला बघण्यासाठी विवश
केलं होतं,
ज्याच्यावर
तीन अभियुक्तांना फासावर लटकावण्यांत आलं होतं. त्यानेच आणि त्याच्या टोळीने मार्गारीटा
निकोलायेव्ना आणि तिची मोलकरीण नताशाला मॉस्कोहून गायब होण्यास विवश केलं होतं.
आणखी एक मुद्दा : ह्या ‘केस’चा तपास खोलवर करण्यांत आला. हे स्पष्ट करणं आवश्यक
होतं,
की
ह्या महिलांना हत्या आणि जाळपोळ करणा-या ह्या लोकांनी पळवून नेलं होतं, की त्या आपल्या मर्जीने
त्यांच्याबरोबर गेल्या होत्या? निकोलाय इवानोविचच्या अस्पष्ट आणि विसंगत पुराव्यावर, मार्गारीटा
निकोलायेव्नाच्या विचित्र आणि हास्यास्पद चिट्ठीवर, जी तिने आपल्या नव-यासाठी
सोडली होती – हे स्पष्ट करंत की ती चेटकीण बनून चाललीये; आणि नताशाच्या आपल्या सगळ्या
वस्तू जागच्याजागी सोडून जाण्याच्या घटनेवर विचार केल्यावर तपास अधिकारी ह्या
निष्कर्षापर्यंत पोहोचले, की अन्य अनेक लोकांसारखंच मालकीण आणि मोलकरीण –
दोघींना सम्मोहित करून त्यांचं अपहरण
करण्यात आलं. ही शक्यतापण व्यक्त करण्यांत आली, की अपराध्यांनी त्यांच्या सौंदर्यावर
मोहित होऊन त्यांना पळवलं.
पण ज्या गोष्टीचं
काहीच प्रमाण नाही सापडलं, ती ही होती की मानसिक रुग्ण, स्वतःला मास्टर म्हणणा-या व्यक्तीला ही टोळी हॉस्पिटलमधून
उडवून कां घेऊन गेली होती. ह्याचं कारण ते नाही शोधू शकले आणि त्या मनोरुग्णाच्या
नावाचा पत्ता पण त्यांना नाही लागला. तो ‘नम्बर एकशे अठरा’ ह्या संबोधनासकट
नेहमीसाठी गायब झाला.
अश्या प्रकारे
सगळ्या गोष्टी समजावून दिल्या गेल्या आणि तपासाचं काम पूर्ण झालं, तसंच, जसं सगळं काही
संपुष्टांत येतं.
काही वर्ष गेले. लोक
वोलान्द,
करोव्येव
आणि इतर लोकांना विसरू लागले. वोलान्द आणि त्याच्या टोळीमुळे दुःखी झालेल्या
लोकांच्या जीवनांत अनेक परिवर्तन झालेत आणि हे परिवर्तन कितीही नगण्य असले तरी
त्यांच्याबद्दल सांगणं चांगलं होईल.
उदाहरणार्थ, जॉर्ज बेंगाल्स्की
हॉस्पिटलमधे तीन महिने घालवून बरा झाला आणि त्याला घरी पाठवण्यांत आलं, पण त्याला वेराइटीची
नौकरी सोडावी लागली; आणि विशेषकरून गर्दीच्या सीज़नमधे, जेव्हां जनता टिकिटांसाठी
तुटून पडंत होती – काळा जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन करणा-या कार्यक्रमाच्या
आठवणी एकदम ताज्या होत्या. बेंगाल्स्कीने वेराइटी सोडून दिलं, कारण की तो समजून
गेला होता,
की दर
संध्याकाळी दोन हजार दर्शकांसमोर जाणं, कोणत्याही परिस्थितीत ओळखलं जाणं आणि ह्या
उपहासात्मक प्रश्नाला सामोरं जाणं, की त्याच्यासाठी काय जास्त चांगलं राहील : डोकं
असलेलं शरीर,
की
बिनडोक्याचं?
– हे
सगळं खूपच पीडादायक होईल.
हो, शिवाय सूत्रधार आपला
नेहमीचा हसरेपणासुद्धां गमावून बसला, जो त्याच्या व्यवसायासाठी नितांत आवश्यक होता.
त्याला एक वाईट आणि जाचक सवय लागली : दर पौर्णिमेच्या रात्री तो व्याकुळ होऊन आपली
मान पकडून घ्यायचा, भीतीने इकडे-तिकडे बघायचा आणि मग रडू लागायचा. हे सगळं हळू-हळू
कमी होत गेलं,
पण
ह्या सवयी बाळगून जुनं काम करणं अशक्यंच होतं; म्हणून सूत्रधाराने ती नौकरी
सोडून दिली. तो शांत जीवन जगू लागला, आपल्या बचतीवर जगू लागला, जी त्याच्या साधारण
जीवन-पद्धतीकडे बघता पंधरा वर्षांसाठी पुरेशी होती.
तो चालला गेला आणि
पुन्हां कधीही वारेनूखाला नाही भेटला जो थियेटर-एडमिनिस्ट्रेटर्समधे आपल्या
अविश्वसनीय सहृदयतेसाठी, सौजन्यपूर्ण व्यवहारासाठी आणि हजरजवाबीसाठी लोकप्रिय
झाला होता. फुकट टिकिट मागणारे तर त्याला ‘दयाळू पिता’ म्हणायचे. कोणीही, कधीही वेराइटींत फोन
केला तर टेलिफोनवर नेहमी एक मृदु, पण उदास आवाज ऐकू यायचा, “ऐकतोय –“ आणि वारेनूखाला
टेलिफोनवर बोलावण्याची विनंती करण्यांत यायची, तेव्हां तोच आवाज पट्कन पुढे
म्हणायचा,
“मी
हजर आहे,
बोला काय
करू.” पण इवान सावेल्येविचला आपल्या सौजन्यासाठी सुद्धां त्रास सहन करावा लागंत
होता.
स्त्योपा
लिखोदेयेवलापण आता वेराइटींत टेलिफोनवर बोलावं नाही लागंत. हॉस्पिटलमधून सुट्टी
मिळाल्यावर,
जिथे
तो आठ दिवस होता, त्याला रोस्तोवला पाठवण्यांत आलं. तिथे त्याला एका मोठ्या
डिपार्टमेन्टल स्टोअरचा डाइरेक्टर नेमलंय. म्हणतांत की आता त्याने पोर्ट वाइन घेणं
पूर्णपणे बंद केलंय, आणि फक्त वोद्काच पितो – तीसुद्धां बेदाण्याची, ज्याने त्याची
तब्येत जास्तंच चांगली झाली आहे. असं पण म्हणतात की तो एकदम शांत झालांय आणि
बायकांपासूनसुद्धां दूर राहतो.
स्तेपान
बोग्दानोविचला वेराइटीतून काढून रीम्स्कीला इतका आनन्द नाही झाला, ज्याचं तो कित्येक
वर्षांपासून स्वप्न बघंत होता. हॉस्पिटल आणि किस्लोवोद्स्कनंतर बुड्ढा, जक्खड बुड्ढा
झालेल्या,
डोकं
हालंत असलेल्या फिनडाइरेक्टरनेपण वेराइटीतून बाहेर जाण्यासाठी अर्ज दिला. मजेदार गोष्ट तर ही होती की हा अर्ज घेऊन ऑफिसमधे आली
त्याची बायको. ग्रिगोरी दानिलोविचला दिवसासुद्धां त्या बिल्डिंगमधे जाण्याची
हिम्मत नाही झाली, जिथे त्याने चंद्राच्या प्रकाशांत खिडकीचा फुटका काच बघितला होता
आणि बघितला होता तो लांबलचक हात जो खालच्या बोल्टकडे येत होता.
वेराइटी सोडून
फिनडाइरेक्टर मुलांच्या पपेट-थियेटरमधे आला. ह्या थियेटरमधे त्याला
ध्वनि-संयोजनाच्या समस्यांचा सामना नव्हता करावा लागंत, ह्या बाबतीत सम्माननीय
अर्कादी अपोलोनोविचशी जामस्क्वोरेच्येमधे वादसुद्धां घालावा लागंत नव्हता. त्याला
दोनंच मिनिटांत ब्र्यान्स्कला पाठवण्यांत आलं आणि मश्रूम्सला डब्ब्यांत बंद
करायच्या कारखानाच्या डाइरेक्टर बनविण्यांत आलं. आता मॉस्कोवासी खारवलेले लाल
मश्रूम्स आणि पांढ-या मश्रूम्सचं लोणचं खातात, आणि त्यांची खूप तारीफ करतात; ते ह्या ट्रान्सफरने
खूष आहेत. गोष्ट जुनी आहे आणि असं म्हणता येईल की अर्कादी अपोलोनोविचला ध्वनिसंयोजनाचं
काम जमंतच नव्हतं. त्याने कितीही प्रयत्न केले तरी ते जसंच तसंच राहिलं.
थियेटरशी ज्यांचा
संबंध तुटला त्यांत अर्कादी अपोलोनोविचच्या व्यतिरिक्त निकानोर इवानोविच बासोयचं
नाव पण घेता येईल, तसं पाहिलं तर निकानोर इवानोविचचा फुकंटच्या तिकिटांना सोडून थियेटरशी
काहीही संबंध नव्हता. निकानोर इवानोविच आता कधीच थियटरमधे जात नाही: पैसे खर्च
करूनही नाही,
आणि
फुकंटसुद्धा नाही; येवढंच नाही, थियेटरचं नाव घेतांच त्याच्या चेह-याचा रंग बदलून
जातो. थियेटरबरोबरंच त्याला कवि पूश्किन आणि सुयोग्य कलाकार साव्वा पतापोविच कुरोलेसोवच्या
नावानेच फार चीड येते. त्याची तर इतकी, की मागच्या वर्षी काळ्या चौकटींत ही बातमी
बघून की साव्वा पतापोविच आपल्या जीवनाच्या चरमोत्कर्षाच्या काळातं हृदय विकाराने
मृत्यु पावला – निकानोर इवानोविचचा चेहरा इतका लाल झाला की तो स्वतःपण साव्वा
पतापोविचच्या मागे जातां-जातां राहिला. तो गरजला, “त्याचं असंच व्हायला
पाहिजे!” शिवाय,
त्याच
संध्याकाळी निकानोर इवानोविच, ज्याला लोकप्रिय कलाकाराच्या मृत्युमुळे अनेक कटु
गोष्टींची आठवण झाली होती, एकटाच, पौर्णिमेच्या चंद्रासोबंत सादोवायावर बसून खूप दारू
प्यायला. प्रत्येक प्यालाबरोबर त्याच्या समोर घृणित आकृत्या येत होत्या आणि
आकृत्यांच्या श्रृंखलेंत होते दुंचिल सेर्गेई गेरार्दोविच आणि सुन्दरी ईडा
हेर्कुलानोव्ना,
आणि तो
लाल केस असलेला लडाकू हंसांचा मालक, आणि स्पष्टवक्ता कनाव्किन निकोलाय.
आणि त्यांचं काय
झालं?
लक्ष
द्या! जसं काही झालंच नाही, आणि होऊपण शकंत नाही, कारण की त्यांचं अस्तित्वंच
नव्हतं;
जसं की
आकर्षक कलाकार सूत्रधाराच, आणि खुद्द थियेटरचं, आणि म्हाता-या आत्याबाई
परोखोव्निकोवाचं, जिने तळघरांत परदेशी चलनाच्या मुद्रा लपवल्या होत्या; आणि, नक्कीच, सोनेरी तुता-या नव्हत्या, आणि दुष्ट
स्वयंपाकीपण नव्हते. निकानोर इवानोविचला सैतान करोव्योवच्या प्रभावाने त्यांचं
फक्त स्वप्न पडलं होतं. फक्त एक चालता-बोलता माणूस जो ह्या स्वप्नांत हजर होता, तो होता फक्त साव्वा
पतापोविच – कलाकार, आणि तो स्वप्नाशी ह्या कारणाने जोडला गेला होता, कारण की तो निकानोर
इवानोविचच्या डोक्यांत आपल्या रेडिओ कार्यक्रमांमुळे खोलवर होता. तो होता, बाकीचे नव्हते.
म्हणजे अलोइज़ी
मोगारिचपण नव्हता कां? ओह, नाही! तो न केवळ तेव्हां होता, पण अजूनही आहे; त्याच पदावर जे
रीम्स्कीने सोडलं होतं, म्हणजे वेराइटीच्या फिनडाइरेक्टरच्या पदावर.
वोलान्दशी भेट
झाल्यावर सुमारे चोवीस तासांनी, ट्रेनमधे, व्यात्काच्याजवळ कुठेतरी अलोइज़ीला शुद्ध आली.
त्याची खात्री झाली की उदास मनःस्थितीत न जाणे कां, मॉस्कोहून निघताना तो पैण्ट
घालायला विसरला होता, पण माहीत नाही कां कॉन्ट्रैक्टरचं भाडेकरूचं पुस्तक त्याने चोरून
आणलं होतं. कण्डक्टरला बरीच मोठी रकम दिल्यावर अलोइज़ीने त्याच्याकडून जुनी, घाणेरडी पैन्ट घेतली
आणि ती घालून व्यात्काहून परंत आला, पण आता तो कॉन्ट्रैक्टरचं घर शोधूच नाही शकला. जीर्ण
इमारत पूर्णपणे आगींत स्वाहा झाली होती. पण अलोइज़ी अत्यंत हुशार होता, दोनंच आठवड्यानंतर
तो एका सुरेख खोलींत राहायला लागला, जी ब्रूसोव गल्लींत होती, आणि काही महिन्यांनी तो
रीम्स्कीच्या खुर्चीवर देखील बसला. जसा आधी रीम्स्की स्त्योपामुळे त्रस्त होता, तसांच आता वारेनूखा
अलोइज़ीमुळे दुःखी होता. आता इवान सावेल्येविच एकंच गोष्टीच स्वप्न बघायचा की
कोणीतरी ह्या अलोइज़ीला त्याच्या नजरेपासून दूर केलंय; कारण, जसं वारेनूखा आपल्या
घनिष्ठ मित्रांना कधी-कधी सांगायचा, “अश्या डुकराला, जसा अलोइज़ी आहे, त्याने आपल्या
हयातींत कधीही बघितलेलं नाहीये आणि ह्या अलोइज़ीपासून त्याला काहीही होऊं शकतं.”
कदाचित, एडमिनिस्ट्रेटर
पूर्वाग्रहाने ग्रासलेला होता. अलोइज़ीशी संबंधित कसलेंच काळे कारनामे कधीच
बघण्यांत नाही आले आणि तसं बघितलं तर, कोणतेच कारनामे नाही दिसले – जर रेस्टॉरेन्ट
प्रमुख सोकोवच्या जागेवर अन्य कोणाच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष केलं तर. अंद्रेइ
फोकिच तर मॉस्को युनिवर्सिटीच्या एक नम्बरच्या हॉस्पिटलमधे कैन्सरने मरून गेला.
वोलान्द मॉस्कोत प्रकट झाल्याच्या नऊ महिन्यांने...
हो, बरेच वर्ष झाले आणि
ह्या पुस्तकांत खरं खरं वर्णन केलेल्या घटना लोकांच्या स्मृतीतून लुप्त होत गेल्या, पण सगळ्यांच्या नाही, सगळ्यांच्या
स्मृतीतून नाही.
दरवर्षी, जेव्हां वसन्त
ऋतूतील पौर्णिमेची रात्र येते, संध्याकाळी लिण्डेन वृक्षांच्या खाली, पत्रियार्शी
पार्कमधे एक तीस-पस्तीस वर्षांचा माणूस प्रकट होतो – लाल केस, हिरवट डोळे असलेला, साधारण वेशभूषेंत.
हा – इतिहास आणि दर्शन संस्थानाचा संशोधक आहे – प्रोफेसर इवान निकोलायेविच पनीरेव.
लिण्डेनच्या सावलीत
येऊन तो त्याच बेंचवर बसतो, जिथे खूप आधी विस्मृतीच्या गर्तेत बुडालेल्या
बेर्लिओज़ने जीवनांत शेवटचाच तुकड्यांत विखुरलेला चंद्र बघितला होता.
आता तो चंद्र, पूर्ण, रात्रीच्या
सुरुवातीला पांढरा, पण नंतर सोनेरी, काळ्या घोड्यासारख्या सापाच्या आकृतिसह भूतपूर्व कवि
इवान निकोलायेविचच्या वरती तरंगंत आहे; पण उंचावर आपल्याच जागेवर स्थिरसुद्धा आहे.
इवान इकोलायेविचला
सगळं माहीत आहे,
त्याला
सगळं माहीत आहे आणि सगळं समजतंय. त्याला माहीत आहे, की तरुणपणी तो अपराधी
सम्मोहनकारी टोळीचा शिकार झाला होता, त्यानंतर त्याचा इलाज केला गेला आणि तो बरा
झाला. पण त्याला हेसुद्धा कळतंय, की काहीतरी आहे, ज्याच्यावर त्याचं काहीही
चालंत नाही. ह्या वसन्त ऋतूच्या चंद्रावर त्याचा काही जोर नाही चालंत. जशी-जशी
पौर्णिमा जवळ येऊं लागते, जसांच चंद्र मोठा होऊन सोनेरी व्हायला लागतो, जसा कधी दोन पंचकोणी
दिव्यांच्या वर चमकला होता, इवान निकोलायेविच व्याकूळ व्हायला लागतो, तो उदास होतो, त्याची भूक मरून
जाते,
झोपं
उडून जाते,
तो वाट
बघतो चंद्र पूर्ण व्हायची, आणि जेव्हां पौर्णिमा येते तेव्हां कोणतीही शक्ती
इवान निकोलायेविचला घरी थांबवू शकंत नाही. संध्याकाळ होता-होता तो घरातून निघून
पत्रियार्शीवर चालला जातो.
बेंचवर
बसल्या-बसल्या इवान निकोलायेविच स्वतःशीच मनमोकळ्या गप्पा मारू लागतो. सिगरेट ओढतो, डोळे बारीक करून कधी
चंद्राकडे बघतो,
तर कधी
स्मृतीत राहून गेलेल्या त्या फिरत्या दरवाजाकडे.
अश्या प्रकारे इवान
निकोलायेविच घंटे-दोन घंटे घालवतो. मग आपल्या जागेवरून उठून नेहमी एकाच रस्त्याने, स्पिरिदोनोव्कातून
होत भावहीन आणि काहीही बघंत नसलेल्या डोळ्यांनी अर्बातच्या गल्ल्यांमधे हिंडतो.
तो तेलाच्या
दुकानाजवळून जातो, तिथे जाऊन वळतो, जिथे जुनी, तिरपी गैसबत्ती लटकते आहे आणि तो हळूंच जाळीजवळ जातो, जिच्या पलीकडे
त्याला सुन्दर,
पण आता
पर्णहीन उद्यान दिसतं; त्याच्या मधे एकीकडून चंद्राच्या प्रकाशांत चमकंत असलेली तीन
पटांची खिडकी आणि दुसरीकडून अंधाराने वेढलेली ती आलीशान इमारत बघतो...
प्रोफेसरला माहीत
नाही,
की
त्याला ह्या जाळीजवळ कोण खेचून आणतं, आणि त्या इमारतींत कोण राहतं; पण त्याला येवढं
माहीत आहे,
की
ह्या पौर्णिमेला त्याला स्वतःशी संघर्ष नाही करावा लागंत. शिवाय, त्याला हे पण माहीत
आहे,
की
जाळीने वेढलेल्या ह्या उद्यानांत तो नेहमी एकंच दृश्य बघतो.
तो बेंचवर बसलेल्या
एका सभ्य,
वयस्कर
माणसाला बघतो,
ज्याने
चष्मा घातला आहे आणि ज्याचे नाक-डोळे किंचित डुकरासारखे आहेत. इवान निकोलायेविच
त्या इमारतीत राहणा-या ह्या माणसाला नेहमी विचारांत असल्यासारखाच बघतो, चंद्राकडे बघंत
असलेला.
इवान
निकोलायेविचला माहीत आहे, की चंद्राकडे बरांच वेळ बघितल्यावर बसलेला माणूस
कोप-यावरच्या खिडकीकडे बघूं लागेल, जणु कोणाची तरी वाट बघतोय की आत्ताच ती फट्कन उघडेल
आणि चौकटीत एक अजबसं दृश्य दिसेल.
पुढचं सगळं इवान
निकोलायेविचला अगदी तोंडपाठ आहे. आता जाळींत थोडसं लपून राहण्याची गरंज आहे, कारण की बेंचवर
बसलेला माणूस व्याकुळतेने डोकं इकडे-तिकडे हालवूं लागेल, आणि दिपलेल्या डोळ्यांनी
हवेंत काहीतरी पकडायचा प्रयत्न करेल, मग तो उत्तेजित होऊन खिदळेल आणि हात नाचवंत
एका गोड वेदनेंत हरवून जाईल आणि मग ज़ोरज़ो-याने बडबडू लागेल, “वीनस!...आह, मी, मूर्ख!”
“अरे देवा, अरे देवा!” इवान
निकोलायेविच कुजबुजेल आणि जाळीच्यामागे लपून आपले चमकते डोळे त्या गूढ अपरिचितावर
रोखून ठेवेल – हा होता चंद्राचा आणखी एक शिकार, “हो, हासुद्धां आणखी एक शिकार आहे, माझ्याचसारखा.”
आणि बसलेला माणूस
बडबडंत राहील,
“आह, मी मूर्ख! मी
तिच्याबरोबर कां नाही उडून गेलो? कां घाबरलो? कोणाला घाबरलास, म्हाता-या गाढवा! आपल्यासाठी
सर्टिफिकेट घेत बसला! आता कर सहन, म्हाता-या डुकरा!”
असं तोपर्यंत चालंत
राहील,
जोपर्यंत
त्या इमारतीच्या अंधा-या भागांत खिडकी नाही उघडणार, तिच्यांत एक पांढरी सावली
नाही तरंगणार आणि बाईचा एक कर्कश आवाज नाही ओरडणार, “निकोलाय इवानोविच, कुठे आहेस तू? ही काय कल्पना आहे!
काय मलेरिया होऊं द्यायचा आहे? चल, चहा प्यायला!”
ह्यावर तो बसलेला
माणूस जागेल आणि कृत्रिम आवाजांत म्हणेल, “गार वारं, गार वारं घ्यायचं होतं, माझ्या लाडके! हवा
कित्ती सुरेख आहे!...”
तो बेंचवरून उठेल, खाली बंद होत
असलेल्या खिडकीला मुक्का दाखवेल आणि हळू-हळू आपल्या घरांत तरंग़ून जाईल.
“खोटं बोलतोय तो, खोट! अरे देवा, किती खोटं!” जाळीपासून
दूर होत इवान निकोलायेविच बडबडतो, “त्याला ह्या उद्यानांत हवा नाही खेचून आणंत; वसंती पौर्णिमेला तो
चंद्रांत,
उद्यानांत
आणि वर,
उंचीवर
काही तरी बघतो. आह, त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी काहीही दिलं असतं, फक्त हे जाणून
घेण्यासाठी की तो कोणत्या वीनसला हरवून बसलाय आणि आता तो उगाचंच हवेंत हात फिरवंत
तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय?”
आणि प्रोफेसर एकदम
आजा-यासारखा घरी परततो. त्याची बायको असं दाखवते, जणु त्याची अवस्था बघंत
नाहीये,
आणि
लवकर-लवकर त्याला बिछान्यांत झोपवूं लागते. पण ती स्वतः नाही झोपंत, तर लैम्प जवंळ एक
पुस्तक घेऊन बसून जाते, उदास डोळ्यांने झोपणा-याकडे बघंत. तिला माहितीये की
सकाळी इवान निकोलायेविच किंचाळून उठेल, रडू लागेल आणि इकडे-तिकडे फिरूं लागेल.
म्हणूनंच तिने आधींच स्प्रिटमधे बुडवून इंजेक्शनची सिरिंज आणि दाट चहाच्या रंगाचं
औषध लैम्पवाल्या टेबलावर तयार ठेवली आहे.
ही गरीब बाई, आजा-याशी बांधलेली, आता आरामांत झोपूं
शकेल,
कोणत्याही
भीती शिवाय. आता इवान निकोलायेविच सकाळ पर्यंत झोपेल, त्याच्या चेह-यावर असतील
प्रसन्नतेचे भाव आणि तो स्वप्न बघंत असेल उदात्त विचार असलेले, सौभाग्यशाली, ज्यांच्याबद्दल
बायकोला काहीही माहीत नाही.
वैज्ञानिकाला
पौर्णिमेच्या रात्री वेदनापूर्ण किंकाळीसोबंत नेहमी एकंच गोष्ट जागवते. तो बघतो –
बिना नाकाचा मारेकरी, जो उसळून ओरडंत भाल्याची नोक वध-स्तंभाशी जखडलेल्या बेसुध कैदी
गेस्तासच्या छातींत घुसवतो. पण मारेकरी इतका भयानक नाहीये जितका स्वप्नांत दिसंत
असणारा तो अप्राकृतिक प्रकाश, जो अश्या कोणच्यातरी ढगांतून येतो आहे, जे उकळतं आहे आणि
पृथ्वीवर सांडत आहे,
जसं पृथ्वीवर येणा-या विपदांपूर्वी होत असतं.
इंजेक्शनच्या नंतर
झोपणा-याच्या समोरचं दृश्य बदलतं. बिछान्यापासून खिडकीपर्यंत चंद्रप्रकाशाचा रस्ता
उलगडतो आणि ह्या रस्त्यावर चालू लागतो रक्तवर्णी किनारीचा पांढरा अंगरखा घातलेला
माणूस आणि जाऊं लागतो चंद्राकडे. त्याच्याबरोबर एक तरुणपण चालतोय, जुने-फाटके कपडे
घातलेला,
विद्रूप
केलेल्या चेह-याचा. चालणारे कोणत्या तरी गोष्टीबद्दल वाद घालतात आहे, बोलतांत आहे, त्यांना काहीतरी
सांगायचंय.
“अरे देवा, देवा!” अंगरखा
घातलेला माणूस आपला कठोर चेहरा आपल्या बरोबर चालणा-याकडे वळवून म्हणतो, “कसला मृत्युदण्ड
होता! किती निकृष्ट! पण तू, कृपा करून मला सांग,” त्याच्या चेह-यावर याचनेचा
भाव आला,
“मृत्युदण्ड
तर देण्यांतंच नाही आला नं! मी विनंती करतो, मला खरं-खरं सांग, नाही दिला नं?”
“नक्कीच, नाहीच दिला गेला,” त्याच्याबरोबर
चालणा-या तरुणाने भसाड्या आवाजांत उत्तर दिलं, “तुला तसा भ्रम झाला होता.”
“तू शप्पथ घेऊन
सांगू शकतोस कां?” अंगरखा घातलेल्या माणसाने परीक्षा पाहण्यासाठी विचारलं.
“शप्पथ घेऊन सांगतो,” तरुणाने उत्तर दिलं
आणि त्याचे डोळे न जाणे कां, स्मित करूं लागले.
“मला आणखी काहीही
नको,”
फाटक्या
आवाजांत अंगरखा घातलेला माणूस ओरडला आणि तो चंद्राकडे वर, वर जाऊं लागला, आपल्या मित्राला
बरोबर घेऊन. त्यांच्या मागे-मागे थाटांत चालंत होता शांत आणि विशालकाय, तीक्ष्ण कानांचा
श्वान.
तेव्हां चंद्राचा
प्रकाश उफाळू लागतो, त्यांतून चांदीची नदी चारी दिशांमधे वाहू लागते. चंद्र हुकुमंत
करंत खेळतोय,
चंद्र
नृत्य करंत डोळे मिचकावतोय. तेव्हां त्या धारेतून एक अद्भुत सुंदरी प्रकट होते आणि
ती इवानकडे एका धास्तावलेल्या दाढीवाल्याला खेचंत आणते. इवान निकोलायेविच लगेच
त्याला ओळखतो. हा – तोच एकशे अठरानंबर आहे, त्याचा रात्रीचा पाहुणा.
इवान निकोलायेविच स्वप्नांतंच त्याच्याकडे हात पसरतो आणि अधीरतेने विचारतो, “तर, कदाचित असंच सगळं
संपलं?”
“असंच संपलं, माझ्या शिष्या,” एकशे अठरा नंबर
उत्तर देतो,
आणि ती
सुंदरी इवानकडे येऊन म्हणते, “हो, नक्की, असंचं. सगळं संपलं आणि सगळं संपतंय...आणि मी तुझ्या
कपाळाचं चुम्बन घेईन, तेव्हां तुझ्यासोबतपण सगळं तस्संच होईल, जसं व्हायला पाहिजे.”
ती इवानकडे वाकते
आणि त्याच्या कपाळाचं चुम्बन घेते, इवान तिच्याकडे खेचला जाते आणि तिच्या डोळ्यांत बघू
लागतो;
पण ती
मागे-मागे सरकंत आपल्या मित्राबरोबर चंद्राकडे जाऊं लागते.
तेव्हां चंद्र मोठा
होऊं लागतो,
आपले
किरण सरळ इवानवर फेकतो; तो चारी दिशांमधे प्रकाश पसरवतो आहे, खोलींट चंद्राचा प्रकाश
शिगोशीग भरून जातो, प्रकाश उसळू लागतो, वर जातो आणि बिछान्याला बुडवतो. तेव्हांच इवान
निकोलायेविच शांततेने झोपतो.
सकाळी तो उठतो.
चुपचाप,
पण
पूर्णपणे शांत आणि स्वस्थ. त्याच्या बेचैन आठवणी शांत होतात आणि पुढच्या
पौर्णिमेपर्यंत प्रोफेसरला कोणीही त्रास नाही देत. ना तर गेस्तासचा बिन-नाकाचा
हत्यारा,
ना
जूडियाचा क्रूर पाचवा न्यायाधीश अश्वारोही पोन्ती पिलात.
समाप्त
संदर्भ
एक
: अनोळखी व्यक्तींशी कधींच बोलूं नका
1.पत्रियार्शी
तलाव : बुल्गाकोवने जुनंच नाव वापरलंय. 1918मधे ह्याचं नाव ‘पायनियर पॉन्ड्स’
करण्यांत आलं.
2.
बेर्लिओज़ : बुल्गाकोवने ब-याच पात्रांची नाव संगीतज्ञांच्या नावांवर ठेवली आहेत.
बेर्लिओज़च्या व्यतिरिक्त रीम्स्की आणि स्त्राविन्स्की पण आहेत.
3. ‘मॉसोलित:
मॉस्को लेखक संघ
4. ‘बिज़्दोम्नी:
घर नसलेला. क्रांतीनंतर बरेच लेखक आपले टोपणनाव ठेवायचे.
5.किस्लोवोद्स्क
: उत्तर कॉकेशसमधे एक हेल्थ-रिसॉर्ट.
6.फिलौन
अलेक्सान्द्रीस्की : ग्रीक दार्शनिक (20BC
– AD 54)
7.जोसेफ़
फ्लावी : (AD 57-100) ज्यूइश जनरल आणि
इतिहासकार
8.टेसिटस
: (AD
55-120) रोमन इतिहासकार .
9.ओज़िरिस : प्राचीन इजिप्शियन देव
10.
फ़ामूस : प्राचीन साइरो-फिनीशियन डेमी गॉड
11.मार्दूक
: बेबिलोनच्या सूर्य-देव
12.वित्स्लिपुत्स्ली
: अज़्टेक लोकांचा युद्धाचा-देव.
13.कुत्र्याच्या
डोकं : ग्योथेच्या फाउस्टमधे मेफिस्टोफेलेस फाउस्टला पहिल्यांदा काळ्या
कुत्र्याच्या रूपांत भेटतो.
14. परदेशी: परदेशी पर्यटकांबद्दल त्या काळांत कुतूहल आणि शंका असायची.
15.
अडोनिस : फामूज़चा ग्रीक अवतार
16.एटिस
: फ्रिजियन देव.
17.मित्राज़:
प्राचीन पर्शियन माज़्दाइज़्ममधे प्रकाशाचा देव
18.
मागीं : तीन बुद्धिमान माणसं जे नवजात क्राइस्टला भेटायला आले होते.
19.एमानुएल
: एमानुएल काण्ट (1724 – 1804) जर्मन दार्शनिक
20.शिलेर
: फ्रेड्रिकवि शिलेर,
जर्मन कवि आणि नाटककार
21.श्त्राउस
: डेविड श्त्राउस(1808 – 1874) जर्मन थिओलोजिस्ट
22.
सलोव्की : श्वेत सागरांत असलेलं ‘सलोवेत्स्की स्पेशल कैम्प’.
23.आततायी
: सोवियत काळाच्या सुरुवातीला क्रांतीचे शत्रू, आततायी, हे शब्द फार प्रचलित होते.
24.
कम्सोमोल्का : यंग कमुनिस्ट लीगची महिला सदस्य
25.
देश सोडून गेलेला : क्रांतीनंतर बरेचसे रशियन
रशिया सोडून यूरोपमधे चालले गेले होते.
26.हर्बर्ट
अव्रीलाक्स्की : थियोलोजिस्ट आणि गणितज्ञ, त्याला जादुगार
म्हणून पण ओळखायचे.
दोन:
पोंती पिलात
1.निस्सान
: ज्यूइश कैलेण्डरचा सातवा महिना. ह्या महिन्याच्या चौदा तारखेच्या
सूर्यास्तापासून
‘पासओवर’चा सण साजरा करण्यांत येतो.
2.
महान हिरोद : एक चतुर रोमन राजनयिक (73BC – 4BC) ज्याला
त्याच्या उत्कृष्ट सेवेसाठी जूडियाचा सम्राट बनवलं.
3.
जूडिया : पैलेस्टीनचा दक्षिणी भाग. हा एक जर्मन प्रदेश होता, न्यायाधीश केज़ारियांत असायचा.
4.
पोंती पिलात : (AD26-36) ह्या काळांत जूडियाचा जर्मन न्यायाधीश होता.
बुल्गाकोवने अनेक रचनांच्या आधारावर त्याचं पात्र प्रस्तुत केलं आहे.
5.येर्शलाइम
: हिब्रू भाषेंतून जेरुसलमचं एक पर्यायी लिप्यंतरण. आणखी काही नावं पण पर्यायी
रूपांतच दिलेली आहेत,
जसं जीज़स साठी येशुआ, कैफसच्या ऐवजी काइफा,
इस्केरिओटच्या जागेवर किरियाथ. अशा
प्रकारे बुल्गाकोवने त्यांच्या वास्तविक प्रभावाने स्वतःला दूर ठेवलं आहे.
6.
बारावी सैन्य तुकडी – हिलाच बुल्गाकोवने फुल्मिनात म्हटलेलं आहे.
7.
गेलिली : पेलेस्टाइनचा उत्तरी भाग,
अत्यंत सुपीक प्रदेश, ज्याची राजधानी तिबेरियसला होती.
8.सिनेद्रिओन
– सर्वोच्च ज्यूइश न्यायखण्ड,
ज्याचा प्रमुख जेरूसलमच्या मंदिराचा
प्रमुख पुजारी असायचा.
9.अरामैक : सेमिटिक भाषांच्या उत्तरी शाखेचं नाव, दक्षिण-पश्चिम एशियांत वापरली जायची.
10.
येर्शलाइमचं मंदिर : किंग सोलोमनने (10 BC) मंदिराचा
निर्माण केला होता,
पहिल्या मंदिराचा विनाश बेबिलोनच्या
आक्रामकांनी 586 BC मधे केला. दुस-या मंदिराचा पुनर्निमाण (557-515BC) च्या काळांत हिरोद महानने केला, आणि टाइटसने AD70
मधे ह्याचा विनाश केला. तिस-या
मंदिराचा निर्माण झालांच नाही. होली बाइबलमधे जीज़सवर एक आरोप हा होता की त्याने
मंदिराला नष्ट करायची धमकी दिली होती. लक्ष द्या, की बुल्गाकोवचा येशुआ, जीझसचं खरखुरं प्रतिरूप नाहीये. जरी बुल्गाकोव मधून-मधून बाइबलचे संदर्भ
वापरून त्याचं चित्रण करतो,
तरीही त्या पात्राला जीझस समजतां येणार
नाही.
11.महाबली
(हिगेमोन): गवर्नर किंवा लीडरसाठी ग्रीक शब्द.
12.
येशुआ: ‘देवंच मोक्षदाता आहे’चं अरामैक भाषांतर. ‘हा-नोस्त्री’चा अर्थ आहे ‘नज़ारेथचा’. हे शहर गेलिलींत आहे जिथे जीज़स लोकांमधे यायच्या आधी राहायचा.
13.गमाला
: गेलिली समुद्रावर असलेल्या तिबेरियस च्या उत्तर-पूर्वी भागांत असलेलं शहर, पारंपरिक रूपांत ह्याचा जीझसशी संबंध नाहीये.
14.लेवी
मैथ्यू : हे सुद्धां बाइबलमधे वर्णित लेवी मैथ्यूचं खरं चित्रण नाहीये. फक्त शिष्य–परंपरेकडे
इंगित केलेलं आहे.
15.बिफागी
: जेरुसलमजवळ असलेलं शहर,
‘हाउस ऑफ फिग्स’चं हेब्रू रुपांतर.
16.’सत्य काय आहे?’
: ‘गॉस्पेल ऑफ जॉन’मधे पिलातने क्राइस्टला विचारलेला प्रश्न.
17.
ऑलिव्स माउन्ट : जेरुसलमच्या पूर्व भागांत असलेली टेकडी. ह्या
टेकडीच्या पायथ्याशी गेथ्समेन (ऑलिव प्रेस) आहे, केद्रोन झ-याच्या
पलिकडे. इथेच क्राइस्टला पकडलं होतं. कादम्बरीत ह्या जाग्या महत्वाच्या आहेत.
18.
गाढवावर: गॉस्पेलमधे निर्विवादपणे जेरुसलेमला क्राइस्टचं आगमन असंच दाखवण्यांत आलं
आहे.
19, सुसा गेट : ह्याला गोल्डन गेटसुद्धां म्हणतात, जेरुसलेमच्या पूर्वीकडे,
माउन्ट ऑफ ऑलिव्सच्या समोर.
20. दिसमास, गेस्तास आणि
बार-रब्बान: पहिले दोघं चोर होते,
ज्यांना क्राइस्टबरोबर फासावर चढवलं
होतं. पारंपरिक गॉस्पेल्समधे ह्यांचा उल्लेख नाहीये, पण निकोडेमसच्या
गॉस्पेलमधे त्यांचा उल्लेख आहे. तिसरा गॉस्पेल्समधे वर्णित बारब्बासचं पर्यायी रूप
आहे.
21.
इदिस्ताविजो : टेसिटसच्या गॉस्पेलमधे – AD16मधे रोमन्स आणि जर्मन्समधे युद्ध इथे झालं होतं.
22.
दुसरं डोकं प्रकट झालंय : पिलातला कल्पनेंत तिबेरियाच्या वृद्ध सम्राटचा चेहरा
दिसूं लागला.
23.
किरियाथच्या जूडास : बाइबलमधल्या जूडास इस्केरिओतच्या तुलनेंत बुल्गाकोवचा जूडास
खूपंच वेगळा आहे. फक्त विश्वासघात आणि प्रमुख पुजा-याकडून मिळालेलं बक्षीस- ह्याचं
विषयावर बुल्गाकोवचा जूडास आधारलेला आहे.
24.
त्याने दिवे लावले : कायद्याप्रमाणे दिवे लावावे लागायचे, म्हणजे लपलेल्या साक्षीदाराला अभियुक्ताचा चेहरा दिसूं शकेल.
25.
बाल्ड–माउन्टेन: बाइबलप्रमाणे ह्या माउन्टेनवर क्राइस्टला फासावर चढवण्यांत आलं
होतं. बुल्गाकोवने वर्णित केलला बाल्ड-माउन्टेन जास्त उंचावर आणि शहरापासून जास्त
दूर होता. बुल्गाकोवच्य पैतृक शहरांत – कीएवमधे पण एक बाल्ड-माउन्टेन आहे.
26.
जोसेफ काइफा : बुल्गाकोवने बाइबलमधे वर्णित प्रमुख पुजारी काइफासच्या ऐवजी काइफा
हे नाव वापरलं आहे.
27.नम्रतेने
क्षमा मागितली : सणाच्या महिन्यांत ज्यू नसलेल्या माणसाच्या छताखाली गेल्याने
पवित्र पुजारी अपवित्र झाला असता.
28.
बार-रब्बानला किंवा हा-नोस्त्रीला : बाइबलमधेसुद्धां हाच पर्याय
मांडलेला आहे.
29. गुलाबी घट्ट पदार्थ
: एका लोककथेनुसार पिलातने पाण्यांत बुडून जीव दिला. कदाचित इथे तो उल्लेख
असावा.
30. सोनेरी भालेवाला
अश्वारोही: पिलात शब्द कदाचित ‘पिलम’
ह्या
शब्दांतून निघाला असावा, लैटिनमधे
ह्याचा अर्थ आहे ‘भाला’.
तीन : सातवं प्रमाण
मेट्रोपोल
: मॉस्कोमधे एक लक्झरी हॉटल. सोवियत काळांत इथे परदेशी लोक
थांबायचे. हॉटेल अजूनही आहे.
चार :
पाठलाग
1.दहा प्राइमस स्टोव चुपचाप
उभे होते : सोवियत काळांत कम्युनिटी अपार्टमेन्ट्स असयाचे. एकाच बिल्डिंगमधे बरेंच
परिवार राहायचे आणि कॉमन किचन वापरायचे. प्रत्येकाचा आपापला प्राइमस स्टोव असायचा.
प्राइमस स्टोवचं ‘मास्टर आणि मार्गारीटा’च्या
कथानकांत बरंच महत्व आहे.
2.दोन मेणबत्यांचे टोक :
साधारणपणे लग्नांत वधू-वराने धरलेल्या मेणबत्त्यांना लग्नानंतरही सुरक्षित ठेवायची
पद्धत आहे.
3.मॉस्को नदीच्या
एम्फिथियेटर: इवान कैथेड्रल ऑफ क्राइस्ट द सेवायरच्या पायथ्याशी असलेल्या पाण्यांत
पोहतो. ही नदीकाठी बाप्तिज़्मा करण्यासाठी प्रसिद्ध जागा होती.
4.‘येव्गेनी
अनेगिन’ : अलेक्सांद्र पूश्किनच्या ह्याच
शीर्षकाच्या काव्यात्मक कादंबरीवर आधारलेला ऑपेरा.
पाच : भानगड ग्रिबायेदवमधेच होती
1.अलेक्सांद्र ग्रिबायेदव :
(1795-1829) . कवि, नाटककार आणि राजनयिक. “ बुद्धीमुळे
दुर्दैव”साठी प्रसिद्ध आहेत.
2.‘पेरेलीगिनो
: इथे मॉस्कोच्या जवळ असलेल्या ‘लेखकांचं
गाव’ म्हटल्या जाणा-या ‘पेरेदिल्कोनी’शी
तात्पर्य आहे.
3.याल्टा,
सूकसू,
बोरावोये,
त्सिखिजिरी
महिंजौरी, लेनिनग्राद (शीत-महल): समर
रिसोर्ट्स असलेली शहरं. ‘शीत महाल’
ही
जागा मुद्दामंच जोडलीये.
4.दाचा : कन्ट्री हाउस
5.कोचवान : मोटार गाड्या
आल्यावर सुद्धां घोड्यागाड्या अजूनही चलनांत होत्या.
सहा : स्किज़ोफ्रेनिया, हेंच
सांगितलं
1.विध्वंसक : साधारणपणे ‘लोकांचे
शत्रू’ असल्या नावाने संबोधिले जायचे.
2.कुलाक : सधन कृषकांचा वर्ग, ज्याचा 1930मधे विनाश करण्यांत आला.
3. एक मे : कामगार-दिवस
4. धातूने बनलेला एक माणूस : पूश्किनचा पुतळा, जो पूश्किन स्क्वेयरवर आहे.
सात
: शापित फ्लैट
1. लोक काहीही मागमूस न सोडतां गायब व्हायला लागले :
गुप्त पोलिस अचानक येऊन कुणालाही पकडून न्यायचे. त्याचा गवगवा होत नव्हता.
2. हा मी आलोय : मेफिस्टोफेलस जेहां पहिल्यांदा फाउस्टकडे
येतो, तेव्हां नेमके हेच शब्द म्हणतो. बुल्गाकोव तेंच
रशियनमधे देत आहे.
3.
वोलान्द
: सैतानासाठी वापरण्यांत येत असलेलं जर्मन नाव
4. फिनडाइरेक्टर : फाइनान्स डाइरेक्टर
5. मेणाची मोट्ठी सील : ही सील सूचित करते, की बेर्लिओज़ला पकडून नेलंय
6.अज़ाज़ेलो : हेब्रू नाव ‘अजाज़ेल’ (Goat
God) आहे, त्याला ‘अजाज़ेलो’
करून बाइबलच्या कथानकापासून दूर
होण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नऊ: करोव्येवच्या युक्त्या
1.हाउसिंग सोसाइटीचे प्रमुख :
ह्या
अर्धसरकारी पदाशी अमाप अधिकार जोडलेले होते.
2.परकीय मुद्रेत लाच घेतो :
परकीय चलन जवळ बाळगणं अपराध होतं.
दहा: याल्टाच्या बातम्या
1.वारेनूखा
: ह्याच नावाचं एक पेयसुद्धा आहे, जे वोद्कांत मध, बेरीज़ आणि मसाल्यांना उकळून बनवण्यांत येतं.
2.सुपर
लाइटनिंग टेलिग्राम : लाइटनिंग टेलिग्रामची अतिशयोक्ती
3.तोतया
द्मित्री : ग्रिगोरी अत्रेप्येव नावाचा एक बहुरूपिया सतराव्या शतकांत
स्वतःला रशियन राजसिंहासनाचा वारस म्हणंत होता, आणि स्वतःला प्रिन्स
द्मित्री - इवान ‘टेरिबल’च्या मारलेला मुलगा म्हणायचा.
4.“...खडकांत
माझा विसावा...” : ग्योथेच्या ‘फाउस्ट’ने प्रेरित “विसावा” नावाच्या रोमान्सचे शब्द
वापरण्यांत आले आहेत.
5.स्वतः
जा. त्यांनाच निर्णय घेऊ दे : गुप्तचर पोलिसांशी तात्पर्य आहे.
बारा: काळा
जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन
1.लुइज़ाचा रोल : शिलेरचे
नाटक ‘प्रेम आणि कारस्थान” मधलं लुइज़ा
मिलरचं पात्र.
तेरा : हीरोचा प्रवेश
1.स्टेट
बॉण्ड : सरकारी बॉण्ड्स,
प्रोत्साहनार्थ देण्यांत यायचे. लॉटरी
सारखं ह्या बॉण्ड्सवर बक्षीस मिळायचं.
2.लातून्स्की...अरीमान… लाव्रोविच : बुल्गाकोविज़्मवर आघात करणारे आलोचक. ही खरी नावं नाहीत, पण सोवियत आलोचक बुल्गाकोवच्या विरोधांत होते.
3.आलोचक
अरीमान : वर्तमान पत्रांत एखादा लेख लिहून एखाद्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या
विरोधांत वातावरण तयार करणं सर्रास चालायचं.
4.लढवय्या
रूढिवादी : सुधारांच्या विरोधांत असलेले. बुल्गाकोवला लढवय्या
श्वेत गार्ड ह्या नावाने संबोधित करायचे. बुल्गाकोवने ‘श्वेत-गार्ड’ ह्या नावाची कादम्बरी लिहिलेली आहे.
5.त्याच
कोटांत, ज्याच्या गुंड्या आता तुटून गेल्या होत्या : ‘विचारपूस करण्यासाठी’ ज्यांना नेण्यांत यायचे त्यांचे बेल्ट्स, जोड्याचे लेसेस,
आणि बटन्स काढून घ्यायचे.
पंधरा: निकानोर इवानोविचचं स्वप्न
1.काही
वेळ दुस-या जागेंत ठेवून
: इथे तात्पर्य तपास कमिटीशी आहे.
2.क्विन्क्वेट
लैम्प्स : विशेष प्रकारचा तेलाचा दिवा,
ज्यांत तेलाची पातळी वातीपेक्षा जास्त असते.
3.बसले
आहांत? : कैदेत बसले आहांत?
4.
लोभी सरदार : पूश्किन रचित एक लघु-शोकांतिका.
5.
जसा एक मस्त-मवाली लपाछिपी खेळण्या-या व्यभिचारिणीला भेटायची वाट बघतो...” : “लोभी
सरदारच्या” पहिल्या दोन ओळी.
6.
फ्लैटचं भाडं, काय पूश्किन देणारेय? : घरोघरी
पूश्किनचं नाव अनेक संदर्भांत घेतलं जातं, त्याच्या साहित्यिक
कारकीर्दीबद्दल काहीही माहीत नसतानासुद्धा.
7. सोन्याचे ढेर पडलेत तिथे,
आणि
ते सगळे आहेत माझे! : पूश्किनची लघु कादम्बरी “क्वीन ऑफ स्पेड्स” वर आधारित
ऑपेरातील ओळी. पण ह्या ओळी चायकोव्स्कीच्या आहेत.
सतरा: एक भानगडींचा
दिवस
1.सुन्दर सागर पवित्र बायकाल...: बायकाल लेक बद्दल एक क्रांतिपूर्व गीत.
2.
सिस्को : लेक बायकलमधे मिळणा-या व्हाइटफिशचा एक प्रकार.
3.बार्गुज़िन
: उत्तर-पूर्वी हवेला दिलेलं स्थानीय नाव
4.शील्का
आणि नेरचिन्स्क... : बायकालच्या पूर्वेला असलेल्या शिल्का नदीवर असलेली शहरं, निर्वासितांसाठी म्हणून
ओळखली जायची.
5. लेरमन्तोव-अध्ययन क्लब :
मिखाइल लेर्मंतोव (1814 – 1841) रशियन कवि आणि कादम्बरीकार.
अठरा : दुर्दैवी पाहुणे
1.मैक्समिलियन अन्द्रेयेविचला
कीएव आवडंत नव्हतं : कीएव बुल्गाकोवचं पैतृक शहर होतं आणि ते त्याला अत्यंत
आवडायचं.
2.पासपोर्ट : आंतरिक
पासपोर्ट,
जे
ओळखपत्रंच असायचं.
3.अब्लोन्स्कीच्या घरांत
सगळं उलट-पुलंट झालं : टॉल्स्टोयच्या ‘आन्ना करेनिना’ह्या कादम्बरीतील दुसरं
वाक्य.
4. चर्चमधे करण्यांत येणारी
पनिखीदा : ऑर्थोडोक्स चर्चमधे मृतकांसाठी केली जाणारी स्पेशल सर्विस.
5.जळू-ब्यूरो : जळूंचा उपयोग अनेक
प्रकारच्या चिकित्सांमधे केला जायचा.
भाग – 2
एकोणीस : मार्गारीटा
1.मार्गारीटा निकोलायेव्ना :
ग्योथेच्या नाटकांतील पात्र, जिला फाउस्टने उध्वस्त केलं होतं.
2.भयानक अन्तोनियो बुरुज :
प्राचीन जेरुसलेममधील एक किल्ला, जिथे रोमन सैन्याच वास्तव्य असायचं.
3.हसमनचा प्रासाद : जूडियाचा
शासक हसमोनाइनचा प्रासाद.
4.मानेझ हॉल : सुरुवातीला
इथे अश्वारोहण अकडेमी होती, मग कॉन्सर्ट हॉल म्हणून वापरली जाऊं लागली.
बुल्गाकोवच्या काळांत ह्या बिल्डिंगचा उपयोग क्रेमलिनसाठी स्टोअर आणि गैरेजच्या
स्वरूपांत होत होता.
बावीस :
मेणबत्त्यांच्या प्रकाशांत
1.सात सोनेरी पंज्यांचा दिवा
: चर्चमधे सात मेणबत्त्या असलेला दिवा साधारणपणे वापरतांत.
2,काळ्या दगडाचा भुंगा :
भुंग्याला अमरत्वाचं प्रतीक समजलं जातं.
3. हैन्स : जर्मन लोक
कथांमधे हैन्स म्हणजे किंचित भोळा असा समजला जातो.
4. सेक्स्टस एम्पिरिक, मार्त्सिआन
कापेल्ला : सेक्स्टस एम्पिरिक एक ग्रीक दार्शनिक, होता, आणि मर्त्सिआन
कापेल्ला – पाचव्या शतकातील एक लैटिन लेखक ज्याने कादम्बरीस्वरूपांत एक ज्ञानकोष
लिहिला आहे - The Marriage of Mercury
and Philology.
5.माझ्या गुडघ्याचं हे दुखणं....माउन्ट
ब्रोकेन्स : इथे सैतान स्वर्गांतून खाली फेकाला गेल्याचा संदर्भ आहे. माउन्ट
ब्रोकेन्स – जर्मनीतील हर्ज़ माउन्टेन्सपैकी सगळ्यांत उंच आहे, लोककथांमधे ही जागा
सैतानांच्या आणि चेटकिणींच्या मेळाव्यासाठी ओळखली जाते.
6.अबादोना : विनाशाचा
दूत
तेवीस : सैतानाचा
शानदार नृत्योत्सव
1.वाल्ट्ज़ सम्राट : जॉन
स्ट्राउसशी तात्पर्य आहे.
2.व्यूताम : (1820–1881)
बेल्जियन वॉयलिन वादक, ज्याने दहा वर्षाचा वयांत आपलं पहिलं प्रस्तुतीकरण दिलं होतं.
3.श्रीमान जैक : असा अंदाज़
करण्यांत येतो की हा एक फ्रेंच व्यापारी होता, बनावट नोटा बनवण्यासाठी
प्रसिद्ध होता. तो देशद्रोही आणि अल्केमिस्ट नव्हता.
4.ग्राफ़ रॉबर्ट : काही
विद्वानांच्या मते हा रॉबर्ट डडले असावा, इंग्लैण्डच्या राणीशी जवळीक असलेला.
5.मैडम तोफ़ाना :
पालेर्मोतील एक महिला, जिला विष देण्याच्या आरोपावरून अटक करण्यांत आली होती आणि 1709मधे
तिचा गळा दाबण्यांत आला होता.
6.स्पैनिश बूट : यंत्रणा
देण्याचं एक लाकडी साधन.
7.फ्रीडा : स्विस मानस
शास्त्रज्ञाच्या ‘The
Sexual Question’ नावाच्या
रचनेतील एक पात्र.
8.मार्क्वेज़ : कुख्यात
अपराधी. विष देण्यासाठी अंगभंग करून हिला पैरिसमधे जाळण्यांत आलं होतं
9.मैडम मीन्किन : (1769-
1854) काउन्ट अराक्चेयेवची प्रेयसी. अत्यंत क्रूर अश्या ह्या महिलेल्या तिच्या
घरच्या सेवकांनी मारून टाकलं.
10.सम्राट रुदोल्फ़ :
(1552-1612),
जर्मन
सम्राट,
प्रागमधे
राहायचा,
एस्ट्रोनॉमी
आणि अल्केमींत ह्याला रस होता.
11.मॉस्कोची ड्रेसमेकर :
बुल्गाकोवचे नाटक “ज़ोयाचा फ्लैट”ची नायिका.
12.गेयस सीज़र कलिगुला :
टिबेरियसनंतर सम्राट झालेला कलिगुला अर्ध-पागल होता, त्याने रोमवर अनेक अत्याचार
केले आणि शेवटी त्याची हत्या करण्यांत आली.
13.मेसालिना : सम्राट
क्लॉडियसची तिसरी राणी, व्यभिचारासाठी कुख्यात होती.
14.माल्यूता स्कुरातोव: इवान द टेरिबलचा
उजवा हात असणारा कुलीन ग्रिगोरी लुक्यानोविच स्कुरातोव-बेल्स्की.
15.आणखी एक...नाही, दोघं... :
विद्वानांच्या मते हे दोघं गेन्रिख यागोदा आणि त्याचा सेक्रेटरी बुलानोव असावेत.
16.कमारीन्स्की : लोकप्रिय
रशियन डान्स.
17.जादुगार सलमान्द्रा :
जादुगार सलमान्द्रा आगींतून चालण्यासाठी प्रसिद्ध होता.
18.तोच घाणेरडा, डाग पडलेला गाउन : ‘ब्लैक मास’च्या वेळेस सैतान
नेहमी घाणेरडा शर्टच घालतो.
19.प्रत्येकाला त्याच्या
विश्वासानुसारंच फळ मिळतं. इथे क्राइस्टचे शब्द वेगळ्या संदर्भात वापरले आहेत.
चोवीस : मास्टर परंत
येतो
1.बरोब्बर
एकोणवीस : साधारणपणे भटकंतीसाठी सम संख्या वापरण्यांत येते - चाळीस दिवस किंवा
चाळीस वर्ष. इथे विनोदी बदल केला आहे, आणि जिवन्त राहण्यासाठी वाघाचं मांस उपयोगांत आणलं आहे.
2.हस्तलिखितं
कधीच जळंत नसतात: रशियामधे हे वाक्य ‘मास्टर एण्ड मार्गारीटा’च्या प्रकाशनानंतर अत्यंत लोकप्रिय झालं. जणु वोलान्दने हे भाकीत ह्याच
कादम्बरीसाठी केलं होतं.
3.अलोइज़ी
मोगारिच : विनोदी आडनाव ‘मोगारिच’ ‘ड्रिंक्स’
घेताना एखादा करार करणे ह्या शब्दापासून घेतलंय.
4. ‘ब्रुदरशॅफ्ट : ब्रदरहुडची
प्रतिज्ञा.
पंचवीस :
न्यायाधीशाने करियाथच्या जूडासची रक्षा करण्याचा कसा प्रयत्न केला
1.फालेर्नो : दाट, कडक रेड वाइनचा
प्रकार.
2.त्सेकूबा : ही पण कडक रेड
वाइन आहे.
3.बारा देव : बारा रोमन देवता –
जुपिटर,
जूनो, नेप्च्यून, वुल्कन, अपोलो, डाइना, सेरेस, वीनस, मार्स, वेस्ता, मरक्युरी आणि
मिनर्वा.
4.पालक देवतांची: रोमन
धर्माप्रमाणे घराची आणि चुलीची रक्षा करणारे देवता.
5.रक्षणकर्ता(मशीहा) : मशीहा, जो डेविडच्या
राजघराण्यांत जन्म घेणार होता. अशी भविष्यवाणी अनेक संतांनी केलेली होती.
6.पाणी पाजलं होतं? : फासावर चढवलेल्या
अभियुक्तांना शेवटच्या घटकेला पाणी पाजायचा नियम आहे.
7.मनुष्याच्या पापांमधे
भीरुतेला तो सगळ्यांत भयानक पाप मानतो : हे बुल्गाकोवचं स्वतःच मत आहे.
सव्वीस: अंतिम संस्कार
1.तीस
टेट्राडाख्म : चांदीची तीस नाणी. जूडासला प्रमुख पुजा-याकडून हेच बक्षीस मिळालं
होतं.
2.आता
आपण नेहमी बरोबर राहू : ‘मास’च्या
वेळेस “एक जीज़स क्राइस्ट...ज्याला आमच्यासाठी पोन्ती पिलात ने फासावर चढवलं” हे
वाक्य दोन हजार वर्षांपासून असंख्य वेळा म्हणण्यांत येतं.
3.भविष्यवेत्ता
राजा आणि गिरणीवाल्याची पुत्री, सुंदरी पिलाच्या पुत्राच्या रूपांत : बाराव्या शतकांतील कवि पेट्रस
पिक्टरच्या ‘पाइलेट’ नावाच्या कवितेत हा संदर्भ
सापडतो.
4.एन-सरीद
: नज़ारेथला अरेबिकमधे एन-सरीद म्हणतात.
5.वालेरियस
ग्रेटसच्या : पिलातचा आधी जूडियाचा न्यायाधीश.
6.त्याने
कुठे आत्महत्या तर नसेल केली? : बाइबलमधे जूडासच्या मृत्युचं हेच कारण दिलेलं आहे.
7.बकुरोती : अंजीर
8.आम्ही
जीवनाची स्वच्छ नदी पाहू : ‘नवा करार’ 22:1 मधे दिलेलं आहे.
सत्तावीस : फ्लैट
नंबर 50चा अंत
1.‘एस्तोरिया’ हॉटेल : पीटर्सबुर्गमधे एक
आलिशान हॉटेल.
अट्ठावीस : करोव्येव
आणि बेगेमोतचं शेवटचं साहस
1.तोर्गसीन: परदेशी चलन जिथे
चालतं असं डिपार्टमेन्टल स्टोअर.
2.ख़लीफा हारून-अल-रशीद :
बगदादचा ख़लीफ़ा जो प्रजेचे हाल-हवाल जाणण्यासाठी वेष बदलून फिरंत असे.
3.पालोसिच : पावेल योसिफोविच
4.केर्च हैरिंग :
क्रीमियाच्या,
आज़ोव
सागरावर असलेल्या ‘केर्च’ शहरातील महागडा
मासा.
5.दुःख! दुःख :
लग्नसमारंभाच्या भोजमधे “दुःख!” असं ओरडायची पद्धत आहे. नवीन जोडप्याला ह्याला
‘गोड’ करण्यासाठी
एकमेकांचं चुम्बन घ्यावं लागतं.
6.‘मृत आत्मा’ : निकोलाय गोगलची
(1809-1852) कादम्बरी. बुल्गाकोवने स्वतः ह्या कादम्बरीचं नाट्य रूपांतर केलेलं
आहे.
7.मेल्पोमीन, पोलिहिम्निया, आणि थेलिया : ग्रीक
देव झ्युस ह्याच्या नऊ कन्यकांपैकी तीन - शोकांतिच्या, कविता, आणि कॉमेडीच्या
ग्रीक
8.इन्स्पेक्टर जनरल:
निकोलाय गोगलची भन्नाट कॉमेडी.
9.येव्गेनी अनेगिन’: अलेक्सान्द्र
पूश्किनची पद्यात्मक कादम्बरी.
10.सोफ्या पाव्लोव्ना : ग्रिबोयेदोवच्या
नाटकाच्या (बुद्धीने दुर्दैव) नायिकेचे नाव हेच आहे.
11.पानायेव : रशियन
साहित्यांत दोन पानायेव झालेले आहेत : व्ही.आइ. पानायेव (1792-1852) -
सेन्टिमेन्टल काव्य-रचयिता, आणि आइ.आइ. पानायेव (1812-1862) – गद्य लेखक.
12.स्काबिचेव्स्की : ए. एम. स्काबिचेव्स्की (1858 – 1912) आलोचक आणि
जर्नलिस्ट.
13.बलीक : साल्मन किंवा
स्टर्जनच्या पाठीकडचा पूर्ण लांबीचा भाग ज्याला मीठ लावून किंवा धुरावर भाजून
उपयोगांत आणतांत. रशियामधे खूप आवडीचा पदार्थ.
एकोणतीस : मास्टर आणि मार्गारीटाच्या भाग्याचा निर्णय
झाला
1.आपली
टोकदार हनुवटी हातावर ठेऊन….एकटक बघंत होता : मूर्तिकार ऑगस्ट रोदिनचा पुतळा ‘द थिंकर’ अगदी
असांच आहे, जो
त्याने ‘गेट्स
ऑफ़ हेल’साठी
तयार केला होता.
2.तिमिर्याज़ेव
: क्लीमेन्त अर्कादेविच तिमिर्याज़ेव (1845 – 1910), रशियन स्कूल ऑफ़ प्लान्ट फिज़िओलॉजीचा संस्थापक.
तीस : अखेरचा निरोप
1.तुम्हांला
शांती लाभो : क्राइस्टचं पुनरागमन झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना असंच संबोधित
केलं होतं. प्रत्येक ‘मास’ मधे
ह्याची पुनरावृत्ती होत असते.
एकतीस : वरोब्योव टेकड्यांवर
1.वरोब्योव
: मॉस्को नदीच्या दक्षिण-पश्चिम किना-यावर असलेल्या टेकड्या, ज्यांचं नाव नंतर ‘लेनिन हिल्स’ ठेवण्यांत आलं.
2.दिवीच्यी मॉनेस्ट्री :
नोवोदेविच्यी कॉन्वेन्ट.
********
फ्लैपचा मजकूर :
बुल्गाकोवने
‘मास्टर आणि मार्गारीटा’ची रचना सन् 1928मधे
सुरू केली आणि कादम्बरी संपवली सन् 1940मधे, जेव्हां ते
मृत्युशैयेवर होते,
शेवटचे बदल करून त्यांनी डोळे मिटले...
सोवियत संघात कादम्बरीचं प्रकाशन झालं सन् 1967 मधे आणि वर्तमान काळांत, जेव्हां बुल्गाकोवची लोकप्रियता दिवसे दिवस वाढतेंच आहे, त्यांच हे कथन सत्य सिद्ध होतं,
की “हस्तलिखितं जळंत नसतात.”
मास्टर आणि
मार्गारीटाच्या कथानकाचा संबंध
आहे लेखकाच्या जीवनाशी आणि तत्कालीन समाजाशी. यथार्थ आणि कल्पना, पुरातन आणि नूतन,
मानव आणि सैतान, देव आणि सैतान. मानव आणि देव,
चांगलं आणि वाईट. अंधार आणि उजेडाचा
मेळ करून लेखकानी अशी कादम्बरी रचली आहे, जिने आधुनिक रशियन
साहित्यांत अमरत्व तर प्राप्त केलंच आहे, पण त्याला नवीन
दिशासुद्धां दिलीये. सत्याला हास्य-व्यंग्य आणि विचित्रतेच्या वेष्टनांत गुण्डाळून
प्रस्तुत केलेलं आहे,
ज्याला उघडल्यावर साखर लावलेल्या कडू
गोळीची अनुभूती होते.
पण
इतक्या यातना सहन केलेल्या नायकाला लेखकाने जीवनाच्या शेवटी भरभरून आनंद दिला आणि
एक संदेशसुद्धां दिला,
की मानसिक यातनेचीसुद्धां एक पराकाष्ठा
असते, शेवंट तर सुखदंच होत असतो.
बुल्गाकोव
आणखी एक संदेश देतात,
“कायरता एक अक्षम्य अपराध आहे,” कुणाला घाबरून सत्याला नाकारणा-यांना शांति लाभंत नाही.
मिखाइल
बुल्गाकोव
मिखाइल बुल्गाकोवचा जन्म सन्
1891मधे उक्राइनच्या कीएव शहरांत झाला. सन् 1916मधे डॉक्टर झाल्यावर जवळ-जवळ चार
वर्ष ते दूर-दूरच्या गावांमधे प्रैक्टिस करंत होते. सन् 1920मधे डॉक्टरकी सोडून
स्वतःला पूर्णपणे साहित्याला वाहून घेतलं. सन् 1921मधे मॉस्कोत आले आणि शेवटपर्यंत
तिथेच राहिले.
साहित्यिक
प्रवास सुरू झाला वर्तमान पत्रांत व्यंग लेखांनी. हळू हळू गोष्टी, नाटक आणि कादम्ब-यापण लिहिल्या.
काही
प्रसिद्ध रचना आहेत:
कादम्बरी : बेलाया ग्वार्दिया (श्वेत गार्ड), झीज़्न गस्पदीना द’मोल्येरा (मोल्येर महाशयाच जीवन), तेत्राल्नी रमान (थियेटरची भानगड).
लघु
कादम्बरी:
सबाच्ये
सेर्द्त्से (श्वान-हृदय),
रोकावीये याइत्सा (दुर्भाग्यशाली
अण्डे).
नाटक :
‘पस्लेद्नीये द्नी
तूर्बिनिख (तूर्बिन परिवाराचे शेवटचे दिवस), बग्रोवी अस्त्रोव
(लाल द्वीप), ज़ोयकिना क्वार्तीरा (ज़ोयाचा फ्लैट) इत्यादी...प्रत्येक
रचनेंत एक नवीनंच शैली वापरून मिखाइल बुल्गाकोवने जे पण लिहिलं, ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं आणि तत्कालीन सामाजिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिम्बंच होतं. पूश्किन, गोगल आणि साल्तिकोव श्चेद्रिनच्या परंपरेला चालू ठेवून बुल्गाकोवने हास्य, व्यंग्य, कल्पनेचा माध्यमाने तत्कालीन घटनाक्रमावर कठोर प्रहार
केलेला आहे, जे त्या काळांत अशक्य होतं. लक्ष देऊन त्यांच्या रचना
वाचल्यात तर वाचक वास्तविक व्यक्ती,
जागा आणि घटनांपर्यंत नक्कीच पोहोचू
शकतो.
आकेळ्ळा
चारुमति रामदास
सन्
1945मधे नागपुरांत जन्म;
सन् 2010मधे इंग्रजी आणि परकीय भाषा
विद्यापीठाच्या रशियन विभागातून सेवा निवृत्त.
थेट
रशियन मधून हिंदीत अनेक रचनांचा अनुवाद केला आहे. ‘मास्टर आणि
मार्गारीटा’ मराठीत पहिलाच प्रयत्न आहे.