संदर्भ
एक
: अनोळखी व्यक्तींशी कधींच बोलूं नका
1.पत्रियार्शी
तलाव : बुल्गाकोवने जुनंच नाव वापरलंय. 1918मधे ह्याचं नाव ‘पायनियर पॉन्ड्स’ करण्यांत
आलं.
2.
बेर्लिओज़ : बुल्गाकोवने ब-याच पात्रांची नाव संगीतज्ञांच्या
नावांवर ठेवली आहेत. बेर्लिओज़च्या व्यतिरिक्त रीम्स्की आणि स्त्राविन्स्की पण
आहेत.
3. ‘मॉसोलित:
मॉस्को लेखक संघ
4. ‘बिज़्दोम्नी:
घर नसलेला. क्रांतीनंतर बरेच लेखक आपले टोपणनाव ठेवायचे.
5.किस्लोवोद्स्क
: उत्तर कॉकेशसमधे एक हेल्थ-रिसॉर्ट.
6.फिलौन
अलेक्सान्द्रीस्की : ग्रीक दार्शनिक (20BC
– AD 54)
7.जोसेफ़
फ्लावी : (AD 57-100) ज्यूइश
जनरल आणि इतिहासकार
8.टेसिटस
: (AD
55-120) रोमन इतिहासकार .
9.ओज़िरिस : प्राचीन इजिप्शियन देव
10.
फ़ामूस : प्राचीन साइरो-फिनीशियन डेमी गॉड
11.मार्दूक
: बेबिलोनच्या सूर्य-देव
12.वित्स्लिपुत्स्ली
: अज़्टेक लोकांचा युद्धाचा-देव.
13.कुत्र्याच्या
डोकं : ग्योथेच्या फाउस्टमधे मेफिस्टोफेलेस फाउस्टला पहिल्यांदा काळ्या
कुत्र्याच्या रूपांत भेटतो.
14. परदेशी: परदेशी पर्यटकांबद्दल त्या काळांत कुतूहल आणि
शंका असायची.
15.
अडोनिस : फामूज़चा ग्रीक अवतार
16.एटिस
: फ्रिजियन देव.
17.मित्राज़:
प्राचीन पर्शियन माज़्दाइज़्ममधे प्रकाशाचा देव
18.
मागीं : तीन बुद्धिमान माणसं जे नवजात क्राइस्टला भेटायला आले होते.
19.एमानुएल
: एमानुएल काण्ट (1724 – 1804) जर्मन दार्शनिक
20.शिलेर
: फ्रेड्रिकवि शिलेर,
जर्मन कवि आणि
नाटककार
21.श्त्राउस
: डेविड श्त्राउस(1808 – 1874) जर्मन थिओलोजिस्ट
22.
सलोव्की : श्वेत सागरांत असलेलं ‘सलोवेत्स्की स्पेशल कैम्प’.
23.आततायी
: सोवियत काळाच्या सुरुवातीला क्रांतीचे शत्रू, आततायी, हे शब्द फार प्रचलित होते.
24.
कम्सोमोल्का : यंग कमुनिस्ट लीगची महिला सदस्य
25.
देश सोडून गेलेला : क्रांतीनंतर बरेचसे रशियन
रशिया सोडून यूरोपमधे चालले गेले होते.
26.हर्बर्ट
अव्रीलाक्स्की : थियोलोजिस्ट आणि गणितज्ञ, त्याला
जादुगार म्हणून पण ओळखायचे.
दोन:
पोंती पिलात
1.निस्सान : ज्यूइश कैलेण्डरचा सातवा महिना. ह्या महिन्याच्या चौदा
तारखेच्या सूर्यास्तापासून
‘पासओवर’चा सण साजरा करण्यांत येतो.
2.
महान हिरोद : एक चतुर रोमन राजनयिक (73BC – 4BC) ज्याला
त्याच्या उत्कृष्ट सेवेसाठी जूडियाचा सम्राट बनवलं.
3.
जूडिया : पैलेस्टीनचा दक्षिणी भाग. हा एक जर्मन प्रदेश होता, न्यायाधीश केज़ारियांत असायचा.
4.
पोंती पिलात : (AD26-36)
ह्या काळांत जूडियाचा
जर्मन न्यायाधीश होता. बुल्गाकोवने अनेक रचनांच्या आधारावर त्याचं पात्र प्रस्तुत
केलं आहे.
5.येर्शलाइम
: हिब्रू भाषेंतून जेरुसलमचं एक पर्यायी लिप्यंतरण. आणखी काही नावं पण पर्यायी
रूपांतच दिलेली आहेत,
जसं जीज़स साठी येशुआ, कैफसच्या ऐवजी काइफा, इस्केरिओटच्या
जागेवर किरियाथ. अशा प्रकारे बुल्गाकोवने त्यांच्या वास्तविक प्रभावाने स्वतःला
दूर ठेवलं आहे.
6.
बारावी सैन्य तुकडी – हिलाच बुल्गाकोवने फुल्मिनात म्हटलेलं आहे.
7.
गेलिली : पेलेस्टाइनचा उत्तरी भाग,
अत्यंत सुपीक प्रदेश, ज्याची राजधानी तिबेरियसला होती.
8.सिनेद्रिओन
– सर्वोच्च ज्यूइश न्यायखण्ड,
ज्याचा प्रमुख
जेरूसलमच्या मंदिराचा प्रमुख पुजारी असायचा.
9.अरामैक : सेमिटिक भाषांच्या उत्तरी शाखेचं नाव, दक्षिण-पश्चिम एशियांत वापरली जायची.
10.
येर्शलाइमचं मंदिर : किंग सोलोमनने (10 BC) मंदिराचा
निर्माण केला होता,
पहिल्या मंदिराचा विनाश
बेबिलोनच्या आक्रामकांनी 586
BC मधे केला. दुस-या
मंदिराचा पुनर्निमाण (557-515BC) च्या काळांत हिरोद महानने केला, आणि टाइटसने AD70 मधे ह्याचा
विनाश केला. तिस-या मंदिराचा निर्माण झालांच नाही. होली बाइबलमधे जीज़सवर एक आरोप
हा होता की त्याने मंदिराला नष्ट करायची धमकी दिली होती. लक्ष द्या, की बुल्गाकोवचा येशुआ, जीझसचं
खरखुरं प्रतिरूप नाहीये. जरी बुल्गाकोव मधून-मधून बाइबलचे संदर्भ वापरून त्याचं
चित्रण करतो,
तरीही त्या पात्राला जीझस
समजतां येणार नाही.
11.महाबली
(हिगेमोन): गवर्नर किंवा लीडरसाठी ग्रीक शब्द.
12.
येशुआ: ‘देवंच मोक्षदाता आहे’चं
अरामैक भाषांतर.
‘हा-नोस्त्री’चा अर्थ आहे ‘नज़ारेथचा’. हे शहर गेलिलींत आहे जिथे जीज़स लोकांमधे यायच्या आधी राहायचा.
13.गमाला
: गेलिली समुद्रावर असलेल्या तिबेरियस च्या उत्तर-पूर्वी भागांत असलेलं शहर, पारंपरिक रूपांत ह्याचा जीझसशी संबंध नाहीये.
14.लेवी
मैथ्यू : हे सुद्धां बाइबलमधे वर्णित लेवी मैथ्यूचं खरं चित्रण नाहीये. फक्त शिष्य–परंपरेकडे
इंगित केलेलं आहे.
15.बिफागी
: जेरुसलमजवळ असलेलं शहर,
‘हाउस ऑफ फिग्स’चं हेब्रू रुपांतर.
16.’सत्य काय आहे?’ : ‘गॉस्पेल
ऑफ जॉन’मधे पिलातने क्राइस्टला विचारलेला प्रश्न.
17.
ऑलिव्स माउन्ट
: जेरुसलमच्या पूर्व
भागांत असलेली टेकडी. ह्या टेकडीच्या पायथ्याशी गेथ्समेन (ऑलिव प्रेस) आहे, केद्रोन झ-याच्या पलिकडे. इथेच क्राइस्टला पकडलं होतं.
कादम्बरीत ह्या जाग्या महत्वाच्या आहेत.
18.
गाढवावर: गॉस्पेलमधे निर्विवादपणे जेरुसलेमला क्राइस्टचं आगमन असंच दाखवण्यांत आलं
आहे.
19, सुसा गेट : ह्याला गोल्डन गेटसुद्धां म्हणतात, जेरुसलेमच्या पूर्वीकडे, माउन्ट
ऑफ ऑलिव्सच्या समोर.
20. दिसमास, गेस्तास
आणि बार-रब्बान: पहिले दोघं चोर होते,
ज्यांना क्राइस्टबरोबर
फासावर चढवलं होतं. पारंपरिक गॉस्पेल्समधे ह्यांचा उल्लेख नाहीये, पण निकोडेमसच्या गॉस्पेलमधे त्यांचा उल्लेख आहे. तिसरा
गॉस्पेल्समधे वर्णित बारब्बासचं पर्यायी रूप आहे.
21.
इदिस्ताविजो : टेसिटसच्या गॉस्पेलमधे – AD16मधे रोमन्स आणि जर्मन्समधे युद्ध इथे झालं होतं.
22.
दुसरं डोकं प्रकट झालंय : पिलातला कल्पनेंत तिबेरियाच्या वृद्ध सम्राटचा चेहरा
दिसूं लागला.
23.
किरियाथच्या जूडास : बाइबलमधल्या जूडास इस्केरिओतच्या तुलनेंत बुल्गाकोवचा जूडास
खूपंच वेगळा आहे. फक्त विश्वासघात आणि प्रमुख पुजा-याकडून मिळालेलं बक्षीस- ह्याचं
विषयावर बुल्गाकोवचा जूडास आधारलेला आहे.
24.
त्याने दिवे लावले : कायद्याप्रमाणे दिवे लावावे लागायचे, म्हणजे लपलेल्या साक्षीदाराला अभियुक्ताचा चेहरा दिसूं
शकेल.
25.
बाल्ड–माउन्टेन: बाइबलप्रमाणे ह्या माउन्टेनवर क्राइस्टला फासावर चढवण्यांत आलं
होतं. बुल्गाकोवने वर्णित केलला बाल्ड-माउन्टेन जास्त उंचावर आणि शहरापासून जास्त
दूर होता. बुल्गाकोवच्य पैतृक शहरांत – कीएवमधे पण एक बाल्ड-माउन्टेन आहे.
26.
जोसेफ काइफा : बुल्गाकोवने बाइबलमधे वर्णित प्रमुख पुजारी काइफासच्या ऐवजी काइफा
हे नाव वापरलं आहे.
27.नम्रतेने
क्षमा मागितली : सणाच्या महिन्यांत ज्यू नसलेल्या माणसाच्या छताखाली गेल्याने
पवित्र पुजारी अपवित्र झाला असता.
28.
बार-रब्बानला किंवा हा-नोस्त्रीला : बाइबलमधेसुद्धां हाच पर्याय
मांडलेला आहे.
29. गुलाबी घट्ट पदार्थ
: एका लोककथेनुसार पिलातने पाण्यांत बुडून जीव दिला. कदाचित इथे तो उल्लेख
असावा.
30. सोनेरी भालेवाला
अश्वारोही: पिलात शब्द कदाचित ‘पिलम’ ह्या शब्दांतून निघाला असावा, लैटिनमधे ह्याचा अर्थ
आहे ‘भाला’.
तीन : सातवं प्रमाण
मेट्रोपोल
: मॉस्कोमधे एक लक्झरी हॉटल. सोवियत काळांत इथे परदेशी लोक
थांबायचे. हॉटेल अजूनही आहे.
चार
: पाठलाग
1.दहा प्राइमस स्टोव
चुपचाप उभे होते : सोवियत काळांत कम्युनिटी अपार्टमेन्ट्स असयाचे. एकाच
बिल्डिंगमधे बरेंच परिवार राहायचे आणि कॉमन किचन वापरायचे. प्रत्येकाचा आपापला
प्राइमस स्टोव असायचा. प्राइमस स्टोवचं ‘मास्टर आणि
मार्गारीटा’च्या कथानकांत बरंच महत्व आहे.
2.दोन मेणबत्यांचे टोक :
साधारणपणे लग्नांत वधू-वराने धरलेल्या मेणबत्त्यांना लग्नानंतरही सुरक्षित ठेवायची
पद्धत आहे.
3.मॉस्को नदीच्या
एम्फिथियेटर: इवान कैथेड्रल ऑफ क्राइस्ट द सेवायरच्या पायथ्याशी असलेल्या पाण्यांत
पोहतो. ही नदीकाठी बाप्तिज़्मा करण्यासाठी प्रसिद्ध जागा होती.
4.‘येव्गेनी
अनेगिन’ : अलेक्सांद्र पूश्किनच्या ह्याच शीर्षकाच्या
काव्यात्मक कादंबरीवर आधारलेला ऑपेरा.
पाच : भानगड ग्रिबायेदवमधेच होती
1.अलेक्सांद्र ग्रिबायेदव
: (1795-1829) . कवि, नाटककार आणि राजनयिक. “
बुद्धीमुळे दुर्दैव”साठी प्रसिद्ध आहेत.
2.‘पेरेलीगिनो
: इथे मॉस्कोच्या जवळ असलेल्या ‘लेखकांचं गाव’ म्हटल्या जाणा-या ‘पेरेदिल्कोनी’शी तात्पर्य आहे.
3.याल्टा,
सूकसू, बोरावोये, त्सिखिजिरी
महिंजौरी, लेनिनग्राद (शीत-महल): समर रिसोर्ट्स असलेली शहरं.
‘शीत महाल’ ही जागा मुद्दामंच जोडलीये.
4.दाचा : कन्ट्री हाउस
5.कोचवान : मोटार गाड्या
आल्यावर सुद्धां घोड्यागाड्या अजूनही चलनांत होत्या.
सहा : स्किज़ोफ्रेनिया, हेंच सांगितलं
1.विध्वंसक : साधारणपणे ‘लोकांचे शत्रू’ असल्या नावाने संबोधिले जायचे.
2.कुलाक : सधन कृषकांचा वर्ग, ज्याचा
1930मधे विनाश करण्यांत आला.
3. एक मे : कामगार-दिवस
4. धातूने बनलेला एक माणूस : पूश्किनचा पुतळा, जो
पूश्किन स्क्वेयरवर आहे.
सात
: शापित फ्लैट
1
लोक काहीही मागमूस न
सोडतां गायब व्हायला लागले : गुप्त पोलिस अचानक येऊन कुणालाही पकडून न्यायचे.
त्याचा गवगवा होत नव्हता.
2 हा मी आलोय :
मेफिस्टोफेलस जेहां पहिल्यांदा फाउस्टकडे येतो, तेव्हां
नेमके हेच शब्द म्हणतो. बुल्गाकोव तेंच रशियनमधे देत आहे.
3.
वोलान्द : सैतानासाठी वापरण्यांत येत असलेलं जर्मन नाव
4. फिनडाइरेक्टर : फाइनान्स
डाइरेक्टर
5. मेणाची मोट्ठी सील : ही सील सूचित करते,
की बेर्लिओज़ला पकडून
नेलंय
6.अज़ाज़ेलो : हेब्रू नाव ‘अजाज़ेल’
(Goat God) आहे, त्याला ‘अजाज़ेलो’
करून बाइबलच्या
कथानकापासून दूर होण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नऊ: करोव्येवच्या युक्त्या
1.हाउसिंग सोसाइटीचे प्रमुख
: ह्या अर्धसरकारी पदाशी अमाप अधिकार जोडलेले
होते.
2.परकीय मुद्रेत लाच घेतो
: परकीय चलन जवळ बाळगणं अपराध होतं.
दहा: याल्टाच्या बातम्या
1.वारेनूखा
: ह्याच नावाचं एक पेयसुद्धा आहे, जे
वोद्कांत मध,
बेरीज़ आणि मसाल्यांना
उकळून बनवण्यांत येतं.
2.सुपर
लाइटनिंग टेलिग्राम : लाइटनिंग टेलिग्रामची अतिशयोक्ती
3.तोतया
द्मित्री : ग्रिगोरी अत्रेप्येव नावाचा एक बहुरूपिया सतराव्या शतकांत
स्वतःला रशियन राजसिंहासनाचा वारस म्हणंत होता, आणि
स्वतःला प्रिन्स द्मित्री - इवान ‘टेरिबल’च्या मारलेला मुलगा म्हणायचा.
4.“...खडकांत
माझा विसावा...” : ग्योथेच्या ‘फाउस्ट’ने प्रेरित “विसावा” नावाच्या रोमान्सचे शब्द
वापरण्यांत आले आहेत.
5.स्वतः
जा. त्यांनाच निर्णय घेऊ दे : गुप्तचर पोलिसांशी तात्पर्य आहे.
बारा:
काळा जादू आणि त्याचं रहस्योद्घाटन
1.लुइज़ाचा रोल
: शिलेरचे नाटक ‘प्रेम आणि कारस्थान” मधलं लुइज़ा
मिलरचं पात्र.
तेरा : हीरोचा प्रवेश
1.स्टेट
बॉण्ड : सरकारी बॉण्ड्स,
प्रोत्साहनार्थ देण्यांत
यायचे. लॉटरी सारखं ह्या बॉण्ड्सवर बक्षीस मिळायचं.
2.लातून्स्की...अरीमान… लाव्रोविच : बुल्गाकोविज़्मवर आघात करणारे आलोचक. ही
खरी नावं नाहीत,
पण सोवियत आलोचक
बुल्गाकोवच्या विरोधांत होते.
3.आलोचक
अरीमान : वर्तमान पत्रांत एखादा लेख लिहून एखाद्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या
विरोधांत वातावरण तयार करणं सर्रास चालायचं.
4.लढवय्या
रूढिवादी : सुधारांच्या विरोधांत असलेले. बुल्गाकोवला लढवय्या
श्वेत गार्ड ह्या नावाने संबोधित करायचे. बुल्गाकोवने ‘श्वेत-गार्ड’ ह्या नावाची कादम्बरी लिहिलेली आहे.
5.त्याच
कोटांत, ज्याच्या गुंड्या आता तुटून गेल्या होत्या : ‘विचारपूस करण्यासाठी’
ज्यांना नेण्यांत यायचे त्यांचे बेल्ट्स, जोड्याचे
लेसेस, आणि बटन्स काढून घ्यायचे.
पंधरा: निकानोर इवानोविचचं स्वप्न
1.काही
वेळ दुस-या जागेंत ठेवून
: इथे तात्पर्य तपास
कमिटीशी आहे.
2.क्विन्क्वेट
लैम्प्स : विशेष प्रकारचा तेलाचा दिवा,
ज्यांत तेलाची पातळी
वातीपेक्षा जास्त असते.
3.बसले
आहांत? : कैदेत बसले आहांत?
4.
लोभी सरदार : पूश्किन रचित एक लघु-शोकांतिका.
5. जसा एक मस्त-मवाली लपाछिपी खेळण्या-या व्यभिचारिणीला भेटायची वाट
बघतो...” : “लोभी सरदारच्या” पहिल्या दोन ओळी.
6.
फ्लैटचं भाडं,
काय पूश्किन देणारेय? : घरोघरी पूश्किनचं नाव अनेक संदर्भांत घेतलं जातं, त्याच्या साहित्यिक कारकीर्दीबद्दल काहीही माहीत
नसतानासुद्धा.
7. सोन्याचे ढेर पडलेत तिथे,
आणि ते सगळे आहेत माझे! : पूश्किनची लघु कादम्बरी “क्वीन ऑफ स्पेड्स” वर
आधारित ऑपेरातील ओळी. पण ह्या ओळी चायकोव्स्कीच्या आहेत.
सतरा: एक
भानगडींचा दिवस
1.सुन्दर सागर पवित्र बायकाल...: बायकाल लेक बद्दल एक
क्रांतिपूर्व गीत.
2. सिस्को : लेक बायकलमधे मिळणा-या व्हाइटफिशचा एक प्रकार.
3.बार्गुज़िन : उत्तर-पूर्वी हवेला दिलेलं स्थानीय नाव
4.शील्का आणि नेरचिन्स्क... : बायकालच्या पूर्वेला असलेल्या शिल्का नदीवर
असलेली शहरं, निर्वासितांसाठी म्हणून ओळखली जायची.
5. लेरमन्तोव-अध्ययन
क्लब : मिखाइल लेर्मंतोव (1814 – 1841) रशियन कवि आणि कादम्बरीकार.
अठरा : दुर्दैवी पाहुणे
1.मैक्समिलियन
अन्द्रेयेविचला कीएव आवडंत नव्हतं : कीएव बुल्गाकोवचं पैतृक शहर होतं आणि ते
त्याला अत्यंत आवडायचं.
2.पासपोर्ट :
आंतरिक पासपोर्ट,
जे ओळखपत्रंच असायचं.
3.अब्लोन्स्कीच्या
घरांत सगळं उलट-पुलंट झालं : टॉल्स्टोयच्या ‘आन्ना करेनिना’ह्या कादम्बरीतील दुसरं वाक्य.
4. चर्चमधे
करण्यांत येणारी पनिखीदा : ऑर्थोडोक्स चर्चमधे मृतकांसाठी केली जाणारी स्पेशल
सर्विस.
5.जळू-ब्यूरो : जळूंचा उपयोग अनेक प्रकारच्या चिकित्सांमधे केला जायचा.
भाग – 2
एकोणीस : मार्गारीटा
1.मार्गारीटा
निकोलायेव्ना : ग्योथेच्या नाटकांतील पात्र, जिला फाउस्टने उध्वस्त केलं
होतं.
2.भयानक
अन्तोनियो बुरुज : प्राचीन जेरुसलेममधील एक किल्ला, जिथे रोमन सैन्याच वास्तव्य
असायचं.
3.हसमनचा प्रासाद
: जूडियाचा शासक हसमोनाइनचा प्रासाद.
4.मानेझ हॉल :
सुरुवातीला इथे अश्वारोहण अकडेमी होती, मग कॉन्सर्ट हॉल म्हणून
वापरली जाऊं लागली. बुल्गाकोवच्या काळांत ह्या बिल्डिंगचा उपयोग क्रेमलिनसाठी
स्टोअर आणि गैरेजच्या स्वरूपांत होत होता.
बावीस :
मेणबत्त्यांच्या प्रकाशांत
1.सात सोनेरी
पंज्यांचा दिवा : चर्चमधे सात मेणबत्त्या असलेला दिवा साधारणपणे वापरतांत.
2,काळ्या
दगडाचा भुंगा : भुंग्याला अमरत्वाचं प्रतीक समजलं जातं.
3. हैन्स : जर्मन
लोक कथांमधे हैन्स म्हणजे किंचित भोळा असा समजला जातो.
4. सेक्स्टस एम्पिरिक,
मार्त्सिआन कापेल्ला : सेक्स्टस एम्पिरिक एक ग्रीक दार्शनिक, होता, आणि मर्त्सिआन कापेल्ला – पाचव्या शतकातील एक
लैटिन लेखक ज्याने कादम्बरीस्वरूपांत एक ज्ञानकोष लिहिला आहे - The Marriage of Mercury and Philology.
5.माझ्या
गुडघ्याचं हे दुखणं....माउन्ट ब्रोकेन्स : इथे सैतान स्वर्गांतून खाली फेकाला गेल्याचा
संदर्भ आहे. माउन्ट ब्रोकेन्स – जर्मनीतील हर्ज़ माउन्टेन्सपैकी सगळ्यांत उंच आहे, लोककथांमधे
ही जागा सैतानांच्या आणि चेटकिणींच्या मेळाव्यासाठी ओळखली जाते.
6.अबादोना :
विनाशाचा दूत
तेवीस :
सैतानाचा शानदार नृत्योत्सव
1.वाल्ट्ज़ सम्राट
: जॉन स्ट्राउसशी तात्पर्य आहे.
2.व्यूताम :
(1820–1881) बेल्जियन वॉयलिन वादक, ज्याने दहा वर्षाचा वयांत आपलं
पहिलं प्रस्तुतीकरण दिलं होतं.
3.श्रीमान जैक :
असा अंदाज़ करण्यांत येतो की हा एक फ्रेंच व्यापारी होता, बनावट
नोटा बनवण्यासाठी प्रसिद्ध होता. तो देशद्रोही आणि अल्केमिस्ट नव्हता.
4.ग्राफ़ रॉबर्ट :
काही विद्वानांच्या मते हा रॉबर्ट डडले असावा, इंग्लैण्डच्या राणीशी जवळीक
असलेला.
5.मैडम तोफ़ाना
: पालेर्मोतील एक महिला, जिला विष देण्याच्या आरोपावरून अटक
करण्यांत आली होती आणि 1709मधे तिचा गळा दाबण्यांत आला होता.
6.स्पैनिश बूट :
यंत्रणा देण्याचं एक लाकडी साधन.
7.फ्रीडा : स्विस
मानस शास्त्रज्ञाच्या ‘The
Sexual Question’ नावाच्या रचनेतील एक पात्र.
8.मार्क्वेज़ :
कुख्यात अपराधी. विष देण्यासाठी अंगभंग करून हिला पैरिसमधे जाळण्यांत आलं
होतं
9.मैडम मीन्किन :
(1769- 1854) काउन्ट अराक्चेयेवची प्रेयसी. अत्यंत क्रूर अश्या ह्या महिलेल्या
तिच्या घरच्या सेवकांनी मारून टाकलं.
10.सम्राट
रुदोल्फ़ : (1552-1612), जर्मन सम्राट, प्रागमधे
राहायचा, एस्ट्रोनॉमी आणि अल्केमींत ह्याला रस होता.
11.मॉस्कोची
ड्रेसमेकर : बुल्गाकोवचे नाटक “ज़ोयाचा फ्लैट”ची नायिका.
12.गेयस सीज़र
कलिगुला : टिबेरियसनंतर सम्राट झालेला कलिगुला अर्ध-पागल होता, त्याने
रोमवर अनेक अत्याचार केले आणि शेवटी त्याची हत्या करण्यांत आली.
13.मेसालिना :
सम्राट क्लॉडियसची तिसरी राणी, व्यभिचारासाठी कुख्यात होती.
14.माल्यूता
स्कुरातोव:
इवान द टेरिबलचा उजवा हात असणारा कुलीन ग्रिगोरी लुक्यानोविच
स्कुरातोव-बेल्स्की.
15.आणखी एक...नाही, दोघं...
: विद्वानांच्या मते हे दोघं गेन्रिख यागोदा आणि त्याचा सेक्रेटरी बुलानोव असावेत.
16.कमारीन्स्की :
लोकप्रिय रशियन डान्स.
17.जादुगार
सलमान्द्रा : जादुगार सलमान्द्रा आगींतून चालण्यासाठी प्रसिद्ध होता.
18.तोच
घाणेरडा,
डाग पडलेला गाउन : ‘ब्लैक मास’च्या वेळेस सैतान नेहमी घाणेरडा शर्टच घालतो.
19.प्रत्येकाला
त्याच्या विश्वासानुसारंच फळ मिळतं. इथे क्राइस्टचे शब्द वेगळ्या संदर्भात वापरले
आहेत.
चोवीस :
मास्टर परंत येतो
1.बरोब्बर एकोणवीस : साधारणपणे भटकंतीसाठी सम संख्या वापरण्यांत येते -
चाळीस दिवस किंवा चाळीस वर्ष. इथे विनोदी बदल केला आहे, आणि जिवन्त राहण्यासाठी वाघाचं मांस उपयोगांत आणलं
आहे.
2.हस्तलिखितं कधीच जळंत नसतात: रशियामधे हे वाक्य ‘मास्टर एण्ड
मार्गारीटा’च्या प्रकाशनानंतर अत्यंत लोकप्रिय झालं. जणु वोलान्दने हे भाकीत ह्याच
कादम्बरीसाठी केलं होतं.
3.अलोइज़ी मोगारिच : विनोदी आडनाव ‘मोगारिच’ ‘ड्रिंक्स’ घेताना एखादा करार करणे ह्या शब्दापासून घेतलंय.
4. ‘ब्रुदरशॅफ्ट :
ब्रदरहुडची प्रतिज्ञा.
पंचवीस :
न्यायाधीशाने करियाथच्या जूडासची रक्षा करण्याचा कसा प्रयत्न केला
1.फालेर्नो
: दाट, कडक रेड वाइनचा प्रकार.
2.त्सेकूबा : ही
पण कडक रेड वाइन आहे.
3.बारा देव : बारा रोमन देवता – जुपिटर, जूनो, नेप्च्यून, वुल्कन, अपोलो,
डाइना, सेरेस, वीनस,
मार्स, वेस्ता, मरक्युरी
आणि मिनर्वा.
4.पालक देवतांची:
रोमन धर्माप्रमाणे घराची आणि चुलीची रक्षा करणारे देवता.
5.रक्षणकर्ता(मशीहा)
: मशीहा,
जो डेविडच्या राजघराण्यांत जन्म घेणार होता. अशी भविष्यवाणी अनेक
संतांनी केलेली होती.
6.पाणी पाजलं
होतं?
: फासावर चढवलेल्या अभियुक्तांना शेवटच्या घटकेला पाणी पाजायचा नियम
आहे.
7.मनुष्याच्या
पापांमधे भीरुतेला तो सगळ्यांत भयानक पाप मानतो : हे बुल्गाकोवचं स्वतःच मत आहे.
सव्वीस: अंतिम संस्कार
1.तीस टेट्राडाख्म : चांदीची तीस नाणी. जूडासला प्रमुख पुजा-याकडून हेच
बक्षीस मिळालं होतं.
2.आता आपण नेहमी बरोबर राहू : ‘मास’च्या वेळेस “एक जीज़स क्राइस्ट...ज्याला आमच्यासाठी
पोन्ती पिलात ने फासावर चढवलं” हे वाक्य दोन हजार वर्षांपासून असंख्य वेळा
म्हणण्यांत येतं.
3.भविष्यवेत्ता राजा आणि गिरणीवाल्याची पुत्री, सुंदरी पिलाच्या पुत्राच्या रूपांत : बाराव्या
शतकांतील कवि पेट्रस पिक्टरच्या ‘पाइलेट’ नावाच्या कवितेत हा संदर्भ सापडतो.
4.एन-सरीद : नज़ारेथला अरेबिकमधे एन-सरीद म्हणतात.
5.वालेरियस ग्रेटसच्या : पिलातचा आधी जूडियाचा न्यायाधीश.
6.त्याने कुठे आत्महत्या तर नसेल केली?
: बाइबलमधे जूडासच्या मृत्युचं हेच कारण दिलेलं आहे.
7.बकुरोती : अंजीर
8.आम्ही जीवनाची स्वच्छ नदी पाहू : ‘नवा करार’ 22:1 मधे दिलेलं आहे.
सत्तावीस
: फ्लैट नंबर 50चा अंत
1.‘एस्तोरिया’ हॉटेल :
पीटर्सबुर्गमधे एक आलिशान हॉटेल.
अट्ठावीस
: करोव्येव आणि बेगेमोतचं शेवटचं साहस
1.तोर्गसीन:
परदेशी चलन जिथे चालतं असं डिपार्टमेन्टल स्टोअर.
2.ख़लीफा
हारून-अल-रशीद : बगदादचा ख़लीफ़ा जो प्रजेचे हाल-हवाल जाणण्यासाठी वेष बदलून फिरंत
असे.
3.पालोसिच :
पावेल योसिफोविच
4.केर्च हैरिंग :
क्रीमियाच्या,
आज़ोव सागरावर असलेल्या ‘केर्च’ शहरातील महागडा मासा.
5.दुःख! दुःख :
लग्नसमारंभाच्या भोजमधे “दुःख!” असं ओरडायची पद्धत आहे. नवीन
जोडप्याला ह्याला ‘गोड’ करण्यासाठी
एकमेकांचं चुम्बन घ्यावं लागतं.
6.‘मृत आत्मा’ : निकोलाय गोगलची (1809-1852) कादम्बरी.
बुल्गाकोवने स्वतः ह्या कादम्बरीचं नाट्य रूपांतर केलेलं आहे.
7.मेल्पोमीन, पोलिहिम्निया,
आणि थेलिया : ग्रीक देव झ्युस ह्याच्या नऊ कन्यकांपैकी तीन - शोकांतिच्या,
कविता, आणि कॉमेडीच्या ग्रीक
8.इन्स्पेक्टर
जनरल: निकोलाय गोगलची भन्नाट कॉमेडी.
9.येव्गेनी
अनेगिन’: अलेक्सान्द्र पूश्किनची पद्यात्मक कादम्बरी.
10.सोफ्या
पाव्लोव्ना
: ग्रिबोयेदोवच्या नाटकाच्या (बुद्धीने दुर्दैव) नायिकेचे नाव हेच
आहे.
11.पानायेव :
रशियन साहित्यांत दोन पानायेव झालेले आहेत : व्ही.आइ. पानायेव (1792-1852) -
सेन्टिमेन्टल काव्य-रचयिता, आणि आइ.आइ. पानायेव (1812-1862) –
गद्य लेखक.
12.स्काबिचेव्स्की
: ए. एम. स्काबिचेव्स्की (1858 – 1912) आलोचक आणि
जर्नलिस्ट.
13.बलीक : साल्मन
किंवा स्टर्जनच्या पाठीकडचा पूर्ण लांबीचा भाग ज्याला मीठ लावून किंवा धुरावर भाजून
उपयोगांत आणतांत. रशियामधे खूप आवडीचा पदार्थ.
एकोणतीस : मास्टर आणि मार्गारीटाच्या
भाग्याचा निर्णय झाला
1.आपली टोकदार हनुवटी हातावर ठेऊन….एकटक बघंत होता :
मूर्तिकार ऑगस्ट रोदिनचा पुतळा ‘द थिंकर’ अगदी असांच आहे, जो त्याने ‘गेट्स ऑफ़ हेल’साठी तयार केला
होता.
2.तिमिर्याज़ेव : क्लीमेन्त अर्कादेविच तिमिर्याज़ेव (1845 – 1910), रशियन स्कूल ऑफ़
प्लान्ट फिज़िओलॉजीचा संस्थापक.
तीस : अखेरचा निरोप
1.तुम्हांला शांती लाभो : क्राइस्टचं पुनरागमन झाल्यावर त्याने आपल्या
शिष्यांना असंच संबोधित केलं होतं. प्रत्येक ‘मास’ मधे ह्याची पुनरावृत्ती होत असते.
एकतीस : वरोब्योव टेकड्यांवर
1.वरोब्योव : मॉस्को नदीच्या दक्षिण-पश्चिम किना-यावर असलेल्या टेकड्या, ज्यांचं नाव नंतर
‘लेनिन हिल्स’ ठेवण्यांत आलं.
2.दिवीच्यी
मॉनेस्ट्री : नोवोदेविच्यी कॉन्वेन्ट.
********