पंचवीस
न्यायाधीशाने
करियाथच्या जूडासची रक्षा करण्याचा कसा प्रयत्न
केला
भूमध्य सागरांतून आलेल्या
अंधाराने न्यायाधीशाच्या घृणेचे पात्र असलेल्या त्या शहराला वेढून टाकलं. मंदिराला
भयानक अन्तोनियो बुरुजाशी जोडणारे लटकते-पुल लुप्त झाले,
आकाशातून एका अथांगतेने येऊन अश्व-शर्यतीच्या मैदानावर स्थित
पंखवाल्या देवतांच्या मूर्ती, तोपांसाठी बनवलेल्या भोकांसहित
हसमनचा प्रासाद, बाजार, काफिले,
सराय, गल्ल्या आणि तलावांना झाकून टाकलं. महान
शहर येर्शलाइम हरवलं, जणू त्याचं कधी अस्तित्वंच नव्हतं.
सगळं गिळून टाकलं अंधाराने, जो येर्शलाइम आणि त्याच्या
आजूबाजूला असलेल्या सगळ्या जीवित प्राण्यांना भयभीत करंत होता. वसन्त ऋतुच्या ह्या
निस्सान महिन्याच्या चौदा तारखेच्या शेवटच्या प्रहरांत सागराकडून एक विचित्र ढग
आलं आणि सगळंच जलमग्न करून गेलं.
त्याने आपल्या निर्मम प्रहाराने बाल्ड-माउन्टेनला
पस्त केलं होतं, जिथे वधिक सुळावर लटकवलेल्या
कैद्यांच्या शरीरांत शीघ्रतेने भाल्याचं टोक खुपसंत होते; तो
येर्शलाइमच्या मंदिरावर आदळला होता; वाफाळलेल्या लाटांच्या रूपांत
वाहून खालच्या शहराला जलमग्न करून गेला होता. तो खिडक्यांच्या आत घुसंत होता,
वाकड्या-तिकड्या पायवाटांवरून लोकांना घरांत ढकलंत होता. ओल
देण्यांत कृपणता दाखवंत तो फक्त प्रकाशंच देत होता. जसांच हा काळा वाफा सोडंत
असलेला राक्षस अग्निवर्षा करायचा, त्या घनघोर अंधारांत
मंदिराचं शिखर चमकून जायचं. पण क्षणभरातंच पुन्हा विझून जायचं, आणि मन्दिर अंतहीन अंधारांत लुप्त व्हायचं. पुन्हां पुन्हां त्याच्यातून
बाहेर यायचं आणि पुन्हां-पुन्हां त्या अंधारांत बुडून जायचं. दरवेळेसचं हे बुडणं
एक विनाशकारी कडकडाट आणायचं.
काही अन्य प्रकाश शलाका
मंदिराच्या समोरच्या पश्चिमी टेकडीवर असलेल्या हिरोद महानच्या प्रासादाला त्या
अंनंत अंधारातून साद घालायच्या, आणि त्याच्या
भयानक, नेत्रहीन, स्वर्णिम प्रतिमा,
आकाशाकडे हात पसरून उडू लागायच्या. पण आकाश-ज्योति लगेच लुप्त
व्हायची, आणि सौदामिनी आपल्या चाबकाने त्या प्रतिमांना परत
अंधारांत ढकलून द्यायची.
अचानक,
मुसळाधार पावसाची झडी लागली, आणि तेव्हां हे
वादळ चक्रीवादळांत परिवर्तित झालं. त्या ठिकाणी, जिथे दुपारी,
उद्यानांत संगमरमरी बेंचच्या जवळ न्यायाधीश आणि धर्म-गुरूने
वार्तालाप केला होता, तोपे सुटलेल्या गोळ्यासारखा भीषण आवाज
करंत सरूची फांदी पडली. पाण्यानी ओथंबलेली धूळ आणि गारांबरोबर स्तंभांच्या खाली असलेल्या
बाल्कनींत तुटलेले गुलाब, मैग्नोलियाची पानं, छोट्या-छोट्या फांद्या आणि रेतीचे कण उडून येऊ लागले. चक्रीवादळ बागेला
उध्वस्त करंत होतं.
ह्यावेळेस स्तंभांच्या
खाली फक्त एक माणूस होता, आणि तो होता
न्यायाधीश.
आता तो खुर्चीवर बसलेला
नसून एका लहान, कमी उंचीच्या टेबलाजवळ पडलेल्या
कोचावर पहुडला होता. टेबलवर खाण्या पिण्याची सामग्री ठेवलली होती, सुरयांमधे दारू होती. दुसरा, रिकामा कोच, टेबलाच्या दुस-या बाजूला ठेवला होता. न्यायाधीशाच्या पायांजवळ रक्तवर्णी
द्रव सांडलेलं होतं आणि फुटक्या सुरईचे तुकडे पडले होते. तो सेवक, ज्याने वादळाच्या आधी टेबल सजवून त्यावर पेय इत्यादि ठेवलं होतं, माहीत नाही कां, न्यायाधीशाच्या नजरेनं घाबरून गेला;
तो विचार करूं लागला की कुठेतरी काहीतरी कमी राहिलंय आणि
न्यायाधीशाने त्याच्यावर रागावून सुरई फरशीवर फेकून फोडून टाकली आणि म्हणाला,
“मला देताना, चेह-याकडे कां नाही बघंत?
तू काही चोरलं आहेस कां?”
अफ्रीकी सेवकाचा काळा
चेहरा भुरकट झाला. त्याच्या डोळ्यांत मृत्युसारखी भीती दिसू लागली,
तो थरथरू लागला आणि त्याच्या हातांतून दुसरी सुरईपण पडतां-पडतां
वाचली, पण न्यायाधीशाचा राग जसा पट्कन आला होता, तसांच तो निघूनही गेला. अफ्रीकी सेवक वाकून सुरईचे तुकडे उचलणारंच होता,
की न्यायाधीशाने खुणेने त्याला जायला सांगितलं आणि सेवक पळून गेला.
म्हणून द्रव तिथेच पडून राहिलं.
आता,
चक्रीवादळ आल्यावर अफ्रीकी सेवक एका कोनाड्याजवळ, ज्यांत एका नतमस्तक नग्न स्त्रीची श्वेत पाषाणाची प्रतिमा होती, लपून उभा होता, म्हणजे कारण नसताना न्यायाधीशासमोर
पडणार नाही आणि बोलावल्याबरोबर लगेच त्याच्या सेवेंत उपस्थित राहूं शकेल.
ह्या वादळी संध्याकाळी
कोचावर अर्धवट लोळलेला न्यायाधीश स्वतःच प्याल्यांत दारू ओतून मोठे-मोठे घोट घेत
होता, मधून-मधून तो पावाचे तुकडे तोंडांत टाकायचा,
मासा खायचा, लिंबू चोखायचा आणि पुन्हा दारू
प्यायला लागायचा.
जर गरजत्या पाण्याचा हल्ला
नसता, प्रासादाच्या छताला धमकावणारा विजेचा कडकडाट
नसता, बाल्कनीच्या पाय-यांवर पडणा-या गारांची खडखड नसती,
तर ऐकूं आलं असतं की न्यायाधीश स्वतःशीच बडबड करतोय. आणि जर
आकाशातील क्षणिक चमक स्थाई प्रकाशांत परिवर्तित झाली असती, तर
हे पण दिसलं असतं की दारू आणि अनिद्रेमुळे सुजलेल्या न्यायाधीशाच्या चेह-यावर
आतुरता आहे आणि तो डबक्यात पडलेल्या दोन पांढ-या गुलाबांकडे बघंत नसून आपला चेहरा
सतत उद्यानाकडे फिरवतोय, तो कुणाची तरी वाट बघतोय, खूप आतुरतेने वाट बघतोय.
काही वेळाने
न्यायाधीशाच्या डोळ्यांसमोर पावसाची सर किंचित मंद झाली. हे चक्रीवादळ कितीही भीषण
असलं, तरी त्याचा जोर कमी झालांच. आता गारा नव्हत्या
पडंत. विजांची चमक आणि कडकडाट आता थांबून-थांबून येत होते. येर्शलाइमवर आता
चांदीची किनार असलेली दाट जांभळी चादर ताणलेली नसून, साधारण भु-या-काळ्या
रंगाचं ढग तरंगत होतं. वादळ मृत-सागराकडे निघून गेलं होतं.
आता पावसाचा आवाज आणि
वाहत्या पाण्याचा आवाज स्पष्ट ऐकूं येत होता, जे त्या
पाय-यांवर वाहत होतं, जिथून न्यायाधीश सकाळी मृत्युदण्डाची
घोषणा करण्यासाठी चौकावर गेला होता. शेवटी मौन झालेल्या कारंज्याचा आवाज पण ऐकूं
आला. उजेड झाला. पूर्वेकडे पळणा-या भुया चादरींत आता निळ्या-निळ्या खिडक्या दिसंत
होत्या.
मंद पडलेल्या पावसाच्या
हल्ल्याला छेदंत, दुरून न्यायाधीशापर्यंत तुता-यांचा
आणि शैकडो घोड्यांच्या धावण्याचा आवाज पोहोचला. न्यायाधीशाच्या शरीरांत किंचित
हालचाल झाली. त्याचा चेहरा उजळला. सैन्य तुकडी बाल्ड-माउन्टेनवरून परंत येत होती.
आवाजावरून कळंत होतं, की त्याच चौकातून जाते आहे, जिथून मृत्युदण्डाची घोषणा झाली होती.
शेवटी न्यायाधीशाला
पाय-यांवरून वरच्या बाल्कनीकडे येणा-या त्या पावलांची चाहूल ऐकूं आली,
जिची तो प्रतीक्षा करंत होता. न्यायाधीशाने मान वळवली, आणि त्याचे डोळे प्रसन्नतेने चमकले.
दोन संगमरमरी सिंहांच्या
आकृत्यांच्यामधे आधी प्रकट झालं टोप घातलेल शिर, मग एक
सम्पूर्ण ओलाचिंब झालेला माणूस, ज्याची बरसातीसुद्धां
त्याच्या शरीराला चिटकली होती. हा तोच माणूस होता, ज्याने
प्रासादाच्या अंधा-या खोलींत मृत्युदण्डाच्या घोषणेपूर्वी न्यायाधीशाशी वार्तालाप
केला होता, आणि जो मृत्युदण्डाच्या वेळेस तिपाईवर बसून एका
फांदीशी खेळंत होता.
पाण्याच्या डबक्यांकडे
लक्ष न देता टोप घातलेला माणूस उद्यानाचा चौक पार करून बाल्कनीच्या संगमरमरी
फरशीवर आला आणि हात उंच करून, गोड आवाजांत
त्याने लैटिनमधे म्हटलं:
“न्यायाधीशाच्या स्वास्थ्य
आणि प्रसन्नतेची कामना!”
“अरे देवा!” पिलात
आश्चर्याने म्हणाला, “तुझ्या शरीरावर तर एकही
वाळलेला तार नाहीये! काय वादळ होत! हो ना? कृपा करून पट्कन
माझ्याजवळ ये. कपडे बदलून मला सविस्तर सगळं सांग.”
आगंतुकाने टोप काढला.
पूर्णपणे ओल्या डोक्याचे आणि कपाळावर चिटकलेले केस मोकळे करतांना त्याच्या चिकण्या
चेह-यावर सभ्य स्मित झळकलं. तो कपडे बदलायला हे सांगून नाही म्हणू लागला,
की पाऊस त्याचं काहींच करूं शकंत नाही.
“मला काहीही ऐकायचं नाहीये,”
पिलातने म्हटलं आणि टाळी वाजवून लपलेल्या सेवकाला बोलावलं. त्याला
आगंतुकाची सेवा करण्यास आणि मग लगेच खायला काहीतरी गरम देण्यास सांगितलं. केस
कोरडे करायला, कपडे बदलायला आणि दुसरे, कोरडे जोडे घालून स्वतःला व्यवस्थित करायला न्यायाधीशाच्या पाहुण्याने
खूपंच कमी वेळ घेतला आणि केसांचा भांग पाडून, कोरड्या चपला
घालून आणि कोरड्या लाल मिलिट्री कोटांत तो लवकरंच बाल्कनीत आला.
आतापर्यंत सूर्य
येर्शलाइमला परतला होता आणि भूमध्य सागरांत बुडण्याआधी न्यायाधीशाच्या घृणेचे
पात्र असलेल्या ह्या शहरावर आपल्या अंतिम किरणा पसरंत बाल्कनीच्या पाय-यांवर सोनं
लुटवंत होता. कारंजे पुनर्जीवित झाले होते आणि आपल्या सम्पूर्ण ताकदीनिशी गाऊ
लागले होते. कबुत्तर गुटर गूँ करत रेतीवर फुदकंत होते;
ओल्या रेतीवर चोच मारंत काही तरी धुंडत होते. लाल द्रवाचं छोटंस
डबकं कोरडं केलेलं होतं, फुटक्या सुरईचे तुकडे नेलेले होते
आणि टेबलवर गर्मागरम माँस ठेवलेलं होतं, ज्यांतून वाफ़ निघंत
होती.
“हुकुम करा,
न्यायाधीश, मी तयार आहे,” आगंतुकाने टेबलाजवळ येत म्हटलं.
“पण,
जो पर्यंत तुम्हीं बसंत नाही आणि दारू पीत नाही, मी तुम्हांला काहीही सांगणार नाहीये,” मोठ्या
प्रेमाने न्यायाधीशाने उत्तर दिलं आणि त्याला दुस-या कोचावर बसण्याची खूण केली.
आगंतुक कोचावर पसरला,
सेवकाने त्याच्या प्याल्यांत लाल-घट्ट दारू भरली. दुस-या सेवकाने
सावधगिरीने पिलातच्या खांद्यावर झुकून न्यायाधीशाचा प्याला भरला. नंतर त्याने
खुणेने दोन्हीं सेवकांना तिथून जायला सांगितलं. जोपर्यंत आगंतुक खात-पीत होता,
पिलात डोळे बारीक करून दारूचे घोट घेत आपल्या पाहुण्याकडे बघंत
होता. पिलातच्या समोर उपस्थित व्यक्ति मध्यम वयाचा होता, त्याचा
चेहरा गोड, आकर्षक, चिकणा होता,
नाक जाड होतं. केसांचा रंग अजबंच होता. आता वाळंत असताना ते भुरे
दिसंत होते. आगंतुकाच्या नागरिकतेबद्दल सांगणंसुद्धां कठीण होतं. त्याच्या
चेह-याची विशेषता होती – त्यावर असलेला सहृदयतेचा भाव, ज्याच्याशी
विसंगंत होते डोळे, किंवा असं म्हणतां येईल की त्याच्याशी
वार्तालाप करणा-या व्यक्तीकडे बघण्याची त्याची पद्धंत. आपल्या छोट्या-छोट्या
डोळ्यांना तो साधारणपणे विचित्र, अर्धवट उघडलेल्या, किंचित सुजलेल्या पापण्यांखाली लपवून ठेवायचा. तेव्हां ह्या डोळ्यांमधे
निष्पाप खोडकर भाव तरळायचा. कदाचित पिलातचा पाहुणा विनोदप्रिय होता. पण कधी-कधी
ह्या हास्याच्या चमकत्या लकेरीला तो बाहेर ढकलून द्यायचा आणि आपल्या पापण्या पूर्ण
उघडून त्याच्याशी वार्तालाप करणा-यावर अचानक आणि एकटक बघायचा, जणु त्याच्या नाकावर असलेला एखादा लपलेला डाग शोधतोय. हे फक्त एकंच
क्षणासाठी व्हायचा, दुस-यांच क्षणी पापण्या पुन्हां
झुकायच्या, अर्धवट बंद व्हायच्या आणि त्यांत पुन्हां तरळून
जायची सहृदयता आणि खोडकर बुद्धिमत्ता.
पाहुण्याने दुसरा प्यालापण
नाकारला नाही. मजा घेत-घेत काही मासे खाल्ले, उकडलेल्या
भाज्यांचा स्वाद घेतला आणि मांसाचा एक तुकडापण खाल्ला.
तृप्त झाल्यावर त्याने
दारूची तारीफ केली:
“अति उत्तम वस्तू आहे,
न्यायाधीश, पण ही ‘फालेर्नो’1तर नाहीं?”
“ त्सेकूबा’2
– तीस वर्ष जुनी,” खूप प्रेमाने
न्यायाधीशाने सांगितलं.
पाहुण्याने
छातीवर हात ठेवंत आणखी काहीही खाण्यास नकार दिला आणि म्हटलं की त्याने पोटभर
खाल्लंय. तेव्हां पिलातने आपला प्याला भरला. पाहुण्यानेपण तसंच केलं. दोघांनी
आपल्या-आपल्या प्याल्यांतून थोडी थोडी दारू माँसाच्या पदार्थात टाकली.
न्यायाधीशाने
प्याला उंचावंत म्हटलं:
“आपल्या साठी, तुझ्यासाठी,
रोमचा पिता, सर्वाधिक प्रिय आणि सर्वोत्तम व्यक्ति,
सीज़र साठी!”
आणि ह्याच्यानंतर
प्याला रिकामा केला. अफ्रीकी सेवकांनी फळं आणि सुरया सोडून बाकी सगळी सामग्री
टेबलावरून काढून घेतली. स्तंभांच्या बाल्कनीत आपल्या पाहुण्यासोबत तो एकटाच उरला.
“तर,” पिलातने हळूंच म्हटलं, “शहरांतल्या वातावरणाबद्दल
काय म्हणतोय?”
त्याने नकळतंच
आपली दृष्टी तिकडे फिरवली, जिथे उद्यानाच्या मागे, उंच स्तंभांच्या इमारती आणि समतल छप्परं सूर्याच्या अंतिम किरणांमधे जळंत
होते.
“मला वाटतं, न्यायाधीश,”
पाहुण्याने उत्तर दिलं, “की येर्शलाइमचं
वातावरण आता संतोषजनक आहे.”
“तर, असं
समजायचं कां, की आता कोणत्याही प्रकारच्या गडबडीची आशंका
नाहीये?”
“समजूं शकता,” न्यायाधीशाकडे प्रेमाने बघंत पाहुण्याने उत्तर दिलं, “फक्त एकाच्याच जोरावर – सीज़र महानच्या शक्तीच्या जोरावर.”
“हो, ईश्वर
त्यांना दीर्घायू करो,” पिलातने पट्कन पुढे म्हटलं, “आणि समग्र शांति प्रदान करो.” थोडा वेळ चुप राहिल्यावर तो पुढे म्हणाला,
“तुम्हांला असं वाटतंय का की सेनांना काढून घ्यावं?”
“मला वाटतं, की
विद्युत गतीने प्रहार करणारी तुकडी काढूं शकता,” पाहुण्याने
उत्तर देऊन पुढे म्हटलं, “निघायचा आधी जर तिने एकदा शहरांत
परेड केली तर चांगलं राहील.”
“खूप चांगला
विचार आहे,”
न्यायाधीशाने सहमति दर्शवंत म्हटलं, “परवा मी
तिला सोडून देईन आणि स्वतः सुद्धां चालला जाईन, आणि – मी
बाराही देवांची3 आणि पालक देवतांची4 शप्पथ
घेऊन सांगतो की हे आजंच करता येण्यासाठी मी बरंच काही दिलं असतं.”
“न्यायाधीशाला
येर्शलाइम आवडंत नाही का?” पाहुण्याने सहृदयतेने विचारलं.
“मेहेरबान,” स्मितकरंत न्यायाधीश म्हणाला, “सम्पूर्ण पृथ्वीवर
ह्याच्यापेक्षा बेकार शहर दुसरं कोणतंच नाहीये. हवामानाबद्दल तर मी बोलतंच नाहीये!
प्रत्येक वेळेस, जेव्हां मी इथे येतो, मी
आजारीच पडतो. ही तर अर्धीच व्यथा आहे. पण त्यांचे हे उत्सव – जादुगार, सम्मोहक, मांत्रिक, तांत्रिक,
मूर्तीपूजक...पागल आहेत, पागल! त्या एका
रक्षणकर्ता(मशीहा)5लांच घ्या, ज्याची ते
ह्यावर्षी वाट बघंत होते! प्रत्येक क्षणाला असं वाटंत की एखादा अप्रिय रक्तपात
बघावा लागतो की काय. नेहमी सेनांना फिरवंत राहा, लोकांचे
रडगाणे आणि तक्रारी वाचंत राहा, ज्यांतील अर्ध्यातर तुमच्या
स्वतःच्याच विरुद्ध असतात! मान्य करा, हे सगळं खूप कंटाळवाण
आहे. ओह, जर मी सम्राटाच्या सेवेत नसतो तर...”
“हो, येथील
उत्सवांचा काळ कठीण असतो,” पाहुण्याने सहमति दाखवली.
“मी अगदी
हृदयापासून कामना करतो की ते लवकरंच संपावे,” पिलातने उत्साहाने म्हटले,
“मला सीज़ेरियाला तरी जाता येईल. विश्वास करा, हिरोदचा
ही भुतडी रचना...” न्यायाधीशाने हात हलवंत स्तंभांकडे खूण केली, ज्याने हे स्पष्ट झालं, की तो महालाबद्दल सांगतोय,
“मला पूर्णपणे पागल करून टाकते. मी इथे रात्री नाही घालवूं शकंत.
सम्पूर्ण जगांत ह्याच्याहून विचित्र स्थापत्यकलेचा नमूना आणखी कुठे नाही सापडणार.
जाऊं द्या, चला, कामाबद्दल बोलूं या.
सगळ्यांत आधी, हा दुष्ट बार-रब्बान – तुम्हांला त्याची काळजी
नाही वाटंत?”
पाहुण्याने आपली
नजर न्यायाधीशाच्या गालावर टाकली, पण तो कपाळ्यावर आठ्या टाकून
कंटाळवाण्या नजरेने दूर कुठेतरी बघंत होता, शहराच्या त्या
भागाकडे, जो त्याच्या पायांखाली होता आणि संध्याकाळच्या
संधिप्रकाशांत हळू-हळू विझंत होता. पाहुण्याची नजरपण विझली, त्याच्या
पापण्या झुकल्या.
“असं म्हणता येईल, की
बार आता धोकादायक नाही राहिला, केकरासारखा झालांय,” पाहुण्याने सांगायला सुरुवात केली तर त्याच्या गोल चेह-यावर आठ्या पडल्या, “त्याच्यासाठी आता विद्रोह करणं
इतकं सोपं नाहीये.”
“खूप प्रसिद्ध
आहे कां?”
पिलातने हसंत विचारलं.
“न्यायाधीश, नेहमी
सारखंच, हा प्रश्न खूप बारीकीने समजतांयत!”
“पण, तरीही,
आपल्याला...” न्यायाधीशाने चिंतित स्वरांत आपलं पातळ, लांब, काळ्या रत्नाची अंगठी घातलेलं बोट वर करंत
म्हटलं.
“ओह, न्यायाधीश,
विश्वास ठेवा, जोपर्यंत मी जूडियांत आहे,
बार मला कळल्याशिवाय एक पाऊलसुद्धां उचलूं शकंत नाही, माझे गुप्तचर त्याच्या मागे आहेत.”
“आता मला चैन
पडला – तसंही जेव्हां तुम्ही इथे असता, तेव्हां मी नेहमीच निश्चिंत
असतो.”
“आपण खूप दयाळु
आहांत,
न्यायाधीश!”
“आणि आता, कृपा
करून मला मृत्युदण्डाबद्दल सांगा,” न्यायाधीशाने म्हटलं.
“तुम्हांला कोणची
विशिष्ट माहिती हवीय?”
“गर्दींत कुठे
अप्रसन्नतेचे,
रागाचे लक्षणं तर नाही दिसले? खास गोष्ट हीच
आहे.”
“बिल्कुल नाही.”
पाहुण्याने उत्तर दिलं.
“छान. तुम्हीं
स्वतः खात्री करून घेतली कां, की मृत्यु झाला आहे?”
:ह्या
बाबतीत न्यायाधीशाने निश्चिंत राहावे.”
“आणखी
सांगा...सुळावर चढवण्याच्या आधी त्यांना पाणी पाजलं होतं?”6
पाहुण्याने डोळे
बंद करंत म्हटलं,
“हो, पण त्याने पिण्यास नकार दिला.”
“म्हणजे कोणी?” पिलातने विचारलं.
“क्षमा करा, महाबली!”
पाहुणा उद्गारला, “मी त्याचं नाव नाही घेतलं कां? हा-नोस्त्री!”
“मूर्ख!” पिलातने
न जाणे कां,
तोंड वेंगाडंत म्हटलं. त्याचा डावा डोळा फडकला, “सूर्याच्या आगेंत होरपळून मरणं! कायद्याप्रमाणे तुम्हांला जे देण्यांत
येते, त्याला नाही कां म्हणायचं? त्याने
कश्या प्रकारे नकार दिला?”
“त्याने म्हटलं,” पाहुण्याने पुन्हां डोळे बंद करंत म्हटलं, “की तो
धन्यवाद देतो आणि ह्या गोष्टीसाठी दोष नाहीं देत, की त्याचं
जीवन हिरावून घेतलं जात आहे.”
“कोणाला?” पिलातने खोल आवाजांत विचारलं.
“महाबली, ते
त्याने नाही सांगितलं.”
“त्याने
सैनिकांच्या उपस्थितींत काही उपदेश देण्याचा प्रयत्न केला कां?”
“नाही, महाबली,
ह्यावेळेस तो बोलंत नव्हता. फक्त एकंच गोष्ट जी त्याने सांगितली,
ती ही, की मनुष्याच्या पापांमधे भीरुतेला तो
सगळ्यांत भयानक पाप मानतो.”7
“असं कां म्हटलं?” पाहुण्याने अचानक चिरका आवाज ऐकला.
“हे समजणं कठीण
होतं. तसंही,
नेहमीसारखा, तो खूप विचित्रपणे वागंत होता.”
“विचित्रपणे कां?”
“पूर्ण वेळ तो
कोणाच्या ना कोण्याच्या डोळ्यांत बघून हसंत होता, हरवल्यासारखं हसू...”
“आणखी काही नाही?” भसाड्या आवाजाने विचारलं.
“आणखी काही
नाही.”
प्याल्यांत दारू
ओततांना न्यायाधीशाच्या हात प्याल्याला लागला. पूर्ण पिऊन झाल्यावर त्याने म्हटलं, “आता ऐक मुख्य गोष्ट: जरी, कमीत कमी आत्तां, आपण त्याचे अनुयायी, शिष्य शोधूं नाही शकंत, पण हे सांगणसुद्धां बरोबर नाही, की ते नाहींत!”
पाहुणा मान खाली
करून लक्षपूर्वक ऐकंत होता.
“कोण्या
अनपेक्षित आश्चर्यांना टाळण्यासाठी,” न्यायाधीश पुढे म्हणाला, “मी तुम्हांला विनंती करतो, की काहीही हल्ला न करतां
पृथ्वीवरून त्या तिन्हीं मृतकांचे शरीर गुप्तपणे काढून त्यांना गुपचाप आणि होहल्ला
न करतां दफ़न करावं, म्हणजे त्यांच्या बद्दल काही कुजबूजही
होणार नाही.”
“जशी आज्ञा, महाबली,”
पाहुण्याने म्हटलं आणि तो उठंत म्हणाला, “ह्या
कामाशी निगडीत जवाबदारी आणि जटिलता बघतां, मला लगेच जाण्याची
परवानगी द्यावी.”
“नाही, आणखी
थोडा वेळ थांबा,” पिलातने खुणेने आपल्या पाहुण्याला थांबवंत
म्हटलं, “आणखी दोन प्रश्न आहेत. पहिला – गुप्तचर प्रमुखाच्या
रूपांत ह्या कठीण कामांत तुमच्या सेवेची आणि सहयोगाची प्रशंसा करताना, जे तुम्हीं जूडियाच्या न्यायाधीशाला अर्पण केलेंत, मला
रोमला तुमची सिफारिश करण्यांत प्रसन्नता होईल.”
ह्यावर
पाहुण्याचा चेहरा लाल झाला. तो उठून न्यायाधीशाचं अभिवादन करंत म्हणाला:
“मी तर फक्त
सम्राटाच्या प्रति आपल्या कर्तव्याचं पालन करतोय!”
“ पण मी
तुम्हांला विनंती करणार होतो,” महाबलीने पुढे म्हटलं, “की जर तुम्हांला पदोन्नति देऊन दुस-या ठिकाणी पाठवण्यांत आलं, तर नाही म्हणून सांगा आणि इथेच राहा. मला तुमच्यापासून दूर नाही व्हायचंय.
तुम्हांला, नक्कीच, वेगळ्या प्रकाराने
पुरस्कृत करण्यांत येईल.”
“मला तुमच्या
आधीन सेवा करायला खूप प्रसन्नता होईल, महाबली.”
“मला आनंद झाला, तर,
आता, दुसरा प्रश्न. ह्याचा संबंध त्याच्याशी
आहे, काय नाव...हो, किरियाथच्या
जूडासशी.
आता पाहुण्याने
आपल्या विशिष्ट नजरेने न्यायाधीशाकडे पाहिलं, आणि, जसं
स्वाभाविक होतं, लगेच नजर झुकवली.
“म्हणतांत की,” आवाज खाली करंत न्यायाधीश म्हणाला, “त्याने ह्या
माथेफिरू दार्शनिकाला आपल्या घरी ठेवण्यासाठी पैसे घेतले होते?”
“पैसे मिळतील,” गुप्तचर प्रमुखाने हलक्या आवाजांत उत्तर दिलं.
“काय फार मोठी
रकम आहे?”
“हे कुणालांच
माहीत नाही,
महाबली.”
“तुम्हांलापण
नाही?”
महाबलीने आश्चर्याने विचारलं.
“हो, मलापण
नाही,” पाहुण्याने शांतिपूर्वक उत्तर दिलं, “पण मला येवढं माहीत आहे, की त्याला हे पैसे आज
मिळणारेत. आज त्याला कायफाच्या महालांत बोलवणारेत.”
“ओह, किरियाथचा
हावरंट म्हातारा,” हसंत महाबलीने म्हटलं, “तो म्हातारा आहे नं?”
“न्यायाधीश कधीच
चूक करंत नाहींत,
पण ह्यावेळेस तुमचा अंदाज बरोबर नाहीये,” पाहुण्याने
प्रेमाने उत्तर दिलं, “किरियाथचा तो माणूस तरूण आहे.”
“असं नका म्हणू!
तुम्हीं त्याचं विवरण मला देऊं शकतां? तो माथेफिरू आहे?”
“ओफ, नाही,
न्यायाधीश!”
“बरं, आणखी
काही?”
“खूप सुंदर आहे.”
“आणखी?
कदाचित त्याला काही शौक असेल?”
“येवढ्या मोठ्या
शहरांत सगळ्यांना चांगल्या प्रकारे ओळखणं खूप कठीण आहे, न्यायाधीश...”
“ओह नाही, नाही,
अफ्रानीयस! स्वतःच्या योग्यतेला इतकं कमी नका समजू!”
“त्याची एक आवड
आहे,
न्यायाधीश,” पाहुण्याने थोडं थांबून म्हटलं,
“पैशांचा लोभ.”
“आणि तो करतो काय?”
अफ्रानियसने नजर
वर केली,
थोडा विचार करून म्हणाला, “तो आपल्या एका
नातेवाइकाच्या दुकानांत काम करतो, जिथे व्याजावर पैसे
देतांत.”
“ओह, बरं,
बरं, बरं, बरं!” आता
न्यायाधीश चुप झाला, त्याने नजरेने बघून घेतलं, की बाल्कनींत कोणी नाहीये, मग हळूंच म्हणाला,
“आता ऐका, विशेष मुद्दा...मला आज अशी माहिती
मिळालीये, की आज रात्री त्याला मारून टाकणारेत.”
आता पाहुण्याने
आपली विशिष्ट नजर न्यायाधीशावर टाकली, फक्त टाकलींच नाही, पण काही वेळ त्याला तसंच बघंत राहिला आणि मग म्हणाला, “तुम्हीं, न्यायाधीश, माझी भरघोस
प्रशंसा करून टाकली. मला वाटंत की मी त्या लायकीचा नाहीये, माझ्याकडे
अशी काही माहिती नाहीये.”
“तुम्हांला तर
सर्वोच्च पुरस्कार मिळायला पाहिजे,” न्यायाधीशाने उत्तर दिलं, “पण अशी माहिती अवश्य मिळालीये.”
“मी विचारण्याचं
साहस करूं शकतो का, की ही माहिती तुम्हांला कुणाकडून मिळाली?”
“आत्ता आज हे
संगायला विवश नका करू, विशेषकरून तेव्हां, जेव्हां
ती अकस्मात् मिळालीय आणि तिची अजून पुष्टी नाही झालीये. पण मला सगळ्यांच शक्यतांवर
नजर ठेवायचीय. हेच माझं कर्तव्य आहे आणि मी भविष्यांत होणा-या घटनांबद्दलच्या
पूर्वाभासाला नाकारूं शकंत नाही, कारण की त्याने मला
आजपर्यंत कधीच धोका दिलेला नाहीये. माहिती ही मिळालीय, की
हा-नोस्त्रीच्या गुप्त मित्रांपैकी एक, ह्या सूदखोराच्या
कृतघ्नतेने कुपित होऊन, त्याला आज रात्री मारून टाकण्याची
आपल्या मित्रांबरोबर योजना बनवतोय, आणि तो बेईमानीबद्दल
मिळालेल्या पुरस्काराची धनराशी धर्मगुरूसमोर हे लिहून फेकणार आहे: ‘पापाचा पैसा परंत करतोय!’
”
ह्याच्यानंतर
गुप्तचर सेवेच्या प्रमुखाने महाबलीवर एकदासुद्धां आपली विशेश नजर नाही टाकली आणि
डोळे बारीक करून त्याचं बोलणं ऐकंत राहिला. पिलात बोलंत होता:
“कल्पना करा, काय
धर्मगुरूला उत्सवाच्या रात्री असली भेट स्वीकार करताना प्रसन्नता वाटेल?”
पाहुण्याने स्मित
करंत उत्तर दिलं,
“फक्त अप्रसन्नतांच नाही वाटणार, पण माझ्या
विचाराने तर त्यामुळे मोठा विवाद उत्पन्न होईल.”
“मलाही असंच
वाटंत,
म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की ह्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे किरियाथच्या जूडासच्या सुरक्षेचा प्रबंध करा.”
“महाबलीच्या
आज्ञेचे पालन होईल,” अफ्रानियस म्हणाला, “पण
मी महाबलीला सांत्वना देऊं इच्छितो, की ह्या दुष्टांच
षडयंत्र सफल होणं कठीण आहे!” असं म्हणता-म्हणता पाहुणा मागे वळला आणि बोलंत राहिला,
“जरा विचार करा, एका माणसाचा पाठलाग करणं,
त्याला मारून टाकणं, हे माहीत करणं की त्याला
किती पैसे मिळालेत, हे पैसे कायफाकडे परंत पाठवण्याचं
दुःसाहस करणं, आणि हे सगळं एका रात्रीत? आज?”
“हो, विशेष
मुद्दा हाच आहे की त्याला आजचं रात्री मारून टाकतील,” हट्टीपणाने
पिलातने पुनरावृत्ति केली, “मला पूर्वाभास झालांय, मी तुम्हांला सांगतोय, की कधीच असं नाही झालं,
की त्याने मला धोका दिला असेल.” आता न्यायाधीशाच्या चेह-यावर किंचित
थरथर झाली, आणि त्याने लगेच आपले हात चोळले.
“ऐकतोय,” पाहुणा नम्रतेने म्हणाला, तो उठून सरळ उभा राहिला
आणि अचानक गंभीरतेने विचारूं लागला, “तर, मारून टाकतील, महाबली?”
“हो,” पिलातने उत्तर दिलं, “आणि मला फक्त तुमच्या
आश्चर्यजनक कार्यदक्षतेवर विश्वास आहे.”पाहुण्याने कोटाच्या खाली आपला भारी पट्टा
व्यवस्थित केला आणि म्हणाला, “मी सम्मानित झालोय, तुमच्या स्वास्थ्य आणि प्रसन्नतेची कामना करतो.”
“ओह, हो,”
पिलात हळूंच उद्गारला, “मी तर अगदीच विसरलो!
मला तुम्हांला काहीतरी परंत करायचंय!...”
पाहुणा
बुचकळ्यांत पडला.
“नाही, न्यायाधीश
तुम्हांला माझं काहीही देणं नाहीये.”
“असं कसं देणं
नाहीये! जेव्हां मी येर्शलाइमला आलो होतो, आठवा, भिका-यांची भीड...मी त्यांना काही पैसे देणार होतो, पण
माझ्याकडे नव्हते, तेव्हां मी तुमच्याकडून घेतले होते.”
“ओह, न्यायाधीश,
तुम्हीं कुठली क्षुल्लक गोष्ट घेऊन बसलांत!”
“क्षुल्लक
गोष्टींचीसुद्धां आठवण ठेवावीच लागते.”
पिलात वळला, त्याने
आपल्या मागे असलेल्या खुर्चीवर पडलेला आपला कोट उचलला, त्यातून
चामड्याची बैग काढली आणि पाहुण्याकडे दिली. तो वाकला, आणि
बैग घेऊन आपल्या कोटाच्या आत लपवली.
“मला
दफन-विधीच्या विवरणाची प्रतीक्षा राहील, तसंच किरियाथच्या जूडासच्या
बाबतीतसुद्धां मला आजंच रात्री सांग. ऐकतोयंस अफ्रानियस, आजंच.
पहारेदाराला मला उठवण्याची आज्ञा दिली जाईल...तुम्हीं आल्याबरोबर. मी तुमची
प्रतीक्षा करीन.”
“मी सम्मानित
झालो!” गुप्तचर सेवेच्या प्रमुखाने म्हटलं आणि तो वळून बाल्कनीतून चालला गेला.
ओल्या रेतीवर त्याच्या जोड्यांची करकर ऐकूं आली; मग त्याचे पाय, धड आणि शेवटी टोपसुद्धां लुप्त झाले. आता कुठे न्यायाधीशाने बघितलं,
की सूर्य कधीच अस्त झालाय आणि अंधार पडतोय.
*********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें