एकतीस
वरोब्योव1 टेकड्यांवर
वादळ काहीही मागमूस न सोडतां निघून गेलं आणि
सम्पूर्ण मॉस्कोला समेटणारं इंद्रधनुष्य आकाशांत प्रकट झालं, ज्याचं
एक टोक मॉस्को नदीचं जलप्राशन करंत होतं. वर टेकड्यांवर दोन उपवनांच्या मध्यभागांत
तीन सावल्या दिसल्या. वोलान्द, बेगेमोत आणि करोव्येव काळ्या
घोड्यांवर बसले होते आणि नदीच्या पलीकडे पसरलेल्या शहराकडे बघंत होते, ज्याच्यावर तुटका सूर्य पश्चिमेकडे उघडंत असलेल्या हज्जारो खिडक्यांत आणि
खेळण्यासारख्या दिवीच्यी मॉनेस्ट्रीवर2 चमकंत होता.
हवेत सळसळ झाली
आणि अजाज़ेलो,
ज्याच्या कोटाच्या काळ्या शेपटीच्या सावलींत मास्टर आणि मार्गारीटा
उडंत होते, त्यांच्याबरोबर घोड्यावरून उतरून वाट बघंत
असणा-या ह्या तिघांच्या जवळ आला.
“तुम्हांला त्रास
द्यावा लागला,
मार्गारीटा निकोलायेव्ना आणि मास्टर,” वोलान्दने
शांतता भंग करंत म्हटलं, “पण तुम्हीं माझ्याबद्दल कोणतीही
चुकीची धारणा नका करून घेऊं. मला नाही वाटंत की तुम्हांला नंतर पश्चात्ताप होईल.
तर...” तो एकट्या मास्टरला म्हणाला, “शहराचा निरोप घ्या.
निघण्याची वेळ झाली आहे.”
वोलान्दने काळ्या
पोलादी हातमोजे घातलेल्या हाताने तिकडे खूण केली, जिथे नदीच्या पलीकडे काच
वितळवंत हज्जारो सूर्य चमकंत होते; जिथे ह्या सूर्यांच्या
वरती दाटलं होतं धुकं, धूळ, दिवसभरांत
शिणलेल्या शहराचा घाम.
मास्टर
घोड्यावरून उतरला,
बाकी लोकांना सोडून टेकडीच्या कड्याकडे धावला. त्याच्या मागे काळा
कोट जमिनीवर घासंत जात होता. मास्टर शहराकडे पाहूं लागला. पहिले काही क्षण
निराशेचे भाव जागृत झाले, पण लगेच त्यांची जागा घेतली एका
गोड उत्तेजनेने, भटक्या जिप्सी उत्तेजनेने.
“नेहमीसाठी! हे
समजलं पाहिजे...” मास्टर कुजबुजला आणि त्याने आपल्या रुक्ष, तिडलेल्या
ओठांवर जीभ फिरवली. तो हृदयांत उठणा-या प्रत्येक भावनेचं आकलन करंत होता. त्याची
उत्तेजना शांत झाली; खोल, आहत
अपमानाच्या भावनेने तिला पिटाळून लावलं. पण ही सुद्धां थोडाच वेळ थांबली; आता तिथे प्रकट झाली एक दर्पयुक्त उदासीनता, त्यानंतर
एका चिर शांतीची अनुभूति झाली.
ते सगळे चुपचाप
मास्टरची वाट बघंत होते. हा समूह बघंत होता, की लांब, काळी आकृती टेकडीच्या कड्यावर उभी राहून कसे हाव-भाव प्रदर्शित करते आहे –
कधी डोकं वर करतेय, जणु पूर्ण शहराला आपल्या दृष्टिक्षेपांत
घेतेय; कधी डोकं खाली करतेय, जणु पायांच्या
खालच्या चिरडलेल्या गवताचं अवलोकन करते आहे.
शांततेला भंग
केलं कंटाळलेल्या बेगेमोतने. म्हणाला, “मालक, मला
निघायच्या आधी शिट्टी वाजवायची परवानगी द्या.”
“तू महिलेला
घाबरवून टाकशील,”
वोलान्दने उत्तर दिलं, “आणि लक्षांत ठेव की
तुझ्या आजच्या खोड्या संपलेल्या आहेत.”
“आह, नाही,
नाही, महाशय,” कमरेवर
हात ठेवून खोगीरावर तिरपी बसलेली मार्गारीटा उद्गारली, तिच्या
कोटाचं टोकदार शेपूट जमिनीवर लोळंत होतं, “त्याला परवानगी
द्या. शिट्टी वाजवूं द्या. मला लांबच्या प्रवासावर जाण्याआधी उदास वाटतंय. महाशय,
हे स्वाभाविक आहे का, तेव्हांसुद्धां, जेव्हां माणसाला माहीत असतं, की ह्या प्रवासानंतर
त्याला सुख भेटणार आहे? तो आपल्याला हसवेल, नाहीतर मला भीती वाटतेय, की मी रडू लागेन आणि
प्रवासाच्या आधीच सगळ्या केरांत जाईल.”
वोलान्दने
बेगेमोतकडे बघून डोकं हालवलं, तो एकदम रंगात आला, जमिनीवर उडी मारली; तोंडांत बोटं ठेवून गाल फुगवंत
त्याने शिट्टी वाजवली. मार्गारीटाच्या कानांत घंट्या वाजूं लागल्या. तिचा घोडा
मागच्या पायांवर उभा राहिला, उपवनांत झांडाच्या वाळक्या
फांद्या पडंत असल्याची सरसर झाली; चिमण्या-कावळ्यांचा एक
मोठा झुण्ड फडफडंत उडून गेला. धुळीचं बवण्डर उठून नदीच्या जवळ पोहोचलं आणि
काठा-काठाने जात असलेल्या ट्रामगाडींत बसलेल्या काही मुशाफिरांच्या टोप्या उडून
पाण्यांत पडल्या. मास्टर ह्या शिट्टीने थरारला, पण तो वळला
नाही, तर जास्तंच व्याकुळतेने आकाशाकडे हात उंचावून हाव-भाव
प्रदर्शित करूं लागला – जणु शहराला धमकावतोय. बेगेमोतने गर्वाने इकडे-तिकडे
पाहिलं.
“शिट्टी तर वाजली, वादंच
नाही,” सौजन्याने करोव्येव म्हणाला, “खरंच
शिट्टी वाजली, पण खरं सांगायचं तर अगदीच मध्यम दर्जाची
शिट्टी होती!”
“मी काही
कॉयर-मास्टर थोडांच आहे,” बेगेमोतने काहीशा घमेण्डीत खिल्ली उडवंत
म्हटलं, त्याने गाल फुगवले आणि अचानक मार्गारीटाकडे बघून
डोळा मारला.
“चला, मी
आपल्या जुन्या आठवणीने प्रयत्न करतो,” करोव्येव म्हणाला,
त्याने हात पुसले आणि बोटांवर फूक मारली.
“तू बघ, बघ
बरं,” आपल्या घोड्यावरून वोलान्दचा गंभीर आवाज ऐकू आला,
“कोणाला नुक्सान नको पोहोचायला.”
“मास्टर, विश्वास
ठेवा,” करोव्येवने हृदयावर हात ठेवून म्हटलं, “गम्मत, फक्त गम्मतीसाठी...” आता तो एकदम उंच-उंच
होऊं लागला, जणु इलास्टिकचा बनलाय; उजव्या
हाताच्या बोटांनी त्याने एक अजबशी आक्रति बनवली, एखाद्या
स्क्रूसारखा गोल-गोल फिरला आणि मग उलंट दिशेला फिरंत अचानक शिट्टी वाजवली.
ह्या शिट्टीच्या
आवाजाला मार्गारीटा ऐकलं नाही, पण पाहिलं, जेव्हां
ती आपल्या फुंकारणा-या घोड्यासकट दहा हात दूर फेकली गेली. तिच्या बाजूचं ओक वृक्ष
मुळासकट उपटून पडलं होतं आणि नदी पर्यंतची जमीन भेगांनी भरून गेली होती. नदीकाठचा
सगळा भाग, घाट आणि रेस्टॉरेन्टसकट, नदीत
सामावला होता. नदीचं पाणी उकळलं, उसळलं आणि त्याने
जल-ट्रामगाडीला निर्दोष मुशाफिरांसकट समोरच्या खालच्या, हिरव्या
किना-यावर फेकून दिलं. मार्गारीटाच्या पायांजवळ करोव्येवच्या शिट्टीने मरून पडलेला
पक्षी होता. ह्या शिट्टीने मास्टरला घाबरवलं. त्याने डोकं धरलं आणि लगेच वाट
बघणा-यांच्या जवळ धावला.
“हँ, तर
सगळे हिशेब चुकते केले? निरोप घेतला?” वोलान्दने
घोड्यावर बसल्या-बसल्या विचारलं.
“हो, घेतला,”
मास्टरने म्हटलं आणि शांत, पण निडर भावनेने
सरळ वोलान्दच्या चेह-याकडे बघितलं.
तेव्हां
टेकड्यांवर तुतारीसारखा वोलान्दचा भयंकर आवाज घुमला, “चला!!” आणि घुमली
बेगेमोतची तीव्र शिट्टी आणि हास्य.
घोडे लपकले, घोडेस्वार
वर हवेंत उठून वेगाने जाऊं लागले. मार्गारीटाला जाणवंत होतं, की तिचा घोडा कसा
बेफाम होऊन तिला नेतो आहे. वोलान्दच्या चोगा ह्या घोडदळाला समेटंत उडंत होता;
चोगा संध्याकाळच्या आकाशाला झाकंत जात होता. जेव्हां क्षणभरासाठी
काळं पांघरुण दूर झालं, तर मार्गारीटाने वळून मागे पाहिलं.
आणि तिला दिसलं की फक्त मागे राहिलेले रंगी-बिरंगी मीनारच त्यांच्यावर गिरक्या
घेणा-या विमानांसह लुप्त नव्हते झाले, सम्पूर्ण शहरंच गायब
झालेलं होतं. ते केव्हांच जमिनींत सामावलं होतं आणि आपल्यामागे सोडून गेलं होतं
फक्त दाट धुकं.
**********
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें